Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 May 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ मे २०१८ दुपारी १.०० वा.
*****
देशातल्या तुरुंगांमध्ये
क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे.
काही तुरुंगांमध्ये दिड पटीहून अधिक कैदी असल्याचं निष्पन्न झालं आहे. हा प्रकार मानव
अधिकारांचं उल्लंघन असल्यानं सर्व उच्च न्यायालयांनी याची दखल घ्यावी असं सर्वोच्च
न्यायालयानं म्हटलं आहे.
****
घरगुती हिंसाचार कायद्या अंतर्गत
एखादी महिला विवाह संपुष्टात आल्या नंतरही आपल्या पूर्वा श्रमीच्या पतीच्या क्रूर वागणुकी
विरोधात तक्रार दाखल करू शकते, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. वैवाहिक संबंध नसताना
सुद्धा पीडित महिलेला न्यायापासून वंचित ठेवता येणार नाही, हा
राजस्थान उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानंही कायम ठेवला. न्यायमूर्ती
रंजन गोगाई, न्यायमूर्ती आर बानूमथी आणि न्यायमूर्ती नविन सिन्हा यांच्या
पीठानं हा निर्णय दिला.
****
माजी राष्ट्रपती फकीरुद्दीन अली अहमद यांची आज जयंती.
त्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात फकीरुद्दीन अली अहमद
यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. अहमद हे देशाचे पाचवे राष्ट्रपती
होते.
****
ओडीशा मधल्या बोलांगिर इथं कुकुडमाल जंगल परिसरात
पोलिसांच्या कारवाईत दोन नक्षलवादी ठार झाले. नक्षलवाद्यां बद्दल माहिती मिळाल्या नंतर
पोलिसांनी आज पहाटे या भागात शोध मोहीम सुरु केली होती त्यावेळच्या चकमकीत हे नक्षलवादी
ठार झाले. या भागात अजुनही कारवाई सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
जम्मू काश्मीर मधल्या राजौरी भागात सुरक्षा दलानं
हिजबुल मुजाहिद्दीनच्या चार जणांना आर्थिक घोटाळ्या प्रकरणी अटक केली आहे. राजौरी
जम्मू रोड वरच्या कल्लार क्षेत्रात अशा प्रकारच्या आर्थिक देवाण घेवाण होणार असल्याच्या
सूचनेवरुन सुरक्षा दलानं विशेष मोहिम राबवून ही कारवाई केली.
दरम्यान, जम्मू
काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणेला सतर्क
राहण्याच्या सूचना केल्या आहेत. आगामी महिन्यात सुरू होणारा पर्यटनाचा
काळ आणि अमरनाथ यात्रा या पार्श्र्वभूमीवर त्यांनी हे निर्देश दिले आहेत.
****
आरोग्य
मंत्री जे.पी.नड्डा यांनी परजीवीं पासून संक्रमित होणाऱ्या आजारांची
पाहाणी करण्याच्या हेतूनं नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या
बैठकीत अधिकाऱ्यांनी दिल्लीतल्या रुग्णालयांना भेट देऊन तिथल्या स्थितीची पहाणी करावी
असे आदेश नड्डा यांनी दिले. अशा प्रकारच्या आजारांना तोंड देण्यासाठी सर्व प्रकारची
तयारी रुग्णालयांनी करावी, अशा रुग्णांची वेगळी नोंदणी करुन, त्यांना
देण्यात येणाऱ्या उपचारांचीही नोंद ठेवावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. औषधं, निदान करण्यासाठीची सामग्री, प्रयोगशाळा, मनुष्यबळ
आणि लागणारा निधी यात कोणतीही कमतरता पडणार नाही याबाबत सरकार सजग असल्याचं नड्डा यांनी
यावेळी सांगितलं.
****
रेल्वे
गाड्या वेळेवर धावाव्या यादृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश रेल्वे मंडळाचे अध्यक्ष
अश्विनी लोहानी यांनी दिले आहेत. देशभरातील आठही रेल्वे विभागाच्या व्यवस्थापकांशी
त्यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधला. रेल्वे गाड्यांच्या वेग-मर्यादेचा
आढावा त्यांनी घेतला.
****
वैद्यकशास्त्रातल्या अन्य शाखां प्रमाणेच होमियोपॅथीचा
विविध शासकीय योजनांमध्ये समावेशासह आरोग्य विमा कवच देण्याबाबत केंद्र सरकारचं आयुष
मंत्रालय प्रयत्नशील असल्याची माहिती या खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली आहे.
ते कोल्हापूर इथं एका रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
****
भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या नेतृत्त्वाखालील
राज्य मंत्रिमंडळात पुन्हा समावेशासाठी उत्सुक नसल्याचं म्हटलं आहे. गैरव्यवहाराच्या
आरोपांनंतर दोन वर्षांपुर्वी त्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा राजिनामा दिला होता. त्यांनी
पीटीआय वृत्तसंस्थेला मुंबईत दिलेल्या मुलाखतीत भाजप सोडणार नसल्याचं नमुद केलं आहे.
पक्षानं त्यांना कठीण प्रसंगी साथ दिली. सुमारे वर्षभरात विधानसभेच्या निवडणुका होणार
आहेत. शिवाय त्यापुर्वी विविध स्थानिक निवडणुका आहेत. त्यांच्या आचारसंहितांमुळं सरकारच्या
कार्याला मर्यादा पडणार असल्यानं मंत्रिमंडळात समावेशासाठी अनुत्सुक असल्याचं खडसे
यांनी म्हटलं आहे.
****
औरंगाबाद इथं उसळलेल्या दंगलीनंतर शहरातली परिस्थिती
आता नियंत्रणात आहे. शहरात शांतता असून, दंगल झालेल्या भागात वाहतूकही सुरळीत सुरु
आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, शहरातली मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
****
उरण इथल्या जवाहरलाल
नेहरु पोर्ट ट्रस्ट – जेएनपीटी बंदरात
वाहतूकदार संघटनांनी पुकारलेलं बेमुदत असहकार आंदोलन काल मागं घेतलं. सर्व वाहतूकदारांची बैठकीत, कंटेरनर वाहतूक करण्यासाठी आता सर्व वाहतूकदारांना परवानगी
देण्यात आल्यानं हे आंदोलन मागं घेण्यात आलं. येत्या १५ मे रोजी याबाबत जेएनपीटी प्रशासनासोबत
चर्चा केली जाणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment