आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Monday, 31 August 2020
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 31 AUGUST 2020 TIME – 18.00
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 August 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ ऑगस्ट २०२० सायंकाळी ६.००
****
** माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी
यांचं निधन
**
अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी राज्यसरकार
यूजीसीकडे करणार
**
कष्टकरी स्त्रियांना आर्थिक साक्षर करण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवणार
- महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती
**
दहा दिवसात नियमावली तयार करून प्रार्थना स्थळं न उघडल्यास, पुन्हा आंदोलनाचा विधीज्ञ
प्रकाश आंबेडकर यांचा इशारा
आणि
**
उद्या अनंत चतुर्दशी; नांदेड, परभणी तसंच लातूर इथं गणेश विसर्जनासाठी कृत्रीम तलावांसह
विशेष व्यवस्था
****
देशाचे
१३ वे राष्ट्रपती पद भूषवलेले भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचं आज निधन झालं. ते ८४ वर्षांचे
होते. त्यांचे पुत्र अभिजीत यांनी ट्वीटरवरून ही माहिती दिली. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे
दीर्घकाळ सदस्य राहिलेल्या मुखर्जी यांनी केंद्र सरकारमध्ये अनेक पदं भूषवली. भारतीय
राजकारणात अमूल्य सेवेसाठी त्यांना २००८ साली पद्मविभूषण या पुरस्कारानं तसंच आठ ऑगस्ट
२०१९ रोजी भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मुखर्जी यांनी आपल्या
‘द कोलिएशन इयर्स: १९९६ टू २०१२’ या पुस्तकात आपल्या राजकीय कारकीर्दीबद्दल भाष्य केलं
आहे.
****
विद्यापीठांच्या
अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी विद्यापीठ
अनुदान आयोग -यूजीसीकडे करणार असल्याचं, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय
सामंत यांनी सांगितलं आहे. ते आज माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. औरंगाबादचं डॉ बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, तसंच नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठासह
बहुतांश विद्यापीठांनी परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदत
मागितल्याचं सामंत यांनी सांगितलं. ७ लाख ९२ हजारावर विद्यार्थी ही परीक्षा देतील,
मात्र त्यांना घराबाहेर न पडता, घरीच बसून परीक्षा देता यावी, याबाबत विचार करण्यासाठी
एका दिवसाचा वेळ विद्यापीठांनी मागितला असल्यानं, पुढच्या दोन दिवसांत यूजीसीकडे याबाबत
मागणी करणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं.
विद्यार्थ्यांना
या परीक्षेची तयारी करण्यासाठी संपूर्ण सप्टेंबर महिना मिळेल, आणि ऑक्टोबर महिन्याच्या
पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतल्या जातील, ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निकाल
लावला जाईल, आणि ही परीक्षा कमी गुणांची असेल, अशी माहितीही सामंत यांनी दिली.
****
न्यायालय
अवमानना प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं ठोठावलेला एक रुपया दंड भरणार असून पुनरावलोकन
याचिका दाखल करण्याचा अधिकार राखून ठेवणार असल्याचं ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी
सांगितलं आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या निकालानंतर माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया
देताना ते बोलत होते. न्यायव्यवस्थेबद्दल आपल्याला आदर आहे. सर्वोच्च न्यायालयाचा किंवा
न्यायव्यवस्थेचा अनादर करण्याचा आपला हेतू नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
****
कष्टकरी
स्त्रियांना आर्थिक साक्षर करण्यासाठी महिला आणि बालविकास विभागाकडून प्रशिक्षण कार्यक्रम
राबवण्यात येईल, असं राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं
आहे. घरकाम करणाऱ्या एका महिलेला हिशेब येत नसल्याची चित्रफित सामाजिक माध्यमांवर फिरत
आहे. त्या अनुषंगानं बोलताना, ठाकूर यांनी, प्रामाणिकपणे कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या
माता-भगिनींची थट्टा न करता त्यांना आर्थिक साक्षर करून सक्षम करणे, ही सर्वांची जबाबदारी
असल्याचं सांगितलं. हिशेब न आल्यामुळे कष्टकरी स्त्रियांची कुणीही खिल्ली उडवू नये.
त्यांच्या प्रामाणिक कष्टाची कदर आणि सन्मान केला पाहिजे, असं मतही ठाकूर यांनी व्यक्त
केलं.
****
दहा
दिवसात नियमावली तयार करून राज्यातली प्रार्थना स्थळं उघडण्याचं आश्वासन सरकारनं दिलं
असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे नेते विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. राज्यातली
प्रार्थना स्थळं खुली करण्याच्या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर यांनी आज पंढरपूरच्या श्री
विठ्ठल मंदीर परिसरात आंदोलन केलं. यावेळी आंबेडकर यांच्यासह पंधरा जणांना मंदिरात
जाऊन दर्शन घेण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर ते बोलत होते. दहा दिवसात मागणी
मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान या आंदोलनावेळी
कोविड प्रतिबंधाबाबतचे कोणतेही नियम पाळले गेले नसल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
अभिनेता
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं आज गोव्यातला हॉटेल व्यावसायिक
गौरव आर्य याची चौकशी केली. सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचीही आज सलग
चौथ्या दिवशी चौकशी करण्यात आली.
****
मुंबई
महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे वांद्रे-कुर्ला संकुलात वाहतुकीची समस्या कमी
करण्यासाठी सार्वजनिक सायकल सेवा सुरू करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास
प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए राजीव यांच्या हस्ते या सार्वजनिक सायकल सेवेला सुरुवात
करण्यात आली. सार्वजनिक सायकल सेवेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि युलू
संस्थेसोबत सामंजस्य करार झाला आहे. ‘वांद्रे आणि कुर्ला रेल्वे स्थानकातून वांद्रे-कुर्ला
संकुलात दररोज किमान तीन लाख नागरिक प्रवास करून येतात, ते या सार्वजनिक सायकल सेवेचा
लाभ घेऊ शकतात.
****
दहा
दिवसीय गणेशोत्सवाचा उद्या अनंत चतुर्दशीला समारोप होत आहे, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर गणेश मूर्तींचं विसर्जन सर्वत्र साधेपणाने करण्याचं आवाहन शासनानं केलं
आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, तसंच शक्य असल्यास घरी बसवलेल्या
गणेश मूर्तींचे घरीच विसर्जन करावं असं आवाहनही सर्व जिल्ह्यांच्या स्थानिक प्रशासनानं
केलं आहे.
नांदेड
शहरात गणेश मूर्ती विसर्जनासाठी नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या वतीने कृत्रिम तलाव
तयार करण्यात आले आहेत.
लातूर
जिल्ह्यात गणेश मूर्ती संकलन केंद्र उभी करून त्या ठिकाणी मूर्ती जमा कराव्यात, त्यांचे
विधीपूर्वक विसर्जन केले जाईल असं आवाहन लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलं
आहे.
परभणी
जिल्ह्यातही गणेश मूर्तींच्या संकलन आणि विसर्जनासाठी ४० वाहनांची महानगरपालिका प्रशासनाने
व्यवस्था केली असून ती वाहनं सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत नागरीकांच्या घरापर्यंत
जाऊन गणेश मूर्ती आणि निर्माल्याचे संकलन करणार आहेत. संकलित मूर्तींसह निर्माल्याचे
विसर्जन वसमत रस्त्यावरील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात तयार करण्यात आलेल्या कृत्रीम
तलावात केलं जाणार असल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे.
****
धुळे
जिल्ह्यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या कोरोना विलगीकरण कक्षात रुग्णसेवा देणाऱ्या
२८ वर्षीय अधिपरिचारीकेचा काल कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत
या परिचारिकेसह तीन डॉक्टरांचा या आजारानं मृत्यू झाला आहे. दरम्यान, धुळे जिल्ह्यात
आज २० जण कोरोना विषाणू बाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली रुग्णसंख्या ८ हजार ४६१
झाली आहे.
****
चंद्रपूर
जिल्ह्याचे आमदार किशोर जोरगेवार यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. जोरगेवार यांची
काल जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती. आपल्या संपर्कात आलेल्यांनी तपासणी
करून घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
लातूर
जिल्ह्यात रिक्षातून प्रवास करताना कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये यासाठी श्री औसा
हनुमान गणेश मंडळाच्या वतीनं ऑटोरिक्षात चालक आणि प्रवासी यांच्या मधील जागेत प्लास्टिकचा
पडदा लावण्याचा उपक्रम राबवण्यात आला. शहरातील किमान दोन हजार ऑटोरिक्षात प्लास्टिकचे
पडदे बसवण्याचा संकल्प या गणेश मंडळानं केला आहे.
****
अहमदनगर
जिल्ह्यात ७०० कोरोना विषाणू बाधित रुग्णांना उपचारानंतर प्रकृती सुधारल्यामुळे आज
रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामुळे जिल्ह्यात आता बरे झालेल्यांची संख्या १७ हजार
८७६ इतकी झाली आहे. तर ३ हजार ९१ जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २१ हजार
२५७ जणांना या विषाणूची लागण झाली आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या २३ हजार १५० झाली आहे. यापैकी सुमारे
१८ हजार रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ६८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या साडे
चार हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
वैद्यकीय
शिक्षण प्रवेशासाठी असलेला ७०-३० चा नियम मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा
असून तो तत्काळ रद्द करावा, अशी मागणी खासदार सुधाकर श्रृंगारे आणि माजी आमदार शिवाजीराव
पाटील कव्हेकर यांनी केली. या मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे
पाठवलं आहे.
****
मुंबई
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी मराठवाडा महसूल विभागाचे अशोक डक यांची तर
पुणे महसूल विभागातून महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय वाडकर यांची उपसभापती पदी बिनविरोध
निवड झाली. बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली.
****
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.08.2020 रोजीचे दुपारी 13.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31
August 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ ऑगस्ट २०२० दुपारी १.०० वा.
****
न्यायालय अवमानना प्रकरणी ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण
यांना सर्वोच्च न्यायालयानं एक रुपया दंड ठोठावला आहे. हा दंड भरण्यास त्यांना १५ सप्टेंबरपर्यंत
मुदत देण्यात आली आहे. भूषण यांनी निर्धारित मुदतीत एक रुपया दंड भरला नाही, तर त्यांना
वकिली करण्यास तीन वर्षांची बंदी तसंच तीन महिने कारावास भोगावा लागणार आहे.
****
पूर्व लडाख मधल्या पँगोग त्सो तलावाजवळ भारत आणि चीनच्या
सैन्यामध्ये गेल्या दोन दिवसांत झटापट झाली आहे. चिनी सैन्यानं काल मध्यरात्री लष्करी
नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हालचाली केल्या, त्यांना आळा घालण्यासाठी भारतीय सैन्यानं
हालचाल केल्याचं लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी सांगितलं आहे. दरम्यान, भारत
आणि चीन सैन्याच्या अधिकाऱ्यांमध्ये लडाख इथंच ब्रिगेड कमांडर स्तरावर सध्या चर्चा
सुरू आहे. चिनी सैन्यानं नव्यानं केलेल्या झटापटीतून यापूर्वी झालेल्या बैठकीतल्या
निर्णयाचं उल्लंघन केलं असल्याचं, सैन्य दलानं म्हटलं आहे.
****
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती गंभीर झाली
आहे. मेंदूत गुठळी झाल्यानं, मुखर्जी यांच्यावर दिल्लीतल्या सैन्य रुग्णालयात गेल्या
दहा ऑगस्टला शस्त्रक्रिया करण्यात आली, तेव्हापासून ते कोमात असून, त्यांना कृत्रीम
श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आलेलं आहे. त्यांच्या फुफ्फुसांतला संसर्ग वाढला असल्याचं
रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. मुखर्जी यांना कोविडचा संसर्गही झालेला आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रकृती सुधारल्यानं,
त्यांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. शाह यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे
१८ ऑगस्ट रोजी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
****
देशात कोवीड-19 या आजारानं बरे होण्याचा दर ७६ पूर्णांक
६२ शतांश टक्के एवढा झाला आहे. कोविड संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता
२७ लाख ७४ हजार आठशे एक झाली असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं
आहे. तपासण्यांचं वाढतं प्रमाण तसंच योग्य उपाययोजना, यामुळे या आजारानं होणाऱ्या मृत्यूचा
दर कमी झाला असून, सध्या तो १ पूर्णांक ७८ टक्के इतका झाला आहे. देशात काल ७८ हजार
५१२ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले असून देशात या आजारानं बाधित होणाऱ्या रुग्णांचा
आकडा ३६ लाख २१ हजार २४५ झाला आहे. सध्या देशात ७ लाख ८१ हजार ९७५ रुग्णांवर उपचार
सुरू आहे
आतापर्यंत देशात ४ कोटी २३ लाख तपासण्या झाल्या असून सध्या
१ हजार चार सरकारी आणि ५८३ खाजगी प्रयोगशाळांमध्ये या तपासण्या करण्यात येत आहेत.
****
१ जानेवारी २०२० नंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे व्यवहार
केलेल्या नागरिकांकडून वसूल केलेलं शुल्क त्वरित परत करण्याचे निर्देश केंद्रीय अर्थमंत्रालयानं
बँकांना दिले आहेत. यापुढे इलेक्ट्रानिक माध्यमातून रुपे कार्ड, भीम-यूपीआई, यूपीआई
क्यू आर कोड आणि भीम-यूपीआई क्यू आर कोडच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना
बँकांनी कोणतेही शुल्क आकारू नये असं या अधिसूचनेत म्हटलं आहे. यासंदर्भात केंद्रीय
प्रत्यक्ष कर मंडळानं गेल्या वर्षी ३० डिसेंबरला अधिसूचनाही जारी केलेली आहे.
****
पालघर जिल्ह्यातल्या गडचिंचले गावात १६ एप्रिल रोजी झालेल्या
दोन साधू आणि एक चालक अशा तिहेरी हत्याकांड प्रकरणात कासा पोलीस ठाण्याचे तत्कालीन
प्रभारी अधिकारी आनंद काळे, उपनिरीक्षक रवी साळुंखे आणि हवालदार नरेश धोडी यांना बडतर्फ
करण्यात आलं आहे. यापूर्वी पाच पोलिसांना बडतर्फ करण्यात आलं असून एका पोलीस अधीक्षकाला
सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. तर कासा पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या ३५ पोलीस
कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत.
****
पंढरपूर इथलं श्री विठ्ठल मंदीर उघडण्याच्या मागणीसाठी
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आज पंढरपुरात मंदिरासमोर आंदोलन सुरू केलं
आहे. यावेळी मंदीर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदीर परिसरात आंदोलक
मोठ्या संख्येनं जमले असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यात अकोला आणि यवतमाळ हे दोन जिल्हे वगळता उर्वरित
सर्व जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा सुमारे १७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार अकोला आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यातच सरासरीच्या
२५ टक्के कमी पाऊस झाला आहे. दरम्यान, उद्या सकाळपर्यंत कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य
महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
आहे.
****
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.08.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३१
ऑगस्ट २०२० सकाळी ११.०० वाजता
****
देशात
कोविड रुग्णांचा बरे होण्याचा दर ७६ पूर्णांक ६१ शतांश टक्के एवढा झाला आहे. कोविड
संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता २७ लाख ७४ हजारावर पोहोचली असल्याचं,
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
****
केंद्रीय
गृहमंत्री अमित शाह यांची प्रकृती सुधारल्यानं, त्यांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात
आली. शाह यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे १८ ऑगस्ट रोजी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात
दाखल करण्यात आलं होतं.
****
पालघर
इथं जमावाकडून झालेल्या साधूंच्या हत्या प्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात
आलं आहे. यात एका सहाय्यक पोलिस निरीक्षकासह दोन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश
आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात फुलंब्री पंचायत समितीचे माजी उपसभापती रविंद्र लहाने यांचं अपघाती निधन
झालं. खुलताबादहून परतत असताना त्यांचं दुचाकीवरचं नियंत्रण सुटून, दुचाकी रस्त्यावर
उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाला धडकली. फुलंब्री - खुलताबाद मार्गावर हा मार्गावर अपघात
झाला.
****
भंडारा
जिल्ह्यातल्या वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत घट होत असून या नद्यांना येणाऱ्या
संभाव्य पुराचा धोका कमी झाला आहे.
दरम्यान,
औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी नव्वद टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
धरणात सध्या घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे.
****
केरळ राज्यबांधव
आज ओणम हा सण साजरा करत आहेत. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या
आहेत. समाजातल्या बंधुभाव आणि सलोख्याचं प्रतिक असलेला हा सण म्हणजे शेतकऱ्यांच्या
कष्टाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट संदेशात
म्हटलं आहे.
****
Date : 31 August 2020
Time: 09 : 00 to 09: 10 AM
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۳۱ٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗ ؍ اگست ۲۰۲۰ئ
وَقت: صبح ۰۰۔۹ سے ۱۰۔۹؍ بجے
٭
وزیر اعظم نریندر مودی نے ملک کو تمام شعبوں میں خود کفیل بنا نے کی عوام سے کی اپیل
٭
ریاست میں لاک ڈائون کے دوران رعایت کرنے سے متعلق قواعد و ضوابط آج جاری کیے جانے کی توقع
٭
ریاست میں گزشتہ روز16؍ ہزار 408؍ افراد کورونا وئرس سے متاثر ‘
296؍ مریض دوران علاج چل بسے
٭
شطرنج کے آن لائن عالمی اولمپیاڈ مقابلوں میں بھارت کو ملا طِلائی تمغہ
یہ 15؍ ویں قسط تھی۔ اپنے خطاب میں وزیر اعظم نے کہا کہ ملک کو خود کفیل بنا نے کے لیے تمام شعبۂ جات کی شرح نمو میں اضا فہ کرنا ضروری ہے۔ اُنھوں نے کہا کہ ملک کو در پیش مسائل حل کرنے کے لیے نوجوان نسل کی صلاحیتوں اور تخیل کااستعمال کیا جا نا چا ہیے۔
اِس سال کورونا وائرس کی وباء کے سبب تمام تہوار اور دیگر تقاریب سادگی سے منا نے اور ملک کے باشندوں کی جانب سے ذمہ داری کا مظا ہرہ کیے جانے پر وزیر اعظم نے اطمینان کا اظہار کیا ۔اپنی تقریر میں اُنھو ںنے کہا کہ ملک کے بچوں کو جدید کھلو نے کیسے فراہم کیے جا سکتے ہیں اور بھارت کھلو نے تیار کرنے والا سب سے بڑا ملک کیسے بن سکتا ہے اِس پر غورو خوص کیا جا رہا ہے۔
اپنی مخا طبت میں وزیر اعظم نے کاشتکاروں کی بھی خوب ستائش کی اور کہا کہ اِس وباء کے دوران بھی کاشتکاروں نے اپنی صلاحیوں کو ثابت کیا ہے ۔ اِس سال زرعی پیداوار میں ہوئے اضافے کے لیے اُنھوں نے کاشتکاروں کو مبارکباد پیش کی۔اُنھوں نے بتا یا کہ ملک کی آ ب و ہوا کے مطا بق اور علاقائی فصلوں کی معلو مات پر مبنی بھارتی کر شی کوش تیار کرنے کا کام جاری ہے۔
وزیر اعظم نے اساتذہ کا ذکر کر تے ہوئے کہا کہ اساتذہ کے سامنے تبدیلی کا ایک بڑا چیلنج ہے جسے اساتذہ نے ایک موقعے کے طور پر قبول کیا ہے جس سے بڑی خوشی محسوس ہو تی ہے۔
UPI QR Code‘ اور BhimU UPI QR Code کے ذریعے لین دین کرنے والے صارفین پر کسی بھی قسم کی فیس عائد نہ کی جائے ۔
***** ***** *****
***** ***** *****
30؍ ستمبر تک اسکولس اور کالجیز بند رکھنے کو کہا گیاہے پھر اِس دوران گریجویشن اور پوسٹ گریجویشن کے آخری سال کے امتحانات کیسے لیے جا سکتے ہیں۔ خیال رہے کہ یو نیور سیٹی گرانٹس کمیشن کی جانب سے 30؍ ستمبر تک مذکورہ امتحا نات لینے کا حکم دیے جا نے پس منظر میں سامنت نے کل ٹوئیٹر پر یہ سوال پو چھا ہے۔ ریاست میں گریجویشن اور پوسٹ گریجویشن کے آخری سال کے امتحانات لینے سے متعلق تشکیل دی گئی
6؍ رکنی کمیٹی آج اپنی رپورٹ پیش کرے گی۔
***** ***** *****
***** ***** *****
***** ***** *****
689؍ ہو گئی ہے۔ اِسی دوران کَل296؍ کورونا مریض علاج کے دوران انتقال کر گئے ۔ اِن اموات کے بعد ریاست بھر میںکورونا وائرس کے سبب وفات پانے والوں کی تعداد 24؍ ہزار399؍ تک جا پہنچی ہے۔
دوسری جانب زیر علاج مریضوں میں سے7؍ ہزار690؍ افراد کَل شفایاب ہو کر اپنے گھر لوٹ گئے ۔ ریاست بھر میں تا حال 5 ؍ لاکھ 62؍ ہزار 401؍ افراد علاج کے بعد کورونا وائرس سے نجات پا کر صحت یاب ہو چکے ہیں اور فی الحال ریاست میں ایک لاکھ93؍ ہزار528؍ کورونا مریض زیر علاج ہیں۔
***** ***** *****
مراٹھواڑے میں گزشتہ کَل مجموعی طور پر کوروناوائر سے متاثرہ 28؍ مریض علاج کے دوران انتقال کر گئے ۔ جبکہ مزیدایک ہزار 323؍ افراد کورونا وائرس کی زد میں آگئے ہیں۔
اورنگ آ باد ضلعے میں کَل 5؍ کورونا مریضوں کی موت واقع ہو گئی ۔جبکہ مزید239؍ افراد کورونا وائرس سے متاثر پائے گئے ہیں۔ لاتور ضلعے میں6؍ کورونا مریضوں کی کل موت واقع ہو گئی۔ جبکہ 265؍ افراد کورونا وائرس کے نر غے میں آ گئے ۔ ناندیڑ ضلعے میں کورونا وائرس سے متاثرہ 5؍ مریض کل وفات پا گئے ۔ جبکہ مزید301؍ افراد کورونا وائرس سے متاثر ہونے کا انکشاف ہوا۔ بیڑ ضلعے میں 5؍ کورونا مریض کل دوران علاج وفات پا گئے اور مزید94؍ افراد کورونا وائرس سے متاثر پائے گئے۔ عثمان آ باد ضلعے میں بھی گزشتہ روز4؍ کورونا مریضوں نے علاج کے دوران دم توڑ دیا ۔ جبکہ مزید207؍ کورونا مریضوں کی نشاندہی ہوئی ۔ جالنہ ضلعے میں زیر علاج کورونا مریضوں میں سے کَل2؍ مریضوں کی موت واقع ہو گئی جبکہ مزید116؍ کورونا مریضوں کی موجود گی کی تصدیق ہوئی ۔ پر بھنی ضلعے میں بھی کَل ایک کورونا مریض علاج کے دوران چل بسا جبکہ 64؍ افراد کورونا وائرس سے متاثر پائے گئے ۔ ہنگولی ضلعے میں بھی گزشتہ روز مزید37؍ افراد کورونا وائر س سے متاثر پائے گئے ہیں ۔
***** ***** *****
***** ***** *****
***** ***** *****
اِس سال کورونا وائرس کی وباء کو مد نظر رکھتے ہوئے ملک بھر میں چنندہ مقامات پر ہی تعزیہ جلوس نکالنے کی اجا زت دی گئی تھی۔
***** ***** *****
شطرنج کے آن لائن عالمی اولمپیاڈ مقابلوں میں بھارت نے پہلی مرتبہ طِلائی تمغہ حاصل کیا ہے۔ مقابلے کے دوران اِنٹر نیٹ
***** ***** *****
٭
وزیر اعظم نریندر مودی نے ملک کو تمام شعبوں میں خود کفیل بنا نے کی
عوام سے کی اپیل
٭
ریاست میں لاک ڈائون کے دوران رعایت کرنے سے متعلق قواعد و ضوابط آج جاری کیے جانے کی توقع
٭
ریاست میں گزشتہ روز16؍ ہزار 408؍ افراد کورونا وئرس سے متاثر ‘
296؍ مریض دوران علاج چل بسے
٭
شطرنج کے آن لائن عالمی اولمپیاڈ مقابلوں میں بھارت کو ملا طِلائی تمغہ
علاقائی خبریں ختم ہوئیں۔
٭٭٭٭٭
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.08.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 August 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ ऑगस्ट २०२० सकाळी ७.१० मि.
****
· देशाला प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं
देशवासियांना आवाहन; बीडच्या रॉकी श्वानाच्या कार्याचा पंतप्रधानाकडूने गौरव.
· सरकारी नोकरीची तीस वर्ष आणि वयाची ५०
ते ५५ वर्ष पूर्ण केलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवेचा आढावा घेण्याचे कार्मिक
मंत्रालयाचे आदेश.
· इलेक्ट्रानिक माध्यमाद्वारे व्यवहार केलेल्या नागरिकांकडून वसूल केलेले शुल्क
त्वरीत परत करण्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या बँकांना सूचना.
· राज्यातल्या टाळेबंदीमध्ये सवलती देण्यासंदर्भातली नियमावली आज जाहीर होण्याची
शक्यता.
· राज्यात काल १६ हजार ४०८ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद २९६ जणांचा
उपचारादरम्यान मृत्यू.
· मराठवाड्यात २८ बाधितांचा मृत्यू, तर नव्या १ हजार ३२३ रुग्णांची नोंद.
आणि
· जागतिक ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत भारताला प्रथमच सुवर्ण पदक.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी देशवासियांना देशाला प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनवण्याचं आवाहन केलं
आहे. आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात ते काल नागरिकांशी संवाद साधत होते.
या मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला पंधरावा भाग काल प्रसारित झाला. स्वावलंबी भारतासाठी
प्रत्येक क्षेत्रात वृद्धी दर वाढवणं आणि देशाचा विकास आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
देशाच्या समस्या निवारण करण्यासाठी तरुण पिढीची क्षमता आणि कल्पकता यांचा उपयोग करून
घ्यायला हवा असंही पंतप्रधान म्हणाले. देशातल्या मुलांना नवनवीन खेळणी कशी मिळू शकतील,
खेळणी उत्पादन करण्यामध्ये भारत एक मोठं केंद्र कसं बनू शकेल, यावर विचार सुरु असल्याचं
ते म्हणाले.
कोरोना विषाणूच्या
संकटातही शेतकरी बांधवांनी आपली क्षमता सिद्ध केली असं सांगून त्यांनी यावर्षी शेती
उत्पादनात झालेल्या वाढीबद्दल शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं. आपल्या देशाच्या ऋतुमानानुसार
आणि प्रदेशांनुसार पिकांची माहिती देणारा ‘भारतीय कृषी कोष’ तयार करण्याचं काम सुरू
असल्याचं त्यांनी सांगितलं.
देशाच्या सुरक्षा
व्यवस्थेमध्ये श्वानांची भूमिका महत्वाची असते असं सांगून पंतप्रधानांनी, बीड पोलिसांनी
आपला साथीदार श्वान ‘रॉकी’ याला संपूर्ण सन्मानानं अखेरचा निरोप दिला होता, या भावूक
प्रसंगाचा उल्लेख केला. ते म्हणाले –
कुछ दिन पहले
ही आपने शायद टीव्ही पर एक बडा भाऊक करनेवाला दृश्य देखा होगा। जिसमें बीड पुलिस अपने
साथी डॉग रॉकी को पुरे सम्मान के साथ आखरी बिदाई दे रहे थे। रॉकी ने तिनसौ से जादा
केसों को सुलझाने मे पुलिस की मदत की थी। डॉग की डिझास्टर मॅनेजमेंट और रेस्क्यू
मिशन्स में भी बहोत बडी भूमिका होती है।
****
सरकारी नोकरीची
तीस वर्ष आणि वयाची ५० ते ५५ वर्ष पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या आतापर्यंतच्या सेवेचा
आढावा घेण्याचे आदेश कार्मिक मंत्रालयानं सर्व सरकारी विभागांना दिले आहेत. यातील अकार्यक्षम
आणि भ्रष्ट कर्मचाऱ्यांना जनहिताच्या दृष्टीने मूदतपूर्व निवृत्त करण्यात येईल, असं
कार्मिक मंत्रालयाच्या आदेशात म्हटलं आहे. सेवेतील ३० वर्ष पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी
५० ते ५५ वर्ष वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जनहिताच्या दृष्टीने सरकार कधीही निवृत्त
करु शकतं, असं मंत्रालयानं नमूद केलं आहे. या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची नोटीस देणं
बंधनकारक असून, त्यांना निवृत्तीवेतन मिळतच राहणार आहे. या सर्व आढाव्यांच्या नोंदीविषयी
एक रजिस्टर तयार करण्याची सूचना या आदेशात करण्यात आली आहे.
****
१ जानेवारी
२०२० नंतर इलेक्ट्रानिक माध्यमाद्वारे व्यवहार केलेल्या नागरिकांकडून वसुल केलेले शुल्क
त्वरीत परत करण्याचे आदेश केंद्रीय अर्थमंत्रालयानं बँकांना दिले आहेत. यापुढे इलेक्ट्रानिक
माध्यमातून केल्या जाणाऱ्या कोणत्याही व्यवहारांवर शुल्क आकारू नये, असे निर्देशही
मंत्रालयानं दिले आहेत. यासंदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं गेल्या वर्षी ३०
डिसेंबरला अधिसूचना जारी केली होती.
रुपे कार्ड,
भीम-यूपीआई, यूपीआई क्यू आर कोड आणि भीम-यूपीआई क्यू आर कोडच्या माध्यमातून व्यवहार
करणाऱ्या ग्राहकांना बँकांनी कोणतेही शुल्क आकारू नये असं या अधिसूचनेत म्हटलं आहे.
****
केंद्र सरकारनं
चौथ्या टप्प्यात टाळेबंदी शिथिलीकरणाची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोणत्या
सवलती देता येतील याबाबत निर्णय घेण्यासाठी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत
एक उच्च स्तरीय बैठक झाली. या बैठकीला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, परिवहनमंत्री अनिल
परब, मुख्य सचिव संजयकुमार यांच्यासह अन्य वरिष्ठ प्रशासकीय तसंच पोलीस अधिकारी उपस्थित
होते. याबाबतची नियमावली आज जाहीर होण्याची शक्यता आहे.
****
केंद्र सरकारनं
३० सप्टेंबरपर्यंत शाळा आणि महाविद्यालयं बंदच राहणार असल्याचं सांगितल्यामुळे या काळात
पदवी आणि पदव्युत्तर विषयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा घेता येतील, असा प्रश्न
राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित केला आहे. विद्यापीठ
अनुदान आयोगानं ३० सप्टेंबरपर्यंत या परिक्षा घेण्याचे आदेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर
सामंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला. राज्यात पदवी आणि पदव्युत्तर
विषयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात सहा सदस्यांची समिती नेमण्यात आली
असून, ही समिती आज अहवाल सादर करणार आहे.
****
कोरोना विषाणूचे
रुग्ण शोधणं, त्यांच्या चाचण्या आणि उपचारांमध्ये राज्य सरकारच्या अग्रेसर भूमिकेमुळे
गेल्या महिनाभरात या संसर्गाचे रुग्ण मोठ्या संख्येनं सापडल्याचं आरोग्य मंत्री राजेश
टोपे यांनी म्हटलं आहे. या संसर्गाबद्दल जागृती करणं, सज्जता बाळगणं यावर सरकारनं लक्ष
केंद्रित केलं असल्याचं त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. या विषाणू चाचणीसाठी
४०० प्रयोगशाळा कार्यरत असून, दररोज ५० हजार चाचण्या होत आहेत, असं त्यांनी नमूद केलं.
गेल्या महिनाभरापासून निर्बंध उठवण्यात येत असल्यामुळे या विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव
वाढला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यात काल
१६ हजार ४०८ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण
रुग्ण संख्या सात लाख ८० हजार ६८९ झाली आहे. काल २९६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत २४ हजार ३९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर
काल सात हजार ६९० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत
पाच लाख ६२ हजार ४०१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ९३ हजार ५२८
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात
काल २८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या १ हजार ३२३ रुग्णांची
नोंद झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात
पाच जणांचा मृत्यू झाला, तर २३९ रुग्णांची नोंद झाली. लातूर जिल्ह्यात सहा रुग्णांचा
मृत्यू झाला, तर आणखी २६५ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात पाच रुग्णांचा मृत्यू झाला,
तर नव्या ३०१ रुग्णांची भर पडली. बीड जिल्ह्यातली पाच रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी
९४ रुग्णांची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यात चार रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या
२०७ रुग्णांची नोंद झाली. जालना जिल्ह्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी ११६
रुग्ण आढळले. परभणी जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर ६४ जण बाधित आढळले. तर
हिंगोली जिल्ह्यात काल आणखी ३७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.
****
पुणे जिल्ह्यात
काल ३ हजार ८५६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ७३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला. मुंबईत काल १ हजार २३७ रुग्णांची नोंद झाली, तर ३० जणांचा मृत्यू झाला. नाशिक
जिल्ह्यात १ हजार १७० नवे रुग्ण, तर सहा मृत्यूंची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात १ हजार
३१३, सातारा ४८९, सांगली २९७, पालघर २७४ चंद्रपूर २७०, सिंधुदुर्ग १५६, अमरावती १०६,
वाशिम ३५, तर गडचिरोली जिल्ह्यात काल आणखी १२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.
****
वैद्यकीय प्रवेशाचं
७०-३० हे प्रमाण त्वरीत रद्द करावं अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश
चव्हाण यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. यामुळे मराठवाडा
आणि विदर्भातल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याचं
त्यांनी म्हटलं आहे. महाविद्यालयांची संख्या आणि विद्यार्थी प्रवेश क्षमता यांचा विचार
केला तर मराठवाड्याच्या वाट्याला कमी जागा येत असल्याचं ते म्हणाले.
****
जालना नगरपालिकेच्या
माध्यमातून करण्यात येत असलेल्या १६ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमीपूजन
काल पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री
रावसाहेब दानवे, आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांची प्रमुख
उपस्थिती होती. जालना शहराच्या विकासाठी आपण कटीबद्ध असून, शहरातली सर्व विकास कामं
दर्जेदार व्हावीत, अशी अपेक्षा टोपे यांनी यावेळी व्यक्त केली.
****
लातूर शहरातल्या
नागरीकांनी घरगुती गणेशाचं घरीच विसर्जन करावं, असं आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे
आणि उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी केलं आहे. गणेश विसर्जनासंबंधी महानगरपालिकेनं
जारी केलेल्या नियमांबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –
ज्या
नागरिकांना घरी गणेश विसर्जन करणे अशक्य आहे, त्यांनी आपल्या मूर्ती महापालिकेच्या
मूर्ती संकलन केंद्रात आणून द्याव्यात. मूर्ती देत असतांना श्रीगणेशाला अर्पण केलेले
फुले, दुर्वा आणि निर्माल्य स्वतंत्रपणे एकत्रित करून द्यावं, निर्माल्य देण्यासाठी
कॅरीबॅगचा वापर करू नये शक्यतो टाकाऊ कागदामध्ये ते एकत्र करून संकलन केंद्रावर
दिले तर पर्यावरणाच्या रक्षणाला हातभार लावता येऊ शकेल.
अरूण
समुद्रे, आकाशवाणी बातम्यांसाठी, लातूर.
****
हजरत इमाम हुसैन
यांचा बलिदान दिवस मुहर्रम काल सर्वत्र शांततेत आणि श्रद्धेनं साजरा झाला. कोरोना विषाणू
प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभर मोजक्याच ठिकाणी ताजिया मिरवणूक काढायला न्यायालयानं
परवानगी दिली होती.
औरंगाबाद शहरात
मुहर्रम निमित्त १३० सवाऱ्या बसवण्यात आल्या होत्या. काल अत्यंत साध्या पद्धतीनं या
सर्व सवाऱ्या उठवण्यात आल्या.
नांदेड जिल्ह्याच्या
देगलूर तालुक्यातल्या कोकलगाव इथं मुहर्रम सणानिमित्त सवारी काढणाऱ्या २० जणांविरुध्द
गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांनी प्रशासनानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन
न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
****
आंतरराष्ट्रीय
बुद्धिबळ महासंघाच्या जागतिक ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेत भारतानं प्रथमच सुवर्ण
पदक जिंकलं आहे. स्पर्धेदरम्यान इंटरनेट आणि सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यानं या ऑनलाइन
स्पर्धेत भारत आणि रशियाला संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं आहे. कोविड-19 साथीमुळे
ही स्पर्धा ऑनलाइन घेण्यात आली.
प्रारंभी रशियाला
विजेता घोषित करण्यात आलं होतं. मात्र अंतिम सामन्यात भारताचे दोन खेळाडू निहाल सरीन
आणि दिव्या देशमुख यांनी सर्व्हरसोबत जोडणी मिळत नसल्याने वेळ गमावला. भारताने याबाबत
आक्षेप नोंदवल्यानंतर फेरतपासणी करण्यात आली. त्यानंतर भारत आणि रशिया या दोन्ही देशांना
संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यातल्या
औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी काल लातूर इथल्या मराठवाडा मेट्रो कोच निर्मिती
कारखान्यास भेट दिली. यावेळी त्यांनी कामाचा आढावा घेतला. कारखाना उभारणीचं ८० टक्के
काम पूर्ण झालं असून, यावेळी निदर्शनास आलेल्या बाबींचा सविस्तर आढावा लवकरच रेल्वेमंत्री
पियुष गोयल यांच्यासमोर ठेवणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्याच्या
जिंतूर तालुक्यातल्या कवठा या गावातल्या महिलांनी गावात दारु बंद करण्याची मागणी केली
आहे. या मागणीचं निवेदन ग्रामस्थ आणि महिलांनी काल पोलीस उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक
पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांना दिलं.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पीक कापणी अहवालावर अचूक नोंद घेतल्याची खात्री करूनच स्वाक्षऱ्या
कराव्यात, असं आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. जिल्ह्यात पीक विम्याच्या
अनुषंगाने मुगाचे पीक कापणी प्रयोग सुरू झाले असून, या प्रयोगाच्यावेळी शेतकऱ्यांनी
स्वतः उपस्थित राहावं असं ते म्हणाले. यातून निष्पन्न झालेल्या उत्पन्नाच्या आधारे
पीक विमा मिळणार असल्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना ही सूचना केली.
****
औरंगाबाद शहरातल्या
उच्च माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातल्या अकरावीच्या प्रवेशाची पहिली यादी
काल जाहीर झाली. या यादीत आठ हजार ७३९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती
शिक्षण उपसंचालक मधुकर देशमुख यांनी दिली. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर
महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत ऑनलाईन माहिती उपलब्ध करुन द्यावी, तसंच
प्रवेश प्रक्रियेदरम्यान सामाजिक अंतराच्या नियमाचं पालन करावं, असं त्यांनी सांगितलं
आहे.
****
नांदेड जिल्ह्यात
किनवटनजिक मौजे पाटोदा फाटा इथं दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात
चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांवर आदीलाबाद इथं उपचार
सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
****
Sunday, 30 August 2020
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 August 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 August 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० ऑगस्ट २०२० सायंकाळी ६.००
****
*पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये
भीषण पूरस्थिती
*राज्य सरकारच्या भूमिकेमुळे
कोरोना विषाणुचे रुग्ण मोठ्या संख्येनं सापडले- मंत्री राजेश टोपे
*देशात कोरोना विषाणुचे रुग्ण
बरे होण्याचं प्रमाण ७६ पूर्णांक ६१ शतांश टक्के
आणि
*जालना नगरपालिकेच्या विकास
कामांना प्रारंभ
****
गेल्या दोन दिवसांपासून मध्य प्रदेश आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार
पावसामुळे नागपूरसह पूर्व विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात भीषण
पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपुर, चंद्रपुर, भंडारा आदी
जिल्ह्यात यापूर्वीच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथकं
तैनात आहेत. पुण्याहून या भागात आणखी चार पथकं विशेष विमानानं दाखल झाली आहेत. गोसेखूर्द धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या
ब्रम्हपुरी तालुक्यातल्या नदीकाठच्या गावांनाही पुराच्या पाण्यानं वेढलं आहे. बचाव पथक गावांमध्ये अडकलेल्या नागरिकांना आवश्यक
साहित्यासह बोटीच्या आणि नावेच्या सहाय्यानं सुरक्षित स्थळी
पोहचवत आहेत. या पुरामुळे हजारो हेक्टर
जमीन पाण्याखाली आल्यानं, शेतकऱ्यांचं
मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नाशिकचं गंगापूर धरण ९७ टक्के भरलं असून, धरणातून १ हजार घनफूट
प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आलं आहे. नदीकाठच्या नागरिकांना
काळजी घेण्याचं आवाहन माहापालिकेनं केलं आहे.
****
कोरोना विषाणुचे रुग्ण शोधणं, त्यांच्या चाचण्या आणि उपचारांमधे
राज्य सरकारच्या अग्रेसर भूमिकेमुळे गेल्या महिनाभरात या संसर्गाचे रुग्ण मोठ्या संख्येनं
सापडल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. या संसर्गाबद्दल जागृती करणं,
सज्जता बाळगणं यावर सरकारनं लक्ष केंद्रित केलं असल्याची माहितीही त्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी
बोलताना दिली आहे. या विषाणू चाचणीसाठी ४०० प्रयोगशाळा कार्यरत असून दररोज ५० हजार
चाचण्या होत आहेत, असं त्यांनी नमुद केलं. गेल्या महिनाभरापासून निर्बंध उठवण्यात येत
असल्यामुळे या विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टाळेंबंदी हटवण्याच्या प्रक्रीयेसंदर्भात खूप दक्षता घेत
असून निर्बंध काढले जात असले तरी मागणी नंतरही धार्मिक स्थळं, चित्रटगृह, व्यायामशाळा
उघडण्यात आलेल्या नसल्याचं त्यांनी म्हटलं. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८०
टक्के असून मृत्यू दर दोन पूर्णांक चार दशांश आहे. गंभीर अवस्थेतील रुग्णांचं प्रमाण
दोन टक्के आहे. नव्या रुग्णांच्या संख्येएवढेच रुग्ण साधारणपणे बरे होत असल्यामुळे
खाटांच्या उपलब्धतेची अडचण येत नसल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. राज्यात पाच लाखांहून
अधिक रुग्ण या संसर्गावर उपचार घेऊन बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली
आहे. या पार्श्र्वभूमीवर या क्षेत्रात आघाडीवर राहुन कार्यरत असलेले आरोग्य क्षेत्रातले
कर्मचारी प्रशंसेला पात्र असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे.
****
देशात
कोरोना विषाणू संसर्गामुळे होणाऱ्या मृत्युंचा दर एक पूर्णांक ७९ शतांश टक्के पर्यंत
कमी झाला असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७६ पूर्णांक ६१ शतांश टक्के पर्यंत वाढलं
आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. कालपर्यंत या विषाणू संसर्गासाठी
चार कोटी १४ लाख ६१ हजार ६३६ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या असून यातल्या दहा
लाख ५५ हजार २७ चाचण्या काल करण्यात आल्या आहेत.
****
नाशिक जिल्ह्यात सध्या ६ हजार ४८६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.आतापर्यंत २७ हजार
९७८ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८५६
रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
****
चंद्रपूर जिल्हा कारागृहातल्या एका कर्मचाऱ्यासह ७१ बंदींना
कोरोना विषाणुची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. दोन दिवसांपूर्वी एका कैद्याच्या पायाची शस्त्रक्रिया
करण्यासाठी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शस्त्रक्रिये आधी या कैद्याची तपासणी केली असता, त्याला
याचा संसर्ग झाल्याचं आढळलं होतं. त्यामुळे अन्य कैदी आणि कर्मचाऱ्यांची तपासणी
करण्यात आल्याची माहिती तुरुंग अधिक्षकांनी दिली आहे.
****
बृहन्मुंबई महापालिकेनं नामवंत गायिका लता मंगेशकर
रहात असलेली इमारत `प्रभू कुंज` कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर खबरदारीचा
उपाय म्हणून प्रतिबंधित केली आहे. दक्षिण मुंबईतल्या पेडर मार्गावरल्या या इमारतीमधे
अनेक ज्येष्ठ नागरिक रहात असल्यानं ही काळजी घेण्यात आली असल्याचं मंगेशकर कुटुंबानं
एका निवेदनाद्वारे नमुद केलं आहे. सामाजिक अंतराचं समर्थन आणि याला सहकार्यासाठी यंदाचा
गणेशोत्सवही कुटुंबानं साधेपणानं साजरा केला. तसंच आपण सर्व काळजी घेत असून कुटुंब
सुरक्षित असल्याचं मंगेशकरांनी म्हटलं आहे.
****
बेळगाव जिल्ह्यात मराठी भाषिकांवर झालेल्या लाठी
हल्ल्याचा राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी निषेध केला असून या प्रकरणी
कारवाईची मागणी केली आहे. पीरनवाडी गावामधे गेल्या २८ तारखेला शिवाजी महाराजांच्या
नियोजित पुतळ्यासमोरच स्वातंत्र्य सैनिक संगोल्ली रायन्ना यांच्या पुतळ्याला उभारण्यावरून
निर्माण परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला होता. महाराष्ट्र-
कर्नाटक सीमा वादासंदर्भातले समन्वयक मंत्री असलेल्या शिंदे यांनी या प्रकरणी कर्नाटकचे
मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली असून मराठी
भाषिक आणि कन्नड भाषिकांमधे अकारण वाद निर्माण केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
वैद्यकीय प्रवेशाचं ७०- ३० हे प्रमाण त्वरीत रद्द
करावं अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री
अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. यामुळे मराठवाडा आणि विदर्भातल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर मोठ्या
प्रमाणात अन्याय होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
महाविद्यालयांची संख्या आणि विद्यार्थी प्रवेश क्षमता यांचा विचार केला तर
मराठवाड्याच्या वाट्याला कमी जागा येत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. यावर
लवकरच बैठक आयोजित करून हा प्रश्न मार्गी लावला जाईल, अशी
ग्वाही देमशुख यांनी दिली असल्याचंही आमदार चव्हाण यांनी कळवलं आहे.
****
जालना नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या १६
कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमीजून आज पालकमंत्री राजेश टोपे यांच्या
हस्ते झालं. मस्तगड इथं झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल
यांची प्रमुख उपस्थिती होती. जालना शहराच्या विकासाठी आपण कटीबध्द असून, शहरातली सर्व विकास कामं दर्जेदार व्हावीत, अशी
अपेक्षा टोपे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केली.
****
हजरत इमाम हुसैन यांचा बलिदान दिवस
मुहर्रम आज सर्वत्र शांततेत आणि श्रद्धेनं साजरा होत आहे. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर
देशभर मोजक्याच ठिकाणी ताजिया मिरवणूक काढायला न्यायालयानं परवानगी दिली आहे. हजरत इमाम हुसैन यांचं सत्यासाठी
आणि समानतेसाठी दिलेलं बलिदान सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुहर्रमनिमित्त
संदेशात म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातल्या कोकलगाव
इथं मोहरम सणानिमित्त सवारी काढणाऱ्या २० जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्वांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुहर्रम सण साजरा करण्याच्या प्रशासनानं
दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन न करता नियमांचं उल्लंघन केलं असल्यामुळे गुन्हा
दाखल करण्यात आला. दरम्यान, कोकलगावमधे कोरोना विषाणू संसर्गाचे सहा रुग्ण आढळून आले
आहेत.
****
बृहन्मुंबईमधील
कोरोना विषाणुच्या नव्या रुग्णांच्या संख्येत गेल्या महिनाभरामधे चार हजारांवरून नऊ
हजारांपर्यंत वाढ झाल्याची माहिती महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी दिली आहे. एक
दिवस नव्या रुग्णांची संख्या बारा हजारांपर्यंत पोहचली होती तर काल नऊ हजार ९८४ नवे
रुग्ण आढळल्याचंही आयुक्त चहल यांनी म्हटलं आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यामधल्या दुर्गम भागातल्या
७७७ कोटी रुपये किंमतीच्या पूल आणि रस्ते कामांना आज
प्रारंभ झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री एकनाथ
शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून
ही कामं सुरू करण्यात आली. ****
वाशिम जिल्ह्यात अनेक विद्यार्थ्यांना इंटरनेट अभावी ऑनलाईन
शिक्षण घेण्यात अडचन येत असल्यानं शिक्षण विभागानं
एका वेळी
दहा विद्यार्थ्यांना शाळा, अथवा गावातलं समाज मंदिर किंवा मोकळ्या जागेत वर्ग घ्यायला परवानगी दिली आहे. संबंधित शिक्षकानं
सामाजिक अंतर राखण्याच्या सर्व नियमांचं पालन करत शिकवावं, असं या विभागानं सूचित केलं आहे.
****
रायगड
जिल्ह्यातल्या महाड इथल्या इमारत दुर्घटनेतला दुसरा आरोपी युनूस शेख याला काल अटक करण्यात
आली. त्याला माणगावच्या न्यायालयात हजर करण्यात आलं असता, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली
आहे. या प्रकरणातले तीन आरोपी अद्याप
पोलिसांच्या हाती लागले नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सातारा जिल्ह्यातल्या कराड
इथं कोरोना विषाणुचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शहरातल्या व्यापाऱ्यांनी
१ ते ८ सप्टेंबर दरम्यान उत्स्फुर्त बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. बंदमधून अत्यावश्यक सेवांना
वगळण्यात आलं असल्याची माहिती व्यापारी संघटनेनं दिली आहे.
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...