Wednesday, 31 May 2023

आकाशवाणी औरंगाबाद – आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक – 31.05.2023 रोजीचे- वृत्त विशेष

आकाशवाणी औरंगाबाद –दिनांक 31.05.2023 रोजीचे रात्री 08.00 ते 08.15 वाजताचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र

आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक 31.05.2023 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.05.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 May 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ मे २०२ सायंकाळी ६.१०

****

·      अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यादेवी नगर करणार, अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा.

·      भाजप सरकारच्या काळात विकासाला गती आणि भ्रष्टाचाराला वेसण, पंतप्रधान मोदींनी राजस्थानच्या अजमेरमध्ये केला जनजागरण मोहिमेचा प्रारंभ.

·      औरंगाबादच्या पंतप्रधान आवास योजनेतील घोटाळ्यात ईडीची तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना चौकशीसाठी नोटीस.

·      अहमदनगरच्या उत्तर विभागाला सिंचनासाठी निळवंडे प्रकल्पाचं पाणी सोडलं.

आणि

·      चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

****

अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून ते अहिल्यादेवी नगर करणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८व्या जयंतनिमित्त त्यांचे जन्मगाव चौंडी इथं राज्य सरकारच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना प्रारंभी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील घोषणा केली. अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यादेवीच्या नावाने ठेवण्याची येथील जनतेची अनेक दिवसांची मागणी होती. लवकरच या जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी नगर करण्यात येईल, असं फडणवीस म्हणाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेला दुजोरा दिला. आमच्या सरकारच्या काळात अहिल्यादेवी नगर नाव दिले जात आहे, हे आमचे भाग्य आहे, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले – (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि आदिल्यादेवी होळकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आम्ही राज्याचा कारभार करतोय. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनातली जी इच्छा आहे, या अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी होळकर हे आपण करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. आपल्या अहिल्यादेवींच्या भक्तांसाठी या सरकारने अहिल्यादेवी सहकारी तत्वावरच्या महामंडळाला दहा हजार कोटींची तरतूद केलेली आहे.

याआधी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केलं. आज अहिल्यादेवी यांची २९८ वी जयंती साजरी होत आहे.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सहकार व इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार राजू नवघरे, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव विठ्ठल भास्कर यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. सहकारमंत्री सावे यांनी अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.

****

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या काळात देशाचा विकास अत्यंत वेगाने होत आहे. आपल्या सरकारच्या काळात भ्रष्टाचाराला थारा दिला जात नाही. सबका साथ सबका विकास हा आपला मूलमंत्र आहे. त्याचीच प्रचिती देशभरातील जनतेला येत आहे, असं प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या जनजागरण मोहिमेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील अजमेर इथल्या सभेनं केला. त्यावेळी ते बोलत होते. मोदी पुढे म्हणाले की, काँग्रेसने ५० वर्षांपूर्वी गरीबी हटविण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात काहीही केले नाही. काँग्रेसच्या काळात किती प्रचंड भ्रष्टाचार होत असे ते त्यांचे नेतेच स्वतः बोलून दाखवत असत. भाजपच्या सरकारमध्ये विकासाला गती मिळाली असून भ्रष्टाचाराला वेसण घातली आहे. भाजपचे देशभर चालणारे हे जनजागरण अभियान एक महिना चालणार आहे.

****

औरंगाबादच्या पंतप्रधान आवास योजना घोटाळ्यात ईडीनं तत्कालीन जिल्हाधिकारी तथा कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. पंतप्रधान आवास या घरकुल योजनेत एक हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर ईडीनं शहरात तब्बल १३ ठिकाणी छापे टाकले होते. या संदर्भात सक्त वसूली संचालनालयानं आतापर्यंत तत्कालीन महापालिका आयुक्त तसंच महापालिकेतील अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे.

****

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यंदा ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त उद्यापासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या शुक्रवारी या कार्यक्रमांचं उद्घघाटन होणार असून, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह शिवप्रेमी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

****

रेल्वेच्या काही तांत्रिक कारणामुळे आज, ३१ मे रोजी हजूर साहिब नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक ०७४२८ हजूर साहिब नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या दिनांक एक जून रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सुटणारी गाडी क्रमांक ०७४२९ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - हजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस देखील रद्द करण्यात आली आहे.

****

अहमदनगरच्या उत्तर विभागाला सिंचनाच्या दृष्ट्रीनं वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्प पाणी सोडण्याचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील निळवंडे धरण जिल्ह्यातील दुष्काळी आणि जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. धरणाचा डावा आणि उजवा कालवा तसंच उच्चस्तरीय पाईप कालवा आणि उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव आणि नासिकच्या सिन्नर तालुक्यातल्या १८२ गावांमधील ६८ हजार ८७८ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज दुपारी एक वाजता शोकाकूल वातावरण आणि शासकीय इतमामात वरोरा इथल्या मोक्षधाम इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मोठा मुलगा पारस यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या वतीनं जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी श्रद्धांजली वाहिली. अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, काँगेस नेते राहुल गांधी यांच्या वतीनं मुकुल वासनिक आणि अशोक चव्हाण यांनी शोक संदेशाचं वाचन केलं.

****

औरंगाबादमध्ये कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेचा धार्मिक कार्यक्रम उद्यापासून सात दिवस होणार आहे. शहरातल्या श्रीराम मंदिर मठ बालाजी ट्रस्ट पिसादेवी इथं हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे एक जून ते सात जूनपर्यंत शहर वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. यामध्ये शहरातील आंबेडकर नगर चौक ते पिसादेवी जाणारा मार्ग आणि हर्सुल टी पॉंईट ते एन वन पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक वोखार्ड टी पाँईट ते नारेगाव मार्गाने आणि पिसादेवी टी पाँईट ते सावंगी बायपास, जकात नाका हर्सुल टी पाँईंट मार्गे आणि एन वन चौक ते चिश्तिया चौक, सेंट्रल नाका, आझाद चौक टी व्ही सेंटर मार्गे वळवण्यात आली असल्याची माहिती पोलिस आयुक्त कार्यालयाच्या वाहतूक शाखेनं दिली आहे.

****

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण-एमएमआरडीएनं पावसाळ्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. या नियंत्रण कक्षात २४ तास तक्रारींवर पाठपुरावा करून बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि रेल्वे यांसारख्या विविध संस्थाच्या आपत्ती नियंत्रण कक्षांसोबत संवाद साधला जाणार आहे. तसंच माहितीची देवाण घेवाण करण्यात येणार आहे. हे नियंत्रण कक्ष दिनांक १ जून २०२३ पासून ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत कार्यरत राहणार आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात २०१७ पासून पंतप्रधान मातृत्व वंदन योजनेचं काम सुरु असून आतापर्यंत ५० हजार ११० गर्भवती महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. निर्धारित उद्दिष्टाच्या हे १०५ टक्के असून या योजनेतून जिल्ह्यात मार्च २०२३ अखेर १९ कोटी ७२ लाख ३६ हजार रुपयांचा लाभ आरोग्य विभागानं या गर्भवती मातांना दिला आहे.

****

लखनौ इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धांमध्ये पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठानं महिला टेनिस स्पर्धेत काल पहिलं सुवर्णपदक जिंकलं. त्यांनी गतविजेत्या उस्मानिया विद्यापीठाचा दोन - शून्य असा पराभव केला.

****

आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 31.05.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 31.05.2023 रोजीचे दुपारी 01.30 वाजताचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 31.05.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 31 May 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३१ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून अहिल्यादेवी यांना अभिवादन केलं आहे.

अहिल्यादेवींचं जन्मगाव असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं आज एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा जयंती सोहळा साजरा होणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून या वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या दोन कर्तबगार महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा निर्णय महिला आणि बालविकास विभागाने घेतला आहे.

***

जम्मू कश्मीर पोलिसांसोबत भारतीय सैन्य दलानं केलेल्या एका संयुक्त कारवाईत, तीन ते चार दहशतवाद्यांना पुंछ भागामध्ये नियंत्रण रेखा ओलांडण्यापासून रोखण्यात आलं आहे. या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला भारतीय लष्करानं प्रत्यूत्तरादाखल केलेल्या गोळीबारात काही दहशतवादी ठार झाल्याचं याबाबतच्या वृतात म्हटलं आहे.

***

केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भाजपच्या महिनाभर चालणाऱ्या जनजागरण मोहिमेचा शुभारंभ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे. या निमित्त अजमेर इथं आयोजित करण्यात आलेल्या सभेला ते संबोधित करतील.
                                    ***
चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज वरोरा इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत आहेत. यावेळी काँग्रेसचे नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वेडेट्टीवार, अशोक चव्हाण यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी धानोरकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केलं. धानोरकर यांचं काल दिल्ली इथं निधन झालं होतं.
                                    
***

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यंदा ३५०र्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त उद्यापासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या शुक्रवारी या कार्यक्रमांचं उद्घघाटन होणार असून, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह शिवप्रेमी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

                                   ***
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ओटीटी प्लॅटफॉर्मवर तंबाखूविरोधी इशाऱ्यांसाठी नवीन नियम अधिसूचित केले आहेत. ऑनलाइन सामग्रीचे प्रकाशक नवीन नियमांचं पालन करण्यात अयशस्वी झाल्यास, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय कठोर कारवाई करणार असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. 
                                 ***

राज्य सरकारनं यंदाच्या वर्षी होणाऱ्या सर्वसाधारण बदल्या ३० जून पर्यंत करायला परवानगी दिली आहे. या बदल्या करण्याची सर्वसाधारण कालमर्यादा ३१ मे होती. यासंदर्भातला शासन आदेश सामान्य प्रशासन विभागानं काल प्रसिद्ध केला आहे.

                                   ***
राज्यातल्या सुमारे तीन हजार गृहनिर्माण सोसायट्यांनी उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे त्यांच्या मासिक वीज बिलात मोठी घट होण्याबरोबरच, महावितरणच्या पॉवरग्रीडमध्ये देखील, ५२ मेगा वॅट विजेची भर पडली आहे. हे लक्षात घेता आणखी गृहनिर्माण सोसायट्यांनी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचं आवाहन महावितरणनं केलं आहे.

***

वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखालील संस्थांच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी शासनानं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. यापुढे अशा संस्थांना दरवर्षी आर्थिक अहवाल सादर करणं बंधनकारक करण्यात आलं असून, त्यासोबतच वक्फ मिळकती भाडेतत्त्वांवर देण्यासंदर्भात नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प ३० दिवसांत सादर करण्याचे आदेश तीन हजार संस्थांना देण्यात आले आहेत.

***

येत्या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यात कापूस पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी, आणि या पिकावरच्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाण्यांची खरेदी करावी, तसंच कापूस पिकाची लागवड एक जून नंतरच करावी, असं आवाहन, नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्यात या हंगामात जवळपास एक लाख ऐंशी हजार हेक्टर जमिनीवर कापूस पिकाची लागवड होण्याचा अंदाज आहे.

***

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत हिंगोली इथं जिल्हास्तरीय समन्वय समितीची आढावा बैठक काल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शिक्षण विभागांनी निकषाची पूर्तता करुन जिल्ह्यातल्या सर्व शाळा तंबाखू मुक्त कराव्या, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसंच विविध विभागांनी आपल्या स्तरावर तंबाखू विरोधी कायद्याचं उल्लंघन होत असल्यास २०० रुपयापर्यंत दंड आकरण्याबाबत यावेळी सूचना देण्यात आल्या.

 

                          // **********//

आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 31.05.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 31.05.2023 रोजीचा सकाळी 10.45 वाजताचे वृत्तविशेष कार्यक्रम - प्रासंगिक

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 31.05.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१ मे २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती आहे. यानिमित्त अहिल्यादेवींचं जन्मगाव असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जयंती सोहळा साजरा होणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून या वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर समाजात योगदान देणाऱ्या दोन  महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा निर्णय महिला आणि बालविकास विभागानं घेतला आहे.    
                                      ***

केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भाजपच्या महिनाभर चालणाऱ्या जनजागरण मोहिमेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, आज होणार आहे. या निमित्त अजमेर इथं आयोजित सभेला ते संबोधित करणार आहेत.

***

२०२३-२४ या वर्षात देशाच्या आर्थिक वृद्धीचा दर कायम राहण्याचा अंदाज, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. ठाम आर्थिक धोरणं, किंमतींमधली घट आणि सरकारी खर्चाच्या गुणवत्तेवर बारकाईनं लक्ष ठेवण्याच्या धोरणाचा परिणाम म्हणून हा दर कायम राहील, असं बँकेच्या काल प्रसिद्ध झालेल्या या अहवालात म्हटलं आहे. 

***

युरोपातलं युद्ध, चीननं सीमेवर तैनात केलेलं सैन्य, शेजारी देशातल्या समस्या यामुळं भारतासमोर वेगळी आव्हानं निर्माण झाली आहेत. मात्र, सीमेवर नियंत्रण रेषेवर शांतता आणि स्थिरता राखणं हे भारतीय लष्कराचं कर्तव्य आहे, असं सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी काल पुण्यात वार्ताहरांशी बोलताना म्हटलं आहे. 

***

देशाच्या महामार्ग विकासाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काल एक बैठक झाली. कार्यक्षमता वाढवणं, आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची कास धरून प्रकल्प पूर्णत्वाला नेण्याच्या‌ उपायांवर या बैठकीत चर्चा झाली.

***

लखनौ इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धांमध्ये पुण्याच्या सावित्रीबाई फुले  विद्यापीठानं महिला टेनिस स्पर्धेत काल पहिलं सुवर्णपदक जिंकलं. त्यांनी गतविजेत्या उस्मानिया विद्यापीठाचा दोन - शून्य असा पराभव केला.

//***********//

आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 31.05.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

آکاشوانی اورنگ آباد‘ علاقائی اُردو خبریں : بتاریخ : 31 مئی 2023‘ وقت : ...

आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 31.05.2023 रोजीचे सकाळी 08.30 वाजताचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

آکاشوانی اورنگ آباد‘ علاقائی اُردو خبریں : بتاریخ : 31 مئی 2023‘ وقت : صبح 09:00 تا 09:10

Regional Urdu Text Bulletin, Aurangabad

Date : 31 May 2023

Time : 09.00 to 09.10 AM

آکاشوانی اَورنگ آ باد

علاقائی خبریں

تاریخ  :  ۳۱؍  مئی  ۲۰۲۳؁ ء

وقت  :  صبح  ۹.۰۰   سے  ۹.۱۰   بجے 


چند اہم خبروں کی سر خیاں سماعت کیجیے  ... 

٭ کسانوں کو ہر سال 6؍ ہزار  روپئے امدا دینے والی نمو شیتکری مہا سنمان امدادی فنڈ اسکیم پر ریات میں عمل در آمد کرنے کا

ریاستی کا بینہ کا فیصلہ 

٭ اورنگ آباد ضلعے میں سِلوڑ تعلقے میں مکاّ ریسرچ سینٹر قائم کرنے کو منظوری

٭ ریاست کے صنعتی راہداریوں کی تر قی کو فو قیت دی جائے گی  ‘  وزیر اعلیٰ ایکناتھ شندے 

٭ ریاستی حکو مت کے سوچھ مُکھ ابھیان کے بھارت رتن سچن تینڈولکر خیرسگالی سفیر 

٭ ریاست کے414؍ آنگن واڑیوں کو گود لینے کے لیے 4؍ سماجی اِداروں سے معا ہدہ

٭ منریگا  کے تحت 26؍ ہزار 250؍ ٹیب خریدی کے ٹینڈر میں گھپلہ ہوا ہے  ‘  حزب مخالف رہنما امبا داس دانوے کاالزام

اور

٭ عثمان آباد میں دھا را شیو ڈرامہ فیسٹِوَل کا آغاز


اب خبریں تفصیل سے...

ٌٌ پر دھان منتری زرعی سنمان فنڈ اسکیم میں ریاستی حکو مت کا فنڈ شامل کرنے والی نمو شیتکری مہاسنمان فنڈ اِس اسکیم پر عمل در آمد کرنے کا فیصلہ ریاستی کا بینہ نے لیا ہے ۔ ممبئی میں وزیر اعلیٰ ایکناتھ شندے کی صدارت میں یہ میٹنگ ہوئی ۔ اِس موقعے پر انھوں نے اِس کی اطلاع دی ۔ انھوں نے کہا کہ مرکزکی جانب سے کسانو ں کو اِس اسکیم کے تحت ہر سال 6؍ ہزار  روپئے دیے جا تے ہیں ۔ اب ریاستی حکو مت کی جانب سے بھی 6؍ ہزار  روپئے دیے جا ئیں گے ۔ اِس طرح جملہ 12؍ ہزار روپیوں کی امداد کسانوں کو حاصل ہو گی ۔ وزیر اعلیٰ نے کہا کہ تاریخی فیصلہ ہم نے لیا ہے ۔

***** ***** ***** 

کپاس پیدا وار علاقوں میں سر ما یہ کاری میں اضا فہ کرنے کے لیے نئی کپڑا صنعت پالیسی کو  کا بینہ نے منظوری دی ۔ اِس پالیسی کی وجہ سے 25؍ ہزار  کروڑ روپیوں کی سر ما یہ کاری ہو گی ۔ اِسی طرح آئندہ 5؍ سال میں 5؍ لاکھ تک روزگار فراہم کرنے کا نشا نہ ہے ۔ ملازمین کے تحفظ ‘  صحت  اور  کام کے حا لات کے ضمن میں نئے ملازمین اصول و ضوابط کو بھی ریاستی کا بینہ نے کل منظورکیے ۔

***** ***** ***** 

اورنگ آباد ضلعے میں سلوّڑتعلقے کے موضع  کوٹ ناندرا  اور  ڈوئی پھوڑ میں مکّا ریسرچ سینٹر قائم کرنے کو اِسی طرح اِس کے لیے 22؍ کروڑ 18؍ لاکھ روپیوں کے اخراجات کو کا بینہ نے منظوری دی ۔ خواتین کو سیاحت کے پرو فیشن میں زیادہ سے زیادہ فوقیت حاصل ہو  او ر وہ مستحکم ہو ۔ اِس نظر یہ سے آزادی کا امرت مہوتسو کے تحت  آئی  یہ خواتین مرکوزیت کی سیاحتی پالیسی پر عمل در آمد کیا جائے گا کل کی کا بینی میٹنگ میں اِس کو منظوری دی گئی ۔اِس کے تحت چند سیاحتی مقات پر خواتین بائیک  ‘  ٹیکسی خد مات شروع کی جائے گی ۔ اِس کے علا وہ یوم ِ خواتین کے ضمن میں یکم ما رچ سے آٹھ مارچ کے در میان مہا راشٹر سیاحت تر قیاتی کا رپوریشن کے تمام ریسارٹ میں خواتین سیا حوں کے لیے آن لائن بُکنگ پر 50؍ فیصد چھوٹ دی جائے گی ۔

***** ***** ***** 

ریاست کے صنعتی راہداریوں کی تر قی کو فوقیت دی جا رہی ہے ۔ وہاں کے تر قیاتی کام تیزی سے ہو اِس کے لیے کوشش کی جا رہی ہے ۔ یہ بات وزیر اعلیٰ ایکناتھ شندے نے کہی ہے ۔ قو می صنعتی راستوں کی تر قی  اور   اِس پر عمل در آمد کے ضمن میں عالمی کنٹرول کمیٹی کی میٹنگ سے کل وہ ویڈیو کانفرنسنگ کے ذریعے سے شامل ہوئے ۔ اِس موقعے پر انھوں نے اِس کی اطلاع دی ۔ اِس میٹنگ میں دِلّی سےمرکزی وزیر مالیات نِر ملا سیتا رمن  کامرس  وزیر پیوش گوئل وغیرہ موجود تھے ۔

***** ***** ***** 

اورنگ آباد -    پیٹھن راستے کی توسیع جلد از جلد کی جا ئے  ‘  اِس راستے پر ریلوے لائن کے لیے اضا فی اراضی تحویل میں لی جا ئے  ‘  اورنگ آباد ضلعے کے کر ماڑ ریلوے اسٹیشن میں ریلوے سائڈنگ  او ر   مال کو اُتار نے -چڑھا نے کا نظم کیا جائے وغیرہ مطالبات وزیر اعلیٰ شندے نے اِس میٹنگ کے ذریعے سے مرکز سے کیے ۔ اِس پر مرکزی حکو مت کے پاس التواء میں پڑے ہوئے مہا راشٹر کی تجا ویز پر تو جہ دے کر انھیں منظور کیا جائےگا ۔ ایسا تیقن کامرس وزیر پیوش گوئل نے دیا ۔

***** ***** ***** 

منہ کی صحت کے لیے ریاستی حکو مت نے شروع کیے گئے  سوچھ مُکھ ابھیان کے خیرسگالی سفیر کے طور پر کام کرنے کے لیے بھارت رتن سچن تینڈولکر سے کل ممبئی میں معاہدہ کیا گیا۔ طِبّی تعلیم  اور  ادویات شعبے کی جانب سے یہ معاہد کیا گیا ۔ممبئی میں ہوئی اِس تقریب میں نائب وزیر اعلیٰ دیویندر پھر نویس موجود تھے ۔


***** ***** ***** ***** ***** ***** 

یہ خبریں آکاشوانی اورنگ آ باد سے نشر کی جا رہی ہیں

***** ***** ***** ***** ***** ***** 


ریاست کے 414؍ آنگن واڑیوں کو  گود لینے کے لیے 4؍ سماجی اِداروں سےمشتر کہ معاہدہ کیاگیا ہے ۔ اِس کی اطلاع خواتین  اور  بہبود اطفال وزیر منگل پر بھات لوڈھا نے دی ۔وہ کل ممبئی میں اِس ضمن میں ہوئی میٹنگ کے بعد وہ مخاطب تھے ۔

حکو مت کے آنگن واڑی گود میں لینے کی پالیسی کے تحت گزشتہ سال اکتوبر سے آج تک 156؍ مختلف سماجی تنظیموں نے 4؍ ہزار 800؍ آنگن واڑیاں گود لی ہیں ۔ اِس کی اطلاع وزیر موصوف نے دی ۔

***** ***** ***** 

مہاتما گاندھی قومی روز گار ضما نت اسکیم  منریگا  کےتحت حکو مت نے 26؍ ہزار  250؍ ٹیب خریدی کے لیے نکا لے گئے ٹینڈر میں گھپلہ ہوا ہے ۔ ایسا الزام قانون ساز کونسل کے حزب مخالف پارٹی رہنما امبا داس دانوے نے عائد کیا ہے ۔ اِس ٹینڈر کو مسترد کر کے خاص جانچ وفد کی معرفت تحقیقات کی جا ئے ۔ اِسی طرح سے خاطی پائے گئے کمپنیوں کو  بلیک لِسٹ میں ڈالا جائے ۔ ایسامطالبہ انھوں نے مکتوب کے ذریعے سے وزیر اعلیٰ  اور  نائب وزیر اعلیٰ سے کیا ہے ۔

***** ***** ***** 

اورنگ آباد کی ڈاکٹر با با صاحب امبیڈکر مراٹھواڑہ یو نیور سٹی کے پوسٹ گریجویٹ کورسیس کے امتحا نات آج سے شروع ہو رہے ہیں ۔ تاہم پروفیشنل کورسیس کے امتحا نات 6؍ جون سے شروع ہو ں گے ۔ شعبہ امتحا نات کے ڈپٹی رجسٹرار ڈاکٹر گنیش منجھا نے اِس کی اطلاع دی ۔ 4؍ اضلاع کے 78؍ مراکز پر یہ امتحان ہوں گے ۔ اِس میں سب سے زیادہ 31؍ مراکز اورنگ آ باد ضلعے  ‘  بیڑ ضلعے میں 21؍ تاہم جالنہ  اور  عثمان آباد ضلعے میں فی کس 13؍ مراکز ہیں ۔

***** ***** ***** 

عثمان آباد شہر میں دھا را شیو ڈرامہ فیسٹول کا کل فلمی اداکار  اُمیش جگتاپ کے ہاتھوں افتتاح عمل میں آ یا ۔ ڈاکٹر با با صاحب امبیڈکر مراٹھواڑہ یو نیور سٹی کے شعبہ ڈرامہ  او ر  اکھل بھارتیہ ناٹیہ پریشد عثمان آباد شاخ کی جانب سے مشتر کہ طور پر اِس فیسٹِول کا انعقاد کیا گیا ہے ۔

***** ***** ***** 

چندر پور کے کانگریس کے رکن پارلیمنٹ  باڑو دھانور کر کے جسد خاکی پر آج صبح 11؍ بجے ورورا میں آخری رسو مات ادا کی جائے گی ۔ اُن کا جسد خاکی کل دو پہر کو دِلّی سے لا یا گیا ۔ اِس کے بعد ورورا میں اُن کی رہائش گاہ پر آخری دیدار کے لیے رکھا گیا تھا ۔ دھانور کر کل دِلّی میں چل بسے ۔ وہ 47؍ برس کے تھے ۔

***** ***** ***** 

اساتذہ کو اعلیٰ خیا لات  اور  عظیم مثالیں نظروں کے سامنے رکھ کر کام کرنے کی ضرورت ہے ۔ اِن خیا لات کا اظہار اورنگ آباد میونسپل کارپوریشن کے ایڈ منسٹریٹر  جی  شریکانت نے کیا ہے ۔ 15؍ جون سے شروع ہو رہے نئے تعلیمی سال کے پس منظر میں قبل از اسکول تر بیتی ورک شاپ کا اہتمام شریکانت کے تصور سے کیا گیا تھا ۔ اِس موقعے پر وہ مخاطب تھے ۔ رکن اسمبلی سنجئے شر ساٹھ  اور  رکن اسمبلی ہری بھائو باگڑے بھی اِس پروگرام میں موجود تھے ۔اس تعلیمی سال سے اورنگ ااباد میونسپل کارپوریشن کے تمام مراٹھی  او ر  اُردو اسکولس سیمی انگلش ہوں گے ۔ اِس کی اطلاع اِس موقعے پر دی ۔

***** ***** ***** 

مانسون  بنگال کے سمندر میں اِسی طرح انڈو مان نکو بار کے ساحلی علاقے سے آ گے کی جانب بڑھ گیا ہے ۔ مالدیپ  اور  کومورین اِسی طرح بنگال کے سمندر میں آئندہ 3؍ یوم میں مانسون مزید آگے بڑھنے کے نظر سے حا لات ساز گار ہے ۔ اِس کی اطلاع محکمہ موسمیات نے دی۔

***** ***** ***** 



آخر میں اہم خبروں کی سر خیاں ایک مرتبہ پھر سن لیجیے  ...

٭ کسانوں کو ہر سال 6؍ ہزار  روپئے امدا دینے والی نمو شیتکری مہا سنمان امدادی فنڈ اسکیم پر ریات میں عمل در آمد کرنے کا 

ریاستی کا بینہ کا فیصلہ 

٭ اورنگ آباد ضلعے میں سِلوڑ تعلقے میں مکا ریسرچ سینٹر قائم کرنے کو منظوری

٭ ریاست کے صنعتی راہداریوں کی تر قی کو فو قیت دی جائے گی  ‘  وزیر اعلیٰ ایکناتھ شندے 

٭ ریاستی حکو مت کے سوچھ مُکھ ابھیان کے بھارت رتن سچن تینڈولکر خیرسگالی سفیر 

٭ ریاست کے414؍ آنگن واڑیوں کو گود لینے کے لیے 4؍ سماجی اِداروں سے معا ہدہ

٭ منریگا  کے تحت 26؍ ہزار 250؍ ٹیب خریدی کے ٹینڈر میں گھپلہ ہوا ہے  ‘  حزب مخالف رہنما امبا داس دانوے کاالزام

اور

٭ عثمان آباد میں دھا را شیو ڈرامہ فیسٹِوَل کا آغاز


علاقائی خبریں ختم ہوئیں

آپ یہ خبر نامہ ہمارے یو ٹیوب چینل آکاشوانی سماچار اورنگ آباد 

Aurangabad AIR News    پر دوبارہ کسی بھی وقت سن سکتے ہیں۔

٭٭٭



Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 31.05.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 31 May 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३१ मे  २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपयांचं अनुदान देणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

·      औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यात मका संशोधन केंद्र स्थापन करण्याला मान्यता

·      राज्यातल्या औद्योगिक मार्गिकांच्या विकासाला प्राधान्यक्रम - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

·      शेंद्रा बिडकीन        औद्योगिक वसाहतीत येत्या काही वर्षात आणखी पन्नास उद्योगांचं उत्पादन सुरू होण्यासाठी शासनाचे प्रयत्न 

·      राज्य शासनाच्या स्वच्छमुख अभियानाचे भारतरत्न सचिन तेंडूलकर सदिच्छादूत

·      राज्यातल्या चारशे चौदा अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी चार सामाजिक संस्थांशी सामंजस्य करार

·      मनरेगा अंतर्गत, सव्वीस हजार दोनशे पन्नास टॅबच्या खरेदीच्या निविदेत घोटाळा झाल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप

आणि

·      उस्मानाबादमध्ये धाराशीव नाट्य महोत्सवाला प्रारंभ

सविस्तर बातम्या

प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी , “नमो शेतकरी महासन्मान निधी  योजना राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुंबईत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले…

 

Byte…

अतिशय महत्वाचे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे घेतलेले आहेत. पहिला निर्णय नमो शेतकरी सन्मान योजना. केंद्राची जी सहा हजार रूपयाची योजना शेतकऱ्यांसाठी होती, त्याच्या जोडीने राज्य सरकारकडून देखील सहा हजार रूपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. म्हणजे सहा प्लस सहा म्हणजे बारा हजार रूपये शेतकऱ्यांना मिळतील. त्याचबरोबर जे पीक विम्याचा हप्ता जो शेतकरी भरत होता, तो देखील त्याच्या विम्याचा हिस्सा सरकार भरेल. शेतकऱ्यांने फक्त एक रूपया भरायचा. अशा प्रकारचे अतिशय ऐतिहासिक निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये झाले.

त्याचबरोबर प्रधानमंत्री किसान योजनेची कार्यपद्धती सुधारण्याचा निर्णयदेखील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेला, २०२७-२८ पर्यंत मुदतवाढ देण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. ही योजना आणखी तीन जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे.

 

कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी नव्या वस्त्रोद्योग धोरणालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या धोरणामुळे २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होणार आहे. तसंच पुढच्या पाच वर्षांत पाच लाखांपर्यंत रोजगारनिर्मिती करण्याचा उद्देश आहे. वस्त्रोद्योगाच्या वाढीसाठी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळ स्थापन करण्याचाही या धोरणात समावेश आहे.

 

कामगारांची सुरक्षा, आरोग्य, आणि कामाच्या स्थितीबाबत नवीन कामगार नियमांनाही राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. केंद्र शासनानं सर्व २९ कामगार कायदे एकत्र करून चार कामगार संहिता तयार केल्या असून, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता २०२० या चौथ्या संहितेला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.

 

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात मौजे कोटनांद्रा आणि डोईफोडा इथं मका संशोधन केंद्र स्थापन करण्याला, तसंच त्यासाठीच्या बावीस कोटी अठरा लाख रुपयांच्या खर्चालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. या मका संशोधन केंद्रासाठी आवश्यक २१ पदे आणि बाह्यस्त्रोताद्वारे १८ पदे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या मान्यतेच्या अधिन राहून निर्माण करण्यात येतील.

 

महिलांना पर्यटन व्यवसायात अधिकाधिक वाव मिळावा आणि त्यांचं सक्षमीकरण व्हावं, यादृष्टीनं “आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत “आई हे महिला केंद्रीत पर्यटन धोरण राबवण्यास, काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. याअंतर्गत काही पर्यटन स्थळांवर महिला बाईक- टॅक्सी सेवा सुरु करण्यात येणार आहे. याशिवाय, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एक ते आठ मार्च या कालावधीत, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सगळ्या रिसॉर्ट्समध्ये, महिला पर्यटकांना ऑनलाईन बुकिंगमध्ये पन्नास टक्के सूट देण्यात येणार आहे.

 

बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विकासाला प्रोत्साहन मिळावं यादृष्टीनं अधिमूल्यात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णयही, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 

नवीन माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून, या धोरणामुळे राज्य माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर राहण्याला, तसंच यातून पंचाण्णव हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करण्याला मदत होणार आहे.

राज्यातल्या अभियांत्रिकी तसंच औषधनिर्माण महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची एकशे पाच पदांची निर्मिती करण्याला, तसंच बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा इथल्या जिगाव प्रकल्पाला गती देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्य बैठकीत घेण्यात अला.

****

राज्यातल्या औद्योगिक मार्गिकांच्या विकासाला प्राधान्यक्रम दिला असून, तिथली विकास कामं गतीनं व्हावीत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय औद्योगिक मार्गिकांच्या विकास आणि अंमलबजावणीबाबत, शिखर संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते काल दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीला दिल्लीहून अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री सर्वांनंद सोनोवाल उपस्थित होते. केंद्र सरकारनं देशभरात उद्योग समूहांसाठी वितरित केलेल्या दोनशे एकोणचाळीस भूखंडांपैकी, दोनशे भूखंड राज्यातल्या शेंद्रा बिडकीन इथं असल्याची माहिती, मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रकल्पात सध्या सत्तावीस उद्योगांनी प्रत्यक्ष उत्पादन सुरू केलं असून, येत्या काही वर्षात आणखी पन्नास उद्योगांचं उत्पादन सुरू होण्यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले.

औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या रूंदीकरणाचं काम वेळेवर पूर्ण करावं, औरंगाबाद-पुणे हरित महामार्गासाठी भूसंपादन लवकर व्हावं, या मार्गावर रेल्वेमार्गासाठी अतिरिक्त जागेचं भूसंपादन करावं, औरंगाबाद जिल्ह्यातल्या करमाड रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे सायडिंग आणि मालाची चढउतार करण्याची व्यवस्था करावी, यासह अन्य मागण्या मुख्यमंत्री  शिंदे यांनी या बैठकीच्या माध्यमातून केंद्राकडे केल्या. त्यावर, केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या महाराष्ट्राच्या प्रस्तावांमध्ये लक्ष घालून ते मंजूर करण्यात येतील, अशी हमी वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी दिली.

****

केंद्रातल्या मोदी सरकारला नऊ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे देशभर महाजनसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबवलं जाणार असून, या अभियानाच्या अखेरीस मोदी सरकारच्या नऊ वर्षातल्या कामगिरीची पुस्तिका घरोघरी पोहोचवली जाणार असल्याची माहिती तावडे यांनी दिली. ते म्हणाले....

Byte..

केंद्रातल्या मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्त उद्या ३१ मे ला माननिय पंतप्रधानांची अजमेरला जाहीर सभा होऊन, महाजनसंर्पक अभियान सुरू होइल, ते ३० जूनपर्यंत चालेल. या संपूर्ण अभियानाच्या अंतर्गत सुमारे ८० कोटी लोकापर्यंत पोहचवण्याची योजना आखली आहे. सुमारे २२७ नेते या अभियानात सहभागी होतील.

****

मौखिक आरोग्यासाठी राज्य शासनानं सुरु केलेल्या स्वच्छ मुख अभियानाचे सदिच्छादूत म्हणून काम करण्यासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्याशी काल मुंबईत सामंजस्य करार करण्यात आला. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्यं विभागाच्या वतीनं हा करार करण्यात आला. मुंबईत झालेल्या या समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

नव्या पिढीच्या सवयी सुधारुन त्यांच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी या अभियानामार्फत योगदान देता येत असल्याबद्दल तेंडुलकर यांनी समाधान व्यक्त केलं. ते म्हणाले,

 

Byte…

मला वाटलं की हा इनिशिएटिव्ह एवढा चांगला आहे, की ह्याचाबरोबर मी अटॅच व्हायला हवच. आणि जर काय मी काही माझ्या कॅपेसिटीनुसार माझं कॉन्ट्रिब्यूशन करू शकतो, यंगस्टर्स नाही म्हणार पण वेगवेगळ्या जनरेशन वरती, त्यांच्या हॅबिट चेंज करण्यासाठी, त्यांची तब्येत चांगली होण्यासाठी, तर मी म्हणेन की माझा एक हा सक्सेसफूल व्हेंचर असू शकतो आणि असोसिएशन असू शकतो.

****

राज्यातल्या चारशे चौदा अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी चार सामाजिक संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती, महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीनंतर ते बोलत होते. शासनाच्या अंगणवाडी दत्तक धोरणाअंतर्गत गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून आतापर्यंत, विविध एकशे छप्पन्न सामाजिक संस्थानी, चार हजार आठशे एकसष्ठ अंगणवाड्या दत्तक घेतल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शासनानं राज्याच्या प्रत्येक ग्रामपंचायतींमधल्या दोन कर्तबगार महिलांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही लोढा यांनी यावेळी दिली.

दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारासाठी नांदेड जिल्ह्यातल्या दोन हजार सहाशे वीस महिलांची निवड झाल्याची माहिती, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिली आहे. या पुरस्कारांचं आज गावपातळीवर वितरण करण्यात येणार आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पाचशे रुपये, असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे.

****

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना- मनरेगा अंतर्गत, शासनानं सव्वीस हजार दोनशे पन्नास टॅबच्या खरेदीसाठी काढलेल्या निविदेत घोटाळा झाला असल्याचा आरोप, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. सदर निविदा प्रक्रिया रद्द करून विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी, तसंच दोषी आढळणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकावं, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शासन निर्णयानुसार पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या निविदा काढण्यासाठी, उच्चाधिकार समितीची परवानगी घेणं आवश्यक असताना, या टॅब खरेदीसाठी परवानगी का घेतली नाही, तसंच सचिवांना एक ते पाच कोटी रुपयांच्या मर्यादेत निविदा काढण्याचे अधिकार असताना, सत्तर कोटींची निविदा काढण्यात आल्याचा आरोप  दानवे यांनी या पत्रात केला आहे.

****

औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा आजपासून सुरू होत आहेत तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा सहा जूनपासून सुरू होणार आहेत. परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी ही माहिती दिली. चार जिल्ह्यातल्या ७८ केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. यामध्ये सर्वाधिक ३१ केंद्र औरंगाबाद जिल्ह्यात, बीड जिल्ह्यात २१, तर जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी १३ केंद्र आहेत.

****

उस्मानाबाद शहरात धाराशीव नाट्य महोत्सवाचं काल सिने अभिनेता उमेश जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नाट्यशास्त्र विभाग, आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेची उस्मानाबाद शाखा यांच्यावतीनं संयुक्तपणे, हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातच आपली जडणघडण झाली असल्याचं सांगत, जगताप यांनी, नाट्य कलावंत तयार व्हावेत यासाठी या नाट्यशास्त्र विभागाकडून होत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात विद्यापीठ उपकेंद्र परिसरात खुला रंगमंच उभारण्यासाठी, वीस कोटी रुपयांची तरतूद झाली असून, त्याचं काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती, विद्यापीठाचे सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी यावेळी दिली.

****

जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या औचित्यानं शासनानं आखलेल्या विशेष प्रचार कार्यक्रमांतर्गत आज परभणीच्या जिल्हा रुग्णालयात विविध कार्यक्रम होणार आहेत. यावर्षी या दिनासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं ठरवलेल्या, “आम्हाला अन्न हवे, तंबाखू नको, या संकल्पनेवर आधारित, प्रसार फेरी, रांगोळी स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा असे कार्यक्रम परभणी शहरात यानिमित्तानं होणार आहेत.

औरंगाबाद शहरातही काल तंबाखू विरोधी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचं बक्षिस वितरण जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी ११ वाजता वरोरा इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचं पार्थिव काल दुपारी दिल्लीहून आणलं, त्यानंतर वरोरा इथं त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवलं होतं. 

धानोरकर यांचं काल दिल्ली इथं निधन झालं, ते ४७ वर्षांचे होते.

****

राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात अनेक उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे. यामध्ये, दिव्यांग कल्याण आणि पुनर्वसन योजनेतून, सहाशे सोळा लाभार्थ्यांना मदत दिली जाणार आहे. त्रेचाळीस मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार असून, पासष्ट लाभार्थ्यांना गाय किंवा म्हैस खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. याशिवाय, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राकडून दहा अंध विद्यार्थ्यांना स्मार्ट केन, दहा दिव्यांगांना चाकाच्या खुर्च्या आणि दहा दिव्यांगांना तीन चाकी सायकलींचं प्रातिनिधिक वाटप होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे तात्यासाहेब चिमणे, तर उपसभापतीपदी मीराबाई वराडे यांची बिनविरोध निवड झाली. काल झालेल्या निवड प्रक्रियेत सभापती आणि उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याचं ही निवडणूक बिनविरोध झाली.

****

शिक्षकांनी उच्च विचार आणि मोठे आदर्श डोळ्यांसमोर ठेवून काम करणं गरजेचं आहे, असं मत औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी केलं आहे. येत्या पंधरा जूनला सुरू होत असलेल्या नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर, शाळापूर्व प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन श्रीकांत यांच्या संकल्पनेतून काल करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. आमदार संजय शिरसाट आणि आमदार हरिभाऊ बागडे या कार्यक्रमाला उपस्थित होते. या शैक्षणिक वर्षापासून औरंगाबाद महानगरपालिकेच्या सगळ्या मराठी आणि उर्दू शाळांचं माध्यम सेमी इंग्लिश होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

****