Tuesday, 30 April 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.04.2019 20.00

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.04.2019 20.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 April 2019

Time 20.00 to 20.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० एप्रिल २०१९ - २०.००

****

लोकसभा निवडणूक केवळ सरकार बनवणार नाही तर २१ व्या शतकातल्या भारताच्या स्थानाचा देखील ही निवडणूक निर्णय करणार असल्याचं भारतीय जनता पक्षाच जेष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. उत्तरप्रदेशातल्या बहराईच इथं एका निवडणूक जाहीर सभेत ते आज  बोलत होते. विकासासाठी देशात मजबूत सरकारची गरज असून मजबूत सरकार केवळ भारतीय जनता पक्षचं देऊ शकत असल्याचं ते म्हणाले. प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रतिष्ठा आणि सुरक्षा उपलब्ध करून देण्यास भाजपचं प्राधान्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

राजस्थानमधल्या दौसा इथं झालेल्या निवडणूक जाहीर सभेत बोलतांना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार, देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करू शकत नसल्याचं सांगितलं. काँग्रेसवर टीका करताना त्यांनी एकच परिवार गेल्या ५५ वर्षांपासून देशावर राज्य करत असून त्यांना आपल्या कामाचा हिशोब द्यावा लागेल, असं ते म्हणाले.

****

काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी आपल्या नागरिकतेसंदर्भातल्या मुद्यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी भारतीय जनता पक्षानं केली आहे. पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी यासंदर्भात बोलतांना यामध्ये कोणतही राजकारण नसल्याचं सांगितलं. गांधी यांच्या नागरिकतेबाबत कोणतीही शंका असता कामा नये, असं ते म्हणाले.

दरम्यान, गांधी यांच्या नागरिकतेबाबत गृह मंत्रालयाने पाठवलेली नोटीस ही भारतीय जनता पक्षाची राजकीय चाल असल्याचा आरोप काँग्रेस पक्षानं केला आहे. लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार असल्याचं पक्षानं म्हटलं आहे. ****

काँग्रेसच्या न्याय योजनेमुळे जनतेला खर्च करण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात पैसे उपलब्ध होतील, यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळू शकेल, परिणामी विमुद्रीकरण आणि वस्तु आणि सेवा करामुळे निर्माण झालेल्या स्थितीपासून दिलासा मिळेल, अशी आशा काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी व्यक्त केली आहे. मध्यप्रदेशमध्ये पन्ना जिल्ह्यातल्या अमानगंज इथं निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. विमुद्रीकरण तसंच वस्तु आणि सेवाकरामुळे  जनतेची क्रय शक्ती संपल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांमधून घोडेबाजाराचे संकेत मिळत असल्यानं, निवडणूक आयोगानं त्यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी, तृणमूल काँग्रेस पक्षानं केली आहे. मोदींनी काल पश्चिम बंगालमध्ये एका प्रचार सभेत, तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार आपल्या संपर्कात असून, निवडणूक निकालानंतर ते सर्व जण भाजपात प्रवेश करणार असल्याचं विधान केलं होतं. हा निवडणूक प्रचाराचा योग्य मार्ग नसून, मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न आहे, असं तृणमूल काँग्रेसनं निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. लोकशाहीला मारक ठरणारी विधानं केल्याप्रकरणी पंतप्रधानांवर कठोर कारवाई करण्याची मागणी तृणमूल काँग्रेसनं या पत्रातून केली आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात दाखल आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर निर्णय सुनावण्यास, निवडणूक आयोग सक्षम असल्याचं, सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. काँग्रेसच्या खासदार सुश्मिता देव यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं, निवडणूक आयोगाला आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी गुरुवारी होणार आहे.

****

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी, सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना  पंतप्रधानांबाबत अवमानकारक वक्तव्य केल्या प्रकरणी, आज पुन्हा न्यायालयात माफी मागितली. राफेल विमान खरेदी संदर्भातल्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या विधानाचा राहुल गांधी यांनी विपर्यास केला होता. या प्रकरणी भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी अवमान याचिका सवोच्च न्यायालयात दाखल केली होती. गांधी यांच्या खेद व्यक्त करण्याच्या पद्धतीबाबत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी नाराजी व्यक्त केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

धुळे महापालिकेतले भाजपचे स्वीकृत सदस्य हिरामण गवळी यांच्यासह आणखी दोन जणांविरूद्ध पोलिस  ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळ्यात काल मतदानाच्या दिवशी भाजपचे कार्यकर्ते मतदारांना कथित रित्या पैसे वाटप करताना, विकास राठोड याने मोबाइलमध्ये चित्रीकरण केल्यामुळे, गवळी यांच्यासह  दोन जणांनी राठोड याला मारहाण केली, तसंच त्याच्या मोबाईल हिसकावला, असं या तक्रारीत म्हटलं आहे.

****

सार्वजनिक कर्ज घेऊन देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस पक्षानं केला आहे. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सत्तेवर असलेल्या सरकारनं आपल्या चार वर्ष ९ महिन्यांच्या कार्यकाळात ३० लाख २८ हजार कोटी रूपयांचं सर्वाजनिक कर्ज घेतल्या आरोप अर्थ मंत्रालयाचा हवाला देत केला. २०१४ नंतर देशाच्या सार्वजिनक कर्जात ५७ टक्के वाढ झाली असल्याचंही ते म्हणाले.

****

आकाशवाणी औरंगाबाद केंद्र दि.30.04.2019 रोजीचे रात्री 8 वाजेचे मराठी बातम...

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.04.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 April 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० एप्रिल २०१९ सायंकाळी ६.००

 ****

देशातल्या उच्च शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदलाची गरज उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. ते आज नवी दिल्लीत शिक्षण-उद्योजकता आणि नैतिकता या विषयावर एका कार्यक्रमात बोलत होते. विचार आणि रचनात्मकतेचा वापर करून अभ्यासक्रमात बदल केला पाहिजे, असं सांगतानाच उपराष्ट्रपतींनी, शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासावर भर द्यावा, आणि खासगी शिक्षण संस्थांमध्ये कौशल्य विकास केंद्र असणं बंधनकारक करावं, असं म्हटलं आहे.

****

राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणातल्या सर्व पुनर्विचार याचिकांवर सर्वोच्च न्यायालय येत्या सहा मे रोजी सुनावणी घेणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं चार मे पर्यंत आपलं म्हणणं दाखल करावं, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. १४ डिसेंबर २०१८ रोजी न्यायालयानं, या खरेदी प्रकरणी दाखल सर्व याचिका निकाली काढत, हा व्यवहार पारदर्शक असल्याचा निर्णय दिला होता. मात्र माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी, ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांच्यासह अनेकांनी या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल केल्या आहेत. 

****

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबतचा वाद म्हणजे, सध्याच्या मुद्यांवरून लक्ष विचलित करण्याच्या प्रयत्न असल्याचं, काँग्रेस पक्षानं म्हटलं आहे. भाजप खासदार सुब्रह्ममण्यम् स्वामी यांच्या तक्रारीवरून केंद्रीय गृहमंत्रालयाने, राहुल गांधी यांना नोटीस बजावून, पंधरा दिवसांत याबाबत सत्य माहिती सांगण्याचे निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्यासह इतर नेत्यांनी, हा वाद म्हणजे, ज्वलंत मुद्यांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न असल्याचं, म्हटलं.

****

शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी, कोलकत्याचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची न्यायालयीन कोठडी हवी असेल, तर केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबाआयनं आणखी पुरावे सादर करावेत, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. यासंदर्भात पुरावे उद्या पुरावे सादर करु, असं सीबीआयच्या महाधिवक्त्यानी आज न्यायालयात सांगितलं.

****

पायाभूत सुविधा क्षेत्रात मार्च महिन्यात चार पूर्णांक सात दशांश टक्के वाढ झाल्याचं, या संबंधीच्या अहवालात म्हटलं आहे. गेल्या वर्षात या कालावधीतल्या वाढीच्या तुलनेत हे प्रमाण शून्य पूर्णांक वीस शतांश टक्क्यांनी अधिक आहे. २०१८ - १९ या संपूर्ण आर्थिक वर्षात पायाभूत क्षेत्रातल्या सर्व, म्हणजे कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, खतं, सिमेंट आणि ऊर्जा निर्मिती या क्षेत्रांचा एकूण विकास दर चार पूर्णांक तीन दशांश टक्के राहिल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

तथाकथित आध्यात्मिक गुरु नारायण साई याला सुरत सत्र न्यायालयानं आजन्म तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ऑक्टोबर २०१३ मध्ये दाखल लैंगिक अत्याचाराच्या एका प्रकरणात नारायण साई, गेल्या शुक्रवारी सुरत सत्र न्यायालयात दोषी ठरला. त्यानंतर न्यायालयानं आज त्याला ही शिक्षा सुनावली. नारायण साई हा तथाकथित आधात्मिक गुरु आसाराम याचा मुलगा आहे. आसारामही लैंगिक अत्याचार प्रकरणात गेल्या सुमारे सहा वर्षांपासून, जोधपूर तुरुंगात आहे.

****



रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण, लांजा आणि राजापूर तालुक्यातल्या २० गावांमधल्या ४० वाड्यांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. इथल्या नागरिकांना सध्या पाच टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. वाढण्याची शक्यता असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यात वाणीसंगम इथं गोदावरी नदी पात्रातून गेल्या तीन महिन्यापासून अवैध वाळू उपसा सुरु आहे. वाळूचा अवैध उपसा आणि अवैध वाहतूक थांबवावी, अशी मागणी, वाणी संगम इथल्या नागरिकांनी, परभणीच्या जिल्ह्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
                                 

****

नांदेड- मुंबई- नांदेड तपोवन एक्सप्रेस आणि मनमाड- धर्माबाद- मनमाड मराठवाडा एक्सप्रेस या दोन रेल्वे गाड्यांना उद्यापासून ३१ मे पर्यंत एक वातानुकुलित द्वितीय श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडला जाणार आहे.



****

राज्यात आलेली उष्णतेची लाट आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं, विदर्भातल्या जवळपास सगळ्याच शहरात पुढचे दोन दिवस उन अधिक राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. नागरिकांनी वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाय करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

   ****


AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30 04 2019 13 00

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30 04 2019 13 00

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.04.2019 13.00

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 April 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० एप्रिल २०१९ दुपारी .०० वा.
****

 केंद्रीय गृहमंत्रालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नागरिकत्वाच्या मुद्द्यावरुन नोटीस बजावली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं नागरिकत्व आणि शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा अमेठीतल्या एका अपक्ष उमेदवाराने काही दिवसांपूर्वीच उपस्थित केला होता. राहुल गांधी यांनी ‘ब्लॅक ऑप्स लिमिटेड’ या कंपनीच्या कागदपत्रांवर आपण ब्रिटीश नागरिक असल्याचं म्हटल्याचा, त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला होता.

मात्र, भारतात दुहेरी नागरिकत्व बेकायदा असून या प्रकरणी, गृह मंत्रालयानं राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द करावं, अशी मागणी भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. या तक्रारीच्या आधारे राहुल गांधी यांना बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये, पंधरा दिवसांच्या मुदतीत यासंदर्भात सत्य माहिती सादर करण्यास सांगितलं आहे.
****

 संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी काल किर्गिस्तानमध्ये बिश्केक इथं आयोजित शांघाय सहकारी संघटना - एससीओ या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेत भाग घेतला.  या परिषदेत, या क्षेत्रातली सुरक्षाविषयक आव्हाने विकसित झाल्याच्या पार्श्वभूमीवर सदस्य देशांमध्ये संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य वाढविण्याच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

दरम्यान, सीतारामन यांनी चीन तसंच रशियाचे आपले समपदस्थ आणि किर्गिस्तानच्या सशस्त्र दलाच्या अधिकाऱ्यांसह द्विपक्षीय बैठकाही केल्या. भारत २०१७ मध्ये एससीओचा पूर्ण सदस्य बनला आहे.
****

 बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फानी या चक्रीवादळाचा फटका बसलेल्या चार राज्यांमध्ये मदत आणि बचावकार्य राबवण्यासाठी केंद्र सरकारनं एक हजार शहाऐंशी कोटी रुपयांची अग्रीम आर्थिक मदत जारी केली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या निर्णयानुसार हा निधी, राज्यांच्या आपत्ती निवारण कोषात जमा केला जाईल. यामध्ये आंध्र प्रदेशासाठी दोनशे कोटी, ओडिशा तीनशे चाळीस कोटी, तामिळनाडू तीनशे नऊ कोटी तर पश्चिम बंगालसाठी दोनशे पस्तीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

 दरम्यान, आपदग्रस्तांच्या मदतीसाठी विशाखापट्टणम्, चेन्नई तसंच अरककोणम इथं, नौदलाची सुसज्ज जहाजं तैनात करण्यात आली आहेत. नौदलाची विमानंही नौदलाच्या विमानतळांवर पूर्ण तयारीत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 शिर्डी इथं काल झालेल्या विमान अपघात प्रकरणी स्पाईस जेट कंपनीनं विमानाच्या दोन्ही वैमानिकांना अंतर्गत चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केलं आहे. काल सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास दिल्लीहून शिर्डीला आलेलं प्रवासी विमान धावपट्टीवरून घसरून किरकोळ अपघात झाला. विमानात १६४ प्रवासी होते, सर्व प्रवासी सुखरुप असल्याचं, विमान कंपनीकडून सांगण्यात आलं. या अपघातामुळे शिर्डी विमानतळावरची विमान वाहतुक काही काळ ठप्प झाली होती.

दरम्यान, या प्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी, नागरी हवाई वाहतुक विभागाच्या महासंचालकांनी, एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.
****

 पालघर जिल्ह्यात पोलिसांनी सुमारे बारा लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. अहमदाबादहून गुटख्याची चोरटी वाहतुक होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी, मुंबई अहमदाबाद रस्त्यावर आज पहाटे, आंबोळी गावाजवळ एका टॅम्पोतून हा गुटखा जप्त केला. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, हे दोघे रायगड जिल्ह्यातल्या पनवेल इथले रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांविरोधात अन्नसुरक्षा आणि प्रमाणन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. राज्यात गेल्या सात वर्षांपासून गुटखा निर्मिती, वाहतुक, साठवणूक आणि विक्रीवर बंदी आहे. गुटखा विक्री हा अजामीनपात्र गुन्हा असल्याचा निर्णय, राज्य सरकारनं गेल्या वर्षी  जारी केला आहे.
****

 यवतमाळच्या मारेगावजवळ ट्रक आणि चारचाकी गाडीच्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. यवतमाळ कडून चंद्रपूरकडे जाणाऱ्या अज्ञात ट्रकने चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर नववधू साक्षी उपरे हिचा रुग्णालयात हलवताना मृत्यू झाला. या अपघातात ६ जण जखमी झाले असून त्यांच्यावर चंद्रपूर इथं उपचार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 काल झालेल्या मतदान प्रक्रियेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ६५ टक्के तर नाशिक मतदारसंघात ५९ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या वर्षी मतदानाचा टक्का वाढल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.
*****
***

आकाशवाणी औरंगाबाद केंद्र दुपारी एक वाजेचे बातमीपत्र दि.30.04.2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30 04 2019 11 00AM

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30 04 2019 11 00AM

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.04.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

मराठी बातमीपत्र

३० एप्रिल  २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



 भाजपाचे ज्येष्ठ नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी निवडणूक प्रचारातल्या भाषणात आचारसंहितेचा कथित भंग केल्याच्या याचिकेची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. काँग्रेस खासदार सुश्मितादेव यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर होईल. मोदी आणि शाह यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगानं कोणतीही कारवाई केली नाही, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.

****



 काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल सर्वोच्च न्यायालयात, नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करून, राफेल विमान खरेदी प्रकरणी न्यायालयाच्या विधानाचा विपर्यास केल्याबाबत पुन्हा एकदा खेद व्यक्त केला. भाजपाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर, न्यायालयानं २३ एप्रिल रोजी राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती. या याचिकेवरही आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

****



 राफेल प्रकरणातल्या पुनर्विचार याचिकेवर आज होणाऱ्या सुनावणीसाठी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाकडे आणखी मुदत मागितली आहे. काल या प्रकरणाच्या सुनावणीच्यावेळी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या पीठासमोर, सरकारी वकिल आर.बालसुब्रमण्यम यांनी न्यायालयाला या याचिकेवर उत्तर देण्यासाठी आणखी मुदत वाढवुन देण्याची विनंती केली, तेव्हा सुनावणीच्या स्थगितीची माहिती सर्व पक्षांना देण्यासाठी न्यायालयानं त्यांना सांगितलं.

****



 लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात काल देशभरातल्या ७२ जागांसाठी सरासरी ६४ टक्के मतदान झालं. सर्वाधिक मतदान ७६ पूर्णांक ६४ टक्के हे पश्चिम बंगालमध्ये नोंदवलं गेलं. महाराष्ट्रातल्या १७ लोकसभा मतदारसंघात सरासरी ५७ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. किरकोळ अपवाद वगळता हे मतदान शांततेत पार पडलं. मुंबई मधल्या सहा मतदार संघांसह ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, धुळे, नंदुरबार, नाशिक, दिंडोरी, शिर्डी, मावळ आणि शिरूर या १७ लोकसभा मतदार संघांत हे मतदान झालं.



 भाजप नेत्या पूनम महाजन, शिवसेनेचे अरविंद सावंत, काँग्रेसचे मिलिंद देवरा, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, हीना गावित, समीर भुजबळ, पार्थ पवार यांच्यासह एकूण ३२३ उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदार यंत्रात बंद झालं.



 कालच्या मतदानानंतर राज्यातल्या सर्व ४८ लोकसभा मतदार संघातली मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्यामध्ये या चारही टप्प्यात सरासरी ६० पूर्णांक ६८ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.

****



 महाराष्ट्रात काल मतदान झालेल्या सतरा लोकसभा मतदार संघांपैकी अनेक ठिकाणी मतदान यंत्रात त्रुटी असल्याच्या तीस तक्रारी काँग्रेस पक्षानं, निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत. यापैकी सर्वाधिक तक्रारी धुळे तसंच नंदुरबार मतदार संघातल्या असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही यासंदर्भात ट्वीट करून, मतदान यंत्रांमध्ये गडबड असल्याचं म्हटलं आहे. धुळे आणि नंदूरबार या दोन्ही मतदार संघात काँग्रेसचं प्राबल्य असल्यामुळे, मतदान यंत्रात जाणूनबुजून गडबड केल्याचा आरोप पाटील यांनी केला.

****



 जळगाव मतदार संघात भडगाव इथल्या एका मतदान केंद्रावर काल फेर मतदान घेण्यात आलं. सुमारे ४५ टक्के मतदान झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.  या मतदान केंद्रावर गेल्या २३ तारखेला मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात, चाचणी मतदान काढून न टाकताच, मतदान सुरु करण्यात आलं, त्यामुळे इथे फेरमतदान घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले होते.

****



 लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता, काल अखेरच्या दिवशी भारतीय जनता पक्षाकडून अभिनेता सनी देओल यांनी पंजाबातल्या गुरदासपूर मतदार संघातून तर अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेस पक्षाकडून बिहारमधल्या पाटणा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

****



 नांदेड जिल्हा परिषदेनं, ग्रामीण पाणी पुरवठ्यासाठीची पाणीपट्टी न भरल्यानं, ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पातून पाणी पुरवठा थांबवण्यात आला आहे. संबंधित कार्यालयानं काल याबाबतचं पत्र जारी केलं.

*****

***
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 30 April 2019
Time:  8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۳۰ ؍اپریل  ۲۰۱۹؁
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸
 لوک سبھا انتخابات کے چو تھے مر حلے میں کل مجموعی طور پر 64؍فیصد رائے دہی ہوئی۔ جبکہ مہاراشٹر کے 17؍ انتخابی حلقوں میںتقریباً 57؍ فیصد رائے دہی ہونے کا انداز ہے۔ اِس میں تھا نہ، کلیان، پال گھر، بھیونڈی، دھو لیہ ،نندور بار، نا سک، دِنڈوری،شِرور ، ما ول  اور ممبئی کے6؍ انتخابی حلقے شامل ہیں۔مہاراشٹر کے بقیہ 17؍ حلقوں میں کل ہوئی رائے دہی کے ساتھ ہی ریاست کے تمام 48؍ حلقوں میں
انتخابی عمل مکمل ہو گیا۔ریاست میں مجموعی طور پر تقریباً60.68؍ فیصد رائے دہی ہونے کا اندازہے۔
 دریں اثناء کانگریس پارٹی نے انتخابی کمیشن سے مہاراشٹر کے 17؍ انتخابی حلقوں میں کئی رائے دہی مراکز پر EVM مشین میں خرابی  ہونے کی شکا یتیں  کی ہے۔ پی ٹی آئی کی خبر میں کہا گیا ہے کہ سب سے زیادہ شکایتیں دھو لیہ اور نندور بار کے انتخابی حلقوں سے متعلق ہیں۔
اِس خصوص میں راشٹر وادی کانگریس پارٹی کے ریاستی صدر جینت پاٹل نے اپنے ایک  ٹوئیٹ پیغام میں کہا کہ دھولیہ اور نندور بار میں کانگریس پارٹی کا غلبہ ہونے کی وجہ سے  جان بوجھ کر EVMمیں گڑ بڑ کی گئی ۔
***** ***** *****
 عام انتخابات کے ساتویں مرحلے  میں پر چۂ  نامزدگی داخل کرنے کی مدت کل ختم ہو گئی ۔کل آخری روز  پنجاب کے گُر داس پور حلقے سے  بی جے پی کے امید وار  اداکار  سنی دیول  نے اپنے پرچہ ٔ نامزدگی داخل کیے۔ دوسری جانب
بہار کے پٹنہ حلقۂ انتخاب سے کانگریس پارٹی کے امید وار  اداکار شترو گھن سنہا نے اپنی امیدواری درخواست داخل کی۔
***** ***** *****
 بحر ہند میں آ یا سمندری طوفان  فونی  شِدت اختیار کر گیا ہے۔ محکمہ موسمیات نے امکان ظا ہر کیا ہے کہ کل دو پہر تک اسکی شدت میں مزید اضا فہ ہو سکتا ہے۔فی الحال  یہ چنئی کے تقریباً810؍ کلو میٹر مشرق- جنوب حصے میں مرکوز ہے۔ محکمہ موسمیات کے مطا بق اِس طو فان کی وجہ سے مغربی بنگال کے ساحلی علاقے میں کئی مقا مات پر ہلکی سے اوسط در جے کی اور کچھ مقا مات پر موسلا دھار بارش ہونے کا امکان ہے۔
***** ***** *****
 ہنگولی ضلعے میں اونڈھا تعلقے کے گوجے گائوں میںکل لُو لگنے کی وجہ سے ایک نوجوان جا بحق ہو گیا۔سنتوش کُنڈلک ناگرے نا می یہ نو جوان دن بھر کھیت میں کام کر نے کے بعدشام گھر پہنچا اور اُس نے فوراً پا نی لیا۔جسکی وجہ سے اُسے چکر آنے لگے ۔ علاج کے لیے اُسے دوا خا نہ لے جا یا گیا جہاں جانچ کے بعد ڈاکٹر نے اُسے مردہ قرار دیا۔
 اِسی طرح کے دوسرے واقعات میں  لو لگنے کی وجہ سے پر بھنی ضلعے کے بار پور واڑی میں ایک شخص  اور آ کو لہ  میں 2؍ افراد ہلاک ہو گئے۔
***** ***** *****
 جنوب وسطی ممبئی کے ناندیڑ ڈویژن نے ناندیڑ-ممبئی-ناندیڑ کے در میان چلنے والی تپون ایکسپریس  اور   منماڑ-دھرم آ باد-منماڑ کے در میان چلنے والی  مراٹھواڑہ  ایکسپریس گاڑی میں  کل سے 31؍ مئی تک  درجہ دوم کے ایکAC ڈبے کا اضا فہ کرنے کا فیصلہ کیا ہے۔
***** ***** *****
 ناندیڑ ضلع پریشد نے  دیہی علاقوں کو فراہم کیے جانے والے  پا نی کا ٹیکس ادا نہ کرنے کی وجہ سے پین گنگا آبی منصوبے سے پانی فراہمی روک دی گئی ہے۔ متعلقہ محکمہ کی جانب سے کل اِس سے متعلق ایک مراسلہ جاری کیا گیا۔ناندیڑ ضلع پریشد پر جملہ56؍ کروڑ85؍ لاکھ روپئے پانی کا ٹیکس واجب الادا ہے ۔
 دوسری جانب ہنگولی ضلع انتظا میہ پر بھی تقریباً3؍ کروڑ روپئے پانی کا ٹیکس باقی ہے۔ پین گنگا آبی منصوبہ انتظا میہ نے واضح کر دیا ہے کہ بقایہ جات ادا کیئے بغیرعیسیٰ پور ڈیم میں دیہی علاقو ںکے لیے مختص پانی  چھوڑا نہیں جائے گا۔
***** ***** *****
 لاتور میونسپل کارپوریشن کی اسٹینڈنگ کمیٹی میں بی جے پی کے  ایڈوکیٹ دیپک مٹھ پتی،  چندر کانت بیراز دار،وینکٹ واگھ مارے،
ورشا کلکر نی،سواتی گھور پڑے   اور شویتا لونڈھے  اسی طرح کانگریس پار ٹی کے کارپوریٹر روی شنکر جا دھو   اور   دیپتی کھنڈاگلے  کا انتخاب عمل میں آ یا ہے۔ میئر  سُریش پوار کے زیر صدارت منعقدہ اجلاس میں اِن نئے اراکین کا انتخاب عمل میں آیا۔ سبکدوش ہونے والے اراکین میں  موجودہ اسٹینڈِنگ کمیٹی کے چیئر مین شیلیش گوجمگنڈے بھی شامل ہیں۔
***** ***** *****
 لاتور ضلعے میں اوسا تعلقے کے  عالملا گائوں میں کل  ایک تنگ و تاریک کنویں کی صفائی کرنے اُترے تین افراد  دم گھٹنے سکی وجہ سے جاحق ہو گئے ۔ اُنھیں باہر نکالنے کے لیے  اندر اُترے مزید چار افراد کو بھی آکسیجن کی کمی کی وجہ سے سانس لینے میں دشواری محسوس ہوئی ۔
تمام افراد کو علاج کی غرض سے دوا خانہ لے جا یا گیا جہاں جانچ کے بعد ڈاکٹروں نے تین افراد کو مر دہ قرار دیا جبکہ باقی چار افراد زیر علاج ہیں۔
***** ***** *****
 پر بھنی ضلعے میں کل بھی درجہ حرارت 47؍ ڈگری سیلسیس پر رہا ۔اسکے بر خلاف ناندیڑ ضلعے میں مطلع ابر آلود رہا۔ محکمہ موسمیات نے پیش گوئی کی ہے کہ  وسطی مہاراشٹر  ، وِدربھ اور مراٹھواڑے میں  آئندہ 2؍ روز تک گر می کی شدت برقرار رہے گی۔
***** ***** *****

AIR News Urdu Bulletin, Aurangabad. Date : 30.04.2019, Time : 8.40 - 8...

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30 04 2019 07 10AM

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30 04 2019 07 10AM

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.04.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 April 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३०  एप्रिल २०१ सकाळी ७.१० मि.

****



Ø  लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सरासरी ६४ टक्के मतदान; राज्यात १७ लोकसभा मतदारसंघात सरासरी ५७ टक्के मतदान झाल्याचा अंदाज

Ø  पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटप्रकरणी मुख्य आरोपी यासीन भटकळविरोधात आरोप निश्चित

Ø  हिंद महासागरातल्या फानी चक्रीवादळाची तीव्रता तीव्रता भीषण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त

आणि

Ø  थकबाकी न  भरल्यामुळे ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पातून नांदेड जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा थांबवण्याचा निर्णय

****



 लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात काल सरासरी ६४ टक्के मतदान झालं. सर्वाधिक मतदान ७६ पूर्णांक ६४ टक्के हे पश्चिम बंगालमध्ये नोंदवलं गेलं. राज्यात काल १७ लोकसभा मतदारसंघात सरासरी ५७ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. किरकोळ अपवाद वगळता हे मतदान शांततेत पार पडलं. मुंबई मधल्या सहा मतदार संघांसह ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, धुळे, नंदुरबार, नाशिक, दिंडोरी, शिर्डी, मावळ आणि शिरूर या १७ लोकसभा मतदार संघांत हे मतदान झालं.



 भाजप नेत्या पूनम महाजन, शिवसेनेचे अरविंद सावंत, काँग्रेसचे मिलिंद देवरा, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, हीना गावित, समीर भुजबळ, पार्थ पवार यांच्यासह एकूण ३२३ उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदार यंत्रात बंद झालं.



 काल १७ मतदार संघात झालेल्या मतदानाबरोबरच राज्यातल्या सर्व ४८ लोकसभा मतदार संघातली निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्यामध्ये एकूण सरासरी ६० पूर्णांक ६८ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.

****



 महाराष्ट्रात काल मतदान झालेल्या सतरा लोकसभा मतदार संघांपैकी अनेक ठिकाणी मतदान यंत्रात त्रुटी असल्याच्या तीस तक्रारी काँग्रेस पक्षानं, निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत. यापैकी सर्वाधिक तक्रारी धुळे तसंच नंदुरबार मतदार संघातल्या असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही यासंदर्भात ट्वीट करून, मतदान यंत्रांमध्ये गडबड असल्याचं म्हटलं आहे. धुळे आणि नंदूरबार या दोन्ही मतदार संघात काँग्रेसचं प्राबल्य असल्यामुळे, मतदान यंत्रात जाणूनबुजून गडबड केल्याचा आरोप पाटील यांनी केला.

****



 जळगाव मतदार संघात भडगाव इथल्या एका मतदान केंद्रावर काल फेर मतदान घेण्यात आलं. सुमारे ४५ टक्के मतदान झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या मतदान केंद्रावर गेल्या २३ तारखेला मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात, चाचणी मतदान काढून न टाकताच, मतदान सुरु करण्यात आलं, त्यामुळे इथे फेरमतदान घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले होते.

****



 पालघर इथं बहुजन विकास आघाडीच्या ६७ कार्यकर्त्यांना, शिवसेनेच्या आमदाराला मारहाण केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये वसई विरार महापालिकेचे महापौर रूपेश जाधव यांचाही समावेश आहे. पालघरचे शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या कार्यालयाबाहेर काल पहाटे एका चारचाकी वाहनातून निवडणूक विभागाच्या पथकाने ६४ हजार पाचशे रुपयांची रोकड पकडली, यासंदर्भातल्या चौकशी दरम्यान, शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक त्यांच्या समर्थकांसह तिथे आढळून आले. महापौर जाधव आणि त्यांच्या समर्थकांनी इथे येऊन, फाटक यांना मारहाण केली, त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

****



 लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता, काल अखेरच्या दिवशी भारतीय जनता पक्षाकडून अभिनेता सनी देओल यांनी पंजाबातल्या गुरदासपूर मतदार संघातून तर अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेस पक्षाकडून बिहारमधल्या पाटणा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

****



 काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल सर्वोच्च न्यायालयात, नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करून, राफेल विमान खरेदी प्रकरणी न्यायालयाच्या विधानाचा विपर्यास केल्याबाबत पुन्हा एकदा खेद व्यक्त केला. भाजपाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर, न्यायालयानं २३ एप्रिल रोजी राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती.

****



 पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटप्रकरणी मुख्य आरोपी यासीन भटकळ विरोधात काल पुणे न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले. या प्रकरणी पुढची सुनावणी १५ जून रोजी होणार आहे. या खटल्याची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग – दूरदृश्य प्रणालीद्वारे सुनावणी घ्यावी, अशी विनंती दिल्ली पोलिसांनी न्यायालयात केली आहे. पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातल्या जर्मन बेकरीत १३ फेब्रुवारी २०१० रोजी हा बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला, तर ५७ जण जखमी झाले होते. या प्रकरणी हाती आलेल्या पुराव्यांवरून यासीन भटकळ याला ऑगस्ट २०१३मध्ये नेपाळच्या सीमेवर अटक करण्यात आली होती.

****



 हिंद महासागरातल्या फानी या चक्रीवादळाची तीव्रता काल सायंकाळी आणखी वाढली. उद्या दुपारनंतर या वादळाची तीव्रता भीषण होण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. सध्या हे वादळ चेन्नईच्या पूर्व –दक्षिण भागात आठशे दहा किलोमीटर आणि मछलीपट्टम किनाऱ्यापासून नऊशे पन्नास किलोमीटर अंतरावर केंद्रीत आहे. पाच किलोमीटर प्रतितास या वेगानं ते उत्तर दिशेला जात असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे. उद्या हे वादळ उत्तर- पश्चिम दिशेला जाण्याची शक्यता असून त्यानंतर ते ओडिसा समुद्र किनाऱ्याकडे वळण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. या वादळामुळे हलका ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता लक्षात घेऊन केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश सरकारला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

****



हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.

****



 हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातल्या गोजेगाव इथल्या एका तरुणाचा काल उष्माघातानं मृत्यू झाला. संतोष कुंडलिक नागरे असं या तरूणाचं नाव असून काल दिवसभर शेतात काम केल्यानंतर सायंकाळी तो घरी आला, त्यानंतर त्यानं लगेचच पाणी पिल्यानं त्याला भोवळ आली, उपचारासाठी रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. परभणी जिल्ह्यात बारपूरवाडी इथंही  उष्माघातानं एकजण मरण पावला. विदर्भातही उष्णतेची लाट असून, अकोल्यामध्ये उन्हामुळे दोघांचा मृत्यू झाला.



 परभणी जिल्ह्यात कालही ४७ अंश सेल्सियस तापमान होतं. त्यामुळे दुपारच्यावेळी बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. नांदेड जिल्ह्यात मात्र काल ढगाळ वातावरण होतं, कंधार भागात पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.



 दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तसंच विदर्भात उष्णतेची लाट येत्या दोन दिवसात कायम राहील, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

****



 नांदेड जिल्हा परिषदेनं, ग्रामीण पाणी पुरवठ्यासाठीची पाणीपट्टी न भरल्यानं, ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पातून पाणी पुरवठा थांबवण्यात आला आहे. संबंधित कार्यालयानं काल याबाबतचं पत्र जारी केलं. जून २०१८ अखेर जिल्हा परिषदेकडे ५५ कोटी ८२ लाख रुपयांची आणि चालू वर्षाची ६३ लाख रुपये अशी एकूण ५६ कोटी ४५ लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत असल्यानं, पाणीपुरवठा थांबवण्यात आला आहे.



 दरम्यान, हिंगोली जिल्हा प्रशासनाकडेही सुमारे तीन कोटी रूपयांची पाणीपट्टी थकलेली आहे, ही थकबाकी भरल्या शिवाय, ईसापूर धरणातून ग्रामीण पाणी पुरवठ्यासाठी आरक्षित केलेलं पाणी सोडणार नसल्याचं, ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पाकडून सांगण्यात आलं आहे.

****



 लातूर शहर महानगर पालिकेच्या स्थायी समितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे ॲडव्होकेट दिपक मठपती, चंद्रकांत बिराजदार, व्यंकट वाघमारे, वर्षा कुलकर्णी, स्वाती घोरपडे, आणि श्वेता लोंढे, यांची तर कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नगरसेवक रवीशंकर जाधव आणि दिप्ती खंडागळे यांची निवड झाली आहे. महापौर सुरेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. स्थायी समितीचे विद्यमान सभापती शैलेश गोजमगुंडे यांचा निवृत्त झालेल्या सदस्यांमध्ये समावेश आहे. स्थायी समितीमध्ये भाजप आणि काँग्रेसचं समान पक्षीय बलाबल असल्यामुळे आता नवीन सभापती कोण होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

****



 लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात आलमला इथं, काल तीन जणांचा आडात गुदमरून मृत्यू झाला. एका अरुंद आडातला गाळ काढण्यासाठी, एकाच कुटुंबातले हे तिघे एका मागोमाग उतरले, मात्र प्राणवायूच्या अभावाने ते बेशुद्ध झाले. या तिघांना वाचवण्यासाठी अन्य चार जण आडात उतरले, मात्र त्यांनाही श्वास घेण्यास त्रास जाणवला, या सर्वांना रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केलं, तर चौघांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

****



 दिल्लीहून शिर्डीला आलेलं प्रवासी विमान काल धावपट्टीवरून घसरून किरकोळ अपघात झाला. विमानात १६४ प्रवासी होते, सर्व प्रवासी सुखरुप असल्याचं, विमान कंपनीकडून सांगण्यात आलं. या अपघातामुळे शिर्डी विमानतळावरची विमान वाहतुक काही काळ ठप्प झाली होती.

****



 अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रभाकर रुपवते यांचं काल सकाळी अल्पशा आजारानं निधन झालं. अहमदनगर जिल्ह्यातल्या मागासवर्गीयांच्या चळवळीतले ते अग्रणी नेते होते. जिल्हा बँकेचं उपाध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. 

*****

***

आकाशवाणी औरंगाबाद केंद्र सकाळी 7.10 वाजेचे बातमीपत्र 30.04.2019

Monday, 29 April 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.04.2019 20.00

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.04.2019 20.00




Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 April 2019

Time 20.00 to 20.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ एप्रिल २०१९ - २०.००

****

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातली मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली. देशभरात आज नऊ राज्यातल्या ७२ जागांवर मतदान झालं. यामध्ये महाराष्ट्रातल्या मुंबई मधल्या सहा मतदार संघांसह ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, धुळे, नंदुरबार, नाशिक, दिंडोरी, शिर्डी, मावळ आणि शिरूर या १७ लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे.

भाजप नेत्या पूनम महाजन, शिवसेनेचे अरविंद सावंत, काँग्रेसचे मिलिंद देवरा, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, हीना गावित, समीर भुजबळ, पार्थ पवार यांच्यासह राज्यातल्या १७ मतदार संघातल्या एकूण ३२३ उमेदवारांचं राजकीय भवितव्य आज मतदार यंत्रात बंद झालं.



या सर्व मतदार संघात दिग्गजांनी आज सकाळीसच आपापल्या मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव अश्वनी कुमार, ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञ तसंच निवडणूक आयोगाचे ब्रँड एम्बेसेडर डॉ अनिल काकोडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप नेत्या पूनम महाजन, विनोद तावडे, धुळे मतदार संघातले उमेदवार केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, तसंच अपक्ष उमेदवार अनिल गोटे, माजी मंत्री तथा नवापूर चे आमदार सुरुपसिंग नाईक, नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, ज्येष्ठ उद्योजक अनिल अंबानी, यांनी सकाळच्या सत्रात मतदान केलं.



ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले, प्रसिद्ध गीतकार गुलजार, जावेद अख्तर, अभिनेत्री शबाना आझमी, अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन तसंच ऐश्वर्या रॉय, रेखा, माधुरी दीक्षित, सोनाली बेंद्रे, आमीर खान, माधवन, शाहरुख खान, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, टेनिसपटू महेश भूपती, यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

****



लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता, आज अखेरच्या दिवशी भारतीय जनता पक्षाकडून अभिनेता सन्नी देओल यांनी पंजाबातल्या गुरदासपूर मतदार संघातून तर अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेस पक्षाकडून बिहारमधल्या पाटणा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

****

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा गेल्या पाच वर्षांचा कार्यकाळ हा देशातल्या जनतेसाठी एक आपत्ती ठरला असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पी चिदंबरम यांनी केली आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. या निवडणुकीनंतर येणारं सरकार हे बिगर भाजप सरकार असेल. निवडणुकीनंतरच्या आघाड्यांचा विचार करता, संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याची शक्यता, चिदंबरम यांनी वर्तवल्याचं, पीटीआयचं वृत्त आहे.

****

तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार आपल्या संपर्कात असून, निवडणूक निकालानंतर हे सर्व भाजपात प्रवेश करणार असल्याचं, भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज पश्चिम बंगालमध्ये श्रीरामपूर इथं बोलत होते. मूठभर जागांच्या बळावर दिल्लीत पोहोचता येत नसून, दिदींसाठी दिल्ली अजून खूप दूर असल्याचं मोदी म्हणाले.

****

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सर्वोच्च न्यायालयात, आज नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करून, राफेल विमान खरेदी प्रकरणी न्यायालयाच्या विधानाचा विपर्यास केल्याबाबत पुन्हा एकदा खेद व्यक्त केला. भाजपाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर, न्यायालयानं २३ एप्रिल रोजी राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती.

****

पालघर इथं बहुजन विकास आघाडीच्या ६७ कार्यकर्त्यांना, शिवसेनेच्या आमदाराला मारहाण प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये वसई विरार महापालिकेचे महापौर रूपेश जाधव यांचाही समावेश आहे. पालघरचे शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावीत यांच्या कार्यालयाबाहेर आज पहाटे एका चारचाकी वाहनातून निवडणूक विभागाच्या पथकाने ६४ हजार पाचशे रुपयांची रोकड पकडली, यासंदर्भातल्या चौकशी दरम्यान, शिवसेनेचे आमदार रवींद्र पाठक त्यांच्या समर्थकांसह तिथे आढळून आले. महापौर जाधव आणि त्यांच्या समर्थकांनी इथे येऊन, पाठक यांना मारहाण केली, त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

****

आकाशवाणी औरंगाबादः दि. 29.04.2019 रोजीचे रात्री 08.00 वाजेचे मराठी बातमी...

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.04.2019 18.00

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.04.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 April 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ एप्रिल २०१९ सायंकाळी ६.००

****

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातली मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली. देशभरात आज नऊ राज्यातल्या ७२ जागांवर मतदान झालं. दुपारी चार वाजेपर्यंत देशभरातल्या ७२ मतदार संघात सरासरी ४९ पूर्णांक ५ दशांश टक्के मतदान झालं. महाराष्ट्रात आज सतरा मतदारसंघात मतदान घेण्यात आलं, राज्यातल्या सर्व ४८ मतदार संघातली मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत पालघर मतदार संघात ५७ टक्के तर नंदूरबार मतदार संघात ६१ टक्के, तर धुळे मतदार संघात ५० टक्के मतदान झालं.

मुंबईत आज मतदारांमध्ये मतदानाचा मोठा उत्साह दिसून आला. मुंबई दक्षिण-मध्य मतदार संघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५० टक्के तर मुंबई -दक्षिण मतदार संघात ४७ टक्के, मतदान झालं. मुंबई उत्तर -पश्चिम मतदार संघात दुपारी तीन वाजेपर्यंत ४० टक्के,  मुंबई उत्तर -पूर्व ४३ टक्के, मुंबई पूर्व -मध्य सुमारे ४० तर उत्तर -मुंबई मतदार संघात ४४ पूर्णांक ६५ शतांश टक्के मतदान झालं.

दिंडोरी ४६ टक्के,  नाशिक सुमारे ४२, भिंवडी ३९, कल्याण सुमारे ३४ टक्के , ठाणे ३८ टक्के, मावळ ४२ टक्के, शिरुर  ४१ टक्के, तर शिर्डी मतदार संघात दुपारी तीन वाजेपर्यंत ४५ पूर्णांक ४८ दशांश टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता, आज अखेरच्या दिवशी भारतीय जनता पक्षाकडून अभिनेता सन्नी देओल यांनी पंजाबातल्या गुरदासपूर मतदार संघातून तर अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेस पक्षाकडून बिहारमधल्या पाटणा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

****

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा गेल्या पाच वर्षांचा कार्यकाळ हा देशातल्या जनतेसाठी एक आपत्ती ठरला असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पी चिदंबरम यांनी केली आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. या निवडणुकीनंतर येणारं सरकार हे बिगर भाजप सरकार असेल. निवडणूकीनंतरच्या आघाड्यांचा विचार करता, संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याची शक्यता असल्याचं, चिदंबरम यांनी म्हटल्याचं, पीटीआयचं वृत्त आहे.

****

तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार आपल्या संपर्कात असून, निवडणूक निकालानंतर हे सर्व भाजपात प्रवेश करणार असल्याचं, भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज पश्चिम बंगालमध्ये श्रीरामपूर इथं बोलत होते. मूठभर जागांच्या बळावर दिल्लीत पोहोचता येत नसून, दिदींसाठी दिल्ली अजून खूप दूर असल्याचं मोदी म्हणाले.

****

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सर्वोच्च न्यायालयात, आज नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करून, राफेल विमान खरेदी प्रकरणी न्यायालयाच्या विधानाचा विपर्यास केल्याबाबत पुन्हा एकदा खेद व्यक्त केला. भाजपाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर, न्यायालयानं २३ एप्रिल रोजी राहुल गांधी यांना नोटीस बजावली होती.

****

लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात आलमला इथं, तीन जणांचा आडात गुदमरून मृत्यू झाला. एका अरुंद आडातला गाळ काढण्यासाठी आडात एकामागोमाग उतरलेले हे तिघेही एकाच कुटुंबातले असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या तिघांना वाचवण्यासाठी आडात उतरलेले अन्य चार जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

****

गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयातल्या नगर विकास विभागानं, नगर परिषद आणि नगर पंचायतींद्वारे आकारण्यात येणाऱ्या विविध करशुल्कात मोठी वाढ केली आहे. ही वाढ तात्काळ रद्द करावी, अशी मागणी नगरसेवक संजय मेश्राम यांनी केली आहे. १ मे २०१९ पासून नवीन कर लागू करण्यास नगर पालिका प्रशासन विभागानं सर्व मुख्य अधिकाऱ्यांना सांगितलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात आजही ४७ अंश सेल्सियस तापमान होतं. त्यामुळे दुपारच्यावेळी बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला.

नांदेड जिल्ह्यात मात्र आज ढगाळ वातावरण होतं, कंधार भागात पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****