Friday, 30 June 2017

AIR News Bulletin, Aurangabad 30.06.2017....17.25

Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.06.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 June 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जून  २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

देशात वस्तू आणि सेवा कर प्रणाली - जीएसटी लागू करण्याची सगळी तयारी पूर्ण झाली असून, आज रात्री बारा वाजता संसदेच्या सेंट्रल हॉल मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात जीएसटीची औपचारिक सुरुवात होणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सर्व केंद्रीय मंत्री, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. गेल्या सात दशकांपासून देशात लागू असलेल्या एक डझनपेक्षा अधिक राज्य आणि केंद्रीय करांच्या जागी आता एकच करप्रणाली सुरु होणार आहे.
जीएसटी हे एक परिवर्तन असून, सगळ्या व्यवसायिकांनी त्याचा लाभ घेण्याचं आवाहन, केंद्रीय नागरी विकास मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. केंद्र आणि राज्यांची अर्थव्यवस्था यामुळे एकत्र येणार असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, विमुद्रीकरणाप्रमाणे संस्थात्मक तयारीशिवाय जीएसटीची अंमलबजावणी होत असल्याचं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. जीएसटी कर प्रणाली देशाच्या दृष्टीनं महत्वाची आहे, मात्र अर्धवट तयारीवर त्याची अंमलबजावणी होत असल्याचं ते म्हणाले. जीएसटीच्या कार्यक्रमावर काँग्रेस पक्षानं बहिष्कार टाकला आहे. 

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या गांधीनगर इथं टेक्स्टाईल इंडिया २०१७ या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. भारतीय वस्त्रोद्योग आणि हातमागाचा जगभर प्रचार प्रसार करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात १०० देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

****

जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात सीमारेषेवर पाकिस्ताननं आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यावेळी त्यांनी लष्करी चौक्या आणि नागरी वस्त्यांवर उखळी तोफांचा मारा केला. या हल्ल्यात एक स्थानिक महिला जखमी झाल्याचं वृत्त आहे.

****

राज्य आणि देशाच्या विकासात व्यापारी-उद्योजकांचं मोठं योगदान असून, वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये प्रामाणिकपणे व्यापार करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस त्रास होणार नाही, अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. मुंबई इथं उद्योग व्यापारी जगतातल्या प्रतिनिधींशी मुनगंटीवार यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर येणाऱ्या अडचणी, शंकांचं निरसन करण्यासाठी विक्रीकर विभागानं एक हेल्पलाईन सुरु केली आहे. एक आठ शून्य शून्य दोन दोन पाच नऊ शून्य शून्य या क्रमांकावर फोन करून राज्यातली कोणतीही व्यक्ती, उद्योजक-व्यापारी आपल्या शंका विचारु शकतील, असं ते म्हणाले.

****

मराठी भाषा सल्लागार समितीनं आज राज्य शासनाला मराठी भाषा धोरणाचा सुधारीत मसुदा सादर केला असून, या मसुद्यावर संबंधीत विभागाचे अभिप्राय घेतल्यानंतर मराठी भाषा विभागामार्फत सदर मसुदा मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मांडण्यात येईल, असं मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. मंत्रीमंडळानं या धोरणास मंजूरी दिल्यानंतर मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल, असं ते म्हणाले. भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी आज तावडे यांना मराठी भाषा धोरणाचा मसुदा सादर केला, त्यावेळी ते बोलत होते.

****

राज्यात उद्यापासून सात जुलैपर्यंत वन महोत्सव सप्ताह राबवण्यात येणार आहे. त्याअंतर्गत मराठवाड्यात चौऱ्याहत्तर लाख वृक्ष लागवडीचं उद्दीष्ट आहे. या सप्ताहाअंतर्गत प्रामुख्यानं टेकड्या, शासकीय पडीक जमीन, गायरान शेतांचे बांध, रस्ते, रेल्वेच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्याचं आवाहन विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी केलं आहे. यासाठी वृक्ष आपल्या दारी योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात रोपं उपलब्ध करुन दिल्याचं ते म्हणाले. मराठवाड्यात आठ जिल्ह्यातल्या शहात्तर तालुक्यांत २७७ रोपवाटीकांमध्ये एक कोटी ३४ लाख रोपं तयार करुन लागवडीसाठी तयार ठेवली आहेत.   
जालना जिल्ह्यात आठ लाख ५० हजार वृक्ष लागवडीचं उद्दीष्ट असून, या मोहीमेत नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे.

****

भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान सुरु असलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तीसरा  सामना आज अँटीग्वा इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेतला पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला, तर दुसऱ्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर १०५ धावांनी विजय मिळवल्यामुळे भारत मालिकेत एक - शून्यनं आघाडीवर आहे.

****

धुळे जिल्ह्यात आज दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार तर १२ जण जखमी झाले. सुरत रस्त्यावर अज्ञात वाहनानं दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरीकडे सुरत नागपूर महामार्गावर आनंदखेडे गावाजवळ लक्झरी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात १२ जण जखमी झाले. जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

****

AIR News Bulletin, Aurangabad 30.06.2017....13.00

Text - AIR News Bulletin, Aurangabad - 30.06.2017 - 13.00

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 June 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जून २०१ दुपारी .००वा.
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटी प्रणालीच्या अंमलबजावणीची सुरुवात आज रात्री बारा वाजता होणार असून, या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहीष्कार टाकला आहे. विरोधकांनी आपल्या या निर्णयावर पुनर्विचार करावा, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. ही कर प्रणाली लागू करण्याचा निर्णय सर्व पक्षांच्या संमतीनं घेतला असल्याचं ते म्हणाले. विरोधी पक्षांचा हा निर्णय दुर्देवी असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जीएसटी लागू झाल्यानंतर कमी झालेल्या करांचा लाभ पारदर्शक पद्धतीनं ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन जेटली यांनी केलं आहे. नवी दिल्ली झालेल्या उद्योग महासंघाच्या बैठकीत ते बोलत होते. 
****
आधार क्रमांक किंवा त्यासाठी देण्यात आलेल्या नोंदणी ओळख क्रमांकाशिवाय करदात्यांना एक जुलैपासून प्राप्तीकर विवरणपत्र भरता येणार नाही, असं आयकर विभागानं सांगितलं आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत पॅन रद्द केलं जाणार नाही, असं विभागानं नमू्द केलं आहे. जे नागरिक एल जुलैपर्यंत आधार पॅनशी जोडू शकणार नाहीत, त्यांना ई प्राप्तीकर विवरणपत्र भरताना भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरणानं दिलेल्या क्रमांकाचा उल्लेख करण्याचा पर्याय असेल आणि ते या दोन्ही विशिष्ठ क्रमांकांना जोडण्याचं वैध माध्यम मानलं जाईल, असं प्राप्तीकर विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. तसंच जे पॅन आधारशी संलग्न नाही, ते रद्द केलं जाणार नाही. पॅन साठी अर्ज करताना एक जुलैपासून आधार अनिवार्य करण्यात आलं आहे. 
****
युरोपियन नेत्यांनी पुढच्या आठवड्यात होणाऱ्या जी - ट्वेंटी शिखर परिषदेत ऐतिहासिक पॅरिस हवामान कराराचं समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे. वॉशिंग्टन बरोबरच्या प्रदीर्घ संबंधांचा आदर आहे, मात्र जागतिक तापमान वाढीच्या समस्येवर तोडगा काढण्यापासून मागे हटणार नसल्याचं, जर्मनी, फ्रांस, इटली आणि युरोपियन संघाच्या नेत्यांनी म्हटलं आहे. येत्या सात आणि आठ जुलैला जर्मनी इथं होणाऱ्या या परिषदेत  पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहेत. दहशतवादाचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजनांवरही या परिषदेत चर्चा होणार आहे.      
****
मादक पदार्थ सेवन प्रतिबंधासाठी कडक उपाययोजना करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित या संदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. डोपिंगची कारणं शोधून काढण्याला आपलं मंत्रालय प्राधान्य देत असल्याचं ते म्हणाले.   
****
जम्मू काश्मीरमध्ये हवामानाच्या स्थितीत सुधारणा झाल्यामुळे पहलगाम आणि बालटाल मार्गे जाणारी अमरनाथ यात्रा पुन्हा सुरु झाली आहे. या भागात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे यात्रा काही तासांसाठी थांबवण्यात आली होती. 
****
दक्षिण मध्य रेल्वे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी आदिलाबाद, नगरसोल आणि अकोला इथून विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे. आदिलाबाद - पंढरपूर ही गाडी तीन जुलैला सकाळी नऊ वाजता आदिलाबाद इथून सुटून दुपारी एक वाजता नांदेड इथं आणि परभणी, परळी, मार्गे चार तारखेला पहाटेच्या सुमारास पंढरपूरला पोहोचेल.
नगरसोल - पंढरपूर ही गाडी नगरसोलहून संध्याकाळी साडेपाचला सुटून औरंगाबाद, परभणी, परळी, लातूर मार्गे पंढरपूरला सकाळी १० वाजता पोहोचेल.
अकोला - पंढरपूर ही गाडी अकोल्याहून तीन जुलैला रात्री आठ वाजता सुटेल. या गाडीचे डबे परभणी इथं नगरसोल - पंढरपूर गाडीला जोडण्यात येणार आहेत.
दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं अतिरिक्त रेल्वे सोडण्याची मागणी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे.
****
आषाढी वारीसाठी निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज माळशिरसहून बेळापूरकडे मार्गस्थ झाली. पालखीचं दुसरं गोल रिंगण खूडुसफाटा इथं पार पडलं. संत तुकाराम महाराजांची पालखी अकलूजचा मुक्काम आटोपून बोरगावकडे मार्गस्थ झाली. माळीनगर इथं पालखीचा उभा रिंगण सोहळा पार पडला. तर पैठणहून निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी कुर्डूहून अरणकडे मार्गस्थ झाली.
****
जुलै ऑगस्ट २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परिक्षांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत शिक्षण मंडळानं वाढवली आहे. उद्यापासून अतिविलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. सर्व माध्यमिक शाळांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं केलं आहे. 
****
तुर्की इथं सुरु असलेल्या अंताल्या खुल्या टेनिस स्पर्धेत भारतीय टेनिसपटू लिएंडर पेसचं पुरुष दुहेरीतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. उपान्त्य फेरीत पेस आणि कॅनडाचा शमसुदीन या जोडीचा माराच आणि पॅविक जोडीनं सहा - चार, सहा - चार असा पराभव केला.
****

AIR News Bulletin, Aurangabad 30.06.2017....10.00

Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.06.2017 - 10..


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

३० जून २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

देशातली सर्वात मोठी कर सुधारणा म्हणून ओळखली जाणारी वस्तू अणि सेवा कर - जीएसटी प्रणाली आज मध्यरात्रीपासून देशभर लागू होणार आहे. ‘एक देश एक कर’ या धोरणानुसार या कर प्रणालीची निर्मिती करण्यात आली आहे. यानिमित्त केंद्र सरकारनं संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आज रात्री अकरा वाजता एका विशेष समारंभाचं आयोजन केलं आहे. मध्यरात्री बारा वाजता घंटानाद करून ही प्रणाली लागू झाल्याची घोषणा केली जाईल.

****

राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनानं घेतल्यानंतर त्यासाठी आपलंही योगदान असावं या भावनेनं विविध व्यक्ती आणि संस्था शेतकऱ्यांसाठी मदत करत आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुंबईतल्या हरमन फिनोकेम या संस्थेनं मुख्यमंत्री सहायता निधीस २५ लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मदतीबद्दल संस्थेचे विशेष आभार मानले आहेत.

****

राज्यातल्या ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जामाफीचा लाभ देण्यासाठी आणलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजने’चं राष्ट्रवादी काँग्रेस स्वागत करत असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. तटकरे यांनी काल वार्ताहरांशी संवाद साधून पक्षाची भूमिका मांडली.

****

नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं झालेल्या तिहेरी वाहनांच्या अपघातात धुळे इथले चौघे जण जागीच ठार झाले. काल रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.

****

हिंगोली जिल्ह्यात खरिपाच्या ८१ टक्के पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात खरिपाच्या एकूण क्षेत्रापैकी तीन लाख ४० हजार हेक्टरवर पेरणीचं नियोजन आहे, यापैकी दोन लाख ७८ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये सुमारे एक लाख ६४ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाल्याचं वृत्त आहे.

****

AIR News Urdu Bulletin, Auragnabad. Date:30.06.2017, Time:8.40-8.45 AM


Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date: 30 June 2017
Time: 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۳۰ ؍جون  ۲۰۱۷؁ء
وقت : صبح  ۴۰-۸ سے  ۴۵-۸

 ملک کی سب سے بڑی ٹیکس اصلا حات کے تحت گوڈس اینڈ سر وِس ٹیکس GST آج در میا نی شب سے ملک بھر میں نافذ العمل ہو جائیگا۔
ایک ملک ایک ٹیکس پا لیسی کے مطابق یہ نظام تیار کیا گیا ہے۔ اِس خصوص میں مرکزی حکو مت نے پار لیمنٹ کے وسطی ہال میں شب11؍ بجے ایک خصو صی پرو گرام کا انعقاد کیا ہے جس میں رات12؍ بجے گھنٹہ بجا کر GST کے نفاذ کا اعلان کیا جا ئیگا۔ صدر جمہو ریہ پر نب مکھر جی ،
نائب صدر جمہوریہ حامد انصاری، وزیر اعظم نریندر مودی،لوک سبھا اِسپیکر سُمِتّرا مہا جن ، سابق وزیر اعظمH. D. Deve Gowda  اور
 دیگر قائدین اِس پرو گرام میں شر کت کریں گے۔
 دریں اثناء کانگریس نے اِس پرو گرام میں شر کت نہ کرنے کا فیصلہ کیا ہے۔ کانگریس صدر سو نیا گاندھی  اورسابق وزیر اعظم ڈاکٹر منمو ہن سنگھ سمیت کانگریس کے اہم قائدین کے اجلاس میں کل یہ فیصلہ کیا گیا۔ سماج وادی پارٹی،DMK بائیں بازو کی جماعتوں اور تِرنمول کانگریس نے بھی اِس پروگرام کے بائیکاٹ کا اعلان کیا ہے۔
****************************
 نائب صدر جمہو ریہ حامد انصا ری کے عہدے کی معیاد 10؍ اگست کو مکمل ہو رہی ہے اِس سے قبل 5؍ اگست کو نائب صدر کے عہدے کے لیے اِنتخا ب کر وائے جائیں گے۔ اعلیٰ انتخا بی کمِشنر نسیم زیدی نے کل نئی دہلی میں ایک اخبا ری کانفرنس میں یہ اطلاع دی۔ اِس انتخا ب کے لیے در خواست نامزد گی داخل کر نے کی آخری تاریخ 18؍ جو لائی ہے۔ نسیم زیدی نے بتا یا کہ 5؍ اگست کو ووٹ ڈالے جائیں گے اور اِسی دن ووٹوں کی گنتی بھی عمل میں آئے گی۔
****************************
 وزیر اعلی ٰ دیویندر پھڑ نویس نے حکم دیا ہے کہ آبرسانی کے مراٹھواڑہ گرِڈ کے لیے فی الفور مُشیر نامزد کر کے تر جیحی بنیاد پر کام شروع کیا جائے۔ محکمۂ آ برسانی کا جائزاتی اجلاس وزیر اعلیٰ کی زیر صدارت کل ممبئی میں منعقد ہوا۔ اِس اجلاس سے خطاب کرتے ہوئے اُنھوں نے کہا کہ چھوٹے آبرسانی منصوبوں کے لیے شمسی توا نا ئی کے آلات کے ذریعے بجلی فراہم کی جائیگی جس سے مصا رف میں کمی ہوگی۔
****************************
 وزیر صحت ڈاکٹر دیپک سا ونت نے کہا ہے کہ سوائن فلو سمیت مختلف وبائی امراض کے علاج اور اُن کے تدا رک کی اسکیموں پر عمل در آ مد کے لیے متعلقہ ادارے عوامی بیدا ری پر توجہ دیں۔ ممبئی سمیت ریاست کے مختلف مقا مات پر سوائن فلو کے مریضوں کی تعداد میں اضا فے کے پیش نظر متعدی امراض سے متعلق کمیٹی کا اجلاس کل طلب کیا تھا۔ ریاست میں جنوری تا جون کے دوران سوائن فلو کے لیے 7؍ہزار سے زائد افراد کی جانچ کی گئی۔ جس میں سے ایک ہزار720؍ مریض سوائن فلو سے متا ثرہ قرار دیئے گئے۔
****************************
 شیو سینا سر براہ اُدّھو ٹھا کرے نے کہا ہے کہ ریاست کے کسا ن کو قر ض سے مکمل طور پر نجات ملنے تک اُن کی پارٹی جد و جہد جاری رکھے گی۔ کل ناندیڑ میں ایک پرو گرام سے خطاب کر تے ہوئے اُنھوں نے اپنے اِس مطالبے کا اعا دہ کیا کہ کسا نوں کے2017؁ء تک کے سا ت بارہ پر سے قرض کا نام و نشان مٹ جا نا چا ہیے۔ اِس کے علا وہ اُنھوں نے مطالبہ کیا کہ آ بپا شی منصو بے مکمل کیئے جائیں اور کسا نوں کو 24؍ گھنٹے بجلی مہیا کی جائے۔ شیو سینا سر براہ نے انتباہ دیا کہ کسا نوں کے مکمل طور پر مطمئن ہو جانے تک سمرُدّھی ایکسپریس وے کا کام ہونے نہیں دیا جائیگا۔ اپنے اِس دورے میں اُدّھو ٹھا کرے نے ناندیڑ کے علا وہ پر بھنی، ہنگولی اور جالنہ کے کسا نوں سے بھی گفتگو کی۔
****************************
 راشٹر وادی کانگریس کے ضلع صدر سنیل تٹکرے نے کہا ہے کہ ریاست کے نواسی لاکھ کسا نوں کو قر ض معا فی کا فائدہ بہم پہنچا نے کے لیے لائی گئی چھتر پتی شیوا جی مہا راج کرشی سنمان یو جنا کا اُن کی پار ٹی خیر مقدم کر تی ہے۔ کل ایک اطلا عی کانفرنس میں اپنی پار ٹی کے موقف کی وضا حت کر تے ہوئے تٹکرے نے کہا کہ اُن کی پارٹی اُمید کر تی ہے کہ اِس اسکیم کے نفاذ میں شفا فیت ہو گی اور مطالبہ کیا کہ قر ض معا فی کا عمل اندرون ایک ماہ مکمل کر لیا جائے ۔
****************************
 اورنگ آ با د ضلع سہکا ری دودھ اُتپا دن سنگھ نے دودھ کی قیمت فروخت میں فی لیٹر4؍ روپئے کا اضا فہ کیا ہے۔
 اِس طرح اب کل سے مہا نند دودھ44؍ روپئے فی لیٹر کے حساب سے دستیاب ہو گا۔ اِس تنظیم کے صدر ہری بھائو باگڑے کی زیر صدارت کل منعقدہ ایک اجلاس میں یہ فیصلہ کیا گیا۔ جموں و کشمیر میں اپنی جان کا نذرانہ پیش کرنے والے سِلّوڑ تعلقے کے سندیپ جا دھَو کے افراد خاندان کو 2؍ لاکھ روپئے کی امداد  دینے کا فیصلہ بھی اِس اجلاس میں کیا گیا۔
****************************
 

AIR News Bulletin, Aurangabad 30.06.2017....06.50

Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.06.2017 - 06.50

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 June 2017
Time – 06.50 AM to 07.00 AM
Language - Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जून २०१७ सकाळी ०६.५० मि.
****
·      वस्तू अणि सेवा कर - जीएसटी प्रणाली आज मध्यरात्रीपासून देशभर लागू होणार
·      उपराष्ट्रपती पदासाठी पाच ऑगस्टला निवडणूक
·      शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होईपर्यंत शिवसेनेचा संघर्ष सुरु राहील - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा इशारा
आणि
·      दुधाचे दर प्रतिलिटर चार रूपयांनी वाढवण्याचा औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा निर्णय
****
देशातली सर्वात मोठी कर सुधारणा ओळखली जाणारी वस्तू अणि सेवा कर - जीएसटी प्रणाली आज मध्यरात्रीपासून देशभर लागू होणार आहे. 'एक कर एक देश' या धोरणानुसार या कर प्रणालीची निर्मिती करण्यात आली आहे. यानिमित्त केंद्र सरकारनं संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात रात्री अकरा वाजता एका विशेष समारंभाचे आयोजन केले आहे. मध्यरात्री बारा वाजता घंटानाद करून ही प्रणाली लागू झाल्याची घोषणा केली जाईल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा आणि डॉक्टर मनमोहन सिंग यावेळी उपस्थित राहतील.
दरम्यान, काँग्रेस पक्षानं या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. समाजवादी पाटी, द्रवीड मुनेत्र कळघम आणि डाव्या आघाडीसह तृणमूल काँग्रेसही या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचं संबंधित पक्षांच्यावतीनं सांगण्यात आलं.
****
उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ १० ऑगस्टला संपणार असून, त्यापूर्वी पाच ऑगस्टला उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १८ जुलै असून, पाच ऑगस्टला मतदानानंतर लगेचच मतमोजणीही होणार असल्याचं, झैदी यांनी सांगितलं.
****
पाणीपुरवठ्याच्या मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी लवकरात लवकर सल्लागार नेमून प्राधान्यानं कामास सुरुवात करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. लहान पाणीपुरवठा योजनांना सौरऊर्जा संयंत्राच्या माध्यमातून वीज पुरवठा केल्यास खर्चात बचत होईल, सौरऊर्जा संयंत्रांसाठी केंद्र शासनाच्या एनर्जी इफीसिएन्शी कॉर्पोरेशन कंपनीशी करार करुन कार्यवाही करता येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
स्वाईन फ्ल्यूसह जलजन्य साथरोगांवर उपचाराबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी यंत्रणांनी जाणीव जागृतीवर भर द्यावा, असं आवाहन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केलं आहे. मुंबईसह राज्यात स्वाईन फ्ल्युच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी काल साथरोग नियंत्रण समितीची बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात जानेवारी ते जून या कालावधीत स्वाईन फ्ल्यू सदृश सुमारे साडे सात हजारावर रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक हजार ७२० जणांना स्वाईन फ्ल्यूचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं होतं यापैकी २६१ जणांचा मृत्यू झाला. स्वाईन फ्ल्युचा प्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून ऑसेलटॅमीवीर हे औषध पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचं, आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं.
****
राज्यातला शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होईपर्यंत शिवसेनेचा संघर्ष सुरु राहील, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल नांदेड इथं शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलत होते. शेतकऱ्यांचा २०१७ पर्यंतचा सातबारा कोरा झाला पाहिजे, या मागणीचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. सिंचनाचे प्रकल्प पूर्ण झाले पाहिजे, शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळाली पाहिजे, असं ते म्हणाले. शेतकऱ्यांचं संपूर्ण समाधान झाल्याशिवाय समृद्धी महामार्गाचं काम होऊ दिलं जाणार नाही, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. आपल्या या दौऱ्यात ठाकरे यांनी नांदेडसह, परभणी, हिंगोली आणि जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला.
****
राज्यातल्या ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी आणलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजने’चं राष्ट्रवादी काँग्रेस स्वागत करत असल्याचं, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. तटकरे यांनी काल वार्ताहरांशी संवाद साधून पक्षाची भूमिका मांडली. या योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता असावी, अशी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची अपेक्षा असल्याचं, तटकरे म्हणाले. संपूर्ण कर्जमाफीची प्रक्रिया महिन्याभरात पूर्ण करावी, कर्जमाफीसंदर्भातल्या प्रक्रियेविषयी वेळोवेळी माहिती द्यावी, शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात रक्कम जमा झाल्यानंतर त्यासंदर्भातली जिल्हानिहाय माहिती दररोज सादर करावी, शेतकऱ्यांना नुकत्याच दिलेल्या दहा हजार रुपये पीककर्जाचा तपशील दोन दिवसांत द्यावा, आदी मागण्या त्यांनी यावेळी मांडल्या.
****
हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दूध विक्री दरात लीटरमागे चार रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे उद्या शनिवारपासून महानंद दूध ४४ रुपये प्रतिलीटर या दरानं मिळेल. दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण आलेले सिल्लोड तालुक्यातल्या केळगाव इथले जवान संदीप जाधव यांच्या कुटुंबाला दोन लाख रुपये मदत देण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला.
****
लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषद तसंच महापालिकेच्या शाळा डिजीटल करण्यासाठी सौर उर्जा यंत्रणा बसवून दिली जाणार असल्याचं, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. ते काल लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. लातूर शहरातील विद्युत व्यवस्था सु़रळीत करण्यासाठी ४४ कोटी रुपये मंजूर केले असून, जिल्ह्यातल्या निलंगा, अहमदपूर, उदगीर, औसा या शहरात वीजपुरवठा सुधारण्यासाठी निधी मंजूर केल्याचं, ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं. लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची ८०० कोटी रुपये थकबाकी भरण्यासाठी सुलभ हप्ते पाडून दिले जाणार असल्याचं ऊर्जामंत्री म्हणाले. बाबनकुळे यांच्या हस्ते काल लातूर जिल्ह्यातील तीन वीज उपकेंद्राचं भुमिपूजन झालं.
दरम्यान, उस्मानाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलताना ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी वीज चोरांवर गुन्हे नोंदवण्यासाठी राज्यातल्या सर्व पोलिस स्थानकांना अधिकार देण्यात आले असल्याचं सांगितलं. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ८२२ शाळांमध्ये सौर ऊर्जेवर वीज पुरवठा करण्यासाठी दोन कोटी रुपये अनुदान मंजुर केल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातली मद्य विक्रीची दुकानं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतरावर नेण्यात आल्यामुळे महसुलात १५ हजार कोटी रुपये तूट आली असल्याचं सांगतानाच, याबाबतच्या नियमात बदल करुन सात हजार दुकानं पुन्हा सुरु करण्यार येतील, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.    
****
महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतानं वेस्ट इंडिजवर सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला. काल झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करत, भारतासमोर १८४ धावांचं आव्हान ठेवलं, भारतीय संघाने स्मृती मंधानाच्या शतकी खेळीच्या जोरावर ४३ व्या षटकांत सात गडी राखून हे लक्ष्य साध्य केलं.
****
बीड जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सक्षम करण्यासाठी मिशन दिलासा हे अभियान राबवणार असल्याचं जिल्हाधिकारी एम डी सिंह यांनी सांगितलं आहे. शेतकऱ्यांचं मनोधैर्य वाढवणं तसंच त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरेल, असं ते म्हणाले. लातूर जिल्ह्यातही हे अभियान राबवलं जाणार असल्याचं, काल सांगण्यात आलं.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं काल शेतकरी संघटना आणि सुकाणू समितीच्या वतीनं अंबाजोगाई तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
****
गुणवत्तेच्या वाटचालीत विद्यार्थ्यांनी मोहाला दूर सारून सद्सद्विवेकबुध्दीने आगेकूच करावी, असं आवाहन ज्येष्ठ अभिनेते तथा दिग्दर्शक माधव वझे यांनी केलं आहे. लातूर इथल्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या ६६ व्या वर्धापनदिनानिमित्त काल आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते.
दरम्यान, संस्थेच्या अंबाजोगाई इथल्या खोलेश्वर माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
****
जालना तालुक्यातला बदनापूर तालुका उघड्यावर शौचापासून मुक्त झाला आहे. जिल्ह्यात परतूर, मंठा तसंच जाफ्राबाद तालुके यापूर्वीच उघड्यावर शौचापासून मुक्त झाले असून, वैयत्तिक शौचालय बांधकामात २०१७-१८ या वर्षात जालना जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
****

Thursday, 29 June 2017

AIR News Bulletin, DHWANICHITRA 29.06.2017....18.15

AIR News Bulletin, Aurangabad 29.06.2017....17.25

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.06.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 June 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ जून  २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

गो-रक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणं मंजूर नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज गुजरातमधल्या साबरमती आश्रमाच्या शताब्दी महोत्सवात बोलत होते.  हिंसेमुळे कोणतेच प्रश्न सुटले नाही आणि सुटणारही नाहीत, त्यामुळे कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशात वाढत चाललेल्या हिंसेच्या घटनांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. तत्पूर्वी पंतप्रधानांनी साबरमती आश्रमातल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन केलं.

****

गेल्या तीन वर्षात देशात झालेला विकास हा रोजगारविरहीत असल्याचा आरोप, नीति आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगडीया यांनी फेटाळून लावला आहे. जेव्हा विकास दर सात ते आठ टक्के असतो, तेव्हा त्यात निश्चितच रोजगार निर्माण होतात, या उपलब्ध रोजगारांची आकडेवारी शोधून काढण्यासाठी सांख्यिकी माहितीचं सुसूत्रीकरण आवश्यक असल्याचं ते म्हणाले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीनं आज मुंबईत आयोजित नीति आयोगाची कार्यक्रम पत्रिका आणि भारतीय अर्थव्यवस्था या चर्चासत्रात ते बोलत होते. भारतातले बहुतांश उद्योग मध्यम आणि लघु क्षेत्रात असल्यामुळे जागतिक पातळीवर मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करु शकत नाहीत, हे लक्षात घेऊन त्यांना तंत्रज्ञानाच्या वाटेनं सक्षम करणारी यंत्रणा निर्माण करण्यावर नीति आयोग भर देत असल्याचं पनगडीया यावेळी म्हणाले.

****

भारत ऊर्जा निर्मिती क्षेत्रात वेगानं प्रगति करत असल्याचं केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते. देशभरात नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांसाठी एक तंत्र स्थापन करणार असल्याचं ते म्हणाले. तसंच देशात वीजेचा वापर देखील वाढला असल्याचं त्यांनी नमूद केलं. 

****

वस्तू अणि सेवा कर - जीएसटी प्रणालीची औपचारिक सुरुवात उद्या रात्री बारा वाजता  संसदेत होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारनं मनमोहन सिंग यांच्यासह एच डी देवेगौडा यांनाही आमंत्रित केलं आहे. तृणमूल काँग्रेसही या कार्यक्रमात सहभागी होणार नाही. 

****

राज्यातला शेतकरी पूर्ण कर्जमुक्त होईपर्यंत शिवसेनेचा संघर्ष सुरु राहील, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज नांदेड इथं शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलत होते. २०१७ पर्यंतचा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. सिंचनाचे प्रकल्प पूर्ण झाले पाहिजे, शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळाली पाहिजे, असं ते म्हणाले. ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून, त्यांनी नांदेडसह, परभणी, हिंगोली आणि जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला.

****

सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा इथं एका वारकऱ्याचा विहीरीत पडून मृत्यू झाला. आज पहाटे ही दुर्घटना घडली. अहमदनगर जिल्ह्यातल्या खंडेराय महाराज पालखीतले ते वारकरी होते. तर करमाळा इथल्या तरुण वारकऱ्याचा फलटण इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ट्रकचा आज माळशिरस जवळ कळंबनाका इथं अपघात झाला. यात दहा वारकरी जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कटुंबियांना सक्षम करण्यासाठी मिशन दिलासा राबवण्याचा निर्णय घेतल्याचं, बीडचे जिल्हाधिकारी एम डी सिंह यांनी सांगितलं आहे. शेतकऱ्यांचं मनोधैर्य वाढवणं तसंच त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी मदत करण्यासाठी मिशन दिलासाचा उपयोग होणार असल्याचं ते म्हणाले. जिल्ह्यातल्या पात्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसाला एक लाख रुपये आर्थिक मदत दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

येत्या एक जुलैपासून राज्यात चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेची सुरुवात होणार आहे. नांदेड जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री अर्जून खोतकर यांच्या हस्ते होणार आहे. जिल्ह्याला दिलेलं वृक्षारोपणाचं उद्दीष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं योग्य नियोजन केलं असून, नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केलं आहे.

****

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत नाशिक विभागात नगर तालुक्यातलं हिवरेबाजार प्रथम आलं आहे. हिवरेबाजारला दहा लाख रुपयांचं बक्षिस जाहीर झालं आहे. आदर्शगाव हिवरेबाजारनं स्वच्छतेची गरज आणि त्यातील सातत्य टिकवून ठेवलं आहे. १९९२ मध्ये ग्राम अभियानात विभागात प्रथम येऊन याची सुरुवात झाली होती. 

****

AIR News Bulletin, Aurangabad 29.06.2017....13.00

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.06.2017 - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 June 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ जून २०१ दुपारी .००वा.

****

उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक पाच ऑगस्टला होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. मतमोजणीही पाच ऑगस्टलाच होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १८ जुलै असल्याचं झैदी यांनी सांगितलं. उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ १० ऑगस्टला संपणार आहे.  

दरम्यान, राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांचे नामांकन अर्ज आज तपासले जाणार आहेत. येत्या १७ जुलैला मतदान आणि २० जुलैला मतमोजणी होणार आहे.

****

वस्तू आणि सेवा कर प्रणाली - जीएसटी एक जुलै पासून लागू करण्याची अधिसूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. जीएसटीमध्ये उत्पादन शुल्क, सेवा कर आणि व्हॅट सारखे अप्रत्यक्ष कर समाविष्ट करण्यात आले आहेत. जीएसटीची औपचारिक सुरुवात उद्या रात्री बारा वाजता केली जाणार आहे. 

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोच्या अत्याधुनिक संचार उपग्रह जीसॅट १७चं आज फ्रेंच गयानामधून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. ‘एरियन- पाच’ या प्रक्षेपकाच्या माध्यमातून जीसॅट १७ हा उपग्रह अवकाशात झेपावला. या उपग्रहाचं वजन जवळपास तीन हजार ४७७ किलोग्रॅम इतकं आहे. यात हवामानासंबंधी माहिती मिळवण्यासाठी उपकरणही बसवण्यात आलं आहे.

****

‘इंडिया टुडे‘ तर्फे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातल्या भारतीय विद्यापीठांचे राष्ट्रीय क्रमांक घोषित करण्यात आले आहेत. यात औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं देशात २१वा क्रमांक पटकावला आहे. कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे यांनी ही माहिती दिली. शंभर गुणांच्या या मानांकनासाठी एकुण ११ मापदंड निश्चित करण्यात आले होते.

****

वीज चोरी आणि अवैध दारु विक्री या दोन विषयांवर शासन गंभीर असून, वीज चोरांवर गुन्हे नोंदवण्यासाठी राज्यातल्या सर्व पोलिस स्थानकांना अधिकार देण्यात आले असल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. ते आज उस्मानाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ८२२ शाळांमध्ये सौर ऊर्जेवर वीज पुरवठा करण्यासाठी दोन कोटी रुपयांचं अनुदान मंजूर केल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातली मद्य विक्रीची दुकानं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतरावर नेण्यात आल्यामुळे १५ हजार कोटी रुपयांचा महसूल कमी झाला असल्याचं सांगून, याबाबतच्या नियमात बदल करुन सात हजार दुकानं पुन्हा सुरु करण्यात येतील, असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले.    

****

आषाढी वारीसाठी निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज नातेपुते इथून माळशिरसकडे मार्गस्थ झाली. वाखरी इथं पालखीचं दुसरं उभं रिंगण होणार आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी आज सराटीहून निघून अकलूजला पोहोचली. पालखीचं गोल रिंगण अकलूज इथं पार पडलं. पैठणहून निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज बिटरगावचा मुक्काम आटोपून कुर्डूकडे मार्गस्थ झाली. पालखीचा चौथा रिंगण सोहळा कव्हेदंड इथं पार पडला. 

****

राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था - आय टी आय आणि शासकीय तांत्रिक विद्यालयांमधल्या प्रशिक्षणार्थ्यांना चालू वर्षापासून जीवन गट विमा योजना लागू करण्यासाठी लवकरच कार्यवाही केली जाईल, अशी माहिती, कौशल्य विकास, आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी दिली आहे. ते मुंबई इथं कौशल्य विकास विभागाच्या बैठकीत बोलत होते.

****

महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये नोंदणी केलेल्या कामगारांना, ‘सर्वांसाठी घर’ या योजनेच्या माध्यमातून घरं उपलब्ध करुन देण्याबरोबरच, असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरवण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगार विभागाला दिले आहेत. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या कामकाजाचा आढावा बैठकीत ते बोलत होते.

****

औरंगाबाद महापालिकेनं ११ जुलैपर्यंत १२ हजार स्वच्छता गृहांच्या उभारणीचं उद्दिष्ट पूर्ण करावं, असे आदेश राज्य शासनातर्फे देण्यात आले आहेत. मनपा हद्दीत १२ हजार शौचालयं उभारणीचं उद्दिष्ट असताना, आतापर्यंत फक्त सहा हजार स्वच्छता गृह कागदावर उभारण्यात आले आहेत. ज्या लाभार्थ्यांनी मनपाकडून पैसे घेऊनही शौचालयांचं बांधकामच केलं नाही, त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याचा विचारही मनपा प्रशासन करत आहे.

****

लंडन इथं सुरु असलेल्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा दुसरा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. याधीच्या सामन्यात भारतानं इग्लंडचा पराभव केला होता.

****

AIR News Bulletin, Aurangabad 29.06.2017....10.00

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.06.2017 - 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२९ जून २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

सरकारनं आधार क्रमांक पॅन क्रमांकाशी जोडणं बंधनकारक केलं असून येत्या एक जुलैपासून या नियमाची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेल्या वित्त विधेयकातील नियमानूसार आयकर भरणा करण्यासाठी आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. तसंच वेगवेगळ्या पॅन कार्डच्या सहाय्यानं होणाऱ्या करचुकवेगिरीचा शोध घेण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. देशभरातील जवळपास दोन कोटी जनतेनं आपला आधार क्रमांक पॅन क्रमांकाशी जोडून घेतला आहे.

****

मतदार यादीत आतापर्यंत नावं समाविष्ट न झालेल्या नागरिकांची नावं, मतदार यादीमध्ये यावीत यासाठी, निवडणूक आयोग येत्या  एक जुलैपासून एक विशेष मोहीम राबवणार आहे. यामध्ये प्रथम मतदान करणाऱ्या युवकांवर विशेष लक्ष पुरवण्यात येणार आहे.

दरम्यान, लातूर जिल्ह्यातल्या अठरा ते एकवीस वर्षं वयोगटातल्या प्रथम मतदारांच्या नोंदणीसाठी, येत्या एक ते एकतीस जुलै दरम्यान जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती, लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिली आहे. नवमतदारांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

****

अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री, प्राध्यापक राम शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरता मुख्यमंत्री सहाय्यता निधीस स्वत:चं वेतन दिलं आहे. शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी आमदारांनी आपलं एक महिन्याचं वेतन द्यावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. राज्यात सर्वप्रथम अहमदनगरच्या आमदारांनी हे वेतन दिलं आहे

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातल्या केळगांव इथं, शहीद संदीप जाधव यांच्या नावानं व्यायामशाळा काढण्यात येईल, त्यासाठी ग्रामविकास मंत्रालयातर्फे २५ लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, असं ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल सांगितलं. शहीद जाधव यांच्या कुटूंबियांची मुंडे यांनी केळगाव इथं भेट घेतली, त्यावेली त्या बोलत होत्या.

****

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगानं शिफारस केलेल्या भत्त्यांमध्ये काही सुधारणा करत, केंद्रीय मंत्रीमंडळानं काल या शिफारशींना मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली.

****
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date: 29 June 2017
Time: 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۲۹ ؍جون  ۲۰۱۷؁ء
وقت : صبح  ۴۰-۸ سے  ۴۵-۸
 مرکزی کا بینہ نے مرکزی ملا زمین کے لیے سا تویں پے کمیشن کی سفا رشات کو منظوری دیدی ۔
 وزیر اعظم نریندر مودی کی قیا دت میں کل ہوئے کا بینی اجلاس میں سا تویں پے کمیشن کے ذریعے پیش کر دہ سفا رشات کو بھتّوں میں کچھ تبدیلیوں کے ساتھ منظور کر لیا گیا۔ واضح ہو کہ ساتویں پے کمیشن کی سفا رشات کو ایک جنوری 2016؁ء سے نافذ کیا گیا ہے تاہم ملازمین کی تنظیموں کی جانب سے بھتّوں کے بارے میں نا راضگی کا اظہار کر نے کے بعد کا بینہ نے ایک کمیٹی قائم کر نے کا فیصلہ کیا تھا۔ اِس کمیٹی کی جانب سے سفا رشات پیش کر نے کے بعد کل مرکزی حکو مت نے اِن بھتّوں کو منظوری دی۔ فی الحال بر سر خد مات اور سبکدوش جملہ50؍ لاکھ مرکزی ملا زمین کو ساتویں پے کمیشن سے مالی فائدہ پہنچے گا۔ بھتّوں پر عمل آ وری ایک جو لائی 2017؁ء سے کی جائے گی۔
 ساتویں پے کمیشن نے جملہ53؍ بھتّے ردّ کر نے کی سفا رش کی تھی جن میں سے 12؍ بھتّوں کو چھوڑ کر دیگر بھتّوں کو حکو مت نے ردّ کر دیا ہے۔ پے کمیشن نے ’’X‘‘ زمرے کے شہروں کے لیے 24؍ فیصد،’’Y‘‘ زمرے کے شہروں کے لیے16؍ فیصد اور’’Z‘‘ زمرے کے شہروں کے لیے
8؍ فیصد رہائشی بھتّہ یعنیHRA دینے کی سفا رش کی تھی جسے قائم رکھا گیا ہے۔ تا ہم مہنگا ئی بھتّہ یعنی DA 25 ؍ فیصدہو جانے کے بعد
HRA ،X،Y   اور  Z زمروں کے لیے بالتر تیب 27،  18؍ اور9؍ فیصد ہو گا۔ اِسی طرح مہنگائی بھتّہ 50؍ فیصد ہو جانے پر
HRA بالتر تیب30،20؍ اور10؍ فیصد ہو گا۔ اِسکے علا وہ حکو مت نے حفا ظتی دستوں کے مختلف بھتّوں میں بھی اضا فہ کیا ہے۔
****************************
 صدر جمہو ریہ کے عہدے کے لیےUPA کی امید وار میرا کمار نے کل اپنے کا غذات نامزدگی داخل کیئے۔
اِس موقع پر کانگریس صدر سو نیا گاندھی ،سابق وزیر اعظم منمو ہن سنگھ، نیشنلِسٹ کانگریس پارٹی صدر شرد پوار، مارکسسٹ کمیو نِسٹ پارٹی رہنما سیتا رام یچو ری، کانگریس کی حکمرا نی والی ریاستوں کے وزرائے اعلیٰ اور دیگر اپو زیشن رہنما مو جود تھے۔ صدر جمہو ریہ کے عہدے کے لیے اب تک 95؍ افرادنے در خواستیں داخل کی ہیں۔ اِس بیچ NDA کے امید وار  رامنا تھ کووند نے اپنے کا غذات نامزدگی کی چو تھی نقل داخل کی۔ صدر جمہو ریہ کے لیے 17؍ جولائی کو رائے دہی ہو گی۔ جمو ں کشمیر میں بر سر اقتدار اورBJP کی حلیف پیپلز ڈیمو کریٹِک پارٹیPDP نے رامنا تھ کووند کی حما یت کا کل اعلان کیا۔ اب تک28؍ سیا سی جماعتیں کو وند کو اپنی حما یت کا اعلان کر چکی ہیں۔
****************************
 مرکزی حکو مت نے پہلی جو لائی سے مو جو دہ آ دھار نمبر کو ٹیکس دہندگان کےPAN کے ساتھ منسلک کر نے کو لازمی قرار دیا ہے۔
اِنکم ٹیکس ضابطوں میں اِس سلسلے میں تر میم کی گئی ہے اور اُنھیں جاری بھی کر دیا گیا ہے۔ تر میم شدہ ضابطوں کے مطا بق مستقل اکائونٹ نمبر یعنیPANکے لیے در خواست دیتے وقت 12؍ ہند سوں والے با یو میٹرک آدھار نمبر یا اِس کے لیے دی گئی در خواست کاID دینا لازمی ہوگا۔ براہ راست ٹیکسوں سے متعلق مرکزی بورڈ نے کہا کہ پہلی جو لائی سے PAN حاصل کر نا اور اِنکم ٹیکس ریٹرن داخل کر تے وقت آدھار کو PAN سے جو ڑ نا لازمی ہو گا ۔ وزیر خزا نہ ارون جیٹلی نے2017-18؁ء کے لیے ما لیاتی بل میں ٹیکس تجا ویز میں ایک تر میم کے ذریعے اِنکم ٹیکس ریٹرن داخل کرنے کے لیے آ دھار کو لازمی بنا دیا تھا اور آ دھار نمبر کو PAN کے ساتھ منسلک کر دیا تھا تا کہ کثیر مقصدی پین کارڈ س کے استعمال کے ذریعے ٹیکس کی چوری کو روکا جاسکے۔
****************************
 مہا راشٹر کے کسا نوں کو قر ض معا فی دینے سے متعلق آرڈیننس کل جا ری کیا گیا۔
 وزیر اعلیٰ دیویندر پھر نویس نے ’’چھتر پتی شیو ا جی مہا راج شیتکری سمّان یو جنا2017-؁‘‘ کے ذریعے کسا نوں کے34؍ہزار22؍ کروڑ روپیوں کے قرضۂ جات معاف کر نے کا اعلان کیا تھا۔ اِس سے متعلق آرڈیننس کل جا ری کیا گیا۔ آر ڈیننس میں واضح کیا گیا ہے کہ ریاست کے کسا نوں کا
30؍ جون2016؁ء تک کا دیڑھ لاکھ روپیوں تک کا قر ض ہی معا ف کیا جائے گا۔ ساتھ ہی قر ض معا فی کے لیے زرعی زمین کے رقبے کی شرط نافذ نہیں کی جائیگی۔تاہم قرض معا فی کا فائدہ اُنہی کسا نوں کو ہو گا جنھوں نے نیشنلائز،خانگی،دیہی اور ضلع امداد باہمی بینکوں سے قر ض حاصل کیاہو۔
 اِس بیچ ریاستی حکو مت کی جانب سے قر ض معا فی کے اعلان کے بعد شیو سینا صدر اُدّھو ٹھاکرے آج مراٹھواڑہ کے دورے پر آ رہے ہیں۔ ٹھاکرے ناندیڑ، ہنگولی ،پر بھنی اور جالنہ ضلعوں میں کسا نوں سے ملا قات کر ینگے۔
****************************
 مہا راشٹر حکو مت نے ریاست میں پیاز کی ریکارڈ پیدا وار ہونے کے بعد3؍ مہینوں کے لیے پیاز کی بر آ مدات کو منظورید دینے کا مرکزی حکو مت سے مطالبہ کیا ہے ۔ ریاست کے مالیات و منصو بہ بندی کے وزیر Sudhir Mungantiwarنے اِس ضمن میں
مرکزی وزیر مالیات ارون جیٹلی سے کل نئی دِلّی میں ملا قات کی۔   Mungantiwarنے کہا کہ جیٹلی نے ریا ستی حکو مت کے مطالبے پر مثبت ردِّ عمل کا اظہار کیا ہے۔ مہا راشٹر میں اِس سال گذشت سال کے مقابلے پیاز کی پیدا وار میں25؍ اضا فہ ہوا ہے۔ ساتھ ہی دیگر ریاستوں میں بھی پیاز کی ریکارڈ پیدا وار درج کی گئی ہے۔
****************************

AIR News Urdu Bulletin, Aurangabad. Date:29.06.2017, Time:8.40-8.45 AM


AIR News Bulletin 29.06.2017....06.50

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.06.2017 - 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 June 2017

Time – 06.50 AM to 07.00 AM

Language - Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ जून २०१७ सकाळी ०६.५० मि.

****

·      केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगानं शिफारस केलेल्या सुधारीत भत्त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी; १ जुलै २०१७ पासून अंमलबजावणी

·      राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारा ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’चा अध्यादेश जारी

·      कांदा निर्यातीला तीन महिन्यांसाठी परवानगी देण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

आणि

·      औरंगाबाद शहरातल्या रस्त्यांसाठी शंभर कोटी रूपयांचा निधी मंजूर

****

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगानं शिफारस केलेल्या भत्त्यांमध्ये काही सुधारणा करत, केंद्रीय मंत्रीमंडळांनं काल या शिफारशींना मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. १ जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात आली, मात्र भत्त्यांबाबत कर्मचारी संघटनांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांचा आढावा घेण्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनंतर काल सरकारनं या भत्त्यांना मंजुरी दिली. सध्या सेवेत असलेल्या आणि निवृत्त अशा एकूण ५० लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. १ जुलै २०१७ पासून या भत्त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. सातव्या वेतन आयोगानं ५३ भत्ते रद्द करण्याची शिफारस केली होती, त्यापैकी १२ भत्ते वगळता अन्य भत्ते रद्द करण्यास सरकारनं मंजुरी दिली. एक्स श्रेणीतल्या शहरांसाठी २४ टक्के, वाय श्रेणीतल्या शहरांसाठी १६ टक्के आणि झेड श्रेणीतल्या शहरांसाठी ८ टक्के घरभाडे देण्याची शिफारस आयोगानं केली होती, ती कायम ठेवली मात्र महागाई भत्ता २५ टक्के झाल्यानंतर त्यात अनुक्रमे २७, १८ आणि ९ टक्के अशी, तर महागाई भत्ता ५० टक्क्यांवर पोहोचल्यानंतर त्यात, ३०, २० आणि १० टक्के अशी सुधारणा करण्यासही मंजुरी दिली. याचबरोबर सुरक्षा दलाच्या विविध भत्त्यातही सरकारनं सुधारणा केली आहे.

****

सरकारी अधिपत्याखालील एअर इंडिया या विमान कंपनीतले आपले समभाग विकण्याच्या निर्णयासही केंदीय मंत्रीमंडळानं तत्त्वतः मंजुरी दिली आहे. सद्यस्थितीत एअर इंडियावर सुमारे ६० हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. एकूण कर्जांपैकी ३० हजार कोटी रुपयांचं कर्ज वसूल न होणारं कर्ज म्हणून घोषित करण्याची शिफारस नीती आयोगानं केंद्र सरकारला केली होती.

****

काँग्रेससह विरोधी पक्षांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार मीरा कुमार यांनी काल आपलं नामांकनपत्र दाखल केलं. यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी, काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि अन्य विरोधी पक्षांचे अनेक नेते उपस्थित होते. आतापर्यंत या पदासाठी ९५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आपल्या नामांकन पत्राची चौथी प्रत दाखल केली. राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक येत्या सतरा जुलैला होणार आहे. पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी, अर्थात पीडीपी, या काश्मीरच्या सत्तेतल्या भाजपाच्या भागीदार पक्षानं कोविंद यांना पाठिंबा देणार असल्याचं, काल जाहीर केलं. आतापर्यंत अट्ठावीस पक्षांनी कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

****

राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भातला अध्यादेश काल जारी करण्यात आला. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – २०१७’ च्या माध्यमातून ३४ हजार २२ कोटी रुपयांची शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार काल त्यासंबंधीचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे.

या अध्यादेशानुसार, राज्यातल्या शेतकऱ्यांचं, ३० जून २०१६ पर्यंतचं दीड लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे. तसंच, कर्जमाफीसाठी शेतजमिनीच्या मर्यादेचा निकष लावला जाणार नाही, असंही अध्यादेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.

मात्र कर्जमाफीचा लाभ हा केवळ राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका आणि जिल्हा सहकारी बँकांमधून घेतलेल्या कर्जावर लागू असेल तसंच, ज्या शेतकऱ्यांनी २०१६-१७ या वर्षात कर्ज घेतलेल्या, आणि ३० जून २०१७ पर्यंत या कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपये यापैकी कमी असेल ती रक्कम देण्यात येईल, असंही आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. मूल्यवर्धित कर आणि सेवा करांतर्गंत नोंदणी झालेल्या आणि १० लाख रूपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेले शेतकरीही कर्जमाफीसाठी अपात्र असणार आहेत.

****

महाराष्ट्रात कांद्याचं विक्रमी उत्पादन झाल्यामुळे तीन महिन्यांसाठी निर्यातीला परवानगी देण्याची मागणी राज्याचे अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे केली आहे. मुनगंटीवार यांनी काल जेटली यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली. या मागणीबद्दल जेटली यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याचं, मुनगंटीवार यांनी सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात २५ टक्यांनी कांदा उत्पादन वाढलं आहे. तसंच अन्य राज्यातही कांद्याचं विक्रमी उत्पादन झालेलं आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याविरोधात येत असलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी, पक्षानं चार सदस्यीय समिती नियुक्त केली असल्याचं, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजु शेट्टी यांनी सांगितलं. पुण्यात काल पक्षाच्या कार्यकारीणीची बैठक झाली, या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. खोत यांना समितीपुढे आपली बाजू मांडण्यासाठी ४ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आल्याचं ते म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि सरकारमध्ये सहभागी असलेले खोत मांडत असलेल्या भूमिका विसंगत असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे, या मुद्द्यावरून आपल्याकडे अनेकांनी तक्रारी केल्या असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं. त्यामुळेच ही समिती नेमण्याचा निर्णय संघटनेनं घेतल्याचं ते म्हणाले.

****

औरंगाबाद शहरातल्या रस्ते विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलतांना दिली. शहरातल्या रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी २५ कोटी रूपये दिले असून त्यातून काही रस्ते तयार झाले, त्यानंतर उर्वरित रस्त्यांसाठी भरीव निधीची मागणी करण्यात आली होती असं दानवे यांनी सांगितलं.

****

राज्य शासनानं घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत. नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी सभा आणि संवाद मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

१९९३ च्या मुंबई साखळी बाँबस्फोट प्रकरणातला आरोपी, मोहम्मद डोसा याचा काल मुंबईतल्या जे.जे. रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. छातीत दुखत असल्याचं त्यानं सांगितल्यानंतर, त्याला कारागृह प्रशासनानं काल सकाळी दवाखान्यात दाखल केलं होतं. हृदयविकारानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी दिली आहे.

****

कोरडवाहू शेतीसाठी कर्जमाफीची पाच एकराची अट शिथील करावी, यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. अहमदनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते. शेतकऱ्यांना बियाणं खरेदीसाठी दहा हजार रुपये कर्ज देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला, भारतीय रिझर्व्ह बँकेची परवानगी आवश्यक असल्यानं, यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही आठवले यांनी यावेळी सांगितलं.

****

मराठवाडा आणि विदर्भातल्या १४ जिल्ह्यांमध्ये, अन्न सुरक्षा योजनेचा लाभ न मिळणाऱ्या शेतकऱ्यांना समाविष्ट करण्याची सूचना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अन्न, नागरी पुरवठा, आणि  ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. त्याचबरोबर लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकाही आधार क्रमांकाशी जोडण्यात याव्यात, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

येत्या १ ते ७ जुलै या सप्ताहा दरम्यान वृक्ष लागवडीमध्ये जालना जिल्ह्याच्या सर्व यंत्रणांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असं आवाहन, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे.

****

Wednesday, 28 June 2017

AIR News Bulletin, Aurangabad 28.06.2017....17.25

Text - AIR News Bulletin, Aurangabad 28.06.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 June 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ जून  २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन पत्र भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी, विरोधी पक्षाच्या उमेदवार मीरा कुमार यांनी आपलं नामांकनपत्र दाखल केलं, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आपल्या नामांकन पत्राची चौथी प्रत दाखल केली. राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक येत्या सतरा जुलैला होणार आहे. पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी अर्थात पीडीपी, या काश्मीरच्या सत्तेतल्या भाजपाच्या भागीदार पक्षानं कोविंद यांना पाठिंबा देणार असल्याचं आज जाहीर केलं. आतापर्यंत अट्ठावीस पक्षांनी कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

****

१९९३ च्या मुंबई साखळी बाँबस्फोट प्रकरणातला आरोपी मोहम्मद डोसा याचा आज मुंबईतल्या जे.जे. रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. छातीत दुखत असल्याचं त्यानं सांगितल्यामुळे त्याला कारागृह प्रशासनानं आज सकाळी दवाखान्यात दाखल केलं होतं. हृदयविकारानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी दिली आहे.

****

केंद्र सरकारच्या पंचवीस विभागांचं येत्या काही दिवसात संपूर्ण संगणकीकरण होणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. ई-फाइल्सच्या निर्मितीचा वेग गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा हजार टक्क्यांनी वाढल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

****

कोरडवाहू शेतीसाठी कर्जमाफीची पाच एकराची अट शिथील करावी यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. अहमदनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी दहा हजार रुपये कर्ज देण्याच्या महाराष्ट्र शासनानं घेतलेल्या निर्णयासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेची परवानगी आवश्यक असल्यानं यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री  अरुण जेटली यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही आठवले यांनी यावेळी सांगितलं.

****

बाल हक्क कायद्याची संपूर्णपणे अंमलबजावणी करता यावी यासाठी शासनानं चार नवीन कायदे आणले असल्याची माहिती राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, यांनी दिली आहे. ते काल सोलापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. यासंदर्भातल्या तक्रारींचा निपटारा वेळेत व्हावा आणि पीडितांना न्याय मिळावा यासाठी शासन, मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर इथं तीन नवी न्यायालयं सुरू करणार असल्याचंही घुगे यांनी सांगितलं. मुलांवर अन्याय होत असेल तर त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी बाल हक्क आयोगाची असल्याचं नमूद करत, आयोग आता पूर्ण क्षमतेनं काम करणार असल्याचं घुगे यावेळी म्हणाले.

****

मतदार यादीत अद्यापपर्यंत  नावं समाविष्ट न झालेल्या नागरिकांची नावं मतदार यादीमध्ये यावीत यासाठी निवडणूक आयोग येत्या एक जुलैपासून एक विशेष मोहीम राबवणार आहे. यामध्ये प्रथम मतदान करणाऱ्या युवकांवर विशेष लक्ष पुरवण्यात येणार आहे. या मोहिमेचं स्मरण जास्तीत जास्त युवकांना करून देता यावं, यासाठी निवडणूक आयोग फेसबुकची मदत घेणार आहे. फेसबुक वापरणाऱ्यांना मतदार यादीमध्ये नाव नोंदण्याचं स्मरण करून देण्यासाठी फेसबुकवर 'रजिस्टर नाऊ' या बटनाची निर्मिती करण्यात आली आहे. तसंच तेरा भारतीय भाषांमधून फेसबुकद्वारे याबाबतचा स्मरण संदेश पाठवला जाणार आहे. दरम्यान, लातूर जिल्ह्यातल्या अठरा ते एकवीस वर्षं वयोगटातल्या प्रथम मतदारांच्या नोंदणीसाठी येत्या एक ते एकतीस जुलै दरम्यान जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिली आहे. नवमतदारांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

****

आषाढी एकादशीच्यावेळी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासन राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधून सात विशेष रेल्वे गाड्या सोडणार आहे. यामध्ये दौंड-पंढरपूर, लातूर-पंढरपूर, नागपूर-पंढरपूर, मिरज-पंढरपूर, नवी अमरावती-पंढरपूर, पंढरपूर-कुर्डूवाडी या गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय पंढरपूर रेल्वे स्थानकामध्ये अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात येणार असून, तिकिट खिडक्यांची संख्याही वाढवण्यात येणार आहे.
दरम्यान, आषाढी वारीसाठी निघालेल्या संत मुक्ताबाई यांच्या पालखीनं आज दुपारी साडेबारा वाजता सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. बार्शी- परंडा रस्त्यावरच्या वारदवाडी फाटा या गावात या पालखीनं आज दुपारी प्रवेश केला तर आळंदीहून निघालेल्या संत ज्ञानेश्वरांच्या पालखीनंही आज धर्मपुरी या गावातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. सोलापूर जिल्हा प्रशासनानं या पालख्यांच्या स्वागताची तयारी केली होती तसंच आरोग्य, पाणीपुरवठा, सुरक्षा, वीज आणि वाहतूक व्यवस्था चोख ठेवली आहे.

****