Friday, 31 March 2023

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.03.2023 रोजीचे रात्री 08.00 ते 08.15 वाजेचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र

आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक 31.03.2023 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.03.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 March 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ मार्च २०२ सायंकाळी ६.१०

****

·      पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळेपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून वाहतूक भत्ता.

·      जुन्या पेन्शन योजनेसाठी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपातीचा सरकारचा निर्णय.

·      छत्रपती संभाजीनगर इथली सभा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार घेण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार.

आणि

·      सोळाव्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला थोड्या वेळातच प्रारंभ.

****

राज्यातल्या पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळेपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून वाहतूक भत्ता मिळणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातल्या वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वसतीस्थानापासून एक किलोमीटरपेक्षा अधिक तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वसतीस्थानापासून तीन किलोमीटर आणि नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वसतीस्थानापासून पाच किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर शाळा असल्यास वाहतूक भत्ता मिळणार आहे.

****

राज्यात जुन्या पेन्शन योजनेसाठी १४ ते २० मार्च या कालावधीत संप केलेल्या १७ लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनातून बाराशे कोटी रुपयांची कपात केली जाणार आहे. तसंच संपकाळाचा कालावधी असाधारण रजा म्हणून ग्राह्य धरला जाणार असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या आदेशात बदल करण्यासाठी विनंतीपत्र दिले असून ते लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

२०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी भारताच्या नवीन परदेशी व्यापार धोरणाची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. ते आज नवी दिल्लीत ते पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्यापासून लागू होणाऱ्या या नवीन धोरणामध्ये आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने अनेक नवीन संधी आणि सुविधा देणाऱ्या सूचना अंमलात येणार आहेत, तसंच आयात आणि निर्यात संदर्भात लवचिकता ठेवण्यात आली असून, निर्यातीत मोठ्या आर्थिक वृद्धीचं लक्ष ठेवण्यात आल्याचं गोयल यांनी सांगितलं.

****

पंतप्रधानांच्या शैक्षणिक पदव्यांबाबत माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत माहिती सादर करण्याची गरज नसल्याचा निकाल गुजरात उच्च न्यायालयानं दिला आहे. पंतप्रधानांच्या पदवी प्रमाणपत्राचा तपशील मागणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयानं २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पंतप्रधानांच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवीचा तपशील सादर करण्याचे निर्देश देणारा मुख्य माहिती आयोगाचा आदेशही या न्यायालयानं रद्दबातल ठरवला आहे. महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांनी या प्रकरणाचा युक्तिवाद केला. पंतप्रधानांच्या पदव्यांमध्ये लपवण्यासारखे काही नसले तरी विद्यापीठाला माहिती जाहीर करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. लोकशाहीत पंतप्रधान पदावर असलेली व्यक्ती डॉक्टरेट असेल किंवा निरक्षर असेल, यामुळे काहीही फरक पडत नाही. तसेच या माहितीत कोणतेही जनहित गुंतलेलं नाही, असंही मेहता यांनी आपल्या युक्तिवादात म्हटलं होतं.

****

सुधारित आकाश शस्त्र प्रणाली आणि शस्त्रास्त्रांचा शोध घेणाऱ्या, १२ डब्ल्यू एल आर ‘स्वाती’ रडारच्या खरेदीसाठी, संरक्षण मंत्रालयानं भारत डायनॅमिक्स लिमिटेड बरोबर करार केला आहे. ९ हजार १६० कोटी रुपयांपेक्षा पेक्षा अधिक रकमेच्या या करारानुसार सुधारित क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपक, सहाय्यक उपकरण आणि वाहनांची खरेदी केली जाणार आहे. आकाश शस्त्र ही हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली असून, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था-डीआरडीओनं ती विकसित केली आहे. सुधारित आकाश शस्त्र प्रणालीच्या आणखी दोन तुकड्या देशाच्या उत्तर सीमेवर भारतीय लष्करासाठी खरेदी करण्याची योजना आहे.

****

येत्या १७ ते १९ मे दरम्यान पहिली जागतिक पर्यटन क्षेत्रातली आर्थिक गुंतवणूक परिषद नवी दिल्लीत होणार आहे. देशी आणि परदेशी गुंतवणुकदारांना पर्यटन व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी एक मोठं व्यासपीठ मिळेल, असं केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल दोन दिवसीय पर्यटन चिंतन समंलेनाचा समारोप केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ही माहिती देण्यात आली.

****

राज्यात आज ४२५ जणांना कोविडचा संसर्ग झाला आहे. तर ३५१ रुग्ण संसर्गमुक्त होवून घरी परतले असून रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक १४ टक्के आहे. दरम्यान, आज एकही मृत्यूची नोंद झाली नाही.

****

छत्रपती संभाजीनगर इथली सभा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार घेण्याचा निर्धार महाविकास आघाडीने वर्तवला आहे. विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सांगितल आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. दोन एप्रिलला ही सभा होणार आहे. सभेची तयारी व्यवस्थित सुरू असून, महाविकास आघाडीचे नेते अंबादास दानवे, राजेश टोपे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी तयारीवर लक्ष ठेवून असल्याचं, पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरात घडलेल्या घटनेसंदर्भात नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही पवार यांनी केलं आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही आज मुंबईत पत्रकार परिषद घेत, ही सभा होणार असल्याचं सांगितलं.

दरम्यान, या सभेच्या पूर्वतयारीनिमित्त आज सभेच्या नियोजित ठिकाणी सांस्कृतिक मंडळ मैदानावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख तथा म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्य पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. महाविकास आघाडीची ही सभा ऐतिहासिक होईल, असा विश्वास घोसाळकर यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, या सभेमुळे सामाजिक वातावरण बिघडण्याचा अहवाल जर संबंधित यंत्रणांनी दिला, तर सभेला परवानगी नाकारली जाऊ शकते, असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. प्रशासन सर्व स्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं महाजन यांनी सांगितलं.

****

शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याबाबत सुळे यांनी ट्वीटरवरून हे मत व्यक्त केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याची तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणीही खासदार सुळे यांनी केली. अनेक महापुरुषांचा वैचारिक वारसा असणारे महाराष्ट्र हे अत्यंत सभ्य, सुसंस्कृत राज्य आहे याची आठवणही खासदार सुप्रिया सुळे यांनी करुन दिली आहे.

****

प्रस्तावित वीज दरवाढीला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दर अधिक असूनही, उद्या एक एप्रिलपासून वीज दरवाढ लागू करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावित वीज दरवाढीला प्रतिबंध करावा या मागणीसाठी महावितरणमधील माजी अभियंते, अजित देशपांडे यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. कृषीपंपाच्या अश्वशक्तिचा भार शेतकऱ्यांना न कळवताच त्यांच्या नावानं कोट्यवधींची थकबाकी दाखवून शासनाची, शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्य ग्राहकांचीही फसवणूक केल्याप्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीमार्फत चौकशी करावी अशी मागणीही देशपांडे यांनी केली आहे. या प्रकरणाची प्राथमिक सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे.

****

सोळाव्या इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं आज उद्घाटन होणार आहे. अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी क्रीडा संकुलात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज दरम्यान आज संध्याकाळी साडे सात वाजता पहिला सामना होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण १० संघ खेळणार असून एकूण ७० सामने होणार आहेत. देशभरातल्या एकूण १२ शहरांमध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत.

****

नांदेड जिल्ह्यात, चला जाणुया नदीला या उपक्रमा अंतर्गत उद्या नदी संवाद यात्रा आणि जलसाठ्यातून गाळ काढण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. नदी स्वच्छतेसाठी लोकांनी एकत्र यावं तसंच नदी साक्षरतेविषयी अधिक जागर व्हावा या उद्देशाने शासन हा उपक्रम राबवत आहे.

****

लातूर जिल्ह्यात चाकूर तालूक्यात ३०० हेक्टर जमिनीवर कृषि विकास योजनेंतर्गत सेंद्रीय शेती केली जाणार आहे.

****

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.03.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.03.2023 रोजीचे दुपारी 01.30 वाजेचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 31.03.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  :  31 March 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३१ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यातल्या पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून वाहतूक भत्ता मिळणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातल्या वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानापासून एक किलोमीटरपेक्षा अधिक तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानापासून तीन किलोमीटर आणि नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानापासून पाच किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर शाळा असल्यास वाहतूक भत्ता मिळणार आहे.

***

२०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी भारताच्या नवीन परदेशी व्यापार धोरणाची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्यापासून लागू होणाऱ्या या नवीन धोरणामध्ये आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने अनेक नवीन संधी आणि सुविधा देणाऱ्या सूचना अंमलात येणार आहेत, तसंच आयात आणि निर्यात संदर्भात लवचिकता ठेवण्यात आली असून, निर्यातीत मोठ्या आर्थिक वृद्धीचं लक्ष ठेवण्यात आल्याचं गोयल यांनी सांगितलं. 

***

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने आकाश शस्त्र प्रणाली अंतर्गत शस्त्रास्त्र खरेदीसाठी भारत डायनेमिक्स लिमिटेड कंपनीसोबत करार केला आहे. सुमारे नऊ हजार १६० कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या या करारान्वये वायूसेनेसाठी अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रक्षेपक तसंच अन्य उपकरणं खरेदी केली जाणार आहेत. उत्तरी सीमेवर तैनात सैन्यदलासाठी ही खरेदी केली जात असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

***

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी संरक्षण मंत्रालयानं भारतीय शियार्ड्ससोबत केलेल्या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. ११ अत्याधुनिक समुद्री टेहळणी जहाजं आणि सहा क्षेपणास्त्र वाहक जहाजांसाठी हा करार करण्यात आला. हे पाऊल आत्मनिर्भरतेला चालना देईल आणि विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला मदत करेल, असा विश्वास पंतप्रधानांनी ट्विट संदेशाद्वारे व्यक्त केला आहे. या करारामुळे देशाच्या आत्मनिर्भरतेच्या उद्दिष्टाला गती मिळाली असल्याचं त्यांनी नमूद केलं.

***

देशात काल तीन हजार नव्या कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली. तर काल १३ हजार ९० रुग्ण बरे झाले असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. सध्या देशात जवळपास १५ हजार रुग्णांवर उपचार सुरु असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७८ शतांश टक्के इतका आहे. देशात आतापर्यंत २२० कोटी ६५ लाख नागरीकांचं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झालं आहे.

***

प्रस्तावित वीज दरवाढीला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दर अधिक असूनही, उद्या एक एप्रिलपासून वीज दरवाढ लागू करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावित वीज दरवाढीला प्रतिबंध करावा या मागणीसाठी महावितरणमधील माजी अभियंते, अजित देशपांडे यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. कृषिपंपाच्या अश्वशक्तिचा भार शेतकऱ्यांना न कळवताच त्यांच्या नावानं कोट्यवधींची थकबाकी दाखवून शासनाची, शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्य ग्राहकांचीही फसवणूक केल्याप्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीमार्फत चौकशी करावी अशी मागणीही देशपांडे यांनी केली आहे. या प्रकरणाची प्राथमिक सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे.

***

छत्रपती संभाजीनगर इथं महाविकास आघाडीची सभा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार होणार असल्याचं, विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. दोन एप्रिलला ही सभा होणार आहे. सभेची तयारी व्यवस्थित सुरू असून, महाविकास आघाडीचे नेते अंबादास दानवे, राजेश टोपे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी तयारीवर लक्ष ठेवून असल्याचं, पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरात घडलेल्या घटनेसंदर्भात नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही पवार यांनी केलं आहे.

***

नांदेड जिल्ह्यात, चला जाणुया नदीला या उपक्रमा अंतर्गत उद्या नदी संवाद यात्रा आणि जलसाठ्यातून गाळ काढण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. नदी स्वच्छतेसाठी लोकांनी एकत्र यावं तसंच नदी साक्षरतेविषयी अधिक जागर व्हावा या उद्देशानं शासन हा उपक्रम राबवत आहे.

***

सोळाव्या इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं आज उद्घाटन होणार आहे. वर्ष २०१८ नंतर प्रथमच ही स्पर्धा घरच्या आणि बाहेरच्या मैदानांवर होणार आहे. अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी क्रीडा संकुलामध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज दरम्यान आज संध्याकाळी साडे सात वाजता पहिला सामना होणार आहे.

//************//

 

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.03.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 31.03.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१ मार्च २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राज्यातल्या पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून वाहतूक भत्ता मिळणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागातल्या वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानापासून एक किलोमीटरपेक्षा अधिक तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानापासून तीन किलोमीटर आणि नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानापासून पाच किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर शाळा असल्यास त्या विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता मिळणार आहे.

***

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी संरक्षण मंत्रालयानं ११ अत्याधुनिक समुद्री टेहळणी जहाजं आणि सहा क्षेपणास्त्र वाहक जहाजांसाठी भारतीय शिपयार्ड सोबत १९ हजार ६०० कोटी रुपयांचा करार केला आहे. या जहाजांमुळे भारतीय नौदलाची लढाऊ क्षमता मजबुत होईल, तसंच भारतीय जहाजबांधणीला आणि संबंधित लघु, मध्यम उद्योगांना प्रोत्साहन मिळेल, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.  

***

जी- 20 देशांच्या व्यापार आणि गुंतवणूकविषयक तीन दिवसीय परिषदेचा काल मुंबईत केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत समारोप झाला. शाश्वत विकासाचं उद्दीष्ट गाठताना जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्याबाबत या परिषदेत चर्चा करण्यात आली.   

***

देशातली एक हजार शहरं ऑक्टोबर २०२४ पर्यंत कचरामुक्त करण्याचं उद्दीष्ट असल्याचं गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस २०२३ निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. देशात चार हजार ७१५ शहरं उघड्यावर शौचापासून मुक्त झाले असून, देशात कचरा प्रक्रिया होण्याचं प्रमाण आता ७५ टक्के झालं असल्याची माहिती पुरी यांनी दिली.

***

माद्रीद मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू आणि किदांबी श्रीकांतनं उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात सिंधूनं इंडोनेशियाच्या कुसुमा वारदानीचा २१ - १४, २१ - १६ असा पराभव केला, तर श्रीकांतनं भारताच्याच बी साई प्रणितला २१ - १५, २१ - १२ असं हरवलं.

//***********//

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.03.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

آکاشوانی اَورنگ آ باد علاقائی خبریں تاریخ : 31 ؍ مارچ 2023 ؁ ء وقت : صبح 09.00 سے 09.10 بجے

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.03.2023 रोजीचे सकाळी 08.30 वाजेचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

آکاشوانی اَورنگ آ باد علاقائی خبریں تاریخ : 31 ؍ مارچ 2023 ؁ ء وقت : صبح 09.00 سے 09.10 بجے

Regional Urdu Text Bulletin, Aurangabad

Date : 31 March 2023

Time : 09.00 to 09.10 AM

آکاشوانی اَورنگ آ باد

علاقائی خبریں

تاریخ  :  ۳۱؍  مارچ  ۲۰۲۳؁ ء

وقت  :  صبح  ۹.۰۰   سے  ۹.۱۰   بجے 


سب سے پہلے خاص خبروں کی سر خیاں  ... 

٭ چھتر پتی سنبھا جی نگر شہر میں تمام شہر یان  سے امن و امان کی بر قرار ی کے لیے وزیر اعلیٰ ایکناتھ شندے کی اپیل 

٭ کراڑ پورہ علاقہ میں پیش آئے واقعے کے دوران 20؍ گاڑیاں نذر آتش 400؍  تا  500؍ افراد کے خلاف جرم داخل  ‘  

جانچ کے لیے 8؍ پولس دستے نامزد

٭ مرکزی حکو مت کی  پی  ایم  شری اسکیم کے تحت پہلے مر حلے کے دوران 516؍ اسکو لوں کو منظوری 

٭ پنجاب نیشنل بینک گھپلہ معاملے میں بیڑ ضلع کے شیو پار وتی شکر کار خانے پر

 ED 

  اور

  CBI 

 کے چھا پے 

٭ ناندیڑ ضلع میں ٹرک اور رکشے کے ما بین ہوئے تصا دم میں7؍ مہینے کی بچی سمیت 5؍ افراد ہلاک

اور

٭ سو لہویں اِنڈین پریمئر لیگ  ‘  آئی پی ایل کر کٹ مقابلوں کا آج افتتاح

اب خبریں تفصیل سے...

ٌٌ وزیر اعلیٰ ایکناتھ شندے نے ریاست میں نظم و نسق کی بر قرار ی کے لیے سب سے پُر امن رہنے کی اپیل کی ہے ۔ انہوں نے کہا کہ شہرکا  فساد سے متاثرہ علاقہ مکمل طور پر پولس کنٹرول میں ہے ۔ انہو ںنے کہا کہ تمام شہر یان کو چا ہیے کہ وہ اِس علاقے میں امن کو بر قرار رکھے ۔ وزیر اعلیٰ نے کہا کہ یہ رام نو می کے اُتسو کا موقع ہے  اور  تمام ریاست میں سب مذاہب کو ماننے والے تمام تہوار مل جل کر منا تے ہیں ۔ انہوں نے کہا کہ تمام مذاہب کے ماننے سے امن بر قرار رکھنے  اور  تعا ون کرنے کی اپیل کی ہے ۔

***** ***** ***** 

چھتر پتی سنبھا جی نگر میں تنائو کے پس منظر میں کل شہر یان نے امن کا پیغام دیتے ہوئے پد یاترا نکالی ۔ راشٹر وادی کانگریس کے ریاستی صدر جینت پاٹل نے شہر میں پیش آئے واقعے کے تناظر میں سیاسی جماعتوں سے اپیل کی ہے کہ وہ اِس واقعے کو ہوا نہ دیں ۔ پاٹل کل پونے میں صحا فیو ں سےمخاطب تھے ۔انہوں نے کہا کہ چھتر پتی سنبھا جی نگر میں2؍ فر قوں کے در میان مذہبی ہم آہنگی بر قرار رکھنے میں انتظامیہ نا کام رہا ہے ۔ انہوں نے کہا کہ اِسی طرز پر چند افراد تمام ریاست میں مذہبی تنائو پیدا کر نے کی سازش کر رہے ہیں ۔ پاٹل نے پولس نتظامیہ سے اپیل کی کہ وہ اِس جانب خاص دھیان دیں کہ 2؍ فرقوں کے در میان مذہبی منا فرت پیدا نہ ہو ۔ 

اِسی بیچ شہر میں بدھ کی شب پیش آئے واقعے میں 2؍  اور  4؍ پہیوں کی 20؍ گاڑیاں جل کر خاک ہو گئی ۔ اِس میں پولس کی 12؍ گاڑیاں شامل ہیں۔ بھیڑ کی جانب سے کیے گئے حملے کے جواب میں پولس نے گولی چلائی جس میں ایک فرد کی جان چلی گئی ۔ ہجوم کی جانب سے کیے گئے پتھرائو میں 20؍ پولس ملازمین زخمی ہو گئے ۔  اِس معاملے میں پولس نے 400؍ افراد کے خَاف جرم دا خل کیا ہے  اور  اِس کی تحقیقات کے لیے 8؍ دستے نامزد کیے ہیں ۔ شہر کے فساد سے متاثرہ علاقے  اور  حساس علاقوں میں پولس بندوبست میں اضا فہ کیا ہے ۔

***** ***** ***** 

اِسی بیچ کراڈپورہ علاقے میں واقع رام مندر میں خزا نہ کے مرکزی وزیر مملکت بھاگوت کراڑ  ‘  وزیر رابطہ سندیپان بھُمرے  ‘  امداد باہمی کے ریاستی وزیر اتُل سا وے  اور  قانون ساز کائونسل میں حزب اختلاف کے قائد امبا داس دانوے نے در شن کیے۔ انہوں نے اِس علاقے میں ہوئے فساد کے بعد جلائے گئے مقامات کا جائزہ لیا ۔ اِس موقعے پر بولتے ہوئے وزیر رابطہ بھُمرے نے بتا یا کہ حالات قابو میں ہیں ۔ انہوں نے شہریان سے افواہوں پر دھیان نہ دینے کی اپیل کی ہے۔ نائب وزیر اعلیٰ  اور  ریاست کے وزیر داخلہ دیویندر پھڑ نویس نے کہا ہے کہ چند قائدین اِس معاملے کو سیاسی رنگ دے رہے ہیں جو غلط ہے ۔ انہوں نے تمام افراد سے امن و امان بر قرار رکھنے کی اپیل کی ہے ۔

دریں اثناء کل شہر میں امن کمیٹی کی میٹنگ کا انعقاد ہوا جس میں شہر یان سے امن و امان بنائے رکھنے کی تمام جماعتوں کے اراکین کی جانب سے اپیل کی گئی  ۔

***** ***** ***** 

کانگریس پار ٹی کے ریاستی صدر نا نا پٹو لے نے ریاستی حکو مت کی نا کار کر دگی پر شدید تنقید کر تے ہوئےسے فوری طور پر استعفیٰ دینے کا مطالبہ کیا ہے ۔ کل ممبئی میں صحیفہ نگاروں سے بات کر تے ہوئے انہوں نے الزام عائد کیا کہ شندے حکو مت کی گزشتہ 9؍ مہینوں کی کار کر دگی سے ریاست پرحرف آیا ہے ۔ چند تنظیموں کی اشتعال انگیز تقا ریر سے مذہبی منا فرت میں اضا فہ ہوا ہے ۔ پٹو لے نے کہا کہ ریاستی حکو مت اِس پر کوئی کار وائی نہیںکر رہی ہے ۔ انہوں نے کہا کہ سپریم کورٹ نے ریاستی حکو مت کو نامرد قرار دیا ہے ۔ عدالت کاکہنا ہے کہ یہ حکو مت کچھ بھی نہیں کر رہی ہے اِس لیے ریاست میں مذہبی اختلا فات شباب پر ہے ۔

***** ***** ***** 

مرکزی حکو مت کی  پی  ایم  شری اسکیم کے تحت پہلے مر حلے کے دوران ریات میں516؍ک اسکو لوں کو منظوری دی گئی ہے ۔ اسکولی تعلیم کے ریاستی وزیر دیپک کیسر کر نے یہ اطلاع دی  ۔ وزیر موصوف نے بتا یا کہ طلباء کو مرکزی مقام دیتے ہوئے اِن اسکو لوں کی تر قی کی جائے گی ۔

 ان 516؍ اسکولوں میں 426؍ پرائمری  ‘  90؍ ثانوی  اور  اعلیٰ ثانوی اسکولس شامل ہیں ۔ اِن میں چھتر پتی سنبھا جی نگر کے 11؍  بیڑ 13؍ ہنگولی 5؍ لاتور 13؍ ناندیڑ18؍ پر بھنی 11؍ دھارا شیو9؍  اور  جالنہ ضلعے کے 12؍ اسکولس شامل ہیں ۔

***** ***** ***** 

زمینی حمل و نقل کے مرکزی وزیر نتن گڈ کری نے کہا ہے کہ ممبئی-  گوا شاہراہ کی تعمیر رواں برس دسمبر مہینے تک مکمل ہو جائے گی  جس سے کو کن ڈویژن کی تر قی ہو گی ۔ وزیر موصوف کے ہاتھوں کل پنویل تعلقے کے کھار پاڑہ میں مذکو رہ شاہراہ کی تعمیر سے متعلق پرو جیکٹ کا افتتاح عمل میں آ یا ۔ اِس موقعے پر گڈ کری نے کہا کہ اُن کی وزارت شاہراہوں پر موجود ٹول نا کے ہٹا نے  اور  اُس کی جگہ  سیٹا لائٹ پر منحصر کرایہ وصول کرنے کے نظام پر کام کر رہی ہے ۔

***** ***** ***** 

قانو ن ساز اسمبلی میں حزب اختلاف کے قائد اجیت پوار نے سوال اٹھا یا ہے کہ جب سپریم کورٹ نے ریاستی حکو مت کو نامرد حکو مت کہا ہے تو کیا یہ حکو مت کی کمی نہیں ہے ۔ کل ناسک میں صحیفہ نگاروں سے بات کر تے ہوئے انہوں نے پو چھا کہ کیا یہ ریاست کی بے عزتی نہیں ہے ۔ پوار نے کہا کہ 

وہ گزشتہ اجلاس کے دوران سے یہ کہہ رہے ہیں کہ یہ حکو مت جو کام کر رہی ہے اُس سے عدالت نا خوش ہے ۔

***** ***** ***** 

نائب وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے کہا ہے کہ سپریم کورٹ نے ریاستی حکو مت کے خلاف فیصلہ نہیں دیا ہے ۔ وہ کل نامہ نگاروں سے مخاطب تھے ۔ انہوں نے سپریم کورٹ کے تبصرے پر کہا سو لیسِٹر جنرل نے عدالت کو بتا یا کہ دیگر ریاستوں میں کیا کچھ ہو رہا ہے  لیکن اُنگلی صرف مہاراشٹر کی جانب اٹھائی جا رہی ہے جس پر عدالت نے ایک عام بیان جاری کیا ہے کہ ریاستی حکو متوں نے مذہبی منا فرت کے خلاف کار وائی کر نی چاییے ۔ پھڑ نویس نے کہا کہ انہیں کہیں بھی یہ محسوس نہیں ہو تا کہ یہ ریاستی حکو مت کے خلاف فیصلہ ہے ۔ انہوں نے کہا کہ جان بوجھ کرعدالت کے تبصرے پر غلط بیانی کی جا رہی ہے  اور  جنہیں عدالت کی کار وائی نہیں سمجھتی وہی افراد ایسا کہہ رہے ہیں ۔

***** ***** ***** 

طِبّی تعلیم اور ادویات کے محکمے کے ذریعے کل سے ریاست بھر میں تھائرائیڈ بیداری  اور  علاج کی مہم چلائی جا رہی ہے ۔ طِبّی تعلیم کے ریاستی وزیر گریش مہا جن نے کل جلگائوں کے سر کاری میڈیکل کالج اور اسپتال کے تھائرائڈOPD کا افتتاح کیا ۔ اِس موقعے پر وزیر موصوف نے کہا کہ اِس بیما ری کے بارے میں عوام میں بیداری لائی جا رہی ہے  اور  سرکاری میڈیکل کالج اسپتالوں میں اِس کے علاج کے لیے سہو لیات فراہم کی جا رہی ہے ۔ انہوں نے بتا یا کہ ہر جمعرات کو 12؍ بجے سر کاری میڈیکل کالجز میں تھائیرائڈ کے علاج کے لیے خصو صی خد مات فراہم کی جائے گی ۔

***** ***** ***** 

پنجاب نیشنل بینک گھپلےکےسلسلے میں انفورسمنٹ ڈائریکٹوریٹ ED    اور  CBI  نے کل بیڑ ضلعے کے دھرور تعلقے کے مُنگی میں واقع شیو پار وتی شکر کار خانے پر چھا پے مارے ۔ بینک نے اِس کار خانے کو خاطر خواہ ضما نت نہ ہونے کے با وجود کروڑوں روپئے قرض دیا ہے ۔ کچھ عر صے بعد شکر کار خانے نے خود کو دیو ا لیہ ظاہر کیا ہے ۔ قرض کی وصو لی کے لیے بینکوں نے کمپنی کے اثا ثے نیلا می کے لیے نکالے ہیں ۔ اِس خصوص میں عدالت میں مقدمہ چل رہا ہے ۔

***** ***** ***** 

ناندیڑ ضلعے کے مُد کھیڑ ناندیڑ روڈ پر کل ایک ٹرک   اور  رکشے کے در میان ہوئے تصا دم میںایک 7؍ ماہ کی بچی سمیت 5؍ افراد ہلاک   اور

  8؍ زخمی ہو گئے ۔ رکشے سے 10؍ مزدور کام کے لیے ناندیڑ آ رہے تھے ۔ مُگٹ کے قریب سامنے سے آ نے والے ٹرک نے رکشے کو ٹکّر دی جس کے سبب یہ حادثہ پیش آ یا ۔ زخمیوں کو ناندیر کے سر کاری اسپتال میں داخل کر دیا گیا ہے  ۔

***** ***** ***** 

سولہویں اِنڈین پریمئر لیگ  ‘  آئی پی ایل کر کٹ مقابلوں کا آج افتتاح ہونے جا رہا ہے ۔ سن 2018؁ء کے بعد پہلی مرتبہ یہ مقابلے ملک  اور  بیرون ملک اِن مقابلوں کا انعقاد کیا گیا ہے ۔ احمد آ باد کے نر یندر مودی اسٹیڈیم میں  گجرات ٹائٹنس  اور  چِنئی سوپر کنگز کے در میان آج شام ساڑھےسات بجے پہلا مقابلہ ہو گا ۔

***** ***** ***** 




آخر میں اہم خبروں کی سر خیاں ایک بار پھر  ...


٭ چھتر پتی سنبھا جی نگر شہر میں تمام شہر یان  سے امن و امان کی بر قرار ی کے لیے وزیر اعلیٰ ایکناتھ شندے کی اپیل 

٭ کراڑ پورہ علاقہ میں پیش آئے واقعے کے دوران 20؍ گاڑیاں نذر آتش 400؍  تا  500

؍ افراد کے خلاف جرم داخل  ‘  

جانچ کے لیے 8؍ پولس دستے نامزد

٭ مرکزی حکو مت کی  پی  ایم  شری اسکیم کے تحت پہلے مر حلے کے دوران 516؍ اسکو لوں کو منظوری 

٭ پنجاب نیشنل بینک گھپلہ معاملے میں بیڑ ضلع کے شیو پار وتی شکر کار خانے پر

 ED

   اور

  CBI 

 کے چھا پے 


علاقائی خبریں ختم ہوئیں

آپ یہ خبر نامہ ہمارے یو ٹیوب چینل آکاشوانی سماچار اورنگ آباد 

Aurangabad AIR News    پر دوبارہ کسی بھی وقت سن سکتے ہیں۔

٭٭٭





Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 31.03.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 31 March 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३१ मार्च २०२३ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      छत्रपती संभाजीनगर शहरात सर्वांनी शांतता बाळगण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन,

·      किराडपुऱ्यातील घटनेत २० वाहनं जळून खाक, ४०० ते ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तपासासाठी आठ पथकं नियुक्त

·      केंद्र शासनाच्या पीएमश्री योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातल्या ५१६ शाळांना मान्यता

·      राज्यात थायरॉईड जनजागृती आणि उपचार अभियान राबवण्यास प्रारंभ

·      पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी बीड जिल्ह्याच्या शिवपार्वती साखर कारखान्यावर ईडी आणि सीबीआयचे छापे

·      नांदेड जिल्ह्यात ट्रक आणि रिक्षाच्या अपघातात सात महिन्यांच्या बालिकेसह पाच जणांचा मृत्यू

आणि

·      सोळाव्या इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं आज उद्घाटन   

 

सविस्तर बातम्या

छत्रपती संभाजीनगरसह राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम रहावी यासाठी सर्वांनी शांतता बाळगण्याचं आवाहन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते म्हणाले,

Byte…

आता सध्या पोलिसांच्या पूर्ण कंट्रोलमध्ये तिथला सर्व परिसर आहे. आणि सर्वांनीच त्याठिकाणी शांतता राखली पाहिजे. रामनवमीचा उत्सव आहे. आणि आपल्या राज्यामध्ये सर्वधर्मीय सर्व सण एकत्र येऊन साजरे करतात. त्यामुळे सर्व धमिर्यांना माझं आवाहन आहे, विनंती आहे की आपण सर्वांनीच शांततेत या सर्व उत्सवांना सहकार्य केलं पाहिजे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काल किराडपुरा भागामध्ये शांततेचा संदेश देत ऐक्य पदयात्रा काढली.

 दरम्यान, बुधवारी रात्री झालेल्या या घटनेत दुचाकी आणि चारचाकी अशी २० वाहनं जळून खाक झाली आहेत. यात पोलिसांच्या १२ वाहनांचा समावेश आहे. जमावाकडून झालेल्या हल्ल्याला प्रत्यूत्तर म्हणून पोलिसांनी गोळीबार केला, यात एकाचा मृत्यू झाला. जमावानं पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत २० पोलिस कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल ४०० ते ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपासासाठी आठ पथकंही नियुक्त करण्यात आली आहेत.

तणावग्रस्त भागात पोलीस आणि राज्य राखीव पोलिस दलाचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातल्या संवेदनशील भागातही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सध्या संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असल्याचं, आणि रात्री कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचं, पोलिस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी आज सकाळी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.

****

दरम्यान, किराडपूरा भागातल्या श्रीराम मंदिरात केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी श्रीरामचं दर्शन घेतलं. या परिसरात झालेल्या वादातून करण्यात आलेल्या जाळपोळीची या नेत्यांनी पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. पालकमंत्री भुमरे यांनी यावेळी बोलताना, परिस्थिती नियंत्रणात असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं.

काही नेते या घटनेला राजकीय वळण देत आहेत. हे चुकीचं असून सर्वांनी शांतता राखण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते म्हणाले,

Byte…

या क्षणी तिथे शांतता आहे. तरी देखिल ही शांतता राहिली पाहिजे असा प्रयत्न सगळ्यांनाच करावा लागेल. म्हणूनच मी म्हटलं की काही नेते जाणीवपूर्वक राजकीय स्टेटमेंट देवून तिथली परिस्थिती बिघडली पाहिजे असा प्रयत्न करताहेत. स्वत:च्या स्वार्थाकरता हा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. तो त्यांनी तात्काळ बंद करावा. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे शांतपणे आपला सगळा कार्यक्रम पार पाडावा कुठेही गडबड गोंधळ होवू नये, कुणीही एकमेकांच्या समोर येवू नये, कुठेही शांततेचा भंग होणार नाही याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं.

****

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधल्या तणावाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये, असं आवाहन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. ते काल पुण्यामध्ये बोलत होते. संपूर्ण राज्यात तणाव निर्माण करण्याचा कट काही लोकांचा आहे, पोलिस प्रशासनानं यासंदर्भात अधिक लक्ष घालून दोन धर्मात कटुता निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन पाटील यांनी केलं.

दरम्यान, शहरात काल शांतता समितीची बैठक पार पडली. नागरीकांनी शांतता आणि सौहार्द राखण्याचं आवाहन सर्वपक्षीय प्रतिनिधींनी यावेळी केलं.

****

राज्य सरकारच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारनं तत्काळ राजीनामा देण्याची मागणी केली आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. भारतीय जनता पक्ष प्रणित शिंदे सरकारच्या नऊ महिन्यांतल्या कारभारानं, राज्याच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. काही संघटनांमुळे धार्मिक वाद वाढत असून, सरकार त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाही. सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारवर नपुंसक असल्याचे ताशेरे ओढले आहेत, सरकार काहीच करत नाही म्हणून धार्मिक वाद विकोपाला जात आहेत, असा संताप न्यायालयानं व्यक्त केल्याचं, पटोले यांनी सांगितलं. सत्ताधारी पक्षातले आमदार- खासदार गुंडगिरी करतात, गृहमंत्र्याच्या घरात कुख्यात माफीयाचा हस्तक राजरोस वावरतो, तरी पोलीस यंत्रणा, गृहमंत्र्यांना त्याची खबर लागत नाही, अशी टीका पटोले यांनी केली. माजी मंत्री, आमदार यांच्यावर हल्ले होतात, त्याची दखल घेतली जात नाही. सत्ताधारी पक्षाचा आमदार गोळीबार करतो, त्याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते, असा आरोपही पटोले यांनी केले.

****

सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला नपुंसक सरकार म्हटलेलं आहे, हा सरकारचा कमीपणा नाही का, असा प्रश्न विधानसभेतले विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हा राज्याचा अपमान नाही का, अशी विचारणाही केली. ते म्हणाले,

Byte…

काल सुप्रीम कोर्टानं या सरकारला नपुंसक सरकार म्हटलेलं आहे. हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? हा सरकारचा कमीपणा नाही का? आम्ही अधिवेशनाच्या निमित्तानं जवळपास चार आठवडे अठरा दिवस, म्हणजे वर्किंग डे अठरा दिवस होते, आम्ही तेच सांगत होतो. की हे सरकार जे काही काम करतंय त्यांना वाईट वाटतं त्यांना राग येतो.

****

सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारविरुद्ध निर्णय दिलेला नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले,

Byte…

सॉलिसिटर जनरल साहेबांनीही इतर राज्यांमध्येही काय काय होतंय आणि कसं महाराष्‍ट्रालाच पिन पॉईंट करण्याचा प्रयत्न होतोय हे लक्षात आणून दिल्यानंतर एक जनरल स्टेटमेंट त्यांनी सगळ्यांबद्दल केलेलं आहे की राज्य सरकारांनी कारवाई केली पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतंय की कुठेही राज्य सरकारच्या विरूद्‌ध निर्णय दिलेला नाही. कुठेही कंटेम्पट सुरू केलेला नाही. जाणीवपूर्वक कुठलंही वाक्य एखादं काढायचं आणि त्या सदंर्भात बोलायचं, मला वाटतं हे जे बोलतायत त्यांना न्यायालयाची कारवाई समजत नाही. न्यायालय काय म्हणतंय हे देखील समजत नाही आणि त्यामुळे हे लोकं असं बोलतायत.

****

केंद्र शासनाच्या पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया - पीएमश्री योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातल्या ५१६ शाळांना मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून शाळांचा विकास केला जाईल, असं त्यांनी सांगितलं. या ५१६ शाळांमध्ये ४२६ प्राथमिक आणि ९० माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे. यात छत्रपती संभाजीनगर मधल्या ११, बीड १३, हिंगोली पाच, लातूर १३, नांदेड १८, परभणी ११, धाराशिव नऊ आणि जालना जिल्ह्यातल्या १२ शाळांचा समावेश आहे. 

****

महामार्गांवर आता उपग्रह आधारित पथकर वसूल करण्याची प्रणाली सुरु करण्यात येणार असल्याचं, केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. या प्रणालीमुळे पथकर वसुली आणि वाहतुकीतले अडथळे दूर होण्यास मदत होईल, असं ते म्हणाले. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा काल त्यांच्या हस्ते पनवेल तालुक्यात खारपाडा इथं शुभारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावर्षी डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल, यामुळे कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

****

राज्यातल्या दहा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ७५० अंगणवाड्या दत्तक देत असल्याची माहिती, महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल मुंबईमध्ये दिली. त्यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात या संदर्भातला सामंजस्य करार झाला. अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत ऑक्टोबर २०२२ पासून विविध सामाजिक संस्थांनी आतापर्यंत ३६६८ अंगणवाड्या दत्तक घेतलेल्या आहेत. त्यामुळं राज्यात एकूण ४४१८ अंगणवाड्यांचा विकास होण्यास सामाजिक संस्थाचं सहकार्य मिळत असल्याचं लोढा यावेळी म्हणाले.

****

राज्यात कालपासून वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्यं विभाग यांच्यामार्फत थायरॉईड जनजागृती आणि उपचार अभियान राबवण्यात येत आहे. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या थायरॉईड बाह्यरुग्ण विभागाचं, काल वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या रोगासंदर्भात जनजागृती करणं आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये थायरॉईड उपचारांसाठी विविध सोयी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दर गुरुवारी दुपारी बारा वाजता, औषध वैद्यकशास्त्र विभागाअंतर्गत विशेष थायरॉईड उपचार सेवा चालवली जाणार आहे. नांदेडमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन बियाणी यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात करण्यात आली.

****

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातल्या मुंगी इथल्या शिवपार्वती साखर कारखान्यावर सक्तवसुली संचालनालय - ईडी आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग -सीबीआयनं काल छापे टाकले. हा कारखाना २०१३ पासून निर्माणाधिन अवस्थेत आहे. पुरेसं तारण नसतानाही पंजाब नॅशनल बँकेनं या कारखान्याला कोट्यवधी रुपयांचं कर्ज दिलं आहे. कारखान्याच्या तत्कालिन अध्यक्षानं भागिदारीसाठी करारनामा केलेल्या बाँडच्या सहाय्यानं हे कर्ज उचलल्याची माहिती आहे.  बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर या कारखान्याने दहा ते पंधरा कोटी रुपये खर्च केले, आणि त्यानंतर काही कालावधीनं हा कारखाना दिवाळखोरीत काढण्यात आला. त्यामुळे बँकांनी कर्जवसुलीसाठी कारखान्याची मालमत्ता लिलावात काढली आहे. यासंबंधीचं प्रकरण न्यायालयात सुरु असताना आता तपास यंत्रणांकडून कारखान्यावर हे छापे मारण्यात आले आहेत.

****

नांदेड जिल्ह्यात मुदखेड - नांदेड रस्त्यावर ट्रक आणि रिक्षाच्या अपघातात काल एका सात महिन्यांच्या बालिकेसह पाच जणांचा मृत्यू झाला असून, आठ जण जखमी झाले. मुदखेड शहरातून निघालेल्या अपघातग्रस्त रिक्षातून दहा मजूर कामासाठी नांदेडला येत होते. मुगट शिवाराजवळ समोरुन आलेल्या ट्रकनं रिक्षाला धडक दिल्यानं हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या भिषण अपघातामुळे मुदखेड - नांदेड मार्गांवरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

****

नांदेड जिल्ह्यातल्या किनवटमध्ये काल आमदार भीमराव केराम यांच्या उपस्थितीत आनंदाचा शिधा वितरणाला प्रारंभ झाला. जिल्ह्यातल्या पात्र शिधा पत्रिकाधारकांसाठी एकूण पाच लाख ९३ हजार शिधा वस्तु संच मंजूर करण्यात आले आहेत.

****

महिला उत्पादक बचत गटांनी वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचा दर्जा राखण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन धाराशीव जिल्हा ग्रामविकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे यांनी केलं आहे. ‘तेजस्विनी महोत्सव २०२३ च्या  समारोप प्रसंगी काल त्या बोलत होत्या. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंच्या विक्रीसाठी बदलत्या समाज माध्यमांचा उपयोग करुन घेण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. या तीन दिवसीय प्रदर्शनात सहभागी झालेल्या महिलांनी आपले अनुभव यावेळी कथन केले.

****

पत्रकार शिवीगाळ, धक्काबुक्की प्रकरणात अभिनेता सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यावर न्यायालयानं काल संपूर्ण प्रकरण रद्द केलं. अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी बजावलेलं समन्सही उच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. २०१९ मध्ये सलमान खान अंधेरी परिसरात सायकल चालवत असताना एक पत्रकार अशोक पांडे यांनी त्याचं चित्रीकरण केलं. हे चित्रीकरण त्यानं ‘यू ट्यूबवर टाकण्यासाठी केलं होतं, ही बाब सलमान आणि त्याच्या सुरक्षा रक्षकाला आवडली नाही. त्यामुळे सलमान आणि त्याच्या सुरक्षा रक्षकानं त्याला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली, अशी तक्रार या पत्रकारानं पोलिसांकडे केली होती.

****

सोळाव्या इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं आज उद्घाटन होणार आहे. वर्ष २०१८ नंतर प्रथमच ही स्पर्धा घरच्या आणि बाहेरच्या मैदानांवर होणार आहे. अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी क्रीडा संकुलामध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज दरम्यान आज संध्याकाळी साडे सात वाजता पहिला सामना होणार आहे.

****


राज्यात काल सर्वत्र श्रीरामनवमी भक्तीभावात साजरी झाली.

छत्रपती संभाजीनगर शहरातल्या किराडपुरा इथल्या राममंदिरात रामजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला.

जालना शहरासह जिल्ह्यात रामनवमी विविध उपक्रमांनी झाली. नवीन जालन्यातल्या श्रीराम मंदिरातून श्रीरामाच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.

शिर्डीत साईबाबा मंदिर संस्थानातर्फे श्री रामनवमी उत्‍सव पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. श्री साईरचित ग्रंथाचं अखंड पारायण समाप्तीनंतर ग्रंथाची सवाद्य मिरवणूक काढली. रामनवमीच्या निमित्तानं साईबाबांच्‍या समाधी दर्शनासाठी ठिकठिकाणांहून पालख्या आल्या होत्या.

बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं गजानन महाराज संस्थान परिसरांत पाच दिवसांपासून सुरु असलेल्या श्रीराम नवमी महोत्सवाची काल सांगता झाली.

नाशिक इथं पंचवटी परिसरातल्या श्री काळाराम मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. धुळे, वाशिम, सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर इथंही रामनवमी भक्तीभावाने उत्साहात साजरी करण्यात आली.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात वार्षिक स्नेहसंमेलन ज्ञानतीर्थ २०२३ या कार्यक्रमाचं आज आणि उद्या आयोजन करण्यात आलं आहे. सिने अभिनेते नरेंद्र देशमुख यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्धाटन होणार आहे.

****