Wednesday, 25 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.01.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२५ जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रीय मतदार दिन आज साजरा होत आहे. 'मतदानासमान दुसरे काहीच नाही, मी नक्कीच मतदान करणार' ही या वर्षीच्या मतदार दिनाची संकल्पना आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्ली इथं राष्ट्रीय मतदार पुरस्कार २०२२ प्रदान करणार आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमाल प्रशासन आणि किमान शासन हा मंत्र दिला असून, त्याचं ध्येय नागरिकांचं आयुष्य सुकर करणं हे आहे, असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. मुंबईत ई-गव्हर्नन्स या विषयावरच्या दोन दिवसीय प्रादेशिक परिषदेत ते काल दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. डिजिटायझेशनमुळे कामकाजात सुलभता येते, खर्च कमी होतो, वेळ वाचतो आणि माहितीची बॅंक तयार होते, असंही त्यांनी सांगितलं.

****

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनापासून राज्यात महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानाला काल सुरुवात झाली. या अभियानांतर्गत या आणि पुढच्या वर्षी मिळून चौदा लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

****

परिक्षा पे चर्चा कार्यक्रमाअंतर्गत काल उस्मानाबाद मधल्या श्रीपतराव भोसले हायस्कुल आणि शरद पवार हायस्कुल इथं चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. तीन हजार २०० विद्यार्थ्यांनी हा स्पर्धेत सहभाग घेतला होता.

****

औरंगाबाद शहरातल्या अनधिकृत केबल्सबाबत कारवाई करत महानगरपालिकेनं काल शहरात विविध विद्युत खांबांवर टाकलेल्या एकूण ११ हजार ६८० मीटर लांबीच्या अनधिकृत केबल्स काढल्या. उच्च न्यायालयानं याबाबत दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिका प्रशासक अभिजीत चौधरी यांनी या मोहिमेसाठी नोडल अधिका-यांची नियुक्ती केल्यानंतर शहरातल्या तीन झोन्समध्ये ही कारवाई करण्यात आली. ही मोहीम येत्या तीस तारखेपर्यंत सुरू राहणार आहे.

****

राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत औरंगाबाद शहरात आज साप्ताहिक विशेष भरती मेळावा होत आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात चार कंपन्यांतर्फे एकूण सुमारे शंभर पदांची भरती होणार आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.08.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 16 August 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्र...