Tuesday, 31 January 2023

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.01.2023 रोजीचे रात्री 08.00 ते 08.15 वाजताचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र

आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक 31.01.2023 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 31.01.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  31 January  2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ जानेवारी २०२   सायंकाळी ६.१०

****

·      २०२२-२३ वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर, विकास दर सात टक्के राहण्याची अपेक्षा.

·      केंद्र सरकारनं समाजातल्या प्रत्येक घटकासाठी कोणताही भेदभाव न करता काम केलं - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.

·      राज्य सेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायाऐवजी वर्णनात्मक पद्धतीनं घेण्याचा निर्णय २०२५पर्यंत पुढे ढकलण्याची मुख्यमंत्र्यांची राज्य लोकसेवा आयोगाकडे मागणी.

·      जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ गीमहाराष्ट्र राज्य गीत म्हणून स्वीकार करण्याचा राज्य सरकारचा निर्णय.

·      अभिमत विद्यापीठांमध्ये सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्तीची योजना सुरू करण्यास मान्यता.

आणि

·      शिष्येवर बलात्कार प्रकरणी आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा.

****

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२२- २३ या वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर सात टक्के राहण्याची अपेक्षा असून, भारत यावर्षीही जगातली सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहील, असं या सर्वेक्षणात म्हटलं आहे. जगातली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या भारताचं सकल देशी उत्पादन यावर्षीच्या मार्च महिन्यात सुमारे साडेतीन ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहचण्याचा अंदाजही यात व्यक्त करण्यात आला आहे. देशात महागाईमध्ये लक्षणीय घट झाली असून वार्षिक महागाई दर सहा टक्क्याच्या खाली आल्याचं यात म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात, वस्तू आणि सेवांच्या निर्यातीमध्ये, मागच्या वर्षीच्या तुलनेत सोळा टक्के वाढ झाल्याचं या सर्वेक्षणात म्हटलं आहे.

२०२३-२४ या वर्षात भारताच्या सकल देशी उत्पादनात सहा ते साडे सहा दशांश टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याचंही या सर्वेक्षणात म्हटलं आहे. २०२३ मध्ये  चलनवाढीचा दर सहा पूर्णांक आठ दशांश टक्के राहण्याचा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेनं वर्तवल्याचं या सर्वेक्षणात म्हटलं आहे. २०२१-२२ या वर्षात कृषी क्षेत्रातल्या खाजगी गुंतवणुकीत वाढ होऊन ती नऊ पूर्णांक तीन दशांश टक्क्यांवर पोचल्याचं, तसंच एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या काळात प्रत्यक्ष कर संकलनात मोठी वाढ झाल्याचं या सर्वेक्षणात म्हटलं आहे.

दरम्यान, २०२३-२४ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत उद्या सादर होणार आहे.

****

केंद्र सरकारसाठी राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचं असून, सरकारनं समाजातल्या प्रत्येक घटकासाठी कोणताही भेदभाव न करता काम केलं असल्याचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरवातीला दोन्ही सदनांच्या सदस्यांना संबोधित करताना त्या आज बोलत होत्या. भ्रष्टाचार हा लोकशाही आणि सामाजिक न्यायाचा सर्वात मोठा शत्रू असल्याचं सरकारचं स्पष्ट मत असून, कामकाजात प्रामाणिकपणा आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षांत देशात थेट लाभ हस्तांतरण आणि डिजिटल इंडियाच्या मदतीने, कायमस्वरूपी आणि पारदर्शक प्रणाली विकसित झाली असल्याचं त्या म्हणाल्या. मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानाचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली असून, आज देशाची उत्पादन क्षमता वाढली असल्याचं त्यांनी नमूद केलं. कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण, आयुष्मान भारत योजना, महिला सशक्तिकरण, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना यासारख्या सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात उल्लेख केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना, यंदाचा अर्थसंकल्प प्रत्ये क्षेत्रासाठी आशेचा किरण घेऊन येईल, असा विश्वास व्यक्त केला. अर्थसंकल्पातून सर्वसामान्य भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.

****

या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस पक्ष भारत-चीन सीमा विवाद, महागाई आणि बेरोजगारी हे मुद्दे लावून धरणार आहे, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. संपूर्ण देशाचा खजिना काही निवडक भांडवलदारांच्या हातात सोपवल्याचा आरोप करत, हा मुद्दाही सदनात मांडणार असल्याचं ते म्हणाले. चीनसंदर्भातल्या परराष्ट्र धोरणाचा मुद्दाही सदनात उपस्थित करणार असल्याचं खरगे यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्य सेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पर्याय पद्धतीऐवजी वर्णनात्मक पद्धतीनं घेण्याच्या निर्णयामुळे या परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असल्यानं हा निर्णय २०२५च्या मुख्य परिक्षेपर्यंत पुढे ढकलावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सेवा आयोगाकडे एका पत्राद्वारे केली आहे. विद्यार्थ्यांची ही मागणी तातडीनं विचारात घेऊन आयोग विद्यार्थ्यांना दिलासा देईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. राज्य सेवा आयोग अत्यंत कार्यक्षमतेनं काम करत असून, गेल्या सात आठ महिन्यात आयोगानं नोकऱ्यांमधला अनुशेष भरून काढण्याचं काम वेगानं केलं आहे, तसंच शासकीय नोकऱ्यांमधली पंचाहत्तर हजार रिक्त पदं भरण्याची तयारी पूर्ण झाली असून त्याचं नियोजनही झालं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

प्रसिद्ध कवी राजा बढे यांचं ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत महाराष्ट्र राज्य गीत म्हणून स्वीकार करण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाचा बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. येत्या एकोणीस फेब्रुवारीपासून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून हे गीत अंगिकारण्यात येणार आहे.

राज्यातल्या अभिमत विद्यापीठांमध्ये सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्तीची योजना सुरू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय, महिला आणि बालविकास विभागाच्या बालसंगोपन योजनेच्या परिपोषण अनुदानात एक हजार दोनशे पंचाहत्तर रुपयांची वाढ करून ते अडीच हजार रुपये करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळांनं घेतला आहे. फलटण-पंढरपूर या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गाकरता राज्य शासनाच्या आर्थिक सहभागालाही आजच्या बैठकीत मान्यता दिली.

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना राज्य आणि जिल्हा स्तरांवर राबवण्यासाठी योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्यासही मान्यता देण्यात आली.

महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ मध्ये, अग्निसुरक्षेच्या अनुषंगानं सुधारणा करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. यामध्ये, शैक्षणिक इमारतींची उंची तीस मीटरवरून पंचेचाळीस मीटर करणं, तसंच आग परिक्षण किंवा सल्लागार नेमणं या तरतुदी करण्यात आल्या आहेत.

नवी मुंबईच्या एकात्मिक औद्योगिक क्षेत्रातल्या जमिनीच्या वापराबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यानुसार आता तिथे आंतरराष्ट्रीय वैद्यकीय आणि शैक्षणिक संस्था येणार असून, त्यातून साठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि एक लाख रोजगारांची निर्मिती होईल, अशी अपेक्षा आहे.

याशिवाय पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर उपसा सिंचन योजनेला चारशे साठ कोटी रुपयांची पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता या बैठकीत देण्यात आली. यामुळे पुणे जिल्ह्यातल्या अवर्षण प्रवण भागातल्या सुमारे साडेपंचवीस हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळेल.

****

गुजरातमधल्या गांधीनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयानं एका शिष्येवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूला आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आसाराम बापू सध्या जोधपूरच्या तुरुंगात असून २०१८ मध्ये, जोधपूर न्यायालयानं त्याला अन्य एका लैंगिक अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. २०१३ मध्ये सुरतमधल्या दोन बहिणींवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात गांधीनगरच्या न्यायालयानं काल आसाराम बापूला दोषी ठरवलं होत. सुरतमधल्या दोन बहिणींनी आसाराम बापू आणि नारायण साई यांच्याविरोधात बलात्काराची ही तक्रार दाखल केली होती.

****

महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांसाठी सरकारनं एक नवीन कायदा करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महत्वाच्या मुद्यांवरून लक्ष हटवण्यासाठी काही लोक जाणीवपूर्वक असं करतात, असा आरोप त्यांनी केला. संविधानाच्या चौकटीत बसणाऱ्या बाबीच माध्यमांनी दाखवाव्यात, ज्या बाबी या चौकटीत बसत नाहीत, ज्यांनी समाजात तेढ निर्माण होते, अशा बाबी टाळाव्यात, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्या आमदारांची विधानभवनात बैठक आयोजित केली आहे. त्यात पोटनिवडणुकांबाबत चर्चा केली जाईल असं सांगत, चिंचवड आणि कसबा या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक लढवण्यावर आम्ही ठाम आहोत, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

****

आजादी का अमृतमहोत्सवाच्या औचित्यानं उस्मानाबाद विभागातल्या सगळ्या टपाल कार्यालयांमध्ये येत्या नऊ आणि दहा फेब्रुवारीला सुकन्या समृद्धी योजनाखाती उघडण्याकरता विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. मुलींच्या शिक्षण आणि भवितव्यासाठी ही योजना किती महत्वाची आहे, याबाबत ग्राम पंचायत, अंगणवाडी आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी या विविध घटकांमध्ये टपाल कर्मचारी  या योजनेबद्दल माहिती देणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातले आठवडी बाजार, मंदिरं, यात्रा आणि शाळा अशा ठिकाणी पालक मेळाव्यांच्या माध्यमातून ही योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचावी असे प्रयत्नही केले जाणार आहेत. आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी या काळात जास्तीत जास्त नागरिकांनी टपाल खात्याच्या सुकन्या समृद्धी  योजना खात्यांमध्ये गुंतवणूक करावी, असं आवाहन उस्मानाबाद विभागाचे डाकघर अधीक्षक भगवान नागरगोजे यांनी केलं आहे.

****

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 31.01.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.01.2023 रोजीचे दुपारी 03.00 वाजेचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.01.2023 रोजीचे दुपारी 01.30 वाजताचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.01.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 31 January 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३१ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

केंद्र सरकारसाठी राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचं असून, समाजातल्या प्रत्येक घटकासाठी कोणताही भेदभाव न करता काम केलं असल्याचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला दोन्ही सदनांच्या सदस्यांना संबोधित करताना त्या आज बोलत होत्या. विकासाच्या लाभांपासून वंचित असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकारनं काम केलं, त्यामुळे मूलभूत सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचत असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. भ्रष्टाचार हा लोकशाही आणि सामाजिक न्यायाचा सर्वात मोठा शत्रु असल्याचं सरकारचं स्पष्ट मत आहे, त्यामुळे कामकाजात प्रामाणिकपणा आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षांत देशा थेट लाभ हस्तांतरण आणि डिजिटल इंडियाच्या मदतीने, कायमस्वरूपी आणि पारदर्शक प्रणाली विकसित झाली असल्याचं त्या म्हणाल्या. मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानाचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली असून, आज देशाची उत्पादन क्षमता वाढली असल्याचं त्यांनी नमूद केलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारत पाच तत्वांच्या प्रेरणेनं प्रगती करत आहे. पारतंत्र्याची प्रत्येक खूण, प्रत्येक मानसिकतेतून मुक्ती मिळण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या.

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण, आयुष्मान भारत योजना, महिला सशक्तिकरण, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना यासारख्या सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात उल्लेख केला.

दरम्यान, २०२३-२४ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या संसदेत सादर करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना, यंदाचा अर्थसंकल्प प्रत्येक क्षेत्रासाठी आशेचा किरण घेऊन येईल, असा विश्वास व्यक्त केला. अर्थसंकल्पातून सर्वसामान्य भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.   

***

जागतिक पातळीवर उलथापालथ असूनही भारत, जगातली सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहील, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. नाणेनिधीनं आज प्रकाशित केलेल्या जागतिक आर्थिक दृष्टीकोनच्या जानेवारी महिन्याच्या आवृत्तीत हे नमूद करण्यात आलं आहे. २०२३ मध्ये भारताचा सहा पूर्णांक एक टक्के या दराने विकास होईल, असं देखील या आवृत्तीत म्हटलं आहे.

***

आकाशवाणी वरून प्रसारित होणाऱ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या शंभराव्या भागासाठी माय जी ओ व्ही अॅपद्वारे जिंगल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या एप्रिल महिन्यात हा शंभरावा भाग प्रसारित होणार आहे. नागरिकांच्या मनात आणि हृदयात कायम राहील अशी संस्मरणीय आणि सहज गुणगुणता येल अशी धून तयार करणं, हा या स्पर्धेचा उद्देश आहे. सर्वोत्कृष्ट जिंगलला अकरा हजार रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २८ फेब्रुवारी पर्यंत प्रवेशिका देता येतील.

मन की बात कार्यक्रमाच्या शंभराव्या भागाच्या औचित्याने, आकाशवाणी तर्फे लोगो अर्थात स्मरणचिन्ह स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. उद्यापर्यंत या स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका सादर करता येतील. विजेत्या स्पर्धकाला एक लाख रुपयांचं रोख बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेचा अधिक तपशील माय जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

***

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतर्गंत तेराव्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खातं अनिवार्य करण्यात आलं असून, यासाठी राज्यभरातल्या इंडीया पोस्ट पेमेंट बँकेत उद्यापासून १२ फेब्रुवारी पर्यंत मोहिम राबवण्यात येणार आहे. तसंच बँक खातं आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा, गावातल्या टपाल कर्मचाऱ्यांमार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. या मोहिमेराज्यातल्या सर्व प्रलंबित लाभार्थीनी त्यांचं बँक खातं उघडावं, असं आवाहन कृषी संचालक विकास पाटील यांनी केलं आहे.

***

गडचिरोली पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत काल दोन नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. मंगेश ऊर्फ कांडेराम पोटावी आणि चिन्ना मासे झोरे अशी त्यांची नावं आहेत. फेब्रुवारी ते मे या काळात नक्षलवादी 'टी सी ओ सी' अर्थात टक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन साजरा करतात. यादरम्यान ते मोठ्या प्रमाणात हिंसक कारवाया घडवून आणतात. या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत या दोघांना अटक करण्यात आली.

***

औरंगाबाद इथल्या जल आणि भूमि व्यवस्थापन संस्था - वाल्मी इथला प्रशासकीय अधिकरी प्रदिप बाहेकर याला तीस हजार रुपयांची लाच घेतांना काल लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं रंगेहात पकडलं. वाल्मी कार्यालयाअंतर्गत काम मंजुर करण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडून त्यानं ही लाच घेतली होती.

 

//**********//

 

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.01.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.01.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१ जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या अभिभाषणानं आज होत आहे. आज दोन्ही सदनात आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाईल. उद्या २०२३-२४ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना, यंदाचा अर्थसंकल्प प्रत्येत क्षेत्रासाठी आशेचा किरण घेऊन येईल, असा विश्वास व्यक्त केला. अर्थसंकल्पातून सर्वसामान्य भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.

****

खुल्या बाजारात गव्हाच्या किमती आटोक्यात राहून देशात गव्हाच्या किंमतीत चढउतार होऊ नयेत यासाठी भारतीय अन्न महामंडळाने खुल्या दराने धान्य विक्री योजना अमलात आणायचा निर्णय घेतला आहे. ग्राहक व्यवहार आणि अन्न तसंच सार्वजनिक वितरण मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी काल गुवाहाटी इथं ही माहिती दिली.

****

प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला द्वितीय पारितोषिक मिळालं आहे. महाराष्ट्रातली साडेतीन शक्तीपीठं आणि नारी शक्ती" ही यंदाच्या चित्ररथाची संकल्पना होती. उत्तराखंडच्या चित्ररथाला प्रथम आणि उत्तर प्रदेशला तिसरा क्रमांक मिळाला आहे.

****

ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास संपला असून, या बाबतचा अहवाल संबंधित सक्षम अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला असल्याची माहिती, केंद्रीय अन्वेषण विभाग - सी बी आयनं मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे. या प्रकरणी अधिक तपासाची गरज नसल्याचं सी बी आयनं सांगितलं आहे.

****

भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पराभवानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रीड यांनी २०२१ मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये संघाला ऐतिहासिक कांस्यपदक मिळवून दिलं होतं.

****

ओमानमधे मस्कत इथं झालेल्या आय टी टी एफ जेष्ठांच्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत मुंबईचे योगेश देसाई यांनी सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या ७० वर्षाहून अधिक वयोगटात एकेरीच्या अंतिम फेरीत त्यांनी झेक रिपब्लिकच्या खेळाडूवर विजय मिळवला.

//*********//

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.01.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.01.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

آکاشوانی اَورنگ آباد علاقائی خبریں تاریخ : 31 ؍ جنورئ 2023 وَقت : صبح 09.00 سے 09.10 ؍ بجے

 Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.

Date : 31 January 2023

Time :  09 : 00 to 09: 10 AM

آکاشوانی اَورنگ آباد

علاقائی خبریں

تاریخ:  ۳۱      ٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗ  ؍ جنوری۲۰۲۳ء؁

وَقت: صبح  ۰۰۔۹  سے  ۱۰۔۹؍ بجے 


سب سے پہلے خبروں کی سر خیاں...

٭ پارلیمنٹ کے بجٹ سیشن کا آج سے آغاز  ‘  کَل مرکزی بجٹ ہو گا پیش 

٭ تجارت کو فروغ دینے کے لیے مرکزی  اور  

ریاستی سطح پر کار وبار کی آزاد وزارت کے قیام کا

مہا راشٹر چیمبر آف کامرس کی جانب سے مطالبہ 

٭ ملک کے خانگی ٹی وی چینلس کے لیے روز آنہ 30؍ منٹ تک خدماتِ عامّہ کی نشر یات لازمی قرار 

٭ قانو ن ساز کائونسل کی5؍ نشستوں کے لیے تقریباً 72؍ فیصد رائے دہی 

٭ پارٹی کا نام  اور  نشان سے متعلق شیو سینا کے دونوں گروپوں کی جانب سے مرکزی انتخابی کمیشن کے روبرو

تحریری بحث پیش 

اور

٭ خواتین کے

T-20 

؍ کر کٹ مقابلے میں بھارت کی ویسٹ اِنڈیز پر 8؍ وکٹوں سے فتح


  اب خبریں تفصیل سے....

پارلیمنٹ کے بجٹ اجلاس کا آج سے صدر جمہوریہ دروپدی مُر مو کے خطاب سے آغاز ہو رہا ہے ۔ اِس پس منظر میں کَل پارلیمنٹ کے احا طے میں کُل جما عتی میٹنگ کا انعقاد کیا گیا ۔ اِس میٹنگ میں وزیر دفاع راجناتھ سنگھ  ‘  پیوش گوئل  اور  سیاسی جماعتوں کے نمائندے موجو د تھے ۔ تاہم کانگریس پارٹی کے نمائندہ اِس میٹنگ میں غیر حاضر تھے ۔ 

اِس موقعے پر حکو مت کی جانب سے تمام سیاسی جماعتوں سے پارلیمنٹ کی کار وائی بغیر کسی رکا وٹ کے کیے جانے کی خاطر تعاون کرنے کی اپیل کی گئی ۔ میٹنگ میں مخالف جماعتوں سے کچھ مسائل اٹھا ئے گئے  اور  تجا ویز دی گئی ۔ حکو مت نے کہا کہ تمام مسائل   اور  تجا ویز پر حکو مت ایوانوں میں بحث کے لیے تیار ہے ۔

یہ اطلاع پارلیمانی امور کے مرکزی وزیر پر لہاد جو شی نے میٹنگ کے بعد  نامہ نگاروں سے بات کر تے ہوئے دی ۔ بجٹ اجلاس کے دوران حکو مت کے سیاسی حکمتِ عملی طئے کرنے کے لیے NDA کی اتحادی جماعتوں کا بھی کل اجلاس منعقد کیا گیا ۔ پارلیمنٹ کے دونوں ایوانوں میں آج اقتصا دی جائزے کی رپورٹ پیش کی جائے گی ۔ کل یکم فروری کو وزیر مالیات نِر ملا سیتا رمن سال2023 - 24 ؁ء  کے لیے مالی بجٹ پیش کریں گی ۔ مرکزی وزیر پر لہاد جو شی نے بتا یا کہ2024؁ء  کے عام انتخاب کے پیش نظر مالی بجٹ انتہائی اہمیت کا حامل ہے ۔

***** ***** ***** 

پارلیمنٹ کے بجٹ اجلاس کے پیش نظر وزیر اعلیٰ ایکناتھ شِندے  کی زیر صدارت کل ریاست کے پارلیمنٹ اراکین کی میٹنگ منعقد کی گئی ۔ نائب وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس  ‘  مرکزی وزیر نا رائن رانے  ‘  مرکزی وزیر مملکت بھاگوت کراڑ  ‘  کپل پاٹل  ‘  ڈاکٹر بھارتی پوارسمیت   ریاستی کا بینی وزراء اِس میٹنگ میں شریک ہوئے ۔ اِس موقعے پر وزیر اعلیٰ نے کہا کہ ریاست کے تمام اراکین پارلیمنٹ ریاست کی تر قی کی خاطر کوشش کرنے والے عوامی نمائندے ہیں ۔ انہوں نے کہا کہ ہم سب مل کر ریاست کے زیر التواء مسائل مرکزی حکو مت کے روبرو اٹھا ئیں ۔

***** ***** ***** 

مہا راشٹر چیمبر آف کامرس  ‘  اِنڈسٹریس  اینڈ  ایگریکلچر  کے صدر للت گاندھی نے ملک میں تجارت کے فروغ کی خاطر مرکزی  اور  ریاستی سطح پر کار بار کی آزاد  وزارت کے قیام کا مطالبہ کیا ہے ۔ مالی بجٹ سے کار وبار و صنعت کو جو امید یں وابستہ ہے  اُس پر اپنا موقف واضح کر تے ہوئے للت گاندھی  نے مانگ کی کہ اشیاء و خد مات ٹیکس ِؑؒ

GST ؍کے5؍ برسوں کا جائزہ لے کر اُس کے طریقہ کار میں درستی کی جائے اور  GST ؍ کی شرح میں مناسب کمی کی جائے اُنھوں نے مزید مطالبہ کیا کہ ریاست کے ناندیڑ  ‘  لاتور  ‘  جلگائوں  اِن اضلاع میں ہوئی خد مات مہیا کی جائیں ساتھ ہی کولہا پور  ‘  ناسک  ‘  اورنگ آباد  طیرانگاہوں پر کارگو ٹر مِنس قائم کیے جائیں ۔ انہوں نے امرا وتی  اور  رتنا گیری ایئر پورٹس کی تعمیر کرنے  اور  کولہا پور یبھو واڑی ریلوے راستے کی خاطر فنڈ فراہم کرنے کی مانگ کی ۔

***** ***** ***** 

مرکزی وزارتِ اطلاعات و نشر یات  نے ملک کے  ٹی وی  چینلس کی  اَپ لِنکنگ  اور  ڈائون لنکنگ  کے لیے نومبر2022؁ء میں جاری رہنما خطوط سے متعلق  ‘  خانگی ٹی وی چینلس  اور  اُن کی تنظیموں کے ساتھ تفصیلی تبادلۂ  خیال کر کے کل اِس بارے میں ہدایات جاری کی ۔ اِس کے مطا بق خانگی ٹی وی چینلس کے لیے روز آ نہ 30؍ منٹ تک خد مات ِ عامہ سے متعلق نشر یات لازمی قرار دی گئیں۔ اِن پروگرامس میں تعلیم کی تشہیر  ‘  زراعت  اور  دیہی تر قی ‘  صحت  اور  خاندانی بہبود  ‘  سائنس  ٹیکنا لو جی  ‘  خواتین  اور سماج کے پسماندہ طبقات کی تر قی  ‘  ما حولیات  ‘ ثقا فت  اور  قومی اتحاد جیسے موضوعات شامل کیے جا ئیں گے ۔

***** ***** ***** 


***** ***** ***** 

 یہ خبریں آکاشوانی اورنگ آ باد سے نشر کی جا رہی ہیں

***** ***** ***** 


زمینی حمل و نقل کے مرکزی وزیر نتن گڈکری نے کہا ہے کہ سر کاری  اور  نیم سرکاری محکمہ جات میں استعمال کی جانے والی15؍ برس سے زائد پُرانی گاڑیوں کو فرسودہ قرار دے کر خدمات سے علیحدہ کرنے کو منظوری دی گئی ہے ۔ نئی دہلی میں بھارتی تجا رت و صنعت کی تنظیم  فِکّی   کی جانب سے منعقدہ تقریب میں وزیر موصوف نے یہ اطلاع دی ۔ انہوں نے بتا یا کہ یکم  اپریل  2023؁ء  سے یہ تمام گاڑیاں راستوں پر نظر نہیں آ ئیں گی ۔ ساتھ ہی آلودگی پھیلا نے والی  چار پہیہ گاڑیوں کے متبا دل کے طور پر نئی گاڑیوں کی خرید ی کی تجویز کو بھی منظوری دی گئی ہے ۔

***** ***** ***** 

با بائے قوم مہا تما گاندھی کی75؍ ویں برسی کی منا سبت سے کَل انہیں خراج عقیدت پیش کیا گیا ۔ اُن کی بر سی شہید دِ ن کے طور پر منائی جاتی ہے ۔ صدر جمہوریہ  دروپدی مُر مو  ‘  نائب صدر جمہوریہ جگدیپ دھنکڑ  ‘  وزیر اعظم نریندر مودی  ‘   وزیر دفاع  راجناتھ سنگھ  ‘  لوک سبھا اسپیکر  اوم بِر لا  ‘  چیف آف آ رمی اسٹاف  انِل چو ہان  ‘  فوج  کے تینوں شعبوں کے سر براہوں راج گھاٹ جا کر انہیں خراج عقیدت پیش کیا ۔ اِس موقعے پر تمام مذاہب کی دعا ئیہ تقا ریب کا اہتمام کیا گیا ۔ گور نر بھگت سنگھ کوشیاری نے کَل راج بھون میں 2؍ منٹ خاموشی اختیار کر کے مہا تماگاندھی  اور  دیگر شہیدں کو یاد کیا ۔ اِس موقعے پر مہا تما گاندھی  کی راج بھون ملاقا ت کے موضوع پر  ڈاکیو منٹری دکھائی گئی ۔

***** ***** ***** 

قانون ساز کائونسل کی5؍ نشستوں کے لیے کَل ریاست میں چند واقعات کے علا وہ مجموعی طور پر پُر امن رائے دہی عمل میں آئی ۔ اِن گریجویٹ حلقوں میں کم و بیش 72؍ فیصد ووٹ ڈالے گئے ۔ مراٹھواڑہ ٹیچرس حلقوں میں86؍ فیصد رائے دہی کی گئی ۔ اورنگ آ باد ضلع80؍ فیصد  جالنہ 82؍  پر  بھنی 90؍ فیصد ناندیڑ 84؍ فیصد ‘ ہنگولی 91   فیصد  ـلاتور   86  عثمان آباد  92اور    بیڑ  حلقے میں90؍ فیصد ووٹ  ڈالے گئے ۔ مراٹھواڑہ ٹیچرس حلقوں میں کل 14؍ امید وار میدان میں تھے ۔ وہیں کو کن حلقہ انتخاب میں91؍ فیصد  ‘  ناگپور  85؍ فیصد  ‘  ناسک  49   اعشاریہ28؍ فیصد  جبکہ امرا وتی میں49؍ اعشا ریہ 67؍ فیصد رائے دہی کی گئی ۔ پر سوں 2؍ فروری کو نتائج کا اعلان کیا جائے گا ۔

اِسی بیچ انتخابی کام کاج میں لا پر واہی کے الزام کے تحت  اورنگ آباد ضلعے کے سلوڑ تعلقے کے زرعی افسر گیا نیشور بر دے کے خلاف سلوڑ شہر پولس اسٹیشن میں جرم داخل کیا گیا ہے ۔ منڈل افسر کچرو تُپے کی جانب سے کی گئی شکایت پر یہ کار وائی کی گئی ۔

***** ***** ***** 

شیو سینا  اُدھو با لا صاحب ٹھاکر ے  اور  با لا صاحب کی شیو سینا اِن دونوں گروپوں نے کل مرکزی انتخابی کمیشن کے روبر و  پارٹی کے نام  اور  نشان سے متعلق تحریری طور پر بحث پیش کر کے اپنا  اپنا موقف واضح کیا ہے ۔ بتا یا گیا ہے کہ شندے گروپ نے124؍ صفحات  اور  ٹھاکرے گروپ نے 112 ؍صفحات پر مشتمل بحث داخل کی ہے ۔ دستور کی شِق10؍ کا حوا لہ دے کر ٹھاکرے گروپ نے کہا کہ شندے گروپ نے اپنی مرضی سے پارٹی چھوڑی ہے  اِس لیے وہ شیو سینا کی نشانی پر دعویٰ نہیں کر سکتے ۔ انہوں نے مطالبہ کیا کہ اِس تعلق سے شندے گروپ کے مطالبے کو قبول نہ کیا جائے۔

وہیں شِندے گروپ نے پارٹی نمائندہ گروپ پر اپنا دعویٰ پیش کیا  اور  کہا کہ نمائدہ گروپ کے144؍ افراد ہمارے ساتھ ہیں ۔ اِن میں اراکینِ پارلیمنٹ  ‘  اسمبلی  اور پارٹی کے عہدیداران شامل ہیں ۔ شندے گروپ نے اِس خصوص میں ناموں کی ایک فہرست کمیشن کے روبرو پیش کی ہے ۔

***** ***** ***** 

گجرات کے گاندھی نگر سیشن کورٹ نے اپنی شا گردہ کی عصمت ریزی معاملے میں روحا نی گرو آسا رام باپو کو مجرم قرار دیا ہے ۔ سورت شہر کی دو بہنوں کی عصمت ریزی کا یہ واقعہ 2013؁ء کا ہے ۔ اِس سلسلے میں عدالت آج سزا سنائے گی ۔ آسا رام باپو کو سن2018؁ء میں جودھپور عدالت نے ایک اور جنسی ہراسانی معاملے میں عمر قید کی سزا سنائی  ہے ۔

***** ***** ***** 

تین ملکوں کے خواتین T-20 ؍ کرکٹ مقابلےکی سیریز میں کَل بھارت نے ویسٹ اِنڈیز کو8؍ وکٹوں سے شکست دے دی ۔ بھارتی ٹیم نے  ٹاس جیت کر ویسٹ اِنڈیز  کو بلّے بازی کرنے کے لیے کہا ۔ ویسٹ اِنڈیز  کی خواتین کر کٹ ٹیم نے طئے شدہ 20؍ اوورس میں94؍ رن بنا ئے ۔ جوابی کھیل کے دوران بھارتی ٹیم نے14؍ ویں  اوور میں2؍ وکٹوں کے نقصان پر جیت کا ہدف حاصل کر لیا ۔ اِس سیریز کا آخری مقابلہ بھارت  اور  جنوبی افریقہ کے در میان آئندہ جمعرات کو ہو گا ۔

***** ***** ***** 



آخر میں اہم خبروں کی سر خیاں ایک با د پھر ...


٭ پارلیمنٹ کے بجٹ سیشن کا آج سے آغاز  ‘  کَل مرکزی بجٹ ہو گا پیش 

٭ تجارت کو فروغ دینے کے لیے مرکزی  اور  

ریاستی سطح پر کار وبار کی آزاد وزارت کے قیام کا

مہا راشٹر چیمبر آف کامرس کی جانب سے مطالبہ 

٭ ملک کے خانگی ٹی وی چینلس کے لیے روز آنہ 30؍ منٹ تک خدماتِ عامّہ کی نشر یات لازمی قرار 

٭ قانو ن ساز کائونسل کی5؍ نشستوں کے لیے تقریباً 72؍ فیصد رائے دہی 

٭ پارٹی کا نام  اور  نشان سے متعلق شیو سینا کے دونوں گروپوں کی جانب سے مرکزی انتخابی کمیشن کے روبرو

تحریری بحث پیش 

اور

٭ خواتین کے

T-20 

؍ کر کٹ مقابلے میں بھارت کی ویسٹ اِنڈیز پر 8؍ وکٹوں سے فتح


علاقائی خبریں ختم ہوئیں۔

٭٭٭٭٭




آکاشوانی اَورنگ آباد علاقائی خبریں تاریخ : 31 ؍ جنورئ 2023 وَقت : صبح 09.00 سے 09.10 ؍ بجے

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.01.2023 रोजीचे सकाळी 08.30 वाजताचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.01.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 31 January 2023

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३१ जानेवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ, उद्या अर्थसंकल्प सादर होणार 

·      देशातल्या व्यापार-उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरांवर स्वतंत्र व्यापार मंत्रालयाची निर्मिती करण्याची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी

·      देशातील खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांना रोज ३० मिनिटं सार्वजनिक सेवांचं प्रसारण करणं बंधनकारक

·      सरकार आणि निमसरकारी विभागातील १५ वर्षांपेक्षा जुनी नऊ लाखांहून अधिक वाहनं भंगारात काढण्यास मान्यता

·      विधान परिषदेच्या पाच जागांसाठी सरासरी ७२ टक्के मतदान

·      पक्षाचं नाव आणि चिन्हासंदर्भात शिवसेनेच्या दोन्ही गटांचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लेखी युक्तिवाद सादर

·      एका शिष्येवर बलात्कार प्रकरणी आसाराम बापू दोषी

आणि

·      महिलांच्या तिरंगी टी - ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा वेस्ट इंडीजवर आठ खेळाडू राखून विजय

 

सविस्तर बातम्या

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या अभिभाषणानं प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर संसदभवन परिसरात काल सर्वपक्षीय बैठक झाली. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, पियुष गोयल, प्रल्हाद जोशी, यांच्यासह केंद्रीय मंत्रीमंडळातले इतर सदस्य तसंच संसदेच्या दोन्ही सदनातले विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. मात्र काँग्रेस पक्षाचे नेते यावेळी गैरहजर राहिले. अधिवेशनादरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत व्हावं, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावं, असं आवाहन सरकारच्यावतीनं यावेळी करण्यात आलं.

बैठकीत विरोधी पक्षांनीही काही मुद्दे आणि प्रस्ताव सरकारकडे सुपूर्द केले. विविध २७ राजकीय पक्षांचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी झाले होते. त्यांनी दिलेल्या प्रत्येक मुद्यावर चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना दिली. अधिवेशनातील रणनीती ठरवण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचीही काल बैठक झाली.

आज दोन्ही सदनात आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाईल. उद्या २०२३-२४ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील. २०२४ साली सार्वत्रिक निवडणुका होणार असल्यानं यंदाचा अर्थसंकल्प अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे, अशी माहिती प्रल्हाद जोशी यांनी दिली.

****

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या संसद सदस्यांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  केंद्रीय मंत्री नारायण राणे,  राज्यमंत्री भागवत कराड,  कपिल पाटील,  डॉ. भारती पवार, यांच्यासह राज्य मंत्रीमंडळातले मंत्री यावेळी उपस्थित होते. संसद सदस्य हे राज्याच्या विकासासाठी झटणारे लोकप्रतिनिधी आहेत. आपण सर्व एकत्र येऊन केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत पाठपुरावा करावा, सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारी यंत्रणा उभी करतानाच महाराष्ट्र सदनातल्या निवासी आयुक्तांनी केंद्रीय मंत्रालय आणि राज्यातल्या विविध विभागातला दुवा म्हणून काम करावं,  असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.          

****

देशातल्या व्यापार-उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य दोन्ही स्तरांवर स्वतंत्र व्यापार मंत्रालयाची निर्मिती, तसंच देशांतर्गत व्यापाराचं नवीन धोरण तयार करण्याची मागणी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. अर्थसंकल्पाकडून व्यापार-उद्योग क्षेत्राच्या अपेक्षासंबंधी आपली भूमिका मांडताना गांधी यांनी, वस्तु आणि सेवा कर-जीएसटी प्रणालीचा पाच वर्षाचा आढावा घेऊन यातील कीचकट प्रणाली दुरूस्त करण्याची, तसंच करांचे दर तर्कसंगत पद्धतीनं कमी करण्याचीही मागणी केली. राज्यात नांदेड, लातूर, जळगांव, गोंदीया या परिपूर्ण विमानतळांवरून नियमित विमानसेवेबरोबरच, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद विमानतळावर कार्गो टर्मिनल, अमरावती, रत्नागिरी विमानतळांच्या कामाची सुरूवात, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाच्या कामासाठी निधी या प्रमुख मागण्या गांधी यांनी सादर केल्या आहेत.

****

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, भारतातल्या दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या अपलिंकिंग आणि डाऊनलिंकिंग साठी  नोव्हेंबर २०२२ मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांबाबत, खासगी वाहिन्यांचे प्रसारक आणि त्यांच्या संघटनांबरोबर विस्तृत चर्चा करून काल याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार खासगी प्रसारकांसाठी रोज ३० मिनिटं सार्वजनिक सेवांचं प्रसारण करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. प्रसारित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची संकल्पना, शिक्षण आणि साक्षरतेचा प्रसार, कृषी आणि ग्रामीण विकास, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, महिला कल्याण, समाजाच्या दुर्बल घटकांचं कल्याण, पर्यावरण आणि सांस्कृतिक वारशाचं जतन, आणि राष्ट्रीय एकात्मता या राष्ट्रीय महत्वाच्या विषयांवर आणि सामाजिक संदर्भांवर आधारित असावं असं यात म्हटलं आहे.

****

सरकार आणि निमसरकारी विभागातील १५ वर्षांपेक्षा जुनी नऊ लाखांहून अधिक वाहनं भंगारात काढण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती, केंद्रीय परीवहन मंत्री गडकरी यांनी दिली. नवी दिल्लीत भारतीय ‍वाणिज्य आणि उद्योग महासंघ -फिक्की तर्फे आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना काल ते बोलत होते. एक एप्रिलपासून ही सर्व वाहनं रस्त्यावर दिसणार नाहीत, यासोबतच प्रदूषण करणाऱ्या बस आणि चारचाकींच्या जागी नवीन वाहनांच्या खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७५ व्या पुण्यतिथीनिमित्त देशानं काल त्यांना आदरांजली वाहिली. देशभरात सकाळी अकरा वाजता दोन मिनिटांचं मौन पाळून राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यात आली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण केली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीप सिंह पुरी आणि लोकसभेचे सभापती ओम बिरला यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली अर्पण केली. राजघाटावर काल सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन इथं दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहिली. यावेळी ‘महात्मा गांधी यांच्या राजभवन भेटी या विषयावरचा माहितीपट दाखवण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महात्मा गांधीजींना अभिवादन केलं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या मुंबईतल्या टिळक भवन मुख्यालयात विशेष कार्यक्रम झाला.

****

राज्यातल्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी काही अपवाद वगळता काल शांततेत मतदान झालं. या पाच मतदारसंघात सरासरी ७२ टक्के मतदान झालं.  मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी ८६ टक्के मतदान झालं. औरंगाबाद जिल्ह्यात ८०, जालना ८२, परभणी ९०, हिंगोली ९१, नांदेड ८४, लातूर ८६, उस्मानाबाद ९२, तर बीडमध्ये ९० टक्के मतदान झालं. एकूण १४ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

कोकण शिक्षक मतदारसंघासाठी ९१ टक्के, नागपूर शिक्षक मतदारसंघात ८५ टक्के, नाशिक पदवीधर मतदार संघात ४९ पूर्णांक २८, तर अमरावती पदवीधर मतदार संघात ४९ पूर्णांक ६७ टक्के मतदान झालं. परवा दोन फेब्रुवारीला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या कामात हेतू पुरस्पर टाळाटाळ आणि हलगर्जीपणा करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोडचे तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे यांच्याविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात काल गुन्हा दाखल करण्यात आला. मंडळ अधिकारी कचरू तुपे यांनी दिलेल्या तक्रारी वरून ही कारवाई करण्यात आली.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही गटांनी काल पक्षाचं नाव आणि चिन्हासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लेखी युक्तिवाद सादर केला. शिंदे गटानं १२४ पानी तर ठाकरे गटानं ११२ पानी लेखी युक्तिवाद सादर केल्याचं सांगण्यात आलं. घटनेच्या दहाव्या अनुसूचीचा दाखला देत, शिंदे गटानं स्वेच्छेनं पक्ष सोडला आहे. त्यामुळे ते शिवसेनेच्या चिन्हावर दावा करु शकत नाहीत, अशी बाजू मांडून शिंदे गटाचा युक्तिवाद ऐकला जाऊ नये, अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे. शिंदे गटाने प्रतिनिधी सभेवर दावा ठोकला. प्रतिनिधी सभेतले १४४ लोक आमच्या बाजूनं आहेत, असं त्यांनी सांगितलं. यासह खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची यादी लेखी स्वरुपात सादर करण्यात आली.

****

वर्धा इथं येत्या तीन ते पाच फेब्रुवारी दरम्यान आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची प्रत्यक्ष सुरुवात उद्या सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या खंजिरी भजनानं होणार आहे. या संमेलनात  परिसंवाद, कथाकथन, निमंत्रितांचं कविसंमेलन, परिचर्चा, प्रकट मुलाखत, मुक्त संवाद, विशेष कार्यक्रम, खुले अधिवेशन असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

****

गुजरातमधल्या गांधीनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयानं एका शिष्येवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूला दोषी ठरवलं आहे. २०१३ मध्ये सुरतमधल्या दोन बहिणींवर बलात्कार केल्याचं हे प्रकरण आहे. या प्रकरणी न्यायालय आज शिक्षा सुनावणार आहे. आसाराम बापूचा मुलगा नारायण साई हा देखील या प्रकरणात आरोपी आहे. २०१३ मध्ये सुरतमधल्या दोन बहिणींनी आसाराम बापू आणि नारायण साई यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. आसाराम बापू सध्या जोधपूरच्या तुरुंगात आहे. २०१८ मध्ये, जोधपूर न्यायालयानं त्याला एका लैंगिक अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

****

मुंबई विद्यापीठ तसंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतंत्र निवड समित्या गठीत केल्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डी पी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठाची कुलगुरु निवड समिती गठीत करण्यात आली आहे, तर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विद्यापीठाकरिता कुलगुरु निवड समिती जाहीर करण्यात आली आहे.

****

राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त काल राज्यात ‘स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान २०२३ राबवण्यात आलं. कुष्ठरोगाविरुद्ध लढा देऊन, कुष्ठरोगाला इतिहास जमा करुयात हे यंदाचं घोषवाक्य आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत काल सार्वजनिक आरोग्य विभागानं महाराष्ट्र नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, लोक सेवा संगम यांच्या वतीनं स्पर्श कुष्ठरोग निवारण जनजागृती अभियान पदयात्रा काढली  होती.

परभणीत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल इथून सुरु झालेल्या खुल्या मॅरेथॉन स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवत उद्घाटन केलं.

उस्मानाबादमध्येही काल मॅरेथॉनचं  आयोजन करण्यात आलं होतं. यात ५० मुलं आणि ५० मुलींनी सहभाग नोंदवला.

****

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या वतीनं आज आणि उद्या हुरडा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या दोन दिवसात स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीनं पर्यटक निवास औरंगाबाद, लोणार, फर्दापुर या ठिकाणी हुरडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. स्थानिक बचत गट, शेतकरी यांच्यामार्फंत नाचणीचे वाळलेले खाद्य पदार्थांचे दर्जेदार प्रकार जसे की पापड, कुरडया, बिस्किटं पर्यटकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येतील. औरंगाबाद इथल्या महामंडळाच्या पर्यटक निवासात पौष्टिक तृणधान्यांचं प्रदर्शन आणि विक्री सुरु करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी दिली.

****

हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पाच गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केलं आहे. संघटितपणे गुन्हे करणार्या या पाच जणांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करूनही वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने ही कारवाई करण्यात आली. शेख अफरोज शेख गैबू, शेख मोसीन शेख गैबू, शेख शब्बीर शेख चाँद, शेख अजीस शेख चाँद, शेख वसीम शेख अजीस अशी त्यांची नावं असून, त्यांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश श्रीधर यांनी जारी केले.

****

शेत जमीन मोजण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातल्या मारुती घाटोळ या भूमापकासह त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल दुपारी ही कारवाई केली.

****

नांदेड जिल्ह्यात लिंबगाव इथं घेण्यात येणाऱ्या लाईन ब्लॉक मुळे परभणी- नांदेड दरम्यान धावणारी विशेष रेल्वेगाडी आज रद्द करण्यात आली आहे. सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी परभणी रेल्वेस्थानकावरुन ही रेल्वेगाडी सुटत असते.

****

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज मुरली विजय यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्यानं २००८ ते २०१५ या काळात ६१ कसोटी, १७ एकदिवसीय आणि नऊ टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

****

भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघादरम्यान  दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या तिरंगी टी - ट्वेंटी क्रिकेट मालिकेत काल भारतानं वेस्ट इंडीजचा आठ खेळाडू राखून पराभव केला. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. वेस्ट इंडिजच्या संघानं निर्धारित २० षटकांत सहा बाद चौऱ्याण्णव धावा केल्या. उत्तरादाखल भारतानं हे आव्हान चौदाव्या षटकांत दोन खेळाडुंच्या मोबदल्यात पार केलं. या मालिकेतला अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान येत्या गुरूवारी होणार आहे.

****

बीडमध्ये येत्या ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान १४ वर्षाखालील मुलांच्या गटासाठी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शैक्षणिक संस्था फुटबॉल संघटना तसंच फुटबॉल क्लब यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि येत्या सात तारखेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात प्रवेशिका पाठवाव्यात असं आवाहन संयोजकाच्यावतीनं केलं आहे.

****

महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त काल वाशिममध्ये रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. वाशिम जिल्हा रुग्णालयापासून, जिल्हा आरोग्य अधिकारी तसंच जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा कुष्ठरोग अधिकारी यांनी हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला प्रारंभ केला.

लातूर इथं देखील "रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन"मध्ये कुष्ठरोग विभागातले सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.

****