Tuesday, 8 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 08.05.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद



संक्षिप्त बातमीपत्र



 मे २०१८ सकाळी ११.०० वाजता

****

 सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरुद्ध दाखल महाभियोग प्रस्ताव रद्द ठरवणाऱ्या उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती ए के सिक्री यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ ही सुनावणी करणार आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी २३ एप्रिलला महाभियोगाची नोटीस रद्द ठरवली होती. काँग्रेसच्या दोन खासदारांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.

****

 केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव प्रदीप कुमार सिन्हा यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. सिन्हा यांना पुढच्या वर्षी १२ जूनपर्यंत या पदावर राहण्यासाठी दिलेल्या मुदतवाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं मान्यता दिली आहे. मे २०१५ मध्ये सिन्हा यांची मंत्रिमंडळ सचिवपदी दोन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. ते १९७७ च्या तुकडीतील उत्तर प्रदेश कॅडरचे प्रशासकीय अधिकारी आहेत.

****

 सेंद्रीय शेतीला उपयुक्त असणारा देशातला गोवंश वाढवण्यासाठी, केंद्र सरकारनं दहा हजार कोटी रुपयांची योजना आखली आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी ही माहिती दिली. ते काल कोल्हापुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. ग्रामीण पातळी पासून ते देशपातळीपर्यंत कृषीक्षेत्रात होत असलेल्या बदलांकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधलं.

****

 सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांना काल दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना काल रंगेहात अटक करण्यात आली. फरक बिलाची रक्कम मंजुर करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.

****

 औरंगाबाद इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं आरक्षण ध्येय धोरण आणि अंमलबजावणी या विषयावर उद्या एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या सिफार्ट सभागृहात होणाऱ्या या कार्यशाळेचं उद्घाटन राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव सिध्दार्थ खरात यांच्या हस्ते होईल. दोन सत्रात होणाऱ्या या कार्यशाळेत तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत.

*****

***

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 25 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 25 June-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...