Friday, 31 March 2017

Audio - AIR News Bulletin, Aurangabad 31.03.2017 05.25pm

Text - AIR News Bulletin, Aurangabad 31.03.2017 05.25pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 31 March 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा - एनईईटी साठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा शिथील करण्यात आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं या परीक्षेसाठी उमेदवारांची वयोमर्यादा २५ वर्ष निश्चित केली होती. त्याविरोधात दाखल याचिकेवर सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं ही वयोमर्यादा पुढच्या शैक्षणिक वर्षापासून निश्चित करण्याचे निर्देश देत, या वर्षी २५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले इच्छुकही परीक्षेला पात्र असतील, असं स्पष्ट केलं आहे. परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदतही न्यायालयानं पाच एप्रिलपर्यंत वाढवून दिली आहे.

****
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी कर दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत सादर केलं. वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर सीमा शुल्क तसंच केंद्रीय उत्पादन शुल्क कायद्यानुसार वसूल करण्यात येणारा अधिभार या दुरुस्तीनंतर रद्द होणार आहे.

****
केंद्र सरकारनं एप्रिल ते जून या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांवरचे व्याजदर एक दशांश टक्क्यानं कमी केले आहेत. नवीन दरानुसार पीपीएफ अर्थात सार्वजनिक भविष्य निधी आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर सात पूर्णांक नऊ दशांश टक्के, किसान विकास पत्रावर सात पूर्णांक सहा दशांश टक्के, तर सुकन्या समृध्दी योजनेवर आठ पूर्णांक चार दशांश टक्के दरानं व्याज मिळेल. एक ते पाच वर्ष कालावधीच्या ठेवींवर सहा पूर्णांक नऊ दशांत ते सात पूर्णांक सात दशांश टक्के व्याजदर राहील.

****
विधीमंडळाची दोन्ही सभागृह संविधानानं तयार केलेली सार्वभौम सभागृह आहेत. त्यामुळे आमदारांना सभागृहाचा अवमान करणारं मत मांडता येणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. विधानसभा सदस्य अनिल गोटे यांनी केलेल्या विधानावर विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी आक्षेप घेत घोषणाबाजी केली, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते. सभागृहात सर्व सदस्यांचा सन्मान राखला जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

****
राज्य सहकारी बँकांमधील गैरव्यवहारांच्या जवळपास दोन हजार प्रकरणांची चौकशी वेळेत व्हावी यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करण्यात येईल, असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत प्रश्नोतराच्या तासात सांगितलं.

****
राज्याचा २०१७-२०१८ वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज विधासभेत आवाजी मतदानानं मंजूर झाला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात विनियोजन विधेयक मांडलं. विरोधकांच्या गैरहजेरीमुळे ते एकमतानं मंजूर झालं.

****
मनोधैर्य योजनेअंतर्गत देण्यात येणारी तीन लाख रुपयांची मदत दहा लाख रुपयांपर्यंत वाढवून देण्याचा प्रयत्न असल्याचं, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत सांगितलं. या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असंही त्या म्हणाल्या.
राज्यात बिअर बार तसंच मद्य विक्री केंद्रांना महापुरुष, गडकिल्ले आणि देवदेवतांच्या नावाचे फलक लावण्यास प्रतिबंध करणारा कायदा, येत्या पावसाळी अधिवेशनात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानपरिषदेत दिली.

****
राष्ट्रीय विधी आयोगाने शासनाकडे सादर केलेलं वकिल कायदा दुरुस्ती विधेयक संसदेत मांडू नये या मागणीसाठी आज वकिलांनी सर्वत्र काम बंद आंदोलन केलं. औरंगाबाद इथं जवळपास सर्वच विधीज्ञांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. धुळे तसंच कोल्हापूर इथंही वकिलांनी कामबंद आंदोलन केल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. बार कौन्सिलची निवडणूक लढवण्यासाठी किमान दहा वर्षांचा अनुभव असावा, वकीलांविरुध्द तक्रारींच्या चौकशीसाठी कौन्सिलच्या सदस्यांऐवजी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती आदी सुधारणा या विधेयकात सुचवल्या आहेत, त्यांना वकिलांचा विरोध आहे.

****
औरंगाबाद इथल्या सीटू कामगार संघटनेचे संस्थापक सदस्य कॉम्रेड छगन साबळे यांचं आज सकाळी औरंगाबाद इथं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते ६१ वर्षांचे होते. शहरातल्या रमानगर स्मशान भूमीत आज संध्याकाळी ६ वाजता त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****
लातूर आणि रेणापूर तालुक्यात सिंचन तसंच पेयजल पुरवठ्यासाठी मांजरा प्रकल्पातून नदीपात्रात विसर्ग करण्याची मागणी आमदार त्र्यंबक भिसे लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास, तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

****
मराठवाड्यात आज नांदेड इथं सर्वाधिक ४२ पूर्णांक पाच अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. परभणी इथं ४२ पूर्णांक तीन, औरंगाबाद तसंच बीड इथं ४१ अंश तर उस्मानाबाद इथं ३८ पूर्णांक सात अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

****

AIR News Bulletin, Aurangabad 31.03.2017 1.00pm

Text - AIR News Bulletin, Aurangabad 31.03.2017 1.00pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 March 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ मार्च २०१ दुपारी .००वा.

*****

राष्ट्रीय आरोग्य धोरणाची अंमलबजावणी होत असून, रोगापासून निरोगाकडे जाण्याचं सरकारचं ध्येय असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे. लोकसभेत यासंदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना ते आज बोलत होते. या धोरणाअंतर्गत देशभरात लसीकरणाचं प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा जास्त वाढवलं असून, विविध आजारांवरील लस उत्पादनही वाढवलं असल्याचं ते म्हणाले. मानसिक आजारांसंदर्भात देशभरात शंभर जिल्ह्यात सर्वेक्षण सुरु केलं असून, याद्वारे आजारांबाबत जनजागृती करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राज्यसभेत काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनी शून्यप्रहरात हानिकारक कीटकनाशक तसंच रासायनिक खतांच्या बेसुमार वापरावर नियंत्रण घालण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलण्याची मागणी केली.

लोकसभेत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लष्करानं संपादित केलेल्या शेतजमिनींचा मोबदला अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचा प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रात विद्यापीठ तसंच महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापकांना सहावा वेतन आयोगानुसार २००६ ते २०१० पर्यंतची थकबाकी त्वरित देण्यात यावी अशी मागणी भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाल शेट्टी यांनी शून्यप्रहरात केली.

भाजपचे खासदार महंत शंभुप्रसाद यांनी काश्मीरात सैन्यदलाच्या जवानांवर दगडफेक करणाऱ्या तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

गृहमंत्री राजनाथसिंह यांनी यासंदर्भात निवेदन देताना, सैन्य दलामार्फत योग्य कारवाई सुरू असल्याचं सांगतानाच, काश्मीरातल्या तरुणांनी दहशतवादी भूलथापांना बळी पडू नये, तसंच शांतता राखण्याचं आवाहन केलं.

****

अयोध्येतल्या राम मंदिर प्रकरणी तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. सुब्रहमण्यम स्वामी ही याचिका दाखल केली होती. याप्रकरणी दररोज सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली होती. स्वामी यांची या खटल्यात काय भूमिका आहे, असंही न्यायालयानं विचारलं आहे.

****

राष्ट्रीय तसंच राज्य महामार्गांच्या ५०० मीटर परिसरात मद्यविक्रीला बंदी घालणाऱ्या निर्णयाबाबत पुनर्विचार याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे. काल याबाबत झालेल्या सुनावणीदरम्यान, राष्ट्रीय महामार्गासाठी हा निर्णय योग्य असला तरी बहुतांश ठिकाणी राज्य महामार्ग नागरी भागातून गेले असल्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करणं शक्य नसल्याचं सांगत काही राज्यसरकारांनी ही याचिका दाखल केली आहे.

****

वैधमापनशास्र विभागानं महाराष्ट्रात सात पेट्रोलपंप जप्त करुन सहा वितरकांविरुद्ध खटले नोंदवले आहेत. पेट्रोलच्या मापात तूट करुन ग्राहकांची फसवणूक करत असल्याचं तपासणीमध्ये आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आली. राज्यातल्या सर्व पेट्रोलियम वितरकांची तपासणी करण्याचे आदेश अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिले आहेत.

****

जलवाहिनी फोडून बेकायदेशिररित्या पाणी घेणाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करुन फौजदारी कारवाई करण्यात येईल, सा  इशारा पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला आहे. काल विधानसभेत हिंगोली जिल्ह्यातल्या दाटेगाव पाणीपुरवठ्यासंदर्भात प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

****

संगणकातल्या प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटीमुळे बँक ऑफ महाराष्ट्राच्या खात्यांमधून यू.पी.आयच्या माध्यमातून सुमारे २५ कोटी रूपये अवैधरित्या हस्तांतरित करण्यात आल्याचं राष्ट्रीय देयकं महामंडळाकडून काल सांगण्यात आलं. खात्यामध्ये पैसे नसतांनाही हे पैसे पाठवले गेले असल्याचं महामंडळानं स्पष्ट केलं. सुमारे १९ बँकांमध्ये हे पैसे पाठवले गेले असून ते परत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं आणि या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष ए.पी. होटा यांनी सांगितलं.

****

प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा जास्तीत-जास्त प्रचार-प्रसार करत स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, असं हिंगोली जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक पी. आर. शिंदे यांनी म्हटलं आहे. जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा अग्रणी बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजन करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना मेळाव्यात ते बोलत होते. हिंगोली जिल्ह्यातल्या एक हजार २६८ लाभार्थ्यांना मुद्रा बँक योजनेतंर्गत सुमारे २० कोटी रुपयांचं कर्ज वितरण करण्यात आल्याचंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

//********//

AIR News Bulletin, Aurangabad 31.03.2017 10.00pm

Text - AIR News Bulletin, Aurangabad 31.03.2017 10.00pm


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

३१ मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयातून जुन्या पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा बदलण्यासाठीचा आजचा शेवटचा दिवस आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारनं या नोटांवर बंदी घालून त्या चलनातून बाद केल्या होत्या.

****

राज्यातल्या प्रत्येक कुटुंबाला हक्काचा निवारा मिळावा यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या एकत्रित सहभागातून महत्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतल्या प्रस्तावित प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करुन देणं, निविदा प्रकिया, प्रशासकीय मंजुऱ्या आदींची कामं निर्धारित वेळेत पूर्ण करुन योजनेला गती देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांसह नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.  मंत्रालयात यासंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठल आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. या योजनेसाठी निवडण्यात आलेल्या राज्यातल्या १४२ शहरांमधून प्रत्येकी किमान दोन प्रकल्प अहवाल एका महिन्याच्या आत सादर करण्यात यावेत, असं ते म्हणाले.

****

नांदेड ते मुगट दरम्यान आज सकाळी नऊ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही गाड्यांच्या वेळेत बदल झाला आहे. तर काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.

आदिलाबाद - नांदेड इंटर सिटी एक्स्प्रेस आज फक्त मुदखेड पर्यंतच धावेल. काचीगुडा - मनमाड पॅसेंजर निझामाबादहून दोन तास दहा मिनिटे उशीरा निघेल, तर मनमाड - काचीगुडा पॅसेंजर नांदेडहून २५ मिनिटे उशीरा सुटेल. काचीगुडा - नारखेड इंटर सिटी एक्स्प्रेस मुदखेडहून एक तास २५ मिनिटे तर नारखेड - काचीगुडा ही गाडी मालटेकडीहून १५ मिनिटे उशिरा सुटेल.

****

ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य नागरिकांसह महिलांनीही संघटीत होण्याबरोबरच कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेऊन शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन जालना जिल्ह्यातल्या भोकरदन विभागाचे उपविभागीय अधिकारी हरिशचंद्र गवळी यांनी केलं आहे. ग्रामस्थांसाठी आयोजित ग्रामसंवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालन, रेशीम उद्योग हे किफायतशीर आणि शाश्वत नफा देणाऱ्या जोडधंद्यांना शासनामार्फत अनुदान देण्यात येत असून, शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

****

AIR News Urdu Bulletin,Aurangabad. Date:31.03.2017 Time:8.40-8.45 AM


Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date- 31 March 2017
Time 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۳۱ ؍مارچ  ۲۰۱۷؁ء
وقت : صبح  ۴۰-۸ سے  ۴۵-۸

 وزیر خزانہ Sudhir Mungantiwarنے اعلان کیا ہے کہ ربیع کی فصلوں کی بیمہ رقم براہ راست کسا نوں کو ادا کی جائے گی۔
اِس سے قبل ضلع بینکوں اور سب رجسٹرار کو حکم دیا گیا تھا کہ ربیع کی فصلوں کی بیمہ رقوم میں سے 50؍ فیصد رقم قرض کھاتے میں وضع کی جائے ۔ حکو مت کے اِس فیصلے کی کل حزب اختلاف کے قائد دھننجئے مُنڈے اور دیگر رہنمائوں نے شدید مخالفت کی۔ اِس کے بعد وزیر مالیات نے یہ احکا مات واپس لیے جانے کا اعلان کیا۔
***************************
 مرکزی وزیر زراعت رادھا مو ہن سنگھ نے کسا نوں کی معا شی صورتحال بہتر بنا نے کے لیے اِسکیموں پر موثر عمل در آ مد کی ضرورت پر زور دیا ہے۔ کل لوک سبھا میں وقفۂ صفر کے دوران کانگریس کے رکن جیو تیر آ دتیہ سندھیا نے مراٹھواڑہ ،وِدربھ اور تلنگا نہ کے کسا نوں کی زبو ں حالی کی سمت توجہ مبذول کر وا تے ہوئے کسا نوں کے قرضہ جات کی معافی کا مسئلہ اٹھا یا۔ اِس کا جواب دیتے ہوئے وزیر زراعت نے کہا کہ حکو مت نے زر عی قرضہ جات پر بڑی رعایتیں دی ہیںاور قومی آفات سماوی فنڈ سے کسانوں کو امداد  دی گئی ہے۔
***************************
 ریاستی وزیر خزا نہSudhir Mungantiwarنے کہا کہ کسانوں کے قرضہ جات معاف کرنے اور سر کاری ملازمین کے لیے
7؍ ویں اجر تی کمیشن کے نفاذ کے تئیں حکو مت مثبت رویہ رکھتی ہے۔ کل قا نون ساز کونسل میں اپنے ایک بیان میں وزیر موصوف نے کہا کہ 7؍ ویں اجر تی کمیشن کے نفاذ سے سر کا ری خزا نہ پر21؍ ہزار500؍ کروڑ روپئے کا اضا فی بوجھ پڑے گا۔ اُنھوں نے بتا یا کہ مختلف اسکیموں کے تحت رقو مات براہ راست متعلقہ افراد کے بینک کھاتوں میں جمع ہونے کے عمل کے باعث ڈھائی ہزار کروڑ روپئے کے بچت ہو رہی ہے۔
***************************
 مرکزی حکو مت نے ہوابازی اسکیم کے تحت علاقا ئی ہوائی خد مات کے پہلے مر حلے کا کل اعلان کیا۔
اِس اِسکیم کے تحت ایک گھنٹے تک کے ہوائی سفر کے لیے45؍ ہوائی راستوں پر ڈھائی ہزار روپئے میں سفر کیا جاسکے گا۔ ہوائی جہاز میں مو جودہ پہلے مقررہ نشستوں کے لیے یہ سہولت رہیگی۔ بقیہ نشستوں کے لیے معمول کے مطا بق کرایہ ادا کرنا ہو گا۔ اِس اِسکیم میں مہا راشٹر کی ناندیڑ-ممبئی، ناندیڑ-حیدر آباد،  ناسک-ممبئی،  نا سک -پونا،  کولہاپور-ممبئی،  جلگائوں -ممبئی  اور شو لاپور-ممبئی  پر وازیں شامل ہیں۔
***************************
 راشٹر وادی کانگریس پارٹی کے سر براہ شرد پوار اور بی جے پی کے بزرگ قائد مُر لی منو ہر جو شی سمیت متعدد اہم شخصیات کو صدر جمہوریہ پر نب مکھر جی کے ہاتھوںکل پدم وِبھوشن اعزاز تقسیم کیئے گئے۔ اِس موقع پر لوک سبھا کے آنجہا نی اسپیکر پی ۔ اے۔ سنگما اور مدھیہ پر دیش کے آنجہا نی وزیر اعلیٰ سُندر لا ل پٹوا کو بعد از مرگ پدم وِبھو شن دیاگیا۔ اِسکے علا وہ ویراٹ کو ہلی، انورادھا پوڈوال ،شیف سنجیو کپور اور کیلاش کھیر کو بھی پدم ایوارڈ زدیئے گئے۔
***************************
 مسلم معا شرے میں تین طلاق اور ایک سے زائد شادی کے شرعی حقوق کو چیلنج کر نے والی در خواست کی سماعت عدالت عظمیٰ کی آئینی بینچ 11؍مئی سے ہونے والی گر می کی تعطیلات کے دوران کرے گی۔ چیف جسٹِس جے۔ ایس۔ کھیہر کی زیر صدارت دو رکنی بینچ نے کل اِس درخواست کی سماعت آئینی بینچ کے سپرد کر دی اور حکو مت کو اندرون دو ہفتے اپنا جواب جمع کرانے کا حکم دیا۔ گذشتہ 27؍ مارچ کو مسلم پر سنل لاء بورڈ نے اپنا موقف پیش کر تے ہوئے کہا کہ مسلمانوں کے شر عی حقوق کے جواز کو چیلنج کر نے والی یہ در خواست نا قابل سماعت ہے۔اورقر آن و حدیث کے مطا بق مسلم شرعی قوا نین کو آئین کی کسو ٹی پر نہیں پر کھا جا سکتا۔ اِس سے قبل عدالت عظمیٰ نے کہا تھا کہ تین طلاق اور دیگر امور سے متعلق قانونی پہلوئوں پر عدالت فیصلہ دے گی۔ اور اسلا می شریعت کے مطا بق دی گئی طلاق کی نگرا نی عدالت کرے یا نہ کرے یہ پا رلیمنٹ کے دائرہ کار میں آ تا ہے۔
***************************
 روز نا مہ اورنگ آ باد ٹائمز کی گولڈن جوبلی تقا ریب کے سلسلے میں کل سے صحا فت پر2؍روزہ سیمینار کا آ غاز ہوگا۔
 کریسنٹ ایجوکیشنل سو سائٹی ،قو می کونسل برائے فروغ اردو زبان اور مو لانا آزاد کالج کے اشترا ک سے ہونے والے اِس سیمینار کا افتتاح پرو فیسر ارتضیٰ کریم کے ہاتھوں عمل میں آئے گا۔ پروگرام کی صدا رت پدم شری فاطمہ زکر یا کریں گی۔ معروف تنقید نگار پروفیسر عتیق اللہ کلیدی خطبہ دیں گے۔ روضہ باغ میں آئی ایچ ایم ہال میں کل صبح 10؍ بجے اِس سیمینار کا افتتاح عمل میں آئے گا۔ سیمینار کے کنوینر خان مقیم خان ہونگے۔ جِس میں ملک بھر کے نامور صحا فی اور ادیب اپنے مقالے پیش کریں گے۔
***************************
 امراض قلب کے علاج میں استعمال ہونے والے اِسٹینٹ ،کیتھیڑ اور بلون جیسے طِبّی آلات و اشیاء کے لیے زائد قیمت وصول کر نے والے اسپتالوں کے خلاف سخت کار وائی کی جائے گی۔ یہ اعلان وزیر برائے تحفظ صا رفین گریش باپٹ نے کل قا نون ساز کونسل میں کیا۔
***************************

AIR News Bulletin, Aurangabad 31.03.2017 6.50am

Text - AIR News Bulletin, Aurangabad 31.03.2017 6.50am


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 March 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ मार्च २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      पिक विम्याची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना देणार; कर्ज कापून घेण्याचे आदेश रद्द

·      शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी योजनांच्या योग्य अंमलबजावणीची गरज - केंद्रीय कृषी मंत्री

·      प्रादेशिक विमान सेवेच्या उडान योजनेअंतर्गत ४५ नवीन मार्गांची घोषणा; नांदेड -मुंबई आणि नांदेड -हैदराबाद मार्गाचा समावेश

आणि

·      गोदावरी नदीच्या संवर्धनाची जबाबदारी राज्य सरकारचीच- मुंबई उच्च न्यायालय

****

रब्बी हंगामाच्या पीक विमा रकमेची संपूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल सांगितलं. रब्बी हंगामाच्या पीकविमा रकमेतून ५० टक्के रक्कम कर्ज खात्यात वळती करण्याचे आदेश जिल्हा बँक आणि सहनिबंधकांना यापूर्वी देण्यात आले होते. सरकारच्या या निर्णयाला काल विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह अनेकांनी विरोध केला, त्यानंतर अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी हे आदेश मागे घेण्यात येत असल्याची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम आणि भीती निर्माण झाली होती, यासाठी आपण हा निर्णय मागे घेत असल्याचं मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

****

शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधार करण्यासाठी योजनांची योग्य अंमलबजावणी होण्याची गरज केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहनसिंह यांनी व्यक्त केली आहे. काल लोकसभेत शून्यप्रहरात काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मराठवाडा, विदर्भासह तेलंगणातल्या शेतकऱ्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीकडे लक्ष वेधत, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला, त्यावर कृषी मंत्री बोलत होते. सरकारनं, कृषी कर्जावरच्या व्याज दरात मोठ्या प्रमाणावर सूट दिली, तसंच राष्ट्रीय आपत्ती कोषाच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना मदत केली असल्याचं, राधा मोहनसिंह यांनी सांगितलं. २००८ मध्ये तत्कालिन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतरही आत्महत्या कमी झाल्या नव्हत्या, याकडेही कृषीमंत्र्यांनी लक्ष वेधलं.

****

शेतकरी कर्जमुक्ती तसंच सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे, सातवा वेतन आयोग लागू केल्यानं, सरकारी तिजोरीवर २१ हजार ५०० कोटी रुपयांचा भार पडणार असल्याची माहिती त्यांनी काल विधान परिषदेत दिली. विविध योजनांचे पैसे लाभार्थींच्या थेट बँक खात्यात जमा होत असल्यानं, अडीच हजार कोटी रुपयांची बचत होत असल्याचं, त्यांनी सांगितलं.

****

केंद्र सरकारनं उडान योजनेअंतर्गत प्रादेशिक विमानसेवेच्या पहिल्या टप्प्याची काल घोषणा केली. यामध्ये एक तास अंतराच्या ४५ नवीन विमान मार्गांवर अडीच हजार रुपयात विमान प्रवास करता येणार आहे. विमानात उपलब्ध पहिल्या निम्या जागांसाठीच ही सवलत लागू असून, इतर जागांसाठी नियमित मूल्य मोजावं लागणार आहे. या योजनेत महाराष्ट्रातल्या नांदेड-मुंबई, नांदेड-हैदराबाद, नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे, कोल्हापूर-मुंबई, जळगाव-मुंबई आणि सोलापूर-मुंबई या मार्गांचा समावेश आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची बैठक घेऊन, अर्थसंकल्प तसंच जाहीरनाम्यातली आश्वासनं पूर्ण करण्याचे निर्देश दिले. काही खासदारांच्या कामात पंतप्रधानांनी सुधारणा सुचवत, सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली. राज्यात स्वच्छता मोहीम राबवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. यावेळी लोकसभेचे दिवंगत अध्यक्ष पी. ए. संगमा, मध्य प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांना मरणोत्तर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच विराट कोहली, अनुराधा पौडवाल, स्वामी निरंजनानंद सरस्वती, शेफ संजीव कपूर, कैलाश खेर यांना पद्म पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

गायक के. जे. येसुदास, अध्यात्मासाठी सदगुरू जग्गी वासुदेव, तर विज्ञान आणि अभियांत्रिकीसाठी उडिपी रामचंद्र राव यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले.

****

हृदय रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणारे स्टेंट, कॅथेटर, बलून या सारख्या उपकरणांसाठी रुग्णांकडून उत्पादन किमतीपेक्षा अधिक किंमत वसूल करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचा इशारा ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी काल विधान परिषदेत दिला. याप्रकरणी दोषींना सात वर्ष कारावासाच्या शिक्षेची तरतूद असल्याचं बापट यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थीनींचं लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना वारंवार घडत असून अशा प्रकारचं कृत्य करणारी कोणतीही व्यक्ती, शाळा, संस्था आढळल्यास त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. अशा घटनांची तक्रार विद्यार्थी, पालकांनी, कोणाच्याही दडपणाखाली न येता शासनाच्या संकेतस्थळावर, लोकप्रतिनिधी किंवा शिक्षण विभागाकडे करावी असं सांगून त्यासाठी लवकरच स्वतंत्र संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात येईल, सं शिक्षणमंत्री म्हणाले.

****

शिधा वाटप व्यवस्थेतील गैरप्रकार रोखण्यासाठी यापुढे प्रत्येक शिधा पत्रिकाधारकाला बायोमेट्रिक पद्धतीने शिधा वाटप केलं येणार असून त्यासाठी लवकरच बायोमेट्रिक यंत्रणा राबवली जाणार असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी काल विधानसभेत  दिली. बोगस शिधापत्रिका प्रकरणी स्वस्त धान्य दुकानावर कारवाईसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बापट बोलत होते.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयातून जुन्या पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा बदलण्यासाठीचा आजचा शेवटचा दिवस आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारनं या नोटांवर बंदी घालून त्या चलनातून बाद केल्या होत्या.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वांना घर या संकल्पनेला गती देण्यासाठी  राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी कमीत कमी दोन प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. या योजनेचा आढावा घेण्यासाठी दूरदृष्य संवाद प्रणाली द्वारे त्यांनी काल राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

****

अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसंदर्भातली चर्चा यशस्वी झाल्यामुळे राज्यातल्या अंगणवाडी सेविकांचा उद्यापासूनचा राज्यव्यापी संप मागे घेण्यात आला असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधना वाढ आणि इतर मागण्यासंदर्भात काल त्यांनी संघटनेसोबत चर्चा केली. येत्या दोन महिन्यात सर्व अंगणवाडी सेविकांचं मानधन नियमित देण्यात येणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं.

****

गोदावरी नदीतलं प्रदूषण रोखून संवर्धनाची जबाबदारी राज्य सरकारची असून ती टाळता येणार नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. गोदावरी प्रदुषणमुक्त करण्यासाठी दाखल याचिकेच्या सुनावणी दरम्यान सरकारनं निधीची अडचण असल्याचं न्यायालयात सांगितलं. यासंदर्भात निधी उपलब्ध करून देण्याची घटनात्मक जबाबदारी ही राज्य सरकारची असून गोदावरी संवर्धनाबाबत राज्याच्या मुख्य सचिवांनी १८ एप्रिलपर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

****

कोणत्याही परीस्थितीत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे या मुद्द्यावर शिवसेना ठाम  असल्याचं शिवसेना नेते रामदास कदम यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत शिवसेनेची बैठक झाली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि लोकप्रतिनिधींना देण्यात येणारा निधी यावर चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या मंत्र्यांचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं कदम यांनी सांगितलं.

****

शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुर्नगठन करण्याचं आश्वासन देणाऱ्या भारतीय जनता पक्षानं सत्तेवर येताच कर्जमाफी मिळणार नसल्याचा पवित्रा घेतला असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी विरोधकांनी काढलेली संघर्ष यात्रा काल बुटीबोरी इथं पोहोचली, त्यावेळी आयोजित जाहीर सभेत चव्हाण बोलत होते. शेतकऱ्यांनी आम्हाला हिंमत द्यावी आम्ही त्यांच्यासाठी लाठ्या काठ्या खाण्यास तयार असल्याचं चव्हाण यावेळी म्हणाले.

****

उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी लादलेली प्रवासबंदी उठवण्यासंदर्भात शिवसेना खासदारांनी काल लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची भेट घेतली. ही प्रवास बंदी उठवण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी आपला अधिकार वापरावा, अशी विनंती पक्षाच्या वतीनं करण्यात आली.

दरम्यान, खासदार रवींद्र गायकवाड आणि सुनिल गायकवाड यांच्यातल्या नामसदृश्यामुळे लातूरचे खासदार सुनिल गायकवाड यांना काल दिल्ली विमानतळावर अडवण्याची घटना घडली.

****

लातूर महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी काल तिसऱ्या दिवशी प्रभाग क्रमांक दोन मध्ये एका उमेदवाराने अर्ज दाखल केला.

//*******//

Thursday, 30 March 2017

News-based programme Dhwani Chitra 30.03.2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 30 March 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

संसदेनं वित्त विधेयक २०१७ ला आज मंजूरी दिली. काल राज्यसभेनं या विधेयकात, करदात्यांना अधिक अधिकार तसंच उद्योग क्षेत्राकडून राजकीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या देणग्यांवर नियंत्रण या दोन्ही तरतुदी रोखण्यासंबंधीच्या या सुधारणा सुचवून विधेयक लोकसभेकडे परत पाठवलं, या सुधारणा फेटाळून लावत, लोकसभेनं विधेयक मूळ स्वरूपात मंजूर केलं. २०१७ -१८ च्या अर्थसंकल्पाची प्रक्रिया यामुळे पूर्ण झाली आहे.

****

सरकारनं उडान योजनेअंतर्गत प्रादेशिक विमानसेवेच्या पहिल्या टप्प्याची आज घोषणा केली. यामध्ये एक तास अंतराच्या ४५ नवीन विमान मार्गावर अडीच हजार रुपयात विमानप्रवास करता येणार आहे. पहिल्या निम्या जागांसाठीच ही सवलत लागू असून, त्याव्यतिरिक्त जागांसाठी नियमित मूल्य मोजावं लागणार आहे. या योजनेत महाराष्ट्रातल्या नांदेड-मुंबई, नांदेड-हैदराबाद, नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे, कोल्हापूर-मुंबई, जळगाव-मुंबई आणि सोलापूर-मुंबई या मार्गांचा समावेश आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातल्या भाजप खासदारांची बैठक घेऊन, अर्थसंकल्प तसंच जाहीरनाम्यातली आश्वासनं पूर्ण करण्याचे निर्देश दिले. काही खासदारांच्या कामात पंतप्रधानांनी सुधारणा सुचवत, सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली. राज्यात स्वच्छता मोहीम राबवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

****

असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांसाठी येत्या दोन महिन्यात व्यापक योजना तयार करणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. असंघटीत कामगारांसाठी कल्याण महामंडळ स्थापन करण्याची आवश्यकता या विषयावर आज विधानसभेत चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. या संदर्भात कामगार मंत्रालयाला आवश्यक निर्देश दिले जातील, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

****

शेतकरी कर्जमुक्ती तसंच सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे, सातवा वेतन आयोग लागू केल्यानं, सरकारी तिजोरीवर साडे २१ हजार कोटी रुपयांचा भार पडणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विविध योजनांचे पैसे लाभार्थींच्या थेट बँक खात्यात जमा होत असल्यानं, अडीच हजार कोटी रुपयांची बचत होत असल्याचं, त्यांनी सांगितलं.

****

हृदय रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणारे स्टेंट, कॅथेटर, बलून या सारख्या उपकरणांसाठी रुग्णांकडून उत्पादन किमतीपेक्षा अधिक किंमत वसूल करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचा इशारा ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी आज विधान परिषदेत दिला. याप्रकरणी दोषींना सात वर्ष कारावासाच्या शिक्षेची तरतूद असल्याचं बापट यांनी सांगितलं.

****

साखर कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांसोबत वीज करार करण्यासंदर्भात बैठक घेऊन विचार करण्याचं आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं. शेकापचे जयंत पाटील यांनी यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात त्यांनी यासाठी कारखान्यांनी चार रुपये प्रतियुनीट दरानं वीज खरेदीचा प्रस्ताव दिला, तर तो मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल, असं सांगितलं.

****

शाळांमध्ये वाढत्या लैंगिक शोषणाच्या घटना रोखण्यासाठी राज्य शासनानं स्वंतत्र संकेतस्थळ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. यासाठी राज्य शासनानं १०३ नंबरवर हेल्पलाईन सुरु केली आहे, असं तावडे यांनी सांगितलं.

****

शेतकऱ्यांना पिकविमा भरपाईच्या रकमेतून बँकांनी कर्जवसुली करण्याच्या शासनाच्या आदेशावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आक्षेप घेत, ही वसुली तत्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना पिकविम्याच्या भरापाईपोटी मिळणाऱ्या रकमेतून कर्जवसुलीची रक्कम कापून घेण्याचे आदेश सहकार विभागानं बँकांना दिले आहेत. त्यासंदर्भातील नवीन आदेश २२ मार्च रोजी काढण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंडे विधान परिषदेत बोलत होते.

****

राज्यात आज अकोला इथं सर्वात जास्त ४४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. मराठवाड्यात औरंगाबाद, परभणी आणि बीड इथं ४१ अंश, तर उस्मानाबाद इथं ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी लादलेली प्रवासबंदी उठवण्यासंदर्भात शिवसेना खासदारांनी आज लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची भेट घेतली. ही प्रवास बंदी उठवण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी आपला अधिकार वापरावा, अशी विनंती पक्षाच्या वतीनं करण्यात आली.

****

AIR News Bulletin, Aurangabad 30.03.2017 1725

AIR News Bulletin, Aurangabad 30.03.2017 1.00pm

Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.03.2017 1.00pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 March 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० मार्च २०१ दुपारी .००वा.

*****

शेतकऱ्याच्या आर्थिक स्थितीत सुधार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं, केंद्रीय कृषी मंत्री राधामोहनसिंह यांनी म्हटलं आहे. आज लोकसभेत शून्यप्रहरात काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मराठवाडा विदर्भासह तेलंगणातल्या शेतकऱ्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीकडे लक्ष वेधत, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला, त्यावर कृषीमंत्री बोलत होते. सरकारनं, कृषी कर्जावरच्या व्याज दरात मोठ्या प्रमाणावर सूट दिली, तसंच राष्ट्रीय आपत्ती कोषाच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना मदत केली असल्याचं, राधामोहनसिंह यांनी सांगितलं. २००८ मध्ये तत्कालिन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं शेतकरी कर्जमाफी दिल्यानंतरही शेतकरी आत्महत्या कमी झाल्या नव्हत्या, याकडेही कृषीमंत्र्यांनी लक्ष वेधलं. शेतकरी विकासासाठीच्या योजनांची योग्य अंमलबजावणी होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

****

देशभरातले सर्व जुने जलविद्युत प्रकल्प अद्ययावत करणार असल्याचं, ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेनेचे रत्नागिरी सिंधुदूर्गचे खासदार विनायक राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगानं ते बोलत होते. कोयना प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीची आवश्यकता तसंच कोयना जलविद्युत प्रकल्पाचा पुढचा टप्पा कार्यान्वीत होण्याबाबतचा प्रश्न राऊत यांनी विचारला होता.

****

राजस्थानातल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी राजस्थान सरकारमधल्या मंत्र्यांनं केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज आज दहा मिनिटांसाठी तहकूब झालं. संयुक्त जनता दलाच्या खासदार कहकशां परवीन यांनी या वक्तव्याचा निषेध करत, संबंधित मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. काँग्रेस पक्षाच्या महिला सदस्यांनी या मागणीला पाठिंबा देत, सभापतींच्या आसनासमोर हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. यामुळे उपसभापतींनी कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित केलं.

कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर, संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी याबाबत बोलताना, संबंधित मंत्र्यांनी असं वक्तव्य केलं असेल, तर ते निंदनीय असल्याचं सांगत, सदनाच्या भावना राजस्थान सरकारकडे कळवल्या जातील, असं नमूद केलं.

****

मोठ्या रकमांच्या कर्जाची वसूली लवकरात लवकर व्हावी आणि थकबाकीदारांवर कारवाई व्हावी, या मागण्यांसाठी अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेनं येत्या २० एप्रिलपासून राष्ट्रीय पातळीवर मोहीम सुरु करण्याचा इशारा दिला आहे. बँकांमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या नावाखाली बॅंकांचं खाजगीकरण करण्याचा सरकारचा विचार असल्याचा आरोपही संघटनेनं केला.  

      दरम्यान, बँकांमधल्या विविध व्यवहारांवर अधिक सेवा कर आणि इतर शुल्क लावण्याच्या भारतीय स्टेट बँकेच्या निर्णयाला अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना आणि अखिल भारतीय बँक अधिकारी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. 

****

त्तरप्रदेशमधल्या महोबा रेल्वे स्थानकानजिक जबलपूर - निजामुद्दीन दिल्ली महाकौशल एक्सप्रेस या रेल्वे गाडीचे आठ डबे रूळावरून घसरून झालेल्या अपघातात जखमींची संख्या ३६ झाली आहे. आज पहाटे दोन वाजता हा अपघात झाला. या अपघाताची चौकशी करून दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

****

उत्तरप्रदेश सरकारनं राज्यातल्या परीक्षा केंद्रांची पाहणी करुन नक्कल होत असलेली १४ परीक्षा केंद्रं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नक्कल करणाऱ्या एक हजार ५०० विद्यार्थ्यांनाही निलंबित करण्यात आलं असून, ५७ परीक्षा केंद्रांवर पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. 

****

राज्यातल्या नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केलं आहे. मुंबई इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व जिल्हा रुग्णालयं आणि उपजिल्हा रुग्णालयात विशेष उपचार केंद्र सुरू केली आहेत, अशा रुग्णांना तत्काळ मदत मिळावी यासाठी १-०-७-७ आणि १-०-८ या क्रमांकावर हेल्पलाईन सुरु केली असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

अशासकीय अनुदानित महाविद्यालयात तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचे सन २०१५-१६ आणि २०१६-१७ या शैक्षणिक वर्षाचे वेतन मंजूर करण्यात आलं असून यासंबंधीचं पत्र औरंगाबाद विभागाच्या उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने सर्व संबंधीत महाविद्यालयांना पाठवलं आहे. तासिका तत्वावरील प्राध्यापकांचं वेतन मंजूर करण्यात यावं अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली होती.  

****

दिल्ली इथं सुरु असलेल्या इंडिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल आज उप उपान्त्य फरीतले सामने खेळणार आहेत. काल झालेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात सिंधूनं भारताच्याच अरुंधती पंटावनेला २१-१७, २१-६ असं पराभूत केलं. तर सायनानं चीनी तैपईच्या चिया सिन ली हिचा पराभव केला. उपउपान्त्य फेरीत सिंधूचा सामना जपानच्या साईना कुवाकामी हीच्याशी, तर सायनाचा सामना थायलंडच्या खेळाडूशी होणार आहे.

//******//

AIR News Bulletin, Aurangabad 30.03.2017 10.00am

Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.03.2017 10.00am


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

३० मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

सरकारी नोकऱ्यांमध्ये नोकरीसाठीची वयोमर्यादा विधवा, घटस्फोटित महिला आणि विभक्त महिलांसाठी ३५ वर्षांपर्यंत  शिथिल करण्यात आली आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या महिलांसाठी ही वयोमर्यादा ४० वर्षे इतकी आहे. कर्मचारी, तक्रार निवारण आणि  निवृत्ती वेतन विभागाचे मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी लोकसभेत ही माहिती दिली. “अ” आणि “ब” श्रेणीच्या नोकऱ्यांसाठीही वयोमर्यादेत ही शिथिलता १९९० सालापासून दिली जाते, मात्र त्यात स्पर्धा परिक्षांद्वारे थेट घेतल्या  जाणाऱ्या उमेदवारांचा समावेश नाही, असंही त्‍यांनी स्पष्ट केलं.

****

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या घराची भरपाई, केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे देण्यात येते. या रकमेत वाढ करण्याचा किंवा या कुटुंबाला पंतप्रधान आवास योजनेत समावेश करण्यात यावा असा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्यात येणार असल्याचं,  मदत आणि  पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी काल विधानसभेत सांगितलं. रायगड जिल्ह्यातल्या पुरग्रस्त कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यासंदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

****

नांदेड इथल्या श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयातल्या क्ष-किरण विभागाचं उद्घाटन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते काल करण्यात आलं. या रुग्णालयात तत्काळ पोलिस चौकी चालू करण्याचे निर्देशही काकाणी यांनी यावेळी दिले.

****

परभणी महानगरपालिकेच्या ६५ जागांसाठी येत्या १९ एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. मात्र कोणत्याच पक्षानं या ठिकाणी आपली उमेदवारी यादी जाहीर न केल्यानं अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवारानं आपलं नामनिर्देशनपत्र दाखल केलेलं नाही. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सर्वच पक्षांनी शहर विकास आघाडी स्थापन केल्यानं परभणी महानगरपालिका निवडणूकीसाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज येण्याची शक्यता व्यक्त होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्याचा अर्थसंकल्प २०१६-१७ अपेक्षापूर्ती संकल्प‘‘ या विषयावर उद्या, एकतीस तारखेला औरंगाबाद इथं एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात सकाळी साडे अकरा वाजता आयोजित या चर्चासत्रात मराठवाड्यातले नामवंत अर्थशास्त्रज्ञ आपले विचार मांडणार आहेत.

//****//


AIR News Urdu Bulletin, Aurangabd. Date:30.03.2017 Time:8.40-8.45 AM


Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date : 30 March 2017
Time : 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۳۰ ؍مارچ  ۲۰۱۷؁ء
وقت : صبح  ۴۰-۸ سے  ۴۵-۸

 اشیاء اور خد مات ٹیکس GST سے متعلق 4؍ بلوں کو کل لوک سبھا نے منظوری دیدی۔
قریب ساڑھے آٹھ گھنٹے تک ہوئی بحث کے بعد اِن بلوں کو منظوری دی گئی۔ لوک سبھا میں اِن بلوں کے منظور ہو جانے کے بعد ایک جو لائی سے ملک بھر میں ایک جیسا ٹیکس نظام نافذ کر نے کی راہ ہموار ہو گئی ہے۔ یہ 4؍ بل مرکزی GST، مجموعی GST،مرکزکے زیر انتظام علاقوں کا GST اور ریاستی نقصان بھر پائی GSTہیں۔
 بحث کے دوران اپو زیشن جماعتوں کی جانب سے تجویز کر دہ سبھی ترا میم مسترد کر دی گئی۔ اِس بل کو اقتصا دی بل کے طور پر پیش کیا گیا ہے اِسلئے اِسے راجیہ سبھا کی منظوری در کار نہیں ہو گی۔ بل پرہوئی بحث کے دوران بولتے ہوئے وزیر مالیات ارون جیٹلی نے کہا کہ GST قا نون کے تحت مرکز اور ریاستوں کے کاموں کی تقسیم طئے کی جا چکی ہے ۔ جیٹلی نے GSTکے نفاذ کے بعد اشیاء اور ساز و سا مان کی قیمتوں میں کمی ہونے کے امید ظاہر کی ۔   اِس بیچ راجیہ سبھا میں کانگریس کے رکن دِگ وجئے سنگھ اور بھارتیہ کمیونِسٹ پارٹی رہنما سیتا رام یچو ری نے مالیاتی بل2017؁ء میں اصلا حات تجویز کر تے ہوئے اُسے لوک سبھا میں واپس بھیجا ہے۔
***************************
 اتر پر دیش کے مہوبہ ریلوے اسٹیشن کے قریب جبلپور -نظام الدّین دِلّی مہا کوَشل ایکسپریس ٹرین کے 8؍ ڈبّے پٹری سے اتر گئے ۔
 آج علی الصبح 2؍ بجے کے قریب پیش آئے حادثے میں9؍ مسافروں کے زخمی ہونے کی خبر ہے۔ شمال وسطی ریلوے کے تعلقات عامّہ افسر نے یہ اطلاع دی ۔
***************************
 سپریم کورٹ نے کل ایک اہم فیصلے میں کل آلودگی کے لیے ذمہ دار بھارت اسٹیج تھری یعنیBS-3  انجن والی گاڑیوں کی فروخت اور اندراج پر پا بندی عائد کر نے کا حکم دیا۔ اِس فیصلے کا اطلاق ایک اپریل سے ہو گا۔ آٹو مو بائل کمپنیوںکی تنظیم نےBS-3  انجن نصب گاڑیوں کا ذخیرہ فروخت کرنے کی عدالت سے اجا زت مانگی تھی جسے عدالت نے نا منظور کر دیا۔ عدالت نے کہا کہ عوام کی صحت آٹو موبائل کمپنیوں کے فائدہ سے زیادہ اہمیت رکھتی ہے۔ اِس فیصلے کے بعد اب ملک میں صرف BS-4  اخراج کے معیار والی گاڑیاں ہی فروخت کی جا سکیں گی۔ مرکزی حکو مت نے ایک جنوری 2014؁ کو ہی اِس معاملے میںBS-4 معیار نافذ کرنے کی ہدا یت دی تھی جسکے خلاف آٹو مو بائل کمپنیوں نے عدالت کا در وازہ کھٹکھٹا یا تھا۔
***************************
 پونے میںCCTV کیمرے نصب کرنے کے بعد جرائم ثابت کرنے کی شرح میں ہوئے اضا فے کے بعد اورنگ آباد ،امرا وتی اور کلیان شہروں  میں بھی CCTV کیمرے لگائے جائینگے ۔ وزیر اعلیٰ  دیویندر پھڑ نویس نے کل قانون ساز اسمبلی میں یہ بات کہی۔ وزیر اعلیٰ نے کہا کہ اِس کام کے لیے 442؍ کروڑ روپئے مختص کئے گئے ہیں۔
***************************
نوٹ بندی کے بعد ضلع امدا دباہمی بینکوں کے پاس جمع ہوئے قریب44؍ ہزار کروڑ روپیوں کا معاملہ نیشنلِسٹ کانگریس پارٹی کے قو می صدر شرد پوار نے کل راجیہ سبھا میں اُٹھا یا۔ پوار نے کہا کہ ربیع کی فصل کے لیے تقسیم کیئے جانے والے قرض پر اسکا منفی اثر پڑیگا۔
***************************
 امدا باہمی اور مارکیٹِنگ کے ریاستی وزیر سبھاش دیشمکھ نے کہا ہے کہ پیاز اگا نے والے کسا نوں کو دی جا نے والی امداد میں اضا فہ کرنے سے متعلق تجویز ریاستی کا بینہ میں پیش کی جائے گی۔ ساتھ ہی پیاز بر آمد کرنے والے کسانوں کو نقل و حمل کے لیے دی جانے والی5؍ فیصد امداد کی مدت بڑھا نے سے متعلق مرکزی حکو مت کو تجویز روانہ کی جائے گی۔ سبھاش دیشمکھ نے کل قا نون ساز کونسل میں یہ بات کہی۔ ناسک ضلع کے ایو لہ میں ایک کسان کی جانب سے مناسب قیمت نہ ملنے کے بعد اپنی پیاز کی فصل کو آگ لگا دینے کے واقعے کے پس منظر میں پو چھے گئے سوال کا دیشمکھ جواب دے رہے تھے۔
***************************
 راشٹریہ سویم سیوک سنگھ کے سرسنگھ چالاک مو ہن بھاگوت نے کہا ہے کہ وہ صدر جمہوریہ کی دوڑ میں شامل نہیں ہیں۔
ناگپور میں کل صحا فیوں سے گفتگو کر تے ہوئے بھاگوت نے یہ وضا حت کی۔ اُنھوں نے کہا کہ RSS میں شمو لیت کے دوران ہی اُنھوں نے اپنے لیے دوسرے سبھی در وازے بند کر لیے ہیں جسکے بعد اسطرح کی کوئی تجویز پیش نہیں کی جا ئے گی۔ اور اگر پھر بھی ایسا ہوتا ہے تو وہ اُسے قبول نہیں کرینگے۔
***************************
 ہنر مندی کو فروغ دینے سے متعلق منصوبے، پر دھان منتری کوَشل وِکاس یوجناکے تحت مجوزہ400؍ مراکز میں سے100؍ مراکز قائم کئے جا چکے ہیں۔ ہنر مندی کے فروغ کے وزیر راجیو پر تاپ روڈی نے کل لوک سبھا میں یہ اطلاع دی۔ روڈی ہنگولی کے رکن پارلیمنٹ راجیو ساتوَ کی جانب سے پو چھے گئے سوال کا جواب دے رہے تھے۔ اُنھوں نے بتا یا کہ اگلے مہینے میں40؍ مراکز اور6؍ مہینے میں 250؍ مراکز قائم کر نے کی حکو مت کی کوشش ہے۔
***************************
 سابق وزیر اعلیٰ پر تھوی راج چو ہان نے کہا ہے کہ مشکل حالات سے گزر رہے کسانوں کو قرض معافی دینے تک وہ چین سے نہیں بیٹھیں گے۔ چوہان نے کل چندر پور ضلع سے شروع ہوئی شیتکریسنگھرش یاترا سے خطاب کر تے ہوئے یہ بات کہی۔ چندر پور ضلع کے سِندے واہی تعلقے کے پڑس گائوں سے اِس یاترا کی شروعات ہوئی ہے جہاں ایک کسان نے خود کشی کر لی تھی۔ یاترا میں کانگریس کے ریاستی صدر اشوک چو ہان، سابق نائب وزیر اعلیٰ اجیت پوار، شیتکری کامگار پارٹی، ریپبلِکن پارٹی ،سماج وادی پارٹی، جنتا دل یو نائیٹیڈ  اور دیگر سیاسی جماعتوں کے عہدیدار اور قریب 52؍ موجودہ اراکین اسمبلی شر کت کر رہے ہیں۔
***************************