Wednesday, 31 January 2018

AIR News Bulletin, Aurangabad 31.01.2018....17.25

Text - AIR News Bulletin, Aurangabad 31.01.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 January 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जानेवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

२०१८-१९ या आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या संसदेत सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्या वर्षीपासून रेल्वे अर्थसंकल्प सर्वसामान्य अर्थसंकल्पात समाविष्ट केल्यामुळे, या वर्षीही रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर केला जाणार नाही.

****

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत आता येत्या अट्ठावीस फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याच्या ठिकाणातही बदल झालेला आहे. यापूर्वी विद्यार्थ्याच्या मूळ रहिवासाच्या जिल्ह्यात हे अर्ज करावे लागत, आता विद्यार्थी ज्या जिल्ह्यात शिक्षण घेणार आहे, त्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे यासाठीचे अर्ज करायचे आहेत.

****

येत्या ९ फेब्रुवारीपासून “स्वच्छ मराठवाडा” अभियान हाती घेण्यात येणार असून, देवगिरी किल्ल्यापासून त्याची सुरूवात होईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉक्टर पुरूषोत्तम भापकर यांनी दिली आहे. आज औरंगाबाद इथं यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मराठवाड्यात जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी आणि लातूर या पाच जिल्ह्यांतली वैयक्तिक शौचालयांची बांधकामं १०० टक्के पूर्ण झाली असून शहरी भाग उघड्यावर शौचापासून मुक्त झाला असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद शहरातल्या काचीवाडा भागातल्या न्यू उर्दू प्राथमिक शाळेच्या, जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यात झालेल्या स्थलांतराला शासनानं मान्यता दिली आहे. या शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांचं, स्थलांतरित किंवा जवळच्या शाळांमध्ये समायोजन केल्याची खात्री जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी करून घ्यावी, शाळेतल्या सगळ्या पात्र कर्मचारी आणि शिक्षकांना स्थलांतरित ठिकाणी सामावून घ्यावं, आणि त्याबाबत त्यांचा आक्षेप नसल्याचं शपथपत्र संस्थेच्या अध्यक्षांकडून घेण्यात यावं, असे निर्देश शासनानं दिले आहेत.

****

औरंगाबाद इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वसतिगृहात, वाचनालयात आणि ह्यूमिनिटीज विभागात गेल्या सहा महिन्यांपासून पाणी पुरवठा होत नसल्यानं, विद्यार्थ्यांनी आज कुलगुरुंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध केला. प्रशासनानं ही समस्या एका दिवसात सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. पुढच्या चार दिवसात पाणी पुरवठा सुरू न झाल्यास, कुलगुरुंच्या घरावर घागर मोर्चाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला.

****

येत्या रविवारपासून सुरू होत असलेल्या यशवंतपूर-लातूर रेल्वेला उदगीर तसंच भालकी इथं थांबा मंजूर करण्यात आला आहे. रेल्वेच्या या निर्णयाचं स्थानिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. पूर्वी यशवंतपूर ते बिदर दरम्यान धावणाऱ्या या रेल्वेचा आता लातूरपर्यंत विस्तार करण्यात आला आहे.

****

धनगर साहित्य परिषदेच्या वतीनं येत्या नऊ ते अकरा फेब्रुवारीदरम्यान लातूर इथे ‘धनगर साहित्य संमेलना’चं आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ कवी पद्मश्री ना.धों.महानोर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका संगिता धायगुडे असणार आहेत. या तीन दिवसीय संमेलनात धनगर संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमांसह परिसंवाद आणि चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

नाशिक जिल्ह्यात लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात आज सुमारे ५०० रुपयांनी घसरण होऊन, सरासरी एक हजार सहाशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. कांद्याची आवक वाढल्यानं, दरावर परिणाम झाल्याचं, सांगितलं जात आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथला कृषी सहाय्यक सुनील सातपुते याला आठ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. म्हैस खरेदीसाठी २० हजार रुपये अनुदान मिळवून देण्यासाठी त्यानं लाचेची मागणी केली होती.

****

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून नुकतेच शिवसेनेत गेलेले मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक परमेश्वर कदम यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं प्राथमिक तपासणी अहवाल दाखल केला आहे. कदम यांच्याकडे उत्पन्नाच्या चौसष्ट टक्के जास्त रक्कम असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर विभागानं आज हा एफ आय आर दाखल केला.

****

नवी दिल्ली इथे सुरू असलेल्या इंडिया सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत सायना नेहवाल आणि आकर्षी कश्यप यांनी तर पुरुष एकेरीमध्ये बी.साईप्रणितनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेची अग्रमानांकित खेळाडू पी.व्ही. सिंधूचा पहिल्या फेरीचा सामना आज होणार आहे.
दरम्यान, भारत दक्षिण आफ्रिका यांच्यात सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून प्रारंभ होत आहे. मालिकेतला पहिला सामना उद्या डर्बन इथं खेळवला जाईल.

****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.01.2018_13.00.

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.01.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 January 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जानेवारी २०१ दुपारी १.०० वा.

****



 नौदलाच्या, स्कॉर्पियन श्रेणीतल्या आय एन एस करंज या पाणबुडीचं आज मुंबईतल्या माझगाव डॉक इथून जलावतरण करण्यात आलं. अत्याधुनिक शस्त्रं वाहून नेण्याची क्षमता असलेली ही पाणबुडी पूर्णपणे भारतीय बनावटीची, असून, या पाणबुडीमुळे नौदलाच्या सामर्थ्यात मोठी वाढ झाली आहे. नौदल प्रमुख सुनील लांबा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

 उत्तर भारतात काही वेळापूर्वी भूकंपाचे धक्के जाणवले. जम्मू काश्मीरसह दिल्लीतही अनेक ठिकाणी भूकंपाचे हादरे बसल्याचं, पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज खेलो इंडिया या शालेय क्रीडा स्पर्धांच्या पहिल्या आवृत्तीचं नवी दिल्लीत उद्घाटन करणार आहेत. या स्पर्धा पुढच्या महिन्याच्या आठ तारखेपर्यंत चालणार आहेत. देशभरातून विविध क्रीडाप्रकारातले प्रतिभावान खेळाडू निवडून त्यांना पुढचं प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी या स्पर्धांचं आयोजन करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

****

 थेट लाभ हस्तांतरण अर्थात, डी.बी.टी. योजनेअंतर्गत देशात आतापर्यंत दोन लाख त्र्याहत्तर हजार एकशे त्र्याऐंशी कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात तीन हजार दोनशे दहा कोटींचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये थेट जमा करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून सध्या छप्पन्न मंत्रालयांच्या चारशे दहा योजनांचा निधी वितरित करण्यात येत आहे.

****

 माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागानं जारी केलेल्या लुक आऊट सर्क्युलरला स्थगिती देण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. हे प्रकरण पुन्हा मद्रास उच्च न्यायालयाकडे पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणाची गुणवत्तेनुसार सुनावणी करावी, असं सांगत याचा निर्णय दोन महिन्यात घ्यावा, असंही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. या प्रकरणाचा निकाल येईपर्यंत कार्ति चिदंबरम यांना देश सोडता येणार नाही, असंही या सुनावणीत नमूद करण्यात आलं आहे.

****

 राज्यात पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीनं, जपानमधील वाकायामा प्रांताचे राज्यपाल योशीनोबू निसाका आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत काल सामंजस्य कराराचं नुतनीकरण करण्यात आलं. जपानी पर्यटकांना चांगल्या सोयी - सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीनं औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा आणि वेरुळ लेण्यांजवळ जपानी पद्धतीच्या गावाची उभारणी प्रस्तावित असल्याचं, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी सांगितलं.

****

 मैला वाहून नेण्याच्या प्रथेचं उच्चाटन करण्यासाठी, राज्यस्तरावर सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्तांची सुकाणू अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी ही माहिती दिली. या संदर्भात काल केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी राज्यांचे मंत्री आणि मुख्य सचिवांची बैठक घेऊन, मैला वाहून नेणाऱ्या लोकांचं केंद्र सरकार सर्वेक्षण करणार असल्याचं सांगितलं, त्यानंतर कांबळे बोलत होते. जिल्हा तसंच तालुका पातळीवरही सुकाणू अधिकाऱ्यांची नेमणूक केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या भांडगाव-खोर या गावातल्या मीनाक्षी फेरो या कंपनीत आज सकाळी स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत दहा ते बारा कामगार जखमी झाल्याचं वृत्त आहे. या कारखान्यामध्ये भंगारातलं लोखंड वितळवणाऱ्या भट्टीपाशी हा स्फोट झाला.

****

ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथंही आज सकाळी भंगारच्या पंधरा ते सोळा गोदामांना लागलेली, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अग्निशमन दलाचे आठ ते दहा बंबांमार्फत, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.                                           .                            ****

 शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी किफायतशीर तसंच उपयुक्त बैलचलित शेती अवजारांवर भर द्यावा लागेल, असं मत, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहसंचालक डॉक्टर बी एस प्रकाश यांनी व्यक्त केलं आहे. परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. या दोन दिवसीय कार्यशाळेत विविध राज्यांमधून अनेक शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत.

*****

***


AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.01.2018_11.00AM.

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.01.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१ जानेवारी २०१८ सकाळी ११.००

****



मेघालय आणि नागालँड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची अधिसूचना आज जारी होणार आहे. त्यानंतर, आजपासून येत्या सात फेब्रुवारीपर्यंत नामांकनपत्रं दाखल करता येणार आहेत. दोन्ही राज्यांच्या प्रत्येकी साठ जागांसाठी येत्या सत्तावीस फेब्रुवारीला मतदान होणार आहे. दरम्यान, त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करण्याची मुदत आज संपत आहे.

****

 भक्ती चळवळीचे संस्थापक आणि संत, गुरू रविदासजी यांची जयंती आज देशभरात साजरी केली जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत रविदास यांना आदरांजली वाहिली आहे.

****

 नांदेड ते अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आज नांदेडहून उशिरा सुटणार आहे. आज ही गाडी  सकाळी साडेनऊच्या नियमित वेळेऐवजी सकाळी पावणेबारा वाजता सुटणार असल्याचं रेल्वेनं कळवलं आहे.

****

 ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथे गायत्री नगरच्या सरदार कंपाऊंड मधल्या भंगार मालाच्या पंधरा ते सोळा गोदामांना, तसंच जवळच्या झोपडपट्टीला आज सकाळी पावणेसातच्या सुमाराला आग लागल्याचं वृत्त आहे. अग्नीशमन विभागाची तीन वाहनं आणि पाण्याचे दोन टँकर्स घटनास्थळी पोहचेले असून अग्निशमन कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

****

 आज आकाशात खगोलशास्त्राच्या दृष्टीनं एक दुर्मिळ घटना बघायला मिळणार आहे.  एका इंग्रजी महिन्यातली दुसरी पौर्णिमा असल्यामुळे नीलचंद्र म्हणजे ब्ल्यू  मून, पृथ्वीपासून सर्वात कमी अंतरावर चंद्र असल्यामुळे  बृहद्चंद्र म्हणजे सुपर मून आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडून खग्रास चंद्रग्रहण होताना चंद्र लालसर दिसणार असल्यामुळे रक्तचंद्र म्हणजे ब्लड मून, अशी वैशिष्ट्यं आज अनुभवता येणार आहेत. आजचा चंद्र नेहमीपेक्षा चौदा टक्के मोठ्या आकाराचा आणि तीस टक्के जास्त प्रकाशमान दिसणार असून, खग्रास ग्रहणामुळे तो काही वेळ पूर्ण काळाही दिसणार आहे. असा योग दीडशे वर्षांतून एकदा येतो,असं खगोलतज्ज्ञांनी म्हटलं आहे.

*****

 नांदेड जिल्ह्यात बारड गावच्या ग्रामसभेनं गावातल्या सर्व धार्मिक स्थळांवरचे लाऊडस्पीकर बंद करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.



*****

***


Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date: 31 January 2018
Time: 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  31 ؍جنوری  ۲۰۱۸؁ء
وقت : صبح  ۴۰-۸ سے  ۴۵-۸
 دیہی علاقوں کی خواتین اورنوجوان لڑکیوں میںانفرادی صفائی سے متعلق بیداری پیداکرنے کے لئے اسمتایوجناپرعمل کرنے کافیصلہ ریاستی کابینہ نے کیاہے۔اس اسکیم کے تحت خواتین کی مخصوص ضرورتوں کی تکمیل کے لئے اشیاء مناسب قیمت پرمہیاکی جائے گی۔کل منعقدہ کابینی اجلاس میں اس فیصلے کومنظوری دی گئی۔یہ اسکیم محکمہ دیہی ترقیات کی معرفت چلائی جائے گی۔صحت عامہ کے شعبے سمیت تمام محکموں کے لئے ادویات اورطبّی آلات ہافکن بایو فارماسوٹیکل کارپوریشن لمیٹیڈ کی معرفت خریدنے کافیصلہ بھی ریاستی کابینہ نے کیاہے۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
 اورنگ آبادمیڈیکل کالج واسپتال کے سرطان کے اقامتی ڈاکٹروں کے مشاہدے میںاضافے کوبھی کابینہ نے منظوری دے دی۔اس کے علاوہ مواصلاتی بنیادی ڈھانچے کی تعمیر،سرکاری زمینوں پرموجودعمارتوں کی ازسرنوتعمیرکے عمل کوپیشہ وارانہ طورپرانجام دینے کے لئے زمینوں کے مالکانہ حقوق یالیز کے معاملات میںترامیم ، ریاست کے لئے پانچویں اجرتی کمیشن کے قیام،انتظامی امورمیںمراٹھی زبان کے متن کاانگریزی میںترجمہ کرنے کے لئے 14 ماہرین لسانیات کے پینل کے قیام کوبھی ریاستی کابینہ نے کل منظورکیا۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
 موتیابندسے پاک مہاراشٹر مہم کاکل وزیراعلیٰ دیویندرپھڑنویس کے ہاتھوں ممبئی میںافتتاح عمل میںآیا۔اس مہم کے تحت 15؍اگست 2019 تک 17؍لاکھ مریضوں کاآپریشن کیاجائے گا۔ اس افتتاحی تقریب سے خطاب کرتے ہوئے صحت عامہ کے وزیردیپک ساونت نے آنکھوں کے ڈاکٹروں کو ترغیب دی کہ وہ سالانہ کم ازکم 50؍آپریشن مفت کریں۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
 سوابھیمان شیتکری سنگھٹنا کے قائدرکن پارلیمنٹ راجوشیٹی نے مطالبہ کیاہے کہ ریاستی حکومت قرض معافی اسکیم سے استفادہ کرنے والے افراد کی فہرست جاری کرے۔کل منترالیہ میںاخباری نمائندوں سے گفتگوکرتے ہوئے اُنہوںنے کہا کہ ریاستی حکومت قرض معافی سے فائدہ اٹھانے والے کسانوں کی تعدادبتاتی ہے لیکن ایساکسان کبھی نہیں ملتاجسے اس اسکیم کافائدہ ہواہو۔
 دریںاثناء امدادباہمی کے وزیرسبھاش دیشمکھ نے کہاہے کہ شیتکری سنمان یوجناکے تحت کچھ کسانوں کی فراہم کردہ معلومات بینکوں کی معلومات سے میل نہیں کھاتی اوراس طرح کے کسان ابھی تک قرض معافی اسکیم کافائدہ نہیںاٹھاسکے۔اس سلسلے میںحکومت نے تعلقہ سطح کی کمیٹیاں تشکیل دی ہیں۔ وزیر موصوف نے درخواست گذارکسانوں کوتلقین کی ہے کہ وہ اس خصوص میںجلدازجلداپنی بینکوں سے رابطہ قائم کریں۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
 منترالیہ میںزہرپی کرخودکشی کرنے والے بزرگ کسان دھرماپاٹل کی آخری رسومات کل دھولیہ ضلع کے وکرھن دیہات میںاداکردی گئی۔سندکھیڑ کے رکن اسمبلی اوروزیرسیاحت جئے کمارراول نے دھرماپاٹل کوخراج عقیدت پیش کرتے ہوئے کہا کہ پاٹل کے اہل خانہ کوانصاف دلایاجائے گا اور اس معاملے میںملوث افراد کے خلاف سخت کاروائی کی جائے گی۔اس سلسلے میںریاستی حکومت نے چیف سیکریٹری سومیت ملک کوتحقیقات کرنے کاحکم دیاہے۔ یہ اطلاع وزیرخزانہ سدھیرمنگنٹی وارنے دی۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
 اصلاح پسندمفکرگووندپانسرے کے قتل کے الزام میںگرفتارویریندرتائوڑے کی ضمانت منظورکرلی گئی ہے۔کولہاپورکے ایڈیشنل ڈسٹرکٹ اینڈ سیشن جج نے 15؍ہزارروپئے کے ذاتی مچلکے پراسے ضمانت پررہاکردیا۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
 بابائے قوم مہاتماگاندھی کی برستی کل ملک بھرمیںمنائی گئی۔ملک بھر میںکل صبح 11؍بجے 2؍منٹ کی خاموشی اختیارکرکے جدوجہد آزادی کے شہیدوں کوخراج عقیدت پیش کیاگیا۔اس موقع پرآکاشوانی نے بھی اپنی نشریات دومنٹ تک بندرکھ کرشہیدوں کوخراج عقیدت پیش کیا۔اورنگ آباد میں ڈیویژنل کمشنردفتر میںڈویژنل کمشنرڈاکٹر پرشوتم بھاپکرسمیت افسران وملازمین نے بھی دومنٹ کی خاموشی منائی۔ڈاکٹر باباصاحب امبیڈکر مراٹھواڑہ یونیورسٹی میںبزرگ صحافی ونودشرساٹھ ’’غلط فہمی کے بھنورمیںپھنسامہاتما‘‘ کے عنوان پرایک پروگرام میںاپنے خیالات کااظہارکیا۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
 پٹرول اورڈیزل میں10؍فیصد ایتھینال کی آمیزش کے باعث گاڑیاں بندپڑنے کی شکایات بڑے پیمانے پرموصول ہورہی ہیں۔ اس آمیزش کے خلاف مذمت میں اورنگ آبادشہر کے تمام پٹرول پمپ یکم فروری سے شام 7؍بجے سے صبح 7 بجے تک بندرہیںگے۔پٹرول پمپ مالکان کی تنظیم کے سیکریٹری عقیل عباس نے کل اورنگ آباد میںمنعقدہ ایک اخباری کانفرنس میںیہ اعلان کیا۔ انہوں نے عندیہ دیاکہ فی الحال یہ آندولن ہفتے بھرچلائی جائے گی بعد میںاس کادائرہ ضلع بھر میں وسیع کردیاجائے گا۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
 نیوزی لینڈ میںجاری انڈر19؍ کرکٹ ورلڈ کپ کے سیمی فائنل میںبھارت نے پاکستان کوشکست دے کرفائنل میںداخلہ حاصل کرلیا۔ 3؍ فروری کوہونے والے فائنل میںبھارت کامقابلہ آسٹریلیاء سے ہوگا۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
 

31.01.2018_8.40_8.45_AM_URDU.mp3


AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.01.2018_06.50AM.

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.01.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 January 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जानेवारी २०१ सकाळी .५० मि.

****



Ø अस्मिता योजने अंतर्गत राज्यशासन माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देणार

Ø राज्य सरकारनं कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर करावी-खासदार राजू शेट्टी यांची मागणी

Ø कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांनी बॅँकेशी संपर्क साधण्याचं सरकारचं आवाहन

आणि

Ø १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा दणदणीत पराभव करत भारताची अंतिम सामन्यात धडक.

*****



ग्रामीण भागातल्या महिला तसंच किशोरवयीन मुलींमध्ये वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव विकसित होण्यासाठी अस्मिता योजना राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला असून, याअंतर्गत माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. काल झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळानं या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. ग्रामविकास विभागामार्फत ही योजना राबवली जाणार असून, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, या योजनेची सुकाणू संस्था म्हणून काम पाहणार आहे.

 सार्वजनिक आरोग्य विभागासह राज्यशासनाच्या सर्व विभागांची औषध तसंच वैद्यकीय उपकरणांची खरेदी हाफकिन बायो फार्मास्युटिकल्स कार्पोरेशन लिमिटेड मार्फतच करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला. औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत कर्करोग निदान कक्षातल्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्यासही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.

 महानेट प्रकल्पाच्या गतिमान पूर्णत्वासाठी मार्गाचा हक्क आणि इतर मान्यताही कालच्या बैठकीत देण्यात आल्या. औरंगाबाद तसंच नागपूर इथं या प्रकल्पासाठी रिकव्हरी स्टेट नेटवर्क ऑपरेटिंग सेंटर स्थापन करण्यात येईल.

 दूरसंचार पायाभूत सुविधा उभारणीसाठी निर्मिती धोरण, शासकीय जमिनींवरील इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया अधिक व्यवहार्य करण्यासाठी भाडेपट्ट्याने किंवा कब्जेहक्काने दिलेल्या जमिनीच्या पुनर्विकास अधिमुल्यामध्ये सुधारणा, राज्यासाठी पाचव्या वित्त आयोगाची स्थापना, प्रशासकीय व्यवहारात मराठी मजकूर इंग्रजी भाषेत अनुवादीत करण्यासाठी १४ भाषा तज्ज्ञांचं पॅनेल स्थापन करण्यालाही मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली.

****



 मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानाला काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत सुमारे १७ लाख रुग्णांवर शस्त्रक्रिया होणार आहे. आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी यावेळी बोलताना, खासगी नेत्र शल्य चिकित्सकांनी दरवर्षी किमान ५० शस्त्रक्रिया मोफत करण्याचं, आवाहन केलं.

****



 राज्य सरकारने कर्जमाफी मिळालेल्या लाभार्थ्यांची यादी जाहीर करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. ते काल मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते. राज्य सरकार कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या जाहीर करतं, मात्र प्रत्यक्षात लाभार्थी सापडत नाहीत, अशी टीका शेट्टी यांनी केली.



 दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत, काही शेतकऱ्यांनी दिलेली कर्जाची माहिती, बँकेच्या माहितीशी जुळत नसल्यानं, अशा शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळू शकला नसल्याचं, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं. अर्जदार शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीची शहानिशा करुन पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देता यावा यासाठी तालुकास्तरीय समिती गठित केली असून, सर्व जिल्ह्यातल्या संबंधित शेतकऱ्यांनी तत्काळ आपल्या बँक शाखेशी संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

****



 लिंगायत समाजातल्या सर्व पोटजातींना इतर मागास वर्गात समाविष्ट करण्यासंदर्भात, राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल मागवणार असल्याचं, विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री राम शिंदे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते होते.

****



 मंत्रालयात विष प्राशन केल्यानं मृत्यू झालेले वयोवृध्द शेतकरी धर्मा पाटील यांच्या पार्थिव देहावर काल धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातल्या विखरण या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. शिंदखेड्याचे आमदार आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. पाटील यांच्या परिवाराला आपण न्याय मिळवून देवू, आणि जे दलाल या प्रकरणात दोषी आहेत त्यांच्यावरही कारवाई करु, असं आश्वासन रावल यांनी यावेळी दिलं.

 दरम्यान, या प्रकरणी राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांना चौकशी करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली.

****



 पालघरचे खासदार विधीज्ञ चिंतामण वनगा यांचं काल दिल्ली इथं ह्रदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ६१ वर्षांचे होते. वनगा यांनी पालघर लोकसभा मतदार संघाचं तीन वेळा प्रतिनिधीत्व केलं. वनगा यांच्या निधनाबद्दल राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त होत आहे.

 दरम्यान, खासदार वनगा यांच्या निधनामुळे उद्या संसदेत अर्थसंकल्पाच्या सादरीकरणावर परिणामाची शक्यता नसल्याचं, संसदीय कामकाज मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

****



 ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले वीरेंद्र तावडे यांना सशर्त जामीन मंजूर झाला आहे. काल, कोल्हापूरच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी  २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल त्यांना देशभरात अभिवादन करण्यात आलं. देशभरात सकाळी ११ वाजता दोन मिनिटं मौन पाळून स्वातंत्र्य संग्रामातल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं. या वेळेत आकाशवाणीनंही मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांच्यासह अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी मौन पाळून हुतात्म्यांना अभिवादन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ज्येष्ठ पत्रकार विनोद शिरसाठ यांचं ‘गैरसमजाच्या भोवऱ्यात अडकलेला महात्मा’ या विषयावर तर, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत प्राध्यापक जयदेव डोळे यांचं ‘महात्मा गांधी यांना आज कसे समजून घ्यायचे’ या विषयावर व्याख्यान झालं.

****



 न्यूझीलंड मध्ये सुरू असलेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उपान्त्य सामन्यात भारतानं पाकिस्तानचा दणदणीत पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. आज झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा २०३ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं पाकिस्तानसमोर २७३ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, त्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ अवघ्या ६९ धावांतच सर्वबाद झाला. येत्या तीन फेब्रुवारीला होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असेल.

****



 नवी मुंबईत काल झालेल्या चौदा वर्षांखालील नवी मुंबई क्रिकेट चषक स्पर्धेत तनिष्क गवते या फलंदाजाने नाबाद एक हजार ४५ धावा केल्या. तनिष्कनं दोन दिवस खेळपट्टीवर टिकून राहत, १४९ चौकार आणि ६७ षटकारांच्या सहाय्यानं ही कामगिरी केली.

****



 पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळलेलं असल्यामुळे, ग्राहकांकडून गाड्या बंद पडण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. याचा निषेध म्हणून उद्या एक तारखेपासून औरंगाबाद शहरातले सगळे पेट्रोल पंप संध्याकाळी सात ते सकाळी सातपर्यंत बंद राहणार आहेत. पेट्रोल विक्रेता संघटनेचे सचिव अकील अब्बास यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सध्या आठवडाभरासाठी असलेलं हे आंदोलन, नंतर जिल्हाभरात वाढवणार असल्याचा इशारा संघटनेनं दिला आहे

****



 खेडं हा शेवटचा घटक गृहीत धरुन भौगोलिक सलगता, भाषिक संलग्नता आणि बहुभाषिकता या तत्वांच्या आधारे सीमा प्रश्न सोडवला जावा, अशी मागणी बेळगाव इथले महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य र. वि. पाटील यांनी केली आहे. पाटील यांना काल, उस्मानाबाद इथं उद्धवराव पाटील जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. सीमा भागातली ८६५ गावं महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासंदर्भात संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी त्यांनी केली.

****



 हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथल्या कवयित्री प्रा.संध्या रंगारी यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राजगुरूनगर शाखेचा ‘पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. येत्या ११ फेब्रुवारी रोजी रंगारी यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. रंगारी यांच्या ‘वाताहतीची कैफियत’ या काव्यसंग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

****



 गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी बांधकाम साहित्य विक्रेत्याकडून दोन लाख रुपये लाच घेतल्या प्रकरणी नांदेड इथं सहायक पोलिस अधीक्षक विजय यादव आणि अन्य एकाविरोधात अर्धापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल ही कारवाई केली.

****



 मराठवाडा लेबर युनियन आणि महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीनं काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. राज्यातल्या ३६ माथाडी मंडळांचं विलीनीकरण करुन एकच राज्यव्यापी मंडळ ठेवण्याचा निर्णय रद्द केल्यास, बेमुदत बंदचा इशारा महामंडळाचे उपाध्यक्ष सुभाष लोमटे यांनी दिला.

*****

***

Tuesday, 30 January 2018

AIR News Bulletin, Aurangabad 30.01.2018....17.25

Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.01.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 January 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जानेवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

पालघरचे खासदार विधिज्ञ चिंतामण वनगा यांच्या निधनानं पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शोक व्यक्त केला आहे. आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे ज्येष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी, तर वनगा यांच्या निधनानं पक्षाने आदिवासी समाजाचा समर्पित सेवक आणि पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे, अशा शब्दात दानवे यांनी श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान, वनगा यांच्या निधनामुळे परवा अर्थसंकल्पाच्या सादरीकरणावर परिणामाची शक्यता नसल्याचं, संसदीय कामकाज मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. उद्या सदनाची बैठक होणार नसल्यानं, एक फेब्रुवारीला सदनाच्या कामकाजाला प्रारंभ होताच, अध्यक्षांकडून शोकसंदेश वाचून दाखवला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षीही अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुस्लीम लीगचे खासदार ई अहमद यांचं निधन झालं होतं.मात्र अर्थसंकल्प नियोजित तारखेला सादर करण्यात आला होता, आणि दुसऱ्या दिवशी सदनाचं कामकाज स्थगित ठेवण्यात आलं होतं.

****

ग्रामीण भागातल्या महिला तसंच किशोरवयीन मुलींमध्ये वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव विकसित होण्यासाठी अस्मिता योजना राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला असून, याअंतर्गत माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ग्रामविकास विभागामार्फत ही योजना राबवली जाणार असून, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, या योजनेची सुकाणू संस्था म्हणून काम पाहणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागासह राज्यशासनाच्या सर्व विभागांची औषध तसंच वैद्यकीय उपकरणांची खरेदी हाफकिन बायो फार्मास्युटिकल्स कार्पोरेशन लिमिटेड मार्फतच करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळानं या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं.
औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत कर्करोग निदान कक्षातल्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे.
महानेट प्रकल्पाच्या गतिमान पूर्णत्वासाठी मार्गाचा हक्क (ROW) आणि इतर मान्यताही मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत दिल्या. औरंगाबाद तसंच नागपूर इथं यासाठी रिकव्हरी स्टेट नेटवर्क ऑपरेटिंग सेंटर स्थापन करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. दूरसंचार पायाभूत सुविधा उभारणीसाठी निर्मिती धोरणही मंत्रिमंडळानं मंजूर केलं.

****

पेट्रोल आणि डिझेलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळलेलं असल्यामुळे, ग्राहकांकडून गाड्या बंद पडण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. याचा निषेध म्हणून येत्या एक तारखेपासून औरंगाबाद जिल्ह्यातले सगळे पेट्रोल पंप संध्याकाळी सात ते सकाळी सातपर्यंत बंद राहणार आहेत. पेट्रोल विक्रेता संघटनेचे सचिव अकील अब्बास यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

****

राज्यातल्या ३६ माथाडी मंडळांचं एकत्रीकरण करुन महामंडळ स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यातल्या सर्व माथाडी कामगारांच्या वतीनं आज लाक्षणिक बंद पुकारण्यात आला. धुळे बाजार समितीतल्या सर्व हमाल मापाडी कामगारांनी कामबंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं.

****

खेडं हा शेवटचा घटक गृहीत धरुन भौगोलिक सलगता, भाषिक संलग्नता आणि बहुभाषीकता या तत्वांच्या आधारे सीमा प्रश्न सोडवावा, अशी मागणी बेळगाव इथले महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य र.वि.पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. उस्मानाबाद इथं शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक उद्धवराव पाटील जीवनगौरव पुरस्कार र.वि.पाटील यांना आज प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातली ८६५ गावं महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासंदर्भात संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी त्यांनी केली.

****

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र अर्जदार शेतकऱ्यांना बँकांकडील माहितीच्या आधारे कर्जमाफीचा, प्रोत्साहनपर लाभाचा फायदा देण्यात आला आहे. काही शेतकऱ्यांनी त्यांच्या अर्जात दिलेली कर्जाची माहिती ही बँकेकडून प्राप्त झालेल्या कर्ज खात्यांच्या माहितीशी जुळत नसल्यानं अशा शेतकऱ्यांना लाभ मिळू शकला नाही, असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं. अर्जदार शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीची शहानिशा करुन पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देता यावा म्हणून तालुकास्तरीय समिती गठित केली असल्याचं ते म्हणाले. सर्व संबंधित शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
जालना जिल्ह्यातही अशा ५४ हजार ५९९ शेतकऱ्यांची माहिती बँकेनं ऑनलाइन पोर्टलवर भरलेल्या माहितीशी जुळत नसल्यानं, या शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पाच फेब्रुवारीपर्यंत आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केलं आहे.

****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.01.2018_13.00.

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.01.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 January 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जानेवारी २०१ दुपारी १.०० वा.

****



 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आज त्यांना देशभर अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री निर्मला सितारामन आणि नौदल, हवाई दल आणि वायु दलाच्या प्रमुखांनी दिल्लीतल्या राजघाट इथं महात्मा गांधीजींच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं. आजचा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरात सकाळी ११ ते ११ वाजून दोन मिनिटांपर्यंत मौन पाळण्यात आलं. या वेळेत आकाशवाणीनंही मौन पाळून गांधीजींना आदरांजली वाहिली.

 दरम्यान, गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभर कुष्ठरोग निवारण दिनही पाळण्यात येत आहे. गांधीजींनी या रोगाच्या निर्मुलनासाठी प्रयत्न केले होते. यानिमित्त आज देशभरातल्या ग्रामपंचायतींमध्ये कुष्ठरोग जागरुकता अभियान - ‘स्पर्श’चं आयोजन करण्यात आलं आहे. 

 औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांच्यासह अधिकारी तसंच मान्यवरांनी मौन पाळुन हुतात्म्यांना अभिवादन केलं.

****

 पालघरचे खासदार विधीज्ञ चिंतामण वनगा यांचं थोड्या वेळापूर्वीच दिल्ली इथं ह्रदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ६१ वर्षांचे होते. हृदय विकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. वनगा यांनी पालघर लोकसभा मतदार संघाचं सलग तीन वेळा प्रतिनिधीत्व केलं.

****

 मंत्रालयात विष प्राशन केल्यानं मृत्यू झालेल्या वयोवृध्द शेतकरी धर्मा पाटील यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातल्या विखरण या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी न्याय न मिळाल्याची तक्रार करत त्यांनी मंत्रालयात विष घेतलं होतं, त्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिंदखेड्याचे आमदार आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी पाटील त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. धर्मा पाटील यांचा लढा कदापी वाया जाणार नाही, त्यांच्या परिवाराला आपण न्याय मिळवून देवू, आणि जे दलाल या प्रकरणात दोषी आहेत त्यांच्यावरही कारवाई करु, असं आश्वासन रावल यांनी यावेळी दिलं.

 दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे, त्यांच्याविरोधात दोंडाईचा न्यायालयात आपण मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचंही रावल यांनी सांगितलं.

****

 राज्यातल्या ३६ माथाडी मंडळांचं एकत्रीकरण करुन महामंडळ स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यातल्या सर्व माथाडी कामगारांच्या वतीनं आज लाक्षणिक बंद पुकारण्यात आला आहे. नवी मुंबईत वाशी इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील पाचही बाजारपेठा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत. या बंदमुळे बाजारातले जवळपास सर्व व्यवहार ठप्प झाले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

 वस्तू आणि सेवा निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकाचं राज्य ठरलं आहे. देशाच्या एकूण वस्तू आणि सेवा निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा २२ पूर्णांक तीन टक्के इतका आहे. काल प्रकाशित करण्यात आलेल्या देशाच्या आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवालात, वस्तू आणि सेवा निर्यातीमध्ये महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा ही पाच राज्य अग्रेसर ठरली आहेत. राज्यांतर्गत व्यापारात आणि वस्तू सेवा कर नोंदणीमध्येही महाराष्ट्र अग्रेसर ठरला आहे.  

****

 इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा आजपासून दिल्लीत सुरु झाली. आज पात्रता फेरीचे सामने होत आहेत, तर उद्यापासून मुख्य सामने सुरु होणार आहेत. पी व्ही सिंधू, सायना नेहवाल, के श्रीकांत या स्पर्धेत सहभागी होत आहेत.  

 दरम्यान, या स्पर्धेचं उद्घाटन काल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झालं. मुलांना आणि तरुणांना क्रिडा क्षेत्र व्यवसाय म्हणून स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी नायडू यांनी ज्येष्ठ बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला.

****

 इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल औरंगाबाद इथं आंदोलन करण्यात आलं. गांधीगिरी पद्धतीनं केलेल्या या आंदोलनात, शहरातल्या पेट्रोलपंपांवर इंधन भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना चॉकलेट वाटप करण्यात आलं.

****

 परभणी जिल्ह्यात सोनपेठ इथं काल तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली. आपत्ती व्यवस्थापनासाठी खंबीर मनोधैर्य आवश्यक असल्याचं मत तहसीलदार जिवराज डापकर यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

 जालना इथं काल पहिल्या नवोदित  साहित्य संमेलनाचा समारोप झाला. नवोदित साहित्य संमेलनाचा वटवृक्ष होण्यास वेळ लागणार नाही असं प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉ. ललित अधाने यांनी यावेळी केलं. गझल, काव्यवाचन, परिसंवाद आणि लोकसाहित्याचे दर्जेदार कार्यक्रम या संमेलनात अत्यंत उत्कृष्टरित्या पार पडले असल्याचं ते म्हणाले.

*****

***

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.01.2018_11.02AM.

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.01.2018 11.02AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३० जानेवारी २०१८ सकाळी ११.०२

****



 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज सत्तरावी पुण्यतिथी. १९४८ साली या दिवशी गांधीजींची हत्या झाली होती. गांधीजींना आदरांजली वाहण्यासाठी देशभरात आज प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीजींना आदरांजली अर्पण केली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे महात्मा गांधी आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांचा देश सदैव ॠणी राहील, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. गांधीजींच्या जीवनातून प्रत्येक भारतीयानं प्रेरणा घ्यावी, असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे, तर राष्ट्रसेवेत बलिदान दिलेल्या प्रत्येकाला नमन करत असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

 न्यूझीलंड मध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उपान्त्य सामन्यात भारतानं पाकिस्तानचा दणदणीत पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. आज झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा २०३ धावांनी पराभव केला. पहिले फलंदाजी करत भारतीय संघानं पाकिस्तान समोर २७३ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, त्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ अवघ्या ६९ धावांतच सर्वबाद झाला. येत्या तीन फेब्रुवारीला होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असेल.

****

 राज्यातल्या ३६ माथाडी मंडळांचं एकत्रीकरण करुन महामंडळ स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णया विरोधात राज्यातल्या सर्व माथाडी कामगारांच्या वतीनं आज लाक्षणिक बंद पुकारण्यात आला आहे. नवी मुंबई इथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आज राज्यभरातल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्याही बंद राहणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

 लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातल्या वैरागड गावात, लोकसहभाग आणि डॉ. हरिवंशराय बच्चन प्रतिष्ठानच्या माध्यमातून सॅनेटरी नॅपकिन व्हेडींग मशीनची सुरूवात करण्यात आली आहे. या माध्यमातून केवळ पाच रुपयात पॅड उपलब्ध करून देण्यात येत आहे. गावातल्या महिलांचं जीवनमान उंचवावं यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.

*****

***