आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Wednesday, 28 February 2018
Text - AIR News Bulletin, Aurangabad 28.02.2018 - 17.25
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 28 February
2018
Time 17.25 to
17.30
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ फेब्रुवारी
२०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
भीमा-कोरेगाव मुद्द्यावरुन विरोधकांनी
केलेल्या गदारोळामुळे, विधान परिषदेचं
कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित झालं. पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमा इथं झालेली दंगल ही राज्यसरकार
पुरस्कृत होती, असा गंभीर आरोप आज विरोधकांनी विधानपरिषदेत केला. याप्रकरणी कथित जबाबदार असलेले संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना
तत्काळ अटक करण्याची मागणी करत विरोधकांनी
केलेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज सुरवातीला २० मिनिटांसाठी तहकूब झालं होतं. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे
यांनी यावेळी बोलताना, सरकारच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचं सांगत, या घटनेनंतर ५४ हजार व्यक्तींविरोधात दाखल केलेले
गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत अशी मागणी केली.
जातपंचायतीच्या नियमांनुसार कौमार्य
चाचणी करण्याबाबत जाहीर वाच्यता करणाऱ्या व्यक्तीवरही यापुढे गुन्हा नोंदवण्यात येणार,
अशी घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत केली. शिवसेनेच्या नीलम
गोऱ्हे यांनी कौमार्य चाचणी आणि अशा वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत, जातपंचायतींवर
कठोर कारवाईची मागणी करणारी लक्षवेधी सूचना मांडली होती.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या
विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ देण्यासाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क
योजना शासनानं जाहीर केली असून, या योजनेच्या लाभापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभासाठी सुरु केलेल्या
योजनेच्या जाचक अटी असल्यामुळे लाभ घेण्यापासून विद्यार्थी वंचित रहात असल्याबाबतची
लक्षवेधी सूचना विधानपरिषद सदस्य अमरसिंह पंडित यांनी मांडली होती.
दुसरीकडे विधानसभेत आज विरोधकांनी बोंडअळी
नुकसानग्रस्तांना मदतीच्या मुद्द्यांवरुन गदारोळ केला. स्थगन प्रस्तावाद्वारे या मुद्द्यावर
चर्चेची मागणी विरोधकांनी लावून धरली. मात्र मागणी मान्य न झाल्यानं विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचं कामकाज सकाळच्या
सत्रात तीनवेळा तहकूब झालं.
****
भारतीय स्टेट बँकेनं आपल्या ठेवींवरच्या व्याजदरात बदल
केले आहेत. एका वर्ष ते दोन वर्षांपर्यंत मुदत ठेवींवरचे व्याजदर पंधरा शतांश टक्क्यांनी
वाढवून सहा पूर्णांक चाळीस शतांश टक्के तर दोन वर्षांपासून तीन वर्षांपर्यंतच्या मुदत
ठेवींचे व्याजदर पाऊण टक्क्यांनी वाढवून पावणे सात टक्के करण्यात आले आहेत. तर दोन
वर्ष ते दहा वर्षापर्यंतच्या मुदत ठेवींचा व्याजदर अर्धा टक्क्यांनी वाढवून साडे सहा
टक्के करण्यात आला आहे. एक कोटी ते दहा कोटी रुपयांपर्यंत मुदतठेवींसाठी आता पावणे
सात टक्के व्याज दिलं जाईल. हे नवे व्याजदर तत्काळ प्रभावानं लागू होणार असल्याचं पीटीआयच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत
विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. चित्रपट
सृष्टीतल्या ज्येष्ठ तसंच नवोदित अभिनेते अभिनेत्रींसह हजारो चाहत्यांनी आपल्या लाडक्या
अभिनेत्रीला अखेरचा निरोप दिला.
****
मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या विविध
मागण्यांसदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज औरंगाबाद इथल्या विभागीय आयुक्त
कार्यालयावर रूमणं मोर्चा काढण्यात आला. हिवाळी अधिवेशनात राज्यसरकारनं बोंडअळीग्रस्त
शेतकऱ्यांना जाहीर केलेली आर्थिक मदत सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात १० दिवसात जमा करावी,
या मागणीसह विविध
मागण्यांचं निवेदन संघटनेच्या वतीनं यावेळी प्रशासनाला देण्यात आलं.
****
औरंगाबादच्या कचरा प्रश्नी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी
आणि पोलिस आयुक्तांनी तिसगाव, करोडी, आडगाव आणि मिटमिटा या चार ठिकाणांची पाहणी करून,
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पाहणी अहवाल सादर केला. या ठिकाणी त्वरित
कचरा डेपो उभारता येणार नाही, त्यामुळे नारेगाव इथं कचरा टाकण्यासाठी तीन महिने मुदतवाढ
देण्याची मागणी प्रशासनानं आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाकडे केली.
****
वीजदेयकाचा रीतसर नियमितपणे भरणा करणाऱ्या वीजग्राहकांना
अखंडित वीज पुरवठा करण्याचे निर्देश औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी वीज महावितरण
कंपनीला दिले आहेत. औरंगाबाद इथं जिल्हा विद्युतीकरण समितीच्या बैठकीत ते आज बोलत होते.
ग्रामीण भागात महावितरणने गटानुसार वीजजोडणी दिली आहे, मात्र गटातले काही ग्राहक देयकाचा
भरणा करत नसल्यानं, इतर ग्राहकांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे थकीत देयकं वसूल
करून, वीजपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश खासदार खैरे यांनी दिले.
****
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या
दहावीच्या परीक्षेला उद्या एक मार्चपासून सुरुवात होत आहे. २४ मार्चपर्यंत ही परीक्षा
चालणार आहे.
****
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.02.2018 13.00
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 28 February 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ दुपारी १.०० वा.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या
दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना
उत्तीर्ण होण्यासाठीच्या किमान गुणांमधे एकवेळ सूट बहाल करण्याचा निर्णय घेण्यात
आला आहे. केवळ यंदाच्या तुकडीसाठीच उत्तीर्ण
होण्यासाठी एकूण ३३
टक्के गुणांचा निकष
लावण्यात येणार आहे. त्यांना मंडळाची परीक्षा आणि
अंतर्गत तपासणी परीक्षांमधे वेगवेगळे ३३ टक्के गुण मिळवावे लागणार नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला उद्या एक मार्चपासून सुरुवात होत आहे.
****
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता
प्रवेश परिक्षा - नीट साठी केंद्रांची संख्या १०७ वरुन १५० करण्यात आली असल्याचं केंद्रीय
मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. या परीक्षेसाठी राज्यात सहा
केंद्रं वाढवण्यात आली आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मोरारजी
देसाई यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना
आदरांजली अर्पण केली आहे. देसाईंची निष्ठा आणि नि:स्वार्थ समर्पण युवकांना नेहमीच प्रेरणा
देत राहील, असं त्यांनी आपल्या ट्विटरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
अभिनेत्री पद्मश्री श्रीदेवी यांच्या पार्थिव देहावर
आज दुपारी मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, श्रीदेवी यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मुंबईत सेलिब्रेशन
क्लब इथं त्यांचे चाहते तसंच सिनेसृष्टीतल्या अनेकांनी गर्दी केली आहे. गेल्या शनिवारी
त्यांचं दुबईत निधन झालं, त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काल रात्री त्यांचं
पार्थिंव मुंबईत दाखल झालं.
****
मुंबई बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिमचा
भाऊ इकबाल कासकर याच्या पोलिस कोठडीत ठाणे पोलिसांनी येत्या सहा मार्चपर्यंत वाढ केली
आहे. कासकर याच्यासह त्याच्या साथीदारांना ठाणे पोलिसांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये
अटक केली होती आणि त्याच्यावर मकोका कायद्याअंतर्गत आरोप लावण्यात आले आहेत. सध्या
तो ठाण्याच्या मध्यवर्ती तुरुंगात आहे.
****
सरकारनं हज यात्रेसाठी विमानाच्या तिकीटांच्या किमतीत
कपात केली आहे. या किमतीत २० हजार रुपयांपासून ९७ हजार रुपयांपर्यंत कपात केली जाणार
असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं. . ****
पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातला मुख्य आरोपी
नीरव मोदी याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करावं, अशी मागणी सक्तवसूली संचालनालयानं मुंबईतल्या विशेष
न्यायालयात केली आहे. नीरव मोदीच्या परदेशातल्या व्यवसायाची तसंच मालमत्तांची माहिती मागणारी
कायदेशीर पत्र सहा देशांना पाठवण्याची परवानगी विशेष न्यायालयानं दिली आहे. काळा पैसा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत उभारण्यात आलेलं
हे विशेष न्यायालय आज नीरव मोदीच्या अनुपस्थितीविषयी त्याच्या वकीलाची बाजू ऐकणार
आहे.
****
अन्नधान्याचं उत्पादन २०१७-१८ या वर्षात २७७ पूर्णांक ४९ दशलक्ष टन इतकं विक्रमी होईल अशी अपेक्षा सरकारनं
व्यक्त केली आहे. मागील वर्षात हेच उत्पादन २७५ पूर्णांक ११ शतांश दशलक्ष टन इतकं होतं. यंदा डाळींचं उत्पादन ८२ शतांश मेट्रिक टनांनी वाढून २३ पूर्णांक ९५ मेट्रिक टन होईल अशी अपेक्षा आहे. कडधान्यांच्या उत्पादानात वाढ तर तेलबियांच्या
उत्पादनात घट होईल असा अंदाज आहे.
****
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाने बनावट
फेसबुक अकाऊंट तयार करून त्यावर पोस्ट टाकणाऱ्या एका तरुणाविरोधात जालना इथं सायबर
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील सुनील अग्रवाल असं या तरुणाचं
नाव असून, तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. अर्थमंत्र्यांच्या नावाने पक्षातील
काहीजणांना फ्रेंड रिक्वेस्ट मैत्री विनंती प्राप्त झाल्यानंतर हा प्रकार समोर आला.
वरिष्ठ पातळीवरून तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.
****
२०१९ या वर्षाच्या अखेरपर्यंत अहमदनगर - बीड - परळी
रेल्वेमार्गाचं काम पूर्ण करण्याचे निर्देश ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा
मुंडे यांनी दिले आहेत. मुंडे यांनी काल विधानभवन इथं या रेल्वेमार्गासंदर्भात आढावा
बैठक घेतली त्यावेळी, त्या बोलत होत्या. बीडमधल्या राष्ट्रीय महामार्गांची कामं अधिक
वेगानं आणि गुणवत्ता पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
*****
***
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.02.2018 11.00AM
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२८ फेब्रुवारी २०१८
सकाळी ११.००
****
माजी
केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना केंद्रीय अन्वेषण
विभाग - सीबीआयनं अटक केली आहे. आय एन एक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तपासात
सहकार्य न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. ते लंडनहून चेन्नईला परतल्यानंतर विमानतळावरच
त्यांना अटक करण्यात आली असून, पुढच्या चौकशीसाठी दिल्लीत आणण्यात येणार आहे. चिदंबरम
अर्थमंत्री असताना विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळानं मंजुरी दिल्यानंतर आयएनएक्स
मीडिया या कंपनीनं २००७ मध्ये परदेशातून ३०५ कोटी रुपये मिळवले होते, याप्रकरणी १०
लाख रुपयांची लाच घेतल्याचा कार्तीवर आरोप आहे.
****
कांचि कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती
यांचं आज तामिळनाडूमधल्या कांचीपुरम इथं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. ते गेल्या
काही दिवसांपासून आजारी होते. कांची कामकोटी पीठाचे ते ६९वे शंकराचार्य होते.
****
अभिनेत्री
श्रीदेवी यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मुंबईत त्यांच्या निवासस्थानी चाहते तसंच सिनेसृष्टीतल्या
अनेकांनी गर्दी केली आहे. काल रात्री श्रीदेवी यांचं पार्थिव दुबईहून मुंबईत दाखल झालं,
त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
राष्ट्रीय
विज्ञान दिवस आज पाळण्यात येत आहे. भौतिकशास्त्रज्ञ सी व्ही रमण यांनी २८ फेब्रुवारी
१९२८ ला रमण प्रभावच्या सिद्धांताची घोषणा केली होती. विज्ञानाचं महत्व समाजाला पटवून
देण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. या अनुषंगानं आज शैक्षणिक संस्थांमधून विविध
कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या कचरा व्यवस्थापनासंदर्भातल्या
जनहित याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. कचऱ्याची मर्यादित कालावधीकरता साठवण करण्यासाठी
महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांनी संयुक्तपणे मिटमिटा, आडगाव आणि
तीसगाव इथल्या पर्यायी जागांची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. काल या पर्यायी जागांची पाहणी केल्यानंतर हे अधिकारी
आपला अहवाल आज न्यायालयाला सादर करण्याची शक्यता आहे.
*****
***
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date: 28 February 2018
Time: 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۲۸؍فروری ۲۰۱۸ء
وقت : صبح ۴۰-۸ سے ۴۵-۸
وزارت خزا نہ نے ملک کی سر کا ری شعبے کی بینکوں کو ہدا یت کی ہے کہ 50؍ کروڑ روپئے سے زیادہ کے تمام ترغیر منافع بخش NPA کھاتوں کی تحقیقات کی جائے۔ اور اُن کھاتوں میں اگر کوئی بے ضابطگی پائی جاتی ہے تو یہ معا ملہCBI کے حوالے کیا جائے۔ ما لی خد مات کے سیکریٹری راجیو کُمار نے کل نئی دہلی میں بتا یا کہ بینکوں کی جعلسازی کا پتہ لگا کر مشکوک معا ملات CBI کے سپرد کر نے کی ہدا یت عوا می شعبے کی بینکوں کو کی گئی ہے ۔ اِس کے علا وہ بر آ مدات و در آ مدات کے ضا بطوں کی خلاف ور زی پائے جانے پر اِنفورسمنٹ ڈائریکٹو ریٹ اور ڈائریکٹو ریٹ آف ریو نیو اِنٹیلی جنس کو شامل کیا جائے۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
اشیاء اور خد مات ٹیکس GST کے تحت اِس برس ماہ جنوری میں 86؍ ہزار318؍ کروڑ روپئے ٹیکس جمع کیا گیا ۔ جو پچھلے ماہ کی بہ نِسبت کم ہے ۔ یہ رقم ماہ دسمبر میں86؍ ہزار703؍ کروڑ روپئے تھی۔ وزا رت خزا نہ کے جا ری کر دہ ایک بیان میں کہا گیا ہے کہ اِس ماہ کی25؍ تاریخ تک
GST کے تحت ایک کروڑ30؍ ہزار ٹیکس دہندگان نے اور17؍ لاکھ 65؍ ہزار ڈیلرس نے کمپو زیشن ڈیلر کے طور پر اپنا نام درج کر وا یا ہے۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
وزیر برائے لسا نیات وِنود تائوڑے نے کہا ہے کہ مراٹھی زبان بار ہویں جماعت تک لا زمی مضمون قرار دینے کے لیے نصا بی بورڈز کو ہدا یت کی جائے گی ۔ کل یوم مراٹھی زبان کی منا سبت سے اسمبلی کے دو نوں ایوانوں میں ایک قرارداد پر مبا حثے کے دوران اُنھوں نے یہ عندیہ دیا۔ اِس قرار داد میں حکو مت سے سفا رش کی گئی ہے کہ مراٹھی زبان کی مقبو لیت میں اضا فے کے لیے اقد ا مات کیئے جائیں۔ تائوڑے نے کہا کہ ریاست کے سر کا ری کام کاج میں مراٹھی کے زیادہ سے زیادہ استعمال کے لیے حکو مت کوشاں ہے۔
اِس دن کی منا سبت سے مراٹھی لسا نی یو نیور سٹی کے قیام کے لیے گرنتھا لی پر کاشن کو ممبئی میں اراضی مہیا کی جا رہی ہے۔ وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے اِس اراضی کے دستا ویز کل ادارے کے ڈائریکٹر دِنکر گنگال کے حو الے کیئے۔ اِس دن کی منا سبت سے اورنگ آ باد کے سر سوتی بھون تعلیمی اِدارے کی جانب سے ایک سیمینار منعقد کیا گیا۔ اِس کے علا وہ سینٹرل بس اِسٹینڈ پر بھی ایک پرو گرام منعقد کیا گیا۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
حزب اختلاف کی جماعتوں نے الزام عائد کیا ہے کہ سر کا ری قرض معا فی اسکیم کا فائدہ کسا نوں تک نہیں پہنچ رہا اور اِس سلسلے میں حکو مت کا رویہ مضحکہ خیز ہے۔ اِس موضوع پر کل قا نون ساز کونسل میں حزب اختلاف کے اراکین نے زوردار نعرے بازی کی۔ جس کے بعد ایوان کی کار وائی دن بھر کے لیے ملتوی کر دی گئی۔ ایوان میں حزب اختلاف کے قائد دھننجئے منڈے نے یہ مسئلہ اُٹھا تے ہوئے تحریک التواء پیش کی ۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
نیشنلِسٹ کانگریس پار ٹی کے سر براہ شرد پوار نے کہا ہے کہ کسا نوں کو معا شی، سما جی اور تعلیمی بنیادوں پر ریزر ویشن دیا جا نا چا ہیے۔ گذشتہ ہفتے ایم این ایس کے سر براہ راج ٹھا کرے کو اِنٹر ویو دیتے ہوئے شرد پوار نے مطالبہ کیا تھا کہ یہ ریزر ویشن معاشی پسماندگی کی بنیاد وںپر دیا جا ئے۔ اِس مطالبے پر شرد پوار پر کا فی تنقید کی گئی ۔ اِس پس منظر میں کل ممبئی میں اطلا عی کا نفرنس میں شرد پوار نے اپنے مو قف کی وضا حت کی۔ اُنھوں نے کہا کہ درج فہرست ذاتوں قبائل اور دیگر پسماندہ طبقات کو مو جودہ ریزر ویشن بر قرار رکھا جائے۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
دریں اثناء نوٹ بندی کے دوران ضلع امداد با ہمی بینکوں میں مو جود پرا نے کرنسی نوٹ لینے سے آر بی آئی نے انکار کر رکھا ہے اور بینکوں کو ہدایت کی ہے کہ بینک اپنے گوشواروں میں اِسے خسا رے کی مد میں درج کریں۔ شردپوار نے کہا کہ آر بی آئی کے اِس فیصلے کے خلاف وہ عدالت عظمیٰ سے رجوع کریں گے۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
ممبئی ہائی کورٹ کی اورنگ آ باد بینچ نے ہدا یت کی ہے کہ اورنگ آ باد میں عارضی کچرا ڈپو کے لیے متبا دل جگہ کا تعین کرنے کے لیے ضلع کلکٹر ، میونسپل کمشنر اور پو لس کمشنر مشتر کہ طور پر معائنہ کر کے اپنی رپورٹ پیش کریں۔ اِس کے لیے مٹمٹہ ، تیس گائوں اور آڑ گائوں کی کھلی اراضی کی تجویز رکھی گئی ہے۔ عدالتی حکم کے بعد اِن تینوں افسران نے کل مجوزہ متبادل مقا مات کا دورہ کیا۔ اِس دوران مقا می با شندوں نے اپنے علا قوں میں کچرا ڈپو کے قیام کی شدید مخالفت کی اِس خصوصی میں مفاد عا مہ کی عرضداشت پر سماعت کے دوران آج یہ عہدیداران اپنی رپورٹ پیش کریں گے۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
بالی ووڈ کی مقبول و خو برو ادا کا رہ سر ی دیوی کے جسد خا کی کو کل شب دُبئی سے ممبئی لا یا گیا۔ آج ممبئی کے وِلے پار لے میں اُن کی آخری رسو مات ادا کی جائے گی۔ دریں اثناء کل دُبئی پولس نے سر ی دیوی کی موت سے متعلق تمام شکوک و شبہات کو مسترد کر تے ہوئے تحقیقات ختم کر دی۔ دُبئی پولس اِس بات پر مطمئن ہے کہ سری دیوی کی موت غسل خا نے کے ٹب میں ڈو ب کر ہو ئی ہے۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
ناگپور-ممبئی سمرُدّھی ایکسپریس وے کے لیے ایکوائر کی گئی اراضی پر مو جود در ختوں کے تخمینے میںردّ و بدل کر نے کے لیے
5؍ لاکھ روپئے کی رشوت لیتے ہوئے جالنہ کے زر عی آفیسر روڈگے اور دیگر تین افراد کو کل اِنسداد بد عنوا نی محکمے نے رنگے ہاتھوں گرفتار کر لیا۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
Date: 28 February 2018
Time: 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۲۸؍فروری ۲۰۱۸ء
وقت : صبح ۴۰-۸ سے ۴۵-۸
وزارت خزا نہ نے ملک کی سر کا ری شعبے کی بینکوں کو ہدا یت کی ہے کہ 50؍ کروڑ روپئے سے زیادہ کے تمام ترغیر منافع بخش NPA کھاتوں کی تحقیقات کی جائے۔ اور اُن کھاتوں میں اگر کوئی بے ضابطگی پائی جاتی ہے تو یہ معا ملہCBI کے حوالے کیا جائے۔ ما لی خد مات کے سیکریٹری راجیو کُمار نے کل نئی دہلی میں بتا یا کہ بینکوں کی جعلسازی کا پتہ لگا کر مشکوک معا ملات CBI کے سپرد کر نے کی ہدا یت عوا می شعبے کی بینکوں کو کی گئی ہے ۔ اِس کے علا وہ بر آ مدات و در آ مدات کے ضا بطوں کی خلاف ور زی پائے جانے پر اِنفورسمنٹ ڈائریکٹو ریٹ اور ڈائریکٹو ریٹ آف ریو نیو اِنٹیلی جنس کو شامل کیا جائے۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
اشیاء اور خد مات ٹیکس GST کے تحت اِس برس ماہ جنوری میں 86؍ ہزار318؍ کروڑ روپئے ٹیکس جمع کیا گیا ۔ جو پچھلے ماہ کی بہ نِسبت کم ہے ۔ یہ رقم ماہ دسمبر میں86؍ ہزار703؍ کروڑ روپئے تھی۔ وزا رت خزا نہ کے جا ری کر دہ ایک بیان میں کہا گیا ہے کہ اِس ماہ کی25؍ تاریخ تک
GST کے تحت ایک کروڑ30؍ ہزار ٹیکس دہندگان نے اور17؍ لاکھ 65؍ ہزار ڈیلرس نے کمپو زیشن ڈیلر کے طور پر اپنا نام درج کر وا یا ہے۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
وزیر برائے لسا نیات وِنود تائوڑے نے کہا ہے کہ مراٹھی زبان بار ہویں جماعت تک لا زمی مضمون قرار دینے کے لیے نصا بی بورڈز کو ہدا یت کی جائے گی ۔ کل یوم مراٹھی زبان کی منا سبت سے اسمبلی کے دو نوں ایوانوں میں ایک قرارداد پر مبا حثے کے دوران اُنھوں نے یہ عندیہ دیا۔ اِس قرار داد میں حکو مت سے سفا رش کی گئی ہے کہ مراٹھی زبان کی مقبو لیت میں اضا فے کے لیے اقد ا مات کیئے جائیں۔ تائوڑے نے کہا کہ ریاست کے سر کا ری کام کاج میں مراٹھی کے زیادہ سے زیادہ استعمال کے لیے حکو مت کوشاں ہے۔
اِس دن کی منا سبت سے مراٹھی لسا نی یو نیور سٹی کے قیام کے لیے گرنتھا لی پر کاشن کو ممبئی میں اراضی مہیا کی جا رہی ہے۔ وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے اِس اراضی کے دستا ویز کل ادارے کے ڈائریکٹر دِنکر گنگال کے حو الے کیئے۔ اِس دن کی منا سبت سے اورنگ آ باد کے سر سوتی بھون تعلیمی اِدارے کی جانب سے ایک سیمینار منعقد کیا گیا۔ اِس کے علا وہ سینٹرل بس اِسٹینڈ پر بھی ایک پرو گرام منعقد کیا گیا۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
حزب اختلاف کی جماعتوں نے الزام عائد کیا ہے کہ سر کا ری قرض معا فی اسکیم کا فائدہ کسا نوں تک نہیں پہنچ رہا اور اِس سلسلے میں حکو مت کا رویہ مضحکہ خیز ہے۔ اِس موضوع پر کل قا نون ساز کونسل میں حزب اختلاف کے اراکین نے زوردار نعرے بازی کی۔ جس کے بعد ایوان کی کار وائی دن بھر کے لیے ملتوی کر دی گئی۔ ایوان میں حزب اختلاف کے قائد دھننجئے منڈے نے یہ مسئلہ اُٹھا تے ہوئے تحریک التواء پیش کی ۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
نیشنلِسٹ کانگریس پار ٹی کے سر براہ شرد پوار نے کہا ہے کہ کسا نوں کو معا شی، سما جی اور تعلیمی بنیادوں پر ریزر ویشن دیا جا نا چا ہیے۔ گذشتہ ہفتے ایم این ایس کے سر براہ راج ٹھا کرے کو اِنٹر ویو دیتے ہوئے شرد پوار نے مطالبہ کیا تھا کہ یہ ریزر ویشن معاشی پسماندگی کی بنیاد وںپر دیا جا ئے۔ اِس مطالبے پر شرد پوار پر کا فی تنقید کی گئی ۔ اِس پس منظر میں کل ممبئی میں اطلا عی کا نفرنس میں شرد پوار نے اپنے مو قف کی وضا حت کی۔ اُنھوں نے کہا کہ درج فہرست ذاتوں قبائل اور دیگر پسماندہ طبقات کو مو جودہ ریزر ویشن بر قرار رکھا جائے۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
دریں اثناء نوٹ بندی کے دوران ضلع امداد با ہمی بینکوں میں مو جود پرا نے کرنسی نوٹ لینے سے آر بی آئی نے انکار کر رکھا ہے اور بینکوں کو ہدایت کی ہے کہ بینک اپنے گوشواروں میں اِسے خسا رے کی مد میں درج کریں۔ شردپوار نے کہا کہ آر بی آئی کے اِس فیصلے کے خلاف وہ عدالت عظمیٰ سے رجوع کریں گے۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
ممبئی ہائی کورٹ کی اورنگ آ باد بینچ نے ہدا یت کی ہے کہ اورنگ آ باد میں عارضی کچرا ڈپو کے لیے متبا دل جگہ کا تعین کرنے کے لیے ضلع کلکٹر ، میونسپل کمشنر اور پو لس کمشنر مشتر کہ طور پر معائنہ کر کے اپنی رپورٹ پیش کریں۔ اِس کے لیے مٹمٹہ ، تیس گائوں اور آڑ گائوں کی کھلی اراضی کی تجویز رکھی گئی ہے۔ عدالتی حکم کے بعد اِن تینوں افسران نے کل مجوزہ متبادل مقا مات کا دورہ کیا۔ اِس دوران مقا می با شندوں نے اپنے علا قوں میں کچرا ڈپو کے قیام کی شدید مخالفت کی اِس خصوصی میں مفاد عا مہ کی عرضداشت پر سماعت کے دوران آج یہ عہدیداران اپنی رپورٹ پیش کریں گے۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
بالی ووڈ کی مقبول و خو برو ادا کا رہ سر ی دیوی کے جسد خا کی کو کل شب دُبئی سے ممبئی لا یا گیا۔ آج ممبئی کے وِلے پار لے میں اُن کی آخری رسو مات ادا کی جائے گی۔ دریں اثناء کل دُبئی پولس نے سر ی دیوی کی موت سے متعلق تمام شکوک و شبہات کو مسترد کر تے ہوئے تحقیقات ختم کر دی۔ دُبئی پولس اِس بات پر مطمئن ہے کہ سری دیوی کی موت غسل خا نے کے ٹب میں ڈو ب کر ہو ئی ہے۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
ناگپور-ممبئی سمرُدّھی ایکسپریس وے کے لیے ایکوائر کی گئی اراضی پر مو جود در ختوں کے تخمینے میںردّ و بدل کر نے کے لیے
5؍ لاکھ روپئے کی رشوت لیتے ہوئے جالنہ کے زر عی آفیسر روڈگے اور دیگر تین افراد کو کل اِنسداد بد عنوا نی محکمے نے رنگے ہاتھوں گرفتار کر لیا۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.02.2018 06.50AM
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 28 February 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø मराठी भाषा गौरव
दिन राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा; मराठी
भाषेच्या विकासाला अधिक चालना देण्याचा ठराव
विधीमंडळात मंजूर
Ø आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक निकषांवर आरक्षण देण्याची
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मागणी
Ø औरंगाबाद शहरातला कचरा मर्यादित कालावधीकरता
साठवण्यासाठी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांनी संयुक्तपणे तीन
पर्यायी जागांची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद
खंडपीठाचे आदेश
आणि
Ø नागपूर-मुंबई
समृद्धी महामार्गात जाणाऱ्या शेतजमिनीतल्या झाडांचं पुनर्मुल्यांकन वाढवून देण्यासाठी
पाच लाख रुपयांची लाच घेतांना जालना तालुका कृषी अधिकारी रामेश्वर रोडगेसह तीन जणांना
अटक
*****
मराठी भाषा गौरव दिन काल राज्यात सर्वत्र उत्साहात
साजरा करण्यात आला. मराठी भाषा ही
जास्तीत जास्त लोकाभिमुख होऊन ज्ञान भाषा व्हावी याकरता सरकारनं भाषेच्या विकास
प्रक्रियेला अधिक चालना द्यावी अशी शिफारस करणारा ठराव काल
मराठी भाषा गौरव दिनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी
एकमतानं मंजूर केला. विधानपरिषदेत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा
ठराव मांडला. मराठी विषय बारावीपर्यंत सक्तीचा करण्याबद्दल,
अभ्यास मंडळाला सूचना करण्याची ग्वाही मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी
दिली. मराठीचा राज्य कारभारात जास्तीत जात उपयोग करण्याबद्दल
पाऊलं उचलली जात आहेत असं ते म्हणाले.
या
दिनानिमित्त काल मुंबईत विधान भवनाच्या प्रांगणात मराठी अभिमान गीताचं सामुहिक गायन
करण्यात आलं. गायक संगीतकार कौशल इनामदार आणि त्यांच्या संचानं हे गीत सादर केलं. या
कार्यक्रमात ध्वनीक्षेपण यंत्रणेत बिघाड झाल्यानं, मराठी अभिमान गीत पूर्ण वाजवलं गेलं
नाही, तसंच या गीतातून शेवटचं एक कडवं वगळलं गेल्याच्या कारणावरून विधानसभेत विरोधी
पक्ष आणि सरकार यांच्यात काल आरोपप्रत्यारोपा झाले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे
पाटील, अजित पवार, जयंत पाटील यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली.
****
सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना
मिळत नसून सरकार तुघलकी वागणूक देत असल्याचा आरोप करत विधानपरिषेत विरोधकांनी घोषणाबाजी केली, त्यामुळे परिषदेचं कामकाज काल दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित करत स्थगन प्रस्ताव
मांडला.
****
मराठी भाषा
विद्यापीठ उभारण्यासाठी ग्रंथाली प्रकाशनाला मुंबईत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. काल विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्या हस्ते ग्रंथालीचे संस्थापक दिनकर गांगल यांच्याकडे या जागेची करारप्रत सोपवण्यात
आली. वांद्रे पश्चिम मतदार संघात हे विद्यापीठ उभारलं जाणार आहे.
****
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काल औरंगाबाद इथं विविध
कार्यक्रम घेण्यात आले. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या वतीनं मराठी भाषा आणि कवितेची
परंपरा या विषयावर साहित्य अकादमीचे क्षेत्रीय सचिव कृष्णा किंबहुने यांचं व्याख्यान
झालं, तर वसंतराव नाईक महाविद्यालयात डॉ. महेश खरात यांचं 'मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यातल्या अडचणी' या
विषयावर व्याख्यान झालं.
औरंगाबाद इथं काल बहुभाषिक संमेलनाचं अयोजन करण्यात
आलं होतं. महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं. या बहुभाषिक संमेलनामध्ये
२४ भाषांचे प्रतिनिधी, पंधरा महाविद्यालयं, आठ शाळा सहभागी झाल्या होत्या.
औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकावरही मराठी
भाषा गौरव दिन उत्साहात साजरा झाला. पाच मार्चपर्यंत मराठी वाचन सप्ताह साजरा होत असून, या निमित्तानं या
परिसरात सवलतीच्या दरात पुस्तक प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातल्या एका न्यायालयात काल संपूर्ण युक्तिवाद मराठी भाषेतून करण्यात आला. न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती एस एम गव्हाणे यांनी कामकाज मराठीतून करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयातल्या सगळ्या विधीज्ञांनी मराठीतून युक्तिवाद करुन हा दिवस साजरा केला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातल्या एका न्यायालयात काल संपूर्ण युक्तिवाद मराठी भाषेतून करण्यात आला. न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती एस एम गव्हाणे यांनी कामकाज मराठीतून करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयातल्या सगळ्या विधीज्ञांनी मराठीतून युक्तिवाद करुन हा दिवस साजरा केला.
****
शेतकऱ्यांना आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक निकषांवर
आरक्षण द्यावं असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष
राज ठाकरे यांनी घेतलेल्या मुलाखतीत पवार यांनी हे आरक्षण आर्थिक निकषांवर द्यावं अशी
मागणी केली होती, त्यामुळे पवार यांच्यावर टिका झाली. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली
आरक्षणाबाबतची भूमिका काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना स्पष्ट केली. याशिवाय, अनुसूचित-जाती
जमाती, आणि इतर मागासवर्गीय समाजाचं आरक्षण कायम ठेवावं असंही पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नोटबंदीनंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे पडून असलेल्या जुन्या नोटा
स्वीकारण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेनं नकार दिला असून या नोटांच्या बदल्यात बँकेच्या
ताळेबंदात तोटा म्हणून नोंद घेण्यास सांगण्यात आलं आहे. सरकारच्या ह्या निर्णयाला सर्वोच्च
न्यायालयात आव्हान देणार असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबाद शहरातल्या कचऱ्याची मर्यादित
कालावधीकरता साठवण करण्यासाठी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांनी
संयुक्तपणे मिटमिटा, आडगाव आणि तीसगाव इथल्या पर्यायी जागांची पाहणी करून अहवाल सादर
करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. या न्यायालयाच्या
आदेशानंतर या तिन्ही अधिकाऱ्यांनी काल या पर्यायी जागांची पाहणी केली. पाहणी दरम्यान
तिन्ही ठिकाणी स्थानिक रहिवाशांनी कचरा टाकण्यास जोरदार विरोध केला. या जनहित याचिकेवर
आज होणाऱ्या सुनावणी दरम्यान हे अधिकारी आपला अहवाल न्यायालयाला सादर करण्याची शक्यता
आहे.
*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
*****
सिनेअभिनेत्री श्रीदेवी यांचा मृतदेह
काल रात्री दुबईतून मुंबईत आणण्यात आला. आज त्यांच्यावर मुंबईतल्या विलेपार्ले स्मशानभूमीत
अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, काल दुबई पोलिसांनी अभिनेत्री श्रीदेवी
यांच्या मृत्यूमागे कोणताही घातपात नसून, त्यांचा मृत्यू शुद्ध हरपल्यानंतर, स्नानगृहातल्या
टबमध्ये बुडून झाला. यामुळे त्यांच्या मृत्यूचा तपास थांबवण्यात आल्याचं सांगितलं.
त्यानंतर त्यांचा मृतदेह भारतात आणण्यासंबंधीची कागदपत्रं कपूर कुटुंबीयांकडे सोपवली.
शनिवारी मध्यरात्रीनंतर दुबईत एका हॉटेलमध्ये श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचे विशेष काव्य पुरस्कार
काल औरंगाबाद इथं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष कवी फ.मुं.शिंदे
यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कविवर्य कुसुमाग्रज काव्य पुरस्कार डॉ. यशवंत मनोहर
यांना, तर कवयित्री लीला धनपलवार काव्य पुरस्कार दासू वैद्य यांना देण्यात आला. कुसुमाग्रजांनी
काव्य लेखनात जी उंची गाठली, तिथपर्यंत किमान आपली नजर पोहोचवण्याचा प्रयत्न आपण केला
पाहिजे, असं मत ज्येष्ठ कवी यशवंत मनोहर
यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त
केलं. दासू वैद्य यांनी पुरस्काराला उत्तर देताना आपल्या दोन कविता
सादर केल्या.
****
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात जाणाऱ्या झाडांचं मूल्यांकन वाढवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची
लाच घेतांना जालना इथला तालुका कृषी अधिकारी रामेश्वर रोडगे याच्यासह तीन व्यक्तिंना
लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं काल रंगेहाथ पकडलं. या प्रकरणातल्या तक्रारदाराची अहंकार देऊळगाव इथली शेती समृद्धी
महामार्गासाठी संपादित झाली आहे. संपादित जमिनीवरच्या
झाडांचं कृषी विभागानं तीन कोटी एक लाख रुपयांचं मूल्यांकन केलं. मात्र, रोडगे आणि
त्याच्या सहकाऱ्यांनी, ते दोन कोटी सतरा लाख एवढंच दाखवलं. त्यामुळे तक्रारदारानं
झाडांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला असता या चौघांनी त्यांच्याकडे वीस लाख रुपयांची
मागणी केली. त्यापैकी पाच लाख रुपये घेतांना रोडगे याच्यासह अनंत नाल्टे, बालासाहेब वाघमारे आणि सुभाष खाडे
यांना अटक करण्यात आली.
****
मराठा
आरक्षणा संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगानं आयोजित केलेली जनसुनावणी काल उस्मानाबाद इथं घेण्यात आली.
यावेळी विविध संस्था संघटनांकडून निवेदनं स्वीकारण्यात आली. अशाच प्रकारची सुनावणी
पाच ते नऊ मार्च या कालावधीत अनुक्रमे नांदेड, परभणी, हिंगोली, बीड आणि जालना याठिकाणी
होणार आहे.
****
२०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये
तीन अपत्ये असतांना दोन अपत्ये असल्याचं खोटं
शपथ पत्र दाखल केल्याच्या कारणावरुन, उस्मानाबादचे शिवसेनेचे जिल्हा परीषद सदस्य गौतम
लटके यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा विभागीय आयुक्तांचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठानं कायम ठेवला आहे. लटके हे परंडा तालुक्यातल्या अनाळा गटातून जिल्हा
परीषद सदस्य म्हणून निवडून आले होते.
****
बीड इथं जिल्हा शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीच्यावतीनं राज्यातल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम
करावं यासह अन्य मागण्यांसाठी काल आंदोलन करण्यात
आलं. मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा देऊन अंदोलनकर्त्यांनी
यावेळी शासनाच्या धोरणांचा निषेध केला.
****
नांदेड इथं गेल्या तीन
दिवसांपासून सुरू असलेल्या १४ व्या संगीत शंकर दरबार महोत्सवाची सांगता काल ज्येष्ठ
गायिका शुभा मुदगल यांच्या शास्त्रीय गायनानं झाली. त्याआधी विख्यात व्हायोलिनवादक
डॉ. एन.एन राजम आणि त्यांची नात नंदिनी शंकर यांची जुगलबंदी रंगली.
****
स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानाचं केंद्रीय पथक परभणी
शहराची पाहणी करण्यासाठी शहरात काल दाखल झालं
आहे. हे पथक शहरात खतनिर्मिती, सार्वजनिक स्वच्छता गृह, घंटागाडी, तसंच विविध भागांची
पाहणी करणार आहे.
*****
***
Tuesday, 27 February 2018
Text - AIR News Bulletin, Aurangabad 27.02.2018 - 17.25
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 27 February
2018
Time 17.25 to
17.30
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ फेब्रुवारी
२०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार असून, पुढचा मुख्यमंत्री
शिवसेनेचा होणार असल्याचं, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. अहमदनगर
जिल्ह्यात पारनेर इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा सहकारी बँकांना
टाळे लावायला निघालेलं सरकार, दुसरीकडे बँका ओरबाडून पळून जाणाऱ्यांकडे दुर्लक्ष करत
असल्याचा आरोप, ठाकरे यांनी केला. केंद्र सरकार लोकांचे प्रश्न सोडवायला तयार नाही.
अच्छे दिन आले नाहीत, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना, हे
देशाला मिळालेलं फसवं नेतृत्व असल्याचं, ठाकरे म्हणाले.
****
मराठी भाषा
ही जास्तीत जास्त लोकाभिमुख होऊन ज्ञान भाषा व्हावी याकरता सरकारनं भाषेच्या विकास
प्रक्रियेला अधिक चालना द्यावी अशी शिफारस करणारा ठराव आज मराठी भाषा गौरव दिनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी
एकमतानं मंजूर केला. विधानपरिषदेत सभापती रामराजे
नाईक निंबाळकर यांनी हा ठराव मांडला. मराठी विषय बारावी पर्यंत सक्तीचा करण्याबद्दल, अभ्यास मंडळाला सूचना करण्याची ग्वाही मराठी भाषा मंत्री विनोद
तावडे यांनी यावेळी दिली. मराठीचा राज्य कारभारात जास्तीत
जात उपयोग करण्याबद्दल पावलं उचलली जात आहेत असं ते म्हणाले. आज सकाळी विधिमंडळ प्रांगणात
झालेल्या कार्यक्रमात ध्वनीक्षेपक बंद पडल्याचा तसंच मराठी गौरव गीतात सातवं कडवं गायल गेलं नसल्याचा
मुद्दा विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासापूर्वी विरोधी पक्षांनी उपस्थित केला.
सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ
शेतकऱ्यांना मिळत नसून सरकार तुघलकी वागणूक
देत असल्याचा आरोप करत विधानपरिषेत विरोधकांनी घोषणाबाजी केली, त्यामुळे परिषदेचं
कामकाज आज दिवसभरासाठी
स्थगित करण्यात आलं. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित
करत स्थगन प्रस्ताव मांडला.
****
मराठी भाषा विद्यापीठ उभारण्यासाठी ग्रंथाली प्रकाशनाला
मुंबईत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आज विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ग्रंथालीचे संस्थापक दिनकर
गांगल यांच्याकडे या जागेची करारप्रत सोपवण्यात आली. वांद्रे पश्चिम मतदार संघात हे
विद्यापीठ उभारलं जाणार आहे.
****
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातल्या एका न्यायालयात आज संपूर्ण युक्तिवाद
मराठी भाषेतून करण्यात आला. न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती एस.एम.गव्हाणे
यांनी कामकाज मराठीतून करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयातल्या सगळ्या विधीज्ञांनी
मराठीतून युक्तिवाद करुन हा दिवस साजरा केला.
****
औरंगाबाद इथं आज मराठी भाषा दिनानिमित्त
बहुभाषिक संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. महापौर नंदकुमार घोडले यांच्या हस्ते या
संमेलनाचं उद्घाटन
झालं. या बहुभाषिक संमेलनामध्ये २४ भाषांचे प्रतिनिधी, पंधरा महाविद्यालयं, आठ शाळा
सहभागी झाल्या होत्या.
शहरातल्या वसंतराव
नाईक महाविद्यालयात डॉ.महेश खरात यांचं ‘मराठी
भाषेला अभिजात दर्जा मिळण्यातल्या अडचणी’ या विषयावर व्याख्यान झालं.
****
मराठा आरक्षणा संदर्भात राज्य मागासवर्ग
आयोगानं आयोजित केलेली जनसुनावणी आज उस्मानाबाद इथं घेण्यात आली. यावेळी विविध संस्था
संघटनांकडून निवेदनं स्वीकारण्यात आली. ही सुनावणी पाच ते नऊ मार्च या कालावधीत अनुक्रमे
नांदेड, परभणी, हिंगोली, बीड आणि जालना या ठिकाणी होणार आहे.
****
आगामी होळीचा सण साजरा करताना वीजेसंबंधी
अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन महावितरणतर्फे करण्यात आलं आहे.
होळी पेटवताना सभोवताली वीज वाहिन्या किंवा वीजवितरण रोहित्र नाहीत,
याची खात्री करावी, असं औरंगाबादच्या महावितरण कार्यालयाचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी
सुनील जाधव यांनी सांगितलं आहे.
****
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूमागे
कोणताही घातपात नसून, त्यांचा मृत्यू शुद्ध हरपल्यानंतर, स्नानगृहातल्या टबमध्ये अपघातानं
बुडून झाल्याचं, दुबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे त्यांच्या मृत्यूचा तपास थांबवण्यात
आल्याचं, दुबई पोलिसांनी सांगितल्याचं, पीटीआयचं वृत्त आहे. दरम्यान, श्रीदेवी यांचा
मृतदेह भारतात आणण्यासंबंधी दुबई पोलिसांनी आवश्यक कागदपत्रं कपूर कुटुंबीयांकडे सोपवली
आहेत. दुबईतल्या भारतीय दुतावासातून ही माहिती देण्यात आली. श्रीदेवी यांच्या मृतदेहावर
रसायनांचं लेपन करून, त्यांचा मृतदेह भारतात आणला जाणार आहे. श्रीदेवी यांचा शनिवारी
मध्यरात्रीनंतर दुबईत एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला.
****
येत्या सहा मार्च रोजी होणाऱ्या
पैठण इथल्या नाथषष्ठी सोहळ्यात येणाऱ्या भाविकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याच्या
सूचना, एकनाथ महाराज विश्वस्त संस्थानचे कार्यकारी विश्वस्त तथा अप्पर जिल्हाधिकारी
पी.एल.सोरमारे यांनी दिल्या आहेत. आज पैठण इथं झालेल्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते
बोलत होते. यात्रा उत्सवाच्या व्यवस्थापनासाठी स्वयंसेवकांनी पैठण नगर परिषदेत नाव
नोंदणी करण्याचं आवाहनही सोरमारे यांनी केलं आहे.
****
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.02.2018 13.00
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 27 February 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ फेब्रुवारी २०१८ दुपारी १.०० वा.
****
मराठी भाषा गौरवदिनानिमित्त आज विधान भवनाच्या प्रांगणात
झालेल्या कार्यक्रमात ध्वनीक्षेपण यंत्रणेत बिघाड झाल्यानं, मराठी अभिमान गीत पूर्ण
वाजवलं गेलं नाही, तसंच या गीतातून शेवटचं एक कडवं वगळलं गेल्याच्या कारणावरून विधानसभेत
आज विरोधी पक्ष आणि सरकार पक्षात आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. विरोधी पक्षनेते
राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, जयंत पाटील यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त
केली. राज्यशासनाच्या या कृतीमुळे मराठीच्या अस्मितेला धक्का पोहोचल्याचं सांगत, सरकारनं
महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अखेरच्या कडव्याचा
उल्लेख करत, कोणाच्या कार्यकाळात मराठी भाषेच्या स्थितीचं वर्णन त्या कडव्यात करण्यात
आलं आहे, असा प्रश्न विचारला. मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण
देताना, या गाण्याचे गीतकार सुरेश भट यांनी, अभिमान गीतातून शेवटचं कडवं गाळलं असल्याचं
सदनाला सांगितलं.
मात्र त्यानंतरही गदारोळ वाढत गेल्यानं, अध्यक्ष
हरिभाऊ बागडे यांनी सदनाचं कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केलं.
दरम्यान, या मराठी अभिमान गीताचे संगीतकार गायक कौशल
इनामदार यांनीही, विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना, हे अभिमान गीत असल्यामुळे, स्वत:
सुरेश भट यांनी मूळ कवितेतून हे कडवं वगळल्याची माहिती दिली.
****
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज औरंगाबादच्या सरस्वती
भुवन शिक्षण संस्थेच्या वतीनं मराठी भाषा आणि कवितेची परंपरा या विषयावर व्याख्यानाचं
आयोजन करण्यात आलं होतं. साहित्य अकादमीचे क्षेत्रीय सचिव कृष्णा किंबहुने यांनी उपस्थितांना
मार्गदर्शन केलं.
औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकावरही मराठी भाषा गौरव
दिन उत्साहात साजरा झाला. पाच फेब्रुवारीपर्यंत मराठी वाचन सप्ताह साजरा होत असून,
या निमित्तानं या परिसरात सवलतीच्या दरात पुस्तक प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे.
****
****
राज्यातल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी
सेविकांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधन वाढीसह त्यांच्या भाऊबीज भेट रक्कमेतही वाढ करण्याचा
शासन निर्णय जाहीर झाल्याची माहिती महीला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली
आहे. एक ऑक्टोबर २०१७ पासून सेवाज्येष्ठतेनुसार मानधन वाढ देण्याचा निर्णय झाला असून,
भाऊबीज भेट दोन हजार रुपये करण्यात आली आहे. सेविका आणि मदतनीसांच्या सेवा समाप्तीचं
वय येत्या एक एप्रिल २०१८ पासून ६५ वरुन ६० वर्षे करण्याचा निर्णयही झाला असल्याचं
मुंडे यांनी सांगितलं.
****
डिसेंबर महिन्यात आलेल्या ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या
पिकाची भरपाई नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातल्या
दीड हजाराहून अधिक शेतकऱ्यांच्या बाराशे हेक्टर वरील शेतपिकाचं नुकसान झालं असून, त्यासाठी
दोन कोटी ३३ लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.
****
राज्यात दोन वेगवेगळ्या अपघातात आज नऊ जणांचा मृत्यू
झाला.
सोलापूर तुळजापूर रस्त्यावर दोन चारचाकी गाड्यांची
धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जण जागीच ठार झाले. आज पहाटे हा अपघात झाला. औरंगाबाद
इथं झालेल्या इज्तेमामध्ये सहभागी होऊन हे सर्वजण सोलापूर तसंच कर्नाटकात जात होते.
मृतांमध्ये महमूद पाटील या पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
दुसरा अपघात बुलडाणा मलकापूर रस्त्यावर चिंचपूर फाट्याजवळ
झाला. मध्यरात्रीनंतर ट्रक आणि ऑटोची धडक होऊन झालेल्या या अपघातात एका लहान मुलासह
तीन जण जागीच ठार झाले, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
****
धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातल्या विखरण
इथले शेतकरी धर्मा पाटील आणि त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांच्या बॅंक खात्यात प्रत्येकी
सरासरी २४ लाख रुपयेप्रमाणे एकूण ४८ लाख रुपये निधी वीजमहानिर्मिती कंपनीने वर्ग केला
आहे. धर्मा पाटील यांनी भूसंपादनात फळबागेच्या मोबदलाप्रश्नी मंत्रालयात २२ जानेवारीला
विष प्राशन केलं होतं, त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
****
‘प्रीपेड
वॉलेट’ द्वारे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना उद्यापर्यंत के वाय सी
अर्थात ग्राहक ओळखीसंबंधीची औपाचारिकता पूर्ण करावी लागणार आहे. यासंदर्भात
या आधी दिलेली ३१ डिसेंबर २०१७
ची मुदत २८ फेब्रुवारी
२०१८ पर्यंत वाढवण्यात आली होती. त्यामुळे
आता यापुढे मुदतवाढ मिळणार नाही, असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे.
****
देशातल्या तुरूंगांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त असणारी
कैद्यांची संख्या, याकडे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणानं लक्ष घालावं, असे आदेश सर्वोच्च
न्यायालयानं दिले आहेत. सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशातल्या तुरूंगांमध्ये
किती पदं रिकामी आहेत, तसंच महिला कैदी आणि त्यांच्या लहान मुलांचं पुनर्वसन कशा प्रकारे
करता येईल, यासंबधीच्या सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं मागवल्या आहेत. या प्रकरणाची
पुढील सुनावणी २७ मार्च रोजी होणार आहे.
*****
***
Subscribe to:
Posts (Atom)
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...