Monday, 7 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 07.05.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद



संक्षिप्त बातमीपत्र



७ मे २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 जम्मू काश्मीरमधल्या कथुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं या प्रकरणाच्या सुनावणीला आजपर्यंत स्थगिती दिली होती. आपल्या जीवाला धोका असल्यामुळे  या खटल्याची सुनावणी चडीगढ़च्या न्यायालयामधे व्हावी, या  पीड़ित बालिकेच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होणार आहे.

****



 देशातली १३ राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशाच्या पश्चिमेकडे निर्माण झालेल्या वातवरणातल्या बदलामुळे जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, चंडीगढ़, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधे येत्या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह रांचा पाऊस पडेल असा अंदाज आहे.

****



 दरम्यान, राज्यातही काल काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्यातल्या बाळापूर आणि परिसरात, तसंच उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात काल रात्री अवकाळी पवसानं हजेरी लावली. उस्मानाबाद, हिंगोली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून, हवेत गारवा निर्माण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. येत्या दोन दिवसात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****



 देशभरातल्या दोन हजार २२५ केंद्रांवर काल वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालय प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - एन ई ई टी घेण्यात आली. सुमारे १३ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं या परीक्षेचं १३६ शहरात आयोजन केलं होतं. या परीक्षेसाठी चार हजार निरीक्षक आणि एक लाख २० हजार पर्यवेक्षक तैनात करण्यात आले होते.

****



 औरंगाबाद इथले भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेलचे जिल्हा सरटिणीस संजय फतेलष्कर यांच्यावर काल चार जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाठा विद्यापीठ परिसरात काल सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले फतेलष्कर यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 25 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...