Saturday, 31 May 2025

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.05.2025 रोजीचे रात्री 08.05 वाजेचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – आकाशवाणी मुंबई केंद्राचा दिनांक 31.05.2025 रोजीचा सायंकाळी 07.15 वाजेचा वृत्तविशेष कार्यक्रम

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – आकाशवाणी मुंबईचे 31.05.2025 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 31 May 2025

Time 18.10 to 18.20 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ मे २०२ दुपारी १.० वा.

****

·      महिला केंद्रित विकास हा आपल्या सरकारच्या प्रत्येक योजनेचा गाभा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी

·      अहिल्यादेवींप्रमाणेच युती सरकार देखील वंचितांसाठी काम करत असल्याची मुख्यमंत्र्यांची चौंडी इथल्या कार्यक्रमात माहिती

आणि

·      विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत परभणी जिल्ह्यात विविध कार्यक्रम; शेतीतील समस्यांचं निराकरण होण्यासाठी मदत होत असल्याची शेतकऱ्यांची माहिती

****

महिला केंद्रित विकास हा आपल्या सरकारच्या प्रत्येक योजनेचा गाभा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्य प्रदेशातल्या भोपाळ इथं आज ‘देवी अहिल्यादेवी होळकर महिला सशक्तीकरण महासंमेलनात’ ते बोलत होते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे विचार प्रेरणादायी असून, त्यांच्या विचारांचं अनुकरण करण्याची आज गरज असल्याचं पंतप्रधान म्हणाले. अहिल्यादेवींचं नाव ऐकताच मनात श्रद्धाभाव निर्माण होतो आणि कोणत्याही कठीण परिस्थितीत राज्य, कसं पुढे न्यायचं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे, असंही त्यांनी नमूद केलं. गरीब आणि वंचितांच्या उत्थानासाठी त्यांचं मोठं योगदान असून, भारतीय वारश्याच्या त्या खूप मोठ्या संरक्षक होत्या, असं सांगून पंतप्रधानांनी अहिल्याबाईंच्या कार्याला उजाळा दिला.

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

यासोबतच पंतप्रधानांनी नमो ड्रोन दीदी, ऑपरेशन सिंदूरमधलं महिलांचं योगदान, आणि अंतराळ-विज्ञानातली महिलांची वाटचाल आदींचा उल्लेख करत आजच्या स्त्री शक्तिचाही गौरव केला.

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

अहिल्याबाईंच्या स्मरणार्थ आज एका टपाल तिकिटाचं आणि विशेष नाण्याचंही मोदी यांच्या हस्ते प्रकाशन झालं. तसंच अनेक प्रकल्पांचं आणि योजनांचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती आज सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी होत आहे.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं.

****

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी या अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी त्यांची जयंती साजरी होत आहे. जयंतीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे उपस्थित आहेत. यावेळी विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.

देव, देश आणि धर्माची जबाबदारी पार पाडणाऱ्या अहिल्यादेवी या ऊर्जा केंद्र असून, प्रेरणा देणारंही केंद्र असल्याचं, मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. अहिल्यादेवींची महती देशातल्या सर्व भाषिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट निर्माण केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अहिल्यादेवींप्रमाणेच युती सरकार देखील वंचितांसाठी काम करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

सुराज्य म्हणजे काय हे अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रशासनातून दिसून येतं, त्या महाराष्ट्राच्या अभिमान होत्या, असं उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म सोहळ्याच्या निमित्ताने चौंडी इथं विविध कार्यक्रम पार पडले. आज पहाटे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यानिमित्ताने जन्मभूमी ते कर्मभूमी म्हणजेच चौंडी ते इंदौर या बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला.

****

छत्रपती संभाजीनगर इथं विविध ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. कोकणवाडी चौक इथल्या अहील्यादेवींच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आलं.

छत्रपती संभाजीनगरमधल्या अहिल्यादेवींनी जीर्णोद्धार केलेल्या सातारा खंडोबा मंदिरात रोषणाई करण्यात आली आहे. आज सकाळी सातारा धनगर समाज जयंती उत्सव समितीच्या वतीनं सातारा खंडोबा मंदिर परिसरात अहील्यादेवींना अभिवादन करण्यात आलं.

****

परभणी इथं निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं अहिल्यादेवींचं भव्य स्मारक बनवण्यात येणार असल्याचं, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं. यामध्ये अहिल्यादेवींचा पुतळा लोकसहभागातून उभारण्यात येणार असून, आमदार पाटील यांनी एक लाख रुपये देऊन निधी संकलनाचा शुभारंभ केला. सुशासन, न्याय आणि अध्यात्म यांचं प्रतीक असलेल्या अहिल्याबाई होळकरांच्या विचारांचा वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचवण्याचं हे एक सशक्त पाऊल ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

धुळे जिल्ह्यात देखील आज सकाळी धनगर समाज युवा संघटनांनी मोटरसायकल रॅली काढली. तसंच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं रक्तदान शिबीर आणि अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचबरोबर जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

****

परभणी जिल्ह्यातल्या पेडगाव इथं आज विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.इंद्र मणि यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. मृदा आरोग्य चांगलं रहावं, यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा असं आवाहन कुलगुरुंनी यावेळी केलं. ड्रोन तंत्रज्ञानाविषयी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली.

या कार्यक्रमात शेतीतील समस्यांचं निराकरण होण्यासाठी मदत होईल असं युवा शेतकरी मंगेश देशमुख आणि प्रियंका कांबळे यांनी सांगितलं. ते म्हणाले

बाईट - शेतकरी प्रियंका कांबळे आणि मंगेश देशमुख

****

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीच्या ५३ व्या बैठकीचा आज समारोप झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते.

या बैठकीत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे आठ वाण, तीन कृषि यंत्रे अवजारे, ६१ पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता देण्यात आली. विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी ही माहिती दिली. या वाणांमुळे आणि तंत्रज्ञान शिफारशींमुळे पिकांची उत्पादकता वाढण्यास मदत होईल, तसंच शेतकऱ्यांचे श्रम कमी होतील, असं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी यावेळी सांगितलं.

****

जागतिक तंबाखू विरोधी दिन आज पाळण्यात येत आहे. याअंतर्गत तंबाखूच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या गंभीर आजारांविषयी जनजागृती करण्यात येते. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालय आणि मेडिकव्हर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं आज सकाळी बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी तंबाखूजन्य पदार्थ टाळा, व्यसनमुक्त व्हा, आरोग्य सांभाळा अशी जनजागृती करण्यात आली.

सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे तसंच सेवन करणाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगर जिल्हा अंमलबजावणी पथकानं कारवाईचा बडगा उचलला आहे. २०२४-२५ या वर्षी ५१७ लोकांवर तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल १ लाख १ हजार ३० रुपये दंड वसूल करून शासनाच्या खात्यात जमा करण्यात आले.

****

 

 

रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या ‘भारत जिंदाबाद’ तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. शहागंज मधल्या महात्मा गांधी पुतळ्यापासून सुरू होणाऱ्या या रॅलीचा समारोप भडकलगेट इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर होईल.

****

गेल्या आठवड्याभरात राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस झाला. आता उघडीप मिळाल्यानंतर शेतात वापसा येण्यास मदत होईल, त्यासाठी किमान पाच सहा दिवस लागतील. वापसा परत आल्यानंतर पेरणीला सुरुवात करता येईल, असं कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी म्हटलं आहे.

****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2025 रोजीचे दुपारी 03.00 वाजेचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र

آکاشوانی خبریں‘ تاریخ: 31.05.2025 ‘ وقت: دوپہر 01:50

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.05.2025 रोजीचे दुपारी 01.30 वाजेचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 31 May 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

जनतेची सेवा करुन त्यांच्या जीवनात सुधारणा करणं म्हणजे शासन असल्याचा विचार लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी प्रत्यक्ष कृतीत आणला. त्यांच्या नितीमुल्यानुसार, सरकार चालवत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आज मध्य प्रदेश इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. परिस्थिती कितीही विरोधात असली तरीही संघर्ष केल्यास यश येतं हे अहिल्याबाईंनी शिकवलं. गरीब आणि वंचितांच्या उत्थानासाठी त्यांचं मोठं योगदान असून भारतीय वारश्याच्या त्या खूप मोठ्या संरक्षक होत्या, असंही पंतप्रधान म्हणाले. यावेळी देवी अहिल्याबाई यांच्या स्मरणार्थ काढण्यात आलेल्या टपाल तिकिटाचं आणि विशेष नाण्याचं प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं.

****

अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी इथं आज त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक विशेष कार्यक्रम होत आहे. यानिमित्त चौंडी इथं विविध विकास कामांचं उद्घघाटन करण्यात येईल. 

****

जम्मू-काश्मीरमध्ये आज संध्याकाळी पाच वाजता व्यापक नागरिक सुरक्षा मॉक ड्रील आयोजित करण्यात येणार आहे. आपत्कालीन इशाऱ्यांचं अनुकरण करत जम्मू काश्मिरमध्ये अनेक ठिकाणी यावेळी सायरन सक्रीय केले जातील. मॉक ड्रीलमध्ये नियंत्रित हवाई हल्ल्यांदरम्यान सायरन सक्रीय करणं, नागरी परिसरात ब्लॅकआऊट प्रोटॉकॉल आणि ड्रोन हल्ल्यांच्या स्थितीत सैनिकी छावणी जवळून कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत उपाय योजना करणं आदींचा यात समावेश आहे. 

****

आज संध्याकाळी हैदराबाद इथं मिस वर्ल्ड स्पर्धेच्या अंतीम फेरीचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे. या भव्य समारोहात चित्रतारकांचं कला प्रदर्शन, मानुषी छिल्लरच्या वतीनं विशेष सादरीकरण तसंच अभिनेता सोनू सूद याला देण्यात येणारा मिस वर्ल्ड ह्यूमैनिटेरियन पुरस्कार हे आकर्षण असणार आहे. अमेरिका, कैरिबियाई, आफ्रीका, यूरोप, आशिया तसंच ओशिनिया या खंडांमधल्या अनेक देशांच्या सौंदर्यवती या स्पर्धेत सहभागी होत आहेत. स्पर्धेत भारताच्या नंदिनी गुप्तासह १६ सौंदर्यवतींनी शीर्ष ४० अर्थात टॉप ४० मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. निर्णायक मंडळ अन्य २४ सौंदर्यवतींची निवड करतील. प्रत्येक खंडातून दोन जणींची निवड होईल आणि अंतिम फेरीत केवळ चार सौंदर्यवतींना अंतिम प्रश्न विचारले जातील. 

****

राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या पोर्टलवरुन दिल्या जाणाऱ्या सर्व १ हजार २७ अधिसूचित ऑनलाईन सेवा येत्या १५ ऑगस्टपासून एकाच पोर्टलवरुन देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती महा आयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी हिंगोली इथं आयोजित बैठकीत दिली.

हिंगोली जिल्ह्यात ४७३ सेवा केंद्र असून या सेवा केंद्रांवर सेवांचे दर प्रदर्शित करणं, क्युआर कोडवर तक्रार दाखल करता येणं आदी सुधारणा करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. या सेवांची माहिती लोकांना मिळावी म्हणून व्हॉटस्अपवरुन चॅटबॉट सुविधा नजीकच्या काळात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले.

****

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण- म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे ५३ अनिवासी भूखंडांची विक्री करण्यात येत आहे. ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेला येत्या दोन जून रोजी सकाळी अकरा वाजेपासून प्रारंभ होईल. सात जुलैला सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाईन बोली स्वरूपातील ई-लिलाव  www.eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर होणार आहे. त्यानंतर आठ जुलैला सकाळी अकरा वाजता mhada.gov.in आणि  www.eauction.mhada.gov.in या म्हाडाच्या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 

****

गोंदिया इथं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्षानिमित्त दहावी आणि बारावीत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि समाज कार्यात बहुमूल्य योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातल्या आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय पुराण आणि त्यांची पत्नी जिल्हा परिषद सदस्या सविता पुराण यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

****

लातूरमध्ये परवा दोन जून रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी किंवा तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांनी आपल्या वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी किंवा अर्ज विहीत नमुन्यात, दोन प्रतींमध्ये संबंधित तहसील कार्यालयात सादर करावेत, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

****

 

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.05.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 31 May 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ मे २०२ सकाळी.०० वाजता.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. देवी अहिल्याबाई यांच्या स्मरणार्थ काढण्यात आलेल्या टपाल तिकिटाचं आणि विशेष नाण्याचंही ते प्रकाशन करणार आहेत. तर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी या अहिल्यादेवी यांच्या जन्मगावी आज राज्यशासनाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम होणार आहे.

****

सार्वजनिक खासगी भागीदारी धोरणाद्वारे शासकीय तंत्रनिकेतन संस्था आयटीआयच्या अद्ययावतीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली असून राज्यातील सर्व आयटीआय दत्तक देण्यात येणार आहेत. त्यासाठी औद्योगिक, सार्वजनिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलं आहे. राज्यातल्या आयटीआय खासगी भागीदारीतून दत्तक देण्याच्या योजनेचा शुभारंभ काल नाशिकमध्ये करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. सातपूरचे आयटीआय लघुउद्योग भारतीला दत्तक देण्यात आल्याचं कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी यावेळी जाहीर केलं. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशऩ- मित्रा धोरणात्मक भागीदार म्हणून काम करणार आहे. नाशिक इथं लोढा यांनी काल  ‘औद्योगिक बैठक घेऊन औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींशी संवादही साधला.

****

राज्यभरात येत्या दोन जून ते ३१ जुलै दरम्यान स्टॉप डायरीया अभियान राबवण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काल यासंदर्भातल्या बैठकीत, हे अभियान गावागावात राबवण्याचे निर्देश दिले. या अभियानामध्ये गाव आणि शहरी अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळेतल्या पाच वर्षांपर्यंतच्या बालकांचं सर्वेक्षण करुन, अतिसारग्रस्त बालकांना ओआरएस आणि औषधी देण्यात येणार आहे.

****

धुळे जिल्ह्यातल्या आरोग्य विभागात विविध पदांवर कंत्राटी पद्धतीनं नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत ९० उमेदवारांची एक कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातल्या ‘शिवांजली सोल्युशन’ या कार्यालयाच्या संचालिका कविता प्रशांत भदाणे आणि अलीबाग इथले वैभव विजय पोळ या संशयितांविरुद्ध काल फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

****

पावसाळ्यात डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, कावीळ, गॅस्ट्रो, अतिसार यांसारख्या कीटकजन्य आणि जलजन्य आजारांच्या पार्श्वभुमीवर नागरिकांनी सजग राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन नांदेड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केलं आहे. जिल्हा हिवताप कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. 

****

उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेनं पूर्णा -जालना- पूर्णा साप्ताहिक विशेष रेल्वे चालवण्याचं नियोजन केलं आहे. ही रेल्वे पूर्णतः अनारक्षित असेल. परवा एक जूनपासून दर रविवारी ही गाडी पूर्णेहून संध्याकाळी पाच वाजता सुटेल आणि रात्री आठ वाजून ५० मिनिटांनी जालन्याला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी पाच जूनपासून दर गुरुवारी सकाळी नऊ वाजता जालन्याहून सुटेल आणि दुपारी साडे बारा वाजता पुर्णा इथं पोहोचेल.

****

क्रिकेट - आईपीएल स्पर्धेत काल मुंबई इंडियन्स संघानं गुजरात टायटन्सचा २० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत मुंबई इंडियन्सनं गुजरात टायटन्सला २२८ धावांचं आव्हान दिलं, प्रत्युत्तरादाखल गुजरात टायटन्सचा संघ सहा गडी गमावत २०८ धावाच करु शकला. या विजयामुळे मुंबई इंडियन्सनं क्वालीफायर -२ मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे; तर गुजरात टायटन्सचा संघ स्पर्धेतून बाहेर गेला आहे.

****

 

गेल्या आठवड्याभरात राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस झाला. मे महिन्यात अशा स्वरूपाचा पाऊस यापूर्वी झालेला नाही. आता उघडीप मिळाल्यानंतर शेतात वापसा येण्यास मदत होईल. त्यासाठी किमान पाच सहा दिवस लागतील. वापसा आल्यानंतर पेरणीला सुरुवात करता येईल, असं कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी म्हटलं आहे. कोकणातील शेतकऱ्यांना आता भात रोपे टाकण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. अतिवृष्टी झालेल्या मराठवाडा, विदर्भ  आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी वापसा आल्यानंतर बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. पावसाचं प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जमिनीतील ओलाव्याचा अंदाज घेऊन पेरणी करण्याचा सल्ला आवटे यांनी दिला आहे.

****

दरम्यान, गेल्या चोवीस तासात कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात पावसाने सध्या काहीशी विश्रांती घेतली आहे. आज दिवसभरातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

 

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.05.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 31 مئی 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

 Regional Urdu Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar

Date: 31 May-2025

Time: 09:00-09:10 am

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر

علاقائی خبریں

تاریخ:  ۳۱؍ مئی  ۲۰۲۵ء؁

وقت: ۱۰:۹-۰۰:۹

***** ***** *****

::::: سرخیاں::::::

پیش ہے خاص خبروں کی سرخیاں:

٭ دفاعی شعبہ نہ صرف معیشت بلکہ ملک کی عزت نفس کیلئے بھی ضروری ہے - وزیراعظم نریندر مودی کا بیان۔

٭ پنیہ شلوک اہلیا دیوی ہولکر کے 300ویں یوم پیدائش کے موقع پر آج مختلف تقاریب کا انعقاد۔

٭ پونے کےنیشنل ڈیفنس اکیڈمی کے تقسیمِ اسناد تقریب میں 17 خواتین کیڈیٹس کے پہلے دستےکی پاسنگ آؤٹ پریڈ میں شرکت۔

٭ عثمان آباد ریلوے اسٹیشن کا نام تبدیل کرکے دھاراشیو ریلوے اسٹیشن کرنے کا ریلوے محکمے کا فیصلہ۔

٭ ترقی یافتہ زرعی سنکلپ ابھیان کے تحت پربھنی ضلعے میں ماہرین کی جانب سے کسانوں کی رہنمائی۔

اور۔۔۔٭ ایشین ایتھلیٹکس چیمپئن شپ مقابلوں میں بھارتی ایتھلیٹس نے کل جیتے تین گولڈ میڈل ۔

 ***** ***** *****

اب خبریں تفصیل سے:

وزیر اعظم نریندر مودی نے کہا ہے کہ دفاعی شعبہ نہ صرف معیشت بلکہ ملک کی عزتِ نفس کیلئے بھی ضروری ہے۔ وہ کل اتر پردیش کے کانپور میں ایک جلسۂ عام سے خطاب کررہے تھے۔ وزیر اعظم نے کہا کہ بھارت دہشت گردی کے خلاف لڑائی میں تین اصولوں پر عمل کرے گا۔ انھوں نے کہا:

Byte: PM Narendra Modi

وزیراعظم نے مزید کہا کہ آپریشن سندور ابھی ختم نہیں ہوا، اور اس آپریشن کے ذریعے دنیا نے ہمارے ملک کی خواتین کے غصے اور درد کودیکھاہے، وزیرِ اعظم نے بتایا کہ اس آپریشن میں بھارت نے دیسی اسلحہ جات اور میک ان انڈیا کی طاقت کا مظاہرہ دنیا کے سامنے کیا۔

اس موقعے پر وزیر اعظم نے 47ہزار 573 کروڑ روپے سے زیادہ کے 15 بڑے ترقیاتی منصوبوں کا افتتاح اور سنگ بنیاد رکھا۔ انہوں نے چُنیّ گنج اور نیا گنج کے درمیان کانپور میٹرو کے نئے کوریڈور کو ہری جھنڈی دکھائی۔ 

اس سے پہلے وزیر اعظم نے بہار کے کاراکٹ میں 48  ہزار 500 کروڑ روپے کے بنیادی ڈھانچے اور فلاحی منصوبوں کا افتتاح اور سنگ بنیاد بھی رکھا۔

***** ***** *****

آج‘ پنیہ شلوک اہلیا بائی ہولکر کا یوم پیدائش منایا جا رہا ہے۔ اس سال اہلیا دیوی کے تین سو ویں یومِ پیدائش کی مناسبت سے مختلف پروگرام منعقد کیے جارہے ہیں۔ اس سلسلے کی ایک اہم تقریب آج ریاستی حکومت کی جانب سے وزیر اعلیٰ دیویندر پھڑنویس کی موجودگی میں اہلیا نگر ضلعے کے چونڈی میں اہلیا بائی کے آبائی گائوں میں منعقد کی جائے گی۔

دریں اثنا، اہلیا بائی ہولکر کے تین سو سالہ یومِ پیدائش کے موقعے پر پونے میں نوجوانوں سے منسوب ایک پروگرام میں، وزیر اعلیٰ پھڑنویس نے ریاستی حکومت کے کام کاج‘ اہلیا بائی ہولکر کے طرزِحکمرانی کے مطابق چلانے کی بات کہی۔ انہوں نے بتایا کہ ریاستی حکومت نے خواتین کی ترقی اور بہتری کیلئے متعدد اسکیمیں شروع کی ہیں، جو خواتین کو بااختیار اور مستحکم بنانے کیلئے اہم ثابت ہوں گی۔

***** ***** *****

صدرِ جمہو ریہ دروپدی مُرمو کے ہا تھوں کل راشٹرپتی بھون میں منعقدہ ایک تقریب میں 15 نرسوں کو نیشنل فلورنس نائٹِنگیل ایوارڈ 2025 سے نوازا گیا۔ نرسنگ کے شعبے میں نمایاں خدمات کے عوض یہ ایوارڈ دیا جاتا ہے۔ اس موقعے پر جلگاؤں کی نرس سجاتا باگُل کو بھی اس اعزاز سے نوازا گیا۔ سماج کی نچلی سطح تک سرکاری طبّی اسکیموں کے فوائد پہنچانے میں ان کے تعاون کے عوض انہیں اس ایوارڈ سے نوازا گیا۔

***** ***** *****

پونے کے نیشنل ڈیفنس اکیڈمی (این ڈی اے) کی 148 ویں تقسیمِ اسناد تقریب کل جوش و خروش کے ساتھ منعقد ہوئی۔ اس تاریخی دن پر پہلی بار 17 خواتین کیڈٹس نے تین سال کی سخت تربیت کے بعد پاسنگ آؤٹ پریڈ میں حصہ لیا۔ پریڈ میں شرکت کے بعد خواتین کیڈٹس نے پش اَپس کرکے اپنی کامیابی کا جشن منایا۔ 2021 میں عدالت ِ عظمیٰ کے حکم پر خواتین کو این ڈی اے میں شامل کیے جانے کے بعد خو اتین کیڈیٹس کا یہ پہلا دستہ ہے۔ میزورم کے گورنر اور سابق فوجی سربراہ جنرل وی کے سنگھ، جنوبی ہیڈ کوارٹر کے سربراہ لیفٹیننٹ جنرل دھیرج سیٹھ اور این ڈی اے کے سربر اہ وائس ایڈمرل گروچرن سنگھ سمیت دیگر معززشخصیات اس تقریب میں شریک تھیں۔

***** ***** *****

یہ خبریں آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر سے نشر کی جارہی ہیں۔

***** ***** *****

ریاستی وزیرِ زراعت مانک ر ائو کوکاٹے نے کہا ہے کہ محکمہ زراعت کے تمام فیصلوں کو کسانوں کیلئے مفید و مددگار بنانے کیلئے ریاستی حکومت کسانوں کے مشوروں اور تجاویز کو سن کر اس پر عمل درآمد کو ترجیح دے رہی ہے۔ وہ کل چھترپتی سمبھاجی نگر میں محکمہ زراعت کے زیر اہتمام کاشتکاروں کیلئے منعقدہ مذاکرے سے خطاب کر رہے تھے۔ انہوں نے کسانوں سے متعلق حکومت کے مختلف منصوبوں کے بارے میں جانکاری بھی دی‘ ساتھ ہی کاشتکاروں کے گروپوں کی جانب سے پیش کردہ تجاویز کو سن کر انھیں نوٹ کیا۔

***** ***** *****

ریلوے محکمے نے عثمان آباد ریلوے اسٹیشن کا نام تبدیل کر کےدھاراشیو ریلوے اسٹیشن کر دیا ہے۔ ریاستی حکومت کی جانب سے عثمان آباد کا قدیم نام تبدیل کرکے دھاراشیو کیے جانے کے بعد ریلوے محکمے نے ریلوے اسٹیشن کا نام تبدیل کر کے دھاراشیو کیا ہے۔ جس کے بعد انڈین ریلوے کانفرنس ایسوسی ایشن نے اسٹیشن کے نئے نام اور کوڈ کو منظوری بھی دے دی ہے۔ ماضی میں عثمان آباد نام سے منسوب اس اسٹیشن کا کوڈ UMD تھا، جسے اب نئے نام دھاراشیو اسٹیشن کی مناسبت سے DRSV  کوڈ میں تبدیل کیا گیا ہے۔ لہٰذا ریلوے کے تمام اندراجات ا ور مطالبات سمیت دیگر تمام اُمور اس نئے نام سے ہی کیے جائیں گے۔ اس تبدیلی کو مکمل کرنے کیلئے، ممبئی پیسنجر ریزرویشن سسٹم، نامی ریزرویشن نظام آج رات پونے بارہ سے رات ڈیڑھ بجے تک عارضی طور پر بند رکھا جائےگا، مسافروں اور عوام سے اسےنوٹ کرنے کی اپیل وسطی ریلوے انتظامیہ نے ایک صحافتی بیان کے ذریعے کی ہے۔

***** ***** *****

ریاستی محکمہ زراعت کے پرنسپل سکریٹری وکاس چندر رستوگی کے ہاتھوں کل پربھنی ضلعے کے مانوت تعلقے کے تاڑ بورگاؤں میں ترقی یافتہ زرعی تصور مہم کا ضلعی سطح پر افتتاح عمل میں آیا۔ اس اسکیم کے تصاویری رتھ کو سبز جھنڈی دکھا کر روانہ کیا گیا۔ اس موقع پر زرعی سائنسدانوں نے بیج کی نئی تیار کردہ اقسام کے ساتھ ساتھ دادا لاڑ کپاس کی کاشت کی تکنیک سے متعلق جا نکاری دی۔

***** ***** *****

آپریشن سندور کے اعزاز میں کل بیڑ شہر میں ریپبلکن پارٹی آٹھولے گروپ کی جانب سے ترنگا ریلی نکالی گئی۔ ڈاکٹر بابا صاحب امبیڈکر کے مجسّمے سے نکالی گئی اس ترنگا ریلی میں آر پی آئی کے کارکنان نے کثیر تعداد میں شرکت کی۔ قومی ترانے پر ریلی کا اختتام عمل میں آیا۔

***** ***** *****

ایشین ایتھلیٹکس چمپئن شپ مقابلوں میں بھارتی ایتھلیٹس نے کل تین طلائی تمغے اپنے نام کیے۔ مردوں کی پانچ ہزار میٹر دوڑ میں گل ویر نےطلائی تمغہ جیتا، جبکہ خواتین کی اونچی چھلانگ کے مقابلے میںپوجا نے طلائی تمغہ حاصل کیا، اسی طرح نندنی آگاسرا‘ نے خواتین کے ہیپٹاتھلون میں طلائی تمغہ اپنے نام کیا۔ پارُول چودھری نے خواتین کی تین ہزار میٹر اسٹیپل چیس میں نقرئی تمغہ جیتا۔ ان مقابلوں میں بھارت فی الحال کل 18 تمغوں کے ساتھ میڈل ٹیبل میں دوسرے مقام پر ہے جس میں آٹھ طلائی، سات نقرئی اور تین کانسے کے تمغے شامل ہیں۔ 

***** ***** *****

تلجاپور کے رکن اسمبلی اور مترا کے نائب صدر راناجگجیت سنگھ پاٹل نے دھاراشیو ضلعے کی مجموعی اور پائیدار ترقی کیلئے،افسران و عہدیداران کو باقاعدہ کام تک ہی محدود نہ رہتے ہوئے مثبت نقطہ نظر سے اختراعی تصورات کے ساتھ کام کرنے کی ترغیب دی ہے۔ کل اس سلسلے میں منعقدہ ایک اجلاس سے وہ خطاب کر رہے تھے۔ اس موقع پر انہوں نے ضلع میں جاری مختلف ترقیاتی کاموں کے بارے میں معلومات دی۔ ضلعے کے مختلف محکموں کے افسران اس اجلاس میں شر یک تھے۔

***** ***** *****

عالمی انسداد ِتمباکو نوشی دن آج منایا جا رہا ہے۔ اس مناسبت سے تمباکو کے استعمال سے ہونے والی خطرناک بیماریوں سے متعلق عوام میں بیداری پیدا کی جا رہی ہے۔ چھترپتی سمبھاجی نگر ضلع تمباکو کنٹرول کمیٹی کی جانب سے آج شہر میں ایک بائیک ریلی کا انعقاد کیا جا رہا ہے۔ تمباکو نوشی کے مضر اثرات پر کل لاتور ضلع کلکٹر دفتر میں ایک عوامی بیداری ورکشاپ کا انعقاد کیا گیا۔ 

***** ***** *****

بیڑ ضلعے میں گزشتہ آٹھ دنوں سے جاری بارش کے سبب ضلعے کے چھوٹےاور درمیانی آبی منصوبوں میں پانی کا ذخیرہ بڑھ رہا ہے۔ بیڑ شہر کے قریب بندوسرا آبی پشتہ پوری طرح بھر گیا ہے اور اسکی درمیانی باندھ سے پانی بہنے کے امکان کے پیشِ نظر ضلع کلکٹر ویویک جانسن نے بندوسرا ندی کے کناروں پر آبادساکنان سے محتاط رہنے کی اپیل کی ہے۔ 

***** ***** *****

::::: سرخیاں::::::

آخرمیں اس بلیٹن کی خاص خبریں ایک بار پھر:

٭ دفاعی شعبہ نہ صرف معیشت بلکہ ملک کی عزت نفس کیلئے بھی ضروری ہے - وزیراعظم نریندر مودی کا بیان۔

٭ پنیہ شلوک اہلیا دیوی ہولکر کے 300ویں یوم پیدائش کے موقع پر آج مختلف تقاریب کا انعقاد۔

٭ پونے کےنیشنل ڈیفنس اکیڈمی کے تقسیمِ اسناد تقریب میں 17 خواتین کیڈیٹس کے پہلے دستےکی پاسنگ آؤٹ پریڈ میں شرکت۔

٭ عثمان آباد ریلوے اسٹیشن کا نام تبدیل کرکے دھاراشیو ریلوے اسٹیشن کرنے کا ریلوے محکمے کا فیصلہ۔

٭ ترقی یافتہ زرعی سنکلپ ابھیان کے تحت پربھنی ضلعے میں ماہرین کی جانب سے کسانوں کی رہنمائی۔

اور۔۔۔٭ ایشین ایتھلیٹکس چیمپئن شپ مقابلوں میں بھارتی ایتھلیٹس نے کل جیتے تین گولڈ میڈل ۔

***** ***** *****

Audio - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 31 مئی 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

آکاشوانی خبریں‘ تاریخ: 31.05.2025 ‘ وقت: صبح 08:30

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2025 रोजीचे सकाळी 08.30 वाजेचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 31.05.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 31 May 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      केवळ अर्थव्यवस्थेसाठी नव्हे, तर देशाच्या स्वाभिमानासाठी देखील संरक्षण क्षेत्र गरजेचं - पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम

·      पुण्यातल्या एनडीएच्या दीक्षांत समारंभात १७ महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीची पासिंग आउट परेड

·      रेल्वे विभागाकडून उस्मानाबादचं धाराशिव रेल्वे स्थानक असं नामांतर

·      विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत परभणी जिल्ह्यात शेतकर्यांना मार्गदर्शन

आणि

·      आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडुंची काल तीन सुवर्ण पदकांची कमाई 

****

केवळ अर्थव्यवस्थेसाठी नव्हे, तर देशाच्या स्वाभिमानासाठी देखील संरक्षण क्षेत्र गरजेचं आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. उत्तर प्रदेशात कानपूर इथं जाहिर सभेला ते काल संबोधित करत होते. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत तीन नियम पाळणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले,

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नाही, या माध्यमातून संपूर्ण जगाने, आपल्या देशातल्या महिलांचा राग आणि वेदना पाहिल्या, या कारवाईत भारताने स्वदेशी शस्त्रास्त्रे आणि मेक इन इंडियाची शक्ती जगासमोर प्रदर्शित केली, असं पंतप्रधान म्हणाले.

यावेळी ४७ हजार ५७३ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या १५ मेगा विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली. त्यांनी चुन्नीगंज आणि नयागंज दरम्यान कानपूर मेट्रोच्या नवीन कॉरिडॉरला हिरवा झेंडा दाखवला.

तत्पूर्वी बिहारमधल्या काराकट इथंही ४८ हजार ५०० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आज साजरी होत आहे. हे वर्ष अहिल्यादेवी यांचं त्रिशताब्दी वर्ष असल्यानं, विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी या अहिल्यादेवींच्या जन्मगावी आज राज्यशासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम होणार आहे.

दरम्यान, अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी जयंतीवर्षानिमित्त पुण्यात आयोजित युवा प्रेरणा संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी, अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्यकारभाराच्या तत्त्वानुसार शासन चालवणार असल्याचं सांगितलं. महिलांच्या विकासासाठी आणि उत्थानासाठी राज्य सरकारने अनेक योजनांची मुहूर्तमेढ रोवली असून, त्या महिलांच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभात १५ परिचारिकांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आले. नर्सिंग क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. जळगावच्या सुजाता बागुल यांचा यावेळी गौरव करण्यात आला. शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

****

पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी - एनडीए चा १४८ वा दीक्षांत समारंभ काल उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक दिवशी पहिल्यांदाच १७ महिला कॅडेट्सनी तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर पासिंग आउट परेडमध्ये भाग घेतला. या संचलनात सहभागी झाल्यानंतर महिला छात्रांनी पुशअप्स मारून आपल्या यशाचा जल्लोष केला. २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महिलांना एनडीएमध्ये प्रवेश देण्यात आला होता, त्याची ही पहिली फलश्रुती आहे. या कार्यक्रमाला मिझोरामचे राज्यपाल आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग, दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ आणि एनडीएचे प्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल गुरुचरण सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

****

कृषी विभागाचे सर्व निर्णय शेतकऱ्यांना मदत करणारे आणि हिताचे ठरावे, यादृष्टीने शेतकऱ्यांच्या सुचना ऐकून त्यास शासन प्राधान्य देत असल्याचं, राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं काल कृषी विभागाच्या वतीने आयोजित प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकऱ्यांच्या परिसंवादात ते बोलत होते. शेतकऱ्यांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या गटामार्फत मांडलेल्या सुचना ऐकून कोकाटे यांनी त्याची नोंद घेतली.

****

रेल्वे विभागाने उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचं नामांतर धाराशिव रेल्वे स्थानक असं केलं आहे. महाराष्ट्र शासनाने पूर्वीच्या उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव केल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं हे नामांतर केलं आहे. स्थानकाचं नवीन नाव आणि कोडला भारतीय रेल्वे कॉन्फरन्स असोशिएशनकडून मान्यता देण्यात आली आहे. पूर्वी उस्मानाबाद नाव असलेल्या या स्टेशनचा कोड यू एम डी असा होता, तो बदलून आता धाराशिव या नवीन नावाच्या स्टेशनचा कोड, डी आर एस व्ही असा झाला आहे. सर्व रेल्वे नोंदी, निवेदन आदी या नवीन नावाने होतील. हा बदल करण्यासाठी मुंबई पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टिम ही आरक्षण प्रणाली, आज रात्री पावणे बारा ते दीड वाजेपर्यंत तात्पुरती बंद करण्यात येणार असून, यात्रेकरू आणि जनतेने याची नोंद घ्यावी असं मध्य रेल्वेनं पत्रकाद्वारे कळवलं आहे. 

****

परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातल्या ताडबोरगाव इथं विकसित कृषी संकल्प अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ काल राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनेच्या चित्ररथाला यावेळी हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं.

यावेळी कृषी क्षेत्रातल्या शास्त्रज्ञांनी नवीन विकसित झालेल्या बियाणांच्या वाणाची, तसंच दादा लाड कापूस लागवड तंत्राची माहिती दिली. यावेळी उपस्थित शेतकरी यादव देशमुख यांनी, या कार्यक्रमात माती परिक्षणाबाबत माहिती मिळाल्याचं सांगितलं.

बाईट - शेतकरी यादव देशमुख

****

ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ बीड शहरात काल रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून काढण्यात आलेल्या या भारत झिंदाबाद तिरंगा रॅलीत हजारो रिपाइं कार्यकर्ते सहभागी झाले होते. राष्ट्रगीताने या रॅलीची सांगता झाली.

****

आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडुंनी काल तीन सुवर्ण पदकांची कमाई केली.

पुरुषांच्या पाच हजार मीटर शर्यतीत गुलवीरने, महिलांच्या उंच उडीत पूजाने, तर महिलांच्या हेप्टाथलॉनमध्ये नंदिनी अगासराने सुवर्ण पदक जिंकलं. पारुल चौधरीने महिलांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकलं. या स्पर्धेत भारत सध्या आठ सुवर्ण, सात रौप्य आणि तीन कांस्यपदकासह एकूण १८ पदकांसह पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

****

धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी अधिकाऱ्यांनी केवळ नियमित कामकाजापुरतं मर्यादित न राहता सकारात्मक दृष्टिकोनातून नवकल्पना मांडाव्यात, असे निर्देश मित्राचे उपाध्यक्ष तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिले. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. या बैठकीस जिल्ह्यातल्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

****

जागतिक तंबाखू विरोधी दिन आज पाळण्यात येत आहे. याअंतर्गत तंबाखूच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या गंभीर आजारांविषयी जनजागृती करण्यात येते. छत्रपती संभाजीनगर जिल्हा तंबाखू नियंत्रण समितीच्या वतीनं आज शहरात बाईक रॅली काढण्यात येत आहे.

लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात काल तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीपर कार्यशाळा घेण्यात आली.

****

गेल्या आठ दिवसांपासून बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे लघु, मध्यम आणि लहान प्रकल्पातला पाणीसाठा वाढत आहे. बीड शहरालगत असलेलं बिंदुसरा धरण पूर्ण भरलं आहे. धरणाच्या मध्य चादरीवरून पाणी वाहण्याची शक्यता लक्षात घेता बिंदुसरा नदीलगत असलेल्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे.

****