आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०३ नोव्हेंबर डिसेंबर
२०१८ सकाळी ११.०० वाजता
****
देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या
१३४व्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. उपराष्ट्रपती एम
व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजेंद्र प्रसाद यांना अभिवादन केलं
आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद यांचं स्वातंत्र्य सेनानी आणि राष्ट्रपती म्हणून देशासाठी
अमूल्य योगदान राहीलं असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. उच्च विचार आणि आदर्श,
साधं जीवनमान, असणारे राजेंद्रबाबू देशावासियांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहतील, असं
पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
भारतीय हवाई दल आणि अमेरिकेचं
हवाई दल यांच्या संयुक्त सरावाला आज प्रारंभ होत आहे. कलईकुंडा आणि पानागढ हवाई दलाच्या
तळावर १२ दिवस हा सराव चालणार आहे. परिचालन क्षमता वाढवण्यासाठी सर्वोत्तम पध्दतींची देवाण घेवाण हा या सरावाचा उद्देश असल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात
म्हटलं आहे. भारतात आयोजित उभय देशांच्या संयुक्त सरावाचं हे चौथं वर्ष आहे.
****
सिधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं झालेल्या राज्यस्तरीय
कॅरम सपर्धेत मुंबईचा प्रशांत मोरे विजयी ठरला. अंतिम सामन्यात त्यानं साताऱ्याच्या
जलाल मुल्ला याचा १५ - १२, १७ - २४, २५ - १३ असा पराभव केला. तर महिला एकेरी अंतिम
सामन्यात मुंबईच्या काजल कुमारी हिनं मुंबईच्याच आयेशा महम्मदला सरळ दोन सेट मध्ये
हरवून विजय मिळवला.
****
मराठवाड्यात एकूण आठशे सदूसष्ठ धरणांमध्ये फक्त
२२ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.
औरंगाबाद, जालन्यासह बीड जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत असून इथं चारशे टॅंकरद्वारे
पाणीपुरवठा होत आहे. जायकवाडी धरणात २७ टक्के, येलदरी
नऊ, पैनगंगा ५५ टक्के,
निम्न तेरणा २२ टक्के तर मांजरा आणि माजलगाव
धरणात शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक
आहे.
*****
***
No comments:
Post a Comment