Monday, 31 July 2023

आकाशवाणी औरंगाबाद – आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक – 31.07.2023 रोजीचे- वृत्त विशेष

आकाशवाणी औरंगाबाद –दिनांक 31.07.2023 रोजीचे रात्री 08.00 ते 08.15 वाजताचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र

आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक 31.07.2023 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.07.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 July 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०

****

·पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना तीन दिवसांची मुदतवाढ, महाराष्ट्रात आतापर्यंत दीड कोटीहून अधिक अर्ज दाखल.

·पंतप्रधान मोदींचा उद्या पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कारानं गौरव, विविध विकासकामांचं उद्घाटन.

·पालघरजवळ धावत्या रेल्वेत गोळीबार, रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यासह तीन प्रवाशांचा मृत्यू, आरपीएफच्या जवानाला अटक.

आणि

·संत मुरारी बापू यांची चित्रकूट भारत गौरव यात्रा हिंगोलीत दाखल, औंढा इथं रामकथावाचन.

****

पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य शासनाच्या विनंतीनुसार केंद्र सरकारने तीन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. एक रुपयात पीक विमा अर्ज भरून पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. ती आता तीन ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. आजपर्यंत राज्यात एक कोटी पन्नास लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून या योजनेत सहभाग घेतला आहे. कोणत्याही तांत्रिक बाबींमुळे शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये, यादृष्टीने ही मुदतवाढ देण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी आपले विमा अर्ज नोंदवून घ्यावेत, असं आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

****

मणीपूरमधील हिंसाचाराच्या मुद्यावर पंतप्रधानांनी संसदेत निवेदन देण्याच्या मागणीवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही वारंवार बाधित झालं. आज लोकसभेत कामकाज सुरू होताच काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी या मुद्यावरून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. पंतप्रधानांनी तातडीने या विषयावर निवेदन देण्याच्या मागणीवरून विरोधक आक्रमक झाले होते. या गदारोळातच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोंधळ कमी न झाल्यानं अध्यक्षांनी प्रारंभीच्या तहकुबीनंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.

राज्यसभेतही कामकाज सुरू होताच विरोधकांनी मणिपूर मुद्यावर नियम २६७ अन्वये चर्चेची मागणी लावून धरली. या मुद्यावर सरकार चर्चेला तयार असल्याचं सभागृह नेते पियुष गोयल यांनी सांगितलं. त्याचवेळी विरोधी पक्ष चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मणिपूर मुद्यावर पंतप्रधानांनी निवेदन देण्याची मागणी केली. सभागृहात सुरू असलेला गदारोळ पाहता सभापतींनी राज्यसभेचं कामकाज आधी दुपारी बारा वाजेपर्यंत, नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत तर त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित केलं.

****

दरम्यान, संसदेतील सभागृहाचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी आज सर्वपक्षीय बैठक घेतली. सदनाचे नेते पियुष गोयल, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, द्रविड मुन्नेत्र कळघमचे तिरुची शिवा, तृणमूल काँग्रेसचे सुखेंदू शेखर रॉय, सीपीआयचे बिनॉय विश्वम, राष्ट्रीय जनता दलाचे प्राध्यापक मनोज झा यांची बैठकीला उपस्थिती होती.

****

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि त्या अगोदर काही राज्यांच्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांशी चर्चा करणार आहेत. आजपासून दररोज राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांबरोबर ते बैठक घेणार आहेत. हे बैठकांचं सत्र १० ऑगस्टपर्यंत चालेल. येत्या आठ ऑगस्ट रोजी ते एनडीएच्या महाराष्ट्रातील खासदारांशी चर्चा करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुणे दौऱ्याची सुरुवात पंतप्रधान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन आणि पूजा करून करणार आहेत. पुणे मेट्रोच्या पूर्ण झालेल्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कचऱ्यातून उर्जा प्रकल्पाचं उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं बांधलेल्या सहा हजार चारशेहून अधिक घरांचं, तर पिंपरी चिंचवड महापालिकेद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधलेल्या एक हजार २८० हून अधिक घरांचं तसंच पुणे महापालिकेने बांधलेल्या दोन हजार ६५० हून अधिक घरांचं, हस्तांतरण पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाणार आहे.

****

पाण्यात आढळणाऱ्या आर्सेनिक या हानिकारक घटकाचं प्रमाण कमी झाल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. जल शक्ति मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. ऑगस्ट २०१६ मध्ये देशातील सहा राज्यात १४ हजार २० लोकवस्त्यांवर पिण्याच्या पाण्यात आर्सेनिक प्रमाणापेक्षा जास्त असल्याची माहिती मिळाली होती. यावर्षी २५ जुलैपर्यंत ही संख्या कमी होऊन फक्त ४६० इतकी राहिल्याचं शेखावत यांनी सांगितलं. पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांमध्येच आता याचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

****

पश्चिम रेल्वेच्या पालघर स्थानकाजवळ चालत्या रेल्वेगाडीमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसाने केलेल्या गोळीबारात आज एका वरिष्ठ आरपीएफ अधिकाऱ्यासह इतर तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. जयपूर-मुंबई एक्स्प्रेस पालघर स्थानकाजवळून जात असताना पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर हल्लेखोर पोलिस पळून जायच्या प्रयत्नात असताना दहिसर स्थानकातून त्याला ताब्यात घेण्यात आलं. चेतन सिंह असं आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबलचं नाव आहे.

****

चित्रकूट भारत गौरव यात्रा आज हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथं पोहोचली. त्या  निमित्ताने नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या परिसरात संत मुरारी बापू यांचं रामकथा वाचन झालं. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून देशभरात महाराष्ट्राचं मोठं महत्त्व असल्याचं त्यांनी सांगितलं. विठ्ठल नावाचे नामस्मरण करून अभिवादन केलं. केदारनाथ इथून या यात्रेला सुरुवात झाली असून बारा ज्योतिर्लंग ठिकाणी भक्तांच्या वतीने राम कथेचं आयोजन करण्यात आलं आहे. या यात्रेमध्ये मुरारी बापू यांच्या सोबत एक हजार आठशे भाविक आहेत. या मध्ये १८० देशातील प्रतिनिधींचा समावेश आहे. 

****

जालना जिल्ह्यात, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून गुणवत्तापूर्ण विकास कामं करण्याबरोबरच, निधी वेळेत खर्च होईल याची सर्व विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कृष्णनाथ पांचाळ यांनी दिले आहेत. जालना जिल्हा वार्षिक योजनेच्या आज झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. वर्ष २०२३-२४ या चालू वर्षातील निधी वेळेत खर्च करण्यासाठी विभागप्रमुखांनी प्रस्तावास तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता घेऊन पुढील कामांची प्रक्रिया सुरु करावी. प्रलंबित कामांचा आणि खर्चाचा नियमितपणे आढावा घ्यावा असंही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितलं.

****

धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात लहान मुलांच्या उपचारासाठी ३० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात प्रसुतीसाठी दाखल होणाऱ्या महिला या सर्वसाधारण,  गरीब असतात. प्रसुती दरम्यान काही नवजात बालकांना जन्मताच ऑक्सीजनची गरज लागते अथवा इतर व्यांधीमुळं अतिदक्षता विभागाची आवश्यकता भासते. त्यामुळे शासनानं ३० खाटांचा अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यास मंजुरी दिली आहे.

****

पावसाळ्यात पसरणाऱ्या डोळ्यांच्या आजाराबाबत नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन लातूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी केलं आहे. या आजारात डोळ्यांना खाज सुटते, सूज येऊन डोळे लालसर होतात. हा संसर्गजन्य आजार असल्याने, डोळे आलेल्या व्यक्तीने विलगीकरणात राहावं, तसंच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार घ्यावा, असं डॉ वडगावे यांनी सांगितलं आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी सर्वोच्च न्यान्यालयानं पुढं ढकलली आहे. आजारपणाच्या कारणावरून मलिक यांनी मागितलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं १३ जुलैला फेटाळला होता. त्यावर मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांचं एक मूत्रपिंड निकामी झालं असून, दुसऱ्याचंही काम थांबलं आहे, त्यामुळं त्यांना जामीन द्यावा, असं मलिक यांचे वकील कपील सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितलं. या याचिकेवर पुढच्या आठवड्यात सुनावणी होईल, असं न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांनी सांगतिलं.

****

आगामी दोन दिवसात मराठवाड्यामध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तर कोकणातील अनेक भागांमध्ये, मध्य महाराष्ट्र, आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

****

उद्या एक ऑगस्ट या महसूल दिनापासून सर्वत्र महसूल सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. हिंगोली जिल्ह्यात या सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रम होणार आहेत. महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी हा सप्ताह राबवण्यात येत आहे.

****

आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 31.07.2023, रोजीचे दुपारी: 01.30, वाजताचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 31.07.2023, रोजीचे दुपारी: 01.00, वाजताचे मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 31.07.2023 रोजीचे दुपारी : 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 31 July 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३१ जूलै २०२ दुपारी १.०० वा.

****

मणिपूर मुद्यावरुन संसदेचं कामकाज आजही बाधित झालं.

लोकसभेत कामकाज सुर होताच काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी, मणिपूर मुद्यावर पंतप्रधानांनी निवेदन देण्याची मागणी करत, घोषणाबाजी सुरु केली. या गदारोळातच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र गोंधळ सुरुच राहील्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

राज्यसभेतही हेच चित्र पाहायला मिळालं. कामकाज सुरु होताच विरोधकांनी मणिपूर मुद्यावर नियम २६७ अन्वये चर्चेची मागणी लाऊन धरली. या मुद्यावर सरकार आज दुपारी दोन वाजता चर्चा करेल, असं सभागृह नेते पियुष गोयल यांनी सांगितलं. विरोधी पक्ष चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मणिपूर मुद्यावर पंतप्रधानांनी निवेदन देण्याची मागणी केली. यावरुन गदारोळ झाल्यानं राज्यसभेचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित झालं होतं.

****

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून सत्तारुढ रालोआ बैठका घेणार आहेत. या बैठका १० ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहेत. बैठकीची सुरुवात पश्चिम उत्तरप्रदेश आणि बुंदेलखंड आणि ब्रज क्षेत्रातल्या खासदारांसोबतच्या चर्चेनं होईल.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुणे दौऱ्याची सुरुवात पंतप्रधान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन आणि पूजा करून करणार आहेत. पुणे मेट्रोच्या पूर्ण झालेल्या दुसऱ्या टप्प्याच्या सेवांचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील.

कचऱ्यातून उर्जा या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रकल्पाचं उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं बांधलेल्या सहा हजार चारशेहून अधिक घरांचं, तर पिंपरी चिंचवड महापालिकेद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधलेल्या एक हजार २८० हून अधिक आणि पुणे महापालिकेने बांधलेल्या दोन हजार ६५० हून अधिक घरांचं, हस्तांतरण पंतप्रधान करणार आहेत.

****

जम्मू काश्मीरमध्ये सीमा संरक्षण दलाच्या जवानांनी जम्मू नजिकच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एका पाकिस्तानी घुसखोर्याला गोळ्या घालून ठार केलं. या घटनेनंतर संबंधित क्षेत्रात तपास अभियान सुरु करण्यात आलं आहे.

****

केवळ पायाभूत सुविधांसाठी नव्हे तर इतरही क्षेत्रांत संस्थात्मक क्षमता बांधणीसाठी जागतिक बँकेने सहकार्य करावं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. देशात महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगलं कुशल मनुष्यबळ, उत्कृष्ट पायाभूत सुविधा असून, आपलं राज्य हरित तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य सेवा आणि बंदर पायाभूत सुविधा या क्षेत्रात भरीव प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

पुणे पोलिसांकडून पुण्यातून अटक करण्यात आलेल्या दोन संशयित दहशवाद्यांच्या तपासात अनेक महत्वपूर्ण बाबी समोर आल्या आहेत. या दहशतवाद्यांकडे सापडलेल्या लॅपटॉप, मोबाईलमध्ये ५०० जीबी डाटा आढळून आला आहे. तसंच यामध्ये ड्रोनद्वारे करण्यात आलेलं चित्रीकरणही पोलीसांच्या हाती आलं आहे. दहशतवाद्यांनी राज्यातल्या अनेक शहरात पाहणी केली होती. मुंबईतल्या छाबड हाऊसची छायाचित्रंही आढळून आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

****

रेल्वे सुरक्षा बल - आरपीएफच्या एका हवालदारानं आज पहाटे पालघर इथं जयपूर एक्सप्रेस रेल्वेत चार जणांची गोळी झाडून हत्या केली. चेतन सिंह असं त्याचं नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे. मृतांमध्ये आरपीएफचे अधिकारी टिकाराम मीना यांच्यासह इतर प्रवाशांचा समावेश आहे. आरपीएफच्या या दोन कर्मचार्यांच्या वादातून हा गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. त्यानंतर ही एक्सप्रेस मीरारोड स्थानकात थांबवून मृत्यूमुखी पडलेल्या चारही व्यक्तींचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले.

****

चीनमधल्या चेंगंदू इथं सुरु असलेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत महिला कपांऊंड तिरंदाजी प्रकारात अवनीत कौरनं आज सुवर्ण पदक पटकावलं.

नेमबाजीत पुरुषांच्या ५० मीटर एअर रायफल थ्री - पोझिशन आणि १० मीटर एअर रायफल प्रकारात ऐश्वर्य तोमरनं सर्वोच्च कामगिरी करत दोन सुवर्ण पदक जिंकले. १० मीटर एअर रायफल प्रकारात दिव्यांश सिंग पनवरला रौप्य पदक मिळालं. नेमबाजीतच सांघिक प्रकारात ऐश्वर्य, दिव्यांश, अर्जून बबुता यांनी एक हजार ८९४ गुणांची कमाई करत सांघिक सुवर्ण पदकाची देखील कमाई के  ली. या स्पर्धेत आतापर्यंत भारत आठ सुवर्ण, तीन रौप्य आणि पाच कांस्य अशी एकूण १६ पदकं जिंकत पदक तालिकेत चौथ्या स्थानावर आहे.

****

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 31.07.2023 रोजीचे सकाळी : 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१ जूलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाकडून आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगानं १७ फेब्रुवारी रोजी शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि चिन्ह वापरण्याची परवानगी दिली होती. यानंतर उद्धव ठाकरे गटानं या गटाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द करावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आलं आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि पी.एस.नरसिंव्हा यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

****

२०२३२४ या आर्थिक वर्षासाठी प्राप्तीकर विवरणपत्र भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. प्राप्तीकर परतावा भरणाऱ्या नागरिकांच्या संख्येत यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं प्राप्तीकर विभागानं म्हटलं आहे.

****

जयपूर एक्सप्रेस रेल्वेत आज पहाटे गोळीबाराची घटना घडली. ही गाडी पालघर स्थानकाजवळून जात असताना रेल्वे सुरक्षा बलाच्या दोन कर्मचार्यांच्या वादातून हा गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. यात चार जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये आरपीएफच्या अधिकारी आणि तीन प्रवाशांचा समावेश आहे. चेतन सिंह असं आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबलचं नाव आहे. त्यानंतर ही एक्सप्रेस मीरारोड स्थानकात थांबवून मृत्यूमुखी पडलेल्या चारही व्यक्तींचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले आहेत.

****

दोन दिवसीय अखिल भारतीय शिक्षण परिषदेचा काल दिल्लीत समारोप झाला. भारताला ज्ञानाधारित महाशक्ती बनविण्यासाठी नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण कटिबद्ध असल्याचं, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यावेळी म्हणाले.

****

 

शस्त्रक्रियेशिवाय कर्करोगावर उपचार करणाऱ्या पहिल्या लेझर मशीनचं काल पुण्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या लेझर प्रणालीमुळे पुणे उपचारांचं हब होण्यास मदत होईल तसंच याचा फायदा शहरी ते ग्रामीण, सर्वच भागातल्या नागरिकांना होईल, असं ते यावेळी म्हणाले. 

****

भारतीय महिला हॉकी संघानं स्पेनचा ३ -० असा पराभव करत स्पॅनिश हॉकी महासंघ शतकमहोत्सवी आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तर भारताचा पुरुष हॉकी संघ या स्पर्धेत तिसर्या स्थानावर राहीला. काल झालेल्या तिसर्या स्थानासाठीच्या सामन्यात भारतानं नेदरलँडचा दोनएक असा पराभव केला.

****

आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 31.07.2023, रोजीचे सकाळी: 11.00, वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 31.07.2023 रोजीचा सकाळी 10.45 वाजताचे वृत्तविशेष कार्यक्रम - ध्वनीचित्र

آکاشوانی اورنگ آباد‘ علاقائی اُردو خبریں بتاریخ : 31 جولائی 2023‘ وقت : صبح 09:00 تا 09:10 بجے تک

आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 31.07.2023, रोजीचे सकाळी : 08.30, वाजताचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

آکاشوانی اورنگ آباد‘ علاقائی اُردو خبریں ' بتاریخ : 31 جولائی 2023‘ وقت : صبح 09:00 تا 09:10 بجے تک

Regional Urdu Text Bulletin, Aurangabad

Date : 31 July 2023

Time : 09.00 to 09.10 AM

آکاشوانی اَورنگ آ باد

علاقائی خبریں

تاریخ  :  ۳۱؍  جولائی  ۲۰۲۳؁ ء

وقت  :  صبح  ۹.۰۰   سے  ۹.۱۰   بجے 


پہلے چند اہم خبروں کی سر خیاں سماعت کیجیے  ... 

٭ ’’  سب کے لیے فائدہ  ‘‘  اِس جذبے سے بھارت کی شناخت  اور  طا قت من کی بات میں وزیر اعظم کا بیان

٭ سنِگا پور کے 7؍ سیٹا لائٹ کو اِسرو کی جانب سے کامیابی سے داغا گیا

٭ طلباء کے پیٹھ پر کے بستوں کو کم کرنے کے لیے تمام مضامین کی ایک ہی کتاب  ‘  اسکو لی تعلیمی وزیر دیپک کیسر کر 

٭ آمدنی ٹیکس بھر نے والوں کی تعداد میں نما یاں اضا فہ  ‘  کل شام تک 6؍ کروڑ سے زیادہ گشوارے داخل 

٭ ریاست میں سیلا بی صورتحال کی وجہ سے متوقع وبائی امراض کا مقابلہ کرنے کے لیے طِبّی مشنری تیار 

اور

٭ بھارتیہ خواتین ٹیم کو اسپینِش ہاکی ٹیم صدی تقریب بین الاقوامی مقابلے کا خطاب


اب خبریں تفصیل سے...

ٌٌ سب کا فائدہ یہ جذبہ بھارت کی شناخت اِسی طرح طاقت ہے ۔ وزیر اعظم نریندر مودی نے یہ بات کہی ہے ۔ وہ کل آکاشوانی سے نشر ہونے والے من کی بات اِس پروگرام سے مخاطب تھے ۔ گزشتہ چند یوم میں آئی قدرتی آفات کے پس منظرمیں مخاطبت میں وزیر اعظم نے اجتما عی طا قت کی کوشش کی اہمیت کا ذکر کیا ۔ بارش کے موسم میں شجر کاری کی اہمیت پر انھو ںنے زور دیا ۔ محرم کے علا وہ حج کا فریضہ ادا کرنے والی مسلم خواتین کے مکتوب کا ذکر وزیر اعظم نے کیا ۔

منشیات سے دور  رہنے کی اپیل انھوں نے عوام سے کی ۔ وزیر اعظم نریندر مودی نے کہا کہ امرت مہوتسو کے جاری پروگراموں کے تحت شہیدوں کی یاد میں ملک بھر میں متعدد پروگرام منعقد کیے جا ئیں گے ۔ انہوں نے کہا کہ شہید مردوں  اور  خواتین کی عزت افزائی کے لیے یوم آزادی سے قبل جلد ہی  ’’  میری ماٹی میرا دیش  ‘‘  مہم کا  آغاز کیا جائے گا ۔ وزیر اعظم نے کہا کہ لاکھوں گائوں پنچایتوں میں خصوصی کتبے لگائے جا ئیں گے ۔ 

***** ***** ***** 

بھارتیہ خلائی تحقیق اِدارے یعنی  اِسرو  کی جانب سے آندھر پر دیش کے شری ہری کوٹہ ستیش دھون خلائی مرکز سے سنگا پور کے ڈی  ایس  ایس  اے  آر  سیٹا لائٹ سمیت جملہ 7؍ سیٹا لائٹ کل صبح خلاء میں کامیابی سے داغے گئے ۔ PSLV-C56    اِس راکٹ کے ذریعے سے یہ سیٹا لائٹ صبح ساڑھے چھ بجے خلاء میں داغے گئے ۔

***** ***** ***** 

تھا نے  -   ناسک  شاہراہ پر ٹریفک جام نہ ہو  اِس کے لیے Eight Lane   راستے کا  کام  جنگی پیما نے پر مکمل کیا جائے گا ۔ یہ بات وزیر اعلیٰ ایکناتھ شندے نے کہی ہے ۔ تھانے  -   ناسک شاہراہ پر کھارے گائوں پڈ گھا  سے  ‘  کھڑ ولی پھاٹا  اِس راستے کا کل وزیر اعلیٰ نے معائنہ کیا ۔ اِس موقعے پر وہ مخاطب  تھے ۔ چھو ٹی گاڑیوں کو راستہ ملیں اِس کے لیے بڑی گاڑیاں بائیں بازو سے چلائیں اِس ضمن میں ڈرائیور س کو ہداتیں دینے اِسی طرح اِس راستےکے گڑھے فوراً بھر نے کا حکم وزیر اعلیٰ نے اِس موقعے پر دیا ۔

***** ***** ***** 

مہاتما گاندھی کےسلسلے میں سنبھا جی بھِڑے نے دیے گئے بیان کی نائب وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے مذمت کی ہے ۔ اِس کے خلاف مناسب کارروائی کی جائے گی ۔ ایسا تیقن دیاگیا ہے ۔ وہ کل ناگپور میں صحا فیوں سے مخاطب تھے ۔ مہا تما گاندھی  ‘  مجاہد آزادی و یر ساور کر کی تو ہین بر داشت نہیں کی جائے گی ۔ یہ بات پھڑ نویس نے کہی ہے ۔ 

دریں اثناء سنبھا جی بھڑے کو حراست میں لینے کا مطالبہ اسمبلی کے ماسنو نی اجلاس میں کر نے والے سابق وزیر اعلیٰ پر تھوی راج چو ہان کو ای میل  کے ذریعے نا معلوم شخص نے دھمکی دی ہے ۔ اِس کی وجہ سے چو ہان کی رہائش گاہ پر پولس بندوبست میں اضا فہ کر دیاگیا ہے ۔ اِس ضمن میں کراڈ پولس اسٹیشن میں جرم داخل کر دیا گیا ہے ۔ پولس میل روانہ کرنے والے کو تلا ش کر رہی ہے ۔

***** ***** ***** 

طلباء کی پیٹھ سے بستوں کو کم کرنے کے لیے تمام مضا مین کے لیے ایک ہی کتاب تیار کرنے کا تجر بہ کیا جائے گا ۔ یہ بات اسکو لی تعلیمی وزیر دیپک کیسر کر نے کہی ہے ۔ ناسک میں کل تعلیمی شعبے کےافسران کی جائزہ میٹنگ کل کیسر کر کی صدارت میں ہوئی ۔ اِس موقعے پر وہ مخاطب تھے ۔ حکو مت نے پہلے مر حلے میں 30؍ ہزار  اور  دوسرے مر حلے میں 20؍ ہزار اساتذہ کی بھر تی شروع کی ہے ۔ جب تک نئی بھر تی نہیں ہو تی تب تک طلباء کا تعلیمی نقصان نہ ہو ۔ اِس کے لیے سبک دوش اسا تذہ کی خد مات حاصل کر کے طلباء کو درس دیا جا ئے گا ۔یہ بات کیسر کرنے کہی ہے ۔

***** ***** ***** 

اِس سال آمد نی ٹیکس کے گوشوارے بھر نے کی تعداد میں نما یاں اضا فہ ہوا ہے ۔ اِس کی اطلاع انکم ٹیکس محکمے نے دی ہے ۔ کل شام تک 6؍ کروڑ سے زیادہ ٹیکس گوشوارے داخل کیے گئے ۔ کل ایک ہی دِن میں ایک کروڑ تیس لاکھ گوشوارے داخل کیے گئے ۔ یہ بات انکم ٹیکس محکمے کی جانب سے کہی گئی ۔ آمد نی  ٹیکس کی تفصیلات داخل کرنے کی آج آخری تاریخ ہے ۔


***** ***** ***** 

یہ خبریں آکاشوانی اورنگ آباد سے نشر کی جا رہی ہیں 

***** ***** ***** 


اورنگ آ باد ضلعے میں بھی بارش کی وجہ سے آنے والی آفات کا مقا بلہ کرنے کے لیے مشنری تیار ہیں ۔ ضلعے میں بادل پھٹنے جیسی موسلا دھار بارش ہوئی تو امداد کے لیے ۔ 500؍ وفد تیار کیے گئے ہیں ۔ بچائو اشیاء تقسیم کی گئی ہے ۔ اِسی بیچ ضلعے میں اب تک 40؍ فیصد ہی بارش ہوئی ہے ۔

***** ***** ***** 

ریاست میں مختلف مقامات پر سیلا بی صورتحال کی وجہ سے متوقع وبائی امراض  اور  دیگر امراض کا مقابلہ کرنے کے لی ریاست کی طِبی مشنری تیار ہو گئی ہے ۔ شعبے صحت کی جانب سے ریاستی  اور  ضلعی سطحوں پر علیحدہ کنٹرول یونٹ قائم کیے گئے ہیں ۔ 496؍ طِبّی وفد تیار کیے گئے ہیں اِسی طرح امداد ی چھائو نیوں میں مناسب طِبّی افراد کا تقرر کیا گیا ۔ ہر ضلعے میں ادویات کا وافر ذخیرہ فراہم کیا گیا ہے ۔ اِس کی اطلا عی میڈیکل ڈپٹی ڈائریکٹر  ڈاکٹر کیلاس باوسکر نے دی ۔

***** ***** ***** 

اورنگ آباد ضلعے میں کل ڈویژنل کمشنر آفس میں اسا تدہ کے لیے تر غیبی امتحان کااہتمام کیا گیا تھا ۔ معیار کو بلند کرنے کے لیے کیے گئے اِس امتحان میں صرف 457؍ اساتذہ حاضر تھے ۔ ضلعے میں جملہ 17؍ ہزار  877؍ اساتذہ میں سے اِس امتحان کے لیے صرف 3؍ ہزار 189؍ اساتدہ نے اندراج کیا تھا ۔ جملہ اساتدہ کے تناسب سے صرف 3؍ اعشا ریہ 80؍ فیصد اسا تذہ نے یہ امتحان دیا ۔

***** ***** ***** 

مغر بی ڈویژن بین الر یاستی بیڈ مِنٹن چیمپئن شپ مقابلے کے لیے مہا راشٹر کی ٹیم میں اورنگ آباد کے بیڈ مِنٹن قو می کھلاڑی  پر تھمیش کلکر نی کو سنگلز کے لیے  اور  سو نا لی ملکھیلکر کو ڈبلز کے لیے منتخب کیا گیا ہے ۔ اِس مقابلے میں مہا راشٹر سمتی گوا  ‘  مدھہ پر دیش  ‘  چھتیں گڑھ  اور  گجرات کی ٹیمیں شر کت کریں گی ۔ یہ مقابلہ مدھیہ پر دیش کے اِندور شہر میں 8؍ اگست سے 11؍ اگست کے در میان ہو گا ۔ سو نا لی  اور  پر تھمیش یہ دو نوں اجنتا تعلیمی اِدارے کے تحت چلائے جا نے والے جواہر لال نہرو کالج کےطلباء ہیں ۔

***** ***** ***** 

ہاکی میں کل اسپین کےشہر  Terrassa     میں بھارت کی خواتین ٹیم نے 100؍ واں  Anniversary Sapanish Hockey Fedration   اِنٹر نیشنل ٹور نا منٹ جیت لیا ۔ بھارت کی خواتین ٹیم نے تین ملکوں کے ٹور نا منٹ میں میز بان اسپین کو صفر کے مقابلے 3؍ گول سےہرا یا ۔ بھارت کی طرف سے Vandana Kataria  نے کھیل کے 22؍ ویں منٹ  ‘  مو نیکا نے 48؍ ویں منٹ میں  اور  Udita نے 58؍ ویں منٹ میں گول کیے ۔ اِس طرح بھارت کی ٹیم نے ٹور نا منٹ کےسبھی میچ جیتے ۔ اِس مقابلے میں بھارت کے مردوں کی ہا کی ٹیم تیسرے نمبر پر رہی ۔

***** ***** ***** 

عثمان آباد ضلعے کے تلجا پور میں تر قیاتی کاموں کی بھو می پو جن تقریب کل رکن اسمبلی رانا جگجیت سنگھ پاٹل کے ہاتھوں عمل میں آ ئیا ۔ اِن تر قیاتی کاموں میں جدید بس اسٹیشن  100؍ ایکر اراضی پر یاتر یوں کے لیے رہائشی کامپلیکس  اور  مندر احاطے میں تر قیاتی کام شامل ہیں ۔ بس اسٹیشن کے لیے 3؍ کروڑ  61؍ لاکھ روپئے فنڈ منظور کیے گئے ہیں ۔ ضرورت پڑ نے پر مزید  فنڈ فراہم کیا جائے گا ۔ یہ بات رکن اسمبلی پاٹل نے اِس موقعے پر کہی ہے ۔

***** ***** ***** 

پونے کے ہڑپسر علاقے میں افیم فروخت کرنے کے لیے آئے ہوئے راجستھان کے ایک شخص کو منشیات مخالف دستے نے حراست میں لیا ۔ مو ہن لال  موگارام  بِشنو ئی اُس شخص کا نام ہے ۔ اُس کے پاس سے 60؍ لاکھ روپیوں کی 3؍ کلو 29؍ گرام افیم ضبط کی گئی ۔

***** ***** ***** 

آئندہ 2؍ یوم میں کو کن کے متعدد مقامات پر وسطی مہاراشٹر   اور  وِدربھ کے چند مقا مات پر تاہم  مراٹھوارہ کے چند مقامات پر بارش ہونے کا قیاس محکمہ موسمیات نے ظاہر کیا ہے ۔

***** ***** ***** 

سینئر صحافی پر شانت جوشی کے جسد خاکی پر کل امبا جو گائی میں آخری رسو مات ادا کر دی گئی ۔ جوشی کل دوران علاج چل بسے ۔ وہ 56؍ برس کے تھے ۔ اُن کا لاتور کے ایک نجی اسپتال میں علاج جاری تھا ۔ صحت زیادہ خراب ہونے کی وجہ سے اُنھیں ممبئی کے اسپتال میں لے جایا جا رہا تھا ۔ اُس وقت راستے میں وہ چل بسے ۔

***** ***** ***** 



آخر میں چند اہم خبروں کی سر خیاں دوبارہ سماعت کیجے  ...


٭ ’’  سب کے لیے فائدہ  ‘‘  اِس جذبے سے بھارت کی شناخت  اور  طا قت من کی بات میں وزیر اعظم کا بیان

٭ سنِگا پور کے 7؍ سیٹا لائٹ کو اِسرو کی جانب سے کامیابی سے داغا گیا

٭ طلباء کے پیٹھ پر کے بستوں کو کم کرنے کے لیے تمام مضامین کی ایک ہی کتاب  ‘  اسکو لی تعلیمی وزیر دیپک کیسر کر 

٭ آمدنی ٹیکس بھر نے والوں کی تعداد میں نما یاں اضا فہ  ‘  کل شام تک 6؍ کروڑ سے زیادہ گشوارے داخل 

٭ ریاست میں سیلا بی صورتحال کی وجہ سے متوقع وبائی امراض کا مقابلہ کرنے کے لیے طِبّی مشنری تیار 

اور

٭ بھارتیہ خواتین ٹیم کو اسپین ہاکی ٹیم صدی تقریب بین الاقوامی مقابلے کا خطاب



علاقائی خبریں ختم ہوئیں

آپ یہ خبر نامہ ہمارے یو ٹیوب چینل آکاشوانی سماچار اورنگ آباد 

Aurangabad AIR News    پر دوبارہ کسی بھی وقت سن سکتے ہیں۔

٭٭٭


आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 31.07.2023, रोजीचे सकाळी : 07.10, वाजताचे मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 31.07.2023 रोजीचे सकाळी : 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 31 July 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३१ जूलै  २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·       सर्वजन हिताय ची ही भावनाच भारताची ओळख आणि शक्ती-मन की बातमधून पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      सिंगापूरच्या सात उपग्रहांचं इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण

·      विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तर कमी करण्यासाठी सर्व विषयांचं एकच पुस्तक-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

·      आयकर भरणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ;काल सायंकाळपर्यंत सहा कोटीहून अधिक विवरणपत्रं दाखल

·      राज्यात पूर परिस्थितीमुळे संभाव्य साथरोगांचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

आणि

·      भारतीय महिला हॉकी संघाला स्पॅनिश हॉकी महासंघ शतकमहोत्सवी आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं विजेतेपद

सविस्तर बातम्या 

 सर्वजन हिताय ची ही भावनाच भारताची ओळख तसंच शक्ती असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात बोलत होते. आकाशवाणीवरुन दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचा कालचा शतकोत्तर तिसरा भाग होता. गेल्या काही दिवसांत आलेल्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधानांनी, सामुहिक शक्तीच्या प्रयत्नांचं महत्त्व विशद केलं. पावसाळ्याच्या दिवसात वृक्षारोपण, पर्जन्य जलपुनर्भरण तसंच जलसंधारणाचं आवाहन त्यांनी केलं. श्रावण महिन्यातल्या सण उत्सवांबाबत बोलताना, आपले सण आणि परंपरा गतिमानता देणारे असल्याचं ते म्हणाले. मेहरमशिवाय हजयात्रा करणाऱ्या मुस्लिम महिलांनी पाठवेल्या पत्रांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचं आवाहन त्यांनी जनतेला  यावेळी केलं.

उज्जैनमधे १८ चित्रकार मिळून भारतीय परंपरेतल्या पुराणकथांवर आधारित चित्रकथा तयार करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. राजकोटचे चित्रकार प्रभातसिंग बरहाट यांनी काढलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरच्या प्रसंगावरच्या चित्राची माहिती देत पंतप्रधानांनी याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

 

स्वातंत्र्याच्या 'अमृत महोत्सवानिमित्त' सुरू होत असलेल्या मेरी माटी मेरा देश - ‘माझी माती माझा देश, या अभियानाची देखील पंतप्रधानांनी माहिती दिली. या अभियानात सर्वांनी सहभागी होत, अमृतकालसाठी आपण मागे चर्चा केलेल्या पंच प्राण पूर्ततेसाठी, देशाची पवित्र माती हातात घेऊन शपथ घ्यावी, आणि ही शपथ घेतानाचे सेल्फी युवा डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर पाठवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या वतीनं, आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून, सिंगापूरच्या डी. एस. - एस. ए. आर. उपग्रहासह एकूण सात उपग्रह, काल सकाळी अवकाशात यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. पी.एस.एल.व्ही. सी- छप्पन या रॉकेटद्वारे हे उपग्रह सकाळी साडे सहा वाजता अवकाशात प्रक्षेपित झाले. ही कामगिरी भारताच्या अंतराळ संशोधन प्रयत्नांमधला महत्त्वाचा टप्पा असून, व्यावसायिक स्वरुपातलं अभियानही याद्वारे यशस्वीरित्या साध्य झालं आहे. हे प्रक्षेपण म्हणजे इस्रोच्या रिमोट सेन्सिंग क्षमतेच्या प्रगतीचं प्रतीक आहे. डी एस-एस ए आर उपग्रहाच्या माध्यमातून खराब वातावरणात आणि रात्रीही उत्तम दर्जाची छायाचित्रं मिळू शकतात. पीएसएलवीच्या कोर अलोन प्रकारातलं हे १७ वं उड्डाण आहे.

****

ठाणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी आठ पदरी रस्त्याचं काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. ठाणे-नाशिक महामार्गावर खारेगाव ते पडघा, खडवली फाटा या रस्त्याची काल मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. लहान वाहनांना रस्ता मिळावा याकरता अवजड वाहनं डाव्या बाजूने चालवण्यासंदर्भात वाहनचालकांना सूचना देण्याचे, तसंच या मार्गावरील खड्डे तातडीनं मास्टीकनं भरण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

****

महात्मा गांधी यांच्याविषयी संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला असून, याविरोधात उचित अशी कारवाई करू असं आश्वाासन दिलं आहे. ते काल नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन केला जाणार नाही, असं फडणवीस यांनी नमूद केलं.

                                                                       

दरम्यान, संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ईमेलव्दारेद्वारे अनोळखी व्यक्तीनं धमकी दिली आहे. त्यामुळे चव्हाण यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस मेल पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत.

****

कामगार विभागाच्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त कामगारांना मिळवून देण्यासाठी त्यांची नोंदणी करणं आवश्यक आहे. यासाठी तालुका स्तरावर लवकरच कामगार नोंदणी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचं, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितलं आहे. वर्धा इथं शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत, २२ ते ३० जुलै या कालावधीत कामगारांना विविध योजनेचा लाभ देण्यासाठी घेण्यात आलेल्या, कामगार सेवा सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात, ते काल बोलत होते. उद्योग व्यवसाय, बांधकाम इतर कामांमध्ये कामगारांची भूमिका महत्त्वाची असते. मात्र, या कामामध्ये कामगारांना सन्मान मिळत नाही, त्यांना त्यांचा सन्मान मिळावा यासाठी शासनाच्या वतीनं विविध योजना राबवण्यात येत आहेत, असं खाडे यांनी सांगितलं.

****

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तर कमी करण्यासाठी सर्व विषयांसाठी एकच पुस्तक तयार करण्याचा प्रयोग केला जाणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. नाशिक इथं काल शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. शासनाने पहिल्या टप्प्यात ३० हजार तसंच दुसऱ्या टप्यात २० हजार शिक्षकांची भरती सुरू केली आहे. जोपर्यंत नवीन भरती पूर्ण होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांची सेवा घेऊन विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार असल्याचं, केसरकर यांनी सांगितलं.

****

या वर्षी आयकर विवरणपत्र भरणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असल्याची माहिती आयकर विभागानं दिली आहे. काल सायंकाळपर्यंत सहा कोटीहून अधिक कर विवरणपत्रं दाखल झाली आहेत. काल एका दिवसात एक कोटी तीस लाख विवरण पत्रं दाखल झाल्याचं आयकर विभागाकडून सांगण्यात आलं आहे. आयकर विवरणपत्र दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

****

जम्मू इथल्या यात्री निवासातून एक हजार ९८४ भाविकांचा अठ्ठावीसावा जथ्था काल अमरनाथ गुहेच्या दिशेनं रवाना झाला. यातले ५६४ भाविक बालतल मार्गाने तर ४१० भाविक नुनवान पहलगाम या मार्गाने अमरनाथ ला पोहोचतील. या वर्षीची अमरनाथ यात्रा गेल्या एक जुलै पासून सुरू झाली. त्यानंतर आतापर्यंत तीन लाख ८३ हजार ५३४ भाविकांनी हिमशिवलिंगाचं दर्शन घेतलं आहे. ३१ ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेला ही यात्रा पूर्ण होईल.

****

राज्यात विविध ठिकाणच्या पूर परिस्थितीमुळे संभाव्य साथीच्या आजारांना आणि अन्य प्रकारच्या रोगराईला तोंड देण्यासाठी राज्यातली आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. आरोग्य विभागातर्फे राज्य आणि जिल्हा पातळीवर स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून, ४९६ वैद्यकीय पथकं तयार करण्यात आली आहेत. तसंच मदत छावण्यांमध्येही पुरेसं वैद्यकीय मनुष्यबळ नियुक्त करण्यात आलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात आला असल्याचं वैद्यकीय उपसंचालक डॉक्टर कैलास बाविस्कर यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात देखील पावसामुळे येणार्या आपत्तीला तोंड देण्यासाठी यंत्रणा तयार आहे. जिल्ह्यात ढगफुटीसारख मुसळधार पाऊस झाला, तर मदतीसाठी दोन हजार ५०० पथकं तयार करण्यात आली आहेत. नदीकाठच्या गावात पूर्व प्रशिक्षण, जनजागृती करण्यात आली असून, बचाव साहित्य वितरीत करण्यात आलं आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ४० टक्केच पाऊस झाला आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात काल विभागीय आयुक्त कार्यालयानं शिक्षकांसाठी शिक्षक प्रेरणा परिक्षेचं आयोजन केलं होतं. गुणवत्ता सुधारण्यासाठी घेण्यात आलेल्या या परिक्षेत फक्त ४५७ शिक्षकच हजर होते. जिल्ह्यात एकूण १७ हजार ८७७ शिक्षकांपैकी या परिक्षेसाठी फक्त तीन हजार १८९ शिक्षकांनी नोंदणी केली होती. एकूण शिक्षकांच्या तुलनेत केवळ तीन पूर्णांक ८० टक्केच शिक्षकांनी ही परिक्षा दिली.

****

पश्चिम विभागीय आंतराज्य बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठीच्या महाराष्ट्र संघात, औरंगाबाद इथले बॅडमिंटन राष्ट्रीय खेळाडू प्रथमेश कुलकर्णी याची एकेरी करता, आणि सोनाली मिलखेलकर यांची दुहेरी करता निवड झाली आहे. सदर स्पर्धेत महाराष्ट्रासह गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात संघांचा समावेश आहे. ही स्पर्धा मध्य प्रदेशातल्या इंदूर या शहरात आठ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या दरम्यान होणार आहे. सोनाली आणि प्रथमेश हे दोघं अजिंठा शिक्षण संस्था संचलित पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.

****

भारतीय महिला हॉकी संघानं स्पेनचा ३ -० असा पराभव करत स्पॅनिश हॉकी महासंघ शतकमहोत्सवी आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. टेरासा इथं काल झालेल्या या सामन्यात भारताच्या वतीनं वंदना कटारिया हिनं २२ व्या मिनिटाला, मोनिका हिनं ४८ व्या मिनिटाला आणि उदिता हिनं ५८ व्या मिनिटाला गोल करत संघाला विजय मिळवून दिला. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला.

या स्पर्धेत भारताचा पुरुष हॉकी संघ तिसर्या स्थानावर राहीला. काल झालेल्या तिसर्या स्थानासाठीच्या सामन्यात भारतानं नेदरलँडचा दोनएक असा पराभव केला.

****

चीनमधे चेंगडू इथं सुरु असलेल्या जागतिक आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांमधे अमन सैनी आणि प्रगती या जोडीनं तिरंदाजीतल्या मिश्र गटाचं सुवर्णपदक मिळवलं. दक्षिण कोरियाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या चो सुआ आणि पार्क सेंघीयन या जोडीचा त्यांनी १५७ विरुद्ध १५६ असा पराभव केला. महिला सांघिक गटात अवनीत कौर आणि पूर्वाशाच्या साथीनं प्रगतीने रौप्यपदक मिळवलं. नेमबाजीत २५ एम रॅपिड फायर प्रकारात विजयवीर सिधू, उदयवीर सिधू आणि आदर्श सिंग यांच्या चमूनं रौप्य पदक जिंकलं.या स्पर्धांमधे चार सुवर्ण, दोन रौप्य, आणि तीन कांस्य अशी एकूण नऊ पदकं मिळवून भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं विकास कामांचं भूमिपूजन काल आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. या विकास कामांमध्ये अद्ययावत बसस्थानक, शंभर एकर परिसरात भक्तांसाठी रहिवासी संकुल, आणि मंदिर परिसरातल्या विकास कामांचा समावेश आहे. बसस्थानकासाही तीन कोटी ६१ लाख रुपये निधी मंजूर असून, गरज पडल्यास आणखी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असं आमदार पाटील यांनी यावेळी सांगितलं.

****

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल, असं मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितलं आहे. जळकोट तालुक्यातल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते काल रावणकोळा इथं शेतकरी, ग्रामस्थांशी बोलत होते. शासनानं नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार, एन डी आर एफ निकषापेक्षा जास्त दरानं ही मदत देण्यात येईल, असं बनसोडे यांनी सांगितलं. घोणसी मंडळात अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व नुकसानग्रस्तांना शासकीय मदत लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. तर अजूनही कोणत्या नुकसानीचे पंचनामे राहिले असल्यास ते तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. अतनूर ते गव्हाण रस्त्यावरील पुलाची तसंच मरसांगवी, अतनूर इथल्या शेतीच्या नुकसानीचीही मंत्री बनसोडे यांनी काल पाहणी केली.

****


ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांच्या पार्थिव देहावर काल अंबाजोगाई इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. जोशी यांचं काल उपचारादरम्यान निधन झालं. ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्यावर लातूर इथं एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई इथल्या दवाखान्यात नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

****

महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांना व्हावी, त्यांना योग्य तो लाभ घेता यावा, तसंच नागरिकांमध्ये महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा -सुविधांबाबत जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी उद्या एक ऑगस्टच्या महसूल दिनापासून राज्यभरात महसूल सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सप्ताहात युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, महसुली अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद असे उपक्रम घेण्यात येतील. नांदेड जिल्ह्यात महसूल सप्ताहाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रं, जनतेची विविध कामं, सैनिकांची विविध कामं असे उपक्रम जनसहभागाद्वारे राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली.

****

पुण्यात हडपसर भागात अफू विक्रीसाठी आलेल्या राजस्थान मधल्या एका तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकानं ताब्यात घेतलं. मोहनलाल मेगाराम बिष्णोई असं त्याचं नाव असून, त्याच्याकडून ६० लाख रुपयांची तीन किलो २९ ग्रॅम अफू जप्त करण्यात आली आहे.

****

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं सोलापूरहून तिरूपतीकडे जाणाऱ्या साप्ताहिक विशेष गाडीला साठ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. सोलापूर-तिरुपती-सोलापूर ही साप्ताहिक विशेष गाडी आता २९ सप्टेंबर पर्यंत धावणार आहे. या साठ दिवसात या गाडीच्या तिरूपतीला जाऊन येऊन एकूण आठ फेऱ्या होतील. इतरही काही गाड्यांना मुदतवाढ मिळाली आहे, यामध्ये सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडीचाही समावेश आहे.

****

येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

****