आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Thursday, 28 February 2019
Tex- AIR News Bulletin Aurangabad 28.02.2019 Evining Bulletin
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28
February 2019
Time 6.00 to 6.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ फेब्रुवारी
२०१९ सायंकाळी
६.०० वा.
****
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वैमानिक अभिनंदन
वर्तमान यांना उद्या मुक्त करणार असल्याचं, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी
जाहीर केलं आहे. पाकिस्तान संसदेच्या संयुक्त सत्रात इम्रान खान यांनी आज ही घोषणा
केली, दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी
सांगितलं.
काल सकाळी पाकिस्ताननं काश्मीरमध्ये केलेला हवाई
हल्ला परतवून लावताना, अभिनंदन यांचं मिग विमान दुर्घटनाग्रस्त होऊन पाकव्याप्त काश्मीरमध्ये
कोसळलं, त्यानंतर पाकिस्तानी सैन्यानं त्यांना ताब्यात घेऊन, त्यांची दृश्यफीत जारी
केली होती. भारतानं यावर कठोर शब्दांत आक्षेप घेत, अभिनंदन यांना तत्काळ बिनशर्त, सुरक्षित,
भारतात परत पाठवण्यास सांगितलं होतं.
अभिनंदन यांना पकडून त्यांची चौकशी करत असल्याच्या,
पाकिस्तानातून इंटरनेटवर टाकल्या गेलेल्या दृश्यफीती, हटवण्याचे निर्देश, केंद्रीय
माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं, यू ट्यूब ला दिले आहेत.
****
औषधनिर्माण आणि जैव तंत्रज्ञान या विभागांना चालना
देण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. आज विज्ञान दिनानिमित्त
नवी दिल्लीत, शांतीस्वरुप भटनागर पुरस्कार पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आले,
२०१६, १७ आणि १८ या तीन वर्षांसाठीचे पुरस्कार पंतप्रधानांनी प्रदान केले. पाच लाख
रूपये आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्कारचं स्वरूप आहे.
****
२०१८-१९ या पीक वर्षांत देशात अन्नधान्याचं विक्रमी
२८१ पूर्णांक ३७ शतांश दशलक्ष टन एवढं उत्पादन होण्याचा अंदाज आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानंही
माहिती दिली. गेल्या पीक वर्षापेक्षा हे उत्पादन तीन पूर्णांक ८९ शतांश टनांपेक्षा
अधिक आहे. यामध्ये भाताचं उत्पादन ११५ दशलक्ष टन, गहू ९९ दशलक्ष टन तर कडधान्यांचं
उत्पादन २४ दशलक्ष टनांपर्यंत होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
****
राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संस्थगित
झालं. हे अधिवेशन शनिवारपर्यंत चालणार होतं, मात्र भारत आणि पाकिस्तान सीमेवर वाढता
तणाव पाहता, सुरक्षा यंत्रणांवरचा तणाव कमी करण्यासाठी, अधिवेशन दोन दिवस लवकर संपवण्याचा
प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांनी विधानसभेत मांडला, त्याला सर्व पक्षांनी
पाठिंबा दिला. महाराष्ट्र हा देशाच्या सैन्यदलाच्या मागे ठामपणे उभा आहे, असं मुख्यमंत्री
यावेळी म्हणाले.
त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी,
अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित होत असल्याची घोषणा केली. चार बैठका झालेल्या या अधिवेशनात,
तेरा तास वीस मिनिटं कामकाज झालं, या दरम्यान, अंतरिम अर्थसंकल्पासह पाच विधेयकं संमत
करण्यात आली.
विधान परिषदेतही मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन लवकर
संस्थगित करण्यामागची भूमिका मांडली, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह सर्व विरोधी
पक्षांनी त्याला पाठिंबा दिला. त्यानंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी, सदनाचं
कामकाज संस्थगित करत असल्याचं जाहीर केलं.
****
इयत्ता दहावीच्या परीक्षेला उद्या १ मार्चपासून
सुरुवात होत आहे. या परीक्षेला औरंगाबाद विभागातून औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली
या पाच जिल्ह्यांतून एक लाख ८६ हजार ६६ परीक्षार्थ्यांनी आवेदनपत्र भरले आहेत. २२ मार्चपर्यंत
या परीक्षा चालणार आहेत.
****
धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यात
बंद पडलेल्या पांझरा कान साखर कारखान्यात आज दुपारी मोठी आग लागली. कारखान्याच्या रिकाम्या
चाळीमध्ये ही आग लागल्याने, कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु इमारतीचं मोठं नुकसान
झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. साक्री इथून पाण्याचे बंब मागवून ही आग विझवण्यात
आली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या कंधार शहरात, राज्य वीज पारेषण
मंडळाच्या ३३ किलो व्हॅट क्षमतेच्या वीज उपकेंद्राला आज दुपारी आग लागली. या दुर्घटनेत
या केंद्राचं मोठं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे
****
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी परभणी
जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांची यादी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून
देण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या ८३५ गावांत चार लाख ४८ हजार २०१ शेतकरी असून, यापैकी,
एक लाख ७७ हजार ७८० शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत, यापैकी ९४ टक्के म्हणजेच एक लाख
६७ हजार १९६ शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर
देण्यात आली आहे. संबंधित पात्र शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत मदतीचा पहिला हप्ता प्रत्येकी
दोन हजार रुपये जमा झाल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.02.2019 13.00
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 February
2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ फेब्रुवारी
२०१९ दुपारी १.०० वा.
****
राज्य विधानसभेनं आगामी आर्थिक वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प कोणत्याही
चर्चेशिवाय मंजूर केला. विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील तसंच राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील यांनी आपली लेखी भाषणं पटलावर ठेवणार
असल्याचं सांगितलं. त्यानंतर आवाजी मतदानानं अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. नियंत्रक
आणि महालेखापाल - कॅग तसंच लोकलेखा समितीचा अहवालही सदनाच्या पटलावर ठेवण्यात आला.
विधान परिषदेतही
अर्थसंकल्प आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. ज्या सदस्यांना, अर्थसंकल्प, दुष्काळी
उपाययोजना, तसंच इतर विषयांवर सूचना मांडायच्या असतील, त्यांनी त्या लेखी स्वरुपात
पटलावर ठेवाव्यात, असं सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी, सांगितलं.
छत्रपती शिवाजी महाराज
शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ज्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही,
अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी, तालुकास्तरावर छाननी करण्यात येत आहे.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली.
शिक्षक आणि इतर कर्मचारी
आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून
मुंबईत आंदोलन करत आहेत, त्यांच्याशी सरकारनं चर्चा करावी, अशी मागणी शिक्षक आमदार
विक्रम काळे यांनी यावेळी केली.
****
भारत आणि पाकिस्तानात
सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं समझौता एक्सप्रेसच्या
फेऱ्या रद्द केल्या आहेत. दर सोमवारी आणि गुरुवारी लाहोरहून निघणारी ही रेल्वे, आज
सकाळी लाहोरहून अटारीकडे निघाली नाही.
दरम्यान, काश्मीरच्या
पूंछ भागात आजही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. संरक्षण दलाच्या प्रवक्त्यांनी
दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सीमेपलिकडून उखळी तोफांचा मारा तसंच गोळीबार करण्यात
आला. भारतीय सैन्यानंही या हल्ल्याला चोख उत्तर दिलं.
****
ज्या आयकर दात्यांनी,
आपल्या बँक खात्याशी त्यांचा कायम खाते क्रमांक - पॅन संलग्न केलेला असेल, अशाच आयकर
दात्यांच्या बँक खात्यात कर परतावा जमा होईल, असं आयकर विभागानं सांगितलं आहे. ज्या
करदात्यांनी आपला कायम खाते क्रमांक अद्याप बँक खात्याशी जोडून घेतलेला नाही, त्यांनी
तत्काळ तो संलंग्न करून घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
मराठा आरक्षणाला
आव्हान देणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू झाला आहे. राज्य सरकार
तर्फे ज्येष्ठ अधिवक्ते मुकुल रोहोतगी आणि व्ही ए थोरात यांनी सरकारची बाजू मांडताना,
एखाद्या समाजाला मागास म्हणून जाहीर करण्याचा आणि त्याला आरक्षण देण्याचा अधिकार राज्यघटनेनं
राज्य सरकारांना दिला आहे, याकडे लक्ष वेधलं. विधीमंडळाने मराठा समाजाला, सरकारी नोकरी
आणि शैक्षणिक संस्थामधे १६ टक्के आरक्षण देण्याचा ठराव गेल्या वर्षी ३० नोव्हेंबरला
जारी केला, यामुळे राज्यात आरक्षणानं ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून, एकूण आरक्षणाचं
प्रमाण ६८ टक्क्यांवर पोहोचलं असल्याचं, या याचिकेत म्हटलं आहे.
****
आज राष्ट्रीय विज्ञान दिन. ज्येष्ठ शास्त्रज्ञ सी
व्ही रमन यांनी भौतिक शास्त्रात केलेल्या, रमन इफेक्ट या प्रभावी संशोधानाच्या स्मरणार्थ
हा दिवस विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी
रमण यांना श्रद्धांजली अर्पण करत, विज्ञान आणि संशोधनाचा उपयोग मानवी जीवनमान सुधारण्यासाठी
केला गेला पाहिजे आणि प्रयोगशाळेपासून शेतीपर्यंत या विषयावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे,
असं ट्वीटरच्या संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथे, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार प्रदान करणार आहेत.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विकासाला प्रोत्साहन
देण्यासाठी, तरूण शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांना देण्यात येणारे हे सर्वात प्रसिद्ध पुरस्कार
आहेत. २०१६, २०१७ आणि २०१८ या तीन वर्षांसाठीचे पुरस्कार पंतप्रधान आज प्रदान करतील.
पाच लाख रूपये आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्कारचं स्वरूप आहे
****
नांदेड जिल्ह्यातले १६ तालुके, ६५ प्राथामिक आरोग्य
केंद्र आणि १६ ग्रामीण रूग्णालयांमध्ये कर्करोग जनजागृती आणि नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात
येत आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते
झालं. आठ तालुक्यांमध्ये कर्करोगाचे विविध ३० रूग्ण आढळून आले. त्यांच्यावर शासकीय
दवाखान्यात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
*****
***
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.02.2019 11.00AM
आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२८ फेब्रुवारी २०१९ सकाळी ११.00
वाजता
****
जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनेचा
म्होरक्या, मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावं, अशी मागणी अमेरिका,
फ्रान्स, ब्रिटननं संयुक्त राष्ट्र संघाकडे केली आहे. या मागणीचा नवा प्रस्ताव या तीनही
देशांनी, पंधरा देश सदस्य असलेल्या सुरक्षा परिषदेकडे सादर केला आहे. या प्रस्तावानुसार
मसूदवर प्रवासबंदी, शस्त्रबंदी लागू करून, त्याची संपूर्ण संपत्ती जप्त करावी, अशी
मागणी या देशांनी केली आहे.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी सैन्य
कारवाई टाळावी, असं आवाहन, अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाकडून करण्यात आलं आहे. ब्रिटनचे
परराष्ट्र मंत्रीही भारत पाकिस्तान सीमेवरचा तणाव कमी व्हावा, यासाठी भारत आणि पाकिस्तानच्या
परराष्ट्र मंत्र्यांच्या संपर्कात आहेत.
****
राज्य विधीमंडळात आज आगामी आर्थिक वर्षाच्या अंतरिम
अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. दरम्यान, उद्या आणि परवा विधीमंडळात, राज्यातल्या दुष्काळी
परिस्थितीवर चर्चा होऊन, या अधिवेशनाची सांगता होणार आहे.
****
पंतप्रधान जन आरोग्य योजनेतंर्गत परभणी जिल्ह्यातल्या नागरीकांसाठी आयुष्यमान भारत या योजनेच्या कार्डाचं
वाटप काल जिल्हा सामान्य रुग्णालय इथं खासदार संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं.
दरम्यान येत्या शनिवारी २ मार्चला महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत
परभणी इथं, आरोग्य शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ – सीबीएसईच्या परीक्षा
पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार असून, परीक्षार्थी तसंच पालकांनी अफवांवर विश्वास
ठेऊ नये, असं आवाहन मंडळानं केलं आहे. सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून
सुरू झाल्या असून, तीन एप्रिलपर्यंत चालणार आहेत, तर दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून
सुरू झाल्या असून, त्या २९ मार्चपर्यंत चालणार आहेत.
****
सरकारनं कर्करोगावरच्या ४२ औषधांची किंमत नियंत्रणाखाली
आणली आहे. यामुळे या औषधांची किंमत ८५ टक्क्यांनी कमी झाली आहे. हे नवीन दर ८ मार्चपासून
लागू करण्यात येतील.
*****
***
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 28 February 2019
Time: 8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۲۸ ؍فروری ۲۰۱۹
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸
پاکستانی کی جانب سے کل بھارتی فوجی تنصیبات کو نشا نہ بنا کر کیئے گئے حملے کو بھارتی فوج نے نا کام بنا دیاہے ۔وزارت ِ خارجہ کے تر جمان رویش کُمار نے کل نئی دہلی میں صحا فیوں کو یہ اطلاع دی۔اُنھوں نے بتا یا کہ اِس کاروائی میں فضائیہ نے پاکستان کے ایک جنگی جہاز کو
مارگرا یا ہے ۔تاہم اِس کار وائی میں بھارت کے ایک جنگی جہاز کا نقصان ہوا اور اُس کا پائلیٹ پاکستان کے قبضـے میں چلا گیا ہے ۔
رویش کُمار نے بتا یا کہ پاکستان کی جانب سے کل دوپہر ایک ویڈیو جاری کیا گیا جِس میں بھارتی گمشدہ لاپلیٹ کو زخمی حالت میں دیکھا یا جا رہا ہے۔اُنھوں نے کہا ہے کہ ایسا کر کے پاکستان نے انسانی حقوق کے بین الاقوامی قوانین اور جِنیوا معاہدے کی پا مالی کی ہے۔ بھارت نے پاکستان کے اعلی کمشنرسے بھارتی پائلیٹ کو بحفاظت جلد ازجلد واپس لوٹا نے کا مطالبہ کیا ہے۔
***** ***** *****
فضائیہ کی جانب سے پر سوں کے روز پا کستان کے خلاف کی گئی کار وائی کی تمام حزب اختلاف جماعتوںنے ستائش کی ہے اور کہا ہے کہ وہ بھارتی فضائیہ کے ساتھ ہے۔کل نئی دہلی میں حزب اختلاف جماعتوں کا اجلاس منعقد ہوا تھا۔ اِس اجلاس میں کانگریس پارٹی کے صدر راہول گاندھی، راشٹر وادی کانگریس پارٹی کے صدر شرد پوار،آندھر پر دیش کے وزیر اعلیٰ چندر بابو نائیڈو اورمغربی بنگال کی وزیر اعلیٰ ممتا بینر جی ،سمیت کئی رہنمائوں نے شر کت کی۔
***** ***** *****
لوک سبھا انتخا بات کے پیش نظر ریاستی وزیر خزا نہ سُدھیر مُنگنٹی وار نے ،زراعت، راستے، توا نائی اور محکمہ قبائلی تر قیات کے لیے بڑے پیما نے پر اقدامات کرنے والا عبوری بجٹ کل مقننہ میں پیش کیا۔ جبکہ مملکتی وزیر خزا نہ دیپک کیسر کر نے قانون ساز کونسل میں بجٹ پیش کیا۔
اِس بجٹ میںحکو مت نے کسا نوں کو معاشی استحکام دینے کا تیقن دیا ہے۔اِس موقعے پر مُنگنٹی وار نے کہا کہ چھتر پتی شیواجی مہا راج یوجنا کے تحت ریاست کے تمام کسا نوں کو قرض معا فی ملنے تک اِمداد فراہم کی جائے گی۔وزیر موصوف نے بتا یا کہ ملازمین کے لیے ساتویں تنخواہ کمیشن کی سفا رشات پر عمل آ وری کرنے کی وجہ سے ریاستی حکو مت کی تجوری پر 19؍ہزار784؍ کروڑروپئے کا اضا فی بوجھ پڑھنے کا امکان ہے۔
***** ***** *****
اِس بجٹ میں محکمہ سماجی تر قیات کے لیے 3؍ہزار180؍ کروڑ،دیگر پسماندہ طبقات کی فلاح کے لیے 2؍ہزار892؍ کروڑ،
خواتین و بہبودِ اطفال کے لیے 2؍ہزار921؍ کروڑ،اقلیتوں کی فلاح کے لیے 462؍ کروڑ،حاملہ اور دودھ پلا نے والی مائوں کے غذائی منصوبے کے لیے ایک ہزار97؍ کروڑ،زراعت،صنعت اورکفایتی نرخ پر بجلی فراہمی کے لیے 5210؍ کروڑ روپئے اِمداد کی تجویز پیش کی گئی ہے۔
اورنگ آباد سمیت دیگر 8؍ شہروں میں روبہ عمل اسمارٹ سٹی منصوبے کے لیے 2؍ہزار400؍ کروڑ ،ریاست کے385؍شہروں میں پر دھان منتری آواس یوجنا کے لیے 6؍ہزار895؍ کروڑ۔
مراٹھواڑہ کے آٹھوں اضلاع سمیت کُل 14؍ اضلاع کے کسا نوں کو کم قیمت پر اناج فراہم کرنے کے لیے896؍ کروڑ روپئے فراہم کرنے کی تجویز ہے۔
*** ***** *****
ثانوی تعلیم کے مرکزی بورڈ ـCBSE کے امتحا نات مجوزہ نظام الاوقات کے مطا بق ہی منعقد کیئے جائیں گے۔بورڈ کی جانب سے یہ وضاحت کی گئی ہے۔CBSE کے بارہویں جماعت کے امتحانات15؍ فروری سے شروع ہو چکے ہیںجوآئندہ3؍اپریل تک جاری رہے گے۔
جبکہ دسویں جماعت کے امتحا نات 21؍ فروری سے شروع ہو چکے ہیں جو آئندہ29؍ مارچ تک جاری رہے گے۔
***** ***** *****
اورنگ آباد ہائوسِنگ اینڈ ایر یا ڈیولپمنٹ بورڈ ۔MAHADAنے شہر کے کم اور متوسط آمدنی والے طبقے کے لیے مکا نات کی قیمت میں 20؍ سے47؍ فیصد کمی کرنے کا فیصلہ کیا ہے۔ مہا ڑا کے چیر مین اُدئے سامنت نے کل شہر کے کم اور متوسط آمدنی والے طبقے کے لیے تقریباً
917؍مکا نوں کے لیے آن لائن در خواست دہی کا نظام معارف کیا۔اِس موقعے پر وہ صحا فیوں سے مخا طب تھے۔
***** ***** *****
دکنی زبان کے ماہر اسلم مرزا کو اِس سال کے گووِند ایوارڈ کے لیے منتخب کیا گیا ہے۔اورنگ آباد کے گروڑ ایڈز نامی اِدارے کی جانب سے گزشتہ چار برسوں سے یہ ایوارڈ دیا جا رہا ہے۔یہ ایوارڈ11؍ہزار روپئے اور سپاس نا مے پر مشتمل ہے۔آج اورنگ آباد میں اسلم مرزا کو یہ ایوارڈ عطا کیا جائے گا۔
***** ***** *****
نئی دہلی میں کھیلے گئے نشا نے بازی کے بین الاقوامی کپ مقابلے میں بھارت کی منو بھا کیر اور سوربھ چودھری نے مکسڈ ڈبلز مقابلے میں طلائی تمغہ حاصل کیا ہے۔10؍ میٹر ایئر پسٹل زمرے میں یہ جو ڑی 483.4؍ پوائنٹ حاصل کر کے سر ِ فہرست رہی۔

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.02.2019 07.10AM
Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 28 February 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८
फेब्रुवारी
२०१९
सकाळी ७.१० मि.
****
v भारतीय लष्करी
आस्थापनांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा डाव भारतानं उधळला; पाकिस्तानचं एक विमान पाडलं
v कारवाई दरम्यान, भारतानं एक मिग २१ विमान गमावलं; पाकिस्तानच्या
ताब्यातल्या वैमानिकाची सुटका करण्याची मागणी
v कृषी, रस्ते, ऊर्जा आणि आदिवासी विभागासाठी भरीव तरतुदी
असलेला राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधी मंडळात सादर
आणि
vविश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या मनू भाकेर आणि सौरभ चौधरी
जोडीला मिश्र दुहेरीत सुवर्णपदक मात्र टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा
पराभव; मालिकाही गमावली
****
भारतीय लष्करी
आस्थापनांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा डाव काल भारतानं
उधळून लावला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार
यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. या कारवाईत भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या हवाई दलाचं एक विमान
पाडलं. हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत पडलं. या कारवाईत भारतानं एक मिग-२१ विमान
गमावलं. या विमानाचा वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात आहे, असं ते म्हणाले.
दरम्यान,
या जखमी वैमानिकाची दृश्य फीत काल पाकिस्ताननं जारी केली. मात्र असं करून, पाकिस्ताननं
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायदा तसंच जिनेव्हा कराराचं उल्लंघन केल्याचं भारतानं म्हटलं
आहे. पाकिस्ताननं या वैमानिकाला तातडीनं सुरक्षित परत पाठवावं, असं भारतानं, पाकिस्तानच्या
उच्चायुक्तांना बोलावून सांगितलं.
दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये बडगाम जिल्ह्यात हवाई दलाचं
एक मालवाहू हेलिकॉप्टर कोसळून हवाई दलाचे सहा अधिकारी ठार झाले. यात एका स्थानिक नागरिकाचाही
मृत्यू झाला.
****
वायू दलानं परवा पाकिस्तानात केलेल्या हवाई कारवाईचं,
विरोधी पक्षांनी स्वागत केलं आहे. काल नवी दिल्लीत २१ विरोधी पक्षांची बैठक झाली, या
बैठकीत सर्व विरोधी पक्ष सैन्यदलासोबत भक्कमपणे उभे असल्याचं म्हटलं आहे. या बैठकीला
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आंध्र प्रदेशचे
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मार्क्सवादी
कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी, द्रविड मुनेत्र कळघमचे तिरुची शिवा आणि
लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव, यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
****
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री
सुधीर मुनगंटीवार यांनी काल कृषी, रस्ते, ऊर्जा आणि आदिवासी विभागासाठी भरीव अशा तरतुदी
असलेला अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी
विधानपरिषदेत या अर्थसंकल्पाचं वाचन केलं. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य
देण्याची ग्वाही सरकारनं दिली. शेतकऱ्यांना सन्मानानं जगता यावं म्हणून छत्रपती शिवाजी
महाराज योजनेमार्फत राज्यातला शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत निधी उपलब्ध
करून देणार, असल्याचं मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं. कर्मचाऱ्यांसाठीच्या सातव्या
वेतन आयोगाची अंमलबजावणी होत असल्याने राज्याच्या तिजोरीत १९ हजार ७८४ कोटी रुपये इतकी
महसुली तूट अपेक्षित असल्याचं ते म्हणाले.
सन 2019-20 च्या अर्थसंकल्पामध्ये
महसुली जमा 3 लक्ष 14 हजार 498 कोटी रुपये व महसुली खर्च हा 3 लक्ष
34 हजार 273 कोटी खर्च अंदाजीत केला. परिणामी 19 हजार 784 कोटी रुपये महसुली तूट येत आहे. अनावश्यक खर्चात
बचत करून व महसूल वसूली अधिक प्रभावीपणे करून हि तूट मर्यादीत करण्याचा मी प्रयत्न
करेणं.
राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असल्याची माहिती देताना,
मुनगंटीवार यांनी, गेल्या १५वर्षांच्या तुलनेत राज्यावर कर्जाचा बोजा स्थूल उत्पन्नाच्या १४ पूर्णांक ८२ शतांश टक्के एवढा असल्याचं
सांगितलं.
सामाजिक विकास विभागासाठी तीन हजार १८० कोटी, इतर
मागासवर्गीय कल्याणासाठी दोन हजार ८९२ कोटी, महिला बालविकास दोन हजार ९२१ कोटी, अल्पसंख्याक
विकास ४६२ कोटी, गर्भवती आणि स्तन्यदा मातांच्या पोषण आहार योजनेसाठी एक हजार ९७ कोटी,
शेती तसंच उद्योगांना तर सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यासाठी पाच हजार २१० कोटी रुपये
निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
औरंगाबादसह आठ शहरांमध्ये राबवल्या जात असलेल्या
स्मार्ट सिटी योजनेसाठी चोवीसशे कोटी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या
निधीत चारशे कोटी रुपये वाढ, राज्यातल्या ३८५ शहरांत राबवल्या जात असलेल्या, प्रधानमंत्री
आवास योजनेसाठी सहा हजार ८९५ कोटी, मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांसह एकूण १४ जिल्ह्यांतल्या
शेतकऱ्यांना, अल्पदरांत धान्य पुरवठ्यासाठी ८९६ कोटी रुपये तरतूद प्रस्तावित आहे.
****
शेती- सिंचन, आरोग्य, महिला आणि बाल विकास या क्षेत्रांसह
प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या लोक कल्याणकारी उपक्रमांसाठी भरीव तरतूद करुन राज्याची
विकास यात्रा अखंडित ठेवण्याचा निर्धार काल
सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात व्यक्त झाला आहे, अशी प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. उद्योग आणि रोजगार निर्मिती, पायाभूत
सुविधा, ग्रामविकास, कौशल्य विकास या कार्यक्रमांबरोबरच दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी
या अर्थसंकल्पातील तरतुदी सहाय्यभूत ठरणार आहेत, असंही ते म्हणाले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या परीक्षा
पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार असून, परीक्षार्थी तसंच पालकांनी अफवांवर विश्वास
ठेऊ नये, असं आवाहन मंडळानं केलं आहे. सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून
सुरू झाल्या असून, तीन एप्रिलपर्यंत चालणार आहेत, तर दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून
सुरू झाल्या असून, त्या २९ मार्चपर्यंत चालणार आहेत.
****
नांदेड नगर पालिकेचे माजी अध्यक्ष अध्यक्ष पुरुषोत्तम
माहेश्वरी यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८१ वर्षाचे होते. नांदेड इथल्या उस्मानशाही
मिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काही काळ कार्य केलं. त्यानंतर नोकरीचा
राजीनामा देऊन त्यांनी नांदेड नगरपालिका निवडणूक
लढवली आणि नगराध्यक्ष झाले. नांदेडच्या महिला महाद्यिालयाचे ते सचिव तर प्रतिभा
निकेतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. याशिवाय अन्य काही संस्थामध्ये
ते सक्रिय होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी एक वाजता गोवर्धन घाट स्मशान भूमीमध्ये
अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
शाळा न्यायाधिकरण आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद
खंडपीठानं दिलेल्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथले
शिक्षण संस्थाचालक राजकुमार सावंत आणि सचिव राहूल प्रधान यांना पंधरा दिवसांची कैदेची
आणि दहा हजार रूपये दंडाची शिक्षा गंगाखेड न्यायालयाने सुनावली आहे. कामावरून कमी केलेल्या
शिक्षिकेला ४० दिवसाच्या आत पुन्का कामावर रूजू करून घेऊन वेतन देण्याचे आदेश न्यायालयानं
दिले होते, मात्र या आदेशाचं पालन या संस्थाचालकांनी केले नाही, त्यामुळे सदरील शिक्षिकेनं
न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती.
****
औरंगाबाद गृहनिर्माण
आणि क्षेत्र विकास मंडळ - म्हाडानं औरंगाबाद शहरातल्या अल्प आणि मध्य उत्पन्न गटातल्या
सदनिकांचे दर २० ते ४७ टक्यांपर्यंत कमी केले आहेत. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी
काल शहरातल्या अल्प आणि मध्यम उत्पन्न
गटातल्या रिक्त असलेल्या एकूण ९१७ सदनिकांसाठी
ऑनलाईन अर्ज नोंदणीचं उद्धाटन केलं, त्यावेळी
वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या
सिल्लोड नगरपरिषदेसाठी काल ७१ टक्के मतदान झालं. नगराध्यक्ष आणि २६ नगरसेवकांसाठी ही
निवडणूक झाली. आज सकाळी दहा वाजता या मतदानाची मोजणी केली जाणार आहे.
****
नवी दिल्लीत काल
संपलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या
मनू भाकेर आणि सौरभ चौधरी या जोडीनं मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावलं आहे. १० मीटर
एअर पिस्टल प्रकारात या जोडीनं ४८३ पूर्णाक ४ दशांश गुणांची कमाई केली. अंतिम फेरीत
त्यांनी चीन आणि जपानच्या खेळांडूचा प्रतिकार मोडून काढला.
दरम्यान, काल
बंगरूळू इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात
ऑस्ट्रेलियानं भारताचा सात गडी राखून पराभव केला आणि मालिकाही जिंकली. भारतानं ऑस्ट्रेलियासमोर ठेवलेलं १९१ धावाचं लक्ष्य ऑस्ट्रेलियानं २ चेंडू
राखून पूर्ण केलं. भारताचा कर्णधार विराट कोहली यानं नाबाद ७२ धावा काढल्या.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या
जळकोट वाडी इथले शेतकरी त्रिंबकभाऊ फंड यांनी त्यांना मिळालेली कृषी भूषण पुरस्काराची
५१ हजार रूपयांची रक्कम पुलवामा इथं शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना समर्पित
केली आहे. काल जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्याकडे त्यांनी ही रक्कम सुपूर्द केली. फंड यांच्यासोबतच बोरामनी गावातल्या
वजीर मुजावर शेख, वडगाव शिराढोण इथले उद्धव
पवार आणि अन्य शेतकऱ्यांनी मिळून एक लाख सोळा हजार रूपये या शहिदांच्या परिवारांना दिले.
****
पंतप्रधान जन आरोग्य योजनेतंर्गत परभणी जिल्ह्यातल्या नागरीकांसाठी आयुष्यमान भारत या योजनेच्या पत्रांचं
वाटप काल जिल्हा सामान्य रुग्णालय इथं खासदार संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं. दरम्यान येत्या शनिवारी २ मार्चला राष्ट्रीय आरोग्य
अभियानातंर्गत परभणी इथं आरोग्य शिबीराचे आयोजन सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यत करण्यात
आलं असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं, उन्हाळी
सुट्यांनिमित्त नांदेड इथून सुरू केलेल्या विशेष गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. यानुसार,
नांदेड- हजरत निझामुद्दीन दिल्ली-नांदेड, नांदेड – तिरुपती –नांदेड, तिरुपती-नगरसोल-तिरुपती,
नांदेड-पनवेल-नांदेड आणि हैदराबाद-जयपूर-हैदराबाद या विशेष गाड्या येत्या जूनपर्यंत
सुरू राहणार आहेत.
*****
***
Wednesday, 27 February 2019
Tex- AIR News Bulletin Aurangabad 18.00 Evining Bulletin
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27
February 2019
Time 6.00 to 6.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ फेब्रुवारी
२०१९ सायंकाळी
६.०० वा.
****
नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते
****
पाकिस्ताननं आज सकाळी केलेला हवाई हल्ला, भारतीय
वायूसेनेनं मोडून काढला आहे. विदेश मंत्रालय प्रवक्ते रवीशकुमार आणि एअर व्हाईस मार्शल
आर जी कपूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या कारवाईत वायूसेनेच्या मिग विमानानं
पाकिस्तानचं एक लढाऊ विमान पाडलं, मात्र या कारवाईत एक भारतीय विमान वैमानिकासह बेपत्ता
झाल्याची माहिती रवीशकुमार यांनी दिली. हा वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचा
दावा, पाकिस्तानकडून करण्यात आला असल्याचं, रवीशकुमार यांनी सांगितलं.
दरम्यान, जम्मू काश्मीर,पंजाब आणि हिमाचल प्रदेशातली नागरी
उड्डाणांसाठी आज बंद केलेली विमानतळं काही तासांनंतर पुन्हा खुली करण्यात आली आहेत
****
राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा, १९ हजार ७०० कोटी
रुपये तुटीचा अंतरिम अर्थसंकल्प आज विधीमंडळात सादर झाला. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार
यांनी विधान सभेत तर वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प
सादर केला. राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असल्याची माहिती देताना, मुनगंटीवार यांनी,
गेल्या १५वर्षांच्या तुलनेत राज्यावर कर्जाचा बोजा स्थुल उत्पन्नाच्या १४ पूर्णांक
८२ शतांश टक्के एवढा असल्याचं सांगितलं.
या अर्थ संकल्पात अर्थमंत्र्यांनी, महिला उद्योजकांसाठी
नवतेजस्विनी योजना, अंगणवाडी सेविकांना भ्रमणध्वनी, इतर मागासवर्गीय कल्याण विभाग,
थकीत करांच्या वसूलीसाठी अभय योजना, पाच हजार अंगणवाडी केंद्रांचं आदर्श अंगणवाडी केंद्रात
रुपांतर, इत्यादी योजनांची घोषणा केली.
सामाजिक विकास विभागासाठी तीन हजार १८० कोटी, इतर
मागासवर्गीय कल्याणासाठी दोन हजार ८९२ कोटी, महिला बालविकास दोन हजार ९२१ कोटी, अल्पसंख्याक
विकास ४६२ कोटी, गर्भवती आणि स्तन्यदा मातांच्या पोषण आहार योजनेसाठी एक हजार ९७ कोटी,
न्यायालय इमारती बांधकाम ७२५ कोटी, पोलिस निवासस्थान बांधकाम ३७५ कोटी, ग्रामपंचायत
इमारती बांधकामासाठी ७५कोटी, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा विभागासाठी एक हजार ८७ कोटी,
शेती तसंच उद्योगांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यासाठी पाच हजार २१० कोटी रुपये
निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
महामार्ग उभारणीसाठी दोन हजार १६४ कोटी, उडान योजनेंतर्गत
विमानतळ विकासासाठी ६२ कोटी, बसस्थानक विकासासाठी एकशे एक कोटी, तर नवीन बस खरेदीसाठी
२१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
औरंगाबादसह आठ शहरांमध्ये राबवल्या जात असलेल्या
स्मार्ट सिटी योजनेसाठी चोवीसशे कोटी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या
निधीत चारशे कोटी रुपये वाढ, राज्यातल्या ३८५ शहरांत राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री
आवास योजनेसाठी सहा हजार ८९५ कोटी, मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांसह एकूण १४ जिल्ह्यांतल्या
शेतकऱ्यांना अल्पदरांत धान्य पुरवठ्यासाठी ८९६ कोटी तरतूद प्रस्तावित आहे.
या आर्थिक वर्षात महसूली जमा तीन लाख १४ हजार कोटी
तर महसूली खर्च तीन लाख ३४ हजार कोटी रुपये राहील, असा अंदाज या अंतरिम अर्थसंकल्पात
मांडण्यात आला आहे.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या परीक्षा
पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार असून, परीक्षार्थी तसंच पालकांनी अफवांवर विश्वास
ठेऊ नये, असं आवाहन मंडळानं केलं आहे. सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून
सुरू झाल्या असून, तीन एप्रिलपर्यंत चालणार आहेत, तर दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून
सुरू झाल्या असून, त्या २९ मार्चपर्यंत चालणार आहेत.
****
मराठी राजभाषा दिन आज सर्वत्र साजरा होत आहे. कुसुमाग्रज
प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा, जनस्थान पुरस्कार, ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी
डहाके यांना आज नाशिक इथे प्रदान करण्यात येत आहे.नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात
या दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. राज्य परिवहन महामंडळातर्फे राज्यातल्या
सगळ्या बसस्थानकांवर ”मराठी भाषा गौरव दिन”साजरा करण्यात आला.
****
नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मनू भाकेर
आणि सौरभ चौधरी जोडीनं १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. मिश्र गटात
झालेल्या या स्पर्धेत भाकेर आणि चौधरी जोडीने,
चीन आणि जपानच्या नेमबाजांचं आव्हान मोडीत काढत, सुवर्णपदक मिळवलं आहे.
****
भारत ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी मालिकेतला दुसरा आणि
अंतिम सामना आज बंगळुरू इथं होत आहे, संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकणं आवश्यक आहे.
****
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं, आमचं यानंतरचं बातमीपत्र
उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.02.2019 13.00
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 February
2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ फेब्रुवारी
२०१९ दुपारी १.०० वा.
****
पाकिस्तानच्या एका लढाऊ विमानानं आज सकाळी हवाई हद्दीचा भंग करत भारतीय
अवकाशात प्रवेश केला. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात घुसलेल्या या विमानाला, भारताच्या
हवाई गस्ती पथकानं तत्काळ पिटाळून लावलं, मात्र या विमानानं, या भागात काही बॉम्ब टाकल्याचं
वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
****
भारतीय हवाई दलाचं
एक जेट विमान आज सकाळी दहाच्या सुमाराला जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात कोसळलं.
या दुर्घटनेत विमानाचे दोन तुकडे झाले आणि त्यानं पेट घेतला. या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर,
श्रीनगर, जम्मू, लेह, चंदीगढ आणि अमृतसर ही विमानतळं, नागरी वाहतुकीसाठी तात्पुरती
बंद करण्यात आली आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणानं ही माहिती दिली.
****
पाकिस्तानच्या हवाई
हद्दीत आलेली दोन भारतीय लढाऊ विमानं पाडल्याचा आणि एका वैमानिकाला पकडल्याचा दावा
पाकिस्ताननं केला आहे. पाक लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी एका ट्वीट
संदेशात हा दावा केला असून, पाडलेल्या विमानांपैकी एक पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये
आणि एक जम्मू काश्मीरमध्ये पडल्याचं त्यात म्हटलं आहे.
दरम्यान पाकिस्तानचे
पंतप्रधान इम्रान खान यांनी आज अण्वस्त्र संबंधित निर्णयाधिकार असणाऱ्या उच्च
समितीची बैठक बोलावल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. भारतानं केलेल्या
हवाई कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीनं काल घेतलेल्या
बैठकीमध्ये ही बैठक बोलावण्याचा निर्णय झाला होता. भारताबरोबरच्या सध्याच्या तणावपूर्ण
स्थितीच्या पार्श्वभूमीवर , पाकिस्तान संसदेचं विशेष सत्रही आज बोलावलं आहे.
****
जम्मू काश्मीरच्या
शोपियां जिल्ह्याच्या मेमंढर भागात आज पहाटे सुरक्षा दलांनी जैश ए मोहम्मद संघटनेच्या
दोन अतिरेक्यांना ठार केलं. या भागात हे अतिरेकी लपून असल्याची माहिती मिळाल्यानंतर
सेना, केंद्रीय राखीव सुरक्षा दल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं या भागाची घेराबंदी
करून शोधमोहीम सुरू केली. सुरक्षा दलानं दिलेल्या प्रत्युत्तरात हे अतिरेकी मारले गेले.
चकमकीच्या ठिकाणावरून शस्तास्त्रं आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला.
****
युवकांनी स्वप्नपूर्ती
साठी धावतानाच, नवभारताच्या उभारणीत मध्यवर्ती भूमिका बजावावी, असं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत राष्ट्रीय युवा संसद महोत्सव पुरस्कार प्रदान
केल्यानंतर बोलत होते. नागपूरच्या श्वेता उमरे हिला पंतप्रधानांच्या हस्ते प्रथम पुरस्कार
देऊन गौरवण्यात आलं. माहिती प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धनसिंह राठोड यांच्यासह
अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
पाकिस्तानातल्या
दहशवादी तळांवर भारतानं केलेल्या हवाई हल्ल्याबाबत चीनसह इतरही कोणत्या देशानं पाकिस्तानची
बाजू घेतलेली नाही, यावरून, दहशतवादाला आश्रय देणाऱ्या शक्तींबाबत जग आता फार संयमी
भूमिका घेऊ शकत नाही, हे स्पष्ट झालं आहे, असं पाकिस्तानचे अमेरिकेतले माजी राजदूत
यू.एस.हक्कानी यांनी म्हटलं आहे. वॉशिंग्टन इथे वृत्तसंस्थांशी बोलताना हक्कानी यांनी,
चीननं पाकिस्तानला पाठिंबा न देता, केवळ दोन्ही देशांनी संयम राखावा, असं आवाहन केलं
आहे, याकडे लक्ष वेधलं.
****
ज्येष्ठ विचारवंत
एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास विशेष तपास पथकाकडे सोपवण्याचे निर्देश सर्वोच्च
न्यायालयानं दिले आहेत. याआधी या प्रकरणाचा तपास कर्नाटकच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून
सुरू होता. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पथकानं या दोन हत्यांमध्ये
काही समान दुवे असल्याचं न्यायालयाला सांगितल्यानंतर न्यायालयानं हे निर्देश दिले.
****
राज्याच्या विधानसभेत
आज, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, प्रसिद्ध संगीतकार भूपेन हजारिका, आणि नानाजी देशमुख
यांना भारतरत्न दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला.
या प्रस्तावाला काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला.
दरम्यान,राज्याच्या
दुष्कळी भागात पुरेशा प्रमाणात चारा छावण्या सुरू कराव्यात, या मागणीसाठी आज विरोधी
पक्षांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस
आणि अन्य विरोधी पक्षांनी यावेळी भाजप सरकार विरोधी घोषणा दिल्या.
*****
***
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.02.2019 11.00AM
आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२७ फेब्रुवारी २०१९ सकाळी ११.00
वाजता
****
परराष्ट्रमंत्री
सुषमा स्वराज आज सकाळी चीन दौऱ्यावर पोहोचल्या. चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांची
त्यांनी आज भेट घेतली. या भेटीत त्यांनी पुलवामा इथे झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत हल्ल्याबाबत
चर्चा केली. हा हल्ला करणाऱ्या जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेला पाकिस्तानचा पूर्ण
पाठिंबा असल्याचं सांगत, संयुक्त संघानं या संघटनेवर बंदी घातली असूनही पाकिस्तान मात्र
काहीही कारवाई करत नसल्याचं स्वराज यांनी नमूद केलं. पाकिस्तानकडून सतत सुरू असलेल्या
कागाळ्यांना प्रतिबंध करण्यासाठी भारतानं काल हवाई कारवाई केल्याचं, असं स्वराज यांनी
सांगितलं.
भारत पाकिस्तानदरम्यानची
सध्याची स्थिती जास्त चिघळू नये, अशी भारताची इच्छा असून, भारत याबाबतीत जबाबदारीनेच
वागणार असल्याचंही स्वराज यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान,
पाकिस्ताननं त्यांच्या भूमीवरून अतिरेकी कारवाया करणाऱ्या संघटनांवर कठोर कारवाई करावी,
असं अमेरिकेनं बजावलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोंपिओ यांनी पाकिस्तानचे
परराष्ट्रमंत्री शाह महेमूद कुरेशी यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना, कोणत्याही प्रकारच्या
सैनिकी कारवाईपासून दूर रहावं, असं सांगितलं.
भारताच्या
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना माईक यांनी, भारत आणि
अमेरिकेदरम्यानच्या संरक्षण सहकार्य तसंच शांती आणि सुरक्षा कायम ठेवण्याच्या, संयुक्त
उद्दिष्टावर जोर दिला.
****
राज्याचा
२०१९-२० या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प आज विधीमंडळात सादर होत आहे. वित्तमंत्री
सुधीर मुनगंटीवार दुपारी दोन वाजता विधानसभेत तर वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर विधान
परिषदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील.
****
रायगड जिल्ह्यात
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेनं सर्वाधिक म्हणजे अट्ठावीस ग्रामपंचायतींवर
वर्चस्व मिळवत जिल्हयात आघाडी घेतली आहे. त्या खालोखाल शेतकरी कामगार पक्षानं एकवीस,
राष्ट्रवादी काँग्रेसनं तेरा, कॉग्रेसनं चार, भारतीय जनता पक्षानं तीन आणि अन्य आघाड्यांनी
दहा ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविलं आहे.
*****
***
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 27 February 2019
Time: 8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۲۷ ؍فروری ۲۰۱۹
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸
ہندوستانی فضائیہ نے کل علی الصبح پا کستان کے خیبر پختونخوا کے بالا کوٹ علاقے میں حملہ کر کے عسکر یت پسند گروپ جیش محمد کا اڈہ تباہ کر دیا۔ خارجہ سیکریٹری وِجئے گوکھلے نے کل نئی دہلی میں یہ اطلاع دی۔ اُنھوں نے بتا یا کہ بھارت کے مختلف مقا مات پر فدائیں حملوں کے لیے جیش محمد کی جا نب سے خود کش بمباروں کو تر بیت دیئے جانے کی اطلاع پر فضا ئیہ نے یہ کار وائی کی۔ اِس حملے میں بری تعداد میں جیش محمد کے انتہا پسند، اُن کی تر بیت کار اور تنظیم سے متعلق افراد ہلاک ہو ئے۔ وِجئے گو کھلے نے بتا یا کہ با لا کوٹ میں واقع یہ اڈہ جیش کے سر براہ مسعود اظہر کا برادر نسبتی یوسف اظہر عرف استاد غوری چلا تا تھا۔ حملے میں شہریوں کی ہلا کتیں نہ ہوں اِس بات کا خاص خیال رکھا گیا۔
دریں اثناء کل شب جموں وکشمیر میں سر حد سے قریب واقع پونچھ اور راجوری سیکٹر میں پا کستانی فوج کی فائرنگ کے جواب میں ہندوستانی فوج نے سرحد پر واقع پا کستانی فوج کی 5؍ چو کیاں تباہ کر دی۔ بری فوج کے تر جمان نے بتا یا کہ ہندوستا نی فوج کی فائرنگ میں متعدد پا کستانی فوجی زخمی ہو ئے۔ کل شام ساڑھے چھ بجے کے بعد پا کستانی فوج نے جنگ بندی معاہدے کی خلاف ورزی کر تے ہوئے ہندوستا نی مورچوں پر بمباری کی اور غیر فو جی آبادی کو نشا نہ بنا یا۔تاہم ہندوستا نی فوج نے شہری آ با دی سے دور واقع پا کستانی چو کیاں تباہ کر کے منہ توڑ جواب دیا۔ اِس واقعہ میں بھارت کے بھی 5؍ فو جی معمولی زخمی ہوئے۔
***** ***** *****
14؍ فروری کو پلوامہ میں ہندوستا نی نیم فو جی دستے کے جوا نوں پر ہوئے خود کش حملے کے بعد سے ملک بھر میں غم و غصہ بھرا ہوا تھا۔ کل کے فضا ئی حملے کے بعد سے ملک بھر میں پا کستانی تر بیت یافتہ دہشت گردوں کو منا سب جواب ملنے کے جذ بات اظہار کیا جا رہا ہے۔ ملک کی تمام سیا سی جماعتوں نے اِس کار وائی پر اطمینان کا اظہار کیا۔ کانگریس صدر راہول گاندھی نے ہندوستا نی فضائیہ کو خراج تحسین پیش کر تے ہوئے اِس کار وائی کا خیر مقدم کیا۔ مغر بی بنگال کی وزیر اعلیٰ ممتا بینر جی اور تملنا ڈو کے وزیر اعلیٰ پلا نی سامی نے بھی اِس کار وائی کا خیر مقدم کیا ۔ اِس کے علا وہ کھیلوں اور دیگر شعبہ ہائے زندگی سے تعلق رکھنے والے افراد نے بھی پا کستان میں کی گئی فوجی کار وائی کا خیر مقدم کیا۔
***** ***** *****
پا کستانی دہشت گردی کو منہ توڑ جواب دیے جانے پر عوام میں بھی خوشی کا اظہار کیا جا رہا ہے۔ اورنگ آباد، جالنہ ،پر بھنی، ہنگولی، ناندیڑ ، بیڑ، لاتور اور عثمان آباد اضلاع میں فضائی کار وائی پر خوش کا اظہار کیا گیا۔ عثمان آباد ضلع میں مختلف مقا مات پر خوشیاں منائی گئی۔ عثمان آباد، عمر گہ اور دیگر مقا مات پر مٹھا ئیاں تقسیم کی گئیں۔ پر بھنی شہر اور ضلع کے دیگر مقا مات پر پٹا خے جلا کر فوج کو خراج تحسین پیش کیا گیا۔ اورنگ آ د میں بھی گلمنڈی میں بی جے پی کار کنوں نے خوشیاں منائی ۔
***** ***** *****
وزیر اعظم نریندر مودی نے کہا ہے کہ ملک محفوظ ہاتھوں میں ہے اور ایسا کوئی کام نہیں ہو نے دیں گے جس سے ملک کے وقار کو کوئی نقصان پہنچے۔ وہ کل راجستھان کے چورو میں منعقدہ ایک جلسے سے خطاب کررہے تھے۔ اُنھوں نے کہا کہ ملک سے بڑھ کر کوئی چیز نہیں ہے اور ملک کی خد مت کر نے والے ہر شخص کو وہ سلام کر تے ہیں۔
***** ***** *****
ہندوستانی فضا ئیہ کی کل علی الصبح کی گئی کار وائی کا ریاستی اسمبلی میں اتفاقِ رائے سے خیر مقدم کیا ہے۔ وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے اِس سلسلے میں قرارداد کل اسمبلی میں پیش کی۔ شیو سینا کے سبھاش سابنے ،راشٹر وادی کانگریس کے قائد اجیت پوار، کانگریس رکن نسیم خان اور سماج وادی پارٹی رہنما ابو عاصم اعظمی نے اِس قرار داد کی تائید کی اور فضا ئیہ کو خراج ِ عقیدت پیش کیا۔
***** ***** *****
ریاستی وزیر چندر کانت پاٹل نے کل ریاستی اسمبلی کو بتا یا کہ درج فہرست قبائلوں کے ریزر ویشن کو بر قرار رکھتے ہوئے دھنگر سماج کو علحدہ ریزر ویشن دینے سے متعلق تجویز بہت جلد مرکزی حکو مت کو روانہ کی جائے گی۔ اِس پر حزب اختلاف کے قائد دھننجئے منڈے نے الزام عائد کیا کہ صرف انتخا با ت کو نظر میں رکھ کر حکمراں جماعت دھنگر سماج کو ریزر ویشن کا لالچ دے رہی ہے۔ اشس موضوع پر کل قا نون ساز کونسل میں بھی شدید ہنگا مہ آرائی ہوئی۔
***** ***** *****
مراٹھواڑہ میں کل پیش آئے دو علحدہ علحدہ حادثات میں7؍ افراد ہلاک اور دیگر3؍ شدید زخمی ہو گئے ۔ اورنگ آباد-نا سک شاہراہ پر ویجا پور سے قریب پرسوں شب ایک کار اور کنٹینر میں ہوئے تصا دم میں اورنگ آباد کے4؍ افراد جائے حادثے پر ہی ہلاک ہو گئے اور ایک خا تون شدید زخمی ہو ئی۔ مہلو کین میں بی جے پی مہا راشٹر مہیلا مورچہ کی صدر سویتا گھُلے اُن کے شوہر اور دیگر2؍ افراد شامل ہیں۔
پو نا-شولا پور شاہراہ پر کل شام ایک اور سڑک حادثے میں 3؍ افراد ہلاک ہو گئے ۔

Subscribe to:
Posts (Atom)
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...