Thursday, 14 September 2017

Text-AIR News Bulletin HLB, Aurangabad 14.09.2017 11.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१४ सप्टेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****

देशातल्या पहिल्या मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचा भूमिपूजन सोहळा आज अहमदाबाद इथं जपनाचे पंतप्रधान शिंजो आबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यावेळी उपस्थित होते. या बुलेट ट्रेनची सुरवात म्हणजे नव भारताची सुरुवात असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. जपान मेक इन इंडियासाठी प्रतिबद्ध असल्याचं शिंजो आबे यांनी यावेळी सांगितलं. तर या बुलेट ट्रेन मुळे देशात मोठं परिवर्तन होणार असून, हा एक ऐतिहासिक दिवस असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ५०८ किलोमीटरचा हा प्रवास असून, दोन ते अडीच हजार तिकीटाचं भाडं असणार आहे.

****

जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात पाकिस्तांनी सैन्यानं काल रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यावेळी सीमेपलिकडून झालेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा बलाच्या दोन जवानांसह पाच जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. भारतीय जवानांनीही या हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर दिलं. मागच्या पाच दिवसात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन होण्याची ही चौथी वेळ आहे.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना केली. या समितीमध्ये दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, गिरीश महाजन आणि संभाजी पाटील निलंगेकर यांचा समावेश आहे. मराठा समाजाचे नेते आणि शासन यांच्यात समन्वय राखून, आरक्षणाबाबत तोडगा काढण्याची जबाबदारी या उपसमितीवर सोपवण्यात आली आहे.

****

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत उद्या १५ सप्टेंबरला संपणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठीचे अर्ज अजून सादर केलेले नाहीत त्यांनी आज दिवसभरात अर्ज सादर करावेत, असं आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे.

****

कोरिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू पी कश्यप, बी साई प्रणित आणि समीर वर्मानं पुरुष दुहेरीच्या दुसर्या फेरीत प्रवेश केला आहे. पी व्ही सिंधूचा महिला दुहेरीतल्या दुसर्या फेरीचा सामना आज थायलंडच्या निताचाओ जिंदपॉल विरुद्ध होणार आहे.

****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 08 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...