Wednesday, 31 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.07.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 July 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१  जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
फॉस्फेट आणि पोटॅश खत निर्मितीसाठीच्या अनुदानात वाढ करण्याचा केंद्र सरकारनं निर्णय घेतला आहे. खतनिर्मिती कंपन्यांना आवश्यक कच्चा माल मिळावा, तसंच शेतकऱ्यांना खतं उपलब्ध करून देणं, सोपं व्हावं या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सरकारी तिजोरीवर २२ हजार ८७५ कोटी रुपये भार पडणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जम्मू काश्मीर मधल्या आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षणाची तरतूद असलेलं आरक्षण सुधारणा विधेयक, तसंच चिटफंडात गुंतवणूक करणाऱ्या छोट्या गुंतवणूकदारांच्या ठेवींना संरक्षण देण्याचा उद्देशानं तयार करण्यात आलेल्या चिटफंड सुधारणा विधेयकालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली.
****
उत्तर प्रदेशातल्या उन्नाव लैंगिक अत्याचार पीडितेच्या अपघात प्रकरणी, केंद्रीय अन्वेषण विभागानं भाजपचे निलंबित आमदार कुलदीप सिंह सेंगर आणि अन्य नऊ जणांना अटक केली आहे. या सर्वांविरोधात हत्येचं कलम लावण्यात आलं आहे. सेंगर यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करणारी पीडिता आणि तिचे वकील या अपघातात जखमी झाले असून, पीडितेचे दोन नातलग ठार झाले होते. या मुद्यावरून लोकसभेत गेल्या दोन दिवसांपासून गदारोळ सुरू आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेली अमरनाथ यात्रा येत्या चार ऑगस्टपर्यंत थांबवण्यात आली आहे. पुढच्या काही दिवसांत जम्मू काश्मीरमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे, गेल्या दोन दिवसातल्या पावसामुळे यात्रा मार्ग अत्यंत निसरडा झाला आहे. या पार्श्वभूमीवर अप्रिय घटना टाळण्यासाठी, यात्रा चार तारखेपर्यंत थांबवण्याचा निर्णय घेत असल्याचं, अमरनाथ मंदीर व्यवस्थापन मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी आपण एकनिष्ठ असल्याचं, खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी तटकरे यांनी काल भेट घेतली होती, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तीन आमदारांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला, या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी एक ध्वनिचित्रफीत जारी करून, ही माहिती दिली. आपल्या रागयड मतदार संघात रस्ते बांधणीच्या कामांसाठी आपण चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली, असं तटकरे यांनी स्पष्ट केलं. येत्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा राखेतून भरारी घेईल, असा आशावादही तटकरे यांनी व्यक्त केला.
****
शाश्वत विकासाचं लक्ष्य आणि सार्वजनिक आरोग्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी पंतप्रधान जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत आणि आयुष सारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचं, विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष भूषण पटवर्धन यांनी म्हटलं आहे. ते आज औरंगाबाद इथं महात्मा गांधी मिशनच्या आरोग्य विज्ञान संस्थेच्या ११ व्या दीक्षांत समारंभ प्रसंगी बोलत होते. अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रणा, कृत्रिम बुध्दीमत्ता आणि रोबोटीक्स वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती होत असून डॉक्टरांची अनेक कामं या माध्यमातून होतील, असं त्यांनी सांगितलं. 
****
नाशिक जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातली आळंदी, वालदेवी आणि भावली ही तीन मध्यम धरणे शंभर टक्के भरली आहेत. गंगापूर आणि दारणा धरणांचा साठा सुमारे ९० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. गंगापूर धरणातून सध्या पाच हजार तीनशे घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. करंजवन, भावली, वालदेवी, कडवा या धरणातूनही विसर्ग सुरू आहे. नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून सध्या सुमारे ४७ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची विसर्ग करण्यात येत आहे.
****
नांदेड जिल्ह्यात किनवट आणि माहूर तालुक्यातल्या आठ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातल्या अन्य तालुक्यातही चांगला पाऊस झाला. हिंगोली तसंच परभणी जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं आहे.
***
परभणी जिल्ह्यात येत्या आठ आणि सोळा ऑगस्ट रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबवण्यात येत आहे. एक वर्ष ते १९ वर्ष वयोगटातल्या सर्व मुला-मुलींना या दिवशी जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात दोन लाख ९३ हजार ८२६ तर शहरी भागात ९१ हजार पाचशे सत्तर मुलामुलींना या गोळ्या देण्याचे उद्दिष्ट आहे.
****

पश्चिम मध्य रेल्वेच्या जबलपूर रेल्वे स्थानकावरील यार्ड नूतनीकरणाच्या कामामुळे पूर्णा - पाटणा - पूर्णा आणि  कोल्हापूर - धनबाद - कोल्हापूर या साप्ताहिक रेल्वे गाडीच्या येत्या २६ ऑगस्ट पर्यंतच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली.
****

आकाशवाणी औरंगाबाद दि.31.07.2019 सायंकाळी 06.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.07.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –  31 July 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ जुलै २०१९ दुपारी .०० वा.
****

 ओला आणि उबेर सारख्या मोबाईल ॲपद्वारे संचलिक टॅक्सी सेवांच्या नियमनासाठी ठोस पावलं उचलण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं, केंद्र सरकारला दिले आहेत. न्यायमूर्ती एस ए बोबडे, न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी आणि न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या पीठानं, महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात दाखल एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान, सरकारला हे निर्देश दिले. यासाठी आवश्यक असल्यास, कायद्यात सुधारणा करण्याची सूचनाही न्यायालयानं केली. या टॅक्सी सेवेच्या नियमनासंदर्भात काय करता येईल, याबाबत माहिती सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं याचिकाकर्त्याना दिले आहेत.
****

 आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण द्यायच्या केंद्रसरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका घटनात्मक पीठाकडे सोपवण्याविषयी आपण निर्णय घेऊ, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटल आहे. ‘आरक्षण’ हे समानतेच्या सकंल्पनेला अपवाद म्हणून मानलं जाऊ शकतं, मात्र सर्वांना समान संधी मिळावी, हे त्यामागचं उद्दिष्ट असतं, असं न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं सांगितलं. यासंदर्भातल्या घटनादुरुस्ती विधेयक 2019 च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी आजही पुढे सुरु राहणार आहे.
****

 उत्तर प्रदेशातल्या उन्नाव घटनेचे पडसाद लोकसभेत आजही उमटले. या प्रकरणी सरकारनं उत्तर देण्याची मागणी करत, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि द्रमुकसह अनेक पक्षांच्या सदस्यांनी, सभात्याग केला. काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांनी लोकसभेत कामकाज सुरू होताच, हा मुद्दा उपस्थित केला. विरोधी पक्षांकडून गेल्या दोन दिवसांत वारंवार हा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यावरही, गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत काहीही उत्तर दिलं नाही, असं चौधरी म्हणाले. यासंदर्भात सीबीआय चौकशी सुरू असली तरीही, या प्रकरणात बचावलेल्या पीडितेच्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचं, चौधरी यांनी सांगितलं.
****

 शेतात उभारल्या जाणाऱ्या उच्च वीज दाब तारा आणि खांबांमुळे शेतीच्या होणाऱ्या नुकसानाकडे छत्रपती संभाजीराजे यांनी आज राज्यसभेचं लक्ष वेधलं. असे टॉवर आणि तारांमुळे शेतकऱ्यांना त्या भागातून उत्पन्न घेता येत नाही, यासाठी शासनानं पिकांचा अंदाज घेऊन, त्या दराने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली.
****
 आगामी निवडणूक आम्ही शिवसेना आणि मित्र पक्षांसोबतच युती करूनच लढणार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक, चित्रा वाघ, यांच्यासह काँग्रेस कालिदास कोळंबकर यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत एका छोटेखानी समारंभात या सर्वांचं स्वागत केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात काही जागांची अदलाबदली केली जाईल. त्याचा निर्णय पुढच्या ८-१० दिवसांत केला जाईल’, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****

 सातारा तालुक्यात भीषण अपघातात एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू झाला. पुणे बंगळुरू महामार्गावर काशीळ गावानजिक हा अपघात झाला. कर्नाटकातून मुंबईकडे जाणारी भरधाव गाडी, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं, रस्त्यालगतच्या एका झाडावर आदळून हा अपघात झाला. मध्यरात्रीनंतर ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. हे सर्वजण कर्नाटकातल्या मदिहोळ देहरी इथले रहिवासी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
 छत्तीसगढमध्ये आज सकाळी झालेल्या भू-सुरुंगाच्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दल सीआरपीएफचा एक सैनिक हुतात्मा झाला. बस्तर जिल्ह्यात सीआरपीएफच्या तळापासून सहा किलोमीटर अंतरावर नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला. नक्षलविरोधी अभियानांतर्गत गस्तीवरून परतणारा सैनिक यात ठार झाला. या भागात शोधमोहीम सुरू असल्याचं, पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे.
****

 उत्तर कश्मीरमधे बांदिपोरा जिल्ह्यात गुरेझ भागातल्या नियंत्रण रेषेवरुन घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न लष्करानं उधळून लावला आहे. यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. काल रात्री उशिरा नौशेरा नार इथं झालेल्या चकमकीत दोन सशस्त्र दहशतवादी ठार झाले. नंतर आणखी एक दहशतवादी मारला गेला. घुसखोरीविरोधी मोहीम अजून सुरुच असल्याचं संरक्षण दलाच्या सूत्रांनी सांगितलं.
****
 जालना जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत सुमारे सतरा मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरू असून, हा पाऊस खरीप पिकांसाठी पोषक ठरणार आहे.
*****
***

आकाशवाणी औरंगाबाद दि.31.07.2019 दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.07.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३१  जुलै  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 भारतीय जनता पक्षात येणाऱ्या इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला जात नसल्याचं, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले आमदार तसंच पदाधिकारी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत, त्यांच्या स्वागत कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या उपस्थितीत शिवेंद्रराजे भोसले, मधूकर पिचड, वैभव पिचड, चित्रा वाघ यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.
****

 विधान परिषदेच्या औरंगाबाद आणि जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने बाबुराव उर्फ भवानीदास कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली. पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले कुलकर्णी यांचा औरंगाबाद आणि जालना या दोन्ही जिल्ह्यात मोठा जनसंपर्क असल्यानं, त्यांना उमेदवारी दिल्याचं, थोरात यांनी सांगितलं.
****

 कोयना आणि वारणा धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे सांगली जिल्ह्यात कृष्णा, वारणा आणि मोरणा नद्यांचे पाणी अनेक ठिकाणी पात्राबाहेर पडले आहे. अनेक पूल, बंधारे आणि नदीकाठची पिकं पाण्याखाली गेली आहेत. सांगली शहरालगत कृष्णानदीचे पाणी नागरी वसाहतीत घुसले आहे. त्यामुळे पूरग्रस्त कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम लष्करीपातळीवर सुरू आहे. आज सकाळपर्यंत कृष्णेची पाणी पातळी ३५ फुटापर्यंत पोहोचली आहे. कृष्णा आणि वारणा नदीकाठावर असलेल्या लोकांना जिल्हा प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

 दरम्यान आज सकाळी वारणा धरणाचे चारही दरवाजे उघडले जाणार असल्याचं आमच्या वार्ताहराने कळवले आहे.
****
 मराठवाड्यात बहुतांश भागात आज सकाळपासून पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. औरंगाबाद परिसरात आज सकाळपासून भीज पाऊस सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरात सूर्यदर्शनही झालेलं नाही. उस्मानाबाद, लातूर तसंच नांदेड जिल्ह्यात आज सकाळपासून पाऊस सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यात रात्रीपासूनच संततधार पाऊस सुरू असून शेतकऱ्यांना समाधान देणारा हा पाऊस ठरला आहे.
*****
***

आकाशवाणी औरंगाबाद दि.31.07.2019 सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

AIR News Urdu Bulletin, Aurangabad. Date : 31.07.2019, Time : 8.40 - 8...

Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 31 July 2019
Time:  8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:   ۳۱؍جولائی ۲۰۱۹ئ؁
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸

 لوک سبھا میں منظور شدہ طلاقِ ثلا ثہ بل کوکل راجیہ سبھا میں بھی منظورکر لیا گیا۔۔بِل کی حما یت میں 99؍ اور مخالفت میں 84؍ ووٹ ڈالے گئے۔اِس بل میں بیک وقت تین طلاق دیئے جانے کے طریقے کو غیر قا نو نی قرار دیا گیا ہے اور اِسکے مرتکب شخص کو تین سال سزائے قید کی گنجا ئش اِس بل میں رکھی گئی ہے۔اِس موقعے پر حزب اختلاف کے قائد غلام نبی آزاد نے کہا کہ کانگریس پارٹی مسلم خواتین کو مستحکم بنا نے کے حق میں ہے تاہم اِس بل میں کانگریس پارٹی کی جانب سے تجویز کر دہ اصلا حات کو قبول نہ کیئے جانے سے
نا راض ہوکر حزب اختلاف اِس بل کی مخالفت میں ووٹ دے رہے ہیں۔شیو سینا اور ریبلیکن پارٹی سمیت دیگر جماعتوں کے اراکین نے اِس بل کی حما یت میں ووٹ دیے۔جبکہ مُشتر کہ جنتا دل نے بحث میں حصہ نہ لیتے ہوئے ایوان سے واک آئوٹ کیا۔
 اِسی دوران ایوانِ زیریں میں کل گاہکوں کے حقوق کے تحفظ سے متعلق بل بھی منظورکیا گیا۔اِس بل کی میں مرکزی حکو مت کو گراہک تحفظ اتھاریٹی قائم کرنے کا اختیار دیا گیا ہے۔ 

***** ***** ***** 

 محکمہ قبائلی تر قیاتی کی جانب سے درجِ فہرست جماعتوں کی فلاح کے لیے چلائے جا رہے مختلف منصوبوںکے تحت  ریاست میں دھنگر سماج کے لیے مخصوص منصوبے چلا نے کا فیصلہ ریاستی کا بینہ نے کیا ہے۔کل منعقدہ کا بینی اجلاس میں یہ فیصلے کیے گئے۔اِن منصوبوں میں بے زمین خانہ بدوش کنبوں کو گلہ بانی کے لیے جگہ فراہم کر نا  یا   اراضی خریدنے کے لیے سبسیڈی کی بنیاد پر مالی معاونت کرنا‘ با صلاحت طلبہ کو نامور انگریزی میڈیم کے اسکولوں میں داخلہ دینا  اور دیہی علاقوںمیں بے گھر خاندانوں کو  پہلے مرحلے میں10؍ہزار تعمیر مکا نات فراہم کر نا وغیرہ منصو بے شامل ہیں ۔
رواں مالی سے اِن منصبوں پر عمل آ وری شروع کر دی جائے گی اور اِسکے لیے 1000؍ کروڑ روپئے فنڈ فراہم کیا جائے گا۔

***** ***** ***** 

 ریاست کی تمام گرام پنچایتوں میں نائب سرپنچوں کو ماہانہ اعزازیہ دینے کا فیصلہ کیا گیاہے۔اِسکے علا وہ سرپنچوںکے ما ہا نہ اعزازیہ میں بھی اضا فہ کرنے کا فیصلہ ریاستی کا بینہ کے اجلاس میں لیا گیا۔یکم جولائی سے27؍ہزار854؍سرپنچ اور اِتنے ہی نائب سرپنچ اِس سے مستفید ہوں گے۔ یہ اعزازیہ گرام پنچا یت کی آبادی کو مدِ نظر رکھتے ہوئے دیا جائے گا۔ جس میں 2؍ تک آ بادی والے دیہات کے سر پنچ کو ایک ہزار کی بجائے 3؍ ہزار روپئے ‘2001؍ سے 8؍ ہزار آ با دی والے دیہات کے سرپنچ1500؍ روپئے کی بجائے 4؍ہزار روپئے اور8؍ہزار سے زائد آ بادی والے دیہات کے سر پنچ کو 2؍ہزار کی بجائے5؍ہزار روپئے اعزازیہ دینے کا فیصلہ کیاگیاہے۔جبکہ نائب سر پنچ کو بھی آ با دی کے لحاظ سے بالتر تیب ایک ہزار ‘1500؍ اور 2؍ہزار روپئے ما ہا نہ اعزازیہ دیا جائے گا۔

***** ***** ***** 

 کانگریس اور راشٹر وادی کانگریس پارٹی کے چار اراکین اسمبلی نے کل اسمبلی اسپیکر ہری بھائو باگڑے کو اپنے استعفے پیش کر دئیے۔
اِن میں ستارہ کے رُکن اسمبلی شیویندر راجے بھونسلے‘آکولہ کے رکنِ اسمبلی وئے بھوَ پیچڑ‘تھانہ ضلعے میں یرولی کے رکن ِ اسمبلی سندیپ نائک اور ممبئی میں وڈا لا کے رکن اسمبلی کالی داس کولمبکرشامل ہیں۔ 

***** ***** ***** 

 کانگریس پارٹی نے قانون ساز کونسل انتخابات کے لیے  اورنگ آباد -جالنہ مقامی خود مختار اِداروں کے انتخا بی حلقے سے بابو رائو عرف بھوانی داس کلکر نی کو امید واری دی ہے۔پارٹی کے ریاستی صدر بالاصاحب تھوارت نے یہ اطلاع دی ہے ۔ اُنھوں نے کہا کہ بزرگ رہنما بھوانی داس کلکر کر نی کی اورنگ آباد اور جالنہ ضلعے میں مقبولیت کو مدِ نظر رکھتے ہوئے اُنھیں پارٹی امید وار نامزد کیا گیا ہے۔

***** ***** ***** 

 امبہ جو گائی کے کسانوں کو سال2018-19؁ کے لیے سو یا بین فصل بیمہ اسکیم کی رقم فوراً  ادا کر نے  ‘ دیہی علاقوں میں پینے کا پا نی فراہم کرنا اور جانوروں کے لیے چارہ چھائوں نیاںشروع کر نا وغیرہ مطالبات کی یکسوئی کے لیے کل امبہ جوگائی میں مورچہ نکال کر ضلع کلکٹر کو ایک مطالباتی محضر پیش کیا گیا۔

***** ***** ***** 

 مراٹھوارہ کے تمام اضلاع میں گزشتہ دو روز سے رم جھم بارش کا سلسلہ جا ری ہے۔ناندیڑ ضلعے کے کِنوٹ اور ماہور تعلقے میں موسلا دھار بارش ہونے کی خبر ہے۔ہنگولی ضلعے سے بھی اچھی بار ش ہونے کی اطلاع ملی  ہے۔پر بھنی ضلعے میں گزشتہ دو روز سے جاری ہلکی بارش وجہ سے فصلوں کو نئی زندگی ملی ہے ۔اورنگ آبادمیں کل شام سے رم جھم بارش کا سلسلہ جا ری ہے۔

***** ***** ***** 

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.07.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 July 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ जुलै २०१ सकाळी ७.१० मि.
****

Ø  तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकाला संसदेची मंजुरी; तलाक देणाऱ्या पतीला तीन वर्ष कारावासाच्या शिक्षेची तरतूद
Ø  धनगर समाजाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय
Ø  राज्यातल्या उपसरपंचांनाही आता दरमहा मानधन तर सरपंचांच्या मानधनात दुपटीहून अधिक वाढ
Ø  पश्चिम वाहिनी नद्यातून गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्यासाठीच्या नदीजोड योजनेला राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून सरकारची तत्त्वत: मान्यता
Ø  काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता
आणि
Ø  मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये भिज पाऊस
****

 मुस्लिम महिला विवाह संरक्षण अर्थात तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाली आहे. लोकसभेपाठोपाठ काल राज्यसभेतही ते संमत झालं. विधेयकाच्या बाजूने नव्व्याण्णव तर विधेयकाच्या विरोधात चौऱ्याऐंशी मतं पडली. मुस्लिम पुरुषानं, पत्नीला तिहेरी तलाक दिल्यास, तीन वर्ष कारावासाची तरतूद या विधेयकात आहे, या तरतुदीला काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम, वायएसआर काँग्रेस, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीसह विरोधी पक्षांनी विरोध दर्शवत, हे विधेयक संसदीय समितीकडे छाननीसाठी पाठवण्याची मागणी केली होती. संयुक्त जनता दलानं मात्र या विधेयकावरच्या चर्चेत भाग न घेता, सभात्याग केला.

 दरम्यान, लोकसभेनं काल ग्राहक हितसंरक्षण विधेयक २०१९ला मंजूरी दिली. केंद्रीय ग्राहक संरक्षण आयोग नेमण्याचा अधिकार केंद्र सरकारला देण्याची तरतूद या विधेयकात आहे.
****

 अनुसूचित जमातीसाठी आदिवासी विकास विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या योजनांच्या धर्तीवर राज्यातल्या धनगर समाजाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबवण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या योजनांमध्ये भटक्या जमाती ‘क’ या प्रवर्गातल्या भूमीहीन मेंढपाळ कुटुंबांसाठी मेंढीपालनासाठी जागा उपलब्ध करुन देणे किंवा जागा खरेदीसाठी अनुदान तत्वावर अर्थसहाय्य देणे, वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्यांना स्वयंम योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना कार्यान्वित करणे, गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश देणे, ग्रामीण भागातल्या बेघर कुटुंबांना पहिल्या टप्यात १० हजार घरकुलं बांधून देणे, आवश्यक परंतु अर्थसंकल्पित निधी उपलब्ध योजना राबविण्यासाठी न्युक्लिअस बजेट योजना राबण्यासह १३ विविध योजनांचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षापासून या योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार असून यासाठी एक हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
****

 राज्यातल्या सर्व ग्रामपंचायतींच्या उपसरपंचांना दरमहा मानधन देण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर सरपंचांचं सध्याचं मानधन वाढवण्यासही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. २७ हजार ८५४ सरपंचांना आणि तितक्याच उपसरपंचांना या योजनेचा १ जुलैपासून लाभ मिळणार आहेत. ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या निकषानुसार हे मानधन देण्यात येणार असून दोन हजारापर्यंत लोकसंख्या असणाऱ्या गावाच्या सरपंचाचं मानधन एक हजारांऐवजी तीन हजार, २००१ ते ८ हजार लोकसंख्येसाठी पंधराशे रूपयांच्या ऐवजी चार हजार आणि आठ हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सरपंचाच्या मानधनात दोन हजार ऐवजी पाच हजार रूपये अशी वाढ करण्यात आली आहे. उपसरपंचांचं मानधन अशाच पद्धतीनं लोकसंख्येच्या निकषानुसार अनुक्रमे एक हजार, पंधराशे आणि दोन हजार रूपये दरमहा देण्यात येणार आहे.
****

 पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात मराठवाड्यासाठी पाणी वळवण्याकरता, नदीजोड योजनेला राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राबवण्यासही मंत्रीमंडळानं काल तत्त्वत: मान्यता दिली. आंतरराज्यीय दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प आणि राज्यांतर्गत नार-पार-गिरणा, पार गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी आणि दमणगंगा-एकदरे-गोदावरी या नदीजोड प्रकल्पांचा यात समावेश आहे. या नदीजोड प्रकल्पांमुळे गोदावरी खोऱ्यातल्या मराठवाडा भागात २६ अब्ज घनफूट, तापी खोऱ्यासाठी १० अब्ज घनफूट आणि मुंबई शहरासाठी ३० अब्ज घनफूट पाणी कोकणातून उपलब्ध होईल.  कोकणातल्या नार-पार, दमणगंगा, उल्हास आणि वैतरणा या खोऱ्यांलगत असलेल्या मराठवाड्यातल्या गोदावरी नदी खोऱ्यात हे पाणी वळवण्यात येणार आहे. या नदीजोड प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र मुख्य अभियंता कार्यालय स्थापन करून हे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.

 याशिवाय बहुजन, दुलर्क्षित आणि वंचित घटकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण - महाज्योती संस्थेची स्थापना करण्यास, मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता देण्यास, ग्रामीण भागातल्या रस्त्यांच्या परिरक्षा धोरण आणि सुपर थर्टी या हिंदी चित्रपटास वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत करमुक्त करण्यालाही राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत केलं जात आहे.
****

 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार आमदारांनी काल विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपले सदस्यत्वाचे राजीनामे सादर केले. यामध्ये साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोलेचे आमदार वैभव पिचड, ठाणे जिल्ह्यातल्या ऐरोलीचे आमदार संदीप नाईक आणि मुंबईतल्या वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर यांचा समावेश आहे. हे सर्व आमदार आज मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
****

 पिक विमा योजनेत नुकसान भरपाई ही मागील पाच वर्षांतल्या सर्वाधिक उत्पादनावर आधारलेली असावी अशी मागणी शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे, असं खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं. या योजनेतल्या त्रुटींसंदर्भात काल शिवसेना खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेतली. त्यानंतर वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत राज्यातल्या शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला मिळत नसल्याच्या तक्रारी असल्याचं त्यांनी पंतप्रधानांना सांगितलं.
****

 विधान परिषदेच्या औरंगाबाद आणि जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने बाबुराव उर्फ भवानीदास कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली. पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले कुलकर्णी यांचा औरंगाबाद आणि जालना या दोन्ही जिल्ह्यात मोठा जनसंपर्क असल्यानं, त्यांना उमेदवारी दिल्याचं, थोरात यांनी सांगितलं.
****

 मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून भिज पाऊस पडत आहे. नांदेड जिल्ह्यात किनवट आणि माहूर तालुक्यातल्या आठ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातल्या अन्य तालुक्यातही चांगला पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात संततधार सुरू असून शेतकऱ्यांना समाधान देणारा हा पाऊस ठरला आहे. परभणी जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं आहे.

 कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ७८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गडहिंग्लज, गगनबावडा, पन्हाळा, तसंच कागल तालुक्यातली वाहतुक यामुळे मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली. बुलडाणा जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे, जिल्ह्यात सर्वत्र नद्या नाले ओढे दुथडी भरून वाहत आहेत. रायगड जिल्ह्यातही सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत असल्यानं सर्वच नद्यांना पूर आले आहेत. अंबा नदीचं पाणी पुन्हा नागोठण्यात घुसलं आहे. आज आणि उद्या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं नागरिकांना सावध राहण्याचा प्रशासनानं इशारा दिला आहे.

 गडचिरोली जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातल्या पर्लकोटा नदीला पूर आला आहे. या पुरामुळे भामरागड इथल्या सुमारे ३०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे.
****

 उस्मानाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी जलसंधारणमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यापूर्वी अर्जुन खोतकर या जिल्ह्याचे पालकमंत्री होते.
****

 अंबाजोगाई तालुक्यातल्या शेतकऱ्यांना २०१८ -१९ या वर्षीचा सोयाबीन पीक विमा योजनेचे पैसे तात्काळ देण्यात यावेत, ग्रामीण भागात पिण्याचं पाणी उपलब्ध करून गुरांच्या छावण्या सुरू कराव्यात, यासह इतर मागण्यांसाठी अंबाजोगाई इथं काल मोर्चा काढला. माजी आमदार पृथ्वीराज साठे आणि बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि आरोग्य सभापती राजेदेशमुख यांच्या नेतृत्वात भर पावसात निघालेल्या या मोर्चेकऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले.
****

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या खुल्या प्रवर्गातल्या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम  अर्थात एमबीबीएसच्या जागा वाढवण्यात याव्यात अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. विविध घटकांच्या आरक्षणांमुळे वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या खुल्या प्रवर्गासाठीच्या जागांमध्ये यावर्षी मोठी घट झाली असून या अभ्यासक्रमासाठीच्या पात्रता गुण छाटणीमध्येही प्रचंड वाढ झाली आहे, त्यामुळे पात्र विद्यार्थी शासकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशापासून वंचित राहत असल्याचं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे.
*****
***

आकाशवाणी औरंगाबाद दि.31.07.2019 सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Tuesday, 30 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.07.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 July 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३०  जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
मुस्लिम महिला विवाह संरक्षण अर्थात तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक आज राज्यसभेत सादर झालं. मुस्लिम पुरुषानं, पत्नीला तिहेरी तलाक दिल्यास, तीन वर्ष कारावासाची तरतूद या विधेयकात आहे, या तरतुदीला विरोधी पक्षांचा विरोध आहे. हे विधेयक संसदीय समितीकडे छाननीसाठी पाठवण्याची मागणी काँग्रेस, द्रमुक, वायएसआर काँग्रेस, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीसह बहुतांश विरोधी सदस्यांनी केली. शिवसेना, रिपब्लीकन पक्षासह अनेक पक्षांच्या सदस्यांनी या विधेयकाच्या बाजुने मतं मांडली. केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद, सध्या या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देत आहेत.
****
पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात मराठवाड्यासाठी पाणी वळवण्याकरता, नदीजोड योजनेला राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राबवण्यास राज्य मंत्रिमंडळानं तत्त्वत: मान्यता दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा प्रकल्प राबवण्यासाठी सर्वेक्षण करण्यासही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली.
आदिवासी विभागातर्फे अनुसूचित जमातीसाठी राबवण्यात येत असलेल्या योजना, विशेष कार्यक्रमांतर्गत धनगर समाजाला लागू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं आज घेतला. बहुजन, दुलर्क्षित आणि वंचित घटकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण - महाज्योती संस्थेची स्थापना करण्यासही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त सरपंचांच्या मानधनात वाढ, मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता, ग्रामीण भागातल्या रस्त्यांच्या परिरक्षा धोरणाला मान्यता, सुपर 30 या हिंदी चित्रपटास वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत करमुक्त करण्यासह इतर अनेक निर्णयांना राज्यमंत्रिमंडळानं आज मान्यता दिली.
****
गुन्हे सिद्धीचं प्रमाण वाढते आहे, पण किरकोळ गुन्ह्यातला मुद्देमाल परत करण्याची कार्यपद्धती निर्माण करणं आवश्यक असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत राज्य पोलीस मुख्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी उत्कृष्ट अशीच राहीली असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. पोलिसांची प्रतिमा देशभरात अधिक उंचावण्यासाठी, पोलीस विभागाच्या पाठीशी सरकार पूर्ण ताकदीने उभं असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले.
****
काँग्रेसच्या एका तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदारांनी आज आपल्या आमदारीचे राजीनामे विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सादर केले. या चौघांमध्ये साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोलेचे आमदार वैभव पिचड, ठाणे जिल्ह्यातल्या ऐरोलीचे आमदार संदीप नाईक आणि मुंबइतल्या वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर यांचा समावेश आहे.
****
विधानरिषदेच्या औरंगाबाद, जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने बाबुराव उर्फ भवानीदास कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली. पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले कुलकर्णी यांचा औरंगाबाद आणि जालना या दोन्ही जिल्ह्यात मोठा जनसंपर्क असल्यानं, त्यांना उमेदवारी दिल्याचं, थोरात यांनी सांगितलं.
****
मराठवाड्यात काल बहुतांश भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर तसंच नांदेड जिल्ह्यात आज सकाळपासून पाऊस सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यात रात्रीपासूनच संततधार पाऊस सुरू असून शेतकऱ्यांना समाधान देणारा हा पाऊस ठरला आहे. नांदेड जिल्ह्याच्या अनेक भागात सकाळी दोन तास चांगला पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परभणी जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून हलका पाऊस सुरु आहे. यामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी काही भागात कापूस तसंच सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव जाणवत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, लातूर जिल्हयात पावसाची स्थिती चिंताजनक असून, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी २०१५-१६ मध्ये राबवण्यात आलेल्या टंचाईच्या उपाय योजनांची माहिती ठेवावी आणि त्याबाबतचा कृती आराखडा प्रत्येक शासकीय यंत्रणांनी तयार ठेवावा, असं जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितलं आहे.
****

आकाशवाणी औरंगाबाद दि.30.07.2019 सायंकाळी 06.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.07.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –  30 July 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जुलै २०१९ दुपारी .०० वा.
****

 मुस्लिम महिला विवाह संरक्षण विधेयक आज राज्यसभेत सादर करण्यात आलं. विधी आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी हे विधेयक सदनासमोर मांडलं. या विधेयकाकडे राजकारणाच्या चष्म्यातून न पाहता, माणुसकीच्या दृष्टिकोनातून पाहावं, असं आवाहन रविशंकर प्रसाद यांनी केलं. काँग्रेसच्या डॉ ॲमी याज्ञिक यांनी, या विधेयकावरच्या चर्चेत भाग घेताना, सर्वोच्च न्यायालयानं तिहेरी तलाक बेकायदा असल्याचा निर्णय दिलेला असताना, हे विधेयक आणणं कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचं सांगितलं.

 केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी, हे विधेयक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधिक बळकटी देईल, असा विश्वास व्यक्त केला. तिहेरी तलाक देण्याचा विचारही विवाहित मुस्लिम पुरुषाच्या मनात येऊ नये, यासाठी या विधेयकात कारावासाची तरतूद ठेवली असल्याचं नक्वी यांनी सांगितलं.
****

 उत्तरप्रदेशातल्या उन्नाव लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या पीडितेच्या रस्ता अपघाताचे पडसाद आज लोकसभेत उमटले. काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सदनाचं कामकाज सुरू होताच, हा मुद्दा उपस्थित करत, घोषणाबाजी सुरू केली. भाजपाचे जगदंबिका पाल तसंच साध्वी निरंजन ज्योती यांनी, हा विरोधकांचा सरकारला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप केला. संबंधित अपघातातला ट्रक समाजवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा असून. ट्रकचालकही समाजवादी पक्षाचा पदाधिकारी असल्याचं, या दोघा नेत्यांनी सदनात सांगितलं. त्यानंतही गदारोळ सुरू होता. अध्यक्षांनी या गदारोळातच ग्राहक संरक्षण विधेयक २०१९ चर्चेला घेतलं. या चर्चेदरम्यानही विरोधकांचा गदारोळ सुरू होता. यावर राज्य सरकारशी निगडित मुद्दे संसदेत उपस्थित करायचे नाहीत, असा निर्णय सर्व सदस्यांनी मिळून घेतलेला आहे, याचं अध्यक्षांनी स्मरण करून दिलं.
****

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यव्यापी महाजनादेश रथयात्रेला परवा, अमरावती जिल्ह्यात गुरुकुंज मोझरी इथून प्रारंभ होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या रथयात्रेला सुरुवात होईल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या रथयात्रेचा महिनाभरानंतर नाशिक इथं समारोप होईल.
****

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज सायंकाळी कोलकाता इथं पोहोचणार आहेत. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन, ते निवडणूक सुधारणा, मतपत्रिकांवर मतदान तसंच देशातल्या राजकारणाच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्याची शक्यता असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.
****

 ठाणे जिल्ह्यात आज सकाळी भूस्खलन होऊन पितापुत्राचा मृत्यू झाला. कळवा उपनगरात एका टेकडीचा भाग चाळीच्या भिंतीवर कोसळून हा अपघात झाला. या प्रकरणात एक महिला गंभीर जखमी झाली असून, या चाळीतून ७० जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

         दरम्यान, सव्वीस आणि सत्तावीस जुलै रोजी झालेल्या पावसामुळे ज्या लोकांच्या घराचं नुकसान झालं, अशा लोकांना राज्य सरकार पुरेशी नुकसान भरपाई देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. कल्याण जवळ मुरबाड इथं आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. पुरामुळे घरांना झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून, गरज भासल्यास नवीन नियमांनुसार भरपाईबाबत निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पावसामुळे दुरावस्था झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी या व्यतिरिक्त निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
****

 मराठवाड्यात काल बहुतांश भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. औरंगाबाद, परभणी, हिंगोली, आणि उस्मानाबाद जिल्ह्यात काही भागात काल हलका पाऊस झाला. औरंगाबाद, लातूर तसंच नांदेड जिल्ह्यात आज सकाळपासून पाऊस सुरू आहे. नांदेड जिल्ह्याच्या अनेक भागात सकाळी दोन तास चांगला पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ७८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गडहिंग्लज, गगनबावडा, पन्हाळा, तसंच कागल तालुक्यातली वाहतुक यामुळे मोठ्याप्रमाणावर विस्कळीत झाली. नृसिंहवाडी इथं कृष्णा नदी काठावर असलेल्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा साजरा झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

         भारतीय क्रिकेट संघ‘वेस्ट इंडीज दौऱ्याच्या प्रतीक्षेत असल्याचं भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानी म्हटलं आहे. काल संध्याकाळी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्यापूर्वी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
*****
***

आकाशवाणी औरंगाबाद दि.30.07.2019 दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.07.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३०  जुलै  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 मुस्लिम महिला विवाह संरक्षण अर्थात तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक आज राज्यसभेत मांडलं जाणार आहे. हे विधेयक गेल्या आठवड्यात लोकसभेत तिसऱ्यांदा मंजूर झालं. मात्र राज्यसभेत सरकारकडे बहुमत नसल्यामुळे गेल्या तीनही वेळा हे विधेयक राज्यसभेत संमत होऊ शकलं नाही. मुस्लिम पुरुषाने पत्नीला तिहेरी तलाक दिल्यास, कारावासाची तरतूद या विधेयकात आहे, या तरतुदीला विरोधकांचा विरोध आहे.
****

         राज्यात कुपोषण निमूर्लन तसचं माता बाल संगोपनासंदर्भात राज्य सरकार राबवत असलेल्या विविध कार्यक्रमांबाबत केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. काल मुंबई इथं इराणी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना याबाबत माहिती दिली.
****

 खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याच्या मुदतीत दोन दिवसांनी वाढ करण्यात आली असून, आता उद्या ३१ जुलैपर्यंत पीक विमा भरता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्याचा काल अखेरचा दिवस होता, पण तांत्रिक अडचणी विचारात घेता ही मुदत वाढ देण्यात आली आहे.
****

         नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्यानं गंगापूर धरण ८० टक्के भरलं आहे. धरणातून साडे सहा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्यामुळे जायकवाडी धरणातल्या पाणी पातळीत तीन टक्क्यानं वाढ झाली आहे, मात्र धरणाचा पाणीसाठा अजूनही जोत्याखालीच आहे.

 बुलडाणा जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावल्यानं येळगाव धरण १०० टक्के भरलं आहे. पैनगंगा नदीलाही पूर आला आहे, या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं आहे. जिल्ह्यातल्या लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा मेहकर, चिखली आणि मोताळा या तालुक्यामध्ये चांगला पाऊस झाला आहे.
****

 मराठवाड्यात काल बहुतांश भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. औरंगाबाद, परभणी, हिंगोली, आणि उस्मानाबाद जिल्ह्यात काही भागात काल हलका पाऊस झाला.
*****
***

आकाशवाणी औरंगाबाद दि.30.07.2019 सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

AIR News Urdu Bulletin, Date : 30.07.2019. Time : 8.40 - 8.45 AM

Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 30 July 2019
Time:  8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۳۰ ؍جولائی ۲۰۱۹ئ؁
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸

 کر نا ٹک میں بھارتیہ جنتا پارٹی کے وزیر اعلیٰ بی ایس یدی یو رپّا نے اعتماد کا ووٹ جیت لیا ہے۔ پی ٹی آئی کی خبر میں کہا گیا ہے کہ کر نا ٹک اسمبلی اسپیکر کی جانب سے 17؍ باغی اراکینِ اسمبلی کو نا اہل قرار دئے جانے کے بعد ایون میں اراکین کی تعداد225؍ سے گھٹ کر208؍ ہو گئی ۔ جسکے بعد اکثر یت کے لیے در کا راراکین کی تعداد بھی 113؍ ہو گئی تھی۔
 اِس بیچ اعتماد کا ووٹ حاصل کرنے کی کار وائی کے بعد اسمبلی اسپیکر کے آر  رمیش کمار نے اپنے عہدے سے استعفیٰ دے دیا۔

***** ***** ***** 

 سپریم کورٹ نے مراٹھا ریزر ویشن کو چیلنج کرنے والی عرضیوں کی تیز رفتار سماعت کرنے کو منظور ی دیدی ہے۔ واضح ہو کہ مہا راشٹر حکو مت نے مراٹھا سماج سے تعلق رکھنے والوں کو سماجی اور تعلیمی اعتبار سے پسماندہ قرار دیتے ہوئے تعلیم اور ملازمت میں ریزر ویشن فراہم کرنے کا فیصلہ کیا ہے۔ جس سے ریاست میں ریزر ویشن کا تنا سب سپریم کورٹ کی طئے کر دہ 50؍ فیصد کی حد سے تجا وز کر گیا ہے ۔ اِسکے خلاف 5؍ عرضیاں سپریم کورٹ میں داخل کی گئی ہیں جن میں مراٹھا ریزر ویشن کو قا نو نی حیثیت کو چیلنج کیا گیا ہے۔

***** ***** ***** 

 اقلیتی امور کے مرکزی وزیر مختار عباس نقو ی نے کہا ہے کہ بھارتیہ جنتا پارٹی کی مرکزی حکو مت نے اپنی دوسری معیاد میں پہلے 100؍ دنوں میں 100؍ فیصد وقف جائیدادوں کے دستا ویزات کو ڈیجیٹل طریقے سے محفوظ کرنے کا ہدف مقرر کیا ہے۔ کل نئی دِلّی میں ریاستوں اور مرکزی زیر انتظام علاقوں کے وقف بورڈس کی قو می کانفرنس میں نقوی نے یہ بات کہی۔ اُنھوں نے کہا کہ حکو مت مختلف تعلیمی اور تر قیاتی کا موں کے لیے وقف بورڈ س کو 100؍ فیصد فنڈز فراہم کر رہی ہے۔
نقوی نے مزید کہا کہ وقف بورڈس میں بنیادی اور معاشی اصلا حات کے پیش نظر یہ قدم اُٹھا یا جا رہا ہے۔ نقوی کا کہنا تھا کہ اِس طرح کے اقدا مات سے وقف جائیدادوں کو مسلمانوں کی بہبود کے لیے استعمال کیا جا سکے گا‘ ساتھ ہی اِن جائیدادوں پر ہو رہے قبضے جات کو بھی روکا جا سکے گا۔

***** ***** ***** 

 ناندیڑ ضلع نیشنلِسٹ کانگریس پارٹی کے صدر سا بق رکن اسمبلی باپو صاحب گور ٹھیکر نے پارٹی چھوڑ نے کا فیصلہ کیا ہے۔ کل ناندیڑ میں ضلع پریشد کے سبھا پتی دتا تریہ ریڈّی کی رہائش گاہ پر ہوئے اجلاس کے بعد گورٹھیکر نے این سی پی چھوڑ نے کا اعلان کیا۔ اُنھوں نے کہا کہ ابھی اِس بات کا فیصلہ نہیں ہوا ہے۔ کہ وہ کس پارٹی میں شامل ہو ںگے۔ گورٹھیکر نے کہا کہ وہ جلد ہی اِس بارے میں کوئی اعلان کریں گے۔

***** ***** ***** 

 دوسری جانب نئی ممبئی میں نیشنلِسٹ کانگریس پارٹی کے 52؍ کار پوریٹرس اور پانچ آزاد کار پوریٹرس بھارتیہ جنتا پارٹی میںشامل ہو گے۔ بی جے پی میں شامل ہو نے والوں میں تھا نے ضلع کے سابق رابطہ وزیر گنیش نائک کا بھی نام ہے۔

***** ***** ***** 

 ناسک ضلعے میں جاری بارش سے جائیکواڑی ڈیم کے آ بی ذخیرے میں 3؍ فیصد کا اضا فہ ہو ا ہے۔ ناسک ضلعے میں لگا تار بارش کی وجہ سے گنگا پور ڈیم80؍ فیصد بھر چکا ہے جس سے ساڑھے چھ ہزار گھن فٹ فی سیکنڈ کے حساب سے گودا وری ندی میں پانی چھوڑا جا رہا ہے۔ اِس اخراج سے جائیکواڑی کی سطح آب میں اضا فہ ضرور ہوا ہے۔ لیکن یہ اب بھی قابلِ استعمال سطح تک نہیں پہنچا ہے۔

***** ***** *****

 دوسری جانب بلڈھا نہ ضلع میں جا ری موسلا دھار بارش کی وجہ سے ییل گائوں ڈیم100؍فیصد لبریز ہو چکا ہے۔ پیَن گنگا ندی میں بھی طغیا نی آئی ہوئی ہے جس سے زرعی زمینیں زیر آب آ گئی ہیں۔
 بلڈھا نہ ضلعے میں ہو رہی بارش سے فصلوں کو نئی زندگی ملی ہے۔ ضلعے کو لونار‘ سندھ کھیڑ راجہ‘ دیول گائوں راجہ مہکر‘ چکھلی اور مو تالہ تعلقوں میں کا فی بارش ہوئی ہے۔

***** ***** *****

 اِس بیچ مراٹھواڑہ کے بیشتر حصوں میں ہلکی بارش ہو رہی ہے۔ اورنگ آ باد‘ پر بھنی ‘ ہنگولی اور عثما ن آ باد میں رُک رُک کر رِم جھِم بارش جا ری ہے۔

***** ***** ***** 

 بیڑ ضلعے کے لو گوں کو بنیادی سہو لیات فراہم کرنے کے لیے کوشش کی جائے گی۔ مہاراشٹر کے روز گار ضما نتی اسکیم کے وزیر جئے دت شِر ساگر نے یہ بات کہی۔ وہ کل بیڑ نگر پریشد کی جانب سے پانچ کر وڑ روپئے کے اخرا جات سے تعمیر کردہ کانکریٹ راستے کے افتتاح کے موقعے پر بول رہے تھے۔ شِر سا گر نے کہا کہ بیڑ شہر کی ہمہ جہت تر قی کے لیے شہر کا تر قیاتی خاکہ تیار کر لیا گیا ہے اور مختلف تر قیا تی کاموں کے لیے حکو مت سے مالی مدد حاصل کرنے کی کوششیںکی جائیں گی۔

***** ***** ***** 

 بھارتی اسٹیٹ بینک نے ڈِپازِٹ پر دیئے جانے والے سود کی شرح میں کٹو ٹی کر دی ہے۔ 7؍سے45؍ دنوں کی مدت تک کے ڈِپازِٹ پر دیئے جانے والے سود کی شرح میں0.75؍ فیصد کی کٹو تی کی گئی ہے۔ اِس طرح کے ڈِپازِٹ پر اب5؍ فیصد کی شرح کے مطا بق سود ادا کیا جائے گا۔بینک نے 46؍سے179؍ دنوں کے ڈِپازِٹ پر بھی شرح ِ سود میں کمی کی ہے۔ نئی شرحوں کا اطلاق ایک اگست سے ہو گا۔

***** ***** ***** 

आकाशवाणी औरंगाबाद दि.30.07.2019 सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Monday, 29 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.07.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 July 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९  जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
केंद्र सरकारनं आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या, पहिल्या शंभर दिवसांत शंभर टक्के वक्फ मालमत्तांच्या डिजिटायझेशनचं लक्ष्य ठेवलं असल्याचं, अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्ली इथं राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांतल्या वक्फ मंडळाच्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. सरकार विविध शैक्षणिक आणि विकासात्मक कार्यक्रमांसाठी वक्फ मंडळांना शंभर टक्के निधी पुरवत असल्याची माहिती नक्वी यांनी दिली.
वक्फ मंडळांच्या पायाभूत तसंच आर्थिक सुधाराच्या उद्देशानं हे पाऊल उचललं असून, त्यामुळे वक्फ मालमत्ता, मुस्लिम समुदायाच्या कल्याणासाठी वापरता येईल आणि अशा मालमत्तांवर होणारं अतिक्रमण रोखता येईल असंही नक्वी यांनी सांगितलं.
****
खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत दोन दिवसांनी वाढवण्यात आली असून, आता परवा ३१ जुलै पर्यंत पीक विमा भरता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. या योजनेत सहभागी होण्यासाठी आलेल्या तांत्रिक अडचणी विचारात घेता ही मुदत वाढ दिल्याचं या बाबातच्या शासन निर्णयात नमूद केलं आहे.
****
राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धारणी तालुक्यातला एक पूल आज सकाळी वाहुन गेला, त्यामुळे परिसरातल्या दहा गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. गडचिरोली जिल्ह्यात अनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे काही रस्त्यांवरची वाहतुक ठप्प झाली आहे.
खानदेशात जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणाचे सर्व ३६ दरवाजे पूर्ण उघडून धरणातून सत्त्याहतर हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, पाटबंधारे विभागानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्यानं गंगापूर धरण ८० टक्के भरलं आहे. आज दुपारपासून धरणातून एक हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे.
मराठवाड्यात आज बहुतांश भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. औरंगाबाद, परभणी, हिंगोली जिल्ह्यात काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. जालना, उस्मानाबाद जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे, परंतु पाऊस नसल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यात तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पीक विमा तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या अडचणींसंदर्भात तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज करावेत, या अर्जांबाबत समिती सुनावणी घेऊन, योग्य निराकरण केलं जाईल, असं प्रभारी जिल्हाधिकारी प्रविण धरमकर यांनी सांगितलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड शुगर ॲण्ड एनर्जी लिमिटेड कंपनीकडे देयकं थकलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून साखरेची मागणी केली जात आहे. यासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात विकल्प अर्ज येत्या दोन ऑगस्टपर्यंत तहसील कार्यालयात जमा करावेत, असं आवाहन गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी कमलाकर फड यांनी केलं आहे. विकल्प अर्जांचा नमुना तहसीलदार तसंच गटविकास अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
****
कॉंग्रेस पक्षाच्या वतीनं उद्या मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. पक्षाकडे उमेदवारी अर्ज भरून दिलेल्या इच्छुकांनी उद्या सकाळी गांधीभवन इथं उपस्थित राहण्याचं आवाहन शहर अध्यक्ष माजी आमदार नामदेव पवार यांनी केलं आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात राबवल्या जात असलेल्या नक्षलविरोधी अभियानात एक महिला नक्षलवादी मारली गेली. आज सकाळी ही चकमक झाली. मारल्या गेलेल्या या नक्षलवादी महिलेजवळून एक बंदूक आणि अन्य साहित्य जप्त केलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं अटक केली आहे. या टोळीच्या ताब्यातून काजूचे एक हजार एकशे नऊ डबे आणि मोठ्या प्रमाणावर रोकड, असा सुमारे दोन कोटी वीस लाख रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
****