Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 25
May 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ मे
२०२५ दुपारी १.०० वा.
****
‘ऑपरेशन सिंदूर’ ही फक्त लष्करी मोहीम नसून ती आपला निर्धार, धैर्य आणि बदलत्या भारताचं
प्रतिबिंब आहे. याद्वारे देशाला देशभक्तीच्या भावनेनं भारुन टाकल्याचं प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमाच्या
१२२ व्या भागातून देशवासीयांशी संवाद साधतांना ते बोलत होते. ते म्हणाले –
बाईट - पंतप्रधान
नरेंद्र मोदी
भारत निर्मित शस्त्र, उपकरणं-तंत्रज्ञान
‘आत्मनिर्भर भारत’चा द्योतक असल्यानं मोहिमेनंतर देशात ‘वोकल फॉर लोकल’ संकल्पनेला
नवीन ऊर्जा मिळाली असं मोदी म्हणाले. यासंदर्भातील अनेक गोष्टी मनाला भीडणाऱ्या असल्याचं सांगतांना, एका
दांपत्यानं आपल्या मुलांसाठी भारतात बनवलेली खेळणी घेण्यातून देशभक्तीची सुरुवात
बालपणापासून करुन देण्याचं, काही जणांनी आपल्या
सुट्ट्या देशातीलच एखाद्या सुंदर ठिकाणी घालवण्याचं निश्चीत केल्याचं, तर युवकांनी ‘वेड इन इंडिया’च्या निर्धारातून देशातच लग्न करण्याचं ठरवल्याचं
तसंच भारतीय कारागिरांनी तयार केलेल्या भेटवस्तू घेण्याचा संकल्प केला आहे असं
पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं. भारताची खरी ताकद ‘जनमानसाची जोडणी, जनभागीदारी’ ही आहे.त्यामुळे जिथे शक्य असेल तिथे देशात बनवलेल्या वस्तूंना
प्राधान्य देत राष्ट्रनिर्मितीत भागीदार बनण्याच्या भावनेनं आपलं एक पाऊल
भारताच्या प्रगतीत मोठं योगदान ठरू शकतं असं ते म्हणाले. महाराष्ट्रातल्या
गडचिरोली जिल्ह्यातल्या काटेझरी या माओवादग्रस्त भागात आता परिस्थिती सामान्य होत
असून इथं पहिल्यांदाच बस प्रवासाची व्यवस्था झाल्यानं मूलभूत सोयी सुविधा पोहोचून
जीवन अधिक सोपं होत असल्याचं त्यांनी सांगितलं. योगासोबतच आयुर्वेदाच्या क्षेत्रात
परंपरीक औषधी प्रणालीला चालना देण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेसोबत झालेल्या सामंजस्य
करारातून पूर्ण जगात आयुष वैज्ञानिक पद्धतीने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवता येणार
असल्याचं मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी क्रीडा संस्कृतीच्या महत्त्वाला यावेळी
अधोरेखित केलं. त्यांनी महाराष्ट्राच्या क्रीडापटुंनी खेलो इंडीया स्पर्धेत
बजावलेल्या गौरवपूर्ण कामगिरीची प्रशंसा केली. ते म्हणाले –
बाईट - पंतप्रधान
नरेंद्र मोदी
उल्लेखनीय स्टार्टअपची माहिती देताना पंतप्रधानांनी जालना
इथल्या स्टार्टअपचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले -
बाईट - पंतप्रधान
नरेंद्र मोदी
****
काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेला
गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळानं हे नमूद केलं आहे की, भारतानं
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर, त्यांच्या मुख्यालयांवर आणि हालचालींच्या ठिकाणांवर अचूक आणि संतुलित कारवाई
कशी केली. आतंकवादाविरोधातील भारताचा संदेश जगापर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आणखी एक सर्वपक्षीय
शिष्टमंडळ कतारमध्ये पोहोचलं आहे. कतारमधील भारताचे राजदूत विपुल यांनी
शिष्टमंडळातले सदस्य सुप्रिया सुळे, आनंद शर्मा, राजीव प्रताप रूडी आणि अनुराग ठाकुर यांचं विमानतळावर स्वागत केलं.
या दरम्यान, द्रविड मुनेत्र कळघम
(द्रमुक) पक्षाच्या खासदार कनिमोझी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळानं
मॉस्को दौरा यशस्वीपणे पूर्ण केला असून आता ते स्लोव्हेनियाकडे रवाना झाले
आहेत.शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त अरब अमिरातला
गेलेल्या शिष्टमंडळानं आपला दौरा पूर्ण केला असून ते आता काँगोमध्ये पोहोचले आहेत.
या शिष्टमंडळानं दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारताला साथ दिल्याबद्दल संयुक्त अरब
अमिरातचं आभार मानलं.
****
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंती
निमित्त राज्यभरात या आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नागपूर
इथं आज संध्याकाळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातले मंत्री आणि स्थानिक
लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे. नागपूर इथं भारतीय
व्यवस्थापन संस्था-आय.आय.एम.मध्ये आयोजित ‘तत्वज्ञानी राणी देवी अहिल्याबाई होळकर’ या
एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आज सकाळी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री
अन्नपूर्णा देवी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झालं.
****
No comments:
Post a Comment