आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Sunday, 30 April 2017
Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.04.2017 - 05.25pm
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 30 April 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० एप्रिल २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपासून देशभरातल्या सर्व विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका
एकाचवेळी घ्याव्यात असं, नीति आयोगानं केंद्र सरकारला सुचवलं आहे. या निर्णयामुळे मोठ्या
प्रमाणावर खर्चात बचत होईल, त्याबरोबरच वेळ आणि मनुष्यबळाचीही बचत होईल, असं आयोगानं
म्हटलं आहे. २०२४ मध्ये एकत्रित निवडणुकांचा निर्णय घेतल्यास, काही विधानसभांचा कार्यकाळ
वेळपूर्वीच संपवावा लागेल, तर काही विधानसभांचा कार्यकाळ लांबवावा लागेल, असं आयोगानं
म्हटलं आहे.
****
येत्या पाच मे रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्था दक्षिण आशिया उपग्रह अवकाशात
प्रक्षेपित करणार आहे. सार्क देशांच्या समूहातल्या पाकिस्तान वगळता, इतर सात देशांचा
या प्रकल्पात सहभाग आहे. दक्षिण आशियाचे आर्थिक तसंच विकास विषयक प्राधान्यक्रम पूर्ण करण्यात हा उपग्रह
सहायक ठरणार असल्याचा विश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून
व्यक्त केला.
****
मन की बात या कार्यक्रमावर
माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अहमदनगर क्षेत्रीय प्रचार कार्यालयानं आज विशेष चर्चासत्र
आयोजित केलं होतं. अहमदनगर जिल्ह्यात पिंपळगाव माळवी इथं ग्रामस्थांनी हा कार्यक्रम
एकत्रित पणे ऐकून, त्यावर सविस्तर चर्चा केली. देशाच्या सर्वांगीण विकासासोबतच शेतमालाला
उत्पादनखर्चावर आधारित भाव द्यावा, ग्रामीण विकासावर अधिक भर द्यावा, अशा मागण्या ग्रामस्थांनी
केल्या.
****
तेजस ही सर्व अद्ययावत सुविधांनी
सुसज्ज रेल्वे गाडी येत्या जून महिन्यापासून मुंबई गोवा मार्गावर धावणार आहे. स्वयंचलित
दरवाजे, चहा कॉफीची यंत्रं, स्वतंत्र एलसीडी स्क्रीन, अत्याधुनिक स्वच्छतागृहं, आदी
सुविधा असलेली ही रेल्वे यंदाच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली होती. गंतव्य स्थानकांची
माहिती देणारे डिजिटल तसंच ब्रेल लिपीतले फलक, इलेक्ट्रॉनिक आरक्षण तक्ते, आदी सुविधाही
या गाडीत असतील. मुंबई गोवा मार्गापाठोपाठ दिल्ली चंदीगड या मार्गावरही ही रेल्वे चालवली
जाणार आहे.
****
हवामान विषयक अचूक पूर्वमाहितीमुळे
शेतीचे नियोजन सुलभ होणार असून हा प्रकल्प शेतकऱ्यांना समृध्दीकडे नेणारा असल्याचं
प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नागपूर जिल्ह्यातील डोंगरगाव
इथं ‘महावेध’ प्रकल्पांतर्गत पहिल्या स्वयंचलित
हवामान केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी
ते बोलत होते. राज्यातल्या सर्व दोन हजार ६५ महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्रं उभारण्यात येणार
असून येत्या
महिन्याभरात एक हजार केंद्रं तर जूनअखेर ही सर्व केंद्र सुरू होणार आहेत. या
हवामान केंद्रामुळे १४४ चौरस किलोमीटर परिसरातील हवामानाची अचूक नोंद दर दहा मिनिटांनी
उपलब्ध होणार आहे.
जलयुक्त शिवार योजनेच्या यशामुळे
राज्यात
यंदा २०लाख टन
तुरीचं उत्पादन झालं, गेल्या पंधरा
वर्षातील सर्वाधिक तूर खरेदी राज्य सरकारनं केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांची तूर खरेदी केली जाणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
कृषी क्षेत्रासंबंधी आवश्यक
त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देत, शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी राज्य सरकार
प्रयत्नशील असल्याचं राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वछता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे
पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात एका प्रसिद्धीपत्रकात त्यांनी
जालना जिल्ह्यातील विविध योजनांची माहिती दिली. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च तसंच पीक
कर्जापेक्षा अधिक उत्पन्न खात्रीशीरपणे मिळावं हा या वर्षीच्या नियोजनाचा मुख्य उद्देश
असल्याचं त्यांनी या पत्रकात नमूद केलं आहे. जालना जिल्ह्यात ९ हजार ६०२ शेतकऱ्यांना
शेततळे मंजूर करण्यात आले असून जालना इथं ५ कोटी ८२ लाख रुपये निधी मंजूरीसह रेशीम
संकलन केंद्रासही केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिल्याचं लोणीकर यांनी सांगितलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात चांदवड तसंच
मालेगांव परिसरात आज दुपारच्या सुमारास अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. जोरदार
पावसाच्या माऱ्यामुळे या भागातल्या कांदा तसंच द्रा़क्ष पिकांचे नुकसान झाल्याची भीती
वर्तवली जात आहे.
****
नांदेड जिल्ह्यात नायगाव शहरात
आज दुपारी कापसाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला अचानक आग लागली. ग्रामीण रुग्णालयासमोर
मुख्य रस्त्यावर ही घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 April 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० एप्रिल २०१७ दुपारी
१.००वा.
****
तरुणांनी
उन्हाळी सुटीत चाकोरीबाहेरच्या जीवनाचा अनुभव घ्यावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी केलं आहे. मन की बात या आकाशवाणीवरील कार्यक्रम श्रृंखलेच्या ३१ व्या भागात
ते आज बोलत होते. कौशल्य विकासाच्या युगात मानवी गुणांच्या विकासाकडे दुर्लक्ष करू
नये, असं सांगतानाच पंतप्रधानांनी, तरुणांना उन्हाळी शिबीरांमध्ये सहभागी व्हावं, सेवाभावी
संस्थांसोबत किमान १५ दिवस काम करावं, असं आवाहन केलं.
तरुणांनी
सुटीच्या काळात नवनवी कौशल्य आत्मसात करावीत, एखादी कला किंवा नवीन भाषा शिकावी, ज्या
बाबत कुतुहल वाटतं, अशा गोष्टी जाणून घ्याव्यात. पर्यटनस्थळांना भेटी देऊन तिथली छायाचित्रं
आपल्याला पाठवावीत, हॅश टॅग इनक्रेडिबल इंडियाचा वापर करून, आपले अनुभव सांगावेत, असंही
पंतप्रधान म्हणाले.
रोखरहित
व्यवहारांना चालना देण्यासाठी तरुणांनी अधिकाधिक नागरिकांना भीम ॲपची माहिती देऊन आर्थिक
व्यवहारांसाठी हे ॲप वापरण्यासाठी त्यांना प्रेरित करावं. १४ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या
या योजनेअंतर्गत एका व्यक्तीनं केलेल्या अशा तीन व्यवहारांसाठी तरुणांना प्रत्येकी
दहा रुपये मिळतील, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
सर्वांनी
उन्हापासून बचावाचे उपाय करावेत, आपल्या छतावर अंगणात पक्षांसाठी पाणी ठेवावं, त्यासोबत
अन्नाची नासाडी टाळण्याचं आवाहन करतानाच, पंतप्रधानांनी रोटी बँकेसारख्या उपक्रमांचं
कौतुक केलं.
उच्च
पदस्थ पदाधिकाऱ्यांनी लाल दिवा फक्त वाहनावरूनच नव्हे तर डोक्यातूनही काढून टाकावा,
असं सांगतानाच, आता प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले.
एक
मे हा दिवस कामगार दिन म्हणून पाळला जातो. कामगारांच्या कल्याणासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांचे योगदान अविस्मरणीय असल्याचं नमूद करत, पंतप्रधानांनी भगवान गौतम बुद्ध,
महात्मा बसवेश्वर, रामानुजाचार्य यांच्या कार्याचं स्मरण केलं.
उद्या
साजरा होत असलेल्या महाराष्ट्र दिनाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रवासियांना शुभेच्छा
दिल्या.
****
औरंगाबाद
इथं महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री
रामदास कदम यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता होणार आहे. मराठवाड्यात सर्व जिल्हा मुख्यालयांच्या
ठिकाणी संबंधित पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाणार आहे.
****
महिला
बचत गटांना शून्य टक्के दराने विनाअट कर्ज देण्याचा प्रस्ताव राज्यशासनाच्या विचाराधीन
असल्याचं, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या काल चंद्रपूर
जिल्ह्यात पोंभूर्णा इथं बोलत होत्या. महिला बचत गटांना वेगवेगळया योजनांमधून भरीव
पाठबळ दिले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
वित्त
मंत्री सुधीर मुनगंटीवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, महिला बचत गटांना कुक्कुटपालन,
दुग्धोत्पादन, आदी व्यवसायांसाठी आवश्यक तेवढी मदत केली जाईल, असं मुनगंटीवार म्हणाले.
****
आजपासून
नंदुरबार इथं सातपुडा महाआरोग्य शिबीराचं आयोजन करण्यात आलं असून राज्याचे वैद्यकीय
शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या शिबीराचं उद्घाटन झालं. या शिबीरात रुग्णांची
मोफत तपासणी, त्यांना औषधोपचार आणि आवश्यक शस्त्रक्रिया अशा आरोग्य सुविधा उपलब्ध करुन
दिल्या जाणार आहेत. आज सकाळी ११ वाजेपर्यंत या शिबीरात सुमारे दीड लाख रुग्णांनी नाव
नोंदणी केली असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यातलं अश्या प्रकारचं हे
विसावं महाआरोग्य तपासणी शिबीर आहे.
****
औरंगाबाद
इथं महापालिकेची सर्व रुग्णालयं-आरोग्य केंद्रं आज रविवारच्या दिवशीही सुरु असणार आहेत.
उद्या एक मे रोजी महाराष्ट्र दिनाची शासकीय सुटी असल्यानं रुग्णांच्या सोयीसाठी
हा बदल केला गेला आहे. दरम्यान, औरंगाबाद इथल्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - घाटी रुग्णालयाचा बाह्य रुग्ण विभाग उद्या बंद राहणार
आहे.
****
राज्य
कापूस उत्पादक पणन महासंघाचं परळी इथलं विभागीय कार्यालय
अन्यत्र स्थलांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून
कार्यरत असलेल्या या कार्यालयांतर्गत बीड, लातूर, उस्मानाबाद आणि अहमदनगर या चार जिल्ह्यातल्या
कापूस खरेदी केंद्राचं नियंत्रण केलं जातं.
****
वस्तु आणि सेवा कर जी एस टी अंतर्गत आपल्या व्यवसायाची नोंदणी
करायचा आजचा शेवटचा दिवस आहे. एस टी-३ या विवरणपत्राच्या माध्यमातून आयकर भरून व्यावसायिक
या सुविधांचा लाभ घेऊ शकतात. जी एस टी नोंदणी करण्यासाठी आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे
केंद्रसरकारनं ३१ मार्च ही नोंदणीची मुदत महिनाभरासाठी वाढवली होती. या कर प्रणालीच्या
नियमांनुसार www.aces.gov.in
या संकेतस्थळावरुन आपला कर व्यापाऱ्यांना ऑनलाईन भरता येणार
आहे. आपली अघोषित संपत्ती प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जाहीर करण्याची मुदत
ही आज संपत आहे.
//*******//
आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
३० एप्रिल २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं विद्युत देयकापोटी
जमा केलेली ३३ कोटी २२ लाख रुपयांची रक्कम महावितरणकडे भरणा न केल्यानं महावितरणने
बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे तसंच बँकेच्या दोन अधिकाऱ्यांविरुध्द फसवणूक आणि अपहाराचा
गुन्हा दाखल केला आहे. बँकेनं १ मार्च ते २४ एप्रिल २०१७ या कालावधीत नाशिक आणि मालेगाव
परिमंडळातल्या वीज ग्राहकांकडून ३३ कोटी २२ लाख रूपये जमा केले, मात्र ते महावितरणकडे
हस्तांतरित केले नाहीत.
****
अहमदनगर
जिल्ह्यातल्या निळवंडे धरणाच्या कालव्याचं बांधकाम करण्यासाठी शिर्डीचं साईबाबा संस्थान
विश्वस्त मंडळ, राज्य सरकारला ५०० कोटी रुपये कर्ज देणार आहे. विश्वस्त मंडळाच्या काल
झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं, मंडळाचे सदस्य सचिन तांबे यांनी पी.टी.आय.
या वृत्तसंस्थेला सांगितलं. राज्य सरकारनं ठराविक कालमर्यादेत ही रक्कम संस्थानला परत
करावी, असं संस्थानकडून सांगण्यात आलं आहे.
****
सेंद्रीय शेतीमाल उत्पादक-ग्राहक जागरुकता अभियानांतर्गत
औरंगाबाद शहरातल्या चेतन ट्रेड सेंटर इथं आज सकाळी ११ वाजता एका चर्चासत्राचं आयोजन
करण्यात आलं आहे. सेंद्रीय शेती करणारे शेतकरी आणि ग्राहक यांच्यासाठी हे आयोजन करण्यात
आलं असल्याचं भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेश चिटणीस पंजाबराव वडजे यांनी
सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता
आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम
आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रक्षेपित करण्यात येणार आहे. या कार्यक्रम
शृंखलेचा हा ३१ वा भाग आहे.
//******//
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date: 30 April 2017
Time: 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: 30؍اپریل 2017
وقت : صبح 8-40 سے 8-45
وَزیراعظم نریندرمودی نے مسلم معاشرے سے درخواست کی ہے کہ وہ طلاق ثلاثہ کوسیاسی رنگ نہ دیں۔انہوںنے کہاکہ اس سلسلے میںتبادلہ خیال جاری ہے۔وَزیراعظم نے امیدظاہرکی کہ مسلم فرقہ خوداس مسئلے کوحل کرلے گا۔کل نئی دلّی میںایک تقریب میںاظہارخیال کرتے ہوئے اُنہوں نے کہاکہ اگرلوگ مسئلے کوحل کرنے کے لئے خوداپنے طورپرآگے آتے ہیں تویہ ایک اچھی بات ہوگی۔وَزیراعظم نے کہا کہ اُن کی حکومت کامقصد سب کا ساتھ سب کاوکاس ہے اورسرکارنے عوام کے ساتھ جووعدے کئے ہیںوہ کسی بھیدبھائوکے بغیرپورے کئے جائیںگے۔نریندرمودی بسویشورجینتی کے موقع پر23؍ہندوستانی زبانوں میںوَچناوَچن کے ترجمے کوجاری کرنے کے بعداظہارِ خیال کررہے تھے۔اُنہوںنے بسویشورجینتی کی پہلی تقریب میں کتاب کی ڈیجیٹل شکل بھی جاری کرنے کی رَسم انجام دی۔
***************************
کِسانوں پرپیداوارٹیکس عائدکرنے کے سلسلے میںدیاگیابیان یعنی کِسانوں کوختم کرنے کاکام ہے۔ایسی تنقیدقانون سازاسمبلی میںحزبِ مخالف پارٹی رہنمارادھاکرشن ویکھے پاٹل نے کی ہے۔نیتی آیوگ کی میٹنگ میںیہ تجویزپیش کی گئی تھی۔اس ضِمن میںوِیکھے پاٹل نے ایک مکتوب جاری کرتے ہوئے سخت تنقیدکی۔
اسی بیچ زرعی پیداوارپرکسی قسم کاٹیکس عائدکرنے کی تجویزنہیںہے۔ یہ بات محصول وَزیرچندرکانت پاٹل نے کل کولہاپورمیںکہی۔اُنہوںنے کہا کہ نیتی آیوگ کی میٹنگ میںپیش کی گئی اس تجویزکومستردکردیاگیا۔
***************************
سرکاری اِسکولوں کوبہتربنانے کے لئے مرکزی حکومت کوشاں ہیں۔یہ بات مرکزی فروغ ِ انسانی ترقیاتی وَزیرپرکاش جائوڑیکرنے کہی۔ تعلیمی شعبے میںنئی اسکیموں اورتجربات کے ذریعے س معیاربلندکرنے کے سلسلے میںفروغِ انسانی ترقیاتی وِزارت اورتعلیمی اتھاریٹی کی جانب سے کل پونامیں منعقد مغربی ڈیویژنل ورکشاپ کاافتتاح کرنے کے بعدوہ مخاطب تھے۔
***************************
آشرم اسکولوں میںطلباء کوروزمّرہ کے اخراجات کے لئے درکاررقم اُن کے کھاتوں میںراست جمع کرنے کافیصلہ رِیاستی حکومت نے لیاہے۔ اسکولی اشیاء کی خریدی میںہونے والی بدعنوانیوں پرقابوپانے کے لئے یہ فیصلہ کیاگیا۔اس اسکیم کے تحت جماعت اوّل سے چہارم کے طلباء کوسالانہ ساڑھے سات ہزارروپئے ،پنجم سے نہم تک کے طلباء کے لئے سالانہ ساڑھے آٹھ ہزارروپئے اوردہم سے بارہویں تک کے طلباء کے لئے سالانہ ساڑھے نوہزارروپئے حاصل ہوںگے۔آئندہ تعلیمی سال سے ریاستی حکومت کی جانب سے چلائے جانے والے 133؍آشرم اسکولوں میں اس اسکیم پر عمل درآمدکیاجائے گا۔
***************************
وَزیراعظم نریندرمودی آج صبح گیارہ بجے آکاشوانی سے نشر ہونے والے ’’مَن کی بات‘‘ پروگرام کے تحت عوام سے خطاب کریںگے۔یہ پروگرام آکاشوانی اوردُوردرشن کے تمام چینلس سے نشرکیاجائے گا۔اس پروگرام کی سیریزکایہ 31؍واں حصّہ ہے۔
***************************
رِیاست کے چندمقامات پرکل غیرموسمی بارش ہوئی۔مراٹھواڑہ میںلاتور،عثمان آباداوربیڑاضلاع میںکل کئی مقامات پرژالہ باری کے ساتھ غیر موسمی بارش ہونے کی اطلاع ہمارے نمائندے نے دی۔لاتورضلع کے لاتور،اوسا، ریناپور،چاکور،جڑکوٹ علاقے میںغیرموسمی بارش ہوئی۔اسی طرح عثمان آبادضلع میںکل غیرموسمی بارش ہوئی۔عثمان آباداورکلم تعلقوں میں اسی طرح بیڑضلع کے چندمقامات پربارش ہوئی۔رِیاست میںسانگلی، ستارہ اور واشم میںکئی دیہاتوں میںژالہ باری کے ساتھ غیرموسمی بارش ہوئی۔
***************************
ممبئی۔لاتورایکسپریس ریلوے گاڑی کوبیدرتک لے جانے کے ریلوے بورڈکے فیصلے کے خلاف لاتورمیںکل ریلوے بچائو کمیٹی کی جانب سے گاندھی چوک میں احتجاجی دھرنے دئیے گئے۔اس موقع پرورکرس نے لاتورکے رُکنِ پارلیمنٹ ڈاکٹرسنیل گائیکواڑکے علامتی مجسمّہ کونذرِ آتش کیا۔ پولس نے اس سلسلے میںپانچ ورکرس کوحراست میںلے لیا۔لاتورممبئی ایکسپریس ۔لاتورریلوے اسٹیشن پربارہ گھنٹے قیام کرتی ہے۔اس وقت میںیہ گاڑی اودگیراسی طرح بیدرتک لے جانے کافیصلہ ریلوے انتظامیہ نے لیاہے۔اس فیصلے کے خلاف ممبئی ہائی کورٹ کی اورنگ آبادبینچ میں عرضداشت داخل کی گئی ہے۔
***************************
ناندیڑشہرمیں آلودگی پرقابو پانے کے لئے اس کے بعدہرمہینے کے پہلے جمعرات کوــ’’بغیرگاڑی کادن‘‘ "No Vhicle Day" کے طورپر منانے کی اپیل ناندیڑواگھالہ شہر میونسپل کارپوریشن نے کی ہے۔ اس دن نجی گاڑیوں کااستعمال نہ کرتے ہوئے عوامی گاڑیوں کایاسائیکل کااستعمال کریں۔ یہ بات میونسپل کارپوریشن نے کہی۔ اس کی وجہہ سے شہرکاٹریفک جام کم ہوگا۔اورایندھن کی بچت ہوگی۔ جاری کردی اپیل میں یہ بات کہی گئی۔
***************************
Date: 30 April 2017
Time: 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: 30؍اپریل 2017
وقت : صبح 8-40 سے 8-45
وَزیراعظم نریندرمودی نے مسلم معاشرے سے درخواست کی ہے کہ وہ طلاق ثلاثہ کوسیاسی رنگ نہ دیں۔انہوںنے کہاکہ اس سلسلے میںتبادلہ خیال جاری ہے۔وَزیراعظم نے امیدظاہرکی کہ مسلم فرقہ خوداس مسئلے کوحل کرلے گا۔کل نئی دلّی میںایک تقریب میںاظہارخیال کرتے ہوئے اُنہوں نے کہاکہ اگرلوگ مسئلے کوحل کرنے کے لئے خوداپنے طورپرآگے آتے ہیں تویہ ایک اچھی بات ہوگی۔وَزیراعظم نے کہا کہ اُن کی حکومت کامقصد سب کا ساتھ سب کاوکاس ہے اورسرکارنے عوام کے ساتھ جووعدے کئے ہیںوہ کسی بھیدبھائوکے بغیرپورے کئے جائیںگے۔نریندرمودی بسویشورجینتی کے موقع پر23؍ہندوستانی زبانوں میںوَچناوَچن کے ترجمے کوجاری کرنے کے بعداظہارِ خیال کررہے تھے۔اُنہوںنے بسویشورجینتی کی پہلی تقریب میں کتاب کی ڈیجیٹل شکل بھی جاری کرنے کی رَسم انجام دی۔
***************************
کِسانوں پرپیداوارٹیکس عائدکرنے کے سلسلے میںدیاگیابیان یعنی کِسانوں کوختم کرنے کاکام ہے۔ایسی تنقیدقانون سازاسمبلی میںحزبِ مخالف پارٹی رہنمارادھاکرشن ویکھے پاٹل نے کی ہے۔نیتی آیوگ کی میٹنگ میںیہ تجویزپیش کی گئی تھی۔اس ضِمن میںوِیکھے پاٹل نے ایک مکتوب جاری کرتے ہوئے سخت تنقیدکی۔
اسی بیچ زرعی پیداوارپرکسی قسم کاٹیکس عائدکرنے کی تجویزنہیںہے۔ یہ بات محصول وَزیرچندرکانت پاٹل نے کل کولہاپورمیںکہی۔اُنہوںنے کہا کہ نیتی آیوگ کی میٹنگ میںپیش کی گئی اس تجویزکومستردکردیاگیا۔
***************************
سرکاری اِسکولوں کوبہتربنانے کے لئے مرکزی حکومت کوشاں ہیں۔یہ بات مرکزی فروغ ِ انسانی ترقیاتی وَزیرپرکاش جائوڑیکرنے کہی۔ تعلیمی شعبے میںنئی اسکیموں اورتجربات کے ذریعے س معیاربلندکرنے کے سلسلے میںفروغِ انسانی ترقیاتی وِزارت اورتعلیمی اتھاریٹی کی جانب سے کل پونامیں منعقد مغربی ڈیویژنل ورکشاپ کاافتتاح کرنے کے بعدوہ مخاطب تھے۔
***************************
آشرم اسکولوں میںطلباء کوروزمّرہ کے اخراجات کے لئے درکاررقم اُن کے کھاتوں میںراست جمع کرنے کافیصلہ رِیاستی حکومت نے لیاہے۔ اسکولی اشیاء کی خریدی میںہونے والی بدعنوانیوں پرقابوپانے کے لئے یہ فیصلہ کیاگیا۔اس اسکیم کے تحت جماعت اوّل سے چہارم کے طلباء کوسالانہ ساڑھے سات ہزارروپئے ،پنجم سے نہم تک کے طلباء کے لئے سالانہ ساڑھے آٹھ ہزارروپئے اوردہم سے بارہویں تک کے طلباء کے لئے سالانہ ساڑھے نوہزارروپئے حاصل ہوںگے۔آئندہ تعلیمی سال سے ریاستی حکومت کی جانب سے چلائے جانے والے 133؍آشرم اسکولوں میں اس اسکیم پر عمل درآمدکیاجائے گا۔
***************************
وَزیراعظم نریندرمودی آج صبح گیارہ بجے آکاشوانی سے نشر ہونے والے ’’مَن کی بات‘‘ پروگرام کے تحت عوام سے خطاب کریںگے۔یہ پروگرام آکاشوانی اوردُوردرشن کے تمام چینلس سے نشرکیاجائے گا۔اس پروگرام کی سیریزکایہ 31؍واں حصّہ ہے۔
***************************
رِیاست کے چندمقامات پرکل غیرموسمی بارش ہوئی۔مراٹھواڑہ میںلاتور،عثمان آباداوربیڑاضلاع میںکل کئی مقامات پرژالہ باری کے ساتھ غیر موسمی بارش ہونے کی اطلاع ہمارے نمائندے نے دی۔لاتورضلع کے لاتور،اوسا، ریناپور،چاکور،جڑکوٹ علاقے میںغیرموسمی بارش ہوئی۔اسی طرح عثمان آبادضلع میںکل غیرموسمی بارش ہوئی۔عثمان آباداورکلم تعلقوں میں اسی طرح بیڑضلع کے چندمقامات پربارش ہوئی۔رِیاست میںسانگلی، ستارہ اور واشم میںکئی دیہاتوں میںژالہ باری کے ساتھ غیرموسمی بارش ہوئی۔
***************************
ممبئی۔لاتورایکسپریس ریلوے گاڑی کوبیدرتک لے جانے کے ریلوے بورڈکے فیصلے کے خلاف لاتورمیںکل ریلوے بچائو کمیٹی کی جانب سے گاندھی چوک میں احتجاجی دھرنے دئیے گئے۔اس موقع پرورکرس نے لاتورکے رُکنِ پارلیمنٹ ڈاکٹرسنیل گائیکواڑکے علامتی مجسمّہ کونذرِ آتش کیا۔ پولس نے اس سلسلے میںپانچ ورکرس کوحراست میںلے لیا۔لاتورممبئی ایکسپریس ۔لاتورریلوے اسٹیشن پربارہ گھنٹے قیام کرتی ہے۔اس وقت میںیہ گاڑی اودگیراسی طرح بیدرتک لے جانے کافیصلہ ریلوے انتظامیہ نے لیاہے۔اس فیصلے کے خلاف ممبئی ہائی کورٹ کی اورنگ آبادبینچ میں عرضداشت داخل کی گئی ہے۔
***************************
ناندیڑشہرمیں آلودگی پرقابو پانے کے لئے اس کے بعدہرمہینے کے پہلے جمعرات کوــ’’بغیرگاڑی کادن‘‘ "No Vhicle Day" کے طورپر منانے کی اپیل ناندیڑواگھالہ شہر میونسپل کارپوریشن نے کی ہے۔ اس دن نجی گاڑیوں کااستعمال نہ کرتے ہوئے عوامی گاڑیوں کایاسائیکل کااستعمال کریں۔ یہ بات میونسپل کارپوریشن نے کہی۔ اس کی وجہہ سے شہرکاٹریفک جام کم ہوگا۔اورایندھن کی بچت ہوگی۔ جاری کردی اپیل میں یہ بات کہی گئی۔
***************************
Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 30 April 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० एप्रिल २०१७ सकाळी
६.५० मि.
****
·
तिहेरी - तलाकच्या मुद्यावरून राजकारण न करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन
· सरकारी शाळांची परिस्थिती सुधारण्यावर केंद्र सरकारचा
भर -केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर
· मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद
आणि बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारांसह पाऊस
आणि
·
मुंबई-लातूर एक्सप्रेस
रेल्वे बीदर पर्यंत वाढवण्याच्या निर्णया विरोधात लातूर इथं धरणं आंदोलन
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम
समुदायाला तिहेरी - तलाकच्या मुद्यावरून राजकारण न करण्याचं आवाहन केलं आहे. ते काल
नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. मुस्लिम समाजात महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात
समाजातल्या जाणकारांनी पुढाकार घेऊन तोडगा काढावा, असं ते म्हणाले. मुस्लिम समाज
हा विषय चर्चेद्वारे सोडवेल, याबाबत आशावादी असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
दरम्यान, १२ व्या शतकातले समाज सुधारक महात्मा बसवेश्वर आणि २३ भाषांमधल्या इतर संतांच्या अनुवादित केलेल्या ‘वचन’ या ग्रंथाचं प्रकाशन काल पंतप्रधानांच्या
हस्ते करण्यात आलं. सुमारे दोनशे भाषातज्ज्ञांनी
अनुवादित केलेल्या या ग्रंथाचं संपादन दिवंगत विचारवंत डॉक्टर एम. एम. कलबुर्गी यांनी
केलं आहे.
****
शेतकऱ्यांवर प्राप्तीकर लावण्यासंदर्भात केलेली सूचना म्हणजेच शेतकरी संपवण्याचं
कारस्थान आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण
विखे पाटील यांनी केली आहे. निती आयोगाच्या बैठकीत
हा प्रस्ताव आला होता, यासंदर्भात विखे पाटील यांनी काल पत्रक काढून टीका केली.
दरम्यान, कृषी उत्पन्नावर कोणताही कर लावण्याचा प्रस्ताव
नाही, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल कोल्हापूर इथं बोलतांना स्पष्ट केलं.
नीति आयोगाच्या बैठकीत आलेला हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचं, पाटील यांनी सांगितलं.
****
सरकारी शाळांची परिस्थिती सुधारण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ
विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. शिक्षण क्षेत्रातले
नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रयोगशील गुणवत्ता वाढीसंदर्भात, मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विद्या प्राधिकरणाच्या वतीनं काल पुण्यात आयोजित, पश्चिम विभागीय
कार्यशाळेचं उद्घाटन केल्यानंतर जावडेकर बोलत होते. इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचं
पुनर्मूल्यांकन करण्याचा अधिकार मिळावा यासाठीचं विधेयक लवकरच संसदेत मांडणार
असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
आश्रमशाळांतल्या विद्यार्थ्यांना
दैनंदिन गरजांसाठी लागणारी रक्कम त्यांच्या खात्यात परस्पर जमा करण्याचा निर्णय राज्य
सरकारनं घेतला आहे. शालेय साहित्य
खरेदीत होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालणं हा या मागचा मुख्य उद्देश आहे. या योजनेनुसार
पहिली ते चौथी पर्यंतचे विद्यार्थी वार्षिक साडेसात हजार रूपये, पाचवी ते नववीपर्यंतचे विद्यार्थी वार्षिक साडे आठ हजार रूपये तर, दहावी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी वार्षिक साडेनऊ हजार रूपये मिळण्यास पात्र असतील. येत्या शैक्षणिक वर्षापासून,
राज्य सरकार द्वारे संचालित १३३ आश्रम शाळांतून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
****
राज्यातील रिक्षा-टॅक्सींचे प्रवास भाडे तसंच प्रवास भाड्याचे
टप्पे ठरवण्यासंदर्भात ऑनलाईन सर्वेक्षण घेण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांसह टॅक्सी
तसंच रिक्षाचालक आणि रिक्षा-टॅक्सी संघटनांनी येत्या १५ मेपर्यंत आपली मतं नोंदवावीत,
असं आवाहन यासंदर्भात शासनानं नेमलेल्या समितीचे अध्यक्ष, बी. सी. खटुआ यांनी केलं
आहे. काल मुंबईत ते वार्ताहरांशी बोलत होते.
****
बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्यासाठी,
उद्या पासून महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण –म हा रे रा ची स्थापना करण्यात
येणार आहे. महारेरा हे महाराष्ट्रातल्या बांधकाम क्षेत्राचं नियमन करणार असून, सदनिका
विक्रीपूर्वी प्रत्येक विकासकाला त्याचे प्रस्तावित आणि चालू असलेले दोन्ही प्रकल्प
महारेरा मध्ये नोंदणीकृत करणं आवश्यक आहे. या प्रकल्पांचे सर्व तपशील महारेराच्या संकेतस्थळावर
उपलब्ध असणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११
वाजता आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून श्रोत्यांशी संवाद साधणार आहे. हा
कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रक्षेपित करण्यात येणार
आहे. या कार्यक्रम शृंखलेचा हा ३१ वा भाग आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित
केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज
ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्याच्या काही भागात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली.
मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी गारांसह पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या लातूर, औसा, रेणापूर, चाकूर, आणि जळकोट परीसरात, उस्मानाबाद
जिल्ह्यालाही काल अवकाळी पावसाचा फटका बसला. उस्मानाबाद आणि कळंब तालुक्यात तसंच बीड
जिल्ह्याच्या काही भागात हा पाऊस पडला. राज्यात सांगली, सातारा आणि वाशिम परिसरातल्या अनेक गावांत गारांसह पाऊस झाल्याचं वृत्त आहे.
****
मुंबई-लातूर एक्सप्रेस रेल्वे बिदर
पर्यंत वाढवण्याच्या रेल्वे मंडळाच्या निर्णया विरोधात लातूर इथं काल रेल्वे बचाव समितीच्या
वतीनं गांधी चौकात धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी संतप्त कार्यकर्त्यानी लातूरचे
खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. पोलिसांनी याप्रकरणी
पाच कार्यकर्त्यांना अटक केली. लातूर-मुंबई एक्सप्रेस लातूर स्थानकावर १२ तास थांबून
असते, त्या वेळेत ही गाडी उदगीर तसंच बीदर पर्यंतच्या प्रवाशांसाठी बीदरपर्यंत वाढवण्याचा
निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद
खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, या रेल्वेचा बीदरपर्यंत विस्तार
करण्याबाबत आपण कोणतंही पत्र दिलेलं नाही, असं खासदार गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
यासंदर्भात काहीजण अपप्रचार करत असून, त्यावर विश्वास ठेवू नये, असं आवाहन करत, गायकवाड
यांनी लातूरची रेल्वे ही लातूर इथूनच मुंबईला जावी, यासाठी प्रयत्न करत असल्याचं काल
जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
जनसामान्यांच्या भाषेमुळे शेक्सपिअर आजही जिवंत असल्याचं
मत प्राध्यापक मुस्तजीब खान यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं आयोजित शेक्सपिअर
महोत्सवात ‘शेक्सपिअरची नाटकं’ या विषयावर ते काल बोलत होते. अंबाजोगाई इथले डॉ केशव
देशपांडे यांचं यावेळी ‘राम गणेश गडकरींवर शेक्सपिअरचा प्रभाव’ या विषयावर व्याख्यान
झालं. गोविंदभाई श्रॉफ सभागृहात आयोजित या महोत्सवात ‘ओळखलंत का मला’ ही एकांकिका काल
सादर झाली. आज सायंकाळी ‘कसाब आणि मी’ हे नाटकाच्या सादरीकरणानं महोत्सवाचा समारोप
होणार आहे.
****
नांदेड शहरात प्रदुषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी यापुढे दर महिन्याचा पहिला
गुरुवार हा "वाहन विरहीत दिन - नो व्हेईकल डे" म्हणून पाळण्याचं आवाहन
नांदेड-वाघाळा शहर महापालिकेनं केलं आहे. या दिवशी खासगी वाहन न वापरता सार्वजनिक
वाहन किंवा सायकलचा वापर करावा, असं महापालिकेनं म्हटलं आहे. या संकल्पामुळे शहरातली वाहतूक कोंडी कमी होऊन, इंधन बचतीला चालना मिळेल असं महापालिकेतर्फे जारी
पत्रकात म्हटलं आहे.
****
बीड नगरपरिषदेच्या ७५ सफाई कामगारांनी गेल्या दोन महिन्यांपासून
पगार न मिळाल्यानं आंदोलन सुरू केलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना लेखी आश्वासन देवूनही पगार
न मिळाल्यानं या कामगारांनी हे आंदोलन सुरू केलं आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिकेत स्थायी समिती सदस्यांची काल निवड
करण्यात आली, यामध्ये शिवसेनेचे ऋषिकेश खैरे, सिद्धांत शिरसाट, राजू वैद्य, स्वाती
नागरे, रूपचंद वाघमारे, शहर विकास आघाडीचे गजानन बारवाल, भारतीय जनता पक्षाच्या राखी देसरडा, एमआयएम पक्षाचे नसीर सलीम, सय्यद मतीन यांची
निवड करण्यात आली.
****
भारतीय तंत्रशिक्षण परिषद -ए आ य सी टी ई नं औरंगाबाद शहरातल्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय-
जेएनईसीची मान्यता कायम ठेवली असल्याचं प्रभारी प्राचार्य डॉक्टर एच.बी.शिंदे यांनी
काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या
वेतन प्रकरणी निकाल देतांना समोपचारानं तोडगा काढण्यास सांगितलं होतं. त्यानुसार शिक्षक
आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याचं कबूल केल्यानंतर
एआयसीटीईने मान्यता पूर्ववत केली आहे.
//********//
Saturday, 29 April 2017
Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.04.2017 - 05.25pm
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 29 April 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ एप्रिल २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लीम समुदायाला तीन-तलाक वरून राजकारण न करण्याची
विनंती केली आहे. याबाबत चर्चा सुरू असून हा विषय मुस्लीम समुदायामध्येच चर्चेद्वारे
सोडवण्याबाबत आशावादी असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. लोक स्वत:हून प्रश्न सोडवण्यास
तयार असल्यास उत्तम आहे, असंही ते म्हणाले. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत
होते. ‘सर्वांची साथ, सर्वांचा विकास’ हे सरकारचे घोषवाक्य असून सरकार कोणताही भेदभाव
करणार नसल्याचं ते म्हणाले.
****
२०२२ पर्यंत देशामध्ये प्रत्येकाला घर देण्याचे सरकारचे ध्येय असल्याचं प्रतिपादन
केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीमध्ये
पत्रकारांशी बोलत होते. कामगार मंत्रालयाने आणि गृहनिर्माण मंत्रालयानं सहकार्याने
नवी विमा योजना आणली असल्याचं ते म्हणाले. या योजनेअंतर्गत कमीत कमी दहा लोक असल्यास
ते सहकार संस्था स्थापन करू शकतात. अशी संस्था प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दोन
लाख वीस हजार मिळण्यास पात्र असल्याचं दत्तात्रय म्हणाले.
****
आठ ते नऊ लाख नोंदणीकृत कंपन्या कंपनी व्यवहार मंत्रालयाला आयकर विवरण सादर करत
नसल्याचं महसूल सचिव हसमुख अधिया यांनी म्हटलं आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून पैशाचे
गैरव्यवहार होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याबाबत कारवाई करण्यासाठी एक चमूची स्थापना
करण्यात आली असून पंतप्रधान कार्यालय गेल्या पंधरा दिवसांपासून या कंपन्यांवर लक्ष
ठेऊन असल्याचं ते म्हणाले.
****
मतदारांनी केलेल्या मतदानाची खात्री होण्यासाठी सप्टेबर २०१८ पर्यंत निवडणूक आयोग
१५ लाख व्हीव्हीपॅट या यंत्रांची खरेदी करणार असल्याचं, मुख्य निवडणूक आयुक्त नसीम
झैदी यांनी म्हटलं आहे. ते चंदीगडमध्ये एका परिसंवादामध्ये बोलत होते. आपण केलेल्या
मतदानाची १०० टक्के मतदारांना खात्री मिळणारा भारत हा जगातील एकमेव देश असेल, असंही
झैदी यावेळी म्हणाले.
****
न्यायालयीन कामकाजाशी संबंधित कर्मचाऱ्यांनी
रोजच्या कामात तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्यावा असं आवाहन कायदा मंत्री रविशंकर प्रसाद
यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संमेलनात ते आज बोलत होते.
तंत्रज्ञानाच्या वापरामुळं त्वरीत न्यायदानास मदत होईल आणि खटल्यांचा निकाल वेळेत लागू
शकेल असं प्रसाद यावेळी म्हणाले.
****
जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे सर्वाधिक पसंतीचे राज्य असून देशात झालेल्या
गुंतवणुकीपैकी अर्धी गुंतवणूक राज्यात झाली असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी काल अलिबाग इथं केलं. रसायनी पाताळगंगा इथं जपानच्या कोकुयो आणि भारताच्या
कॅम्लीन कंपनीच्या संयुक्तरित्या केलेल्या नव्या उत्पादन केंद्राचं उद्घाटन त्यांच्या
हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. ‘मेक इन
महाराष्ट्र’, ‘इज ऑफ डुईंग बिजनेस’ यामुळे राज्यात गुंतवणूक करण्यास अधिक गुंतवणूकदार उत्सुक
आहेत. देशात तसंच राज्यात येणाऱ्या नव्या प्रकल्पांमुळे स्थानिक रोजगार उपलब्ध होत
असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले.
****
‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याकरता १ मे च्या ग्रामसभेत
योजनेच्या शासन निर्णयाचं प्रकट वाचन करण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा
मुंडे यांनी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचांना पाठवलं आहे. राज्यातील मुलींचा
जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन देवून
खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी माझी कन्या भाग्यश्री ही योजना
राज्यात राबवण्यात येत आहे.
****
दृष्टीबाधितांच्या पहिल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन औरंगाबाद इथल्या
एम.जी.एम. क्रीडा संकुलात करण्यात आलं आहे. खासदार चंद्रकांत खैरे, म्हाडाचे मुख्य
कार्यकारी संचालक डॉक्टर अनिल रामोड यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचं उद्धाटन झालं. राज्यातल्या पाच विभागातले संघ या
स्पर्धेत सहभागी झाले आहेत. एक मे रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना होणार असून यावेळी बक्षीस वितरण करण्यात
येणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ११ वाजता होणाऱ्या आकाशवाणीवरील ’मन की बात’ या कार्यक्रमामध्ये
श्रोत्यांशी संवाद साधणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर
प्रक्षेपित करण्यात येणार आहे. हा या शृंखलेचा ३१ वा भाग आहे.
****
मुंबई-लातूर एक्सप्रेस बिदर पर्यंत वाढवण्याच्या रेल्वे बोर्डाच्या निर्णया विरोधात
लातूर इथं आज रेल्वे बचाव समितीच्या वतीनं गांधी चौकात धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी
संतप्त कार्यकर्त्यानी लातूरचे खासदार डॉ. सुनिल गायकवाड यांच्या पुतळ्याचं दहन केलं.
पोलिसांनी याप्रकरणी पाच कार्यकर्त्यांना अटक केली आहे. लातूर-मुंबई एक्सप्रेस लातूर
स्थानकावर १२ तास थांबुन असते, त्या वेळेमध्ये बिदर, उदगीरच्या प्रवाशांसाठी ही रेल्वे
बिदरपर्यंत वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे.
****
बीड नगरपरिषदेच्या ७५ सफाई कामगारांनी गेल्या दोन
महिन्यांपासून पगार न मिळाल्यानं आंदोलन सुरू केलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना लेखी आश्वासन
देवूनही पगार न मिळाल्यानं या कामगारांनी हे आंदोलन केलं आहे.
****
text - AIR News Bulletin, Aurangabad 29.04.2017....01.00
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 April 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ एप्रिल २०१७ दुपारी १.००वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२व्या शतकातील
समाज सुधारक बसवेश्वर आणि २३ भाषांमधील इतर संतांच्या भाषांतरीत केलेल्या ’वचन’ या
ग्रंथाचं प्रकाशन आज नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं. महात्मा बसवेश्वर यांच्या सुवर्ण
जयंती समारोहाच्या उद्घाटनप्रसंगी हे प्रकाशन करण्यात आलं. यावेळी बोलतांना पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी भगवान बसवेश्वर यांनी लोकशाही व्यवस्था विकसित केली असून, महिला
सक्षमीकरणासाठी त्यांनी महान कार्य केले असल्याचं ते म्हणाले. मुस्लीम समाजातील महिला
तीन तलाक पद्धत बंद करण्याचं आवाहन करत असून, त्याबाबत राजकारण करण्यात येऊ नये, असंही
ते यावेळी म्हणाले. राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या पहिल्या समारोहामध्ये महात्मा बसवेश्वर
यांच्या कार्याचे डिजिटल स्वरुपात देखील यावेळी प्रकाशन करण्यात आले.
****
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सुकमामध्ये सैन्यावर
झालेल्या नक्षली हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली.
नक्षली हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती पंतप्रधान मोदी यांना देण्यात
आली. सिंह यांनी यावेळी जम्मू काश्मीरमध्ये विकासकामासाठी देण्यात आलेल्या ८० हजार
कोटी रुपयांच्या पॅकेजबाबतही माहिती दिली. या पॅकेजअंतर्गत जम्मू काश्मीर सरकारला आतापर्यंत
१९ हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत.
****
भारतीय
तंत्रज्ञान संस्था अर्थात आय आय टी शिक्षण संस्थांमधून होणाऱ्या आत्महत्या हा चिंतेचा
विषय असून, या संस्थांच्या आवारात वैद्यकीय कल्याण केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात
आल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल मुंबईत सांगितलं.
त्याचप्रमाणे नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्यासाठी
अभिमुखता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येईल, असंही जावडेकर पुढे म्हणाले. या संस्थेतील
मुलींची संख्या वाढवून २० टक्क्यांवर नेण्याच्या दृष्टीनं संस्थेत काही अतिरिक्त जागा
वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं जावडेकर यांनी सांगितलं.
****
एचआयव्ही
एड्स बाधीत रूग्णांच्या चिकित्सा आणि उपचारासाठी एका नवीन सुधारित धोरणाची सुरूवात
काल केंद्रीय स्वास्थ्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते करण्यात आली. यामुळे एचआयव्ही
बाधीत रूग्णांना अँटी रेट्रोवायरल- ए आर टी उपचार मोफत दिला जाईल असं सांगून या केंद्र
पुरस्कृत योजनेचा फायदा या रूग्णांना होईल असं ते म्हणाले. यावेळी एचआयव्ही बाधीतांसाठी
काम करणाऱ्या आणि जनजागृती करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात
आलं.
****
टपाल विभाग आणि भारत संचार निगम लिमिटेड - बी एस एन
एल ने एक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून, या अंतर्गत ग्रामीण भागातील टपाल
कार्यालयात ब्रॉडबँड सेवा पुरवण्यात येणार आहे. याअंतर्गत देशातल्या ग्रामीण भागामध्ये
सुमारे एक लाख ५५ हजार टपाल कार्यालयं ब्रॉडबँड
सेवेनं जोडण्यात येणार आहे. याबाबत बोलतांना दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांनी पहिल्या
फेरीमध्ये एक लाख ग्रामपंचायत कार्यालयांना ब्रॉडबँड सेवेची जोडणी लवकरच पूर्ण होणं
अपेक्षित असल्याचं सांगितलं.
****
बँका
खराब झालेल्या किंवा लिहिलेल्या नोटा स्विकारण्यास नकार देऊ शकत नाही असं रिझर्व्ह
बँक ऑफ इंडियानं स्पष्ट केलं आहे. अशा नोटांना बाद झालेल्या नोटा ग्राह्य न धरता यावर
तोडगा काढावा असंही आरबीआयनं सांगितलं आहे. रिझर्व्ह बँकेकडं गेल्या काही दिवसांत बँका
रंग उडालेल्या तसंच ज्यांच्यावर काही लिहिलं आहे, अशा नोटा स्वीकारत नसल्याच्या तक्रारी
येत होत्या. यामध्ये खासकरुन ५०० आणि २००० च्या नोटांचा समावेश होता. यानंतर आरबीआयनं
परिपत्रक काढत बँकांना या नोटा स्विकारण्याचा आदेश दिला आहे.
****
भाजप अध्यक्ष अमित शाह हे ९५ दिवसांच्या देशव्यापी
दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी ते २०१९ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका जिंकण्यासाठी
तसंच २०१४ मध्ये ज्या १२० जागांवर भाजपचा पराभव झाला त्या जिंकण्यासाठीची रणनीती तयार
करण्यात येणार आहे. या दौऱ्याचा भाग म्हणून ते आज जम्मू काश्मीरमध्ये पोहचणार आहेत.
शाह हे प्रत्येक राज्यामध्ये एक ते तीन दिवस थांबणार असून पक्षाची संघटनात्मक बलस्थानं
आणि दुव्यांचा आढावा यावेळी ते घेणार आहेत.
****
आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना दैनंदिन गरजांसाठी
लागणारी रक्कम त्यांच्या खात्यात परस्पर जमा करण्याचा निर्णय काल राज्य सरकारतर्फे
घेण्यात आला. शालेय साहित्य खरेदीत होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालणं हा या मागचा मुख्य
उद्देश आहे. या योजनेनुसार पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वार्षिक साडेसात
हजार रूपये, पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना साडे आठ हजार रूपये तर, दहावी ते बारावीतील
विद्यार्थी वार्षिक साडेनऊ हजार रूपये मिळण्यास पात्र असतील. येत्या शैक्षणिक वर्षापासून,
राज्य सरकार द्वारे संचालित १३३ आश्रम शाळांतून प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबवण्यात
येणार आहे.
//*****//
text - AIR News Bulletin, Aurangabad 29.04.2017....10.00
आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२९ एप्रिल २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
नांदेड शहरातल्या प्रदुषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी यापुढे दर
महिन्याचा पहिला गुरुवार हा "वाहन विरहीत दिन-नो व्हेईकल डे" म्हणून पाळण्याचं
आवाहन नांदेड-वाघाळा शहर महापालिकेनं केलं आहे. या दिवशी खासगी वाहन न वापरता सार्वजनिक
वाहन किंवा सायकलचा वापर करावा, असं महापालिकेनं म्हटलं आहे. या संकल्पामुळे शहरातली वाहतूक
कोंडी कमी होऊन, इंधन बचतीला चालना मिळेल असं महापालिकेतर्फे जारी पत्रकात म्हटलं आहे.
****
देशातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संघटनेनं देशाची सुरक्षा करत असताना शहिद झालेल्या
संरक्षण, केंद्रीय सशस्त्र पोलिस आणि राज्य पोलीस दलातील शहिद जवानांच्या कुटुंबांना
दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक अधिकारी एका कुटुंबाला पाच ते दहा वर्षांसाठी
दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करेल. ज्या कुटुंबाला दत्तक घेण्यात येईल ती शक्यतो आयएएस
अधिकाऱ्यांची नियुक्ती असणाऱ्या राज्यातील असेल, अशी माहिती इंडियन सिव्हिल अॅण्ड अॅडमिनिस्ट्रेटिव्ह
सर्व्हिस असोसिएशनचे सचिव संजय भुसरेड्डी यांनी दिली.
****
मलेशियात सुलतान अझलनशहा चषक हॉकी स्पर्धेला
आजपासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेत भारत, मलेशिया, इंग्लंड, जपान, ऑस्ट्रेलिया आणि
न्यूझीलंड, हे सहा देश सहभागी होत असून, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सलामीच्या
सामन्यानं स्पर्धेला प्रारंभ होईल. भारताचा पहिला सामना आज इंग्लंडसोबत होणार आहे.
दुपारी दीड वाजेच्या सुमारास या सामन्याला सुरूवात होईल. भारताचा पुढचा सामना उद्या
न्यूझीलंडसोबत, २ मे रोजी ऑस्ट्रेलिया, ३ मे रोजी जपान आणि ५ मे रोजी यजमान मलेशिया
संघासोबत होईल. स्पर्धेचा अंतिम सामना ६ मे रोजी होणार आहे.
****
औरंगाबाद इथं आज आणि उद्या शेक्सपिअर महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आज सायंकाळी
साडे सहा वाजता गोविंदभाई श्रॉफ सभागृहात होणाऱ्या या महोत्सवात प्राध्यापक मुस्तजीब
खान यांचं शेक्सपिअरची नाटकं या विषयावर तर डॉ केशव देशपांडे यांचं राम गणेश गडकरींवर
शेक्सपिअरचा प्रभाव या विषयावर व्याख्यान होणार आहे. या महोत्सवात 'ओळखलंत का मला',
ही एकांकिका आज सादर होईल. तर उद्या सायंकाळी 'कसाब आणि मी' हे नाटक सादर होणार आहे.
//******//
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad, Date: 29.04.2017, Time : 8.40 to 8.45 AM
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date - 29 April 2017
Time 8.40am to 8.45am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ : ۲۹؍ اپریل ۲۰۱۷
وَقت : صبح ۴۰: ۸ - ۴۵ :۸
***********************
قرض حاصل کرنے کے لیے نا اہل ہوجانے والے کسانوں کو بھی قرض فراہم کرنے کا حکم وزیرِ اعلیٰ دیویندر پھڑنویس نے دیا ہے۔ کل ممبئی میں 2017-18 کے خریف ہنگام کا جائزاتی اِجلاس وزیرِ اعلیٰ کی زیرِ صدارت منعقد ہوا۔ اِس اِجلاس سے خطاب کرتے ہوئے وزیرِ اعلیٰ نے کہا کہ ریاست میں کم و بیش 31 / لاکھ کسان قرض کے دائرے سے باہر ہوگئے ہیں۔ اس کے لیے اَپّر چیف سیکریٹری برائے امورِ مالیات کی زیرِ قیادت ایک کمیٹی تشکیل دی گئی ہے۔ یہ کمیٹی تمام کسانوں کو قرض مہیا کرے گی۔ اُنھوں نے کہا کہ جو بینک کسانوں کو قرض فراہم کرنے کے اہل نہیں رہے انہیں تجارتی بینکوں سے جوڑ کر اِس قابل بنایا جارہا ہے۔ پھڑنویس نے بتایا کہ اس برس زرعی ترقی کی شرح ساڑھے بارہ فیصد رہی۔ انھوں نے ہدایت کی کہ اس موسمِ خریف میں دوبارہ تخم ریزی کی تکلیف دور کرنے کیلئے مؤثر منصوبہ تیار کیا جائے۔ رابطہ وزراء اور ضلع کلکٹر۔ ضلع۔ تعلقہ اور گائوں کی سطح پر مؤثر منصوبہ بندی کرکے قرض میلے منعقد کریں۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
موسم کی پیشگی اِطلاع دینے والے مہاویدھ منصوبے کا اِفتتاح کل وزیرِ اعلیٰ کے ہاتھوں عمل میں آئے گا۔ اِس منصوبے کے باعث موسم کی پیشگوئی سے متعلق اندازوں میں بہتری آئیگی اور زرعی تحقیق و ہنگامی منصوبہ بندی میں مدد ملے گی۔ اس منصوبے کے تحت رِیاست کے تمام 65/ محصول ڈیویژنوں میں خودکار موسمیات مرکز قائم کیے جائیں گے۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
رِیاست میں محکمے پولس میں بڑے پیمانے پر تبادلے کیے گئے ہیں۔ اورنگ آباد کے پولس کمشنر امیتیش کمار کا ممبئی شہر ٹریفک ایڈیشنل کمشنر کے عہدے پر تبادلہ کردیا گیا ۔ تھانہ کے اَپّر پولس کمشنر یشسوی یادو نے کل اورنگ آباد کے پولس کمشنرکی حیثیت سے عہدے کا جائزہ لیا۔ اورنگ آباد کے ڈِپٹی پولس کمشنر وسنت پردیشی کو تھانہ شہر پولس ڈِپٹی کمشنر اور ڈپٹی کمشنر سندیپ آٹوڑے کو گوندیا کا اَپّر پولس سپرنٹنڈنٹ بنایا گیا ہے۔ عثمان آباد اَپّر پولس سپرنٹنڈنٹ دیپالی داٹے‘ اورنگ آباد شہر ڈِپٹی پولس کمشنر ہونگی۔
اورنگ آباد سرکل کے اِسپیشل اِنسپکٹر جنرل اجیت پاٹل کا پونا کرائم برانچ کے آئی جی اور ممبئی شہر ٹریفک کے ڈپٹی کمشنر ملند بھارمبے کا اورنگ آباد سرکل کے آئی جی کی حیثیت سے تبادلہ کیا گیا۔ اورنگ دیہی پولس سپرنٹنڈنٹ نوین چندر ریڈی کو ممبئی شہر ڈپٹی کمشنر آف پولس بنایا گیا ۔ جبکہ ناگپور سی آئی ڈی پولس سپرنٹنڈنٹ ڈاکٹر آرتی سنگھ نے اورنگ آباد یہی پولس سپرنٹنڈنٹ کی حیثیت سے کل عہدے کا جائزہ لیا۔ پیٹھن کے ایڈیشنل ایس پی بچن سنگھ کا تبادلہ جلگائوں کے اَپّر پولس سپرنٹنڈنٹ کے عہدے پر کیا گیا ۔ اس کے علاوہ مراٹھواڑہ کے جالنہ۔ بیڑ۔ لاتور۔ ناندیڑ۔ پربھنی اور ہنگولی اضلاع کے بھی اعلیٰ پولس عہدیداروں کے تبادلے کیے گئے ۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
وزیرِ اعظم نریندر مودی کل بروز اتوار آکاشوانی پر من کی بات پروگرام میں قوم سے خطاب کریں گے۔ یہ اس سلسلے کا 31/ واں پروگرام ہے۔ آکاشوانی اور دُوردرشن کے تمام چینل صبح گیارہ بجے یہ پروگرام نشر کریں گے۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
قانون ساز کونسل میں حزبِ اِختلاف کے قائد دھننجے منڈھے نے مطالبہ کیا ہے کہ حکومت تور کی خرید سے متعلق سخت شرائط منسوخ کرکے نئے احکامات جاری کرے۔ اُنھوں نے اِلزام عائد کیا کہ تورکی خرید کے معاملے میں منصوبہ بندی کا فقدان ہے اس لیے کسانوں کے ساتھ دھوکے بازی ہورہی ہے۔ کسانوں کو ضمانتی نرخ کے علاوہ فی کوئنٹل ساڑھے چار سو رُوپئے بونس دئیے جانے اور اندرونِ ایک ہفتہ تور خریدی کا عمل مکمل کیے جانے کا بھی اُنھوں نے مطالبہ کیا۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
عثمان آباد ضلع کے یرماڑا پولس اِسٹیشن کے سب اِنسپکٹر راجندر موتاڑے پر 2012 میں ہوئے جان لیوا حملے کے مقدمے میں ایک شخص کو 10/ برس قید بامشقت کی سزا سنائی گئی ہے۔ ملزم پوپٹ پوار کو گرفتار کرنے اس کے گھر گئے سب اِنسپکٹر موتاڑے پر ملزم نے حملہ کیا تھا۔ اس معاملے میں عثمان آباد ایڈیشنل سیشن کورٹ نے اسے موکا کے تحت یہ سزا سنائی۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
ریاست کے 80/ گرام پنچایتوں کیلئے عام اِنتخابات اور دو ہزار 440/ گرام پنچایتوں کے تین ہزار 909/ خالی نشستوں کیلئے ضمنی اِنتخابات 27/ مئی کو ہونگے۔ ان میں اورنگ آباد و عثمان آباد اَضلاع کی ایک ایک اور ناندیڑ و جالنہ کے دو۔ دو گرام پنچایتیں شامل ہیں۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
Date - 29 April 2017
Time 8.40am to 8.45am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ : ۲۹؍ اپریل ۲۰۱۷
وَقت : صبح ۴۰: ۸ - ۴۵ :۸
***********************
قرض حاصل کرنے کے لیے نا اہل ہوجانے والے کسانوں کو بھی قرض فراہم کرنے کا حکم وزیرِ اعلیٰ دیویندر پھڑنویس نے دیا ہے۔ کل ممبئی میں 2017-18 کے خریف ہنگام کا جائزاتی اِجلاس وزیرِ اعلیٰ کی زیرِ صدارت منعقد ہوا۔ اِس اِجلاس سے خطاب کرتے ہوئے وزیرِ اعلیٰ نے کہا کہ ریاست میں کم و بیش 31 / لاکھ کسان قرض کے دائرے سے باہر ہوگئے ہیں۔ اس کے لیے اَپّر چیف سیکریٹری برائے امورِ مالیات کی زیرِ قیادت ایک کمیٹی تشکیل دی گئی ہے۔ یہ کمیٹی تمام کسانوں کو قرض مہیا کرے گی۔ اُنھوں نے کہا کہ جو بینک کسانوں کو قرض فراہم کرنے کے اہل نہیں رہے انہیں تجارتی بینکوں سے جوڑ کر اِس قابل بنایا جارہا ہے۔ پھڑنویس نے بتایا کہ اس برس زرعی ترقی کی شرح ساڑھے بارہ فیصد رہی۔ انھوں نے ہدایت کی کہ اس موسمِ خریف میں دوبارہ تخم ریزی کی تکلیف دور کرنے کیلئے مؤثر منصوبہ تیار کیا جائے۔ رابطہ وزراء اور ضلع کلکٹر۔ ضلع۔ تعلقہ اور گائوں کی سطح پر مؤثر منصوبہ بندی کرکے قرض میلے منعقد کریں۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
موسم کی پیشگی اِطلاع دینے والے مہاویدھ منصوبے کا اِفتتاح کل وزیرِ اعلیٰ کے ہاتھوں عمل میں آئے گا۔ اِس منصوبے کے باعث موسم کی پیشگوئی سے متعلق اندازوں میں بہتری آئیگی اور زرعی تحقیق و ہنگامی منصوبہ بندی میں مدد ملے گی۔ اس منصوبے کے تحت رِیاست کے تمام 65/ محصول ڈیویژنوں میں خودکار موسمیات مرکز قائم کیے جائیں گے۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
رِیاست میں محکمے پولس میں بڑے پیمانے پر تبادلے کیے گئے ہیں۔ اورنگ آباد کے پولس کمشنر امیتیش کمار کا ممبئی شہر ٹریفک ایڈیشنل کمشنر کے عہدے پر تبادلہ کردیا گیا ۔ تھانہ کے اَپّر پولس کمشنر یشسوی یادو نے کل اورنگ آباد کے پولس کمشنرکی حیثیت سے عہدے کا جائزہ لیا۔ اورنگ آباد کے ڈِپٹی پولس کمشنر وسنت پردیشی کو تھانہ شہر پولس ڈِپٹی کمشنر اور ڈپٹی کمشنر سندیپ آٹوڑے کو گوندیا کا اَپّر پولس سپرنٹنڈنٹ بنایا گیا ہے۔ عثمان آباد اَپّر پولس سپرنٹنڈنٹ دیپالی داٹے‘ اورنگ آباد شہر ڈِپٹی پولس کمشنر ہونگی۔
اورنگ آباد سرکل کے اِسپیشل اِنسپکٹر جنرل اجیت پاٹل کا پونا کرائم برانچ کے آئی جی اور ممبئی شہر ٹریفک کے ڈپٹی کمشنر ملند بھارمبے کا اورنگ آباد سرکل کے آئی جی کی حیثیت سے تبادلہ کیا گیا۔ اورنگ دیہی پولس سپرنٹنڈنٹ نوین چندر ریڈی کو ممبئی شہر ڈپٹی کمشنر آف پولس بنایا گیا ۔ جبکہ ناگپور سی آئی ڈی پولس سپرنٹنڈنٹ ڈاکٹر آرتی سنگھ نے اورنگ آباد یہی پولس سپرنٹنڈنٹ کی حیثیت سے کل عہدے کا جائزہ لیا۔ پیٹھن کے ایڈیشنل ایس پی بچن سنگھ کا تبادلہ جلگائوں کے اَپّر پولس سپرنٹنڈنٹ کے عہدے پر کیا گیا ۔ اس کے علاوہ مراٹھواڑہ کے جالنہ۔ بیڑ۔ لاتور۔ ناندیڑ۔ پربھنی اور ہنگولی اضلاع کے بھی اعلیٰ پولس عہدیداروں کے تبادلے کیے گئے ۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
وزیرِ اعظم نریندر مودی کل بروز اتوار آکاشوانی پر من کی بات پروگرام میں قوم سے خطاب کریں گے۔ یہ اس سلسلے کا 31/ واں پروگرام ہے۔ آکاشوانی اور دُوردرشن کے تمام چینل صبح گیارہ بجے یہ پروگرام نشر کریں گے۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
قانون ساز کونسل میں حزبِ اِختلاف کے قائد دھننجے منڈھے نے مطالبہ کیا ہے کہ حکومت تور کی خرید سے متعلق سخت شرائط منسوخ کرکے نئے احکامات جاری کرے۔ اُنھوں نے اِلزام عائد کیا کہ تورکی خرید کے معاملے میں منصوبہ بندی کا فقدان ہے اس لیے کسانوں کے ساتھ دھوکے بازی ہورہی ہے۔ کسانوں کو ضمانتی نرخ کے علاوہ فی کوئنٹل ساڑھے چار سو رُوپئے بونس دئیے جانے اور اندرونِ ایک ہفتہ تور خریدی کا عمل مکمل کیے جانے کا بھی اُنھوں نے مطالبہ کیا۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
عثمان آباد ضلع کے یرماڑا پولس اِسٹیشن کے سب اِنسپکٹر راجندر موتاڑے پر 2012 میں ہوئے جان لیوا حملے کے مقدمے میں ایک شخص کو 10/ برس قید بامشقت کی سزا سنائی گئی ہے۔ ملزم پوپٹ پوار کو گرفتار کرنے اس کے گھر گئے سب اِنسپکٹر موتاڑے پر ملزم نے حملہ کیا تھا۔ اس معاملے میں عثمان آباد ایڈیشنل سیشن کورٹ نے اسے موکا کے تحت یہ سزا سنائی۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
ریاست کے 80/ گرام پنچایتوں کیلئے عام اِنتخابات اور دو ہزار 440/ گرام پنچایتوں کے تین ہزار 909/ خالی نشستوں کیلئے ضمنی اِنتخابات 27/ مئی کو ہونگے۔ ان میں اورنگ آباد و عثمان آباد اَضلاع کی ایک ایک اور ناندیڑ و جالنہ کے دو۔ دو گرام پنچایتیں شامل ہیں۔
<<>><<>><<>><<>><<>><<>>
text - AIR News Bulletin, Aurangabad 29.04.2017 - 6.50am
Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 29 April 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ एप्रिल २०१७ सकाळी
६.५० मि.
****
·
कर्जाच्या परिघाबाहेर गेलेल्या
शेतकऱ्यांनाही कर्जपुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
· राज्यात पोलिस दलात
मोठे फेरबदल; औरंगाबादचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची मुंबई शहर वाहतूक शाखेच्या सह आयुक्तपदी बदली
तर ठाण्याचे अपर पोलिस आयुक्त यशस्वी यादव औरंगाबादचे पोलिस आयुक्त
म्हणून रुजू
आणि
·
तूर खरेदीसंदर्भातल्या
जाचक अटी रद्द करून नव्यानं शासननिर्णय जारी करावा - विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची
मागणी
****
कर्जाच्या परिघाबाहेर गेलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जपुरवठा
करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत २०१७-१८ ची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या
अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात सुमारे ३१ लाख शेतकरी कर्जाच्या परिघाबाहेर गेले आहेत, त्यांना कर्जपुरवठ्याच्या परिघात आणण्यासाठी अपर मुख्य वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे, या समितीनं नियोजन
करून, सर्व शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावं, असं मुख्यमंत्री म्हणाले. ज्या बँका कर्जवाटपात अकार्यक्षम आहेत, त्यांना व्यावसायिक बँकांशी जोडून
त्या सक्षम केल्या जात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
या वर्षी कृषी विकास दर साडे बारा टक्के राहिल्याचं त्यांनी सांगितलं.
उत्पादकता वाढवणं हे या हंगामाचं मुख्य उद्दिष्ट असून, यंदाच्या खरीप हंगामात दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी सर्वंकष आराखडा
तयार करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत.
पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा, तालुका, गाव पातळीवर सुक्ष्म नियोजन करुन पीक कर्ज मेळावे
आयोजित करावेत, कृषी विद्यापीठांनी पीक पद्धतीचं नियोजन करून, शाश्वत पीक
घेण्याबाबत गाव पातळीवर माहिती द्यावी, जलयुक्त शिवार, शेततळी, विहीरींची कामं
युद्धपातळीवर करण्यात यावीत, कृषी आणि पणन विभागाने साठवणूक, अन्न प्रक्रिया उद्योगावर अधिक भर द्यावा, आदी
सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केल्या.
****
हवामानाची माहिती देणाऱ्या ‘महावेध’ प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या
होणार आहे. या प्रकल्पामुळे हवामान अंदाजात अचूकता येणार असून कृषी संशोधन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी तो
सहायक ठरेल. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातल्या सर्व दोन हजार ६५ महसूल मंडळामध्ये स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी
करण्यात येणार आहे.
****
राज्यात पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
औरंगाबादचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची मुंबई शहर वाहतूक सह आयुक्तपदी बदली
झाली असून, ठाण्याचे अपर पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी काल औरंगाबादचे पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.
औरंगाबाद शहराचे पोलिस उपायुक्त वसंत परदेशी यांची ठाणे
शहर पोलिस उपायुक्त पदी तर उपायुक्त संदीप आटोळे यांची गोंदीयाच्या अपर पोलिस अधीक्षक
पदी बदली करण्यात आली आहे. उस्मानाबादच्या अपर पोलिस अधीक्षक दिपाली दाटे तसंच औरंगाबाद
इथलेच पोलिस अधीक्षक विनायक ढाकणे आता, औरंगाबाद शहर पोलिस उपायुक्त म्हणून काम पाहतील.
औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक अजित पाटील यांची पुणे गुन्हे
अन्वेषण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून बदली झाली असून, मुंबई शहर वाहतुक
विभागाचे सहायक पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे आता औरंगाबादचे विशेष पोलिस महानिरीक्षक
असतील.
औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांची
मुंबई शहर पोलिस उपायुक्त पदी, बदली झाली असून, नागपूर सीआयडीच्या पोलिस अधीक्षक डॉ
आरतीसिंह यांनी काल औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. पैठणचे सहाय्यक पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांची
जळगावच्या अपर पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
जालन्याच्या पोलिस
अधिक्षक ज्योती प्रिया सिंह यांची पुणे शहर पोलिस उपायुक्त पदी बदली झाली आहे. पुणे
गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे आता जालन्याचे पोलिस अधीक्षक म्हणून
काम पाहतील. जालन्याचे अपर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांची नागपूरच्या पोलिस उपायुक्त
पदी तर लातूरच्या अपर पोलिस अधीक्षक लता फड यांची जालन्याच्या अपर पोलिस अधीक्षक पदी
बदली झाली आहे.
यवतमाळचे अपर पोलिस अधीक्षक काकासाहेब डोळे आता लातूरचे
अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहतील.
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईचे अप्पर पोलिस अधीक्षक दीक्षित
कुमार गेडाम यांची सिंधुदूर्गच्या पोलिस अधीक्षक पदी बदली झाली असून, त्यांच्या जागी
दौंड इथले राज्य राखीव पोलिस दलाचे समादेशक अजित बोराडे यांची नियुक्ती झाली आहे. माजलगावचे
सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. हरि बालाजी एन यांची गडचिरोलीचे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून
बदली झाली आहे.
नांदेडचे पोलिस अधीक्षक संजय येनपुरे यांची मुंबईचे शहर
पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली असून, अकोल्याचे पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना आता
नांदेडचे पोलिस अधीक्षक असतील.
नांदेडचे अप्पर पोलिस अधीक्षक संदीप डोईफोडे यांची बुलडाणा
अपर पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली असून, त्यांच्या जागी नागपूरच्या कामठीचे सहाय्यक
पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे यांची बदली झाली आहे.
परभणी पोलिस अधीक्षक नियती ठाकुर यांची चंद्रपूरच्या पोलिस
अधीक्षक पदी बदली झाली असून, नागपूरच्या पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य दिलीप
झळगे यांची परभणीच्या पोलिस अधीक्षक पदी नियुक्ती झाली आहे.
हिंगोलीचे पोलिस अधीक्षक म्हणून पुणे शहराचे पोलिस उपायुक्त
बस्वराज तेली यांची नियुक्ती झाली असून, सध्याचे पोलिस अधीक्षक अशोक मोराळे यांची पुणे
शहर पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे.
ठाणे शहर पोलिस उपायुक्त पंढरीनाथ पवार यांची जालना पोलिस
प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून, तर बारामतीचे अपर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले
यांची जालना पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून बदली झाली आहे.
मुंबई शहर पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांची नांदेड
इथं नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलिस अधीक्षक म्हणून, तर धुळ्याचे अपर पोलिस अधीक्षक
चंद्रकांत गवळी यांची औरंगाबाद इथं नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलिस अधीक्षक म्हणून
बदली झाली आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित
केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज
ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरील ‘मन
की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ३१ वा भाग
असणार आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम
प्रसारित होईल.
****
शासनानं तूर खरेदीसंदर्भातल्या जाचक अटी रद्द करून नव्यानं
शासननिर्णय जारी करावा, अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी
केली आहे. तूर खरेदीसंदर्भात नियोजनाचा अभाव असून शेतकऱ्यांचा छळ होत असल्याचा आरोप
मुंडे यांनी केला. शेतकऱ्यांच्या हमीभावावर प्रतिक्विंटल चारशे पन्नास रूपये बोनस देऊन
आठ दिवसात तूर खरेदी प्रक्रिया पूर्ण करावी, असंही ते म्हणाले. समृद्धी महामार्गामुळे
या भागातला नव्वद टक्के शेतकरी भूमिहीन होणार असल्यानं, शासनानं समृद्धी महामार्गाचा
पुनर्विचार करावा अशी मागणीही मुंडे यांनी यावेळी केली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या येरमाळा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस
निरीक्षक राजेंद्र मोताळे यांच्यावर २०१२ मध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आरोपीस १० वर्षे सक्तमजुरीची
शिक्षा सुनावण्यात आली आहे. उस्मानाबाद अतिरिक्त सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावली.
मोक्का प्रकरणातील आरोपी पोपट पवार याला अटक करण्यासाठी मोताळे त्याच्या घरी गेले असता
आरोपीनं मोताळे यांच्यावर हा हल्ला केला होता.
****
राज्यातल्या ८० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि दोन हजार ४४० ग्रामपंचायतींमधल्या तीन हजार ९०९ रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी २७ मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
प्रत्येकी एक, नांदेड आणि जालना
जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पोट निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यातल्या
१२०, नांदेड १६०, उस्मानाबाद ७४, जालना ८६ आणि लातूर जिल्ह्यात ५३ रिक्त जागांसाठी मतदान होईल.
****
पीडित महिलांना पोलिसांसह संबंधित यंत्रणांकडून प्रतिसाद न मिळाल्यास महिला आयोग त्याचा पाठपुरावा
करुन न्याय मिळवून देईल असं, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉक्टर विजया रहाटकर
यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद इथं सुभेदारी विश्रामगृहात
आयोजित 'महिला आयोग तुमच्या दारी' या उपक्रमांतर्गत त्या बोलत
होत्या. महिलांच्या कौटुंबिक, कार्यालयीन तसंच सामाजिक सुरक्षेसाठी राज्य महिला आयोग प्रयत्नशील असल्याचं रहाटकर यावेळी
म्हणाल्या.
****
जालना जिल्ह्यात मंठा पंचायत
समितीचे विस्तार अधिकारी ए आर चव्हाण, तसंच पांगरी गोसावीचे ग्रामविस्तार अधिकारी एस
आर आटोळे यांना निलंबित करण्यात आलं आहे. सातत्यानं गैरहजर राहण्याच्या कारणावरून ही
कारवाई करण्यात आली. जालना पंचायत समितीतल्या दोन कर्मचाऱ्यांनाही कार्यालयात उशीरा
येण्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आलं आहे.
****
परिवहन विभागाची नवीन संगणकीय प्रणाली वाहनधारकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचं परभणीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पी. बी. जाधव यांनी म्हटलं आहे. ते काल परभणी इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. परभणी जिल्ह्यातील साडेतीनशे सुविधा केंद्रांमधून
संगणकीय प्रणाली सुरु करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या नवीन प्रणालीमध्ये रोखरहित व्यवहारांची सुविधा उपलब्ध आहे.
//*******//
Subscribe to:
Posts (Atom)
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...