Thursday, 30 April 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.04.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 April 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० एप्रिल २०२० सायंकाळी ६.००
****

Ø  देशात कोरोना बाधित रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण अकरा दिवसांवर तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण २५ पूर्णांक १९ शतांश टक्के
Ø  कोणत्याही रुग्णालयांनी रुग्णांना उपचार नाकारू नयेत- मुख्य सचिव अजोय मेहता यांचे निर्देश
Ø  दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या पार्थिव देहावर मुंबईत अंत्यसंस्कार
आणि 
Ø  औरंगाबाद शहरात आज दुपारपर्यंत २१ नवीन कोरोना बाधित रुग्ण
****

  देशात कोरोना बाधित रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण अकरा दिवसांवर गेलं असून, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण २५ पूर्णांक १९ शतांश टक्के एवढं झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या चोवीस तासात देशभरात एक हजार ७१८ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून, सध्या देशभरात २३ हजार ६५१ रुग्ण विविध रुग्णालयांमधून उपचार घेत आहेत. गेल्या चोवीस तासात ६३० रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत आठ हजार ३२४ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली.
 ****

 कोविड १९ च्या उपचार पद्धतीत बदल करण्यासंदर्भात निर्देश जारी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे अत्यवस्थ रुग्णांवरच्या उपचारात हायड्रॉक्सी क्लोरोक्विन आणि प्रतिजैविकांचा वापर घातक असू शकतो, यामुळे या उपचारावर आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर आज सुनावणीस आली. न्यायालय या संदर्भात तज्ज्ञ नसल्याने, काहीही निर्देश देऊ शकत नसल्याचं, तीन न्यायमूर्तींच्या पीठानं सांगितलं. या आजारावर सध्या कोणतीही ठोस उपचार पद्धत ज्ञात नसल्यामुळे, डॉक्टरांकडून विविध प्रकारे उपचारांचा प्रयत्न केला आहे. उपचाराबाबतचा आपला सल्ला, भारतीय वैद्यक संशोधन परिषद - आयसीएमआर कडे नोंदवावा, अशी सूचना न्यायालयानं याचिकाकर्त्यांना केली आहे.
        ****

 कोणत्याही रुग्णालयांनी रुग्णांना उपचार नाकारू नयेत, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले आहेत. अनेक खासगी दवाखाने तसंच सुश्रुषा गृहांकडून रुग्णांना निदान तसंच उपचार नाकारले जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. जे दवाखाने रुग्णांना उपचार नाकारतील, त्यांच्याविरोधात कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. दोन मे नंतर याबाबतचे आदेश लागू होणार असल्याचं, मेहता यांनी सांगितलं.
         ****

 लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, तसंच इतर नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी राज्य सरकारनं कार्यपद्धती निश्चित केली आहे. यासाठी सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील तसंच मंत्रालयातील नियंत्रण कक्षाद्वारे यावर देखरेख ठेवली जाणार आहे. सर्व यंत्रणांनी जबाबदारीने यासंदर्भात अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातल्या अडकलेल्या व्यक्तींची यादी संबंधित इतर जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवावी, परराज्यात अडकलेल्या नागरिकांच्या वाहतुकीसाठी दोन्ही राज्यांनी समन्वयानं वाहतुकीचा निर्णय घ्यावा, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अधिकृत पत्र असल्याशिवाय लोकांच्या कोणत्याही गटाला स्थलांतर करण्याची परवानगी दिली जाणार नाही. कोविड आजाराची लक्षणं असल्यास वाहतुकीची परवानगी दिली जाणार नाही, तसंच इतर राज्यांतून येणाऱ्यां सर्वांना चौदा दिवसांचा विलगीकरण अवधी पाळावा लागेल, असंही या वृत्तात म्हटलं आहे.
       ****

 दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या पार्थिव देहावर मुंबईतल्या चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कपूर कुटुंबातल्या सदस्यांसह उद्योजक अनिल अंबानी, अभिनेता अभिषेक बच्चन, सैफ अली खान तसंच चित्रपटसृष्टीतल्या मोजक्या कलाकारांनी यावेळी उपस्थित राहून, ऋषी कपूर यांना अखेरचा निरोप दिला. कपूर यांचं आज सकाळी मुंबईत खासगी रुग्णालयात निधन झालं, ते ६७ वर्षांचे होते. ऋषी कपूर यांच्या निधनाने आपण एका गुणी कलावंताला मुकलो आहोत अशी प्रतिक्रिया राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
    ****

        हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
    ****

 महाराष्ट्र दिन उद्या साजरा होत आहे. औरंगाबाद इथं उद्या महाराष्ट्र दिनाचं शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता हे ध्वजारोहण होणार आहे.

दरम्यान, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंमामपूर्व आढावा बैठक घेण्यात आली.
  ****

 खरीप हंगामापूर्वी बीड जिल्ह्यात विद्युत दुरुस्ती आणि रोहित्र वेळेवर उपलब्ध करून द्यावीत, तसंच मान्सूनपूर्व देखभाल दुरूस्तीची कामं त्वरित सुरू करावीत, अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे. वीज वाहतूक आणि वितरण प्रणाली सुरळीत करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही कामं त्वरित करण्यात यावी अशी मागणी क्षीरसागर यांनी राऊत यांना दिलेल्या पत्रात केली आहे.
   ****

 विद्यापीठ अनुदान आयोग - यूजीसीने विद्यापीठांच्या परीक्षांबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकार आणि विद्यापीठांना दिल्या असून त्याअनुषंगानं स्थापन केलेल्या कुलगुरुंच्या समितीची उद्या बैठक होणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीपाठोपाठ परवा होणाऱ्या कुलगुरूंच्या बैठकीनंतर  परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असंही सामंत यांनी सांगितलं. प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा एक ते १५ जुलै पर्यंत संपवाव्यात आणि बारावीनंतरचं नवीन शैक्षणिक वर्ष १ सप्टेंबर पासून सुरु करावं अशा सूचना यूजीसीने दिल्या असल्याचं सामंत यांनी सांगितलं.
 ****

 तूर खरेदीची मुदत ३१ मेपर्यंत वाढवण्याची मागणी राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. कोरोना विषाणूच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यात संचारबंदी लागू आहे. या कालावधीत अनेक शेतकऱ्यांना नाफेडच्या खरेदी केंद्रावर पोहोचणं शक्य होत नाही. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी बांधवांची अडचण लक्षात घेऊन ही मुदतवाढ द्यावी, असं ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांसह संबंधितांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. राज्यात तूर खरेदीची मुदत आज ३० एप्रिलला संपते आहे.
  ****

 औरंगाबाद शहरात आज दुपारपर्यंत २१ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. शहरातील नूर कॉलनी, कैलासनगर, चिकलठाणा, सावरकर नगर, किल्लेअर्क, जय भीमनगर, आसेफिया कॉलनी,  बेगमपुरा या परिसरातले हे रुग्ण असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. औरंगाबाद शहरातली एकूण रुग्णसंख्या आता १५१ झाली आहे.

 दरम्यान, औरंगाबाद शहरात कोरोना विषाणू बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व्यापारी महासंघानं शहरातला जुना आणि नवा मोंढा उद्यापासून तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी ही माहिती दिली आहे. या तीन दिवसांमध्ये हा संपूर्ण परिसर निर्जंतूक करण्यात येणार असून दुकानांचे मालक, कर्मचारी आणि हमाल बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचं काळे यांनी सांगितलं.
****

 कोरोना विषाणूमुळे लागू टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अडचण येऊ नये यासाठी उद्या १ मेच्या सुट्टीच्या दिवशीही लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने आपले सर्व बाजार व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीचे सभापती ललितकुमार शहा यांनी ही माहिती दिली.
****

 नांदेड शहरातील पीरबुऱ्हाणनगर भागातला रहिवासी असलेल्या ६४ वर्षीय कोरोनाग्रस्त रूग्णाचा आज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रूग्णावर २२ एप्रिल पासून उपचार सुरू होते. मधुमेह, अस्थमा यासह अनेक आजार असल्याने रूग्णाची प्रकृती उपचाराला प्रतिसाद देत नव्हती, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 धुळे इथं आज आणखी दोन रुग्णांचे कोरोना विषाणू चाचणी अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यात २८ वर्षीय तरुणाचा, आणि १९ वर्षीय तरुणीचा समावेश आहे.
****

 अहमदनगर इथं एका ३१ वर्षीय कोरोना बाधीत रुग्णाचे १४ दिवसानंतर घेण्यात आलेले दोन्ही चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या २५ झाली आहे.
****

 अमरावती शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता प्रशासनानं जिल्ह्यातल्या सरकारी आणि खासगी संस्थांच्या तेवीस इमारती ताब्यात घेतल्या असून या इमारतीमध्ये कोविड रुग्णालय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
****

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात त्यांना अभिवादन करण्यात आलं. कुलगुरू डॉ उध्दव भोसले यांनी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****

 लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक सुरेन्द्र अनंतराव पाठक यांचं आज सकाळी लातूर इथं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. लातूरच्या अष्टविनायक प्रतिष्ठानचे सचिव, तसंच सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालयाचे विश्वस्त म्हणूनही ते काम पाहात होते.
****

 नांदेडच्या सार्वजनिक बांधकाम विभागातले कर्मचारी वैजनाथ दांडगे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस अकरा हजार रूपयांचा निधी दिला आहे. आज त्यांनी आपला धनादेश नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला.
****

 चंद्रपूर महानगर पालिकेनं सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १७ जणांविरूद्ध तसंच मास्क न वापरणाऱ्या ३८६ नागरिकांवर कारवाई केली आहे. या नागरिकांकडून ७८ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

 दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळला नसून जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे.
*****
***

Audio - आकाशवाणी औरंगाबाद दि.30.04.2020 रोजीचे सायंकाळी 06.00 वाजेचे मराठी बातमी...

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 30.04.2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 April 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० एप्रिल २०२० दुपारी १.०० वा.
**** 
लॉकडाऊनमुळे राज्याच्या महसुलात एक लाख ४० हजार कोटी रुपयांची तूट पडण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज सामाजिक संपर्क माध्यमावरून जनतेशी संवाद साधत होते. या महसुली तुटीचा राज्यातल्या विकास कामांवरही विपरित परिणाम होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
या आर्थिक संकटाचा शेतीवर होणारा ताण कमी करण्यासाठी कृषी कर्जाची पुनर्रचना, अल्पमुदतीच्या कर्जाचं मध्यम तसंच दीर्घ मुदत कर्जात रुपांतर, कर्ज परतफेडीचे हप्ते लांबवणं, पीककर्जाचा व्याजदर शून्य टक्के करावा, असे अनेक उपाय पवार यांनी सुचवले. उद्योग तसंच व्यापाराचं अर्थकारण सावरण्यासाठी असेच अनुकूल निर्णय घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. लॉकडाऊन संपल्यानंतर बेरोजगारी आणि कुशल मनुष्यबळाचा प्रश्न बिकट होण्याची शक्यताही पवार यांनी वर्तवली आहे.
इरफान खान आणि ऋषी कपूर या दोन चतुरस्र अभिनेत्यांना पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
****
अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले ऋषी कपूर यांच्या निधनानं मनोरंजन क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याची भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केली. ऋषी कपूर यांच्या निधनानं चित्रपट सृष्टीतला दोन पिढ्यांमधला मार्गदर्शक दुवा निखळला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. ऋषी कपूर यांचं आज सकाळी मुंबईत एका खासगी रुग्णालयात निधन झालं, ते ६७ वर्षांचे होते.
****
मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोना विषाणू बाधित असलेल्या २६ रुग्णांचा मृत्यू झाला तर ४७५ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतली कोरोना विषाणूबाधितांची संख्या आता ६ हजार ६४४ वर पोहचली आहे. मुंबईत आतापर्यंत २७० जणांचा मृत्यू झाला आहे तर १९३ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ४२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
****
हिंगोली शहरात आज नवीन चार रुग्णांचा अहवाल सकारात्मक आला आहे. त्यात राज्य राखीव पोलीस दलातील तीन सैनिक तर राज्य राखीव दलाच्या जालना इथल्या कोरोनाबाधित सैनिकाच्या संपर्कातल्या नव्या एका व्यक्तीचा समावेश आहे. आजच्या सकारात्मक रुग्णांसह हिंगोली इथली कोरोना बाधित रुग्णांची संख्या २० झाली आहे.
****
परभणी जिल्ह्यात सेलू इथल्या कोरोना बाधित महिलेच्या कुटुंबातील ८ आणि संपर्कात आलेल्या २३ अशा ३१ जणांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. बाधित महिलेने परभणीत उपचार घेतलेल्या रुग्णालयातल्या तीस जणांचंही विलगीकरण करण्यात आलं आहे. या सर्वांचे लाळेचे नमूने औरंगाबाद इथल्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
****
धुळे इथं दाखल ७५ वर्षीय महिलेचा काल रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही महिला कोरोना विषाणू बाधित होती असं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद शहरामध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात आज कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. वैद्यकीय सेवा वगळता जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यातील सर्व दुकानं, शेती संदर्भातील दुकानं आणि इतर किरकोळ दुकानं तसंच बँकाही बंद आहेत. सर्व भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त असून रस्त्यांवर  शुकशुकाट असल्याचं चित्र दिसत आहे. आज आणि उद्या असा दोन दिवस हा कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.
****
नांदेड शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी अनोखी शिक्षा सुनावली आहे. शहरातील पोलीस कवायत मौदानाजवळच्या चौकात काम नसतांना भटकणाऱ्यांना पोलिसांनी उन्हात बसण्याची शिक्षा केली आहे.
****
अमरावती इथं आज ४ जणांचा कोरोना विषाणू चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. यामुळे अमरावती इथली रुग्णांची संख्या ३२ वर पोहोचली आहे.
दरम्यान, अमरावती महानगर पालिकेतर्फे नागरिकांना घरपोच फळ आणि भाजीपाला उपलब्ध करून देण्याऱ्या वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपाच्या चार प्रभागांमध्ये ही व्यवस्था करण्यात आली असून वाहन क्रमांक आणि मोबाईल क्रमांक नागरिकांना कळवण्यात आला आहे. नागरिकांना भाजीपाला विक्रेत्याशी थेट संपर्क साधून आपली मागणी नोंदवता येणार आहे.
****
नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आज आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आलं. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसंच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांनी आहार कसा घ्यावा, सामाजिक अंतर कसे ठेवावे याबाबत डॉक्टरांनी सविस्तर मार्गदर्शन केलं.
****
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
****

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक- 30.04.2020 दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 30.04.2020 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
 ३० एप्रिल २०२० सकाळी ११.०० वाजता
****
हिंदी चित्रपट सृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांचं आज सकाळी मुंबई इथं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर ते गेल्या सप्टेंबर महिन्यातच ते भारतात परतले होते. ऋषी कपूर यांनी बॉबी, सागर, प्रेमरोग, चांदनी, अग्निपथ, 101 नॉट ऑऊट, अशा अनेक हिंदी चित्रपटातून विविध भूमिका साकारल्या, शानदार या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, बॉबी या चित्रपटासाठी सर्वात्कृष्ट अभिनेत्याच्या फिल्मफेअर पुरस्कार याशिवाय फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे.
****
राज्यात गेल्या २४ तासात ५९७  कोरोना विषाणू बाधितांची वाढ झाली असून यात मुंबईत सर्वाधिक २७० रुग्ण आढळले आहेत. या वाढीव रुग्णांमुळे राज्यातली रुग्णसंख्या ९ हजार ९९७ एवढी झाली आहे. राज्यात २०५ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून १ हजार ५९३ रुग्ण बरे झाले असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद शहरात आज सकाळी १४ जणांचा कोरोना विषाणू चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. या नवीन रुग्णांपैकी अकरा जण पूर्वीच्याच बाधित क्षेत्रातले असून, प्रत्येकी एक रुग्ण कैलासनगर, चिकलठाणा आणि सावरकर नगर भागातला आहे. औरंगाबाद शहरातल्या कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांची संख्या आता १४४ झाली आहे.
****
अकोला शहरात सलग दुसऱ्या दिवशी आणखी पाच जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यामुळे अकोल्यातली एकूण रुग्णसंख्या २७ झाली आहे. यातील चौघे एकाच कुटुंबातील आहेत तर एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
****
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असताना खासगी वाहनातून सांगली जिल्ह्यात बेकायदा प्रवेश केल्याप्रकरणी मुंबईतील एका पोलिस उपनिरीक्षकासह चौघांविरोधात कासेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कुठलाही अधिकृत परवाना नसतांना मुंबईहून सांगलीकडे निघालेलं हे खाजगी वाहन पोलिसांनी अडवल्यावर देखील थांबलं नाही, त्यामुळे पोलीसांनी पाठलाग करत  हे वाहन थांबवून कारवाई केली.
****





आकाशवाणी औरंगाबाद दिनांक- 30.04.2020 सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

AIR News Urdu Bulletin, Aurangabad. Date : 30.04.2020, Time : 09.00 to 0...

Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date : 30 April 2020
Time:  09 : 00 to 09: 10 AM
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:   ٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗ۳۰ ؍  اپریل  ۲۰۲۰ئ؁
وَقت: صبح  ۰۰۔۹  سے  ۱۰۔۹؍ بجے 

 سب سے پہلے خاص خبروں کی سر خیاں...

        ٭  ملک کے کچھ اضلاع میں 4؍ مئی کے بعد لاک ڈائون میں نر می کی جائے گی۔ مرکزی وزارتِ داخلہ ٭  مختلف حصوں میں پھنسے ہوئے خانہ بدوش مزدوروں ‘ سیاح ‘ طلبہ اور دیگر افراد کو اُن کے مستقل       رہائشی مقام پر روانہ کرنے کی مشروط اجازت
 ٭ کورونا متاثرین کے علاج کے لیے پلازما تھیراپی کا پہلا تجر بہ کامیاب۔ وزیر صحت راجیش ٹو پے کا دعویٰ
 ٭  ریاست میں مزید597؍ افراد کورونا  وائرس کی زد میں   :  32؍ مریض چل بسے
 ٭اورنگ آ باد میں کورونا سے متاثرہ مزید 21؍ مریض پائے گئے ۔
 ٭ وزیر اعلیٰ نے قانون ساز کونسل میں خالی نشست پُر کرنے کے معاملے میں وزیر اعظم سے مداخلت        کرنے کی درخواست کی۔
 اور
 ٭  معروف اداکار عرفان خان نہیں رہے

  اب خبریں تفصیل سے....

 مرکزی حکو مت لاک ڈائون سے متعلق آئندہ 4؍ مئی سے نئے رہنما اصول جاری کرے گی ۔  اور کچھ اضلاع میں لاک ڈائون کی پا بندیوں میں نر می کی جائے گی۔وزارت ِ داخلہ نے کل لاک ڈائون کی موجودہ صورتحال سے متعلق ایک جامع جائزہ میٹنگ لی جس میں یہ معلو مات فراہم کی گئی۔ اِس حوالے سے  مزید تفصیلات آئندہ 2؍ روز میں جاری کی جا ئیں گے۔ 

***** ***** ***** 

 لاک ڈائون کی وجہ سے ملک کے مختلف حصوں میں پھنسے ہوئے خانہ بدوش مزدور ‘ سیاح ‘ طلبہ اور دیگر افراد کو اُن کے مستقل رہائشی مقام پر واپس بھیجنے کی مرکزی حکو مت نے مشروط اجازت دیدی ہے۔
وزارتِ داخلہ کی جانب سے کل اِس خصوص میں جاری کیے گئے حکم نامے میں کہا گیا ہے کہ پھنسے ہوئے افراداپنے پسندیدہ مقام پر پہنچنے کے لیے بس کا استعمال کریں‘  تا ہم اِس سے قبل بسوں کو جراثم سے پاک کر والیں‘   اور  دوران ِ سفر سما جی فاصلے کے ضابطے پر بھی عمل کریں۔اِسی طر ح ریاستوں سے کہا گیا ہے کہ ایک نوڈل آفیسر کا تقر ر کر کے اُس کی معرفت پھنسے ہوئی شہر یان کو اُن کی متعلقہ ریاست کے لیے روانہ کریں اِسی طرح دیگر ریاستوں میں پھنسے ہوئے شہر یان کو واپس لانے کا  بندوبست کریں۔
دونوں ریاستیں باہمی تال میل سے اِس کام کا لائحہ عمل طئے کریں۔ پھنسے ہوئے لوگوں کو نکالنے سے پہلے اُن کی طبی جانچ کروا نا لازمی ہے۔ اسی طرح اُن کے رہائشی مقام پر پہنچنے کے بعد مرکزی حکو مت کی ہدایات کے مطا بق اُنھیں اپنے اپنے مکانوں میں یا اِنسٹی ٹیوشنل کورنٹین کر نا لازمی ہو گا۔

***** ***** ***** 

 ریاستی وزیر صحت راجیشن ٹو پے نے کہا ہے کہ کورونا متاثرین کے علاج کے لیے پلازما تھیراپی کا پہلا تجر بہ کامیاب رہا ہے۔ اُنھوں نے بتا یا کہ ممبئی کے لیلا وتی ہسپتال میں یہ تجر بہ کیا گیا ہے اب دوسرے مریض کا بھی پلازما تھیرا پی  کے ذریعے علاج کیا جا رہا ہے۔ پی ٹی آئی کی خبر میں کہا گیا ہے کہ پلا زما تھیرا پی میں کورونا وائرس سے نجات پا چکے  مریض کے خون سے پلازما  لے کر کورونا متاثرہ مریض کے خون میں شامل کیا جا تا ہے۔ تاہم مرکزی وزارت برائے صحت کی جانب سے کہا گیا ہے کہ یہ طریقہ علاج کورونا متاثرین کے لیے موزو ہے اِس کا ابھی تک کوئی ٹھوس سند نہیں ہے۔

***** ***** ***** 

 ریاست میں کل مزید597؍ افراد کورونا وائرس کی زد میں آگئے ۔ جس کے ساتھ ہی مریضوں کی تعداد بڑھ کر9؍ہزار915؍ ہو گئی ہے۔ اورکل 32؍ کورونا مریضوں کی موت واقع ہو گئی جس کے بعد ریاست میں اب تک کورونا وائرس کے سبب فوت ہو نے والوں کی تعداد 432؍ ہو گئی ہے۔

***** ***** ***** 

 اورنگ آباد شہر میں کل کورونا وائرس سے متاثرہ مزید21؍ مریض پائے گئے ہیں۔جس کے بعد متاثرین کی تعداد 130؍ سے تجاوز کر گئی ہے۔ ضلع سول ہسپتال میں91؍ اور گھاٹی دواخانے میں10؍مریض زیر علاج ہیں۔ اورنگ آباد شہر میں اب تک 7؍ کورونا مریض جابحق ہوئے ہیں اور23؍ مریض علاج کے بعد مکمل طور پر صحت یاب ہو کر اپنے گھر جا چکے ہیں۔ شہر کے بائجی پورہ علاقے کی کورونا متاثرہ زچہ اور اُن کی نو مولود بیٹی کو بھی کل صحت یاب ہو جانے پر دواخانے سے رخصت دیدی گئی۔

***** ***** ***** 

 ضلع پولس سپرنٹنڈنٹ موکشداپاٹل نے اورنگ آ باد ضلع کے تمام دیہاتوں میں آئندہ 2؍ روز تک مکمل بند منا نے کا حکم دیا ہے۔ جس کے مطا بق 30؍ اپریل اور یکم مئی اِن 2؍ دنوں میں لازمی خد مات کو چھوڑ کر بقیہ تمام سر گر میوں پر سخت پا بندی ہوگی۔ اُنھوں نے حکم کی خلاف ور زی کرنے والے کے خلاف سخت کار وائی کا انتباہ دیا ہے۔ساتھ ہی اُنھوں نے عوام سے انتظامیہ کے ساتھ تعاون کرنے کی بھی اپیل کی ۔

***** ***** *****

 ہنگولی ضلعے میں کل کورونا سے متاثرہ مزید 2؍ مریض پائے گئے۔کل صبح اِن دو نوں مریضوں کی جانچ رپورٹ موصول ہوئی جس کے بعد ضلعے میں کورونا متاثرین کی تعداد بڑھ کر 16؍ ہو گئی ہے۔ مریضوں کی تعداد میں ہورہے اضافے کو مد نظر رکھتے ہوئے ضلع انتظامیہ نے 3؍ مئی تک پورے ضلعے میں تمام دکانیں بندرکھنے کا حکم دیا ہے۔

***** ***** ***** 

 پریس ٹرسٹ آف اِنڈیا کے مطابق  وزیر اعلیٰ اُدھو ٹھا کرے نے وزیر اعظم نریندر مودی سے قانون ساز کونسل میں خالی نشستوںپر تقرری میں مداخلت کرنے کی در خواست کی ہے۔ خبر میں کہا گیا ہے کہ ٹیلی فون پر بات چیت کرتے ہوئے وزیر اعلیٰ نے اُنھیں بتا یا کہ ریاست میں سیا سی عدم استحکام پیدا کرنے کی کوشش کی جا رہی ہے۔ لہذا وزیر اعظم اِس جانب توجہ دیں۔
 اِسی دوران ریاست میں کورونا وائرس کے سبب پیدا شدہ حالات سے متعلق بھی وزیر اعلیٰ اور وزیر اعظم کے در میان  بات چیت ہوئی۔ اور  وزیر اعظم نے ریاستی حکو مت کی جانب سے کیے جا رہے اقدامات کی تفصیلات حاصل کی۔ 

***** ***** *****
 یہ خبریں آکاشوانی اورنگ آ باد سے نشر کی جا رہی ہیں
***** ***** ***** 

 ہندی اور انگریزی فلموں کے معروف اداکار عر فان خان کا کل صبح ممبئی میں انتقال ہو گیا۔ وہ54؍ برس کے تھے۔ عر فان خان نے متعدد ہندی اور انگریزی فلموں میں اپنے فن کے جو ہر دکھائے۔ اُنھیں پدم شری اعزاز کے علا وہ فلم پان سنگھ تو مر میں نبھا ئے گئے مرکزی کر دار کے لیے فلموں کے قومی اعزاز سے بھی سر فرا ز کیا گیا تھا۔سال2018؁ میں سر طان کی تشخیص ہونے پر علاج کے لیے وہ بیرون ملک چلے گئے تھے۔ صحت یاب ہو کر وطن واپس آنے کے بعد منظر عام پر آئی اُن کی فلم انگریزی میڈیم عرفان خان کی زندگی کی آخری فلم ثابت ہوئی۔ کل صبح طبیعت خراب ہو نے پر اُنھیں ممبئی کے کوکیلا بین ہسپتال میں داخل کیا گیا تھا۔ جہاں دورانِ علاج اُن کی وفات ہو گئی۔
 مرکزی وزیر برائے اطلاعات و نشر یات پر کاش جائوڑیکر نے عر فان خان کی موت پر گہرے رنج و غم کا اظہار ہے۔ اپنے تعزیتی پیغام میں وزیر موصوف نے کہا کہ ہم ایک ہمہ جہت اداکار سے محروم ہو گئے ہیں۔
 عر فان خان کے انتقال پر صدر جمہوریہ رام ناتھ کو وِند نے دکھ کا اظہار کیا ہے ۔ اُنھوں نے کہا کہ عرفان خان کی موت سے نہ صرف فلمی دنیا بلکہ فلمی شائقین کا بھی بڑا نقصان ہوا ہے۔
 وزیر اعظم نریندر مودی نے بھی عر فان خان کو خراج تحسین پیش کرتے ہوئے کہا کہ عرفان خان اپنے مختلف کرداروں کے ذریعے ہمیشہ یاد رہیں گے۔
 گورنر بھگت سنگھ کوشیاری  اور  وزیر اعلیٰ اُدھو ٹھا کرے نے بھی عر فان خان کی وفات پر دکھ کا اظہار کیا۔ وزیر اعلیٰ اُدھو ٹھا کرے نے کہا کہ عرفان خان کا بالی ووڈ سے ہالی ووڈ تک کا سفر نئے اداکاروں کے لیے ایک مثال ہے۔

***** ***** ***** 

 وزیر توانائی نتن رائوت نے کہا ہے کہ ریاست میں تینوں بجلی سپلائی کمپنیوں اور  بجلی کے ریگو لیٹری کمیشن کے باہمی اتفاق سے بجلی کے نرِ خ میں کی گئی کمی کے فیصلے کی وجہ سے ریاست میں صنعت اور کاروبار کو بڑے پیمانے پر فروغ  ملے گا۔ وہ کل زوم ایپ کے توسط سے منعقدہ اخباری کانفرنس میں اظہار خیال کر رہے تھے۔ اِس موقعے پر انھوں نے بحیثیت ِ وزیر توانا ئی کیے گئے تمام اہم فیصلوں کی بھی تفصیلات پیش کی۔

***** ***** ***** 

 ریپبلیکن پارٹی کے قو می صدر اور مملکتی وزیر برائے سماجی انصاف رام داس آٹھو لے نے کہا ہے کہ دِن رات کورونا وائرس کے خاتمے کے لیے کوشاں ڈاکٹرس‘ نرسیس‘ دیگر طبی ملازمین‘ پولس ملازمین اور میونسپل کار پوریشن کے صفائی ملازمین کی تنخواہوں میں کسی قسم کی کوئی تخفیف نہ کی جائے۔

***** ***** ***** 

 مراٹھواڑہ گریجویٹ حلقہ ٔ  انتخاب کے رکن اسمبلی ستیش چو ہان نے وزیر اعلیٰ اُدھو ٹھا کرے سے مطالبہ کیا ہے  کہ ا گر ریاستی حکو مت 3؍ مئی کے بعد لاک ڈائون کی معیاد میں اضا فہ کر نا چاہتی ہے تو دیگر اضلاع میں پھنسے ہوئے طلبہ  اور  اسا تدہ سے متعلق مثبت فیصلہ کر یں۔اُنھوں نے کہا کہ پونا اور اورنگ آبادجیسے شہروں میں دیہی علاقوںکے کئی طلبہ  اِسی طرح ریاست کے مختلف ضلع پریشدوں میں ہزاروں اساتدہ اپنے وطن سے سینکڑوں کلو میٹر دور پھنسے ہوئے ہیں۔  ستیش چو ہان نے مطالبہ کیا کہ ایسے طلبہ ‘ اسا تدہ اور دیگر شہر یان کو 2؍ دن کا وقت  دے کر اپنے اپنے گائوں واپس جانے کی اجازت دی جائے۔

***** ***** ***** 

 لاتور ضلعے میں نام فائونڈیشن کی جانب سے 600؍ ضرورت مند افراد میں کرانہ کٹس تقسیم کیے گئے۔ نام فائونڈیشن کے سر براہ نانا پاٹیکر‘ مرکند اناس پورے اور راجہ بھائو شیڑ کے کی جانب سے یہ سامان عطیہ کیا گیا۔ اِسی طرح پر بھنی ضلعے میں مانوت شہر کے حمال واڑی علاقے میں بھی نام فائونڈیشن اور گیان سادھد نا فائونڈیشن کی جانب سے120؍ کنبوں میں اناج تقسیم کیا گیا۔

***** ***** ***** 

 نشہ آور گولیاں فروخت کرنے والا ملزم جو سٹی چوک پولس کی حراست میں ہے اُس میں بھی کورونا وائرس کی علا مات پائی گئی ہیں۔ جس کی وجہ سے متعلقہ پولس اسٹیشن کے 20؍ ملازمین کو کورنٹین کر دیا گیاہے۔  پولس انسپکٹر  سنبھا جی پوار نے بتا یا کہ  اِن تمام کے بلغم کے نمو نوں کی جانچ کی جا رہی ہے۔
 اِسی دوران اورنگ آ باد کے چھائو نی علاقے میں واقع ایک بیکری کا ملازم کورونا وائرس سے متاثر ہو نے کی خبر جھو ٹی ہے۔ چھائو نی بورڈ کے چیف ایکزیکیٹو آفیسر  وِکرانت مورے نے اِس خصوص میں ایک مکتوب جاری کرکے بتا یا کہ یہ خبر بے بنیاد ہے۔ 

***** ***** *****



 آخر میں اِس بلیٹن کی خاص خاص خبریں ایک مرتبہ پھر سن لیجیے

  ٭  ملک کے کچھ اضلاع میں 4؍ مئی کے بعد لاک ڈائون میں نر می کی جائے گی۔ مرکزی وزارتِ داخلہ ٭  مختلف حصوں میں پھنسے ہوئے خانہ بدوش مزدوروں ‘ سیاح ‘ طلبہ اور دیگر افراد کو اُن کے مستقل       رہائشی مقام پر روانہ کرنے کی مشروط اجازت
 ٭ کورونا متاثرین کے علاج کے لیے پلازما تھیراپی کا پہلا تجر بہ کامیاب۔ وزیر صحت راجیش ٹو پے کا دعویٰ
 ٭  ریاست میں مزید597؍ افراد کورونا  وائرس کی زد میں   :  32؍ مریض چل بسے
 ٭ اورنگ آ باد میں کورونا سے متاثرہ مزید 21؍ مریض پائے گئے ۔
 ٭ وزیر اعلیٰ نے قانون ساز کونسل میں خالی نشست پُر کرنے کے معاملے میں وزیر اعظم سے مداخلت        کرنے کی درخواست کی۔
 اور
 ٭  معروف اداکار عرفان خان نہیں رہے

 علاقائی خبریں ختم ہوئیں۔

 اپنے گھروں میں رہیں‘ اور کورونا وائرس کے اثر سے محفوظ رہنے کے لیے احتیاطی ہدایات پر عمل کریں۔ اور سنتے رہیے آکاشوانی اورنگ آباد۔
٭٭٭٭٭

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 30.04.2020 TIME – 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 April 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक३० एप्रिल २०२० सकाळी ७.१० मि.
****
** चार मे पासून देशातल्या काही जिल्ह्यांना टाळेबंदीतून सूट दिली जाणार- केंद्रीय गृह मंत्रालय  
** विविध भागात अडकलेले स्थलांतरीत मज, पर्यटक, विद्यार्थी आणि इतरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी सशर्त परवानगी
** कोरोना विषाणूग्रस्तावर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग यशस्वी झाल्याचा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा दावा
** राज्यात आणखी ५९७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण; ३२ जणांचा मृत्यू
** औरंगाबाद शहरात २१, उदगीरमध्ये चार, हिंगोलीत दोन तर जालना आणि परभणीत प्रत्येकी एक रूग्ण
**  विधानपरिषदेच्या रिक्त जागेवर नियुक्ती करण्यासंदर्भात हस्तक्षेप करण्याची मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती
**आणि
** प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचं निधन 
****
केंद्र सरकार टाळेबंदीसंदर्भात चार मे पासून नव्यानं मार्गदर्शक सूचना जारी करणार असून, काही जिल्ह्यांना टाळेबंदीतून सूट दिली जाणार आहे. गृह मंत्रालयानं काल टाळेबंदीच्या स्थितीसंदर्भात व्यापक आढावा बैठक घेतली, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. याबाबत सविस्तर सूचना येत्या एक दोन दिवसात जारी केल्या जाणार आहेत. टाळेबंदीमुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. तीन मे पर्यंत सर्वत्र टाळेबंदीची कडक अंमलबजावणी केली जावी, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
टाळेबंदीमुळे देशाच्या विविध भागात अडकलेले स्थलांतरीत मज, पर्यटक, विद्यार्थी आणि इतरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी काही अटींवर केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. अडकलेल्या लोकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवताना बसेसचा वापर करावा, तत्पूर्वी या बसेसचं निर्जतुंकीकरण करून घ्यावं तसंच प्रवासादरम्यान एकमेकांपासून अंतर राखण्याच्या नियमाचं पालन करावं अशा अटींवर ही सशर्त परवानगी देण्यात येत असल्याचं गृह मंत्रालयानं काल जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे. विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी राज्यांनी अगोदर एक नोडल प्राधिकारी नियुक्त करावा आणि त्यानंतर त्या प्राधिकाऱ्यामार्फत या लोकांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची आणि बाहेरच्या राज्यात अडकलेल्या आपल्या राज्यातल्या लोकांना आणण्याची व्यवस्था करावी, असं गृहमंत्रालयाच्या या आदेशात म्हटलं आहे. दोन्ही राज्यांनी एकमेकांशी चर्चा करून या लोकांच्या प्रवासासंबधीचा तपशील निश्चित करावा. अडकलेले लोकं जिथं असतील तिथं त्यांची वैद्यकीय तपासणी करून मगच त्यांना पाठवावं, आणि ते त्यांच्या गावी पोचल्यानंतर केंद्र सरकारच्या दिशा निर्देशांनुसार त्यांना घरी किंवा संस्थात्मक विलगीकरणात ठेवावं, असं गृह मंत्रालयानं सांगितलं आहे.
दरम्यान, राज्यात अडकलेल्या स्थलांतरित मजूरांना नियोजनबद्ध पद्धतीनं त्यांच्या गावी पाठवण्यासाठी राज्य सरकार इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. ही चर्चा पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या मजुरांना परत पाठवण्याबाबतचा निर्णय जाहीर करतील, असं त्यांनी सांगितलं
****
केंद्र सरकारनं बड्या थकबाकीदारांपैकी कोणाचंही कर्ज माफ केलेलं नसून, कर्ज बुडव्यांविरोधात कारवाई केली जात असल्याचं, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे. वसूल न झालेल्या कर्जाच्या रकमा एका ठराविक कालमर्यादेनंतर बँकांकडून ताळेबंदातून निर्लेखित केल्या जातात. मात्र याचा अर्थ ते कर्ज माफ केलं असा होत नाही, असं जावडेकर यांनी म्हटलं आहे. नीरव मोदी तसंच विजय मल्ल्या यांच्याविरोधात कारवाई सुरू आहे. त्यांच्या थकबाकीचा एक मोठा हिस्सा वसूल झालेला आहे, आणि उर्वरित रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं.
****
कोरोना विषाणूग्रस्तावर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग यशस्वी झाला असल्याचं, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात ही चाचणी करण्यात आली असून, आता दुसऱ्या रुग्णावर पुन्हा प्लाझ्मा थेरपीने उपचार केले जात असल्याचं टोपे यांनी सांगितलं. या उपचार पद्धतीत कोरोना विषाणूमुक्त झालेल्या रुग्णाच्या रक्तातून प्लाझ्मा हा घटक घेऊन, तो कोरोना विषाणू बाधिताच्या रक्तात सोडला जातो, असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. मात्र ही पद्धत कोरोना विषाणू ग्रस्तावर उपचारासाठी वापरावी, याचा अद्यापतरी काहीही ठोस पुरावा नसल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
राज्यात काल आणखी ५९७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्णांचा आकडा नऊ हजार ९१५ झाला आहे. काल या आजारानं राज्यात ३२ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ४३२ इतकी आहे.
****
औरंगाबाद शहरात काल दिवसभरात २१ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले असून, एकूण रुग्ण संख्या १३० वर पोहोचली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात ९१, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीत १० बाधितांवर उपचार सुरु आहे. औरंगाबादमध्ये आतापर्यंत सात जणांचा या आजारानं मृत्यू झाला, तर २३ जण बरे होऊन घरी परतले आहेत.
शहरातल्या बायजीपुरा इथल्या कोरोना विषाणू बाधित महिलेची काही दिवसांपूर्वी प्रसुती झाली होती, या महिलेला तसंच तिच्या बाळाला काल घरी सोडण्यात आलं. शहरात आतापर्यंत एकूण २४ रूग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आलं असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं.   
दरम्यान, नशेच्या गोळ्या विक्री प्रकरणी शहरातल्या सिटीचौक पोलिस ठाण्यात अटकेत असलेल्या आरोपीचाही कोरोना विषाणू बाधितांमध्ये समावेश आहे. त्यामुळे या पोलिस ठाण्यातल्या २० कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं असून, या सर्वांच्या लाळेच्या नमुन्यांची चाचणी करण्यात येत असल्याचं पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातला ग्रामीण भाग पुढचे दोन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिले आहेत. आज आणि उद्या एक मे या दोन दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता कडक टाळेबंदीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी रस्त्यावर न येता, पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन पाटील यांनी केलं आहे.
दरम्यान, औरंगाबाद इथल्या छावणी परिसरात एका बेकरीतल्या कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं वृत्त निराधार आहे. याबाबत सामाजिक संपर्क माध्यमावरून चुकीची बातमी फिरत असल्याचं निदर्शनास आलं आहे. छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी याबाबत एक पत्र जारी करून, हे वृत्त निराधार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं काल चार जण कोरोना विषाणू बाधित आढळून आले. हे चौघे जण मृत्यू झालेल्या कोरोना विषाणू बाधित महिलेच्या संपर्कातले आहेत. त्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या एकूण बाधितांची संख्या सात झाली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात काल आणखी दोन नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यापैकी एक विशेष राखीव पोलिस दलाचा सैनिक असून, दुसरा रुग्ण बार्शी इथून आलेला आणि वसमत इथं विलगीकरण कक्षात असलेला २१ वर्षीय तरुण आहे. काल सकाळी या दोघांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या सोळा झाली आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं तीन मे पर्यंत जिल्ह्यातली सर्व दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संचारबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याबाबत तसचं घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या पारध इथल्या एका सतरा वर्षीय मुलीला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यात बाधितांची संख्या तीन झाली आहे. बाधित तरुणी दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर या तरुणीच्या लाळेचे नमुने प्रयोग शाळेकडे पाठवण्यात आले होते. ही मुलगी  गुजरात राज्यातल्या सुरतहून आपल्या नातेवाईकांसह पारधला पोहचली होती, मात्र ग्रामस्थांनी त्यांना जिल्हा  सरकारी रुग्णालयात पाठवलं होतं.
दरम्यान जिल्हा रुग्णालयात १६ दिवस उपचार घेतल्यानंतर, परतूर तालुक्यातल्या शिरोडा इथल्या महिलेला काल कोरोना विषाणूमुक्त झाल्यावर सुट्टी देण्यात आली. विलगीकरण कक्षातून बाहेर आल्यानंतर डॉक्टर, परिचारिकांनी या महिलेचं टाळ्या वाजवून आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. योग्य उपचार तसंच डॉक्टर, परिचारिकांनी धीर दिल्यानं आपण ही लढाई जिंकल्याची भावना या महिलेनं व्यक्त केली.
दरम्यान, दु:खीनगर भागातल्या कोरोना विषाणू मुक्त झालेल्या महिलेला रुग्णालयातून घरी पाठवण्याबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल, असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलूच्या इथल्या ५५ वर्षीय महिला नांदेड इथं उपचारादरम्यान कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचं काल स्पष्ट झालं. सदर महिला गंभीर आजारानं ग्रस्त असल्यानं सुरवातीला उपचारासाठी औरंगाबादला आली होती, त्यानंतर २६ एप्रिल रोजी सेलूत येऊन दोन दिवस कुटुंबियांसोबत राहून, ती पुन्हा उपचारासाठी नांदेडला गेली होती. नांदेड इथं उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोना विषाणू तपासणी केली असता, ती बाधित असल्याचं आढळून आलं. परभणी जिल्हा प्रशासनानं सेलुत आरोग्य पथकं पाठवली असून, संचारबंदी लागू केली आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्यानं जिल्ह्यात कोरोना विषाणू बधितांची संख्या २४९ झाली आहे. केवळ मालेगाव इथल्या बधितांची संख्या २२६ इतकी आहे. काल नाशिक शहरात एक रुग्ण वाढल्यानं शहरातल्या बधितांची एकूण संख्या ११ झाली आहे. तर येवला इथं एक जण बाधित असल्याचं आढळलं आहे.
****
राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचारासाठी सरकारनं रुग्णालयांची त्रिस्तरीय व्यवस्था केली आहे. सौम्य, मध्यमस्तरीय आणि गंभीर स्वरूपाच्या रुग्णांसाठी ही व्यवस्था असणार असल्याची माहिती आरोग्य सेवा आयुक्त डॉ. अनुप कुमार यादव यांनी दिली आहे. ते म्हणाले

पूर्ण राज्यामध्ये त्रिस्तरीय व्यवस्था कोविड १९ च्या treatment सा ठी तयार करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये  जवळपास ९०० care centre  आहेत. जवळपास ५०० category २ चे तिथे moderate centre  कोविड १९ patient  ठिक केले जाणार आहेत. २३० हॉस्पिटल आहेत तिथे critical patient आहे त्यांना स्वत आपण घेऊन जाणे अपेक्षित आहेत आणि महत्त्वाच्या असं आहे की प्रत्येक ठिकाणी clinic स्थापन करण्यात आलेल्या आहे.
****
केंद्र सरकारच्या सर्व अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू ॲप तत्काळ डाऊनलोड करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या ॲपद्वारे आपण सुरक्षित असल्याचं सांगितल्यावरच त्यांनी कार्यालयात यावं, अशी सूचना केंद्र सरकारनं केली आहे. मात्र या ॲपने जर मध्यम किंवा अति धोका असल्याचे संकेत दिले, तर संबंधितांनी कार्यालयात न येता, पुढचे चौदा दिवस घरीच विलगीकरणात राहावं, असं या बातमीत म्हटलं आहे.
****
 विधानपरिषदेच्या रिक्त जागेवर नियुक्ती करण्यासंदर्भात हस्तक्षेप करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काल दूरध्वनीवरून बोलतांना केली असल्याचं वृत्त प्रेस ट्रस्ट या वृत्तसंस्थेनं सूत्राचा हवाला देऊन दिलं आहे. राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं ठाकरे यांनी पंतप्रधानांना सांगितल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. कोविड १९ विषाणूच्या संकटाच्या काळात महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात राजकीय अस्थिरता योग्य नाही, यात आपण लक्ष घालावं, असं ठाकरे यांनी मोदी यांना सांगितलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यासंदर्भात मंगळवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर ठाकरे काल पंतप्रधानांशी याविषयावर दूरध्वनीवर बोलले.  उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याचा ठराव राज्य मंत्रिमंडळानं दोन वेळा पारित केला आहे, मात्र राज्यपाल कोश्यारी यांनी अद्याप त्याला मंजुरी दिलेली नाही.
दरम्यान, राज्यातल्या कोरोना विषाणू संबंधी परिस्थितीवरही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात चर्चा झाली. राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांची पंतप्रधानांनी माहिती घेतली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
राज्यातल्या तीनही वीज कंपन्या आणि वीज नियामक आयोगामध्ये समन्वय साधून वीज दर कमी करायच्या निर्णयामुळे राज्यात उद्योग आणि व्यवसाय वाढीसाठी मोठा हातभार लागणार असल्याचा विश्वास ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे. ते काल झूम ऍपच्या माध्यमातून घेतलेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते. ऊर्जामंत्री म्हणून पदभार स्विकारल्यापासून सध्याच्या कोरोना विषाणू संकट काळात घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांची माहिती राऊत यांनी यावेळी दिली. राज्यातला वीज दर सरासरी ७ टक्के कमी केला असल्याचं त्यांनी सांगितलं. औद्योगिक तसच व्यावसायिक ग्राहकांवर पुढचे तीन महिने स्थिर आकार लागू होणार नसल्याची माहिती त्यांनी दिली. घरगुती वापराच्या बिलांचे मीटर रिडींग घेणार नसून गेल्या महिन्याच्या सरासरी बिलावरून वीज देयक तयार केलं जाईल असं राऊत यांनी सांगितलं.
****
गावी परतलेल्या बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड मजुरांना २८ दिवस विलगीकरणात ठेवण्यात येत असून, त्यांना जीवनावश्यक किराणा साहित्याचं मोफत वाटप करण्याचा निर्णय पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून त्यांना ही मदत दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यासाठी बीड जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून प्राथमिक स्वरूपात एक कोटी ४३ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, ग्रामविकास विभागानं यास विशेष बाब म्हणून तांत्रिक मान्यताही दिली आहे.
****
महाराष्ट्र दिन उद्या साजरा होणार आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र दिनानिमित्त कोणतेही कार्यक्रम होणार नाही. प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक अशा निवडक अधिकार्यांच्या उपस्थितीतच ध्वजारोहण होणार असल्याचं शासनानं यापूर्वीच सांगितलं आहे.
****
लातूर जिल्ह्याच्या उदगीर शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असून, या परिस्थितीत सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केलं आहे. विलगीकरण कक्षात ठेवलेल्या नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, यावेळी नागरिकांना सर्व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याच्या सूचना  प्रशासनाला देण्यात आल्याचं बनसोडे यांनी सांगितलं.
****
राज्य शासन तीन मे नंतर टाळेबंदीचा कालावधी वाढवणार असेल तर इतर जिल्ह्यात अडकलेल्या विद्यार्थी, शिक्षकांबाबत शासनानं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पुणे, औरंगाबाद सारख्या शहरात ग्रामीण भागातले अनेक विद्यार्थी तसंच राज्यातल्या विविध जिल्हा परिषदांमध्ये हजारो शिक्षक स्वत:च्या मूळ जिल्ह्यांपासून शेकडो किलोमीटर अंतरावर अडकून पडले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात भोकर नगर परिषदेच्यावतीनं शहरातल्या १०४ दिव्यांग व्यक्तींच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करण्यात आले तर बँक खाते नसलेल्या ७० लाभार्थींना प्रत्येकी २००० रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. टाळेबंदीच्या पार्श्र्वभूमीवर राज्य शासनानं त्यांना आर्थिक अनुदान देण्याच्या घेतलेल्या निर्णयानुसार हे अनुदादेण्यात आलं आहे.
****
टाळेबंदीच्या काळात परभणी जिल्ह्यातील कुठलाही नागरीक उपाशी राहू नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाच्या वतीनं विविध उपाय योजना केल्या जात आहेत. जिल्ह्यात एक हजार ६३ स्वस्त धान्य दुकानातून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्न धान्याचं वितरण करण्यात येत असल्याचं जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती सुर्यवंशी यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या..

आपल्या जिल्ह्यामध्ये पाच हजार दोनशे आतापर्यंत वाटप  झालेले आहे येथील प्रमाण ८४ टक्के एवढा आहे मे व जून महिनांमध्ये धान्याचे वाटप एपीएस केसरी पत्रिका शिला धारकांना सुरू झालेले आहे १७००
मेट्रिक टन  धान्याचे वाटप होणार आहे तक्रारीच्या अनुषंगाने दोन दुकानांवर कारवाई करण्यात आलेली असून पाथरी तालुक्यातील एक दुकान निलंबित करण्यात आलेले असून सेलू तालुक्यातील एका दुकानाची अनामत रक्कम जप्त करण्यात आलेली आहे जिल्ह्यामध्ये शिवभोजनाची अकरा केंद्र असून आपण पंधराशे थाळी दररोज वाटप करीत आहोत उज्वला योजना २९ हजार लाभार्थ्यांना त्यांना मोफत सिलेंडर पोहोचलेले असून एकूण लाभार्थ्यांची संख्या एक लाख पाच हजार एवढी आहे
****
लातूर जिल्ह्यात नाम फांऊडेशनच्या वतीनं सहाशे गरजुंना किराणा सामानाच्या सहाशे पाकिटांचं  वाटप करण्यात आलं. नाम फांऊडेशनचे प्रमुख नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, राजाभाऊ शेळके, यांच्या माध्यमातून या साहित्याची व्यवस्था करण्यात आली. परभणी जिल्ह्यात मानवत शहरातल्या हमालवाडी परिसरातही नाम फाउंडेशन आणि ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या वतीनं १२० कुटुंबांना धान्यवाटप करण्यात आलं.
पाथरी तालुक्यातल्या वडी इथल्या जिल्हा परिषद शाळेत विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या ऊसतोड मजूरांना स्वर्गीय नितीन महाविद्यालय आणि जन्मभूमी फाऊंडेशनच्या वतीनं १४ दिवस पुरेल एवढा जीवनावश्यक वस्तूंचा साठा वाटप करण्यात आला.
****
परभणी शहरातल्या डॉक्टरांसाठी केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे त्यांनी ५० पीपीई किट्स आणि पंधराशे मास्क उपलब्ध करून दिले. परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्याहस्ते परभणी आय एम एच्या डॉक्टर्सकडे या वस्तु सुपूर्द करण्यात आल्या.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम-परंडा-वाशीचे शिवसेना आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या वतीनं गरजूंसाठी २५ हजार जीवनावश्यक वस्तुंच्या संचाचं वाटप करण्यात आलं.
उस्मानाबाद शहरातल्या साईराज मित्र परिवाराच्या वतीनं काल रक्तदान शिबिर घेण्यात आलं. ५० जणांनी यावेळी रक्तदान केलं. 
****
हिंगोली इथल्या ओमप्रकाश देवडा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं पंतप्रधान सहाय्य्ता निधीला आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. या रकमेचा धनादेश अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे काल सुपूर्द करण्यात आला.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्र मंडळाचे सदस्य प्राचार्य डॉक्टर अशोक मोहेकर यांनी पत्नीसह स्वतःचंही एक महिन्याचं निवृत्तीवेतन मुख्यमंत्री सहायता निधीस दिलं आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष महावीर श्रीश्रीमाळ यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश काल जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांच्याकडे सुपुर्द केला.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात विलगीकरणात ठेवलेल्या १०३ मजुरांना त्यांच्या गावी रवाना करण्यात आलं. बेकायदेशीररित्या पायी तसंच इतर वाहनांतून घराकडे निघालेल्या या मजुरांना प्रशासनानं ताब्यात घेतलं होतं.
****
परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ शहरातल्या जिल्हा बँकेच्या शाखेसमोर ग्राहकांनी काल मोठी गर्दी करून सर्व नियमांची पायमल्ली केल्याचं दिसून आलं.
****
नांदेड शहरातल्या फार्मा टेडर्स या दुकानामधून  निर्धारीत किंमतीपेक्षा जास्त दरानं सॅनिटायझरची विक्री करत असल्याचं आढळून आल्यानं दुकानदाराविरूध्द अत्यावश्यक वस्तु अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुकानात सॅनिटायझरचा अधिक साठा असल्याचं आढळून आलं आहे.
****
परभणीप्रतिबंधात्मक उपापयोजनेचं पालन न करणाऱ्या ८० जणांविरूद्ध दंडात्मक कारवाई रून १४ हजार ३०० रुपयांचा दंड महापालिकेनं वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, मास्क न लावणं, दुकानावर, भाजीपाला विक्री ठिकाणी एकमेकांमध्ये ठरविक अंतर न राखणं, किराणा, जिवनावश्यक वस्तु विक्रेत्यानं मुख्य वस्तुंचे दरपत्रक न लावणं आदी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
****
हिंदी आणि इंग्रजी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणारे प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचं काल सकाळी मुंबईत निधन झालं, ते ५४ वर्षांचे होते. दूरदर्शनवरील विविध मालिकांसह अनेक हिंदी- इंग्रजी चित्रपटांतून वेगवेगळ्या भूमिका साकारलेले इरफान खान यांना, पद्मश्री या नागरी सन्मानासह, पानसिंग तोमर या चित्रपटातल्या मुख्य भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. २०१८ साली कर्करोगावर उपचारासाठी ते विदेशात गेले होते, उपचारानंतर भारतात परतल्यावर प्रदर्शित झालेला इंग्रजी मीडियम हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. प्रकृती बिघडल्यानं, त्यांना मुंबईत कोकिळाबेन धिरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, उपचारादरम्यान त्यांचं काल निधन झालं.
इरफान खान यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
****
टाळेबंदीच्या काळातही लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत २१ ते २८ एप्रिल दरम्यान २८ कोटी ६६ लाख रूपयांचा शेती माल विक्री करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना शेत माल बाजार समितीमध्ये आणण्यासाठी प्रभावी यंत्रणा बाजार समितीच्या वतीनं राबवण्यात आली.याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर…

बाजार समितीनं नियम पाळणे शेतकऱ्यांना माल बाजार समितीत आणण्यासाठी एक प्रभावी यंत्रणा राबवली आणि शेतकऱ्याला एकाच वेळी एक वाहन सोडणं त्याची नोंदणी करणं सकाळी पाच ते दहा वेळेस परवानगी घेणे या सगळ्या प्रकार केल्यामुळे बाजार समितीचे आवारात हरभरा, सोयाबीन, गहू, ज्वारी ,बाजरी, उडीद मालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती ललित कुमार शहा यांनी आकाशवाणीला दिली अरुण समुद्रे आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर

****
भारतीय कापूस महामंडळामार्फत कापूस खरेदीसाठी परभणी जिल्ह्यात आतापर्यंत ४६ हजार ७७६ कापूस उत्पादकाची नोंदणी केली आहे.
****
पालघर जिल्ह्यात जमावानं तीनजणांची हत्या केल्याप्रकरणी पोलीस अधिक्षकांनी काल आणखी तीन जणांना निलंबित केलं. त्यात एक सहायक पोलीस उप निरीक्षक आणि दोन कॉन्स्टेबल्सचा समावेश असून, त्यांची विभागीय चौकशी केल्यानंतर ही कारवाई केली आहे.
****