Monday, 30 November 2020

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.11.2020 रोजीचे रात्री 09.15 ते 09.30 वाजेचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक 30.11.2020 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 November 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 November 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० नोव्हेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

** पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उद्या मतदान; मराठवाड्यात ८१३ मतदान केंद्रांवर पथकं रवाना

** ज्येष्ठ रंगकर्मी, राम जाधव यांचं अकोला इथं दीर्घ आजारानं निधन

** शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकदेव यांची जयंती सर्वत्र भक्तिभावानं साजरी

** जालना तसंच औरंगाबाद इथं आज प्रत्येकी दोन कोविडबाधितांचा मृत्यू

आणि

** कृषीपूरक उद्योग - व्यवसाय उभारून रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घेणाऱ्या युवकांना सर्वतोपरी सहकार्य - सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचं आश्वासन

****

मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात उद्या पदवीधर मतदार संघासाठीच्या निवडणुकीत मतदान होणार आहे. विभागात एकूण ३ लाख ७३ हजार १६६ पदवीधर मतदार ८१३ मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावतील. औरंगाबाद जिल्ह्यात १ लाख ६३ हजार ७९ मतदारांसाठी २०६ मतदान केंद्रं उभारण्यात आली आहेत. जालना जिल्ह्यात २९ हजार ७६५ मतदारांसाठी ७४ मतदान केंद्र, परभणी- ३२ हजार ७१५ मतदारांसाठी ७८ केंद्रं, हिंगोली- १६ हजार ७९४ मतदारांसाठी ३९ केंद्रं, नांदेड- ४९ हजार २८५ मतदारांसाठी १२३ केंद्रं, बीड - ६३ हजार ४३६ मतदारांसाठी १३१ केंद्रं, लातूर - ४१ हजार १९० मतदारांसाठी ८८ केंद्रं,तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ३३ हजार ६३२ मतदारांसाठी ७४ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर मतपत्रिका, मतपेट्या आणि सर्व आवश्यक साहित्यासह मतदान केंद्र पथकं आज रवाना झाली. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या सर्व मतदान केंद्रांचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं असून, इतरही सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत मतदान होणार असून, कोविड बाधित मतदारांना शेवटच्या दोन तासांत मतदान करता येणार आहे.

 

जालना जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असून, मतदान केंद्रावर आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी मतदान केंद्र अधिकाऱ्यांना दिले आहेत.

परभणी जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी मतदान होणाऱ्या ठिकाणचे आठवडी बाजार रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.

दरम्यान, पदवीधर मतदारांनी या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क योग्य पद्धतीने बजवावा यासाठी, निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. मतदानासाठी मतपत्रिकेसोबत पुरवलेल्या जांभळया रंगाच्या स्केच पेनचाच वापर करावा, आपली पहिली पसंत असलेल्या उमेदवाराच्या नावासमोर असलेल्या रकान्यात "१" हा अंक लिहावा, उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर आपल्या पसंती क्रमानुसार २, ३, ४, इत्यादी अंक लिहिणं ऐच्छिक असल्याचं, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मतपत्रिकेवर इतर काहीही लिहू नये किंवा खुणा करू नयेत, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून उद्या कर्मचाऱ्यांना नैमित्तिक रजा मंजूर करावी, अशी सूचना विभागीय आयुक्त कार्यालयातील उपआयुक्त तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली आहे.

या मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी विभागात एकूण ९३७ सुक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी तीन डिसेंबरला होणार आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन अभिनेते सुबोध भावे यांनी केलं आहे. 

****

ज्येष्ठ रंगकर्मी, राम जाधव यांचं आज अकोला इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. रंगभूमीवर अभिनया सोबतच, दिग्दर्शन, निर्माता म्हणूनही आपली छाप पाडलेल्या जाधव यांना राज्यशासनासह विविध संस्थांनी अनेक पुरस्कार देऊन गौरवलं होतं. २०११ मध्ये रत्नागिरी इथं भरलेल्या ९१ व्या नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपद राम जाधव यांनी भुषवलं होतं. त्यांच्या निधनानं नाट्यक्षेत्रासह सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

****

महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांचं आज सकाळी निधन झालं, चंद्रपूर जिल्ह्यात आनंदवन इथं त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या नात तर डॉ विकास आमटे यांच्या कन्या असलेल्या डॉ. शीतल यांना ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने मार्च २०१६ मध्ये ‘यंग ग्लोबल लीडर’ या पुरस्कारनं गौरवलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होत्या, त्यातच यांनी आनंदवनातले कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप केले होते, मात्र आमटे कुटुंबातल्या सर्व ज्येष्ठ सदस्यांनी एक संयुक्त निवेदन जारी करून, हे आरोप तथ्यहीन असल्याचं स्पष्ट केलं होतं.

****

शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकदेव यांची जयंती आज सर्वत्र भक्तिभावानं साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुनानक यांना अभिवादन केलं, प्रत्येकाशी सन्मानाने आणि प्रेमपूर्वक आदराने वागण्याची गुरुनानक यांची शिकवण आजच्या काळात खूप महत्त्वाची असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुनानक यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं. गुरू नानकदेव यांच्या विचारातच अखिल मानवजातीचे कल्याण सामावलं असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे

गुरुनानक जयंतीनिमित्त ठिकठिकाणच्या गुरुद्वारांधमध्ये कोविड प्रतिबंधाचे नियम पाळून विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. जालना इथं सार्वजनिक मिरवणूक न काढता शीख बांधवांनी सामाजिक उपक्रम राबवल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्य सरकार मागील वर्षभरात सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याची टीका भाजपा प्रदेश उपाध्यक्ष खासदार प्रीतम मुंडे यांनी केली आहे. त्या आज जालना इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती ही जनतेची निराशापूर्ती असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात लवकरच भाजपची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार संतोष दानवे यांनीही यावेळी राज्यसरकारच्या धोरणांवर टीका केली.

****

जालना जिल्ह्यात आज दोन कोविडबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या आता ३१९ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात ६८ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता बारा हजार ३५१ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या १११ रुग्णांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले अकरा हजार ७१३ रुग्ण या संसर्गातून बरे झाले आहेत. सध्या बाधित असलेल्या ३१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात आज दोन कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर नऊ जणांना उपचारानंतर कोविड संसर्गमुक्त झाल्यानं, रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात या संसर्गाने आजपर्यंत एक हजार १४७ जणांचा मृत्यू झाला असून, ४१ हजार १८५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत, जिल्ह्यातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ४३ हजार ३०० झाली आहे

****

मराठवाड्यातल्या युवकांनी कृषीपूरक उद्योग - व्यवसाय उभारावेत, असं आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण तसंच सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. लातूर तालुक्यात रायवाडी इथं संगमेश्वर बोमणे यांच्या पुढाकारातून उभारलेल्या श्रीशैल्य हायटेक नर्सरीचा शुभारंभ आज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घेणाऱ्या युवकांना सर्वतोपरी सहकार्याचं आश्वासन देशमुख यांनी दिलं.

****

हिंगोली जिल्ह्यातील वारंगा फाटा जवळ आज मोटरसायकल आणि ट्रकच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. पाठीमागून येणाऱ्या ट्रकने या दुचाकीला धडक दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वे विभागानं उद्यापासून काही गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, यामध्ये सिकंदराबाद - मनमाड- सिकंदराबाद अजंठा एक्सप्रेसचा समावेश आहे. हैदराबाद -जयपूर-हैदराबाद उत्सव विशेष गाडी, पूर्णा पाटणा पूर्णा उत्सव विशेष गाडी या दोन गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. आदिलाबाद-मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम विशेष एक्स्प्रेस या गाडीला उद्यापासून मध्ये तीन अधिकचे डबे जोडले जाणार आहेत.

****////****

 

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 30.11.2020 रोजीचे सायंकाळी 06.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 30.11.2020 सोलापूर जिल्हा वार्तापत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 November 2020 Time 13.00 to 13.05 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 November 2020

Time 13.00 to 13.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० नोव्हेंबर २०२० दुपारी १.००

****

कोविड १९ची लस विकसित करणाऱ्या तीन संशोधकांच्या चमूंसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संवाद साधणार आहे. जीनोव्हा बायोफार्मा, बायोलॉजिकल ई आणि डॉ. रेड्डी या संशोधन संस्थेतल्या संशोधकांशी पंतप्रधान दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे कोविड लसीच्या संशोधनाबाबत चर्चा करतील.

****

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गैरसमज न बाळगण्याचं आवाहन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. या कायद्यांच्या विरोधात पंजाबच्या शेतकर्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जावडकेर यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून हे आवाहन केलं. पंजाबमधल्या शेतकर्यांनी गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक धान्य बाजार समित्यांमध्ये किमान आधारभूम किमतीत विकलं, असं नमूद करत जावडेकर यांनी, या कृषी कायद्यांमुळे किमान आधारभूत किंमत आणि बाजार समित्या अबाधित राहणार असल्याचं स्पष्ट केलं.

****

शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकदेव यांची ५५१ वी जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्तानं नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वारासह ठिकठिकाणच्या गुरुद्वारांमध्ये विशेष कार्यक्रमातून गुरुनानक यांना अभिवादन केलं जात आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या  गुरुद्वारांमध्ये   गुरुनानक जयंती ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्याचं आयोजन करण्यात आलं आहे.  गुरुद्वारांमध्ये सकाळपासून भजन, कीर्तन, कथा, व्याख्यान आदी कार्यक्रम सुरु आहेत.

****

जागतिक कोविड १९ संकटात मृत्यूदर नियंत्रित आणि  संख्या कमी राखण्यात भारतानं मोठं यश मिळवलं आहे.  जागतिक स्तराचा विचार करता, देशातल्या मृतांचा आकडा प्रर्ती दशलक्ष नागरिकांच्या मागे कमी आहे. ही संख्या सध्या सरासरी  ९९ अशी  आहे. विशेष लक्ष केंद्रित करून राबवलेल्या अभियानाद्वारे मृत्यूदर   कमी   ठेवण्याचे प्रभावी प्रबंधन करण्यात आले असून, हा आकडा ५०० पेक्षा कमी असल्याचं केंद्रीय आरोग्य मंलत्रालयानं सांगितलं.

दरम्यान, देशात काल दिवसभरात ३८ हजार ७७२ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ४४३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या ९४ लाख ३१ हजार ६९२ झाली आहे. देशात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख ३७ हजार १३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ४५ हजार ३३३ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. देशात आतापर्यंत ८८ लाख ४७ हजार ६०० रुग्ण बरे झाले असून, सध्या चार लाख ४६ हजार ९५२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल आठ लाख ७६ हजार १७३ कोविड चाचण्या करण्यात आल्या, देशभरात आतापर्यंत १४ कोटी तीन लाख ७९ हजार ९७६ चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं.

****

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या उद्या होत असलेल्या निवडणुकीसाठी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातल्या पदवीधर मतदारांना विशेष नैमित्तीक रजा मंजूर केली आहे. ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी काल या संदर्भात काढलेल्या परिपत्रात नमूद केलं आहे.

उद्या सकाळी आठ वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत पदवीधर तसंच शिक्षक मतदारांना मतदान करता येईल, मतमोजणी तीन डिसेंबरला होणार आहे. कोरोना विषाणू बाधित मरदारांना शेवटच्या दोन तासात मतदान करता येईल.

****

राज्यात मुंबई उच्च न्यायालयासह सर्व न्यायालयांचं कामकाज उद्या मंगळवारपासून नियमितपणे सुरू होणार आहे. सर्व न्यायालयांचे न्यायाधीश आणि कर्मचारी पूर्ण क्षमतेनं दोन पाळ्यांत सकाळी अकरा वाजेपासून दुपारी दीड वाजेपर्यंत आणि दुपारी दोन वाजेपासून ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत काम करणार असल्याची माहिती, उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक एस. डी दिघे यांनी दिली.

****

औरंगाबाद महापालिकेच्या वतीनं रेल्वेस्थानक आणि विमानतळावर कोरोना विषाणू चाचणी करण्यात येत आहे. सचखंड एक्सप्रेस रेल्वेनं काल आलेल्या २५३ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.तर औरंगाबाद विमानतळ इथं ३९ प्रवाशांची चाचणी घेण्यात आली. विमानतळावर परवा केलेल्या आरटीपीसीआर चाचणीत दोन जण बाधित आढळून आले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन लिंकद्वारे त्यांची माहिती देण्याचं आवाहन शासकीय कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं करण्यात आलं आहे. भविष्यात घेण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रमासाठी ही माहिती संकलित केली जात असल्याचं कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं कळवण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधण्याचं अथवा केव्हीके औरंगाबादच्या फेसबुक पेजवर अपलोड केलेल्या लिंकवर ही माहिती भरावयाची आहे.

****

कोरोना विषाणू संसर्ग काळात औषधी गुणधर्मामुळे परदेशात हळदीची मागणी वाढली असल्यानं चालू वर्षी १६ लाख हळद पोत्यांची निर्यात करण्यात आली आहे. सांगली मार्केट यार्डात देशातल्या सर्व ठिकाणची हळद विक्रीसाठी येत असून सध्या दररोज ४ हजार हळद पोत्यांची आवक सुरू आहे. राज्यात सांगली, हिंगोली, वसमत, नांदेड, जळगाव इथून दरवर्षी हळदीचं उत्पादन घेतलं जातं.

//***********//

 

 

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.11.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी ब...

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ३० नोव्हेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३० नोव्हेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

कोविड 19 ची लस विकसित करणाऱ्या तीन संशोधकांच्या चमूंसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संवाद साधणार आहे. जीनोव्हा बायोफार्मा, बायोलॉजिकल ई आणि डॉ. रेड्डी या संशोधन संस्थेतल्या संशोधकांशी पंतप्रधान दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे कोविड लसीच्या संशोधनाबाबत चर्चा करतील.

****

केंद्र सरकारनं मिशन कोविड सुरक्षा या भारतीय कोविड -19 लस विकास अभियानासाठी ९०० कोटी रुपयांचं तिसरे प्रोत्साहन पॅकेज जाहीर केलं आहे. भारतीय कोविड-19 लसींच्या संशोधन आणि विकासासाठी जैव तंत्रज्ञान विभागाला हे अनुदान प्रदान केलं जाईल. यामुळे कोविड संसर्ग रोखण्यासाठी अंदाजे पाच ते सहा लसींच्या विकासाला गती देण्यास मदत मिळेल आणि परवाना तसंच सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत नियामक अधिकाऱ्यांच्या विचारार्थ त्या बाजारात सादर करणं हे सुनिश्चित करण्यात मदत होईल.

****

शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले धर्मगुरू, गुरु नानक यांची आज ५५१ वी जयंती देशात आणि जगभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्व शीख बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. एकात्मता, शांतता, बंधुत्व, सौजन्य आणि सेवा या मुल्यांना केंद्रस्थानी ठेवून गुरु नानक यांनी दिलेली मानवतेची शिकवण, कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, आणि आत्मप्रतिष्ठा हा जगण्याचा मूलाधार आहे, हे त्याचं तत्वज्ञान सर्व मानवी समाजाला प्रेरणादायी आहे, असे गौरवपूर्ण उद्गार राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात काढले.

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी सुद्धा गुरु नानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु नानक याचं भारतीय संत, अध्यात्मिक गुरु आणि तत्वाज्ञांच्या मध्ये खूप मोठं स्थान असल्याचं ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गुरु नानक देव यांचं स्मरण आणि अभिवादन केलं. गुरु नानक देव यांचे विचार आम्हास समाज सेवा आणि उत्तम जग निर्माण करण्यासाठी सतत प्रेरित करो, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

****

मध्य रेल्वे उद्या मंगळवारपासून काही विशेष गाड्या सुरू करत आहे. यामध्ये मुंबई - लातूर- मुंबई आणि मुंबई-आदिलाबाद- मुंबई या दोन गाड्यांचा समावेश आहे. या विशेष गाड्यांमधून फक्त आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवास करता येणार असल्याचं रेल्वेनं सांगितलं आहे.

//**********//

 

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.11.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी सं...

 Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.

Date : 30 November 2020

Time:  09 : 00 to 09: 10 AM

آکاشوانی اَورنگ آباد

علاقائی خبریں

تاریخ:   ۳۰ٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗ  ؍  نومبر  ۲۰۲۰ئ؁

وَقت: صبح  ۰۰۔۹  سے  ۱۰۔۹؍ بجے 


شروع میں چند اہم خبروں کی سر خیاں سماعت کیجیے...

٭ تر میمی زرعی قا نون کسانوں کا معا شی تحفظ کرنے والا قانون ہے‘ وزیر اعظم کی من کی بات میں خلاصہ

٭اجنٹا گپھائوں کی وراثت کو ڈیجیٹل ذریعے سے محفوظ کیا جائے گا

٭مراٹھا سماج کے مختلف مطالبات کے لیے اسمبلی کے سر مائی اجلاس پر 8؍ دسمبر کو مورچہ

٭ٹھا کرے حکو مت نے مہاراشٹر کا ایک سال بے کار کر دیا ‘ مرکزی مملکتی وزیر رائو صاحب دانوے کی تنقید ... تاہم بہو جن کی قیادت بھارتیہ جنتا پارٹی ختم کر رہی ہے‘ سابق وزیرجئے سنگھ رائو گائیکواڑ کا الزام...

٭گریجویٹ حلقۂ انتخاب کی تشہیر کَل ختم ہوگئی۔ کَل رائے دہی ہو گی 

٭ریاست میں کَل 5؍ہزار544؍ کووِڈ متاثرین کا اِندراج ‘ مراٹھواڑہ میں

349 ؍ نئے مریض پائے گئے

٭بیڑ ضلع میں چیتے کے حملے میں ایک خا تون ہلاک‘ ایک ہفتے میں تیسری واردات...

٭بھارت -آسٹریلیا ایک روزہ کر کٹ مقابلوں کی سیریز میں کَل کے دوسرے ایک روزہ مقابلے میں فتح حاصل کر تے ہوئے آسٹریلیا کی سبقت



  اب خبریں تفصیل سے....

وزیر اعظم نریندر مودی نے کَل کہا ہے کہ حا لیہ زرعی اصلاحات سے کسانوں کے لیے نئے امکا نات پیدا ہو گئے ہیں۔ آکاشوانی پر اپنے ’’من کی بات‘‘ پروگرام میں قوم سے خطاب کر تے ہوئے وزیر اعظم نے کہا کہ کسا ن طویل عر صے سے اِن اصلاحات کی مانگ کر رہے تھے اور اُن کی حکو مت نے اُن کا مطالبہ پوار کر دیا ہے۔ انہوں نے کہا کہ پارلیمنٹ نے کا فی غور و خوص کے بعد زرعی اصلاحات کو قانو نی شکل دی ہے۔

وزیر اعظم نے اِس بات کا ذکر کیا کہ کس طرح مہا راشٹر کے دھو لیا ضلعے کے ایک کسان جِتیندر بھائو جی کو مکئی فروخت کر نے کے لیے اپنی بقا یہ ادائیگی حاصل کرنے میں اِن اصلا حات سے مدد ملی ہے۔ مودی نے کہا کہ صحیح جانکاری‘ جو غلط تصورات اور افواہوں سے پاک ہو ہر شخص کے لیے طا قت میں اضا فہ کرنے کا ذریعہ بن سکتی ہے۔

***** ***** ***** 

اجنٹا گپھائوں کی وراثت کو ڈیجیٹل ذریعے سے محفوظ کیا جا رہا ہے۔ یہ بات وزیر اعظم نے کہی ہے۔ اِس تجربہ میں اجنٹا گپھائوں کی مکمل جھلک نظر آئے گی۔ ہماری ثقا فتی وراثت کو تیکنا لو جی کے ذریعے سے زیادہ سے زیا دہ لوگوں تک پہنچا نا اور اِس وراثت کی حفا ظت کے لیے تیکنا لو جی کا استعمال کر نے کی اہمیت ہے ۔ یہ بات وزیر اعظم نے کہی۔ فی الحال کووِڈ ویکسین کی گفتگو جاری ہے۔ کورونا وائرس کی وباء کے سلسلے میں کسی قسم کی لا پر واہی برتنا آج بھی خطر ناک ہے ۔ یہ بات نریندر مودی نے کہی۔

***** ***** ***** 

مراٹھا سماج کے مختلف مطالبات کے لیے اسمبلی کے سر مائی اجلاس پر8؍ دسمبر کو مورچہ نکا لنے کا اشارہ مراٹھا کرانتی مورچے کی جانب سے دیا گیا ہے۔ مراٹھا مورچے کی کل پو نا میں میٹنگ ہوئی۔ اِس کے بعد مراٹھا کرانتی مورچے کے کوآر ڈینیٹر راجندر کونڈھیرے نے صحا فتی کانفرنس میں اِس ضمن میں معلو مات دی۔

***** ***** ***** 

مراٹھا سماج کو ریزر ویشن کیوں نہیں دیا جا رہا۔ اِس کا جواب ہر ایک نے سیاسی رہنمائوں سے پو چھنا چا ہیے۔ یہ بات رکن پارلیمنٹ اُدئین راجے بھونسلے نے کہی ہے۔ وہ کَل ساتارہ میں صحا فتی کانفرنس سے مخا طب تھے۔ جس سماج نے اِقتدار دیا وہی سماج اقتدار سے نیچے اُتار ے گا ایسا اشارہ اُنھوں نے اِس موقع پر دیا۔

***** ***** ***** 

ریاست کی ٹھا کرے حکو مت نے مہا راشٹر کا ایک سال بے کار کر دیا ہے۔ ایسی تنقید مرکزی مملکتی وزیر رائو صاحب دانوے نے کی ہے۔ وہ کَل اورنگ آ باد میں گریجویٹ حلقہ انتخابات کے پس منظر میں صحا فتی کانفرنس سے مخا طب تھے۔ مختلف سطحوں پر حکو مت کو نا کا می ہوئی ہے۔خود کی نا کا می پر پر دہ ڈالنے کے لیے بار بار مرکزکی جانب اشا رہ کیا جا تا ہے ۔ یہ بات اُنھوں نے کہی۔حکو مت کے خلاف بولنے والی آواز کو دبا نے کی کوشش کی جا رہی ہے۔ ایسا الزام دانوے نے عائد کیا ہے۔

***** ***** ***** 

Seeds Corporationکے بو گس سو یا بین بیج معاملے میں حکو مت نے کسا نوں کو ہوا کے رخ پر چھو ڑ دیا ہے۔ ایسا الزام سابق وزیر  رکنِ اسمبلی ببن رائو لو نیکر نے عائد کیا ہے۔ وہ کَل پر بھنی میں صحا فتی کانفرنس سے مخا طب تھے۔ پر بھنی ضلعے میں 92؍ ہزار کوئنٹل اور جالنہ ضلعے میں27؍ ہزار کوئنٹل سو یا بین بیج بوگس نکلے یہ بات اُنھوں نے کہی۔ مہا وِکاس فرنٹ حکو مت کی ایک سال میں کار کر دگی صِفر رہی یہ بات لو نیکر نے کہی ہے۔


***** ***** ***** 

 یہ خبریں آکاشوانی اورنگ آ باد سے نشر کی جا رہی ہیں

***** ***** ***** 


بھارتیہ جنتا پارٹی ‘ بہو جن کی قیادت ختم کر رہی ہے۔ ایساالزام سابق مرکزی وزیر جئے سنگھ گائیکواڑنے عائد کیا  ہے ۔ وہ کَل اورنگ آ باد میں صحا فتی کانفرنس میں مخا طب تھے۔ مراٹھواڑہ گریجویٹ حلقۂ انتخابات میں اُنھوں نے مہا وِکاس فرنٹ کے امید وار ستیش چو ہان کی حما یت ظا ہر کی ہے۔

***** ***** ***** 

ریاست میں ممبئی ہائی کورٹ سمیت تمام عدالتوں کا کام کاج کَل منگل سے حسبِ معمول شروع ہو رہا ہے۔ تمام عدالتوں کے ججس اور ملازمین مکمل گنجائش کے ساتھ دو نوں سیشن میں صبح گیارہ بجے سے دو پہر دیڑھ بجے تک  اور  دو پہر دو بجے سے شام ساڑھے چار بجے تک کام کریں گے اِس کی اطلاع ہائی کورٹ کے جنرل منیجر  ایس  ڈی  دِگھے نے دی۔

***** ***** ***** 

قانون ساز کونسل کے گریجویٹ اِسی طرح اساتذہ حلقہ انتخاب کے انتخابات کی تشہیر کَل شام ختم ہوئی۔ پانچ حلقہ ٔ  انتخابات میں ہو رہے اِن انتخا بات کے لیے کَل رائے دہی ہو گی ۔ صبح 8؍ بجے سے شام 5؍ بجے تک گریجویٹ اِسی طرح اسا تدہ حلقہ ٔ  انتخاب میں ارئے دہی کی جا ئے گی۔ ووٹوں کی گنتی 3؍ دسمبر کو ہو گی ۔ کورونا وائرس سے متاثرہ رائے دہندگان آخری کے دو گھنٹوں میں رائے دہی کر سکتے ہیں۔

***** ***** ***** 

اِسی بیچ اِس رائے دہی کے لیے رائے دہندگان کی شناخت کے لیے الیکشن شناختی کارڈ سمیت آدھار کارڈ ‘ ڈرائیونگ لائسنس ‘ پئن کارڈ ‘ سر کا ری یا نِجی اِدارے کی جانب سے دیا گیا شنا ختی کارڈ ‘ تعلیمی اِداروں میں کام کرنے والے اسا تدہ رائے دہند گان کو دیئے گئے شناختی کارڈ ‘ گریجویٹ یا پوسٹ گریجویٹ کی ڈگری وغیرہ دستاویزات قبول کی جائے گی۔ اِس بات کی وضاحت انتخابی کمیشن نے کی ہے۔

***** ***** ***** 

ریاست میں کَل مزید5؍ ہزار544؍ کووِڈ متاثرین کااِندراج ہوا۔ اِس کی وجہ سے ریاست میں جملہ مریضوں کی تعداد18؍ لاکھ20؍ ہزار59 ؍ ہو گئی ہے۔ تمام ریاست میں کَل 85؍ متاثرین دوران علاج چل بسے۔ ریاست میں اِس وائرس کی وجہ سے مر نے والوں کی شرح 2؍ عشا ریہ 59 ؍فیصد ہو گئی ہے۔ تاہم کَل 4؍ ہزار262؍ مریض صحت یاب ہو گئے  اور اُنھیں گھروں کو روانہ کر دیا گیا۔ ریاست میں اب تک16؍ لاکھ80؍ ہزار926؍ مریض کورونا  وائرس سے نجات حاصل کر چکے ہیں۔ کورونا وائرس سے نجات حاصل کر نے کی شرح92؍ عشا ریہ 36؍ فیصد ہو گئی ہے۔ فی الحال ریاست میں

90؍ ہزار997؍ مریضوں کا  علاج جاری ہیں۔

***** ***** ***** 

مراٹھواڑہ میں کَل12؍ کورونا وائرس متاثرہ مریض فوت ہو گئے ۔ تاہم349؍ نئے مریض پائے گئے۔ جالنہ ضلعے میں4؍  بیڑ ضلع میں3؍ اورنگ آ باد ضلع  اور عثمان آ باد ضلع میں 2-2؍ اور ناندیڑ ضلع میں کَل ایک کووِڈ متاثرہ چل بسا۔

اورنگ آباد ضلعے میں116 ؍ لاتور61؍ بیڑ49؍ جالنہ 43؍ ناندیڑ35 ؍ عثمان آ باد 21؍ پر بھنی18؍ اور ہنگولی ضلعے میں 6 ؍ نئے مریضوں کی شناخت ہوئی۔

***** ***** ***** 

بیڑ ضلع کے آشٹی تعلقے میں جو گیشوری پار گائوں میں چیتے نے کئے گئے حملے میں ایک خا تون ہلاک ہو گئی۔ تاہم دیگر ایک خا تون زخمی ہو گئی۔ سوریکھا بھونسلے مرنے والی خاتون کا نام ہے۔ کل شام کو یہ خا تون کھیت سے واپس آرہی تھی کہ اُس وقت چیتے نے کئے حملے میں وہ ہلاک ہو گئی۔ گزشتہ ہفتے بھر میں یہ تیسری واردات ہے ۔ اِس چیتے کو پکڑ نے کے لیے محکمہ جنگلات نے17 ؍ وفد تعینات کئے ہیں اور تین جال  بچھائے ہیں۔

***** ***** ***** 

سڈ نی کر کٹ گرائونڈ میں کَل تین میچوں کی سیریز کے دوسرے ایک روزہ بین الاقوامی میچ میں آسٹریلیا نے بھارت کو 51؍ رن سے ہرا دیا۔ آسٹریلیا نے بھارت کو390؍ رن کا نشا نہ دیا اور بھارت مقررہ 50؍ اوورز میں338؍ رن ہی بنا سکا۔ بھارت کے لیے کپتان وِراٹ کو ہلی نے سب سے زیادہ87؍ گیندوں میں89؍ رن بنا ئے۔ اِس جیت کے ساتھ ہی میزبان ٹیم نے سیریز میں0-2؍ کی نا قابل تسخیر سبقت حاصل کر لی ہے۔ اِس سے پہلے آسٹریلیا نے پہلے بلّے بازی کا فیصلہ کر کے مقررہ پچاس اوورز میں چار وکٹ پر389؍ رن بنائے ۔ تیسرا ایک روزہ میچ 2؍ دسمبر کو کھیلا جائے گا۔

***** ***** ***** 

آخر میں اہم خبروں کی سر خیاںدوبارہ سماعت کیجیے... 

٭ تر میمی زرعی قا نون کسانوں کا معا شی تحفظ کرنے والا قانون ہے‘ وزیر اعظم کی من کی بات میں خلاصہ

٭اجنٹا گپھائوں کی وراثت کو ڈیجیٹل ذریعے سے محفوظ کیا جائے گا

٭مراٹھا سماج کے مختلف مطالبات کے لیے اسمبلی کے سر مائی اجلاس پر 8؍ دسمبر کو مورچہ

٭ٹھا کرے حکو مت نے مہاراشٹر کا ایک سال بے کار کر دیا ‘ مرکزی مملکتی وزیر رائو صاحب دانوے کی تنقید ... تاہم بہو جن کی قیادت بھارتیہ جنتا پارٹی ختم کر رہی ہے‘ سابق وزیرجئے سنگھ رائو گائیکواڑ کا الزام...

٭گریجویٹ حلقۂ انتخابات کی تشہیر کَل ختم ہوگئی۔ کَل رائے دہی 

٭ریاست میں کَل 5؍ہزار544؍ کووِڈ متاثرین کا اِندراج ‘ مراٹھواڑہ میں

349 ؍ نئے مریض پائے گئے

٭بیڑ ضلع میں چیتے کے حملے میں ایک خا تون ہلاک‘ ایک ہفتے میں تیسری واردات...

٭بھارت -آسٹریلیا ایک روزہ کر کٹ مقابلوں کی سیریز میں کَل کے دوسرے ایک روزہ مقابلے میں فتح حاصل کر تے ہوئے آسٹریلیا کی سبقت

  علاقائی خبریں ختم ہوئیں۔

٭٭٭٭٭


आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.11.2020 रोजीचे सकाळी 09.20 वाजेचे मराठी रा...

آکاشوانی اَورنگ آباد علاقائی خبریں تاریخ:   30  ؍  نومبر 2020 ؁وَقت : ...

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.11.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बा...

Sunday, 29 November 2020

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक - 29.11.2020 रोजीचे रात्री 09.15 ते 09.30 वाजेचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक - 29.11.2020 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 November 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 November 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ नोव्हेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

** मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर येत्या आठ डिसेंबरला मोर्चा काढण्याचा मराठा क्रांती मोर्चा संघटनेचा इशारा

** केंद्र सरकारचे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचं संरक्षण साधणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

** कोरोना विषाणू संसर्गामुळे औरंगाबादमध्ये एका तर जालन्यात चार रुग्णांचा मृत्यू

आणि

** भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाची विजयी आघाडी

****

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर येत्या आठ डिसेंबरला मोर्चा काढणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं देण्यात आला आहे. मराठा मोर्चाची आज पुण्यात बैठक झाली, त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ऊर्जा भरतीमध्ये सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास - एसईबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना वगळल्याच्या विरोधात सर्व जिल्ह्यात वीज महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर परवा एक डिसेंबरला आंदोलन केलं जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. राज्य सरकारनं न्यायालयीन प्रक्रिया आणि इतर प्रत्येक बाबतीत वेळकाढूपणा केल्यानं, मराठा समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे, या अस्वस्थतेतूनच हे आंदोलन केलं जात असल्याचं, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.

****

मराठा समाजाला आरक्षण का देण्यात येत नाही, याचा जाब प्रत्येकानं राज्यकर्त्यांना विचारला पाहिजे, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. ते आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्या समाजानं सत्तेत बसवलं, तोच समाज सत्तेतून खाली उतरवेल, असा इशाराही उदयनराजे यांनी यावेळी दिला. सर्वोच्च न्यायालायचा निकाल येईल, त्याला अधीन राहून मराठा समाजाची टक्केवारी राखून ठेवत इतर विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. मराठा समाजाच्या मोर्चांना उत्तर देण्यासाठी प्रतिमोर्चे काढण्यात येतात, त्यामागे कोण असतं, असा प्रश्नही उदयनराजे यांनी विचारला आहे.

****

राज्यात मुंबई उच्च न्यायालयासह सर्व न्यायालयांचं कामकाज येत्या मंगळवारपासून नियमितपणे सुरू होणार आहे. सर्व न्यायालयांचे न्यायाधीश आणि कर्मचारी पूर्ण क्षमतेनं दोन पाळ्यांत सकाळी अकरा वाजेपासून दुपारी दीड वाजेपर्यंत आणि दुपारी दोन वाजेपासून ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत काम करणार असल्याची माहिती उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक एस. डी दिघे यांनी दिली आहे. कोरोना विषाणू संसर्गाची सद्य स्थिती लक्षात घेऊन मुख्य न्यायाधीश आणि प्रशासकीय न्यायाधीशांच्या समितीनं हा निर्णय घेतला आहे.

****

केंद्र सरकारनं आणलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचं संरक्षण साधणारे कायदे आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज `मन की बात` या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचा हा ७१वा भाग होता. या कायद्यांची ‘योग्य आणि पूर्ण माहिती’ शेतकऱ्यांची ताकद होऊ शकते असं पंतप्रधान म्हणाले. या कायद्याचा वापर करून राज्यातल्या धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातल्या भटाणे गावातले शेतकरी जितेंद्र भोई यांनी व्यापाऱ्याकडून थकबाकी कशी मिळवता आली याची माहिती त्यांनी यावेळी दिली. याबाबत जितेंद्र भोई यांनी आकाशवाणीसाठी आपली प्रतिक्रिया दिली आहे…

 

आज माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मन की बात या कार्यक्रमातून देशाचे माननीय प्रधानमंत्री साहेबांनी माझा नामोल्लेख केला. त्याबद्दल मला खूपच आनंद होत आहे. माननीय प्रधानमंत्री साहेबांचे आभार मानतो की, माझे मक्याचे पैसे बुडालेले असताना मी केंद्र शासनाचा शेतकरी हिताचा कायद्याच्या मदतीने मला तो पैसा परत मिळाल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज एका ९० वर्षीय कोविड बाधिताचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार १४४ जणांचा या संसर्गाने मृत्यू झाला आहे. औरंगाबाद इथल्या घाटी रुग्णालयातून आज सहा जणांना सुट्टी देण्यात आली, जिल्ह्यातले ४१ हजार ११५ रुग्ण आतापर्यंत या संसर्गातून मुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोविडबाधितांची एकूण संख्या ४३ हजार १८४ झाली आहे.

****

जालना जिल्ह्यात आज चार कोविडबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या आता ३१७ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात कोरोना विषाणू संसर्ग झालेले ४३ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता बारा हजार २८३ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या १२ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले अकरा हजार ६०४ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या ३६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातले सर्वच प्रकल्प वर्षभरापासून रखडले असल्याचं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, कौडगाव इथला टेक्निकल टेक्सटाईल पार्क आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे प्रकल्प, महाविकास आघाडी सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी घेवून केंद्राकडे शिफारस केली नसल्यामुळे रखडले असून, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी न ठेवल्यानं आणि केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केले नसल्यानं रखडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. येत्या पंधरा डिसेंबर पर्यंत यासंदर्भात बैठक घेतली नाही तर मंत्र्यांना उस्मानाबाद जिल्हा बंदी करण्यात येईल, असा इशारा आमदार पाटील यांनी दिला आहे.

****

मध्य रेल्वे परवा, मंगळवारपासून काही विशेष गाड्या सुरू करत आहे. यातली मुंबई - लातूर विशेष ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून रात्री नऊ वाजता सुटेल आणि लातूरला दुसऱ्या दिवशी सकाळी साडे सहा वाजता पोहचेल. लातूर इथून रात्री साडे दहा वाजता सुटणारी गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहचेल. मुंबई-आदिलाबाद विशेष ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून दुपारी चार वाजून ३५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडे नऊ वाजता आदिलाबादला पोहचेल. आदिलाबाद इथून दुपारी एक वाजता सुटणारी गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचेल. या विशेष गाड्यांमधू फक्त आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केलं आहे. 

$60B7F3D6-B41D-4F2E-890F-60F527B****

क्रिकेट

ऑस्ट्रेलियात सिडनी इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचा ५१ धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलिया संघानं आज सकाळी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, निर्धारित षटकांत यजमान संघानं चार गड्यांच्या मोबदल्यात ३८९ धावा करत, भारतीय संघासमोर ३९० धावांचं आव्हान ठेवलं. कर्णधार विराट कोहलीच्या ८९ आणि के एल राहुलच्या ७६ धावा वगळता भारतीय संघाचे अन्य फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर निष्प्रभ ठरले, निर्धारित षटकांत भारतीय संघ ३३७ धावांवर सर्वबाद झाला. तीन सामन्यांच्या मालिकेतला अखेरचा सामना दोन डिसेंबरला खेळवला जाणार आहे.

****

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या आजचा एकदिवसीय सामना खेळून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं अडीचशे एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम केला आहे.  असा विक्रम करणारा कोहली हा नववा भारतीय खेळाडू आहे. कोहलीच्या आधी अजहरुद्दीन, सौरव गांगुली, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, आणि महेंद्रसिह धोनी या कर्णधारांसह अनिल कुंबळे, युवराज सिंह, विरेंद्र सेहवाग, यांनी यापूर्वी असा विक्रम केला आहे.

****

राज्यात परवा, मंगळवारी पदवीधर तसंच शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या करता मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्रासह, आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, पारपत्र, शासकीय किंवा खासगी आस्थापनांनी दिलेलं ओळखपत्र, शिक्षण संस्थेत कार्यरत शिक्षक मतदारांना दिलेलं ओळखपत्र, पदवी किंवा पदविका मूळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत अपंगत्वाचं मूळ प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रं पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.

****

कोरोना विषाणू संसर्ग काळात औषधी गुणधर्मामुळे परदेशात हळदीची मागणी वाढली असल्यानं चालू वर्षी १६ लाख हळद पोत्यांची निर्यात करण्यात आली आहे. सांगली मार्केट यार्डात देशातल्या सर्व ठिकाणची हळद विक्रीसाठी येत असून सध्या दररोज ४ हजार हळद पोत्यांची आवक सुरू आहे. राज्यात सांगली, हिंगोली, वसमत, नांदेड, जळगाव इथून दरवर्षी हळदीचं उत्पादन घेतलं जातं.

****////****

 

 

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक - 29.11.2020 रोजीचे सायंकाळी 06.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 29.11.2020 सिंधुदुर्ग जिल्हा वार्तापत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.11.2020 रोजीचे दुपारी 01.30 वाजेचे मराठी र...

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 November 2020

Time 13.00 to 13.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ नोव्हेंबर २०२० दुपारी १.००

****

जिंठ्याच्या लेण्यांचा वारसा डिजिटल करून या प्रकल्पाचं जतन करण्यात येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या `मन की बात` या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधताना सांगितलं. या कार्यक्रम मालिकेचा हा ७१वा भाग होता. या  प्रयोगामध्ये अजिंठा लेण्यांची संपूर्ण झलक पहायला मिळेल. यामध्ये `डिजिटलाइज्ड` आणि पुन्हा स्थापन केलेल्या कलाकृती यांच्या बरोबरच यासंबंधित दस्तऐवज आाणि अनेकांनी व्यक्त केलेल्या शब्दभावना, त्यांचे उद्गार यांचाही समावेश असेल, असं त्यांनी म्हटलं. आपला सांस्कृतिक वारसा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवणं आणि या वारशाच्या संरक्षणासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणं महत्वाचं असल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशाच्या संस्कृती आणि शास्त्राचा शोध घेण्यासाठी अनेक लोक विदेशांतून येऊन इथंच कायम राहिले आहेत. अनेक लोक शोधकार्य करून मायदेशी परत जातात आणि या संस्कृतीचे चांगले संवाहक बनतात असं ते म्हणाले. या तसंच अन्य क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा त्यांनी यावेळी गौरवानं उल्लेख केला. आपला अमूल्य वारसा असलेल्या गोष्टी आंतरराष्ट्रीय टोळ्यांचा शिकार होत आल्या असून अशा टोळ्या पुन्हा सक्रिय होऊ नयेत, यासाठी देशानं प्रयत्न वाढवले असल्याचं त्यांनी सांगितलं. धुळे जिल्ह्यातले शेतकरी, जितेंद्र भोई यांना, नव्या कृषी कायदयाचा वापर केल्यामुळे त्यांच्या मका उत्पादनाचे पैसे मिळण्यासाठी मोठी मदत झाल्याचं उदाहरण त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्र सरकारनं गेल्या सप्टेंबर महिन्यात जे कृषी कायदे बनवले त्यामुळे शेतमाल खरेदी केल्यानंतर तीनच दिवसांत शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे द्यावे लागणार आहेत आणि जर पैसे मिळाले नाहीत, तर शेतकरी त्याविरोधात तक्रार दाखल करु शकतो. संबंधित भागातल्या उप विभागीय अधिकाऱ्यांना एका महिन्याचा आत शेतकऱ्यानं दाखल केलेल्या तक्रारीचं निवारण या कायद्यानुसार करावं लागणार असल्याचं त्यांनी नमुद केलं.  देश टाळेबंदीच्या काळातून बाहेर पडत आहे, आता लसीची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाबाबत कोणताही निष्काळजीपणा करणं आजही अत्यंत घातक आहे. आपल्याला, या संसर्गाविरुद्धचा आपला लढा पुढंही तेवढ्याच ताकदीनं सुरु ठेवायचा असल्याचं पंतप्रधान म्हणाले. दरम्यान, महामारीनं आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये बदल घडून आला आहे. निसर्गाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात आता बदल झाला असल्याचं त्यांनी म्हटलं. येत्या सहा डिसेंबरला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली देण्यासोबतच, देशाविषयीचे आपले संकल्प, संविधानानं एक नागरिक म्हणून आपली कर्तव्यं पूर्ण करण्याची जी शिकवण आपल्याला दिली आहे, तिचं स्मरण करण्याचा दिवस असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. 

****

देशात गेल्या २४ तासांत कोरोना विषाणू संसर्गाचे नवे ४१ हजार ८१० रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या ९३ लाख ९२ हजार ९२० झाली आहे. या काळात या संसर्गामुळे ४९६ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख ३६ हजार ६९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४२ हजार २९८ असून आतापर्यंत ८८ लाख २ हजार २६७ रुग्ण यातून मुक्त झाले आहेत. सध्या ४ लाख ५३ हजार ९५६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर या संसर्गातून बरे होण्याचं प्रमाण ९३ पूर्णांक ६८ शतांश टक्के झालं आहे.

****

मुंबईत नव्या १ हजार ६३ रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या २ लाख ८१ हजार ८७४ झाली आहे. गेल्या २४ तासांत १७ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या १० हजार ७७३ झाली आहे. आतापर्यंत २ लाख ५५ हजारावर रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून सध्या १२ हजार ७५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

औरंगाबाद शहरात नाल्यात कचरा टाकण्याऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला आहे. आजपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं महापालिका प्रशासक तसंच आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी या संदर्भातल्या एका बैठकीत सांगितलं.

****

नाशिकचे रहिवासी असलेले, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे असिस्टंट कमांडर नितीन भालेराव नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झाले आहेत. छत्तीसगड मधील सुखमा इथं नक्षलवाद्यांनी काल रात्री केलेल्या बॉम्ब हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते, उपचारांदरम्यान त्यांना विरमरण आलं. असिस्टंट कमांडर नितीन भालेराव यांचं पार्थिव रायपूरहून विमानानं मुंबईला आणि तेथून नाशिक इथं आणलं जाणार असून  नाशिकमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

दक्षिण मध्य रेल्वेनं येत्या मंगळवारपासून वरंगल काझीपेठमार्गे नरसापूर नगरसोल ही विशेष रेल्वे गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

//***********//

 

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.11.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी ब...

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.11.2020 रोजीचे सकाळी 09.20 वाजेचे मराठी रा...

AKASHWANI AURANGABAD URDU NEWS BULLETIN 9.00 AM TO 9.10 AM 29-11-2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 November 2020 Time 07.10 to 07.25 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 November 2020

Time 07.10 to 07.25

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ नोव्हेंबर २०२० सकाळी ०७.१०

****

** देशातल्या तीन संशोधन संस्थांमध्ये कोविड 19 च्या लस संशोधन आणि उत्पादन प्रक्रियेचा पंतप्रधानांकडून आढावा

** कोविडची लस पुढच्या महिन्यात येण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ सौम्या स्वामीनाथन यांच्याकडून व्यक्त

** थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतीदिनी त्यांना सर्वत्र अभिवादन

** महात्मा फुले समता पुरस्कार ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांना प्रदान

** तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचं सरकार सर्वच क्षेत्रात कुचकामी-भाजपची टीका 

** राज्यात काल पाच हजार ९६५ नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात नव्या ४२९ रुग्णांची नोंद

** बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात बिबट्याचा काल एक महिला आणि तिच्या मुलावर हल्ला

** औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं एकाच कुटुंबातल्या तिघांची हत्या

आणि

** परभणी इथला शालेय विद्यार्थी अजय डाके याचं पंतप्रधानांकडून कौतुक

****

कोविड 19 च्या लससंशोधन आणि उत्पादन प्रक्रियेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशातल्या तीन संशोधन संस्थांना भेट देऊन आढावा घेतला, यामध्ये अहमदाबाद इथली जायडस बायोटेक पार्क, हैदराबाद इथली भारत बायोटेक आणि पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटचा समावेश आहे. काल सकाळी अहमदाबादमध्ये तर दुपारी हैदराबाद इथे विकसित होणाऱ्या लसीचा पंतप्रधानांनी आढावा घेतला, त्यानंतर सायंकाळी ते पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचले. जगातल्या या सर्वात मोठ्या लसनिर्मिती संस्थेत विकसित होत असलेल्या कोव्हिशील्ड लसीसंदर्भात पंतप्रधानांनी माहिती जाणून घेतली. सुमारे ५० मिनिटांच्या या चर्चेत सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांच्यासह संस्थेतले शास्त्रज्ञ, संशोधकांनी पंतप्रधानांना लसनिर्मितीतल्या टप्प्यांबाबत माहिती दिली.

लस संशोधन आणि उत्पादन प्रक्रियेत कार्यरत असलेल्या तीनही संस्थांमधल्या सर्व चमूचं पंतप्रधानांनी कौतुक आणि अभिनंदन केलं असून, भारत सरकार संपूर्ण पाठिंब्यासह सक्रियपणे या सर्वांसोबत कार्यरत असल्याचं, पंतप्रधानांनी एका ट्विट संदेशात म्हटलं आहे.

दरम्यान पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर पत्रकारांशी बोलताना अदर पुनावाला यांनी, भारतात लस वितरणाला प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं. लसीची किंमत सर्वांना परवडणारी असेल, तसंच जुलै महिन्यापर्यंत या लसीचे ४० कोटी डोस पुरवले जातील, असंही पुनावाला यांनी सांगितलं.

देशात कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीची प्रक्रिया निर्णायक टप्प्यावर आली असताना पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे आणि या क्षेत्रातल्या शास्त्रज्ञांबरोबरच्या चर्चेमुळे आगामी लसीकरण, त्यातली संभाव्य आव्हानं, आणि त्याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी मदत होणार असल्याचं, पंतप्रधान कार्यालयानं आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ७१वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे

****

कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठीची लस पुढच्या महिन्यातही येऊ शकते, असा विश्वास जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केला आहे. लातूर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेअंतर्गत काल कोविड विषयावर सामाजिक संपर्क माध्यमातून त्या बोलत होत्या. या लसीचं संशोधन आणि चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत, एक ते दोन कंपन्यांची लस ही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होईल, आणि मार्च एप्रिल मध्ये ही लस मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार असल्याचं, स्वामिनाथन यांनी सांगितलं. या व्याख्यान उपक्रमात द व्हॅकसिन्स अलायन्स संस्थेच्या डॉ रंजना कुमार, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.

****

नवी मुंबईतल्या कोविड चाचणी घोटाळ्याप्रकरणी मनपा आरोग्य अधिकारी आणि कोविड चाचणी समन्वयक डॉ. सचिन नेमाने यांना निलंबित करण्यात आलं आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती, या समितीने दिलेल्या अहवालानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

****

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोरोना विषाणू संसर्गाविषयी जनजागृती मोहीम सुरु केली आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क लावणं, वारंवार हात धुणं आणि एकमेकात सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन नांदेड इथले ज्येष्ठ साहित्यक देविदास फुलारे यांनी केलं आहे.

****

थोर समाज सुधारक, स्त्रीशिक्षणाचे प्रणेते, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मंत्रालयात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही महात्मा फुले यांना अभिवादन केलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचार, शेतकरी- बहुजन समाजाबद्दलचं धोरणच राज्याला तसंच देशाला विकासाच्या वाटेवर पुढे घेऊन जाईल, असं पवार यांनी म्हटलं आहे.

औरंगाबाद इथं औरंगपुरा परिसरात असलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

****

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा महात्मा फुले समता पुरस्कार काल पुण्यात ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांना समता परिषदेचे अध्यक्ष तथा राज्याचे अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, एक लाख रुपये, मानपत्र, आणि स्मृती चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. या पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलताना भुजबळ यांनी, महात्मा फुले यांना भारतरत्न मिळाला नाही म्हणून त्यांचं मोठेपण कमी होत नाही, असं मत व्यक्त केलं. मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाचा विरोध नाही, मात्र ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी रस्त्यावर येऊन ताकद दाखवण्याची गरज, भुजबळ यांनी व्यक्त केली.

या पुरस्कारला उत्तर देताना डॉ लहाने यांनी आपण हा पुरस्कार आपल्या आईला आणि उपचार केलेल्या रुग्णांना समर्पित करत असल्याचं सांगितलं. कोविड प्रादुर्भावाला आपण यशस्वीपणे रोखू शकतो त्यासाठी मास्क लावणं ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं डॉ लहाने यांनी नमूद केलं.

****

राज्यातल्या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचं सरकार सर्वच क्षेत्रात कुचकामी ठरल्याची टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या उणीवा निदर्शनास आणून देण्यासाठी भाजपतर्फे राज्यभरात घेतल्या जात असलेल्या पत्रकार परिषदांच्या श्रुंखलेत ते काल नागपूर इथं बोलत होते. शिवसेनेनं निवडणूक जाहीरनाम्यात दिलेलं, घरगुती वीज देयकात ३०टक्के सवलतीचं आश्वासन, पाळलं नाही, उलट कोविडच्या संकटात विजेचे दर वाढवल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली.

****

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारकडून घोळ होत असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ठाकरे सरकारच्या वर्षभराच्या कमागिरीवर भारतीय जनता पक्षानं काल मुंबईत 'ठाकरे सरकारची काळी पत्रिका' या पुस्तिकेचं प्रकाशन केलं, त्यावेळी फडणवीस बोलत होते. मराठा आरक्षण कायदा करताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे आपल्या सरकारनं सुनिश्चित केलं होतं, असंही फडणवीस म्हणाले. हे सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरलं असून, महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याची टीका फडणवीस यांनी केली. 

****

जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर इथं दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले मराठा बटालियनचे सैनिक यश देशमुख यांच्या पार्थिव देहावर काल जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यात पिंपळगाव इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सैन्य दल तसंच पोलीस प्रशासनातर्फे बंदुकीच्या चार फैरी झाडून देशमुख यांना मानवंदना देण्यात आली

****

पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी पंढरपूर तालुक्यात सरकोली या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी काल सकाळी पंढरपुरात शिवतीर्थावर भालके यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठा जनसागर लोटला. भालके यांच्या निधनाबद्दल विविध पक्षांचे नेते तसंच समाजाच्या सर्वच क्षेत्रातल्या मान्यवरांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

****

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुरेंद्र भास्कर थत्ते यांचं नाशिक इथं शुक्रवारी मध्यरात्रीनंतर निधन झालं, ते ८० वर्षांचे होते. आणिबाणी विरोधात लढा, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची ऐतिहासिक रामरथ यात्रा तसंच एनरॉन विरोधी लढ्यात थत्ते यांचं मोठं योगदान होतं. त्यांच्या पार्थिव देहावर काल नाशिक इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

राज्यात काल आणखी पाच हजार ९६५ कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख १४ हजार ८१५ झाली आहे. काल तीन हजार ९३७ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत १६ लाख ७६ हजार ५६४ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातूनमुक्त झाले असून, सध्या राज्यात ८९ हजार ९०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याचा कोविड संसर्गमुक्तीचा दर ९२ पूर्णांक ४ दशांश टक्के झाला आहे.

****

मराठवाड्यात काल सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ४२९ रुग्णांची नोंद झाली. बीड जिल्ह्यात काल ३ कोविडग्रस्तांचा, उस्मानाबाद जिल्ह्यात दोन तर नांदेड जिल्ह्यात काल एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात काल नवे १२० रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात ६४, नांदेड ६१, बीड ६० जालना ३६, उस्मानाबाद ३२, हिंगोली ३१, तर परभणी जिल्ह्यात काल २५ नवे रुग्ण आढळले.

****

बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात बिबट्याने काल एक महिला आणि तिच्या मुलावर हल्ला केला. शिलावती दिंडे आणि अभिषेक दिंडे अशी त्यांची नावं असून, बिबट्याच्या हल्ल्यात हे दोघं गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आष्टीच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आष्टी तालुक्यात या आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं एकाच कुटुंबातल्या तीन जणांची हत्या झाल्याची घटना काल पहाटे निदर्शनास आली. पती, पत्नी आणि त्यांच्या नऊ वर्षीय मुलीचा मृतांमध्ये समावेश आहे, तर सहा वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

जालना इथं औद्योगिक वसाहतीतल्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचं एटीएम २८ लाख रुपयांच्या रोकडसह चोरट्यांनी पळवून नेलं. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजेच्या सुमारास पांढऱ्या स्कॉर्पिओ जीपमधून आलेल्या चोरट्यांनी एटीएम मशीनलाच दोरखंड बांधून गाडीच्या मदतीने मशीन ओढून काढल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.

****

परभणीतल्या बालविद्या मंदीर शाळेत सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या अजय जितेंद्र डाके या विद्यार्थ्याच्या कलागुणांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर...

 

परभणी येथील बालविद्या मंदिरचा विद्यार्थी अजय जितेंद्र डाके याने पंतपधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यासोबत रेखाचित्र काढून त्यांना पाठवलं होतं. पंतप्रधानांनी अजयच्या चित्रकलेचं मुक्तकंठाने कौतुक करत, या कलेच्या माध्यमातून आपले मित्र आणि आसपासच्या लोकांना सामाजिक संबंधांच्या मुद्यांप्रती सजग करण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला दिला आहे. अजयने पत्रातून व्यक्त केलेल्या देशाबद्दलच्या भावनेचंही पंतप्रधानांनी कौतुक केलं आहे. विनोद कापसीकर आकाशवाणी वार्ताहर परभणी

****

औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी परभणी जिल्ह्यात ३२ हजार ७१५ पदवीधर मतदारांसाठी ७८ मतदान केंद्रं उभारण्यात आली असल्याचं, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितलं आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात ७४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदारांनी निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यात प्रशासनास सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पदवीधर मतदारांना आपल्या मतदान केंद्राचा तपशील समजावा, यासाठी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

//*************//