आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१८ एप्रिल
२०१८ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आपल्या युरोप दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात चार दिवसांच्या भेटीसाठी आज
ब्रिटनमध्ये पोहोचले आहेत. तिथे ते राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांच्या बैठकीत भाग घेणार
आहेत. पंतप्रधान आज ब्रिटनसोबतच्या द्विपक्षीय चर्चेसाठी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा
मे यांची भेटही घेणार आहेत.
****
दरम्यान,
पंतप्रधानांनी, थोर तत्वज्ञ आणि समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त
त्यांना आदरांजली वाहिली आहे. महात्मा बसवेश्वर यांना इतिहासात विशेष स्थान असून, त्यांनी
समाजाला एकत्र आणण्याचे प्रयत्न केले आणि ज्ञानाला महत्त्व दिलं, अशा शब्दात पंतप्रधानांनी
त्यांना आदरांजली वाहिली आहे.
****
परशुराम
जयंती आज साजरी करण्यात येत आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत
असून, औरंगाबादमध्ये यानिमित्त संध्याकाळी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. देशभरात
आज अक्षय्यतृतीयेचा सणही साजरा केला जात आहे. साडे तीन शुभ मुहुर्तापैकी एक असलेल्या
या सणानिमित्त आज बाजारपेठांमध्ये सोन्याचांदीची आभुषणं, वाहन तसंच गृहोपयोगी वस्तू
खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे.
***
कुलभूषण
जाधव प्रकरणी भारतानं दुसऱ्या फेरीतले लेखी अर्ज आंतरराष्ट्रीय न्यायालयात सादर केले
आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयानं गेल्या सतरा जानेवारीला दिलेल्या आदेशानुसार उत्तर
सादर केलं असल्याची माहिती परराष्ट्रमंत्रालयानं दिली आहे. जाधव यांच्या न्याय्य हकांचं
रक्षण करण्यास प्रतिबद्ध असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
मध्य
प्रदेशमधल्या सिधी जिल्ह्यात लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारा मिनि ट्रक शोण नदीच्या कोरड्या
पात्रात कोसळून झालेल्या अपघातात किमान पंचवीस जण मृत्युमुखी पडले आहेत. अन्य चौदा
जण जखमी झाले असून, अनेक लोक वाहनात अडकलेले असल्याचं आणि त्यामुळे मृतांची संख्या
वाढण्याची शक्यता असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे.
****
वाढत्या
सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुंबईत चार नवीन सायबर पोलीस ठाणी उभारण्याचा निर्णय
राज्यसरकारनं घेतला आहे. पोलिसांच्या गुन्हे विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी पीटीआयला
ही माहिती दिली आहे.
****
No comments:
Post a Comment