आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Wednesday, 30 April 2025
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.04.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 April 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० एप्रिल २०२५ सायंकाळी ६.१०
****
• केंद्र सरकारचा जातीनिहाय जनगणनेचा निर्णय-ऊसाला प्रति क्विंटल ३५५ रुपये रास्त आणि किफायतशीर दर निर्धारित
• वेव्हज परिषदेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर
• सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती
• भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषद- आयएससीईचा दहावी तसंच बारावीचा निकाल जाहीर
आणि
• जुन्या कपड्यांच्या पुनर्वापरासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा अभिनव उपक्रम
****
केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली, ते म्हणाले...
बाईट - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
मंत्रिमंडळाने यंदाचा ऊस गाळप हंगामासाठी ऊसाचा रास्त आणि किफायतशीर दर प्रति क्विंटल ३५५ रुपये निर्धारित केला आहे. देशभरातले पाच कोटी ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखाने, तसंच साखर उद्योगाशी निगडित कामगारांना याचा लाभ होणार असल्याचं, वैष्णव यांनी सांगितलं.
****
दरम्यान, जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केलं आहे. हा निर्णय सर्व समाजघटकांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देण्यास मदत करेल, असं पवार यांनी एका ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईत उद्यापासून सुरू होणाऱ्या वेव्हज परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान करतील. चार मे पर्यंत चालणाऱ्या या परिषदेत जगभरातून शंभर पेक्षा जास्त देश सहभागी होणार असून, विविध विषयांवर चर्चासत्रं, आणि अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
परिषदेच्या पहिल्या दिवशी ‘भारत आणि महाराष्ट्र पॅव्हिलियन’ तसंच वेव्हज प्रदर्शनाचं उद्घाटन होणार असून, काही महत्त्वपूर्ण घोषणा आणि सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून देशातल्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होणार आहे.
****
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे पुढचे सरन्यायाधीश असतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. पुढील महिन्याच्या १४ तारखेपासून ते आपला कार्यभार सांभाळतील, अशी माहिती केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली.
****
भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने आयएससीई इयत्ता १० वी आणि आयएससी इयत्ता १२ वी चे निकाल आज जाहीर केले. दोन लाख पन्नास हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती तर ९९ हजार पाचशे एकावन्न विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. दहावीत ९९ पुर्णांक ३७ टक्के गुणांसह मुलींनी वर्चस्व राखलं तर एकुण ९८ पूर्णांक ८४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरम्यान, बारावीच्या परीक्षेतही मुलींनी चांगली कामगिरी केली असून ९९ पुर्णांक ४५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या तर विद्यार्थ्यांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे ९८ पुर्णांक ६४ टक्के इतकं राहीलं. विद्यार्थांना cisce.org आणि results.cisce.org या संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येणार आहे.
****
महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या ६६ व्या वर्धापन दिनाचा छत्रपती संभाजीनगरचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस आयुक्तालयातल्या देवगिरी मैदानात उद्या सकाळी आठ वाजता होणार आहे. या सोहळ्यात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुलात पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते तर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत अप्पर जिल्हाधिकारी हरीष धार्मिक यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र दिनी उद्या मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातल्या उत्कृष्ट पाच मंत्रालयीन विभागांचे सचिव, आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, यांना गौरवण्यात येणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
****
साडे तीन मुहूर्तापैकी एक अक्षय्य तृतीया आज साजरी होत आहे. आजच्या दिवशी शुभ कार्याची सुरुवात केली जाते, तसंच या काळात सोने, चांदी आणि इतर वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे पर्व सगळ्यांसाठी यश, वृद्धि आणि प्रसन्नता घेऊन येवो, असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
****
यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव तालुक्यातील गोपालनगर आणि दिग्रस तालुक्यातील डोळंबा इथं अक्षय तृतीयेनिमित्त होणारे दोन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला आज यश आलं. यावेळी प्रशासनाच्या चमुने पोलिसांच्या मदतीने मुला मुलीचे आई वडील यांची समजूत घातली, बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगितल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा, तालुका आणि गावस्तरीय अधिकाऱ्यांना अशा कोणत्याही घटनांविरुद्ध सतर्क राहण्याचे आणि त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच, बालविवाह निर्मूलनासाठी जिल्हा कृती दल सक्रिय करण्यात आलं आहे.
****
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज सर्वत्र साजरी करण्यात आली. दिल्ली इथल्या महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात आज निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. याप्रसंगी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, स्मिता शेलार यांच्यासह सर्व उपस्थितांनी प्रतिमांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हा महोत्सव समितीतर्फे शहरासह जिल्ह्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. यानिमित्ताने आज सकाळी टीव्ही सेंटर, बळीराम पाटील हायस्कूल, कॅनॉट गार्डन ते आकाशवाणी चौक पर्यत फेरी काढण्यात आली.
****
महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आज धुळे इथं वीरशैव लिंगायत समाजातर्फे महात्मा बसवेश्वरांना अभिवादन करण्यात आलं. विविध कार्यक्रमासह शहरातून दुचाकी फेरी काढण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं जुन्या कपड्यांच्या पुनर्वापरासाठी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांनी आपल्याकडे वापरात नसलेले, सुस्थितीतले कपडे यासाठी देण्याचं आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी केलं आहे. उद्यापासून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला यासाठीची विशेष घंटागाडी प्रत्येक प्रभागातून फिरणार असल्याचं, आयुक्तांनी सांगितलं. ते म्हणाले...
बाईट - मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत
****
बालरंगभूमी परिषदेतर्फे कोल्हापूर इथल्या कणेरी मठात आयोजित निवासी कला-संस्कार शिबिरासाठी बीड जिल्ह्यातले २८ शिबीरार्थी सहभागी होणार आहेत. या शिबिरात शिबीरार्थीना सहभोजन, स्वावलंबनाचे धडे गिरवत कला आणि संस्कारांचा आनंद घेता येणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
छत्तीसगड राज्यातल्या बिलासपूर इथून तीन सोन्याच्या दुकानांतून चोरलेल्या दागिन्यांसह एका टोळीला आज भंडारा पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून पोलिसांनी १४ लाख ५६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून पाच जणांना अटक केली आहे.
****
नाशिकमधल्या पिंपळगाव बसवंतमध्ये दोन बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली. हे दोन नागरिक जोपुळ रोड परिसरातील सोहन सिटीमध्ये अवैधरीत्या राहत होते. येत्या १ मे पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
परभणी जिल्ह्यात नांदखेडा इथं शस्त्र बाळगल्याप्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी या दोघांकडून चार चाकी वाहनासह १० लाख ३७ हजार २००रुपयांचा मुद्देमाल, गावठी पिस्टल, तलवार आणि इतर शस्त्रं जप्त केली आहेत.
****
इंडियन प्रीमियर लिग- आयपीएल क्रिकेटमध्ये आज चेन्नई सुपर किंग्जचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. विशाखापट्टणम इथं होणार हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होईल.
****
हवामान
राज्यात आज सर्वाधिक ४४ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं ४१ पूर्णांक सहा अंश, बीड इथं ४२, छत्रपती संभाजीनगर इथं ४२ पूर्णांक सहा, तर परभणी इथं ४३ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.04.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 30 April 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० एप्रिल
२०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथल्या
एका उपाहारगृहात काल रात्री लागलेल्या आगीत १५ जणांचा मृत्यू झाला. १४ जणांचे मृतदेह
सापडले असून, अनेकांना सुरक्षित बाहेर काढल्याचं पोलिसांनी सांगितलं.
आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम
इथं सिंहाचल मंदिरात चंदनोत्सवादरम्यान आज पहाटे झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू
झाला आणि १४ जण जखमी झाले. जोरदार पावसामुळे मंदिरात उभारलेल्या मंडप भिंतीवर कोसळला
आणि ही भिंत मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर पडली. राष्ट्रीय आणि
राज्य राखीव दलाची पथकं बचाव आणि मदत कार्य करत आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात
हलवण्यात आलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही घटनेबद्दल दु:ख व्यक्त
केलं असून, मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय
मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत जाहिर करण्यात आली आहे.
****
साडे तीन मुहूर्तापैकी एक अक्षय्य
तृतीया आज साजरी होत आहे. आजच्या दिवशी शुभ कार्याची सुरुवात केली जाते, तसंच या काळात सोने, चांदी आणि इतर वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
देशवासियांना अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे पर्व सगळ्यांसाठी यश, वृद्धि आणि प्रसन्नता घेऊन येवो, असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
महात्मा बसवेश्वर जयंती आज साजरी
होत आहे. समाजाप्रती महात्मा बसवेश्वर यांचा दृष्टीकोन आणि उपेक्षितांच्या उत्थानासाठी
त्यांनी केलेले प्रयत्न आजही समाजाला मार्गदर्शन करत असल्याचं सांगत, पंतप्रधान मोदी यांनी बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
****
अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर
उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे पारंपरिक
पद्धतीनं उघडण्यात आले असून, आजपासून चार धाम
यात्रेला सुरुवात झाली. केदारनाथ धामचे दरवाजे शुक्रवारी उघडतील आणि बद्रीनाथ धामचे
दरवाजे रविवारी उघडतील.
****
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायमूर्ती भूषण गवई हे भारताचे पुढचे सरन्यायाधीश असतील. राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांची भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती
केली आहे. १४ मे रोजी ते आपला कार्यभार सांभाळतील, अशी माहिती केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली.
****
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ
अर्थात महाबीजचा ४९ वा वर्धापन दिन आणि सुवर्ण महोत्सवी वर्षातल्या पदार्पणाचा कार्यक्रम
महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. वृक्षारोपण
करुन उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकरी, महाबीज विक्रेते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावेळी महाबीज पुरस्कार
देऊन गौरवण्यात आलं.
****
केंद्र सरकारच्या विविध योजनांचा
लाभ तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांना मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून सर्व अधिकाऱ्यांनी
कामांचं योग्य नियोजन करून वेळेच्या आत कामं पूर्ण करावीत, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले
आहेत. काल यासंदर्भात बुलढाणा इथं झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. येत्या
पावसाळ्यामध्ये वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागांनी संयुक्तरीत्या वृक्ष लागवड योजना
राबवून प्रामुख्यानं आयुर्वेदासंदर्भातल्या झाडांची लागवड करावी, अशी सूचनाही जाधव यांनी संबंधित अधिका-यांना त्यांनी यावेळी
केली.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी पदव्युत्तर परीक्षेत काल बीड शहरातल्या
तीन परीक्षा केंद्राना अचानक भेट दिली. या ठिकाणी ३६ कॉपीबहादर आढळले असून, त्यांचा ’संपूर्ण परफॉर्मन्स रद्द’ करण्याचे आदेश कुलगुरू फुलारी
यांनी दिले. विद्यापीठाच्या पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा कालपासून सुरु झाल्या.
****
मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या
कार्यक्रमात बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक अधिका-यांनी नाविण्यपूर्ण, लोकाभिमूख, गतीमान अभियान राबवून
स्वच्छता ठेवावी, असं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं
आहे. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. नागरीकांशी संवेदनशीलपणे व्यवहार
करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
****
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या
निषेधार्थ काल बीड जिल्ह्यात गेवराईत बंद पाळण्यात आला. शहरातली बाजारपेठ पूर्ण बंद
ठेऊन पाकिस्तानचा निषेध नोंदवण्यात आला.
****
हिंगोली शहरात आझम कॉलनी भागात
आग लागून चार दुकानांतलं साहित्य जळून खाक झालं. काल दुपारच्या सुमारास ही दुर्घटना
घडली. अग्निशमन दल जवानांच्या सुमारे एका तासाच्या प्रयत्नानंतर आग अटोक्यात आल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
थायलंडहून भारतात हवाई मार्गानं
हायड्रो गांजा मागवून देशात विक्री करणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं
अटक केली. या टोळीतल्या दहा जणांमध्ये परदेशी टपाल कार्यालयातील कस्टम अधिक्षक, हवाला व्यवहार करणारे दोन जण आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातल्या
दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
****
परभणी पोलिसांनी काल गावठी पिस्टल, तलवार आणि घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक केली. यासंदर्भातली
गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी दहा लाख रुपयांचा मुद्देमाल
जप्त करण्यात आला.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.04.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 30 April 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० एप्रिल
२०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथल्या
एका उपाहारगृहात काल रात्री लागलेल्या आगीत १५ जणांचा मृत्यू झाला. १४ जणांचे मृतदेह
सापडले असून, अनेकांना सुरक्षित बाहेर काढल्याचं पोलिसांनी सांगितलं.
आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम
इथं सिंहाचल मंदिरात चंदनोत्सवादरम्यान आज पहाटे झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू
झाला आणि १४ जण जखमी झाले. जोरदार पावसामुळे मंदिरात उभारलेल्या मंडप भिंतीवर कोसळला
आणि ही भिंत मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर पडली. राष्ट्रीय आणि
राज्य राखीव दलाची पथकं बचाव आणि मदत कार्य करत आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात
हलवण्यात आलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही घटनेबद्दल दु:ख व्यक्त
केलं असून, मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय
मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत जाहिर करण्यात आली आहे.
****
साडे तीन मुहूर्तापैकी एक अक्षय्य
तृतीया आज साजरी होत आहे. आजच्या दिवशी शुभ कार्याची सुरुवात केली जाते, तसंच या काळात सोने, चांदी आणि इतर वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
देशवासियांना अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे पर्व सगळ्यांसाठी यश, वृद्धि आणि प्रसन्नता घेऊन येवो, असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
महात्मा बसवेश्वर जयंती आज साजरी
होत आहे. समाजाप्रती महात्मा बसवेश्वर यांचा दृष्टीकोन आणि उपेक्षितांच्या उत्थानासाठी
त्यांनी केलेले प्रयत्न आजही समाजाला मार्गदर्शन करत असल्याचं सांगत, पंतप्रधान मोदी यांनी बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
****
अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर
उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे पारंपरिक
पद्धतीनं उघडण्यात आले असून, आजपासून चार धाम
यात्रेला सुरुवात झाली. केदारनाथ धामचे दरवाजे शुक्रवारी उघडतील आणि बद्रीनाथ धामचे
दरवाजे रविवारी उघडतील.
****
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायमूर्ती भूषण गवई हे भारताचे पुढचे सरन्यायाधीश असतील. राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांची भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती
केली आहे. १४ मे रोजी ते आपला कार्यभार सांभाळतील, अशी माहिती केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली.
****
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ
अर्थात महाबीजचा ४९ वा वर्धापन दिन आणि सुवर्ण महोत्सवी वर्षातल्या पदार्पणाचा कार्यक्रम
महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. वृक्षारोपण
करुन उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकरी, महाबीज विक्रेते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावेळी महाबीज पुरस्कार
देऊन गौरवण्यात आलं.
****
केंद्र सरकारच्या विविध योजनांचा
लाभ तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांना मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून सर्व अधिकाऱ्यांनी
कामांचं योग्य नियोजन करून वेळेच्या आत कामं पूर्ण करावीत, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले
आहेत. काल यासंदर्भात बुलढाणा इथं झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. येत्या
पावसाळ्यामध्ये वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागांनी संयुक्तरीत्या वृक्ष लागवड योजना
राबवून प्रामुख्यानं आयुर्वेदासंदर्भातल्या झाडांची लागवड करावी, अशी सूचनाही जाधव यांनी संबंधित अधिका-यांना त्यांनी यावेळी
केली.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी पदव्युत्तर परीक्षेत काल बीड शहरातल्या
तीन परीक्षा केंद्राना अचानक भेट दिली. या ठिकाणी ३६ कॉपीबहादर आढळले असून, त्यांचा ’संपूर्ण परफॉर्मन्स रद्द’ करण्याचे आदेश कुलगुरू फुलारी
यांनी दिले. विद्यापीठाच्या पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा कालपासून सुरु झाल्या.
****
मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या
कार्यक्रमात बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक अधिका-यांनी नाविण्यपूर्ण, लोकाभिमूख, गतीमान अभियान राबवून
स्वच्छता ठेवावी, असं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं
आहे. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. नागरीकांशी संवेदनशीलपणे व्यवहार
करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
****
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या
निषेधार्थ काल बीड जिल्ह्यात गेवराईत बंद पाळण्यात आला. शहरातली बाजारपेठ पूर्ण बंद
ठेऊन पाकिस्तानचा निषेध नोंदवण्यात आला.
****
हिंगोली शहरात आझम कॉलनी भागात
आग लागून चार दुकानांतलं साहित्य जळून खाक झालं. काल दुपारच्या सुमारास ही दुर्घटना
घडली. अग्निशमन दल जवानांच्या सुमारे एका तासाच्या प्रयत्नानंतर आग अटोक्यात आल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
थायलंडहून भारतात हवाई मार्गानं
हायड्रो गांजा मागवून देशात विक्री करणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं
अटक केली. या टोळीतल्या दहा जणांमध्ये परदेशी टपाल कार्यालयातील कस्टम अधिक्षक, हवाला व्यवहार करणारे दोन जण आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातल्या
दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
****
परभणी पोलिसांनी काल गावठी पिस्टल, तलवार आणि घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक केली. यासंदर्भातली
गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी दहा लाख रुपयांचा मुद्देमाल
जप्त करण्यात आला.
****
Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 30 اپریل 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10
Regional Urdu Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.04.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 30 April 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० एप्रिल २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या
कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपये मदतीचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय-कुटुंबातल्या
एका सदस्याला सरकारी नोकरीची घोषणा
·
मुंबईत आयोजित वेव्हज परिषद मनोरंजन क्षेत्रातल्या गुंतवणुकीसाठी
‘दावोस’ ठरेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन
·
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत मराठवाडा
विभागीय पुरस्कार जाहीर
·
अक्षय्य तृतीयेनिमित्त होणारे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाच्या
उपाययोजना
आणि
·
मराठवाड्यात धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगरचं तापमान साडे ४२ अंश सेल्सिअस, नांदेड
जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस उष्णतेचा यलो ॲलर्ट
****
काश्मीरच्या
पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या राज्यातल्या सहा व्यक्तींच्या
कुटुंबियांना, प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं
घेतला आहे. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले...
बाईट
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्र
सरकारच्या अनिवार्य जोखीम बाबीवर आधारित पीकविमा योजना राबवण्याचा, तसंच कृषी
पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना राज्यात राबवण्याचा निर्णय कालच्या बैठकीत
घेण्यात आला.
पी एम यशस्वी
या एकछत्री योजनेअंतर्गत ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना,
मॅट्रीकपूर्व तसंच मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत केंद्र शासनानं
२०२१ ते २०२६ या वर्षांकरता निर्गमित केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना राज्यात लागू
करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे.
राज्यात
जहाजबांधणी, जहाजदुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर सुविधा विकसित करण्याबाबतच्या
धोरणाला मान्यता, इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि
वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज
परतावा योजनेची मर्यादा दहा लाख रुपयांवरून पंधरा लाख रुपये करणं, तसंच ॲप आधारित वाहनांसाठी समुच्चयक धोरणालाही राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता
दिली. महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध नियमातल्या तरतुदीत सुधारणा करत भिक्षागृहातल्या
व्यक्तींना दररोज पाच ऐवजी चाळीस रुपये देण्याचा निर्णय काल घेण्यात आला.
महाराष्ट्र
इलेक्ट्रीक वाहन धोरण, २०२५, मंत्रिमंडळानं काल मंजूर केलं. याबाबत
मुख्यमंत्र्यांनी अधिक माहिती दिली..
बाईट
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
हरित ऊर्जा
निर्मितीसह उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर राज्य शासनानं लक्ष केंद्रित केलं असून, ऊर्जा निर्मिती
क्षेत्रात स्वयंपूर्णतेच्या दिशेनं राज्य अग्रेसर असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी
म्हटलं आहे. काल मंत्रालयात जलसंपदा विभागासोबत, महाजेनको,
महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड आणि अवादा अॅक्वा बॅटरीज प्रायव्हेट
लिमिटेड, या तीन कंपन्यांचे सामंजस्य करार झाले, त्यावेळी ते बोलत होते. या सामंजस्य करारांमुळे राज्यात एकूण नऊ उदंचन जलविद्युत
प्रकल्पांमध्ये ५७ हजार २६० कोटी इतकी गुंतवणूक होणार आहे. आठ हजार ९०५ मेगावॅट क्षमतेच्या
या उदंचन प्रकल्पांमधून नऊ हजार २०० रोजगार निर्माण होणार आहेत.
****
थॅलेसेमिया
आजारापासून महाराष्ट्र मुक्त करण्यासाठी ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे' हे अभियान
येत्या आठ मे पासून सुरू करण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या दिवशी राज्यातल्या
सर्व थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची सूचना, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली आहेत.
****
महाराष्ट्र
राज्य स्थापना दिनाच्या ६६ व्या वर्धापन दिनाचा छत्रपती संभाजीनगरचा मुख्य शासकीय समारंभ
पोलीस आयुक्तालयातल्या देवगिरी मैदानात उद्या सकाळी आठ वाजता होणार आहे. या सोहळ्यात
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते
ध्वजारोहण होणार आहे.
लातूर इथं
जिल्हा क्रीडा संकुलात पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण
होणार आहे.
****
मुंबईत
उद्यापासून ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’ वेव्ह्ज संमेलनाला प्रारंभ
होत आहे. वांद्रे कुर्ला संकुलात जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित या परिषदेचं, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. चार मे पर्यंत चालणाऱ्या या परिषदेतल्या
विविध आयोजनांबाबतचा हा संक्षिप्त वृत्तांत...
वेव्हज् परिषदेत जगभरातून 100 पेक्षा जास्त देश सहभागी होणार असून. विविध विषयांवर चर्चासत्रं, आणि
अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
परिषदेच्या पहिल्या दिवशी ‘भारत आणि महाराष्ट्र पॅव्हिलियन’ तसंच वेव्हज
प्रदर्शनाचं उद्घाटन होणार असून काही महत्त्वपूर्ण घोषणा आणि सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. क्रिएटोस्पिअरचं उद्घाटन तसंच ‘वेव्हज बझार’, आणि वेव्हज एक्सलेटरलाही पहिल्या दिवशी प्रारंभ होणार आहे. परिषदेच्या दुसऱ्या
दिवशी जागतिक मीडिया संवाद, तसंच क्रिएट इन इंडिया चॅलेन्जेसची अंतिम फेरी होईल, तर तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी विविध चर्चासत्रांबरोबरच प्रदर्शनाचे आयोजन
करण्यात येणार आहे.
या
परिषदेच्या माध्यमातून देशातल्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना
मिळण्यास मदत होणार आहे.
आकाशवाणी बातम्यांसाठी, हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर
दरम्यान, जागतिक स्तरावर
मनोरंजन क्षेत्रातल्या गुंतवणुकीसाठी वेव्ह्ज परिषद ‘दावोस’ ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. या परिषदेच्या तयारीची
काल पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. वेव्ह्ज परिषद मुंबईत आयोजित होणं हे महाराष्ट्रासाठी
गौरवास्पद असल्याचं शिंदे यांनी नमूद केलं.
****
राजीव गांधी
प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर तसंच नांदेड
जिल्हाधिकारी कार्यालय आणि कन्नड उपविभागीय अधिकारी कार्यालयांना वर्ष २०२४-२५ साठी
पारितोषिकं जाहीर झाली आहेत. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी काल ही पारितोषिकं जाहीर
केली. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाला आधुनिक संकल्पना या श्रेणीत, नांदेड जिल्हाधिकारी
कार्यालयाला ऑनलाईन पोर्टल मार्फत कर्मचारी बदल्या तर कन्नड उपविभागीय अधिकारी कार्यालयाला
आधुनिक संकल्पना तसंच व्यवस्थापन या श्रेणीत पुरस्कार जाहीर झाले आहेत.
****
श्रीलंकेत
सुरू असलेल्या महिलांच्या तिरंगी एकदिवसीय मालिकेत भारतीय संघानं काल दक्षिण अफ्रिकेचा
१५ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने सहा बाद २७६ धावा केल्या.
प्रत्युत्तरादाखल दक्षिण अफ्रिकेचा संघ ५० षटकांत २६१ धावांवर सर्वबाद झाला. पाच बळी
टिपणारी स्नेह राणा प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराची मानकरी ठरली.
****
साडे तीन
मुहूर्तापैकी एक अक्षय्य तृतीया आज साजरी होत आहे. आजच्या दिवशी शुभ कार्याची सुरुवात
केली जाते, तसंच या काळात सोने, चांदी आणि इतर वस्तू
खरेदी करणं शुभ मानलं जातं.
दरम्यान, अक्षय्य तृतीयेनिमित्त
होणारे बालविवाह रोखण्यासाठी अनेक जिल्हा प्रशासनांनी उपाययोजना केल्या आहेत. बालविवाहाच्या
संदर्भात कुठलीही माहिती किंवा संशयास्पद घटना आढळल्यास १०९८ या नि:शुल्क क्रमांकावर
संपर्क साधण्याचं आवाहन धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी केलं आहे.
****
देशासह
राज्यभरात परशुराम जयंती काल साजरी झाली. छत्रपती संभाजीनगर इथं ब्राह्मण समाज समन्वय
समितीतर्फे भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त शहरातल्या क्रांती चौकापासून औरंगपुऱ्यातल्या
परशुराम स्तंभापर्यंत फेरी काढण्यात आली. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीनं काल
शोभायात्राही काढण्यात आली, तसंच एका रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं.
बीड जिल्ह्यातल्या
पाटोदा शहराचं ग्रामदैवत भामेश्वर मंदिर इथं भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात
आला.
धाराशिव
इथल्या अनंतदास महाराज मंदिर इथं ब्राह्मण महासंघाच्या वतीनं भगवान परशुराम यांच्या
प्रतिमेवर पुष्प गुलाल उधळून जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
****
धाराशिव
जिल्ह्यात लोहारा इथं भानुदासराव चव्हाण वरिष्ठ महाविद्यालयातला पदवीदान समारंभ काल
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य देविदास
पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी नवीन राष्ट्रीय
शैक्षणिक धोरणात समाविष्ट असलेल्या विविध कौशल्य युक्त शिक्षणाचा लाभ घेऊन आत्मनिर्भर
होण्याचं आवाहन, त्यांनी यावेळी केलं.
****
राज्यात
सामाजिक सौहार्द आणि महाराष्ट्र धर्म वाढीस लागावा या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश
काँग्रेस कमिटीने सद्भावना यात्रांचं आयोजन केलं आहे. त्यानुसार उद्या बीड जिल्ह्यात
परळीमध्ये प्रदेश काँग्रेसच्या वतीने सद्भावना संकल्प करण्यात येणार आहे.
****
लातूर इथं
उभारण्यात येत असलेल्या 'सारथी' संस्थेचं विभागीय कार्यालय,
मुला-मुलींची वसतीगृहं आणि इतर उपक्रमाच्या इमारत बांधकांमाची आमदार
अमित देशमुख यांनी काल पाहणी केली. वसतीगृहाच्या नियोजित १२ पैकी ७ व्या मजल्याचं काम
सध्या सुरू आहे.
****
हवामान
राज्यात
काल सर्वाधिक ४४ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात
धाराशिव इथं ४२ अंश तर परभणी आणि छत्रपती संभाजीनगर इथं साडे ४२ अंश सेल्सिअस तापमानाची
नोंद झाली.
मुंबईच्या
प्रादेशिक हवामान केंद्रानं नांदेड जिल्ह्यासाठी चार दिवस उष्णतेचा येलो ॲलर्ट जारी
केला आहे. तर एक आणि दोन मे रोजी विभागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली
आहे.
****
Tuesday, 29 April 2025
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.04.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 29 April 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ एप्रिल २०२५ दुपारी १.०० वा.
****
शिक्षण आणि नवोन्मेष क्षेत्रात
देशाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि त्याला चालना देण्यासाठी, भारताची संशोधन परिसंस्था मजबूत करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विकसित भारतासाठी शिक्षण, उद्योग आणि नवोन्मेष क्षेत्राला एकत्रित आणणाऱ्या युग्म संमेलनात ते बोलत होते. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं हे
संमेलन होत आहे. या तिनही क्षेत्रात सरकार करत असलेल्या कामांची, आणि भविष्यातल्या योजनांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली.
देशातल्या शिक्षण क्षेत्राला २१व्या शतकानुसार आधुनिक बनवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं
ते म्हणाले. युग्म हा मंच भारताच्या नवोन्मेष यात्रेत महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
युग्म अर्थात - Youth,
University, Government, and Market, हा एक प्रकारचा
पहिलाच धोरणात्मक मंच असून, यात सरकार, शिक्षण, उद्योग आणि नवोन्मेष क्षेत्रातलं नेतृत्व एकत्र
येत आहे. आत्मनिर्भर आणि नवोन्मेषप्रणित भारताच्या दृष्टीकोनाला अनुसरुन या परिषदेदरम्यान
नवोन्मेषाशी संबंधित प्रमुख उपक्रम सुरु करण्यात आले. युग्म या उपक्रमाच्या माध्यमातून, वाधवानी फाऊंडेशन आणि सरकारी संस्थांच्या, एक हजार चारशे कोटी रुपयांच्या एका संयुक्त प्रकल्पातून भारताच्या
नवोन्मेषी धोरणासाठी योगदान देण्यात येणार आहे. याशिवाय, देशात अत्याधुनिक वैज्ञानिक शिक्षण शाखा निर्माण करून संशोधनाला
गती देण्यात येणार आहे.
****
भारतानं संयुक्त राष्ट्रामध्ये
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा जोरदारपणे मांडला असून, पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि पैसा पुरवत असल्याबाबत
पाकिस्तानच्या मंत्रांनी नुकत्याच दिलेल्या कबुलीबाबतही भाष्य केलं आहे. पाक मंत्र्यांची
ही कबुली पूर्ण जगानं ऐकली असल्याचं संयुक्त राष्ट्रांतल्या भारताच्या उप-स्थायी प्रतिनिधी
योजना पटेल यांनी म्हटलं आहे. भारतावर आधारहीन आरोप करण्यासाठी जागतिक मंचाचा वापर
केल्याबद्दल त्यांनी पाकिस्तानची निंदा केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातल्या
नेत्यांनी भारताला दिलेल्या समर्थनाबद्दल पटेल यांनी आभार मानले.
****
काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतले
विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष सत्र
बोलावण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र
लिहिलं आहे. दहशतवादाविरुद्ध देशाची एकता दर्शवण्यासाठी आणि मृतांच्या कुटुंबियांना
न्याय देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी हे विशेष सत्र बोलावण्याची मागणी या दोन्ही
नेत्यांनी केली आहे.
दरम्यान, या मागणीबाबत भाजपनं काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस अध्यक्षांनी
या हल्ल्याबाबत आपल्या पक्षाचं काय म्हणणं आहे ते आधी सांगावं, असं भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी म्हटलं आहे.
****
परशुराम जयंती आज साजरी होत
आहे. यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी परशुराम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शस्त्रास्त्रांसह पवित्र ग्रंथांच्या
प्रगल्भ ज्ञानासाठी ओळखले जाणारे भगवान परशुराम यांचे आशीर्वाद प्रत्येकाचं जीवन धैर्य
आणि शक्तीने भरतील अशी आशा, पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात व्यक्त
केली.
****
पवित्र चार धाम यात्रा आजपासून
सुरू झाली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी काल या यात्रेच्या व्यवस्थेचा
आढावा घेतला. येत्या दोन मे पासून भाविकांना केदारनाथ धाममध्ये दर्शन घेता येणार आहे.
यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या पवित्र स्थळांवर हजारोंच्या संख्येनं येणाऱ्या भाविकांच्या
गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी उत्तराखंड सरकारनं चोख व्यवस्था केली असून, या यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यातही सुरक्षा व्यवस्था कडक
करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या गरीब
विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांकरता मदत करण्यासाठी मिशन झेड सुरू करण्यात
आलं आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी गुलाबराव खरात यांच्या संकल्पनेमधून
सुरु झालेल्या मिशन झेड अंतर्गत आवश्यक पूरक शैक्षणिक सुविधा आणि मार्गदर्शन मोफत उपलब्ध
करून देण्यात येणार असून, यासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून विशिष्ट रक्कम
बाजूला ठेवण्यात येईल.
****
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बुलढाणा
जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका यांनी दक्षता घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. जिल्ह्यात बालविवाह होत
असल्याचं निदर्शनास आलं तर संबंधितांवर कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
****
मुंबईच्या प्रादेशिक हवामान
केंद्रानं नांदेड जिल्ह्यासाठी आजपासून चार दिवस उष्णतेचा येलो ॲलर्ट जारी केला आहे.
****
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...