Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 August 2019
Time 1.00 to
1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ ऑगस्ट २०१९ दुपारी १.०० वा.
****
महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक आणि गुजरातमध्येही पावसानं
चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक
ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असून, या चारही राज्यांमध्ये आतापर्यंत १२५ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. यात केरळमध्ये गुरुवारपर्यंत ५५, महाराष्ट्रात ३०, गुजरातमध्ये २२, कर्नाटक २४, तर इतरत्र आणखी काही जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागानं दक्षिणेतील राज्यांमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पूरग्रस्त बेळगावची हवाई पाहणी करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असून, या चारही राज्यांमध्ये आतापर्यंत १२५ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. यात केरळमध्ये गुरुवारपर्यंत ५५, महाराष्ट्रात ३०, गुजरातमध्ये २२, कर्नाटक २४, तर इतरत्र आणखी काही जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागानं दक्षिणेतील राज्यांमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पूरग्रस्त बेळगावची हवाई पाहणी करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीतील बचाव
कामांचा काल आढावा घेतला. स्थानिक प्रशासनाव्यतिरिक्त राष्ट्रीय आपत्ती निवारण दल,
महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद पथक, लष्कर, नौदल आणि वायु दलाबरोबरच तटरक्षक दलही,
या मदत आणि बचाव कार्यात सहभागी असल्याची माहिती त्यांनी सांगली इथं पत्रकार परिषदेत
दिली.
पूरस्थितीतील उपाययोजना करण्यासाठी १५९ कोटी रुपये
आकस्मिक निधीतून देण्यात आले आहेत. आपत्तीमधील मृतांच्या नातेवाइकांना पूर्वी दीड लाखाची
मदत दिली जायची, ती आता पाच लाख रुपये करण्यात आली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी
दिली.
जनावरांची हानी झाल्यास ३० हजार, बैलासाठी २५ हजार
रुपये, शेतीमधील गाळ काढण्यासाठी १३ हजार, तर खरडून गेलेल्या जमिनींसाठी ३८ हजार रुपयांची
मदत केली जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
****
गेल्या पाच दिवसांत महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांमधून
चार लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. त्यापैकी तीन लाख ७८
हजार कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये
पुराशी संबंधित घटनांमध्ये एकूण ३० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगलीत बोटीसह
बुडालेल्या १२ जणांचा समावेश आहे.
****
पंढरपूर परिसरात भीमा नदीला आलेला महापूर आता ओसरू
लागला आहे. पुराचं पाणी १० फुटांनी कमी झाल्यामुळे पटवर्धन कुरोलीसह नदीकाठच्या अनेक
गावांना दिलासा मिळाला असल्याचं वृत्त आहे.
****
प्रवरा नदीच्या भंडारदरा धरणातून पाच हजार ७४८ घनफूट
प्रतिसेकंद, निळवंडे धरणातून १० हजार
८२७ घनफूट प्रतिसेकंद, तर
ओझर बंधाऱ्यातून १५ हजार ३८१ घनफूट प्रतिसेकंद पाणी सोडण्यात आलं आहे. तसंच गोदावरी नदीवर असलेल्या नांदूर
मधमेश्वर बंधाऱ्यातून ४४ हजार २३१ घनफूट प्रतिसेकंद इतकं पाणी जायकवाडीच्या दिशेनं सोडण्यात आल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
पैठणच्या जायकवाडी धरणातून आज १५०० घनफूट प्रतिसेकंद
वेगानं नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यांत सध्या
पाणी सोडण्यात येत असून नदीकाठच्या नागरीकांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचं
तहसीलदार महेश सावंत यांनी सांगितलं आहे.
****
वन्यजीव क्षेत्रातील छायाचित्रणासाठी दिला जाणारा
शूट ऑफ द फ्रेम हा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार औरंगाबाद इथले वन्यजीव छायाचित्रकार
बैजू पाटील यांना जाहीर झाला आहे. डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात या पुरस्कारानं बैजू
यांना गौरवलं जाणार आहे. सुवर्णपदक, दीड लाख रुपये रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र असं
या पुरस्काराचं स्वरूप आहे.
राजस्थानातल्या रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात त्यांनी
पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोरासमोर थबकलेल्या अस्वलाचं छायाचित्र टिपलं होतं. या छायाचित्रालाच
हे पारिततोषिक जाहीर झालं आहे.
****
येत्या पाच वर्षांत भारताला शिक्षणामध्ये जगात अग्रणी
बनविण्यात भारतीय तंत्रज्ञान संस्था महत्त्वाची भूमिका बजावेल, असं केंद्रीय मनुष्यबळ
विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या भारतीय तंत्रज्ञान
संस्था - आयआयटीच्या ५७ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.
*****
***
No comments:
Post a Comment