Tuesday, 17 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.09.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –17 September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ सप्टेंबर २०१ सायंकाळी ६.००
****
आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत २०२२ पर्यंत देशभरात दीड लाख आरोग्य केंद्र सुरु केले जातील अशी माहिती, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्ली इथं पत्रकारांशी बोलत होते. पंधरा सप्टेंबरपासून देशात आयुष्मान पंधरवाडा साजरा केला जात आहे, सध्या देशात अशी २२ हजार केंद्र कार्यरत असल्याच माहिती त्यांनी दिली.
****
उपेक्षित समाजास सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी राज्यात बदल घडवणार असल्याचं रिपब्लीकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते आज परभणी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही नागरिकांना अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत सुविधाही प्राप्त होऊ शकल्या नाहीत. सर्वांना मुलभूत सुविधा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटीबद्ध असल्याचं सांगतानाच, गेल्या पाच वर्षात केंद्रात तसंच राज्यात घेण्यात आलेले अनेक निर्णय जनतेच्या उपयोगाचे नसल्याचा दावाही त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेससोबत आघाडी नाही, मात्र राज्यात वंचित बहुजन आघाडीची सत्ता निश्चित येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
****
राज्याच्या प्रमुखाने आपत्तीच्या ठिकाणी मुक्कामी राहावं लागतं, त्याशिवाय यंत्रणा हलत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज सोलापूर इथं पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते. आजचे राज्यकर्ते पुराचा दौरा हेलिकॉप्टरने दौरा करतात आणि अर्ध्या तासात गायब होतात. अशा लोकांना आता माफी नाही, त्यामुळे लढण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन पवार यांनी केलं.
****
आपण कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नसल्याचं, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी स्पष्ट केलं आहे. लोकसभेची निवडणूक काँग्रेस पक्षाकडून लढवलेल्या उर्मिला यांनी, नुकताच काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांच्याशी त्या संपर्कात होत्या, त्यावरून त्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र उर्मिला यांनी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नसल्याचं सांगत, या चर्चेला आज पूर्णविराम दिला.
****
आशा कार्यकर्त्यांच्या मानधनात दोन हजार रूपये वाढ केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गेली अनेक वर्षे या कार्यकर्त्या दरमहा अडीच हजार रूपये मानधनावर काम करत आहेत. मानधन वाढवण्याच्या मागणीसाठी गेल्या तीन  तारखेपासून आशा कार्यकर्त्यांनी ठिय्या आणि काम बंद आंदोलन सुरू केलं होतं. महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं कोल्हापुरात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आशा संघटनेच्या जिल्हाध्यक्षा नेत्रदिपा पाटील, यांच्यासह एका शिष्ट मंडळानं भेट घेऊन मानधनवाढीची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानधनात दोन हजार रूपये वाढ केल्याची घोषणा केली. या घोषणेमुळं आशा महिलांचं राज्यव्यापी आंदोलन स्थगित केल्याची घोषणा संघटनेच्या जिल्हाध्यक्षा पाटील यांनी केली.
****
कोट्यवधी रुपयांच्या कडकनाथ कोंबडी घोटाळ्याप्रकरणी सांगली इथल्या एका कुक्कुटपालन केंद्रातल्या चार अधिकाऱ्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सुधीर मोहिते, संदीप मोहिते, हनुमंत जगदाळे आणि प्रीतम माने अशी या चौघांची नावं आहेत. या प्रकरणी औरंगाबाद, नाशिक, पालघर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुण्यासह अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हा घोटाळा साडे पाचशे कोटी रुपयांचा असून, त्यात राज्यभरातल्या दहा हजार शेतकऱ्यांना फसवण्यात आल्याचा दावा केला आहे. या घोटाळ्याची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही शेट्टी यांनी केली आहे.
****
सत्ताधारी पक्षाच्या विकासाच्या गप्पांना बळी न पडता जनतेनं आपल्या गाव परिसरातल्या विकासाला प्राधान्य द्यावं, असं आवाहन आमदार अमित देशमुख यांनी केलं आहे. लातूर विधानसभा मतदार संघात जनसंपर्क अभियानाला देशमुख यांनी आज वासनगाव इथून पदयात्रेनं प्रारंभ केला, त्यावेळी ते बोलत होते. सरकारनं प्रत्यक्षात कमी आणि जाहिरातीतूनच अधिक विकास केल्याची टीका देशमुख यांनी यावेळी केली. विविध विकास कामांचा शुभारंभही देशमुख यांच्या हस्ते आज करण्यात आला.
****
औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर इथला तलाठी आणि कोतवाल या दोघांसह तीन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं आज दीड हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक केली. सातबारा उतारा देण्यासाठी यांनी संबंधितांकडून लाच मागितली होती.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 12 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...