Tuesday, 31 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.03.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 March 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मार्च २०२० सायंकाळी ६.००
****

 कोरोनाचा प्रतिबंध आणि उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात गेल्या दोन दिवसांत १२ कोटी ५० लाख रुपये जमा झाले आहेत. कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून तसंच देणगी स्वरुपात कोरोना आपत्ती व्यवस्थापनाकडे अनेक उद्योग तसंच संस्थानी मदत देणं सुरु केले आहे.

 लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एक कोटी अकरा लाख रुपये मदत दिली आहे.

 भारतीय स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान मदत निधीत शंभर कोटी रुपये जमा केले आहेत. बँकेचे अध्यक्ष रजनीशकुमार यांनी ही माहिती दिली.
****

 कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य विषयक तसंच आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात ६० टक्के कपातीचा निर्णय सरकारनं घेतला आहे. अधिकाऱ्यांच्या वेतनातही कपात करण्यात आली आहे. आणि वर्ग अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५० टक्के, तर  वर्ग कर्मचाऱ्यांच्या वेतनात २५ टक्के कपात होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.
****

 गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे २२७ नवीन रुग्ण आढळले असून, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या एक हजार दोनशे ५१ वर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. देशभरात २१ हजार तात्पुरती निवासी शिबीरं उभारण्यात आली असून,  त्यामधून सहा लाख ६६ हजार नागरिकांच्या निवासाची तसंच २३ लाख नागरिकांच्या भोजनाची सुविधा करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. लॉकडाऊनच्या नियमांचं शंभर टक्के पालन करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं.
****

 अहमदनगर जिल्ह्यात आणखी तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ही माहिती दिली. हे तिघे जामखेड इथल्या दोन कोरोना बाधितांच्या संपर्कात आले होते. अहमदनगर जिल्ह्यात आता एकूण कोरोनाबधितांची संख्या ८ झाली असून यापैकी एकाला उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.
****

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या नांदेड शहरातील भाजीपाला व्यावसायिकांवर शासनानं कडक कारवाई करावी तसंच शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी नांदेड शहरात बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे. भाजीपाला विक्रीसाठी जागा उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असल्याचं त्यांनी याबाबतच्या निवेदनात म्हटलं आहे.

 दरम्यान, नांदेड जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनांसंदर्भात ३१ मार्चपर्यंत घालण्यात आलेले निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जारी केले आहेत. नांदेड जिल्ह्यात गरजूंना मदत करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था, संघटना तसंच नागरिक पुढे येत आहेत
****

  जालना जिल्ह्यातल्या भोकरदन इथं गरजू तसचं मजुरी करणाऱ्या कुटुंबांना श्रीगणपती नागरी सहकारी पतसंस्था आणि राजाभाऊ देशमुख मंडळाच्यावतीनं जीवनावश्यक वस्तुंच्या २ हजार ५०० कीटचं वाटप करण्यात येत आहे. धान्यासह इतर आवश्यक वस्तुंचा या कीटमध्ये समावेश आहे.
****

 हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर इथं आठवडी बाजार बंद असतांनाही ग्राहक आणि व्यापाऱ्यांनी सामाजिक अंतर पाळण्याच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत, मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.

 दरम्यान हिंगोलीत कोरोनाचा दुसरा संशयित आढळला असून, त्याच्या घशातल्या स्रावाचे नमुने औरंगाबाद इथं तपासणीलना पाठवण्यात आले आहेत.
****

 परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या बीज तंत्रज्ञान संशोधन केंद्राला आज सकाळी आग लागली. दीड ते दोन तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलास यश आलं. या आगीमध्ये महत्त्वाची अनेक कागदपत्रं तसंच संगणक आदी साहित्याचं मोठं नुकसान झालं. आगीचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही.
****

 जालना शहरासह परिसरातल्या अनेक गावात आज दुपारी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह सुमारे पाऊण तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काढणीस आलेल्या गहू, हरभरा पिकांसह फळबागांच्या नुकसानाची भीती वर्तवली जात आहे.

 परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे मोसंबीच्या बागांचं मोठं नुकसान झालं
*****
***

Audio - आकाशवाणी औरंगाबाद दि.31.03.2020 रोजीचे सायंकाळी 06.00 वाजेचे मराठी बातमी...

आकाशवाणी औरंगाबाद दि.31.03.2020 दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 31.03.2020 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३१ मार्च २०२० सकाळी ११.०० वाजता
****
राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधित ३९ रुग्णांना उपचारानंतर प्रकृतीत सुधार पडल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, यापैकी चौदा जण मुंबईतले आहेत. पिंपरी चिंचवडमधून नऊ, पुण्यातून सात, नागपूर चार, यवतमाळ तीन, आणि अहमदनगर तसंच औरंगाबाद इथल्या एका रुग्णाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. या सर्वांना त्यांच्या घरी चौदा दिवस विलगीकरणात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड शहरात एका मशिदीमध्ये १४ जणांनी सामुहिकरित्या नमाज पठण केलं होती. या सर्वांना विलगीकरणासाठी अहमदनगर इथं पाठवण्यात आलं होतं, त्यापैकी २ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या इतर ३१ व्यक्तींना प्रशासनानं ताब्यात घेऊन अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठवल आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यात आढळलेला एकमेव करोनाबाधित रुग्ण करोनामुक्त झाला आहे. आणखी दोन दिवस त्याला निगराणीखाली ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली
****
सातारा इथं १५ युवकांविरोधात जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी हे सर्व जण केक कापण्यासाठी एकत्र जमले होते.
****
पनवेल इथलं मोहिते रूग्णालय पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी काल रात्री बंद केलं. मोहिते रूग्णालयाचे मालक डॉक्टर मोहिते यांची मुलगी परदेशातून आल्यानंतर तिची भेट घेतल्यानंतर डॉ मोहिते यांनी विलगीकरणात न राहता रूग्णालयात जाऊन लहान मुलांवर उपचार केले, याबाबतची माहिती आयुक्त देशमुख यांना मिळाल्यानंतर त्यांनी रूग्णालयाची पाहणी करून रूग्णालयाला टाळं ठोकलं.
****
नांदेड वाघळा शहर महानगरपालिकेच्या बेघर निवारा गृहात ६० बेघर तसंच प्रवासात अडकून पडलेल्या लोकांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत ही व्यवस्था करण्यात आल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****



आकाशवाणी औरंगाबाद दि.31.03.2020 सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date : 31 March 2020
Time:  09 : 00 to 09: 10 AM
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:   ۳۱ ؍  مارچ  ۲۰۲۰ئ؁
وَقت: صبح  ۰۰۔۹  سے  ۱۰۔۹؍ بجے 

 سب پہلے اِس وقت کی سر خیاں...

 ٭ مہاراشٹر بجلی بورڈ نے اگلے پانچ سالوں کے لیے کی بجلی کے نِرخ میںکی کٹو تی
 ٭کورونا وائرس کی وجہ سے فصل قرض کی ادائیگی پردی جانے والی سود کی شرح میںرعایت پر31؍  مئی تک توسیع 
 ٭صحت اور معاشی بحران سے نمٹنے کے لیے ریاستی وزیر مالیات اجیت پوار نے مرکزی حکو مت سے کیا
25؍ ہزار کروڑ روپیوں کا مطالبہ
 ٭مہاراشٹر میں کورونا سے متاثرہ مریضوں کی تعداد ہو ئی220؍‘  کل ہوئی 2؍مریضوں کی موت
  اور
 ٭اورنگ آباد میں کورونا کا کوئی پازیٹیو مریض نہیں لیکن عوام ضروری جسمانی دوری بنائیں رکھی : ضلع کلکٹر

  اب خبریں تفصیل سے....

 مہاراشٹر بجلی بورڈ نے ریاست میں مختلف زمروں کے لیے فراہم کی جانے والی بجلی کی نر خ میں اوسطً7؍ تا8؍ فیصد کی کٹوتی کا اعلان کیا ہے۔ یہ کٹو تی اگلے پانچ سالوں کے لیے کی گئی ہے۔ بجلی بورڈ کے صدر آنند کلکر نی نے کل یہ اعلان کیا۔ اِس کے مطا بق ممبئی کو چھوڑ کر پورے مہاراشٹر کے لیے صنعتی بجلی کے دا موں میں 10؍ سے12؍ فیصد کی کٹو تی کی گئی ہے۔ جبکہ گھریلو استعمال کی بجلی کے نرخ میں5؍ سے7؍ فیصد کی کمی کی گئی ہے۔ کلکر نی نے کہا کہ گزشتہ 10؍ سے 15؍ سال بعد بجلی کے نر خ میں کٹو تی کرنے جیسا کوئی فیصلہ لیا گیا ہے جس سے موجودہ حالات میں معاشی سر گر میوں میں تیزی آنے کی امید ہے۔
 دوسری جانب کلکر نی نے صارفین سے یہ اپیل بھی کی کہ وہ بجلی کے داموں میں کٹو تی کے بعد بھی بجلی کا استعمال ضرورت پڑ نے پر ہی کریں اور اُس کے غیر ضروری استعمال سے بچیں۔

***** ***** *****

 اِس بیچ مرکزی حکو مت نے کورونا وائرس کی وجہ سے چل رہے لاک ڈائون کے پس منظر میں کسا نوں سے وصول کیے 
جانے والے فصل قرض کی مدت میں توسیع کردی ہے۔ اِس فیصلے کے تحت فصل قرض ادائیگی پر سود میں ملنے والی دو فیصد کی رعایت کے منصوبے کی معیاد 31؍ مئی تک بڑ ھا دی گئی ہے۔ واضح ہو کہ کسا نوں کو چار فیصد کی شرح سود پر تین لاکھ روپیوں تک کا قرض دیا جا تا ہے لیکن لاک ڈائون کی وجہ سے کسا ن بینکوں تک پہنچنے سے قاصر ہیں اور نہ ہی وہ اپنی زرعی اشیاء کو آ سانی سے فروخت کر پا رہے ہیں۔ کسانوں کی اِس دشواری کے مد نظر مرکزی حکو مت نے قرص ادائیگی کی مدت میں توسیع کرنے کا فیصلہ لیا ہے۔توسیع دی گئی مدت کے دوران بینک‘ کسا نوں سے کوئی جر مانہ وصول نہیں کریں گے۔

***** ***** *****  

 دریں اثناء اطلاعات و نشر یات کی وزارت نے کل وضاحت کی ہے کہ مرکزی حکومت کی جانب سے ملک بھر میں کیے گئے 21؍ دنوں کے لاک ڈائون میں توسیع کرنے کی کوئی تجویز زیر غور نہیں ہے۔ کا بینی سیکریٹری راجیو گوَ با نے سو شل میڈیا پر چل رہی اِن خبروں کی تر دید کی جن میں لاک ڈائون بڑھا نے کی بات کہی جارہی تھی۔ اُنھوں نے کہا کہ سوشل میڈیا کے ذریعے پھیلائی جا رہی یہ خبریں بے بنیاد ہیں اور عوام کو چا ہیے کہ وہ اِن افواہوں کو نظر انداز کریں۔

***** ***** *****

 اِس دوران مرکزی حکو مت نے اپنے سبھی ملازمین کو بائیو میٹرک حاضری سے اگلے حکم تک مُستثنی کر دیا ہے۔ اِس سے پہلے31؍ مارچ تک بائیو میٹرک حاضری سے چھوٹ دی گئی تھی جسے اب بڑھا دیا گیا ہے۔

***** ***** *****

 نیشنلِسٹ کانگریس پارٹی کے قومی صدر شرد پوار نے عوام سے لاک ڈائون کے دوران قوانین پر سنجید گی سے عمل کرنے کی اپیل کی ۔ سوشل میڈیا کے ذریعے کل شرد پوار نے عوام تک اپنا پیغام پہنچا یا۔ پوار نے کہا کہ مرکزی حکو مت کی جانب سے ملک بھر میں نافذ کیے گئے لاک ڈائون کے ختم ہونے میں ابھی دو ہفتے باقی ہیں اور اِس دوران عوام کفا یت شعاری کی عادت ڈالیں۔پوار نے مزید کہا کہ ضروری ہو تب ہی گھروں سے نکلیں ورنہ گھر میں ہی رہیں۔ اُنھوں نے کہا کہ عوام پولس سے بحث میں نہ اُلجھیں۔
 پوار نے کہا کہ گنا توڑ نے والے مزدوروں کا کام ختم ہونے کے بعد کار خا نوں کے احاطوں میں ہی اُنھیں تین سے چار ہفتوں تک رکھا جائے جہاں اُن کے رہنے‘ کھا نے  اور طبی سہو لیات پہنچانے کا انتظام ہو سکے۔ سوشل میڈیا پر لو گوں کی جانب سے پو چھے گئے سوالوں کا بھی پوار نے جواب دیا۔

***** ***** *****

 مہاراشٹر میں کورونا وائرس کے پھیلائو سے پیدا ہوئی صورتحال سے نمٹنے اور صحت اور معاشی بحران کے پس منظر میں ریاستی وزیر مالیات اجیت پوار نے مرکزی حکو مت سے 25؍  ہزار کروڑ روپیوں کے فنڈز کا مطالبہ کیا ہے۔ اجیت پوار نے مرکزی وزیر مالیات نِر ملا سیتا رمن‘ ٹرانسپورٹ کے وزیر نتِن گڈ کری اور اطلا عات و نشر یات کے وزیر پر کاش جائوریکر کو خط لکھا ہے جس میں مطالبہ کیاگیا کہ مرکزی حکو مت کی جانب سے آنے والے 16؍ ہزار 654؍ کروڑ روپیوں کی بقایہ رقم بھی ادا کی جائے ۔

***** ***** *****

 اِس بیچ مہاراشٹر میں کورونا وائرس سے متاثرہ مریضوں کی تعداد 220 ؍ ہو گئی ہے۔ کل ممبئی میں 8؍ پونے میں 5؍ ناگپور میں2 ؍ اور ناسک اور کو لہا پور میں ایک ایک نئے مریض کا انکشاف ہوا۔ اس طرح ایک دن میں کورونا کے 17؍ نئے مریض پائے گئے ۔ اِس دوران39؍ مریض کورونا سے ٹھیک بھی ہوئے ہیں اور اُنھیںاسپتالوں سے چھٹی دیدی گئی ہے۔
 دوسری جانب مہاراشٹر میں کل کورونا سے متاثرہ دو مریضوں کی موت بھی ہوئی  ہے۔ ممبئی میں ایک 78؍ سالہ بزرگ کی جبکہ پونے میں 52؍ سالہ شخص کی کل کورونا سے موت ہوگئی۔ اِن اموات کے بعد مہاراشٹر بھر میں کورونا سے مرنے والوں کی تعداد 10؍ ہو گئی ہے۔ ریاستی و زیر صحت راجیش ٹو پے نے یہ اطلاع دی۔

***** ***** ***** 

 شہری فراہمی محکمہ نے کہا ہے کہ راشن دکانوں سے غذائی اجناس خرید نے کے لیے کسی بھی طرح کا کوئی فارم جاری نہیں کیا گیا ہے۔ محکمے کی جانب سے سوشل میڈیا پر وائرل ہو رہی ایک پوسٹ کی تر دید کی گئی ہے جس میں کہا جا رہا تھا کہ راشن دکانوں سے سامان خرید نے کے لیے فارم بھر نا ضروری  ہے۔ شہری فراہمی کے محکمے نے کہا کہ یہ خبربے بنیاد ہے اور اُس نے کوئی فارم جاری نہیں کیا ہے ۔ محکمے نے عوام سے اپیل کی کہ وہ جعلسازی سے بچیں اور کوئی فارم نہ بھریں۔

***** ***** *****

 اورنگ آباد کی ڈاکٹر بابا صاحیب امبیڈکر مراٹھواڑہ یونیور سٹی نے کورونا وائرس کی وباء سے پیدا ہوئی ہنگا می صورتحال کے مد نظر اورنگ آباد کیمپس‘ عثمان آباد سب سینٹر اور گھن سائونگی ماڈل کالج کو14؍ اپریل تک مکمل بند رکھنے کا فیصلہ کیا ہے۔ یونیور سٹی کے وائس چانسلر ڈاکٹر پر مود یو لے نے کل اِس بارے میں احکا مات جاری  کیے ۔ حکم نا مے میں کہا گیا ہے کہ 14 ؍ اپریل تک سبھی پروفیسر‘ افسران اور ملازمین گھر سے ہی کام کر تے ر ہیں۔
 دوسری جانب ڈاکٹر با با صاحیب امبیڈکرر مراٹھواڑہ یونیور سٹی نے سبھی پوسٹ گریجویٹ کورسیز کے امتحانات‘ اگلے حکم تک آگے بڑھا دیے گئے ہیں۔ یو نیور سٹی نے واضح کیا کہ امتحا نات منسوخ ہونے سے متعلق سوشل میڈیا پر گردش کر رہی پوسٹ جھوٹ پر مبنی ہے۔ طلباء سے کہا گیا ہے کہ وہ یونیورسٹی کی ویب سائٹ پر دی گئی معلو مات کو ہی مستند سمجھیں۔

***** ***** *****

 اورنگ آ باد کے شیندرا صنعتی علاقے سے جالنہ ضلعے کے بد نا پور پہنچے مزدوروں کے رہنے کے لیے ضلع پریشد اسکول میں انتظا مات کیے گئے تھے ۔ اِن مزدوروں میں مرد‘ خواتین اور بچے بھی شامل تھے۔ بد نا پور میں فلاحی تنظیموں نے حکو مت کے تعاون سے اِن سبھی کے لیے رہنے اور کھانے کا انتظام کیاتھا۔ ہمارے نمائندے نے بتا یا کہ بعد میں متعلقہ کار خانے کے مالک نے اِن سبھی مزدوروں کی ذمہ داری قبول کی اور اُنھیں اپنے ساتھ واپس شیندرا لے گئے۔

***** ***** ***** 

 جالنہ ضلعے میں صبح گیارہ بجے کے بعد پولس کی جانب سے کر فیو پر سختی سے عمل کیا جا رہا ہے۔ پولس سپرنٹنڈنٹ ایس چیتنّیہ نے کل شہر کا دورہ کیا اور امن و قانون کی صورتحال کا جائزہ لیا۔

***** ***** *****

 کر فیو کی خلاف ور زی کرنے پر اورنگ آباد شہر میں اب تک 47؍ لو گوں کے خلاف کیس در ج کیا گیا ہے۔ اِن میں زیادہ تر لوگ وہ ہیں جو بِلا وجہ شہر کے مختلف حصوں میں بنا ماسک لگائے گھوم رہے تھے۔ کچھ دکاندار غیر ضروری سامانوں کی دکانیں کھلی رکھتے  ہوئے پائے گئے جبکہ کچھ رکشہ ڈرائیور اپنے رکشوں میں مسا فر بر داری کر تے پائے گئے ۔ اِن سبھی پر ڈزاسٹر منجمنٹ قانون کے تحت شہر کے مختلف تھانوں میں کیس در ج کیا گیا ہے۔

***** ***** *****

 اورنگ آباد کے ضلع کلکٹر اُدئے چودھری نے کہا ہے کہ اورنگ آباد میں کورونا وائرس پازیٹو پائے جانے کا کوئی نیا کیس سامنے نہیں آیا ہے۔ لیکن پھر بھی عوام ایک دوسرے سے ضروری جسمانی دوری بنائے رکھیں۔ اُنھوں نے کہا کہ گورنمنٹ میڈیکل اسپتال کو مل رہے نمونوں کی رپورٹ نگیٹو آ رہی ہے لیکن احتیا طی تدا بیر پر عمل کرتے رہنا ضروری ہے۔
 ضلع کلکٹر نے لو گوں سے اپیل کی کہ وہ ضرورت پڑ نے پر ہی گھروں سے باہر نکلیں ور نہ گھروں میں ہی رہیں۔ صبح کی سیر پر جانے والوں سے گھر پر ہی رہ کر ورزش کرنے کی ضلع کلکٹر نے صلاح دی ۔ اُنھوں نے کا کہ عوام افواہوں پر دھیان نہ دیں ضلع کلکٹر نے بتا یا کہ انتظا میہ کے پاس قریب ایک مہینے بھر کا ضروری سامان کا ذخیرہ موجود ہے۔

***** ***** *****

  آخر میں اہم خبروں کی سر خیاں ایک بار پھرسن لیجیے
 ٭ مہاراشٹر بجلی بورڈ نے اگلے پانچ سالوں کے لیے کی بجلی کے نِرخ میںکی کٹو تی
 ٭کورونا وائرس کی وجہ سے فصل قرض کی ادائیگی پردی جانے والی سود کی شرح میںرعایت پر31؍ مئی تک توسیع 
 ٭صحت اور معاشی بحران سے نمٹنے کے لیے ریاستی وزیر مالیات اجیت پوار نے مرکزی حکو مت سے کیا
25؍ ہزار کروڑ روپیوں کا مطالبہ
 ٭مہاراشٹر میں کورونا سے متاثرہ مریضوں کی تعداد ہو ئی220۔  کل ہوئی 2؍مریضوں کی موت
  اور
 ٭اورنگ آباد میں کورونا کا کوئی پازیٹیو مریض نہیں لیکن عوام ضروری جسمانی دوری بنائیں رکھیں  :  ضلع کلکٹر اورنگ آباد
علاقائی خبریں ختم ہوئیں

٭٭٭٭٭

AIR News Urdu Bulletin, Aurangabad. Date : 31.03.2020, Time : 9.00 to 9...

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 31.03.2020 TIME – 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 March 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक३१ मार्च २०२० सकाळी ७.१० मि.
****
** आगामी पाच वर्षांसाठी वीज दरात सरासरी ७ ते ८ टक्के कपात राज्य विद्युत नियामक आयोगाकडून जाहीर
** कोरोना विषाणू प्रार्दुभाव लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पीक कर्जासाठीच्या दोन टक्के व्याज सवलत आणि तीन टक्के तत्पर कर्जफेड प्रोत्साहन योजनेस ३१ मे पर्यंत मुदतवाढ
**  आरोग्य आणि आर्थिक संकटावर मात करण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांची केंद्र सरकारकडे २५ हजार कोटी रुपयांच्या निधीची मागणी
** राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या २२०; दोन जणांचा मृत्यू
** आणि
** मराठवाड्यात अवकाळी पाऊस; माजलगाव तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू  
****
राज्य विद्युत नियामक आयोगानं, राज्यातल्या विविध संवर्गाकरिता पुढील पाच वर्षांसाठी, वीज दरात सरासरी ७ ते ८ टक्के कपात जाहीर केली आहे. आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी काल ही कपात जाहीर केली. आयोगाच्या निर्णयानुसार, मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी उद्योगासाठीचे वीज दर, तब्बल १० ते १२ टक्क्यांनी कमी होणार असून, घरगुती विजेकरिताचे दर, ५ ते ७ टक्क्यांनी कमी होणार आहेत. तर शेतीसाठीचे वीज दर १ टक्क्यांनी कमी होणार आहेत. गेल्या १० ते १५ वर्षांनंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची दर कपात होत असून, यामुळे सध्याच्या परिस्थितीत आर्थिक विकासाला चालना मिळण्यास प्रोत्साहन मिळेल, असं कुलकर्णी यांनी सांगितलं. तथापि, वीज दरात कपात झाली म्हणून, ग्राहकांनी विजेचा अनावश्यक वापर न करता, गरजेपुरता वापर करावा, असं आवाहन कुलकर्णी यांनी केलं आहे.
****
कोरोना विषाणू प्रार्दुभावाला प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठीच्या दोन टक्के व्याज सवलत, आणि तीन टक्के तत्पर कर्जफेड प्रोत्साहन योजनेस, ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय, केंद्र सरकारनं काल घेतला. चार टक्के व्याज दरानं, तीन लाख रूपयांपर्यंत पीक कर्ज शेतकऱ्यांना देण्यात येतं. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांवर, बँकापर्यंत पोहाचण्यासाठी तसंच त्यांच्या शेतमालाच्या विक्रीवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे ते वेळेत कर्जाची परतफेड करू शकलेले नाहीत, ही बाब लक्षात घेऊन, ही मुदतवाढ देण्यात आली आहे. मुदतवाढ दिलेल्या कालावधीसाठी, बँका शेतकऱ्यांना कोणताही दंड आकारणार नाही. सरकार शेतकऱ्यांना दोन टक्के व्याज सवलत, आणि तत्पर कर्जफेड केल्यास, अतिरिक्त तीन टक्के व्याज सवलत देऊन पीक कर्जाचा पुरवठा करते.
****
केंद्र सरकारने लागू केलेल्या एकवीस दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याची, कोणतीही योजना नसल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. लॉकडाऊन वाढवलं जणार असल्याबाबत, सामाजिक संपर्क माध्यमांमधल्या वृत्ताचं, केंद्रीय सचिव राजीव गौबा यांनी खंडन केलं. सामाजिक संपर्क माध्यमांमधून, पसरवल्या जात असलेल्या या चर्चा निराधार असून, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन सरकारनं  केलं आहे.
दरम्यान, पुढील आदेश मिळेपर्यंत केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना, बायोमेट्रिक हजेरी प्रणालीतून सूट देण्यात आली. यापूर्वी केवळ ३१ मार्च पर्यंत सूट देण्यात आली होती, आता त्यात वाढ करण्यात आली आहे.
****
केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या लॉकडाऊनमधल्या दोन आठवड्यांचा काळ अद्याप बाकी असून, या काळात नागरिकांनी नियमांचं गांभीर्यानं पालन करावं, असं आवाहन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, शरद पवार यांनी केलं आहे. ते काल सामाजिक संपर्क माध्यमांवरून, जनतेशी बोलत होते. पुढचे काही दिवस नागरिकांनी काटकसरीची सवय लावून घ्यावी, अत्यावश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडावं, पोलिसांशी हुज्जत घालून गैरवर्तन करू नये, असं आवाहनही पवार यांनी केलं. ऊसतोडणी कामगारांचं काम संपल्यावर, कारखान्यांनी कारखाना परिसरातच, त्यांची पुढचे तीन ते चार आठवडे निवास, भोजन, तसंच वैद्यकीय उपचारांची सुविधा करून द्यावी, अशी सूचना पवार यांनी केली आहे. नागरिकांनी सामाजिक संपर्क माध्यमांवरून विचारलेल्या अनेक प्रश्नांनाही, त्यांनी उत्तरं दिली.
****
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, उद्भवलेल्या आरोग्य आणि आर्थिक संकटावर मात करण्यासाठी, अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे, २५ हजार कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना लिहिलेल्या पत्रात, केंद्रानं वेगवगेळ्या शिर्षाखाली बाकी असलेली, १६ हजार ६५४ कोटी रुपयांची थकबाकीही द्यावी, अशी मागणी केली आहे.  
****
लॉकडाऊनमुळे विस्थापित झालेल्या, आणि परराज्यातील अडकलेल्या कामगारांच्या व्यवस्थेसाठी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदेशानुसार, ४५कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये कोकण विभागासाठी १५ कोटी, पुणे १० कोटी, तर उर्वरीत औरंगाबाद, नागपूर, अमरावती, नाशिक विभागासाठी, प्रत्‍येकी ५ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. विस्थापित कामगारांसाठी निवारा गृह, अन्नधान्य आणि भोजन तसंच इतर तातडीनं करावयाच्या उपाययोजनांसाठी, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली, आपत्ती व्यवस्थापन राज्य कार्यकारी समितीची काल बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
****
राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या २२० झाली आहे. काल मुंबईत आठ, पुण्यात पाच, नागपूर इथं दोन, तर नाशिक आणि कोल्हापूर इथं प्रत्येकी एक, असे नवीन १७ रुग्ण आढळले. या आजारातून आतापर्यंत ३९ जण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर राज्यात काल दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत ७८ वर्षीय पुरुषाचा, तर पुण्यात ५२ वर्षीय पुरुषाचा या आजारानं मत्यू झाला. त्यामुळे राज्यात कोरोना आजारानं मृत्यू झालेल्यांची संख्या, दहा झाली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल ही माहिती दिली. 
****
स्वस्त धान्य दुकानावरील धान्य खरेदी करण्यासाठी, कोणत्याही प्रकारचा फॉर्म, अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेला नाही. सध्या सामाजिक आणि अन्य काही माध्यमावरून, अशा प्रकारचा बनावट फॉर्म प्रसिद्ध केला जात आहे. त्यात काहीही तथ्य नसून, असा कोणताही निर्णय, अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आलेला नसल्यानं, नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी, असा कुठलाही फॉर्म भरून देऊ नये, असं आवाहन, अन्न, नागरी पुरवठा विभागानं केलं आहे.
****
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन, औरंगाबाद इथला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा वि़द्यापीठ परिसर, उस्मानाबाद इथला उपपरिसर, समाजकार्य महाविद्यालय आणि घनसावंगीचं मॉडेल कॉलेज, येत्या १४ एप्रिलपर्यंत संपुर्णतः बंद ठेवण्याचे आदेश, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिले आहेत. या काळात सर्व प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी, मुख्यालय न सोडता घरी बसूनच आवश्यक असेल ते प्रशासकीय काम करावं, असे निर्देशही कुलगुरूंनी दिले आहेत.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा, पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षा रद्द झाल्याबद्दल, समाज माध्यमात प्रसारीत होत असलेले परिपत्रक खोटे असून, सर्व संबंधितांनी, विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरून दिलेली माहितीच अधिकृत समजावी, असं विद्यापीठानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद इथल्या शेंद्रा औद्योगिक परिसरातू, जालना जिल्ह्यातल्या बदनापूर इथं दाखल झालेल्या, कामगार महिला, पुरुष आणि लहान मुलांची, जिल्हा परिषद शाळेत व्यवस्था करण्यात आली. बदनापूर इथल्या स्वयंसेवी संस्थांनी, प्रशासनाच्या मदतीनं सर्व कामगारांची, जेवणाची आणि राहण्याची व्यस्था केली. त्यानंतर संबंधित कारखान्याचे मालक, या सर्व कामगारांची आणि त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन, शेंद्रा इथं घेऊन गेल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जालना शहरात सकाळी अकरानंतर पोलिसांनी संचारबंदी अधिक कडक केली आहे. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी स्वतः शहरात फिरून बंदोबस्ताचा आढावा घेतला.
****
बीड जिल्ह्यातल्या महसूल, तलाठी, वाहन चालक कर्मचारी संघटना तसंच चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांनी, एका दिवसाचं वेतन, मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरता, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे सादर काल सादर केलं. संघटनेच्या वतीनं दहा लाख रूपये या निधीस देण्यात आल्याचं, संघटनेचे अध्यक्ष नायब तहसीलदार चंद्रकांत जोगदंड यांनी सांगितलं.
लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी, आपल्या खासदार निधीतून एक कोटी रुपये निधी, आणि आपलं एका महिन्याचं एक लाख रुपये वेतन, पंतप्रधान हाय्यता निधीसाठी दिलं आहे.  निलंग्याचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनीही, आपल्या स्थानिक विकास निधीतून, एक कोटी रुपयांचा निधी देण्याचं जाहीर केलं आहे. आरोग्य सुविधांच्या उपलब्धतेसाठी हा निधी असून, गरज भासल्यास आणखी निधी देऊ, असं आमदार निलंगेकर यांनी म्हटलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा तालुक्यात सुधीर राठोड यांच्या सह काँग्रेस कार्यकर्त्यांनी, सामाजिक अंतर ठेवून, गरजू लोकांना धान्य वाटप केलं. कळमनुरी जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी, सहकाऱ्यांच्या मदतीनं, वयोवृद्ध, निराधार आणि गरजू मजुरांना धान्यासह आवश्यक साहित्याचं वाटप केलं.
****
लातूर शहरातल्या सर्व अठरा प्रभागांमध्ये उद्यापासून जंतुनाशक फवारणी केली जाणार आहे. दररोज पाच ते सहा प्रभागांमध्ये सकाळी सात ते बारा आणि दुपारी चार ते संध्याकाळी सात या दरम्यान फवारणी होईल. येत्या आठ तारखेपर्यंत फवारणीचे तीन टप्पे होणार असल्याचं, याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे.
****
परभणी शहरात महापालिकेकडून जंतुनाशक फवारणी करण्यात येत असून, आरोग्य विभागामार्फत पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. दवाखाना बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर दंडात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून दवाखान्यांचा दररोजचा अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त रमेश पवार यांनी दिले आहेत.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत कोरोना विषाणू बाधित रुग्णांसाठी काही सोयी सुविधा तातडीनं तयार करण्यात येत आहे. या सुविधांसाठी वैद्यकीय, शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री तसंच लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सुचनेनुसार आपत्कालीन निधीमधून दोन कोटी सतरा लाख रुपये खर्चास जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आजपासून चाळीस ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असून रुग्णवाहिका, मालट्रक, छोट्या मालवाहू वाहनांची तपासणी करूनच शहरात प्रवेश दिला जाणार आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी ही माहिती दिली. व्यावसायिक प्रवासी वाहतुकीला मुळीच परवानगी नसून, ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने पोलिस विभाग संपूर्ण शहरावर नजर ठेवणार आहे. हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का असूनही शहरात फिरणाऱ्या दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
****
लातूर शहरातल्या कार्यकर्त्यांना रक्तदान करण्याचं आवाहन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी सामाजिक प्रसार माध्यमातून केलं आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करत सर्वांना रक्तदान करण्याचं आवाहन गुरुनाथ मगे यांनी केलं आहे. बीड तसंच परभणी इथंही रक्तदान शिबीर घेण्यात आलं.
****
संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी औरंगाबाद शहरात सत्तेचाळीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी अनेकजण शहराच्या विविध भागात विनाकारण तसंच तोंडावर मास्क न बांधता फिरत असल्याचं आढळून आलं. काही दुकानदारांनी विनाकारण आपली दुकानं उघडी ठेवली होती, तर काही रिक्षाचालक नियमांचं उल्लंघन करून रिक्षात गर्दी करून फिरताना आढळून आले. या सर्वांविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत शहराच्या विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण अद्याप आढळलेला नाही, नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग अर्थात समाजापासून अंतर योग्य अंतर राखावं, असं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केलं आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे येणाऱ्या नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह येत आहे, मात्र तरीही नागरिकांनी आवश्यक असेल तेव्हा, योग्य खबरदारी घेऊनच घराबाहेर यावं, असं त्यांनी सांगितलं. सकाळच्या वेळी फिरण्याचा व्यायामही टाळावा, घरीच व्यायाम करण्याचा सल्ला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, सुमारे महिनाभर पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तू जिल्ह्यात उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नांदेड शहरातल्या युवकांच्या बचत गटानं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन लाख रूपये दिले आहेत. नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्याकडे दोन लाख रूपयांचा धनादेश या युवकांनी सुपुर्द केला.
मुंबईतले खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबई शहर आणि उपनगर भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी खासदार निधीतून एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या संघटनांनी जिल्ह्यातल्या सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी देण्यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सेवा २४ तास अखंडितपणे सुरू ठेवाव्यात, असं आवाहन जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर यांनी केलं आहे. लॉकडाऊनमुळे परभणी जिल्ह्यात दवाखाने बंद असल्यामुळं आरोग्य सेवेसाठी जिल्ह्यातल्या नागरिकांची गर्दी होत असल्याचं निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर मुगळीकर यांनी हे आवाहन केलं आहे.
****
परभणी महानगरपालिके मार्फत मालमत्ता आणि पाणीपट्टी कराच्या विलंब शास्तीवर देण्यात आलेल्या सवलतीची मुदत ३० मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही मुदत आज संपणार होती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या अनुषंगाने शासनानं राज्यात संचार बंदी लागू केलेली आहे. त्यामुळे नागरीकांना कराचा भरणा करण्यासाठी इच्छा असूनही करांचा भरणा करता आलेला नाही, त्यामुळे ही मुदत वाढवण्यात आल्याचं मनपा आयुक्त रमेश पवार यांनी सांगितलं.
****
जालना शहरात जुना जालना भागातल्या भाजीमंडईत होणारी गर्दी टाळण्यासाठी हा बाजार आता सकाळी सहा ते बारावाजेपर्यंत आणि सायंकाळी पाच ते आठवाजेपर्यंतचं सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यांचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. बीड इथं रोटरी क्लब आणि  भारतीय जैन संघटनेनं एकत्रित येऊन आजपासून रक्तदान शिबिराला सुरूवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर आणि स्वच्छता बाळगत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. हे शिबिर उद्यापर्यंत चालणार आहे.
परभणी इथंही रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून काल यात ३० जणांनी रक्तदान केलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा आणि सोनपेठ इथं दोन दिवसांच्या सलग सुट्ट्यानंतर काल शेतकऱ्यांसह नागरिकांनी बँकेमध्ये गर्दी केली होती. मात्र बँकेच्या प्रशासनाने नागरिकांना एकमेकांपासून अंतर ठेवण्याची जाणीव करून देत बँकेच्या दरवाजापासून एका-एका ग्राहकास बँकेत बोलावून व्यवहार पूर्ण केले. केंद्र शासनाच्या विविध योजने अंतर्गत खात्यात पैसे जमा झाले आहेत का? हे पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ इथं दर सोमवारी भरणारा आठवडी बाजार भाजी विक्रेत्यांनी प्रशासनची नजर चुकवून काल दुसऱ्या ठिकाणी भरवला. या बाजारात शहरासह ग्रामीण भागातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ही बाब पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेच्या लक्षात येताच हा बाजार बंद करण्यात आला.
****
नांदेड जिल्ह्यात धर्माबाद तालुक्यात आंतरराज्यीय बासर नाक्यावर तेलंगणा राज्यात कामासाठी गेलेल्या ५४ कामगारांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांना धर्माबाद इथल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. हे सर्व कामगार नांदेड जिल्ह्यातले रहिवाशी आहेत. 
****
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या परिसर प्रशासनानं वाहतुकीस बंद केला आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी या भागात घरोघर जाऊन माहिती संकलित करत आहेत. मात्र या भागातले नागरिक सहकार्य करत नसल्याची तक्रारी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या भागाची पाहणी केली. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात ग्रामीण भागात मात्र सोशल डिस्टन्सिंग अर्थात समाजात योग्य अंतर राखण्याचा नियम पाळला जात आहे. शेतातली आवश्यक कामंही योग्य अंतर राखून पूर्ण केली जात आहेत.
****
कोल्हापूर इथल्या कोळंबा मध्यवर्ती कारागृहातले ३५ कैदी कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर मास्कची निर्मिती करत आहेत. या कारागृहाकडे विविध ठिकाणांहून तीस हजार मास्कची मागणी करण्यात आली आहे. या मागणी आणि पुरवठ्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे कोल्हापूरचे वार्ताहर -

कारागृह तीस हजार मास्क ची मागणी विविध ठिकाणाहून नोंदवण्यात आली आणि गेल्या वीस दिवसात या कैद्यांनी पंचवीस हजाराहून अधिक मास्क ची निर्मिती पाणीपुरवठा करून ही मागणी पूर्णत्वास आणली आहे बाजारात पंचवीस ते पन्नास रुपयाला मिळणारे मास्क हे कैदी केवळ बारा  रुपये प्रति नग या दराने उपलब्ध करून देत आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी कोल्हापूरहून रवींद्र कुलकर्णी $FF787CEB-9459-431D-A871-175BEF33B
****
कोरोना विषाणू संदर्भात संभ्रम निर्माण करणारे संदेश पसरवल्यास ग्रुप ॲडमिनविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशारा राज्याच्या पोलिस यंत्रणेनं दिला आहे. त्यामुळे कोणीही एप्रिल फूल म्हणून पसरवू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. उद्या एक एप्रिल रोजी एकमेकांना एप्रिल फूल करुन त्याचा आनंद साजरा करण्याची पद्धत आहे, मात्र यंदा कोरोना विषाणू संदर्भात अफवा पसरतील, असे संदेश पसरणार नाहीत आणि प्रशासनावर ताण निर्माण होणार नाही, याची नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करणारं पत्र पोलिसांतर्फे जारी करण्यात आलं आहे.
****
लॉकडाऊनच्या काळात घरमालकांनी भाडेकरू कामगारांना घरातून बाहेर काढू नये, असं आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केलं आहे. कोणत्याही आस्थापनांनीही कामगारांना कामावरून कमी करू नये, असं आवाहनही डॉ शिंदे यांनी केलं आहे. इतर राज्यातून पालघर जिल्ह्यात रोजगारासाठी सुमारे चार हजारावर कामगार आलेले आहेत. या सर्वांना जिल्हा प्रशासनानं मदत शिबिरात निवारा उपलब्ध करुन दिला असून त्यांना अन्न, पाणी, वैद्यकीय मदत दिली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी शिंदे यांनी दिली
****
एक फेब्रुवारी पासून मुदत संपलेल्या वाहन परवाना, आणि नोंदणीला ३० जुन पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं काल याबाबत निर्णय घेतल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. 
****
मराठवाड्यात काल सर्वत्र अवकाळी पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात काल रात्री पाऊस झाला.
परभणी जिल्ह्यातल्या परभणी, पूर्णा, पालम, गंगाखेड, जिंतूर तालुक्यात काल रात्री वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.
बीड जिल्ह्यातही अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. माजलगाव तालुक्यातल्या नाखलगाव इथं वीज पडून एकाचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. परळी जवळच्या गोपीनाथ गडाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी वार्यासह पाऊस झाल्यानं घरांवरची पत्रे उडून गेली, अनेक भागात झाडं उन्मळून पडली.
हिंगोली जिल्ह्यात हिंगोली शहरासह वसमत, कुरुंदा, सेनगाव, कळमनुरी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.
जालना जिल्ह्यातल्या परतूर, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी,  राणीउंचेगाव, श्रीष्ठी या भागातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. भारडी शिवारात मोसंबी पिकाचं मोठं नुकसान झालं.
नांदेड जिल्ह्यातही ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. या अवकाळी पावसानं आंबा, कांदा, गहू पिकांचं, तसंच भाजीपाल्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 
****


आकाशवाणी औरंगाबाद दि.31.03.2020 सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Monday, 30 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.03.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 March 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० मार्च २०२० सायंकाळी ६.००
****

 इतर विकसित देशांच्या तुलनेत भारतात कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी असून, सुदैवानं भारतात अजून सामाजिक संसर्गाचा धोका नसल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. भारतात सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं नागरिकांनी पालन करावं, कोरोनाची लक्षणं दिसल्यास लपवू नयेत, असं आवाहनही या अधिकाऱ्यांनी केलं. देशभरात कोरोनाबाधितांची संख्या एक हजार ७१ झाली आहे, यापैकी २९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, शंभर रुग्णांना उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या देशभरात ९४२ रुग्ण उपचार घेत आहेत.
****

 शिवभोजन थाळी योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली असून पुढचे तीन महिने शिवभोजन थाळी दहा रुपयांऐवजी पाच रुपयांना मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

 दरम्यान, नांदेड इथं संचारबंदीच्या काळात शिवभोजन थाळीचा तीस ते पस्तीस जणांनी आज लाभ घेतला.
****

 लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी आपल्या खासदार निधीतून एक कोटी रुपये निधी आणि आपलं एका महिन्याचं एक लाख रुपये वेतन पंतप्रधान हाय्यता निधीसाठी दिले आहे. 
****

       औरंगाबाद इथल्या शेंद्रा औद्योगिक परिसरातून जालना जिल्ह्यातल्या बदनापूर इथं दाखल झालेल्या कामगार महिला, पुरुष आणि लहान मुलांची जिल्हा परिषद शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. बदनापूर इथल्या स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनाच्या मदतीनं सर्व कामगारांची जेवणाची आणि राहण्याची व्यस्था केली. जालना शहरात सकाळी अकरानंतर पोलिसांनी संचारबंदी अधिक कडक केली आहे. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी स्वतः शहरात फिरून बंदोबस्ताचा आढावा घेतला.
****

लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत कोरोना विषाणू बाधित रुग्णांसाठी काही सोयी सुविधा तातडीनं तयार करण्यात येत आहे. या सुविधांसाठी वैद्यकीय, शिक्षण, सांस्कृतिक कार्य मंत्री तसंच लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सुचनेनुसार आपत्कालीन निधीमधून दोन कोटी सतरा लाख रुपये खर्चास जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
****

 बीड जिल्ह्यातल्या महसुल, तलाठी, वाहन चालक कर्मचारी संघटना तसंच चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरता जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्याकडे सादर करण्यात आलं. संघटनेच्या वतीने दहा लाख रूपये या निधीस देण्यात आल्याचं संघटनेचे अध्यक्ष नायब तहसीलदार चंद्रकांत जोगदंड यांनी सांगितले.
****

 हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा तालुक्यात सुधीर राठोड यांच्या सह काँग्रेस कार्यकर्त्यांनी सामाजिक अंतर ठेवून गरजू लोकांना धान्य वाटप केले. कळमनुरी जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ.सतीश पाचपुते यांनी सहकाऱ्यांच्या मदतीनं वयोवृद्ध, निराधार आणि गरजू मजुरांना धान्यासह आवश्यक साहित्याचं वाटप केलं.
****

       लातूर शहरातल्या सर्व अठरा प्रभागांमध्ये उद्यापासून जंतुनाशक फवारणी केली जाणार आहे. दररोज पाच ते सहा प्रभागांमध्ये सकाळी सात ते बारा आणि दुपारी चार ते संध्याकाळी सात या दरम्यान फवारणी होईल. येत्या आठ तारखेपर्यंत फवारणीचे तीन टप्पे होणार असल्याचं, याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे.
****

 उस्मानाबाद जिल्ह्यात उद्या ३१ मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या नागरिकांनी घराबाहेर न पडता घरातच राहून हा जनता कर्फ्यू यशस्वी करावा आणि आपला जिल्हा कोरोना मुक्त राहील यासाठी सर्वांनी आपलं योगदान द्यावं असंही मुंढे यांनी म्हटलं आहे.
****

 परभणी शहरात महापालिकेकडून जंतुनाशक फवारणी करण्यात येत असून, आरोग्य विभागामार्फत पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. दवाखाना बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर दंडात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून दवाखान्यांचा दररोजचा अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त रमेश पवार यांनी दिले आहेत.
****

 नांदेड जिल्ह्यात उद्यापासून चाळीस ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असून रुग्णवाहिका, मालट्रक, छोट्या मालवाहू वाहनांची तपासणी करूनच शहरात प्रवेश दिला जाणार आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी ही माहिती दिली. व्यावसायिक प्रवासी वाहतुकीला मुळीच परवानगी नसून, ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने पोलिस विभाग संपूर्ण शहरावर नजर ठेवणार आहे. हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का असूनही शहरात फिरणाऱ्या दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
****

 लातूर शहरातल्या कार्यकर्त्यांना रक्तदान करण्याचं आवाहन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी सामाजिक प्रसार माध्यमातून केले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करत सर्वांना रक्तदान करण्याचं आवाहन गुरुनाथ मगे यांनी केलं आहे.

बीड तसंच परभणी इथंही रक्तदान शिबीर घेण्यात आलं.
*****
***

Audio - आकाशवाणी औरंगाबाद दि.30.03.2020 रोजीचे सायंकाळी 06.00 वाजेचे मराठी बातमी...

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 30.03.2020 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date 30 March 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० मार्च २०२० दुपारी १.०० वा.
****
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशातल्या अनेक मोठ्या कंपन्या आणि व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आहे. टीव्हीस मोटार्स कंपनीने पंचवीस कोटी रूपये पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा केले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआयने पंतप्रधान मदत निधीत एक्कावन्न कोटी रुपयांचे योगदान दिलं आहे.
****
खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आणि एक कोटी रुपये मुंबईतल्या रुग्णालयांना व्हेंटिलेटर्ससाठी वितरित केले आहे. त्यांनी खासदार निधीतून एक कोटी रुपये मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय तसंच गोकुळदास तेजपाल-जीटी रुग्णालयाना व्हेंटिलेटर्स घेण्यासाठी दिले आहेत.
****
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमधल्या दोन आठवड्यांचा काळ अद्याप बाकी आहे, या काळात नागरिकांनी नियमांचं गांभीर्यानं पालन करावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते आज सामाजिक संपर्क माध्यमांवरून जनतेशी बोलत होते. पुढचे काही दिवस नागरिकांनी काटकसरीची सवय लावून घ्यावी, अत्यावश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडावं, पोलिसांशी हुज्जत घालून गैरवर्तन करू नये, असं आवाहनही पवार यांनी केलं. लॉकडाऊनची मुदत वाढवली जाण्याबाबत सामाजिक संपर्क माध्यमांवरून फिरत असलेल्या निराधार संदेशांबाबत बोलताना पवार यांनी, नागरिकांनी नियमांचं योग्य पालन केलं, तर लॉकडाऊन वाढवण्याची गरजच पडणार नाही, असं सांगितलं. ऊसतोडणी कामगारांचं काम संपल्यावरही कारखान्यांनी कारखाना परिसरातच त्यांची पुढचे तीन ते चार आठवडे निवास, भोजन, तसंच वैद्यकीय उपचारांची सुविधा करून द्यावी अशी सूचना पवार यांनी केली आहे. नागरिकांनी सामाजिक संपर्क माध्यमांवरून विचारलेल्या अनेक प्रश्नांनाही त्यांनी उत्तरं दिली.
****
लॉकडाऊनच्या काळात घरमालकांनी भाडेकरू कामगारांना घरातून बाहेर काढू नये, असं आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केलं आहे. कोणत्याही आस्थापनांनीही कामगारांना कामावरून कमी करू नये, असं आवाहनही डॉ शिंदे यांनी केलं आहे. इतर राज्यातून पालघर जिल्ह्यात रोजगारासाठी सुमारे चार हजारावर कामगार आलेले आहेत. या सर्वांना जिल्हा प्रशासनानं मदत शिबिरात निवारा उपलब्ध करुन दिला असून त्यांना अन्न, पाणी, वैद्यकीय मदत दिली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी शिंदे यांनी दिली
****
सांगली, मिरज औद्योगिक वसाहत क्षेत्रात काम करणाऱ्या सहाशे कामगारांच्या जेवण आणि निवासाची सांगली पोलिसांनी सोय केली. परराज्यातून आलेले हे कामगार पायपीट करत असल्याचं आढळून आल्यावर पोलिसांनी या सर्वांची एका क्रीडांगणावर राहण्याची व्यवस्था केली. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी ताप आणि खोकल्याच्या रूग्णांचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत केलल्या सर्वेक्षणामध्ये एकही कोरोना सदृष्य लक्षणे असलेली व्यक्ती आढळली नाही. दहा जणांना जिल्हा रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षामध्ये दाखल केलं असुन या रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
****
संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी औरंगाबाद शहरात सत्तेचाळीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी अनेकजण शहराच्या विविध भागात विनाकारण तसंच तोंडावर मास्क न बांधता फिरत असल्याचं आढळून आलं. काही दुकानदारांनी विनाकारण आपली दुकानं उघडी ठेवली होती, तर काही रिक्षाचालक नियमांचं उल्लंघन करून रिक्षात गर्दी करून फिरताना आढळून आले. या सर्वांविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत शहराच्या विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण अद्याप आढळलेला नाही, नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग अर्थात समाजापासून योग्य अंतर राखावं, असं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केलं आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे येणाऱ्या नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह येत आहे, मात्र तरीही नागरिकांनी आवश्यक असेल तेव्हा, योग्य खबरदारी घेऊनच घराबाहेर यावं, असं त्यांनी सांगितलं. सकाळच्या वेळी फिरण्याचा व्यायामही टाळावा, घरीच व्यायाम करण्याचा सल्ला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, सुमारे महिनाभर पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तू जिल्ह्यात उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगासनांची एक थ्रीडी चित्रफित ट्वीटरवर प्रसारीत केली आहे. ही चित्रफित वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे.
****