Sunday, 17 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.11.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१७ नोव्हेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीकनुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठवलं जाईल, असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याचं राजभवनानं प्रसिद्ध् केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. यासंदर्भात राज्य सरकारनं शाह यांना माहिती कळवली होती. तसचं शिवसेनेच्या शिष्टमंडळानंही मच्छिमारांना नुकसानभरपाई देण्याची मागणी काल केली होती.
****
रायगड जिल्ह्यात माणगाव इथं अग्निसुरक्षा विषयक उत्पादनं बनवणाऱ्या क्रिप्टझो या कंपनीत काल आग लागल्यानं १८ कर्मचारी जखमी झाले. एका उत्पादनाचा वापर कसा करायचा, याचं प्रात्यक्षिक दाखवताना अचानक आग लागल्याचं पोलिसांनी सांगितलं. आग लगेचच आटोक्यात आणली, तसंच जखमी कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे.****
नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यात वन विभागाचे वनपाल बालाजी वच्चेवार यांना काल अडीच हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहाथ पकडलं. अस्वलाने मारलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
****
औरंगाबाद शहरात पुढील आठवड्यात होणाऱ्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या जनजागृती निमित्त रविवारी सकाळी शहरातून समता वाहन फेरी काढण्यात आली. भडकलगेट येथून विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्रकुमार सिंगल आणि संयोजक उद्योग आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी झेंडा दाखवल्यानंतर फेरी मार्गस्थ झाली. ही फेरी शहराच्या विविध भागांतून जाणार आहे.
****
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वस्तू आणि सेवा कर - जीएसटी फॉर्म आणि रिटर्न्सच्या सुलभतेसंदर्भात काल नवी दिल्ली इथं बैठक घेतली. जीएसटी फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेवर उद्भवलेल्या चिंतेची दखल घेण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सीतारामन यांनी राजस्थान कर सल्लागार संघटना, भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स आणि लघु उद्योगभारतीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...