Friday, 31 December 2021

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.12.2021 रोजीचे रात्री 09.15 ते 09.30 वाजेचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र

आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक 31.12.2021 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे ...

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 December 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 December 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ डिसेंबर २०२ सायंकाळी ६.१०

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं, चिंता वाढली आहे. सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड 19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      कापड उत्पादनांवरील जीएसटी ५ टक्क्यांवरून १२ टक्के करण्याच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती.

·      शेतमालाला आधारभूत किंमत आणि नफा मिळवून देणारं सॉफ्टवेअर सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाकडून विकसित.

·      शिक्षक पात्रता परीक्षा परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी आणखी दोघांना अटक.

आणि

·      मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी; कोविड नियम पालन करण्याचं शासनाचं आवाहन.

****

****

कापड उत्पादनांवरील वस्तू आणि सेवा कर - जीएसटी दर पाच टक्क्यांवरून १२ टक्के करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्ली इथं झालेल्या वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्यासह सर्व राज्यांचे अर्थमंत्री या बैठकीला उपस्थित होते. कापड उत्पादनांवरील जीएसटी दर पाच टक्क्यांवरून १२ टक्के करण्याचा निर्णय या सप्टेंबरमध्ये घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी उद्या १ जानेवारी २०२२ पासून होणार होती. अनेक राज्यांचे आक्षेप लक्षात घेऊन कापड उत्पादनांवर १२ टक्के दराने जीएसटी लावण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात ल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स -कॅटने या निर्णयाला दिलेल्या स्थगितीचं स्वागत केलं आहे. कपड्यांप्रमाणेच पादत्राणांवर जीएसटी दर वाढवण्याचा निर्णय पुढे ढकलणं आवश्यक असल्याचं मत कॅट चे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी व्यक्त केलं.

****

शेतकऱ्यांच्या मालाला आधारभूत किंमत आणि नफा मिळावा, यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. या सॉफ्टवेअरला पेटंट मिळाल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. 'ऍन इंटिलीजेंट सिस्टीम अँड ए मेथड फॉर सिस्टिमेटिक डिस्ट्रीब्यूशन ऑफ अग्रिकल्चर गुड्स' असे या सॉफ्टवेअरचे नाव असून, केंद्र सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस आणि अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश व्हनकडे यांना यासंबंधी पेटंट जाहीर झालं आहे. कोणत्या वेळी कोणतं पीक घ्यावं, विविध शेती मालाला कोणत्या कालावधीमध्ये भाव प्राप्त होतो, तसंच कोणत्या विभागांमध्ये त्या पिकाला दर मिळतो, यासंदर्भात हे सॉफ्टवेअर मार्गदर्शन करू शकते. जिल्हानिहाय विक्री तसंच वितरण व्यवस्था देखील सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करता येणार असल्याचं कुलगुरू डॉ फडणवीस यांनी सांगितलं.

****

शिक्षक पात्रता परीक्षा -टीईटी गैरव्यवहार प्रकरणात तुकाराम सुपे यांच्या कार्यालयीन गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या सुनील घोलपसह मनोज शिवाजी डोंगरे याला गुन्हे शाखा पोलिसांनी आज अटक केली. घोलप याने २०२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षे अन्य आरोपींशी संगनमत करून अपात्र विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी कोट्यवधी रुपये घेतले. सुपे हा त्याच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांची नावं आणि हॉल तिकीट घोलप याच्या व्हॉट्स ॲपवर पाठवत होता. घोलपकडून ते अन्य साथीदाराला पाठवलं जात असल्याचं तपासात समोर आलं आहे. न्यायालयानं घोलप तसंच डोंगरे या दोघांना ३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

****

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रणित सिद्धिविनायक सहकार पॅनल विजयी झालं असून महाविकास आघाडी प्रणित सहकार समृद्धी पॅनेलचा पराभव झाला आहे. सिद्धिविनायक सहकार पॅनलला ११ तर सहकार समृद्धी पॅनलला ८ जागा मिळाल्या. सहकार पॅनलचे प्रमुख सतीश सावंत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार विठ्ठल देसाई यांना समसमान मतं मिळाली यात चिठ्ठी काढून विठ्ठल देसाई विजयी झाले.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला सर्वच्या सर्व जागा मिळविण्यात अपयश आल्यानं राजन तेली यांनी सिंधुदूर्ग भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. स्वतः राजन तेली यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे.

****

मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी सगळीकडे जय्यत तयारी दिसून येत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी २०२२ या नववर्षानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येकाने राज्यासाठी तसेच समाजासाठी अधिक निष्ठेनं आणि समर्पण भावनेनं कार्य करण्याचा संकल्प करावा, असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना, आरोग्यदायी संकल्प करण्याचं आवाहन केलं आहे. नववर्षाचं स्वागत करताना, कोरोना संकटाचं भान राखावं. आपल्या वागण्यातून कोविड संसर्ग वाढीला हातभार लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नववर्षाचं स्वागत उत्साहाने मात्र आरोग्यचं भान राखत संयमाने करावं, असं आवाहनही पवार यांनी केलं आहे.

मावळत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांच्या स्वागतासाठी मुंबईसह विविध शहरं तसंच पर्यटनस्थळं, चौपाट्या आणि समुद्रकिनाऱ्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता या सर्व चौपाट्या बंद करण्यात आल्या आहेत. सर्व पर्यटनस्थळांवर जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

 

शिर्डी इथल्या साईबाबांच्या मंदिरावर नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराचा गाभाराही आकर्षक फुलांनी सजण्यात आला आहे.

खंडाळा-लोणावळा या सर्वात मोठ्या पर्यटन स्थळ असलेल्या भागात नवीन वर्षाच्या स्वागत समारंभासाठी कोणताही बंगला, लॉज, किंवा जागा भाड्याने देऊ नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी सूचना स्थानिक जिल्हा प्रशासनानं लोणावळा तसच खंडाळातल्या सर्व हॉटेल्स तसंच बंगला मालकांना बजावली आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड इथं नववर्षाचं स्वागत जल्लोषात आणि आतिषबाजीनं करण्यात आलं.

****

आकाशवाणी औरंगाबाद - दिनांक 31.12.2021 रोजीचा ‘आझादी का अमृत महोत्सव - व्...

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 31.12.2021 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.12.2021 रोजीचे दुपारी 01.30 वाजेचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.12.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 December 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ डिसेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

वस्त्रोद्योगाशी संबंधीत उत्पादनांवर उद्यापासून लागू होणारी पाच टक्क्यांवरुन १२ टक्क्यांची जीएसटी वाढ रद्द करण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात, केंद्राकडून राज्यांना मिळणारी जीएसटी नुकसानभरपाई १४ टक्के वार्षिक वाढीसह ३० जून २०२२ नंतरही कायम ठेवण्यात यावी, अशीही मागणी केली आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रात होणाऱ्या दरवाढीमुळे महागाई वाढेल, व्यापारी, उलाढाल, अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम होईल, असं पवार यांनी म्हटलं आहे.

****

देशभरात कोरोना आणि ओमायक्रॉन विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह आठ राज्यांना खबरदारीच्या उपाय योजना राबवण्याचे आणि लसीकरण वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक बाधित असले तरी महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोनाच्या नवबाधितांची संख्या वाढत आहे, असं आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. राज्यात प्रामुख्यानं मुंबई, ठाणे आणि पुण्यात नव्याने आढळणाऱ्या बाधितांची संख्या मोठी असल्याचं ते म्हणाले. 

****

मुंबई आणि पुण्यात ओमायक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरुवात झाल्याचा दावा, ‘आयसर’च्या हवाल्यानं राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी केला आहे. या दोन्ही महानगरातल्या या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या ‘आयसर’ या संस्थेनं ‘ओमायक्रॉन’ संसर्गाचं सर्वेक्षण केलं आहे. लक्षणं कमी, रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाणही कमी; तसंच मृत्यूचं प्रमाणही कमी असलं तरी हा संसर्ग वाढू नये यासाठी आपण सर्वांनी नियम पाळणं गरजेचं आहे; असं डॉ. आवटे यांनी म्हटलं आहे.

****

२०२१ या वर्षाचा आज शेवटचा दिवस असून, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र कोविड आणि ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरीकांनी गर्दी न करण्याचं आवाहन शासनानं केलं आहे. आज मध्यरात्रीपासून राज्यात नवे निर्बंध लागू होणार असून, रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत जमावबंदी आदेश आहेत.

****

पुणे जिल्ह्यात कोरेगाव भीमा इथं विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमासाठी उद्या म्हणजे एक जानेवारीला अनेक जण हजेरी लावत असतात. पुणे महानगर परिवहन महामंडळानं नागरिकांच्या सोयीसाठी आज आणि उद्या मोफत जादा बसेसचं नियोजन केलं आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विजयस्तंभ स्थळी गर्दी करू नये असं आवाहन विविध स्तरावरून करण्यात आलं आहे.    

****

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपप्रणीत सिद्धीविनायक पॅनेलनं विजय मिळवला आहे. एकूण १९ जागांपैकी सिद्धीविनायक पॅनलला ११ तर महाविकास आघाडीच्या सहकर समृद्धी पॅनलला आठ जागा मिळाल्या

****

राज्यातल्या धोकादायक आणि जीर्ण पुलांची कामं करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून, नव्यानं उभारण्यात येणारे पूल आणि दुरुस्ती करावयाच्या पुलांच्या कामांचे नकाशे, आराखडे महिनाभरात विभागाकडे सादर करण्याचे निर्देश, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. राज्यातल्या सर्व पुलांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली काल नांदेड इथं दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. ज्या पुलांची कालमर्यादा संपुष्टात आली आहे, अशा सर्व पुलांचं संरचनात्मक लेख परीक्षण करण्याच्या सूचनाही, त्यांनी दिल्या.

****

हडपसर ते नांदेड या विशेष रेल्वेची एकतर्फी फेरी करण्यात येणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनंसपर्क कार्यालयानं कळवलं आहे. ही गाडी दोन जानेवारीला रात्री साडे अकरा वाजता हडपसर इथून सुटेल आणि मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी मार्गे हुजूर साहिब नांदेड इथं दुसऱ्या दिवशी दुपारी सव्वा वाजता पोहोचेल. ही गाडी पूर्णत: आरक्षित असेल.

****

दुबईत १९ वर्षाखालच्या आशिया चषक एकदिवस क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका दरम्यान सुरु आहे. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या पाच बाद ५१ धावा झाल्या होत्या. भारताच्या कौशल तांबेनं दोन, तर रवीकुमार, विकी ओस्तवाल आणि राज बावानं प्रत्येकी एक गडी बाद केला.

****

भारताचा स्कीईंगपटू आरिफ मोहम्मद खान हा बिजिंग इथं होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेतल्या दोन वेगवेगळ्या प्रकारांसाठी पात्र ठरला आहे. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय स्कीईंगपटू ठरला आहे. ही स्पर्धा चार ते २० फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.

****

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.12.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.12.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.12.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१ डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांचं वाढतं प्रमाण आणि ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग यामुळे पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे सर्व निर्बंध आज मध्यरात्रीपासून लागू होतील. खुल्या मैदान किंवा बंदिस्त सभागृहातल्या विवाह सोहळय़ांमध्ये, तसंच सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांत फक्त ५० लोकांना आणि अंत्यविधीसाठी २० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. रुग्णसंख्या वाढणाऱ्या जिल्हे किंवा महापालिका हद्दीत निर्बंध कठोर करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला बहाल करण्यात आले आहेत.

****

केंद्र सरकारनं ग्राहक हक्क संरक्षण आयोगांचे कार्यक्षेत्र निर्धारित करणाऱ्या नियमांची अधिसूचना प्रसिद्ध केली. यानुसार ५० लाखापर्यंतच्या तक्रारी जिल्हा आयोगात, दोन कोटींपर्यंतच्या राज्य आयोगात तर त्यावरच्या राष्ट्रीय आयोगात दाखल कराव्या लागतील. ग्राहक संरक्षण कायदा २०१९ मध्ये ग्राहक आणि विक्रेते यांच्यातल्या वादांवर तोडगा काढण्यासाठी त्रिस्तरीय रचना अस्तित्वात आली आहे.

****

सोलापूर - औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर उस्मानाबाद जवळील आळणी फाटा इथं प्रवासी कार आणि मालवाहू कंटेनर यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. आज पहाटे हा अपघात झाला. मृत चौघेही एकाच कुटुंबातले असून, ते लातूरला जात होते असं पोलिसांनी सांगितलं.

****

नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यातल्या राजवाडी इथले शेतीनिष्ठ ऊस भुषण पुरस्कार प्राप्त शेतकरी भगवानराव पाटील राजवाडीकर यांचं काल निधन झालं, ते  ९१ वर्षांचे होते. विक्रमी ऊस उत्पादनासाठी २००७ मध्ये त्यांना वसंतदादा शुगर इन्स्ट्युटचा ऊस भुषण पुरस्कार देण्यात आला होता.

****

राज्यातल्या विविध १२ सांस्कृतिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित करण्यात येतं. या वर्षापासून ‘आचार्य पार्वतीकुमार यांच्या नावानं नृत्य क्षेत्रातील पुरस्कार देण्यात येईल. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

****

मराठवाड्यात काल ५३ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

****

آکاشوانی اَورنگ آباد علاقائی خبریں تاریخ 31 ؍ د سمبر 2021 وَقت : صبح 9.00 سے 9.10 ؍ بجے

 Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.

Date : 31 December 2021

Time:  09 : 00 to 09: 10 AM

آکاشوانی اَورنگ آباد

علاقائی خبریں

تاریخ:  ۳۱   ؍  دسمبر  ۲۰۲۱ء؁

وَقت: صبح  ۰۰۔۹  سے  ۱۰۔۹؍ بجے 

سب سے پہلے اِس وقت کی سر خیاں...


٭ مہاراشٹر میں آج آدھی رات سےنافذ ہوں گی سخت پا بندیاں‘شادی کی تقریبات میں50؍ اور 

جنا زوں میں صرف20؍ لوگ کر سکتے ہیں شر کت 

٭   نئے سال کے موقعے پر بھیڑجمع ہونے سے روکنے کے لیے سیا حتی مقامات کو کیاگیا بند ‘

مزید پا بندیاں عائد کرنے کامقامی ضلع انتظا میہ کو دیاگیااختیار

٭ مہاراشٹر میں کَل ایک دِن میں پائے گئے 5358؍ نئے کورونا پا زیٹیو مریض‘

ریاستی وزیر امِت دیشمکھ نے کہا کورونا مریضوں کی تعداد میں ہو رہا اضا فہ 

تیسری لہر میں تبدیل ہو سکتا ہے 

اور

٭ سلِوڑ -   کنّڑ شاہراہ پر منگلور پھا ٹے کے قریب کَل ہوئے حادثے میں ایک ہی خاندان کے

6؍ لوگوں کی موت


  اب خبریں تفصیل سے....


مہاراشٹر میں کورونا پا زیٹیو مریضوں کی بڑھتی تعداد اور او میکرون مریضوں میں ہو رہے اضا فے کی وجہ سے ریاست میں د و بارہ پا بندیاں عائد کی جا رہی ہیں۔ نئی پا بندیاں آج آدھی رات سے نافذ ہوں گی ۔ وزیر اعلیٰ اُدھو ٹھا کرے نے کورونا ماہرین کی کمیٹی سے تفصیلی تبادلۂ خیال کے بعد یہ فیصلہ لیا۔ اِس بارے میں حکم نا مہ کَل دیر رات جا ری کیا گیا ۔ آج رات سے نافذ کی جا نے والی پا بندیوں کے مطا بق کھُلی جگہوں یا بند ہالس میں منعقدکی جانے والی شادی کی تقریبات میں صرف 50؍ لوگوں کو شر کت کرنے کی اجازت ہو گی ۔

وہیں جنازوں اور آخر رسو مات میں صرف بیس افراد شریک ہو سکتے ہیں ۔ سیاسی ‘ مذہبی اور سما جی تقریبات میں

صرف50؍ لوگوں کو شر کت کی اجازت ہو گی ۔ اُن ضلعوں میں جہاں کو رونامریضوں کی تعداد بڑھ رہی ہے وہاں سخت فیصلے لینے کا اختیار مقامی انتظا میہ کو بحال کر دیا گیا ہے۔ نئے سال کے جشن  کے موقعےپر لوگوں کی بھیڑ جمع ہونے سے روکنے کے لیے ممبئی سمیت مختلف شہروں کے سیاحتی مقا مات  اور سمندر کناروں کو بند کر دیا جائے گا ۔ سبھی سیاحتی مقا مات پر امتنا عی احکا مات نافذ ہیں۔

اِس بیچ کورونا ٹاسک فورس کے ساتھ ہوئی میٹنگ میں وزیر اعلیٰ نے ریاست میں کورونامریضوں کی بڑھتی تعداد پر فکر مندی کا اظہار کیا۔ میٹنگ کی تفصیلات تبا تے ہوئے ریاستی وزیر صحت راجیش ٹو پے نے کہا کہ بھیڑ کو جمع ہونے سے روکنے پر سبھی نے ایک دوسرے سے اتفاق کیا ہے۔ ٹو پے نے کہا کہ مزید پا بند یوں کے بارے میں بھی جلد ہی فیصلہ لیا جا ئے گا ۔

***** ***** ***** 

دریں اثنامہاراشٹر میں اومیکرون مریضوں کی تعداد میں اضا فہ جاری ہے ۔ گزشتہ کَل ایک دِن میں ریاست میں198؍ نئے او میکرون پا زیٹیو مریضوں کا انکشاف ہوا ۔ اِن مریضوں میں190؍ مریض ممبئی سے ہیں جبکہ تھا نے میں4؍ اور سا تا را ‘ ناندیڑ‘ پونے اور پِمپری - چِنچوڑ میں ایک-ایک او میکرون پا زیٹیو مریض پا یا گیا ۔ اِس اضا فے کے بعد مہاراشٹر میں اب تک پائے گئے او میکرون مریضوں کی تعداد بڑھ کر450؍ ہو گئی ہے ۔ اِس تعداد میں سے125؍ افراد ٹھیک بھی ہو چکے ہیں۔

دوسری جانب ریاست میں ایک او میکرون پا زیٹیو مریض کی موت کا ا نکشاف ہوا ہے۔

 پِمپری-چِنچوڑ میں28؍ دسمبر کو فوت ہوئے 52؍ سالہ شخص کی او میکرون سے موت ہو نے کاکَل انکشاف ہوا ۔ 

نائجیر یا سے سفر کر کے لوٹے اِس شخص کو 13؍ سالوں ے ذیابطیس کی بیما ری تھی ۔ یہ شخص پِمپری-چِنچوڑ میو نسپل حدود کے یشو نت رائو چو ہان اسپتال میں علاج کر وا رہا تھا ۔

***** ***** ***** 

مہاراشٹر میں کَل ایک دِن میں 5358؍ نئے کورونا پا زیٹیو مریض پائے گئے ۔ اِس اضا فے کے بعد ریاست میں اب تک کورونا پا زیٹیو ہوئے مریضوں کی مجموعی تعداد بڑھ کر 66؍ لاکھ70؍ ہزار754؍ تک جا پہنچی ہے ۔ وہیں کَل دن بھر میں ریاست میں22؍ کورونا مریضوں نے دوران علاج دم توڑ دیا ۔ اِن اموات کو ملا کر مہاراشٹر میں کورونا وائرس کی شروعات کے بعد سے اب تک جان گنوا نے والوں کی کُل تعداد  ایک لاکھ41؍ ہزار

518؍ ہو گئی ہے ۔ ریاستی شرح اموات 2؍ فیصد پر بر قرار رہی۔

دوسری جانب کَل ایک دن میں ریاست کے مختلف اسپتالوں سے کَل1193؍ افراد  کورونا وائرس سے صحت یاب ہونے کے بعدگھرں کو رخصت ہوئے ۔ مہاراشٹر میں اب تک 65؍ لاکھ7؍ ہزار330؍ افراد

 اِس بیما ری سے ٹھیک ہو چکے ہیں۔ کورونا وائرس سے صحت یابی کا ریاستی تناسب لگ بھگ 98؍ فیصد رہا ۔ فی الحال مہاراشٹر میںکورونا پا زیٹیو مریضوں کی درج شدہ مجموعی تعداد18,217؍ ہو گئی ہے  او ر  اِن سبھی مریضوں کا علاج کیا جا رہا ہے۔

***** ***** ***** 

مراٹھواڑہ میں کَل ایک دِن میں53؍ نئے کورونا پا زیٹیو مریض منظر عام پر آئے ۔ اور ایک مریض کی موت ہو گئی ۔ جان گنوا نے والے شخص کا تعلق بیڑ ضلعے سے ہے ۔گزشتہ کَل اورنگ آ باد  اور  عثمان آ باد ضلعوں میں 16-16؍ نئے مریض پائے گئے ۔ لاتور میں8؍ پر بھنی میں7؍ اور جالنہ ضلعے میں 4؍ مریضوں کا کَل اضا فہ درج کیا گیا ۔ بیڑ ضلعے میں کَل 2؍ افراد کے کورونا پا زیٹیو ہو نے کا انکشاف ہوا ۔ ناندیڑ  اور  ہنگولی ضلعوں میں

گزشتہ روز ایک بھی کورونا پا زیٹیو مریض نہیں پا یا گیا ۔


***** ***** ***** 

 یہ خبریں آکاشوانی اورنگ آ باد سے نشر کی جا رہی ہیں

***** ***** ***** 


لاتور کے نگراں وزیر امِت دیشمکھ نے ضلعے کے عوام سے احتیا ط برتنے اور سبھی کورونا مخالف ضا بطوں پر عمل کر تے رہنے کی اپیل کی ہے ۔ امِت دیشمکھ نے کہا کہ گزشتہ کچھ دنوں سے کورونا مریضوں کی تعداد میں ہو رہا اضا فہ ‘ تیسری لہر کے آہٹ سامحسوس ہو رہا ہے۔ لہذا اِس سے بچنے کے لیے حکو مت کی جانب سے جاری کر دہ احکا مات پر سختی سے عمل کر لینے کی ضرورت ہے ۔امِت دیشمکھ نے مزید کہا کہ کورونا وائرس کے پھیلائو کو روکنے کے لیے لاتور ضلعے میں کورونا مخالف ٹیکہ اندازی مہم میں تیزی لا نے کی ضررورت ہے ۔ دیشمکھ نے لوگوں سے کہا کہ جنھوں نے ابھی تک ٹیکہ نہیں لگوا ا ہے وہ فوراً اپنی ٹیکہ اندازی مکمل کریں۔

***** ***** ***** 

اِسی طرح امیکرون مریضوں کی بڑھتی تعداد کے پس منظر میں ناندیڑ کے ضلع کلکٹر ڈاکٹر وِپِن اِٹنکر نے بھی ضلعے کے عوام سے احتیا ط کا دامن نہ چھوڑ نے کی اپیل کی ہے ۔ ضلع کلکٹر نے صحت کو لاحق خطرات کے پیش نظر لوگوں سے ا یک جگہ جمع نہ ہونے  اور  گھروں میں رہتے ہوئے نئے سال کا استقبال کر نے کی اپیل کی ۔ اورنگ آباد کے پولس کمشنر ڈاکٹر نِکھل گپتا نے بھی نئے سال کا استقبال سادگی سے کرنے کی اپیل کی ہے۔

***** ***** ***** 

شیو سینا کا رکن سنتوش پَرب پر کیے گئے حملے کے ملزم اور بھارتیہ جنتا پارٹی کے رکن اسمبلی نتیش را نے اور دیگر ایک ملز م کی قبل از گرفتاری ضمانت کی در خواست ‘ سندھو دُرگ کی ضلع عدالت نے کَل نا منظور کر دی۔ اِس عرضی پر  دونوں فریقوں کی جانب سے گزشتہ 2؍ دونوں سے اپنی بات رکھی جا رہی تھی ۔ عرضی نا منظور ہونے کے بعد رانے کے وکیل نے صحا فیوں کو بتا یا کہ عدالت کے فیصلے کے خلاف ہائی کورٹ سے رجوع کرنے پرغور کیا جا رہا ہے۔

***** ***** ***** 

تعلیم کے شعبے میں ہو رہی زبر دست سیاسی مدا خلت سے تعلیم کا معیار گر نے کا خطرہ بڑھ گیا ہے ۔ اِس خیال کا اظہار ڈاکٹر با با صاحیب امبیڈکر مراٹھواڑہ یو نیور سٹی کے سابق وائس چانسلر  ڈاکٹر وِجئے پنڈھری پانڈے نے کیا ۔ وہ کَل اورنگ آباد میں یو نیور سٹی اصلا حات بِل2016؁ کے ضمن میں منعقدہ گول میز کانفرنس میں بول رہے تھے ۔اُنھوں نے کہا کہ موجودہ دور میں معیار سے زیادہ تعداد کو اہمیت دی جا رہی ہے جس سے یو نیور سیٹیوں میں تعلیم کا درجہ لگا تار گر تا جارہا ہے ۔ 

اِس بیچ بھارتیہ جنتا پار ٹی کی یوا مورچہ شاخ نے کَل اورنگ آباد ضلع کلکٹر دفتر پر مظاہرے کیے ۔ مظاہرین کاکہنا تھا کہ مہاراشٹر کی مہا وِکاس آگھاڑی حکو مت کے یو نیو رسٹی قا نون سے  یو نیور سیٹیوں کے وائس چانسلروں کے انتخاب میں سیاسی مداخلت بڑھ جا ئے گی ۔

***** ***** ***** 

اورنگ آ باد ضلعے کے سِلوڑ -کنڑ شاہراہ پر بارات لے جا رہے پِک اَپ اور ٹریکٹر کے در میان کَل ہوئے بھیا نک حادثے میں ایک ہی خاندان کے 6؍ لوگوں کی موت ہو گئی ۔ یہ حادثہ منگلور پھا ٹے پر کَل علی الصبح رونما ہوا ۔ حادثے میں14؍ لوگ شدید زخمی بھی ہوئے ہیں جنھیں علاج کے لیے اسپتال میں شریک کیا گیا ہے۔

***** ***** ***** 

بھارت اور جنوبی افریقہ کے در میان سنچو رین میں کھیلا گیا پہلا ٹیسٹ میچ بھارت نے جیت لیا ہے ۔ بھارتی ٹیم نے113؍ رنوں سے یہ مقا بلہ اپنے نام کیا ۔ میچ کے  پانچویں اور آخری دِن جنوبی افریقہ کو جیت کے لیے 305؍ رن بنا نےتھے تاہم پوری ٹیم191؍ رن ہی بنا سکی ۔ 4؍ وکٹ کھو کر 94؍ رنوں کے اسکور سے آگے کھیلتے ہوئے کَل جنوبی افریقہ کے بلّے باز بھارت کی گیند بازی کے آگے ٹِک نہیں پائے  اور  وکٹ گنوا تے رہے ۔بھارت کی جانب سے محمدشا می اور جسپریت بُمراہ نے 3-3؍ کھلاڑیوں کو آئوٹ کیا ۔ جبکہ محمد سراج اور  روی چند اشوِن نے 2-2؍ جنوبی افریقی بلّے باز وں کے وکٹ لیے ۔ سنچری لگا نے والے کے ایل راہُل کومین آف دی میچ انعام دیا گیا ۔ اِس جیت کے بعد بھارت3؍ ٹیسٹ میچوں کی سیریز میں ایک - صفر کی سبقت حاصل کر چکا ہے ۔ سیریز کا دوسرا ٹیسٹ میچ‘3؍ سے7؍ جنوری کے در میان جو ہانسبرگ میں کھیلا جا ئے گا ۔

***** ***** ***** 

دوبئی کے شارجہ میں کھیلے جا رہے اَنڈر19-    ایشیا کپ ایک روزہ کر کٹ مقابلوں میں بھارت کی ٹیم نے کَل بنگلہ دیش کو103؍ رنوں سے ہرا کر فائنل میں داخلہ حاصل کر لیاہے۔ کَل کھیلے گئے مقا بلے میں بنگلہ دیش نے ٹاس جیت کر پہلے بلّے با زی کی بھارت کو دعوت دی ۔ بھارتی بلّے باز شیخ رشید کی جانب سے دھواں دار90؍ رنوں کی اِننگز کی بدو لت بھارت نے بنگلہ دیش کے سامنے244؍ رنوں کا نشا نہ رکھا جِسے حاصل کر نےمیں بنگلہ دیش نا کام رہا ۔

***** ***** ***** 

موسم :  وِدربھ کے کچھ مقا مات پر کَل ژالہ باری کے ساتھ ساتھ بارش ہوئی ۔ مراٹھواڑہ اور وسطی مہاراشٹر کے کئی مقا مات پر کم از کم درجہ حرارت میں اوسط کے مقابلے ہلکا اضا فہ ضرور ہوا ہے  لیکن سرد ہوائیں اب بھی جا رہی ہیں ۔ پونے دفتر موسمیات کا کہنا ہے کہ اگلے 2؍ دنوں میں پورے مہاراشٹر میںموسم خشک رہے گا ۔

***** ***** ***** 

اورآخر میں اہم خبریں ایک بار پھر سن لیجیے ...


٭ مہاراشٹر میں آج آدھی رات سےنافذ ہوں گی سخت پا بندیاں‘شادی کی تقریبات میں50؍ اور 

جنا زوں میں صرف20؍ لوگ کر سکتے ہیں شر کت 

٭   نئے سال کے موقعے پر بھیڑجمع ہونے سے روکنے کے لیے سیا حتی مقامات کو کیاگیا بند ‘

مزید پا بندیاں عائد کرنے کامقامی ضلع انتظا میہ کو دیاگیااختیار

٭  مہاراشٹر میں کَل ایک دِن میں پائے گئے 5358؍ نئے کورونا پا زیٹیو مریض‘

ریاستی وزیر امِت دیشمکھ نے کہا کورونا مریضوں کی تعداد میں ہو رہا اضا فہ 

تیسری لہر میں تبدیل ہو سکتا ہے 

اور

٭ سلِوڑ -   کنّڑ شاہراہ پر منگلور پھا ٹے کے قریب کَل ہوئے حادثے میں ایک ہی خاندان کے

6؍ لوگوں کی موت


اِس کے ساتھ ہی آکاشوانی اورنگ آباد سے علاقائی خبریں ختم ہوئیں۔

٭٭٭


आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.12.2021 रोजीचे सकाळी 09.20 वाजेचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र

آکاشوانی اَورنگ آباد علاقائی خبریں تاریخ 31 ؍ د سمبر 2021 وَقت : صبح 9.00 سے 9.10 ؍ بجے

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.12.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 December 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ डिसेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं चिंता वाढली आहे. आपल्या सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      राज्यात आज मध्यरात्रीपासून पुन्हा निर्बंध, विवाह सोहळा, तसंच राजकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी फक्त ५० लोकांना तर अंत्यविधीसाठी २० लोकांनाच परवानगी, सर्व पर्यटनस्थळांवर जमावबंदी आदेश लागू

·      राज्यात ओमायक्रॉनची बाधा झालेले १९८ नवे रुग्ण, पिंपरी- चिंचवडमध्ये २८ डिसेंबरला मृत्यू पावलेल्या रूग्ण ओमायक्रॉन बाधित असल्याचं स्पष्ट

·      ** राज्यात कोविड संसर्गाचे नवे पाच हजार ३५८ रुग्ण, मराठवाड्यात एकाचा मृत्यू तर ५३ बाधित

·      साहित्यिक किरण गुरव, संजीव वेर्णेकर,  प्रणव सखदेव आणि संजय वाघ यांना, यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

·      कृषी विद्यापीठांच्या  विविध पिकांचे संशोधित नऊ वाण, १५ कृषी औजारांसह १९५ शिफारसींना मान्यता

आणि

·      दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा ११३ धावांनी विजय, दुबईत १९ वर्षाखालच्या आशिया चषक एकदिवस क्रिकेट स्पर्धेत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश

***

राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांचं वाढतं प्रमाण आणि ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग यामुळे पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाविषयक तज्ज्ञ समितीच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा केल्यावर निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भातला आदेश रात्री उशिरा जारी करण्यात आला. हे सर्व निर्बंध आज मध्यरात्रीपासून लागू होतील.

खुल्या मैदान किंवा बंदिस्त सभागृहातल्या विवाह सोहळ्यांमध्ये केवळ ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी असेल. सर्वच राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांत फक्त ५० लोकांनाच सहभागी होण्यास परवानगी असेल, तसंच अंत्यविधीसाठी २० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. रुग्णसंख्या वाढणाऱ्या जिल्हे किंवा महापालिका हद्दीत निर्बंध कठोर करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला बहाल करण्यात आले आहेत. मावळत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांच्या स्वागतासाठी मुंबईसह विविध शहरे किंवा पर्यटनस्थळी चौपाट्या किंवा समुद्रकिनाऱ्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता या सर्व चौपाट्या बंद केल्या जाणार आहेत. सर्व पर्यटनस्थळांवर जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्य कृती दलाच्या या बैठकीत रुग्णसंख्या वाढत असल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. गर्दी नको या मुद्यांवर सर्वांचं एकमत असून, आणखी निर्बंधाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. 

****


राज्यात  ओमायक्रॉनची बाधा झालेले १९८ नव्या रुग्णांची काल नोंद झाली. या रुग्णांमध्ये १९० मुंबईतले, ठाण्यातले चार आणि सातारा, नांदेड, पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवडमधला प्रत्येकी एक रुग्ण आहे. यामुळे राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या ४५० झाली आहे, त्यापैकी १२५ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं.

दरम्यान, राज्यात एका ओमायक्रॉन बाधित रुग्णाच्या मृत्यूची काल नोंद झाली. पिंपरी- चिंचवडमध्ये २८ डिसेंबरला मृत्यू झालेल्या ५२ वर्षीय पुरुषाला ओमायक्रॉनची लागण झाली होती, असं गुरुवारी स्पष्ट झालं. नायजेरियातून प्रवास करून आलेल्या या रुग्णाला १३ वर्षे मधुमेहाचा त्रास होता़ पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात तो उपचार घेत होता.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे पाच हजार ३५८ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६६ लाख ७० हजार ७५४ झाली आहे. काल २२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार ५१८ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल एक हजार १९३ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६५ लाख सात हजार ३३० रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ५५ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १८ हजार २१७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ५३ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर बीड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

औरंगाबाद आणि उस्मानाबद जिल्ह्यात प्रत्येकी १६ रुग्ण आढळले. लातूर आठ, परभणी सात, जालना चार, तर बीड जिल्ह्यात दोन नव्या रुग्णांची नोंद झाली. नांदेड तसंच हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणू संसर्गाच्या रूग्ण संख्येत होत असलेली वाढ, ही तिसऱ्या लाटेची चाहूल असल्याचं जाणवतं असल्यामुळे याला रोखण्यासाठी लातूर जिल्ह्यात नागरिकांनी दक्ष राहून पथ्य पाळावीत, असं आवाहन, पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. तिसऱ्या लाटेचा कमीत कमी परिणाम राहण्याच्या दृष्टीनं जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांचं काटेकोर पालन करणं आवयश्यक असल्याचं ते म्हणाले. या संसर्ग प्रादूर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी लातूर जिल्ह्यात लसीकरण मोहिम गतीमान करणं गरजेचं असून, ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही, त्यांनी तत्काळ घ्यावी असं आवाहनही देशमुख यांनी केलं आहे.

****

ओमायक्रॉन विषाणुच्या संक्रमणाच्या पार्श्र्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातल्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन, जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर यांनी केलं आहे. आरोग्याच्या दृष्टीनं खबरदारी म्हणून एकत्र न येता यावर्षी नववर्षाचं स्वागत घरीच राहून करण्याचं अआवाहन, त्यांनी केलं.

औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनीही नव वर्षाचं स्वागत साधेपणानं करण्याचं आवाहन केलं आहे.

****

यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी या लघु कथा संग्रहासाठी किरण गुरव यांना, तर ‘रक्तचंदन या काव्य संग्रहासाठी संजीव वेर्णेकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘काळे करडे स्ट्रोक्स या मराठी कादंबरीसाठी प्रणव सखदेव यांना, तर ‘काव्य परमल या कोकणी काव्यसंग्रहासाठी, श्रद्धा गरज यांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. बाल साहित्याच्या क्षेत्रात ‘जोकर बनला किंगमेकर या कादंबरीसाठी संजय वाघ यांना, तर कोकणीमध्ये सुमेधा देसाई यांना लघुकथा संग्रहासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे.

****

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरच्या हल्ल्याच्या गुन्ह्यातले आरोपी भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे तसंच अन्य एकाचा अटकपूर्व जामीन अर्ज, सिंधूदुर्ग जिल्हा न्यायालयानं काल फेटाळला. या अर्जावर दोन्ही बाजुंकडून दोन दिवस सुनावणी सुरू होती. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याबाबत विचार सुरु असल्याचं, राणे यांच्या वकिलानं काल वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.

****

राज्य सरकारच्या मराठी भाषा सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीत डॉ. श्रीपाद जोशी, पंडित विद्यासागर, डॉ. सुहास पळशीकर, डॉ. केशव देशमुख, डॉ. चिन्मय धारुरकर, पी. विठ्ठल, डॉ. रमेश वरखेडे, डॉ. वंदना महाजन आदींचा समावेश आहे. राजभाषा मराठीचं धोरण ठरवण्यासाठी ही समिती काम करेल.

****

सध्या शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप केला जात आहे, त्यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरण्याची भीती वाटत असल्याचं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर विजय पांढरीपांडे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं विद्यापीठ विकास मंच आयोजित विद्यापीठ स्वायत्तता वाचवा अभियाना अंतर्गत, महाविकास आघाडी सरकारच्या विद्यापीठ सुधारणा कायदा २०१६ संदर्भात, गोलमेज परिषदेचं आयोजन काल करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. गुणवत्तेपेक्षा संख्यात्मक गोष्टींना अधिक महत्त्व दिलं जात आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेचं मोठं नुकसान होत असल्याचं, ते म्हणाले.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारनं विद्यापीठ कायद्यामध्ये, कुलगुरूच्या निवडीमध्ये राजकिय हस्तक्षेप वाढवणारा कायदा केल्याच्या निषेधार्थ काल औरंगाबादमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं.

****

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि पुण्याच्या महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या वतीनं काल परभणी इथं ४९वी कृषी संशोधन आणि  विकास समितीची बैठक पार पडली. या बैठकीत चारही कृषी विद्यापीठांनी संशोधित केलेल्या विविध पिकांचे नऊ वाण, १५ कृषी औजारांसह १९५ शिफारसींना मान्यता देण्यात आली. जागतिक पातळीवर उपयुक्त असं कृषी संशोधन राज्यातल्या शेतकऱ्यांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करावा, असं आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी यावेळी केलं. 

****


औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड - कन्नड मार्गावर वऱ्हाडाला घेऊन निघालेल्या पिकअप वाहन आणि ट्रॅक्टर यांच्या भीषण अपघातात मंगरुळ इथल्या एकाच कुटुंबातल्या सहा जणांचा मृत्यू झाला. काल पहाटे हा अपघात झाला. यात १४ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****

उस्मानाबाद शहराच्या उत्पन्नात वाढ करण्यासह केन्द्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमधून शहराच्या विकासासाठी काम केल्याचं, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी सांगितलं. नगर पालिकेच्या अध्यक्षपदाच्या शेवटच्या दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कार्याचा आढावा यावेळी घेतला.

***

भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी क्रिकेट सामना ११३ धावांनी जिंकला. सेंच्युरीयन इथं काल पाचव्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा संघ ३०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, केवळ १९१ धावांवर बाद झाला. चार बाद ९४ धावांवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाचे फलंदाज भारतीय माऱ्यासमोर झटपट बाद झाले. जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी तीन तर मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन अश्र्विन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. शतकवीर के. एल. राहूलला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भारतानं तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत या विजयानं एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतला दुसरा कसोटी सामना तीन ते सात जानेवारी दरम्यान जोहान्सबर्ग इथं होणार आहे.

****

दुबईत शारजा इथं १९ वर्षाखालच्या आशिया चषक एकदिवस क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतानं बांग्लादेशावर १०३ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात बांग्लादेशानं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. शेख रशीद  ९० धावांची तडाखेबंद खेळी केल्यामुळं भारतानं बांग्लादेशासमोर विजयासाठी २४४ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.

****

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.12.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Thursday, 30 December 2021

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.12.2021 रोजीचे रात्री 09.15 ते 09.30 वाजेच...

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 30.12.2021 रोजीचे कोरोना वृत्त विशेष

आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक 30.12.2021 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे ...

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 December 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 December 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० डिसेंबर २०२ सायंकाळी ६.१०

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं, चिंता वाढली आहे. सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ९६१.

·      संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नियमांचं पालन करण्याचं उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांचं आवाहन.

·      सिल्लोड तालुक्यातल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू.

आणि

·      भारताचा दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ११३ धावांनी विजय.

****

देशभरातल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ९६१ झाली आहे. यापैकी सर्वाधिक २६३ रुग्ण दिल्लीतले आहेत, तर २५२ रुग्ण महाराष्ट्रातले आहेत. देशभरात आत्तापर्यंत २२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ओमायक्रॉननं शिरकाव केला असल्याचं आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे. आजवर आढळलेल्या ओमायक्रॉन बाधितांपैकी ३२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या जनतेला नियमांचं पालन करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. आज पुणे इथं एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे आवाहन केलं आहे. कोरोना आणि ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असल्यानं नागरिकांनी विनाकारण गर्दी करु नये, नववर्षाचं स्वागत घरी राहूनच करावं, असं त्यांनी म्हटलं आहे. अनेक राज्यांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले असून, आपल्या राज्यात अशी वेळ येऊ देऊ नये, असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरीकांनी या संसर्गाच्या प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करावं, पोलिसांवर कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे.

****

अत्यंत वेगानं पसरत असलेल्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या स्वरुपाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात कलम १४४ लागू केलं आहे. याबाबतचा आदेश मुंबई पोलिसांनी जारी केला आहे. हा आदेश आजपासून येत्या सात जानेवारीपर्यंत लागू राहील.

****

गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणू संसर्गाच्या रूग्ण संख्येत होत असलेली वाढ, ही तिसऱ्या लाटेची चाहूल असल्याचं जाणवतं असल्यामुळं याला रोखण्यासाठी लातूर जिल्ह्यात नागरिकांनी दक्ष राहून पथ्य पाळावीत, असं आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तसंच लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. तिसऱ्या लाटेचा कमीत कमी परिणाम राहण्याच्या दृष्टीनं जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन करणं आवयश्यक असल्याचं ते यावेळी म्हणाले. या संसर्ग प्रादूर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी लातूर जिल्ह्यात लसीकरण मोहिम गतीमान करणं गरजेचं असून, ज्यांनी अद्याप लसीकरण केलेलं नाही, त्यांनी तत्काळ करुन घ्यावं असं अवाहनही देशमुख यांनी केलं आहे.

****

ओमायक्रॉन विषाणुच्या संक्रमणाच्या पार्श्र्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातल्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन ईटनकर यांनी केलं आहे. आरोग्याच्या दृष्टीनं खबरदारी म्हणून एकत्र न येता यावर्षी नववर्षाचं स्वागत घराबाहेर न पडता अत्यंत साधेपणानं घरच्या घरीच करा, असं विटणकर यांनी म्हटलं आहे.

औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनीही नववर्षाचं स्वागत साधेपणानं करण्याचं आवाहन केलं आहे. नागरिकांनी घरीच राहून नववर्षाचा आनंद साजरा करावा, असं त्यांनी म्हटलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड परिसरात एक प्रवासी वाहन आणि ट्रॅक्टर दरम्यान काल मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. सिल्लोड - कन्नड मार्गावर मोढा फाटा इथं ही दुर्घटना झाली. मृतांमध्ये सिल्लोड तालुक्यातल्या मंगरुळ इथल्या एकाच कुटुंबातले सदस्य असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लग्नावरून परतणाऱ्या एका प्रवासी वाहनानं उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या भीषण अपघातानंतर या भागातली वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

****

भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला कसोटी क्रिकेट सामना ११३ धावांनी जिंकला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ ३०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना १९१ धावांवर बाद झाला. आज पाचव्या दिवशी यजमान संघानं चार बाद ९४ धावांवरुन पुढं खेळण्यास सुरुवात केली होती. कर्णधार डीन एल्गरनं एकाकी झुंज देताना ७७ धावा केल्या. जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी तीन तर मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन अश्र्विन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. पहिल्या डावात शतक झळकवणारा सलामीवीर के. एल. राहूल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारतानं एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा कसोटी सामना तीन ते सात जानेवारी दरम्यान होणार आहे.      

****

कथाकार किरण गुरव यांच्या  `बाळूच्या अवस्थांतराची डायरी` या लघु कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा या वर्षीचा पुरस्कार जाहिर झाला आहे. आज या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.  `जोकर बनला किंगमेकर` या संजय वाघ यांच्या कादंबरीला या अंतर्गत बालसाहित्य पुरस्कार जाहिर झाला आहे. तर प्रणव सखदेव यांच्या `काळे करडे  स्ट्रोक्स` या कादंबरीला युवा साहित्य पुरस्कार जाहिर झाला आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यात केसराळी शिवारात काल संध्याकाळी गारांचा पाऊस झाला. या पावसामुळं रब्बी पिकांचं नुकसान झालं आहे.

****

मराठा आरक्षण आंदोलनात आठ ऑगस्ट २०१८ रोजी मृत्यूमुखी पडलेल्या लातूर जिल्ह्यातल्या माटेफळ इथले दिवंगत रमेश ज्ञानोबा पाटील यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता मदत निधीचा धनादेश आज लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला.

//**************//