Wednesday, 18 October 2017

Text-AIR News Bulletin HLB, Aurangabad 18.10.2017 11.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१८ ऑक्टोबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****

दीपावलीत आज नरक चतुदर्शीच्या पहाटे घरोघरी अभ्यंगस्नान सोहळा साजरा झाला. देशभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या प्रशासनातल्या भारतीय वंशाच्या सदस्यांसह राष्ट्रपती कार्यालय व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली. अमेरिकेच्या राष्ट्रपती कार्यालयात दिवाळी साजरी करण्याची परंपरा माजी राष्ट्रपती जॉर्ज बुश यांनी सुरु केली होती.

****

पाकिस्ताननं आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. जम्मू कश्मीरच्या पॅूंछ जिल्ह्याच्या बालकोट सेक्टरमध्ये आज सकाळी सात वाजल्यापासून पाकिस्तानी सैन्यानं भारतीय चौक्यांवर अकारण गोळीबार सुरु केला. भारतीय सैन्य या गोळीबाराचा चोख प्रत्युत्तर देत आहे.

****

सध्याचा सणाचा काळ लक्षात घेत राज्यसरकारांनी अधिक दक्ष राहून गर्दीच्या आणि धार्मिक स्थळांच्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करावी, असे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयानं दिले आहेत.

****

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आज अंदमान आणि निकोबारच्‍या दोन दिवसांच्या भेटीसाठी जात आहेत. तिथे तैनात असलेल्या सैनिकांसोबत त्या दिवाळी साजरी करणार असून. सैनिकांच्या कुटुंबियांशीही संवाद साधणार आहेत.

****

राज्य सरकार आजपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करत असून, येत्या महिन्याभरात ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

****

राज्यातल्या दुसऱ्या टप्प्याल्या ग्रामपंचात निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला एक हजार तीनशे अकरा ग्रामपंचायतींमध्ये तर काँग्रेसला तीनशे बारा ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला आहे. या दुसऱ्या टप्प्यात तीन हजार आठशे सत्तावन्न ग्रामपंचायतीसाठी मतदानं घेण्यात आलं होतं.

****

क्रिकेटपटू एस श्रीकांतवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं घातलेली आजीवन बंदी केरळ उच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे. २०१३ च्या इंडियन प्रीमीयर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेत स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी बीसीसीआयनं श्रीकांतवर घातलेली बंदी न्यायालयाच्या एकलपीठानं उठवली होती, त्या निर्णयाला बीसीसीआयनं केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

****


No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...