आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२६
ऑगस्ट २०२० सकाळी ११.०० वाजता
****
देशात कोरोना विषाणुचे नवे
६७ हजार १५१ रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या आता ३२ लाख ३४ हजार ४७४ झाली आहे.
यातले २४ लाख ६७ हजार ७५८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर सात लाख सात हजार २६७ रुग्णांवर
उपचार सुरू आहेत.
****
देशात कोरोना विषाणुमुळे
गेल्या चोवीस तासांत एक हजार ५९ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूमुखी पडलेल्यांची
संख्या ५९ हजार ४४९ झाली आहे. मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्केपर्यंत घटला असल्याचं
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना
विषाणू संसर्गाचे १२३ आढळल्यानं एकूण रुग्ण संख्या २१ हजार ५१५ झाली आहे. नव्या रुग्णांमधे
महापालिका हद्दीतल्या ६७ आणि ग्रामीण भागातल्या ५६ रुग्णांचा समावेश आहे.
****
ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणुचे
नवे ७८८ रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्ण संख्या एक लाख १६ हजार ४१३ झाली आहे.
****
अमरावती जिल्ह्यात आणखी ११३
जणांना कोरोना विषाणुची लागण झाल्यामुळे जिल्ह्यातली रुग्ण संख्या ४ हजार ८०० झाली
आहे. आतापर्यंत ३ हजार ५०४ रुग्ण बरे झाले असून, ११२ रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू
झाला आहे तर सध्या १ हजार १८४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
रायगड जिल्हयातल्या महाड
इथल्या इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या आता १५ झाली असून मदत आणि बचाव कार्य अंतिम
टप्प्यात आहे. सकाळी ढिगा-यातून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, दूर्घटनेत नऊ
जण जखमी झाले आहेत.
****
जालना जिल्ह्यात गणेशोत्सव
आणि गौरी पूजनानिमित्त फुलांच्या दरात वाढ झाल्याचं चित्र आहे. शहरातल्या छत्रपती शिवाजी
महाराज व्यापार संकुलातल्या फुल बाजारात आज झेंडू, गुलाब, शेवंती, गलांडा या फुलांना
चारशे रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला, तर जर्बेराचं एक फुल दहा रुपयांना विकलं गेलं.
****
सोन्याच्या दरात काल ५५७ रुपयांनी घट होऊन, दिल्लीत
सोन्याचे दर प्रतितोळा ५२ हजार ३५० रुपये झाले. चांदीच्या
दरातही किलोमागे सोळाशे रुपयांनी घट होऊन, चांदीचा भाव
प्रतिकिलो ६६ हजार ७३६ रुपयांवर स्थिरावला.
****
No comments:
Post a Comment