आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Saturday, 30 June 2018
Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.06.2018 - 17.25
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 30 June 2018
Time - 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जून २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
स्वातंत्र्यानंतर
या वर्षी पहिल्यांदाच जवळपास एक लाख ७३ हजार भाविक हज यात्रेसाठी जाणार असल्याचं अल्पसंख्याक
व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी सांगितलं आहे. या मंत्रालयाच्या हज विभागाकडून
हजला जाणाऱ्या समन्वयकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते.
पहिल्यांदाच एक हजार तीनशेहून अधिक महिला एकट्यानं या यात्रेसाठी जात असल्याचंही नकवी
यांनी सांगितलं.
****
भारताचे
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी आज मध्य प्रदेशमधल्या जबलपूरमध्ये धर्मशास्त्र राष्ट्रीय
विधी विद्यापीठाच्या इमारतीची कोनशीला बसवली. तसंच त्यांनी यावेळी डॉ.भीमराव आंबेडकर
दूरसंचार प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीत विधी विद्यापीठाच्या तात्पुरत्या कॅम्पसचं उद्घाटनही
केलं. सरन्यायाधीश मिश्रा हे सध्या मध्य प्रदेशच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असून उद्घाटनप्रसंगी
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद हे देखील यावेळी उपस्थित
होते.
****
राज्यातल्या
अन्नधान्य वितरण व्यवस्थेनं आधुनिकीकरणाचं धोरण स्विकारलं असून पीओएस मशिनद्वारे शिधापत्रिकाधारकांना
अन्नधान्य वितरण करण्यात येत आहे. या नव्या कार्यप्रणालीमुळं राज्यात १२ लाख बोगस शिधापत्रिका
रद्द करण्यात आल्या असून ३ लाख मेट्रिक टन धान्याची बचत झाली असल्याची माहिती राज्याचे
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना
दिली. हे बचत झालेलं धान्य ९९ लाख नागरिकांना वाटप करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यातल्या अन्नधान्य वितरण व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी गिरीष बापट यांनी राज्यव्यापी
दौरा सुरू केला आहे. आज ते कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत.
राज्यात
अन्नधान्य वितरण व्यवस्था सुरळीतपणे सुरू असून ग्रामीण भागात शिधापत्रिकेवरील धान्य
वेळेवर उपलब्ध व्हावं यासाठी राज्य शासन हे धान्य थेट महामंडळाकडून खरेदी करत आहे.
तसंच धान्य साठवणाऱ्या गोदामांची संख्याही वाढवण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
दक्षिण
मुंबईच्या परिसरातील व्हिक्टोरियन गॉथिक पद्धतीच्या आणि कलात्मक वास्तूंचा समावेश जागतिक
वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाला आहे.
युनेस्कोच्या
जागतिक वारसा समितीच्या बहारिनमधील मनामा इथं आज झालेल्या ४२व्या परिषदेत ही घोषणा
करण्यात आली. यामुळे राज्यातल्या पाच वारसा स्थळांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश
होणार असून देशातील सर्वात जास्त वारसा स्थळांचा मान असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य
ठरले आहे. यापूर्वी अजिंठा, एलिफंटा, वेरुळ आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत
यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश आहे.
****
आर्थिक
कारवाई कृती दल अर्थात एफ ए टी एफ या जागतिक आर्थिक निरीक्षक संस्थेनं पाकिस्तानला
परिपूर्ती यादीमध्ये ठेवण्याच्या निर्णयाचं भारतानं स्वागत केलं आहे. पॅरीसमध्ये झालेल्या
संस्थेच्या वार्षिक बैठकीत ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. ज्या निर्भयपणे हाफीज सईदसारखे
दहशतवादी आणि जमात-उद दावासारख्या संस्था पाकिस्तानमध्ये कार्यरत आहे; ही बाब पाकिस्ताननं
दहशतवादाचा सामना करण्यासाठी दिलेल्या आश्वासनांच्या विपरीत असल्याचंही एफ ए टी एफनं
म्हटलं आहे.
****
विविध
क्षेत्रामध्ये असलेलं संख्याशास्त्राचं महत्व लक्षात घेता शासनाच्या प्रत्येक विभागामध्ये
रूजू होताना मूलभूत सांख्यिकीचे प्रशिक्षण देणं महत्वाचं असल्याचं मत मराठवाडा विकास
मंडळाचे अपर आयुक्त डी.एम.मुगळीकर यांनी व्यक्त केलं आहे. अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयातर्फे
१२व्या राष्ट्रीय सांख्यिकी दिनानिमित्य औरंगाबाद इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत
होते. यावर्षीच्या सांख्यिकी दिनाच्या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना “कार्यालयीन
सांख्यिकीची गुणवत्ता हमी” ही होती.
****
पत्रकार
केदार प्रभुणे यांचं आज सकाळी कोल्हापूर इथं निधन झालं. ते ५० वर्षांचे होते. ते दैनिक
पुढारीचे सहयोगी संपादक होते. त्यांनी औरंगाबाद इथं दैनिक मराठवाडा, देवगिरी तरुण भारत
आणि लोकमतमध्ये काम केलं होतं.
****
परभणी
जिल्ह्यातल्या रमाई घरकुल योनजेअंतर्गत दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना समाविष्ट
न करणं तसंच पंतप्रधान आवास योजनेतून झोपडपट्टी भाग वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या
वतीनं आमदार डॉ.राहूल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या कार्यालयास आज घेराव
आंदोलन करण्यात आलं. गोरगरीब जनतेला हक्काच्या घरापासून वंचित ठेवलं असून घरकुल योजनेचा
४५ कोटी रूपयांचा निधी पडून असल्याचा आरोप डॉ.पाटील यांनी यावेळी केला.
****
जळगाव जिल्ह्यातल्या वाकडी घटनेच्या निषेधार्त परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड
आणि सेलू तहसिल कार्यालयावर मातंग समाजाच्या वतीनं आज मोर्चा काढण्यात आला. आपल्या
विविध मागण्याचं निवेदन यावेळी प्रशासनाला देण्यात आलं. या मोर्चात समाज बांधव मोठ्या
संख्येनं सहभागी झाले.
****
धुळे
जिल्ह्याअंतर्गत ऑनलाईन बदली प्रक्रियेत धुळे जिल्हा परिषदेच्या ४७ शिक्षकांनी खोटी
माहिती भरुन संवर्ग एक आणि दोनचा लाभ घेतला आहे. अशा चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे
बदली करुन घेतलेल्या शिक्षकांची वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्याचे आदेश ग्रामविकास
विभागानं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. अशा शिक्षकांच्या
कागदपत्रांची पडताळणी येत्या १३ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
****
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.06.2018 13.00
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 June 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जून २०१८ दुपारी
१.०० वा.
****
GST अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या रिवर्स चार्ज मेकॅनिझम RCM अर्थात परतीच्या
शुल्क प्रणालीशी संबंधित तरतुदींवरची स्थगिती सरकारनं सप्टेंबर अखेरपर्यंत कायम ठेवली
आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि सीमा शुल्क मंडळानं याबाबत एक अधिसूचना जारी
करुन ही माहिती दिली आहे. यापूर्वी ही स्थगिती 30 जूनपर्यंत राहणार होती. RCM अंतर्गत
नोंदणीकृत डीलर्सनी बिगरनोंदणीकृत व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेल्या मालावर शुल्क भरणं
अपेक्षित आहे. दरम्यान, येत्या एक जानेवारीपासून जीएसटी वस्तू आणि सेवाकर विवरणपत्राचे नवे अर्ज अंमलात
येतील, अशी माहिती केंद्रीय अर्थसचिव हसमुख अढिया यांनी काल नवी दिल्ली इथं दिली. जीएसटीच्या
अंमलबजावणीला उद्या एक जुलैला एक वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात
ते बोलत होते.
जीएसटी परिषदेच्या चार मे रोजी
झालेल्या बैठकीत नव्या विवरणपत्रांच्या अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक
असणाऱ्या सॉफ्टवेअरवर काम सुरू असून ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत त्याची चाचणी घेतली
जाईल आणि एक जानेवारीपासून हे नवे अर्ज अंमलात येतील, असे अढिया म्हणाले.
****
शेतकऱ्यांचं उत्पन्न
दुप्पट करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून 2020 पर्यंत देशभरातल्या 22 हजार ग्रामीण
बाजारांना ई-नाम अर्थात राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक कृषी बाजारपेठांशी जोडण्याची घोषणा
केंद्र सरकारनं केली आहे. भुवनेश्वर इथं काल ऍग्रीविकास 2018 या कार्यक्रमात बोलताना
केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी ही माहिती दिली. 22 हजार ग्रामीण
बाजार किंवा हाट यांचं रुपांतर ग्रामीण कृषी बाजारपेठांमध्ये करण्यात येईल आणि शेतकऱ्यांना
त्यांचा माल योग्य खरेदीदाराला थेट विकता यावा, यासाठी या बाजारपेठा ई-नामशी जोडण्यात
येतील, असं ते म्हणाले.
****
भारताचे सरन्यायाधिश दीपक मिश्रा हे आज मध्यप्रदेशमधल्या
जबलपूरमध्ये धर्मशास्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा कोनशीलेचं उद्घाटन करणार आहेत.
मिश्रा हे सध्या मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर असून त्यांनी काल जबलपूरमध्ये जिल्हा आणि
सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन केलं. जिल्हा आणि सत्र न्यायालय हे न्यायव्यवस्थेचा
पाया असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. न्यायव्यवस्थेच्या कामाच्या क्षमतेमध्ये वाढ
करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता असल्याचं सरन्यायाधिश मिश्रा
यांनी यावेळी नमूद केलं.
****
जम्मू काश्मीरमध्ये
गेले दोन दिवस मुसळधार पाऊस असून, झेलम नदीच्या प्रवाहानं धोक्याची पातळी ओलांडली असून
प्रशासनानं मध्य आणि दक्षिण काश्मीरमधे पूर घोषीत केला आहे. पाटबंधारे आणि पूरनियंत्रण
विभागानं नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या भागातल्या शैक्षणीक संस्था बंद आहेत. दरम्यान, या पावसामुळं अमरनाथ यात्रा आज सकाळपासून स्थगित करण्यात आली आहे. जम्मूच्या भगवतीनगर इथल्या
आधार शिबिरातून यात्रेला जाणाऱ्या नव्या जथ्याला परवानगी देण्यात आली नसल्याचं सूत्रांनी
सांगितलं.
****
दरम्यान, केंद्र सरकारनं पूरग्रस्त राज्यांसाठी ४००
कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. या राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल
प्रदेश आणि नागालँडचा समावेश आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नवी
दल्लीत झालेल्या उच्चस्तरिय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा जवान
आणि दहशतवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. त्रेहगाम भागात
दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी या भागात शोधमोहीम सुरू
केली. यावेळी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू झाला. या दहशतवादी गटानं सीमेपलीकडून
घुसखोरी केली असल्याचं संरक्षण दलातल्या सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, दुसऱ्या एका
घटनेमध्ये सोपीअन जिल्ह्यात गस्तीवर असलेल्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात
दोन जवान जखमी झाले आहेत.
****
अरुणाचल प्रदेशमध्ये लोअर सियांग जिल्ह्यात ITBP अर्थात इंडोतिबेटन सीमा
सुरक्षा दलाच्या एका वाहनावर दरड कोसळल्यानं पाच जवानांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी
झाले. ITBP च्या 49 व्या बटालियनच्या 20 जवानांना घेऊन जाणारी बस लिकाबालीजवळ बसर-अकाजन
रस्त्यावरुन जात असताना मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळून हा अपघात झाला. या दुर्घटनेतल्या
जखमींना उपचारासाठी विशेष हेलिकॉप्टरनं दिल्लीला नेण्यात आलं आहे.
****
फिफा विश्वचषक फूटबॉल
स्पर्धेची सोळा संघांची बाद फेरी आजपासून सुरू होत आहे. अर्जेंटिना आणि फ्रांस यांच्यात
या फेरीतला पहिला सामना संध्याकाळी साडेसात वाजता कझान इथं होणार आहे. तर रात्री साडेअकरा
वाजता सोची इथं उरुग्वे आणि पोर्तुगाल यांच्यात दुसरा सामना होईल. दरम्यान, बाद फेरीसाठी
नव्या प्रकारचा चेंडू वापरण्याची घोषणा फिफानं केली आहे.
****
दुबईमध्ये सुरू असलेल्या
कबड्डी मास्टर्स स्पर्धेत विश्वविजेत्या भारतीय संघानं कोरियाचा 36-20 असा पराभव केला आणि अंतिम फेरीत
प्रवेश केला. अंतिम फेरीत भारताची लढत इराणशी होणार असून अंतिम सामना आज होणार आहे.
*****
***
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.06.2018 11.00AM
आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३० जून २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
राज्याच्या ग्रामीण भागात आर्थिक दृष्ट्या दुर्बल जनतेला हक्काची घरं बांधून
देण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यानं ठरवलेल्या अतिरिक्त ७ लाख ९४
हजार ३० घरांच्या उद्दिष्टास चालू आर्थिक वर्षातच मंजुरी देण्याची मागणी, मुख्यमंत्री
फडणवीस यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडं केली आहे.
काल नवी दिल्ली इथं फडणवीस यांनी तोमर यांची भेट घेतली. महात्मा गांधी राष्ट्रीय
ग्रामीण रोजगार योजना - मनरेगा अंतर्गत २०१७-१८ या वर्षासाठी उर्वरीत ४३८ कोटी रुपये
निधीदेखील देण्याची मागणी मुख्यमंत्री यावेळी केली.
या दोन्ही मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं
आश्वासन तोमर यांनी यावेळी दिलं असल्याचं याबाबतच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
****
महिला आयोगाच्या वतीनं देशभरातील तुरुंगांना भेटी दिल्या जात असून,
महिला कैद्यांच्या स्थितीचा, त्यांच्या समस्यांचा आढावा घेतला जात असल्याचं आयोगाच्या
अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सांगितलं. त्या काल नाशिकमध्ये महिला मेळाव्यात बोलत होत्या.
केवळ पैशांअभावी जामीन घेऊ न शकलेल्या महिला कैद्यांना आर्थिक मदत देण्याबाबतचा आयोग
प्रयत्न करीत असून, यासाठी काही सामाजिक संस्थांची मदत घेतली जाणार असल्याचं त्यांनी
सांगितलं.
****
ग्रामीण
भागातल्या नव संकल्पनांना योग्य ती संधी निर्माण करून देण्याच्या उद्देशानं
प्रत्येक जिल्ह्यात राज्याच्या धर्तीवर स्टार्ट अप सुरू करणार असल्याचं कौशल्य विकास मंत्री
संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं आहे. राज्य कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग तसंच महाराष्ट्र
राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राबविण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र स्टार्ट अप’ सप्ताह 2018 च्या सांगता समारंभात ते काल
मुंबईत बोलत होते.
****
मलेशियात क्वालालम्पुर इथं सुरू
असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू आणि किंदाबी श्रीकांत यांचे उपांत्य
फेरीचे सामने आज दुपारी होणार आहेत. महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी
तिसऱ्या मानांकित सिंधूची लढत तैवानच्या अव्वल मानांकित ताई झू यिंग सोबत तर पुरूष
एकेरीत श्रीकांतचा सामना जपानच्या केन्तो
मोमोता याच्याशी होणार आहे.
*****
***
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 30 June 2018
Time 8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۳۰ ؍ جون ۲۰۱۸
وَقت: صبح ۴۰:۸ - ۴۵:۸
خریف کی فصلوں کے لیے دیڑھ گنا ضما نتی قیمت ادا کرنے کی یقین دہا نی وزیر اعظم نریندر مودی نے کی۔
مرکزی کا بینہ کے آئندہ اجلاس میں اِس فیصلے کو منظوری دی جائے گی۔ گنّا اُگا نے والے کسانوں کے وفد نے جن میں مہا راشٹر کے کسان بھی شامل تھے ‘ کل نئی دِلّی میں وزیر اعظم نریندر مودی سے ملا قات کی۔ اِس موقع پر وزیر اعظم نے اُنھیں یہ یقین دہا نی کر وائی۔ وزیر اعظم نے کہا کہ رواں سال کے لیے گنّے کی واجبی اور کِفا یتی قیمتوں کا اعلان اگلے دو ہفتوں میں کر دیا جائے گا۔ اُنھوں نے کہا کہ گذشتہ سال کے مقابلے یہ قیمتیں زیادہ ہوں گی۔ فی الحال گنّے کے لیے فی کوئنٹل 255؍ روپئے قیمت ادا کی جا تی ہے جس میں فی کوئنٹل 20؍ روپیوں کا اضا فہ کرنے کی سفا رش کی گئی ہے۔
***** ***** *****
وزیر اعظم نریندر مو دی نے کہا ہے کہ معا شی طور پر کمزور اور متوسط طبقے کو جدید طِبّی سہو لیات فراہم کر نے کے لیے ریاستی حکو متوںکے تعائون سے بنیادی ڈھا نچہ کھڑا کیا جا رہا ہے ۔وزیر اعظم مو دی کل نئی دِلّی کے ایمس اسپتال میں ایک تقریب کے افتتاح کے موقع پر بول رہے تھے۔ اُنھوں نے کہا کہ آ یوشمان بھارت نا می سب سے بڑے صحت منصو بے کے تحت ملک کے ہر خاندان کو پانچ لاکھ روپیوں تک کا بیمہ تحفظ فراہم کیا جائے گا۔
***** ***** *****
مہاراشٹرکے99؍ لاکھ سے زیادہ لو گوں کو غذائی تحفظ قا نون کے دائرے میںلا یا جائے گا۔
اناج اور خوراک کی فراہمی کے ریاستی وزیر گریش با پٹ نے یہ بات کہی۔ انا ج اور خوراک کی فراہمی کی مرکزی وزارت کی جانب سے نئی دِلّی میں منعقدہ قو می سطح کی کانفرنس میں با پٹ بول رہے تھے۔ اُنھوں نے کہا کہ اناج پانے والے مستحق افراد کی طرح بزرگ افراد کے لیے بنے گھروں کو بھی کم قیمت پر اناج فراہم کیا جا نا چا ہیے۔
***** ***** *****
ممبئی ہائی کورٹ کی اورنگ آباد بینچ نے حکو مت سے کہا ہے کہ وہ شِر ڈی کے سائی با با ٹرسٹ میں ہوئے گھپلے کے الزا مات کے بارے میں تین ہفتوں میں اپنا موقف پیش کرے۔ ہندو جن جا گرن سمیتی نے اِس معاملے میں عدالت میں عرضداشت داخل کی ہے۔ ہندو جن جاگرن سمیتی کاالزام ہے کہ سائی بابا ٹرسٹ نے 2015 میں ہوئے نا سک کُمبھ میلے کے دوران انتظا مات کے لیے سامان کی خریداری کی رقم میں بڑے پیما نے پر بد عنوا نی کی ہے۔
***** ***** *****
قرض کی یکمُشت ادائیگی اسکیم کے تحت بینکوں سے مثبت رویہ اپنا تے ہوئے زیادہ سے زیادہ کسانوں تک قرض معا فی کا فائدہ پہنچا نے کی اپیل ٹرانسپورٹ کے ریاستی وزیر دیواکر رائو تے نے کی ہے۔ اِس بارے میں کل لاتور ضلع کلکٹر دفتر میں منعقدہ میٹِنگ میں رائو تے بول رہے تھے۔ اُنھو ں نے کہا کہ اِس بات کی ضرورت ہے کہ دیڑھ لاکھ سے برائے نام زیادہ قرضدار کسا نوں کے قرضے ، بینک اپنے اختیا رات کا استعمال کر کے معاف کرے جن سے کسا ن قرض کے بوجھ سے پوری طرح آزاد ہو سکیں۔ رائو تے نے اِس بارے میں بینکوں کو غور کر نے کو کہا۔
***** ***** *****
مائونٹ ایوریسٹ کی چو ٹی سر کر نے والے مہاراشٹر کے قبا ئلی طلباء کے ایک گروپ نے کل وزیر اعظم نریندر مودی سے ملا قات کی۔
یہ طلباء مہاراشٹر سر کار کے قبائلیوں کی بہبود سے متعلق محکمے کی شوریہ مہم کا حصہ تھے۔ وزیر اعظم نے طلباء کو اُنکے اِس کار نا مے پر مبارکباد پیش کی اور اُنکے مستقبل کے لیے نیک خواہشات کا اظہار کیا۔
***** ***** *****
دوران زچگی زچّہ اموت پر قا بو پانے کے معاملے میں ریاست مہا راشٹر نے ملک بھر میں دوسرا مقام حاصل کیا ہے۔
اِس ضمن میں مرکزی وزیر صحت جے پی نڈّا کے ہاتھوں کل نئی دِلّی میں انعام دے کر ریاست کی حوصلہ افزائی کی گئی ہے۔ زچگی کے دوران ہونے والی اموات پر قا بو پانے کے معاملے میں کیرا لہ نے ملک میں پہلا مقام حاصل کیا ہے۔
***** ***** *****
بھارت کے کِدامبّی شریکانت اور پی وی سندھو ، ملیشین اوپن بیڈ مِنٹن سیریز کے سیمی فائنل میں پہنچ گئے ہیں۔ مردوں کے سنگلز مقابلے میں چو تھی رینکِنگ کے حا مل شریکانت نے آسٹریلیاء کےLeverdez کو18-21؍ اور 14-21؍ کے فرق سے ہرادیا۔ وہی خواتین کے سنگلز مقابلوں میں تیسری رینکِنگ کی حامل بھارت کی پی وی سندھو نے اسپین کی Carolina Marin کو20-22؍ اور19-21؍ کے فرق سے شکست دی۔ سیمی فائنل مقابلے آج کھیلے جا ئیں گے۔
***** ***** *****
درج فہرست ذاتوں اور جماعتوں کے مختلف مطالبات کی جانب حکو مت کی توجہ مبذول کر وانے کے لیے کل بیڑ میں بھارتیہ ریپبلیکن پارٹی کی جانب سے آکروش مورچہ نکا لا گیا۔ یہ جلوس ضلع کلکٹر دفتر کے سامنے جلسۂ عام میں تبدیل ہو گیا۔ اِس موقع پر حکو مت کی پا لیسی پر سخت تنقید کی گئی۔
***** ***** *****
لاتور کے گنج گولائی علاقے میں کل نا جائز قبضہ جات ہٹا دیئے گئے۔ لاتور کے میو نسپل کمشنر کو ستُبھ دوئے گائو نکر نے بتا یا کہ شہر کے سبھی نالوں پر سے نا جائز قبضہ جات ہٹائے جا ئیں گے۔ اُنھوں نے شہر یوں اور کار و بار یوں سے اپنے قبضہ جات خود ہی ہٹا لینے کی اپیل بھی کی۔
***** ***** *****
بھارت اور آئر لینڈ کے در میان کل کھیلے گئے T-20؍ کر کٹ مقابلے میں بھارت نے آئر لینڈ کو143؍ رنوں سے ہرا دیا۔ اِس جیت کے ساتھ ہی بھارت نے دو میچوں کی سیریز 0-2؍ سے اپنے نام کر لی۔ کل کھیلے گئے مقابلے میں بھارت نے پہلے بلّے بازی کر تے ہوئے مقررہ 20؍ اووروں میں 4؍ وکٹ کے نقصان پر 213؍ رن بنائے۔ جواب میں آئر لینڈ کی پو ری ٹیم محض 13؍ اوور کھیل کر70؍ رن ہی بنا سکی۔
بھارتی ٹیم اب انگلینڈ کے دورے پر روانہ ہو رہی ہے جہاں وہ ٹیسٹ،T-20؍ اور ایک روزہ میچ اِن تینوں طرز کی کر کٹ کھیلے گی۔ بھارت اور انگلینڈ کے بیچ پہلاT-20؍ مقابلہ منگل کے روز ہو گا۔

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.06.2018 06.50AM
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 June 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जून २०१८ सकाळी ६.५० मि.
****
v खरीप पिकांच्या हमीभावात किमान दीडपट वाढीची पंतप्रधानांची
ग्वाही
v माता मृत्यूदर कमी करण्यात
महाराष्ट्राचा देशभरातून दुसरा क्रमांक
v मराठा
क्रांती मोर्चाच्या दुसऱ्या टप्प्याला तुळजापुरातून प्रारंभ
आणि
v टी ट्वेंटी मालिकेत भारताचा आयर्लंडवर दोन शून्यनं विजय; मलेशियन
खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत, किदम्बी श्रीकांत आणि पी.व्ही.सिंधू उपांत्य फेरीत दाखल
****
खरीप पिकांच्या हमीभावात किमान दीडपट वाढीची ग्वाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत या
निर्णयावर शिक्कामोर्तब होईल. महाराष्ट्रासह एकूण पाच ऊस उत्पादक राज्यांतल्या, ऊस
उत्पादकांच्या शिष्टमंडळानं, काल नवी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली, त्यावेळी ते
बोलत होते. चालू वर्षासाठी उसाचा रास्त आणि किफायतशीर दर दोन आठवड्यात जाहीर होईल,
आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात नक्कीच वाढ केली जाईल, अशी ग्वाही पंतप्रधानांनी
दिली. सध्या उसाचा रास्त आणि किफायतशीर दर प्रति क्विंटल २५५ रुपये असून, त्यात क्विंटलमागे
वीस रुपयांनी वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांत एकूण थकबाकीपैकी
चार हजार कोटी रुपये ऊस उत्पादकांना अदा करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
****
आर्थिक दुर्बल तसंच मध्यम वर्गाला आधुनिक आरोग्य
सेवा पुरवण्यासाठी राज्य सरकारांच्या सहाय्यानं पायाभूत सुविधा निर्माण करत असल्याचं
पंतप्रधानांनी नमूद केलं आहे. ते काल नवी दिल्लीतल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था-एम्स-मध्ये
‘राष्ट्रीय वृद्धत्व केंद्रा’च्या कोनशीला समारंभात
बोलत होते. ‘आयुष्मान भारत’ या सर्वात मोठया आरोग्य
विमा योजनेअंतर्गत, देशातल्या प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा
मिळेल, असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.
****
ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘सांधेबदल शस्त्रक्रिया मोहीम’
राबवण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे. राज्यातली सगळी शासकीय रुग्णालयं, तसंच धर्मादाय
विश्वस्त रुग्णालयांच्या माध्यमातून, दहा लाख गरजू रुग्णांवर या शस्त्रक्रिया करण्यात
येणार आहेत.
****
माता मृत्यूदर कमी करण्यात महाराष्ट्रानं देशभरातून दुसरा क्रमांक पटकावला आहे. काल नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्री
जे.पी.नड्डा यांच्या हस्ते राज्याला
पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. हा दर कमी करण्यात केरळ राज्य देशात प्रथम
क्रमांकावर आहे. पंतप्रधान सुरक्षित
मातृत्व अभियानात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. या अभियानांच्या संकेतस्थळावर खासगी तसंच सरकारी डॉक्टराची नावं नोंदवावी लागतात. देशभरातून जवळपास पाच हजार डॉक्टरांनी इथं नावं नोंदवली असून, यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्वाधिक सहाशे डॉक्टरांचा समावेश आहे.
****
राज्यातल्या ९९ लाखांपेक्षा अधिक लोकांना अन्न सुरक्षा
कायद्याचा लाभ मिळणार असल्याचं, अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं
आहे. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाच्यावतीनं नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय
परिषदेत ते काल बोलत होते.
अन्य लाभार्थ्यांप्रमाणे वृद्धाश्रमांनाही स्वस्त दरात धान्य उपलब्ध करुन द्यावं
अशी सूचना बापट यांनी यावेळी केली.
****
चालू
शैक्षणिक वर्षापासून राज्यात १३ ओजस
शाळा सुरु करण्यात येणार आहेत, यासंदर्भात
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबई इथं आढावा बैठक घेतली. शाळांमध्ये
आंतरराष्ट्रीय मानकाचं अध्ययन-अध्यापन व्हावं, यावर मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांनी
भर द्यावा, असं आवाहन तावडे यांनी यावेळी केलं. येत्या चार जुलै
पासून नागपूर इथं सुरु होणाऱ्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सर्व जिल्ह्यांचे
पालकमंत्री, शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक यांच्याबरोबर संयुक्त
बैठक घेऊन, यासंबंधी शाळांनी केलेल्या मागण्यांचा आढावा घेणार असल्याचं तावडे म्हणाले.
****
शिर्डीच्या श्रीसाईबाबा
संस्थानाच्या विश्वस्त मंडळावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत तीन आठवड्यात आपलं
म्हणणं मांडण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं शासनाला दिले
आहेत. हिंदु जनजागृती समितीनं यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. या विश्वस्तमंडळानं
२०१५ सालच्या नाशिक कुंभमेळ्याच्या वेळी गर्दीच्या नियोजनासाठीचं साहित्य खरेदी करताना
मोठ्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीनं केला आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
मराठा क्रांती मोर्चा
आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं जागरण गोंधळानं
सुरुवात झाली. मराठा समाजाला आरक्षण द्यावं, शेतमालला भाव द्यावा,
स्वामीनाथन आयोग लागू करावा, अट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करा, आदी मागण्यासाठी काल आंदोलकांनी तुळजापूर शहरातून
मोर्चाही काढला. आतापर्यंत काढलेल्या
अट्ठावन्न मोर्चांनंतर शासनानं काही मागण्या मान्य केल्या, मात्र
त्यांची अंमलबजावणी अजूनही झाली नाही, शासनानं मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसह इतर
सर्व मागण्यांबाबत निर्णय जाहीर करावेत, अशा मागणीचं निवेदन उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.
****
मलेशियन
खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत, भारताच्या किदम्बी श्रीकांत आणि पी.व्ही.सिंधूनं उपांत्य
फेरीत धडक मारली आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत चौथ्या मानांकीत श्रीकांतनं काल ऑस्ट्रेलियाच्या
लिव्हर्डेज याचा 21-18, 21-14 असा पराभव केला. महिला एकेरीत तिसऱ्या मानांकित सिंधूनं, उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या
कॅरोलिन मरीन हिला 22-20, 21-19 असं नमवलं.
उपांत्य फेरीचे सामने आज होणार आहेत.
****
क्रिकेट - आयर्लंड इथं काल झालेल्या टी ट्वेंटी सामन्यात
भारतानं आयर्लंडचा १४३ धावांनी पराभव करत, दोन सामन्यांची ही मालिका दोन शून्यनं जिंकली आहे. भारतानं प्रथम फलंदाजी करत, निर्धारित २० षटकांत चार बाद
२१३ धावा केल्या, आयर्लंडचा संघ तेराव्या षटकांत अवघ्या ७० धावात तंबूत परतला.
भारतीय संघ आता इंग्लंड दौऱ्यावर जात असून, या दौऱ्यात
टी ट्वेंटी, एकदिवसीय तसंच कसोटी या तीनही प्रकारात प्रत्येकी तीन सामने होतील. पहिला
टी ट्वेंटी सामना येत्या मंगळवारी खेळला जाईल.
****
महाराष्ट्रातल्या एव्हरेस्टवीर
विद्यार्थ्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या शौर्य अभियान दलाच्या
पाच विद्यार्थ्यांनी, गेल्या महिन्यात सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केलं. पंतप्रधानांनी
या मुलांचं अभिनंदन करत, भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
****
पुढच्या महिन्यात साजऱ्या
होत असलेल्या आषाढी यात्रेनिमित्त राज्य परिवहन
महामंळामार्फत तीन हजार ७८१ जादा बसेस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
परिवहन मंत्री दिवाकर
रावते यांनी ही माहिती दिली. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर इथं आयोजित आढावा
बैठकीत ते बोलत होते. विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा परतीचा प्रवास
सुलभ व्हावा, यासाठी दहा टक्के बस, आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करुन दिल्या जातील, असंही
रावते यांनी सांगितलं. २३ जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी एसटीचे सुमारे
आठ हजार कर्मचारी आठवडाभर सेवा देणार आहेत.
****
‘एक रकमी परतफेड’ योजनेअंतर्गत
बँकांनी सकारात्मक भूमिका घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यात
मदत करावी, असं आवाहन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केलं आहे. लातूरच्या जिल्हाधिकारी
कार्यालयात काल झालेल्या याबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. दीड लाखाच्या मर्यादेपेक्षा नाममात्र जास्त
कर्ज असलेलं शेतकऱ्यांचं कर्ज, बँकांनी आपल्या अधिकारात माफ
केल्यास, ते
पूर्ण कर्जमुक्त होतील, बँकांनी याबाबत विचार करावा, असं आवाहन रावते यांनी केलं आहे.
****
येत्या पाच वर्षासाठी राज्य सरकार उद्योगस्नेही आणि
रोजगाराभिमुख औद्योगिक धोरण राबवणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी
दिली आहे. ते काल औरंगाबाद इथं नवीन औद्योगिक धोरणाविषयीच्या चर्चासत्रात बोलत होते.
औद्योगिक क्षेत्रात यावर्षी आठ लाख कोटी रूपयांची गुंतवणूक झाली असून या माध्यमातून
२० लाख रोजगार निर्मिती झाल्याचं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यातल्या विविध औद्योगिक
संघटनांनी या धोरणाविषयी आपले मुद्दे मांडले, तसंच आपल्या मागण्यांसंदर्भात उद्योगमंत्र्यांना
निवेदन सादर केलं.
****
लातूर इथं गंजगोलाई भागातली अतिक्रमणं
काल हटवण्यात आली, शहरात सर्वच भागात नाल्यावर असलेलं अतिक्रमण हटवण्यात येणार असून,
नागरिक तसंच व्यावसायिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावं, असं आवाहन लातूरचे मनपा
आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे.
****
अनुसूचित जाती जमातीच्या विविध मागण्यांकडे सरकारचं
लक्ष वेधून घेण्यासाठी काल बीड इथं भारतीय रिपब्लीकन पक्षाच्या वतीनं आक्रोश मोर्चा
काढण्यात आला.
*****
***
Friday, 29 June 2018
Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.06.2018 - 17.25
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 29 June 2018
Time - 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जून २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
आर्थिक
दुर्बलांना सहजगत्या न्याय मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी
व्यक्त केली आहे. कानपूर उच्च न्यायालयातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आज लोक
अदालतसारखे न्यायिक प्रणालीचे पर्याय अधिक बळकट करण्याची आवश्यकता व्यक्त केली. आर्थिक
दुर्बल घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी न्यायिक प्रणालीची मदत घेण्याचं टाळण्याच्या
मानसिकतेबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. दीर्घ काळापासून प्रलंबित प्रकरणं निकाली
निघावी या करता वकिलांनी न्यायालयांना सहकार्य करावं, असं प्रतिपादन राष्ट्रपतींनी
केलं.
****
स्विस
बँकांमध्ये जमा करण्यात आलेल्या, भारतीयांच्या संपत्तीबाबत या वर्षाच्या अखेरपर्यंत
माहिती घेण्यात येईल, असं केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांशी
बोलताना सांगितलं. हे काळं धन आहे का अवैध आर्थिक व्यवहार याचा तपास करण्यात येणार
असल्याचं त्यांनी म्हटलं. भारतीयांच्या, स्विस बँकांमध्ये जमा होणाऱ्या संपत्तीत वाढ
झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर गोयल यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात काही अयोग्य
बाबी आढळल्यास सरकार योग्य ती कारवाई करेल, असंही गोयल यांनी स्पष्ट केलं. डॉलरच्या
तुलनेत रुपयाच्या घसरत असलेल्या किंमतीबाबत आंतरराष्ट्रीय कारणं लक्षात घेऊन योग्य
ती उपाययोजना केली जाईल, असंही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
‘एक
रकमी परतफेड’ योजनेअंतर्गत बँकांनी सकारात्मक भूमिका घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना
कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यात मदत करावी, असं आवाहन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी
केलं आहे. लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या कर्जमुक्ती आणि कर्ज उपलब्धता,
याबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बँकांनी त्यांच्या अधिकारात, दीड लाखांहून थोडंसंच
जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचं, दीड लाखाच्या वरच्या रकमेचं कर्ज माफ केल्यास त्या
शेतकऱ्यांना शासनाकडून दीड लाख रुपयांची कर्जमाफी मिळेल, आणि ते पूर्ण कर्जमुक्त होतील,
असं सांगत, बँकांनी याबाबत विचार करावा, असं रावते यांनी म्हटलं आहे.
****
मराठा
क्रांती मोर्चा आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आज उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
तुळजापुर इथं झाली. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं यावेळी जागरण गोंधळानं आंदोलनाची
सुरुवात कऱण्यात आली. यानंतर उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलं.
आतापर्यंत या आंदोलकांद्वारे काढण्यात आलेल्या अट्ठावन्न मोर्चांनंतर शासनानं काही
मागण्या मान्य केल्या मात्र त्यांची अंमलबजावणी अजूनही झाली नाही, आता शासनानं मराठा
आरक्षणाच्या मुख्य मागणीसह इतर सर्व मागण्यांबाबत निर्णय जाहीर करावेत, अशी मागणी आंदोलकांनी
या निवेदनाद्वारे केली आहे.
****
नागपूर-मुंबई
समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात येणार असलेल्या सात हजार दोनशे नव्वद हेक्टर
जमिनीपैकी सहा हजार सत्तावन्न हेक्टर जमिनीचं संपादन आतापर्यंत झालं आहे. सरळ खरेदीद्वारे एक हजार हेक्टर जमीन खरेदी करून
बुलडाणा जिल्ह्यानं जमीनसंपादनात राज्यात पहिलं स्थान पटकावलं असून, या जिल्ह्यात आता
फक्त एकशे छत्तीस हेक्टर जमिनीचं संपादन बाकी असल्याची, तसंच औरंगाबाद जिल्हा जमीन
संपादनात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष
डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली आहे.
****
शिर्डीच्या
श्रीसाईबाबा संस्थानाच्या विश्वस्त मंडळावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत तीन
आठवड्यात आपलं म्हणणं मांडण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं
शासनाला दिले आहेत. हिंदु जनजागृती समितीनं यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. या विश्वस्तमंडळानं
२०१५ सालच्या नाशिक कुंभमेळ्याच्या वेळी गर्दीच्या नियोजनासाठीचं साहित्य खरेदी करताना
मोठ्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीनं केला आहे.
****
महाराष्ट्राच्या
आदिवासी विकास विभागाच्या शौर्य अभियान पथकाच्या दहा विद्यार्थ्यांनी आज पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दलाच्या पाच विद्यार्थ्यांनी नुकतंच सर्वोच्च माऊंट
एव्हरेस्ट शिखर सर केलं आहे. पंतप्रधानांनी या मुलांचं अभिनंदन केलं असून, पुढच्या
वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. या भेटीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि
केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर उपस्थित होते.
****
Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 29.06.2018 11.00
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२९ जून २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
त्यांच्या निवासस्थानी देशातल्या ऊस उत्पादकांच्या एका शिष्टमंडळाशी संवाद साधणार आहेत.
या शिष्टमंडळात देशभरातले दीडशे ऊस उत्पादक शेतकरी सहभागी असून, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या
शेतकऱ्यांचाही समावेश आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठीच्या उपाययोजना आणि सरकारनं
त्यासाठी उचललेली पावलं यावर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.
****
भारतीय बँकांना महामार्ग
क्षेत्रात मोठी संधी असून त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन केंद्रीय परिवहन
मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज मुंबईमध्ये देशभरातल्या अग्रणी बँकांच्या
प्रमुखांची भेट घेणार आहेत. यावेळी महामार्ग क्षेत्रातल्या प्रकल्पांबाबत बँकप्रमुखांना
माहिती देण्यात येणार आहे.
****
जम्मू काश्मीरच्या शोपिया
जिल्ह्यात लष्कराच्या गस्ती पथकावर ग्रेनेडचा हला झाल्याचं वृत्त आहे. लष्करानं या
भागाला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू केली आहे. तर, कूपवाडा जिल्ह्यातही भारतीय सैन्याची
अतिरेक्यांशी चकमक सुरू असून,या चकमकीत एक अतिरेकी ठार झाल्याचं वृत्त आहे.
****
केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआय-नं
कॅनरा बँकेच्या दोन माजी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांवर मुंबईच्या एका विशेष
न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. हिरे व्यापारी जतिन मेहता यानं या बँकेचं एकशे
शेहेचाळीस कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याच्या गुन्ह्याच्या संदर्भात अविनाश महाजन आणि
सुंदर राजन रामन या माजी संचालकांसह अन्य पंधरा अधिकाऱ्यांविरोधात सीबीआयनं हे आरोपपत्र
दाखल केलं आहे.
****
श्री अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची
तिसरी तुकडी आज जम्मूहून रवाना झाली. सततच्या पावसानं जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर
काही ठिकाणी अडथळे निर्माण झाले असल्याच्या स्थितीतही भाविकांनी ही यात्रा सुरू ठेवली
आहे. दरम्यान, श्रीअमरनाथ यात्रेवरचं एक विशेष टपाल तिकीट काल जम्मूकाश्मीरचे राज्यपाल
एन.एन.व्होरा यांनी जारी केलं. या तिकिटावर श्रीअमरनाथ यात्रेचा संपूर्ण मार्ग दाखवण्यात
आला आहे.
//**********//
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 29 June 2018
Time 8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۲۹ ؍ جون ۲۰۱۸
وَقت: صبح ۴۰:۸- ۴۵:۸
وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے کہا ہے کہ ما حو لیات کے تحفظ کی خا طر ریاست میں عوا می حمل و نقل کے لیے آلود گی نہ پھیلا نے والا ایندھن استعما ل کیا جائے گا۔ وہ کل ممبئی میں پیٹرولیم اور طبعی گیس کنٹرول بورڈ کے ایک پرو گرام سے خطاب کر رہے تھے۔ پیٹرولیم کے وزیر دھر میندر پر دھان بھی اِس پروگرام میں شریک تھے۔ اپنے خطاب میں دھر میندر پھر دھان نے کہا کہ آئندہ4؍ تا 5 ؍ برسوں میں ریاست کے 30؍ اضلاع میں سِٹی گیس ڈِسٹریبیوشن سینرز شروع کیئے جائیں گے۔ فی الحال ریاست میں اس طرح کے9؍ مراکز فعال ہیں آئندہ مر حلے میں اورنگ آباد ، لاتور ، عثمان آ باد سمیت مزید 9؍ اضلاع میں یہ مراکز شروع کیئے جائیں گے۔
***** ***** *****
ریاست کے ایک ہزار دیہاتوں کی تر قی کے لیے کل ریاستی حکو مت نے مختلف سماجی تنظیموں اور کمپنیوں کے ساتھ61؍ معاہدے کیئے۔ وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس بھی اِس موقع پر موجود تھے۔ اُنھوں نے کہا کہ حکو مت کی فعالیت اور تنظیموں کے ہنر کو استعمال کر کے ریاست میں بڑی تبدیلی لائی جائے گی۔ ریاست میں ایک ہزار ماڈل گائوں تیار کیئے جائیں گے اور ملک کی سب سے بہترین سہو لیات اِن دیہاتوں میں فراہم کی جائیں گی۔
***** ***** *****
قانون ساز کونسل کی 4؍ نشستوں کے لیے ہوئے انتخا بات میں شیو سینا نے2؍ نشستیں حاصل کی ہیں جبکہ لوک بھارتی پارٹی اور بی جے پی کو ایک ایک نشست پر کامیابی ملی ۔ ممبئی گریجویٹس حلقے سے شیو سینا امید وار وِلاس پوتنِس اور ممبئی اسا تذہ حلقے سے لوک بھارتی کے کپل پاٹل نے فتح حاصل کی ۔ ناسک اساتذہ حلقے سے شیو سینا کے امید وار کِشور دراڑے اور کوکن گریجویٹس حلقے سے بی جے پی کے نِرنجن ڈائو کھرے نے انتخا بات میں فتح حاصل کی۔
***** ***** *****
ممبئی میں کل ایک خانگی کمپنی کا طیارہ گر کر تباہ ہو گیا اِس حادثے میں 9؍ افراد ہلاک اور 3؍ افرد زخمی ہو گئے۔
مہلو کین میں پائلٹ، کو پائلٹ ،2؍ اِنجینئرز اور ایک راہگیر شامل ہے۔ جوہو طیرانگاہ سے تجر باتی پر واز کے آ غاز کے بعد دو پہر دیڑھ بجے کے قریب گھاٹ کو پر علا قے میں یہ طیارہ گر پڑا۔ ہوا بازی کے وزیر سُریش پر بھو نے اِس حادثے کی تحقیقات کا حکم دے دیا ہے ۔ گذشتہ 2؍ دنوں میں ریاست میں یہ دوسرا ہوائی حادثہ ہے۔
***** ***** *****
ممبئی عدالت عالیہ نے کہا ہے کہ ڈاکٹر نریندر دابھولکر اور کامریڈ گووِند پانسرے کے قتل کی تحقیقات انتہا ئی غیر اطمینان بخش ہیں۔
اِن معاملات پر کل ہوئی سما عت کے دوران نا راضگی کا اظہار کر تے ہوئے عدالت نے کہا کہ اِن قتل کی وارداتوں کی سی بی آئی اور ریاستی پولس کی خصو صی تحقیقاتی ٹیم کے ذریعے کی جارہی تحقیقات سنجید گی سے عاری ہے۔ 12؍ جولائی کو آئندہ سماعت کے دوران سی بی آئی کے ایڈیشنل ڈائریکٹر اور محکمۂ داخلہ کے ایڈیشنل چیف سیکریٹری کو عدالت میں حاضر رہنے کا حکم بھی ممبئی عدالت عالیہ نے دیا۔
***** ***** *****
ریاست میں یکم جو لائی تا 31؍ جولائی کے دوران 13؍ کروڑ درخت لگائے جانے کی مہم کے دوران شہر یوں کو رعا یتی داموں پر پو دے دیئے جا ئیں گے۔ 9؍ مہینے کے تھیلیوں میں لگے پو دے8؍ روپئے میںاور18؍ مہینے کے پو دے40؍ روپئے میں دیئے جائیں گے۔
***** ***** *****
مرکزی مملکتی وزیر برائے سماجی انصاف رامداس آٹھولے نے کہا ہے کہ ڈاکٹر گنگا دھر پانتائو نے تا عمر امبیڈکر ی تحریک کی رہنمائی کی۔ کل اورنگ آ باد میں ایک تقریب سے خطاب کر تے ہوئے اُنھوں نے کہا کہ شہر میں گنگا دھر پانتائو نے کی یادگار کی تعمیر اور اُن کے نام سے ایوارڈ شروع کر نے کے لیے وہ کوشش کریںگے۔ اِس موقع پر پانتائو نے کے نام سے مو سوم ویب سائٹ کا افتتاح بھی آٹھولے نے کیا۔
بعد ازاں اخباری نمائندوں سے گفتگو کر تے ہوئے مملکتی وزیر برائے سماجی انصاف رام داس آٹھولے نے کہا کہ درج فہرست ذاتوں اور قبائل پر مظالم کی اِنسداد سے متعلق ایٹرا سٹی قا نون کے تحفظ کے لیے پارلیمنٹ کے مانسون اجلاس میں قا نون لا یا جائے گا۔ اُنھوں نے کہا کہ ریاست میں بی جے پی اور شیو سینا کے ما بین انتخا بی اتحاد ہو نا چا ہیے۔
***** ***** *****
وزیر ماحو لیات رام داس کدم نے کہا ہے کہ ریاستی اسمبلی کے آئندہ انتخا بات میں شیو سینا تنہا انتخا بات لڑ کر اکثر یت حاصل کرے گی۔ وہ کل جالنہ میں شیو سینا کار کنوں کے تر بیتی کیمپ سے خطاب کر رہے تھے۔ اُنھوں نے بی جے پی کی سیا سی پا لیسیوں پر سخت تنقید کر تے ہوئے کہا کہ بی جے پی نے شیو سینا کی انگلی پکڑ کر مہاراشٹر کی سیا ست میں داخلہ لیا۔

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 29.06.2018 6.50
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 June 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जून २०१८ सकाळी ६.५० मि.
****
·
राज्यात सार्वजनिक वाहतुकीसाठी
पर्यावरणपूरक इंधन वापरणार - मुख्यमंत्री
·
एक हजार गावांच्या विकासासाठी राज्य शासनाचे विविध
कंपन्यांसोबत ६१ सामंजस्य करार
·
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेला दोन तर लोकभारती आणि भाजपला प्रत्येकी
एक जागा
·
अस्मितादर्श नियतकालिकाचा अर्धशतकपूर्ती सोहळा साजरा
आणि
·
लातूर इथं सोयापार्क
तर उस्मानाबाद इथं फटाका क्लस्टर उभारणार - उद्योगमंत्र्यांची घोषणा
****
पर्यावरण संवर्धनाकरिता
राज्यात सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन वापरलं जाणार असल्याचं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाच्या कार्यक्रमप्रसंगी
ते काल मुंबईत बोलत होते. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यावेळी उपस्थित होते. राज्यात येत्या
चार ते पाच वर्षात जवळपास ३० जिल्ह्यात सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन नैसर्गिक वायू वाटप
केंद्र सुरु केले जाणार असल्याचं धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. राज्यात सध्या नऊ
ठिकाणी अशी केंद्रं आहेत. पुढच्या टप्प्यात औरंगाबाद, लातूर, उस्मानाबादसह आणखी नऊ ठिकाणी ही
केंद्र सुरू केली जाणार असल्याची माहिती प्रधान यांनी दिली.
****
राज्यातील एक हजार गावांचा विकास करण्यासाठी काल राज्य
शासनानं विविध सामाजिक संस्था, कंपन्यांसोबत ६१ सामंजस्य करार केले. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यावेळी उपस्थित होते. यावेळी बारा संस्थांना उद्देश पत्रंही देण्यात आली. शासनाची
व्यापकता आणि संस्थांचं कौशल्य यांच्या सहयोगानं राज्यात महापरिवर्तन घडून येणार असल्याचं
मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात एक हजार मॉडेल गावं तयार करणार असून या गावांमध्ये देशातील
सर्वोत्तम सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आरोग्य बँक उपक्रमाचं लोकार्पण करण्यात आलं.
****
विधान
परिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेनं दोन जागांवर विजय मिळवला, तर
लोकभारती आणि भाजपला प्रत्येकी एक जागा मिळाली. मुंबई पदवीधर मतदार संघातून शिवसेनेचे
उमेदवार विलास पोतनीस यांनी तर मुंबई शिक्षक मतदार संघातून लोकभारतीचे कपिल पाटील यांनी
विजय मिळवला. नाशिक शिक्षक मतदार संघातून शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे विजयी
झाले. तर कोकण पदवीधर मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे निरंजन डावखरे यांनी विजय
मिळवला आहे.
****
मुंबईत काल एक खासगी विमान कोसळून पाच जण
मृत्यूमुखी पडले. मृतांमध्ये वैमानिक, सह वैमानिक, दोन
अभियंता तसंच एका पादचाऱ्याचा समावेश आहे. जुहू विमानतळावरून चाचणी उड्डाण
घेतल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास घाटकोपर भागात हे विमान कोसळलं. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. हवाई वाहतुक मंत्री सुरेश प्रभू यांनी या अपघाताच्या
चौकशीचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांत राज्यात झालेला हा दुसरा विमान अपघात आहे.
****
डॉ. नरेंद्र दाभोलकर तसंच कॉ.गोविंद
पानसरे हत्या प्रकरणाचा तपास असमाधानकारक असल्याचं मत, मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त
केलं आहे. या प्रकरणी काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं, केंद्रीय गुन्हे अन्वेषण
- सीबीआय आणि राज्य पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून या हत्येचा तपास गांभीर्यानं केला
जात नसल्याचं नमूद केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या १२ जुलैला होणार असून, सीबीआयचे
सहसंचालक तसंच राज्याचे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी पुढील सुनावणीच्या
वेळी हजर राहण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत.
****
राज्यात एक जुलै ते ३१ जुलै दरम्यान राबवल्या जात असलेल्या १३
कोटी वृक्षलागवड योजनेत नागरिकांना सवलतीच्या दरात रोपं उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
नऊ महिने वाढ झालेलं लहान पिशवीतलं रोप, ८ रुपयांना तर १८ महिने वाढ झालेलं मोठ्या पिशवीतील रोप, ४० रुपये
दरानं उपलब्ध असेल.
****
अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात मन्याळे इथं जिल्हा
परिषदेच्या प्राथमिक शाळेनं २५ हजार झाडं लावली आहेत. उन्हाळी सुटीत विद्यार्थ्यांनी
जमा केलेल्या सुबाभूळ, बोर, चिंच, यासारख्या विविध जातींच्या झाडांच्या बियांचं जवळच
असलेल्या डोंगरावर रोपण करण्यात आलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
डॉ. गंगाधर पानतावणे यांनी आयुष्यभर आंबेडकरी चळवळीला दिशा देण्याचं कार्य केलं,
असं केंद्रीय
सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
अस्मितादर्श नियतकालिकाच्या अर्धशतकपूर्ती निमित्त काल औरंगाबाद इथं आयोजित समारंभाचं उद्घाटन,
आठवले यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
औरंगाबाद इथं पानतावणे यांचं स्मारक उभारण्यासाठी तसंच पानतावणे यांच्या
नावानं शासनाचा पुरस्कार सुरू करण्यासाठी, प्रयत्न करणार असल्याचं
आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. डॉ.गंगाधर पानतावणे यांच्या नावाने सुरू करण्यात
आलेल्या संकेत स्थळाचं लोकापर्णही यावेळी आठवले यांच्या हस्ते करण्यात आलं.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर मुळे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष
श्रीपाद जोशी, पूर्वाध्यक्ष श्रीपाल सबनीस, अर्थतज्ज्ञ डॉ.भालचंद्र मुणगेकर यांच्यासह अनेक मान्यवर
यावेळी उपस्थित होते.
अस्मितादर्श नियतकालीकाच्या माध्यमातून पानतावणे यांनी, समाजाला जाती धर्माच्या पलीकडे घेऊन जाण्याचं
कार्य केलं, असं मत श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केलं.
पानतावणे यांच्या साहित्यावर परिसंवाद,
तसंच निमंत्रितांचं कविसंमेलनही यावेळी घेण्यात आलं.
****
अनुसूचित जाती जमाती अन्याय प्रतिबंधक कायदा ॲट्रोसिटी कायद्याच्या संरक्षणासाठी
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक आणणार असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं. ते काल औरंगाबाद इथं बोलत होते. राज्यात
शिवसेना-भाजपनं एकत्रित निवडणूका लढवल्या पाहिजे असं मत, त्यांनी व्यक्त केलं.
****
विधानसभेच्या आगामी निवडणुकीत स्वबळावरच बहुमत मिळवू,
असा विश्वास पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे. ते काल जालन्यात आयोजित शिवसेना कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात बोलत होते.
भाजपाने शिवसेनेचं बोट धरून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केल्याचं सांगत कदम यांनी
भाजपच्या राजकीय धोरणांवर टीका केली.
दरम्यान, प्लास्टिक बंदीच्या निर्णयाचे त्यांनी समर्थन
केलं. जनतेने हा निर्णय सकारात्मक स्वीकारला असून, याचं श्रेय युवासेना प्रमुख आदित्य
ठाकरे यांना जातं, असंही त्यांनी नमूद केलं.
****
जालना जिल्ह्यात बँकाकडून शेतकऱ्यांना
दिल्या जाणाऱ्या पीककर्ज वाटपाबद्दल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नाराजी व्यक्त
केली आहे. पीककर्ज वाटपाचा आढावा आणि छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसंदर्भात
जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते काल बोलत होते. बँकांनी सकारात्मक
दृष्टीकोन ठेऊन शेतकऱ्यांना प्राधान्यानं पीककर्जाच वाटप करण्याचे निर्देश त्यांनी
यावेळी दिले.
****
लातूर जिल्ह्यात सोयापार्क
तर उस्मानाबाद जिल्ह्यात फटाका क्लस्टर सुरु केलं जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री
सुभाष देसाई यांनी दिली आहे. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उद्योजकांसमवेत लातूर
इथं आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. या मुळे या दोन्ही जिल्ह्यात कृषी तसंच औद्योगिक विकासाला
चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
हिंगोली जिल्ह्याच्या
औंढा तालुक्यातून जिल्हा कृषी विभागाच्या पथकानं अप्रमाणीत खताची ३६१ पोती जप्त केली
आहेत. जवळा बाजार इथल्या क्रांती कृषी सेवा केंद्र तसंच मुसळे कृषीसेवा केंद्रावर ही
कारवाई करण्यात आली.
****
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या
लघू पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंत्याला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काल निलंबित
केलं आहे. जलयुक्त शिवारच्या कामात हयगय केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
****
राज्यात लवकरच सहा नवीन
खुले कारागृह उभारण्यात येणार आहेत. लातूरसह धुळे, वर्धा, यवतमाळ, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी
इथं ही कारागृह उभारली जाणार आहेत. सध्या राज्यात अशी १३ कारागृह आहेत.
****
मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत, पी.व्ही.सिंधू
आणि किदम्बी श्रीकांत यांनी
काल आपापले पहिल्या फेरीचे एकेरी सामने
जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, सायना नेहवालचं या स्पर्धेतलं आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं.
****
नेदरलँड मध्ये सुरु असलेल्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत,
भारत आणि बेल्जियम संघात काल झालेला सामना एक एक असा बरोबरीत सुटला. साखळी फेरीतला
भारताचा पाचवा आणि शेवटचा सामना यजमान नेदरलँड सोबत होणार असून, सध्या सात गुण मिळवून
भारत गटात दुसऱ्या स्थानावर आहे.
//**********//
Subscribe to:
Posts (Atom)
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...