आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Saturday, 31 March 2018
Text - AIR News Bulletin, Aurangabad 31.03.2018 - 17.25
Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 31 March 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मार्च २०१८ सायंकाळी
५.२५ मि.
****
उत्पादकता सुधारणं, शेती क्षेत्र मजबूत करणं आणि ई नाम सारख्या ऑनलाईन बाजारपेठा
उपलब्ध करणं यासारख्या प्रयत्नातून २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्यास
मदत होईल, असं उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते आज हैदराबाद इथं
एका कार्यक्रमात बोलत होते. शेतकऱ्यांनी स्वत:ची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कुक्कुटपालन,
दुग्धव्यवसाय यांसारखे जोडधंदे सुरु करावेत, असं ते म्हणाले. कृषी उत्पादनांचं योग्य
मूल्य सुनिश्चित करण्याला प्राथमिकता दिली पाहिजे, त्यामुळेच शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट
करण्याचं उद्दिष्ट पूर्ण होईल, असं त्यांनी नमूद केलं.
****
केंद्रीय अन्वेषण विभाग - सी बी आयनं आय सी आय सी आय बँकेच्या
व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांच्यामधील कथित व्यावसायिक संबंधांबाबत प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. आय सी आय सी
आयनं २०१२ मध्ये धूत यांना तीन हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांचं कर्ज दिल्यानंतर, सहा महिन्यांनी धूत यांनी दीपक कोचर यांच्या कंपन्यांना कोट्यवधी
रुपये दिल्याचा आरोप आहे. धूत यांना आय सी आय सी आय बँकेकडून मिळालेलं हे कर्ज स्टेट
बँक ऑफ इंडियासह २० बँकांकडून मिळालेल्या चाळीस हजार कोटी रुपये कर्जाचा
भाग आहे. मात्र, या प्राथमिक चौकशीमध्ये चंदा कोचर यांचा समावेश नसून त्यांच्या चौकशीबाबत
नंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचं सी बी आयनं म्हटलं आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३३८ व्या पुण्यतिथीनिमीत्त आमदार आशिष शेलार
यांनी मुंबईत विधान भवन प्रांगणातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार
अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉक्टर अनंत
कळसे, विधानसभा अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर आणि इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित
होते.
****
रायगडावराही शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विविध कार्यक्रम पार पडले.
श्री शिवपुण्यस्मृती पुरस्कारांचं वितरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन
भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आजही जिवंत असल्याचं,
तसंच रायगड हा सर्वांसाठी मार्गदर्शक असल्याचं भागवत यांनी यावेळी नमूद केलं.
****
संशोधन केंद्रांतून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचवण्यासाठी पुढील
काळात प्रशिक्षित कृषी विस्तार कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी लागेल, असं मत यशवंतराव
चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू इ. वायुनंदन यांनी व्यक्त केलं आहे.
नाशिक इथं आज ‘कृषी विस्तार सेवा प्रदाता’ या तीस दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या
उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
****
जालना नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या
अध्यक्षतेखाली घेण्यात आली. राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत शहरी बेघरांना
तात्पुरता बेघर निवारा सुरू करणं, शहरातल्या खुल्या भूखंडावर ज्येष्ठ नागरिकांसाठी
नाना-नानी पार्क विकसित करणं आदी २१ ठरावांना सभागृहानं मान्यता दिली. शहरातल्या आठवडी
बाजारात ग्रामीण भागातून भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून जागाभाडे वसूल
केलं जाऊ नये, अशी मागणी शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहात केली.
****
तिहेरी तलाक विरोधी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी
नाशिक इथं आज शरियत बचाव कृती समितीच्या वतीनं मुस्लिम महिलांचा मूक मोर्चा काढण्यात
आला. महिलांच्या एका प्रतिनिधी मंडळाच्या वतीनं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात
आलं. यात धार्मिक प्रथांमधील सरकारी हस्तक्षेपास विरोध करण्यात आला आहे. या मोर्चात
नाशिक जिल्ह्यातील विविध भागातल्या मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या.
****
औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी यशवंतराव चव्हाण
प्रतिष्ठान आणि महात्मा गांधी मिशन यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या दोन एप्रिल रोजी
‘कचराकोंडी जागर संवाद’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. कचरा प्रश्नाचे ज्येष्ठ
अभ्यासक आणि मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ.शरद काळे हे
यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.
****
राज्यात मराठवाडा आणि विदर्भात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. आज सर्वात जास्त
४२ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान परभणी इथं नोंदवलं गेलं. नांदेड ४२, बीड ४१, तर
औरंगाबाद इथं ३९ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढचे दोन दिवस राज्यात
आणखी उष्णता वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
भारताचा बॅडमिंटनपटू समीर वर्मा वरलीन्स ओपन वर्ल्ड हंड्रेड स्पर्धेच्या उपांत्य
फेरीत पोहोचला आहे. उत्पांत्यपूर्व फेरीत समीरनं फ्रान्सच्या लुकास कर्व्हीचा १७-२१,
२१-१९, २१-१५ असा पराभव केला. भारताचा दुसरा खेळाडू परुपल्ली कश्यप याला पुरुष एकेरीत,
तर भारतीय जोडी फ्रान्सीस अलवीन आणि के. नंदगोपाल यांना या स्पर्धेत पराभव पत्करावा
लागला.
****
Text -AIR NEWS BULLETIN AURANGABAD 31.03.2018 6.50
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३१ मार्च २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
प्रबळ इच्छाशक्ती आणि मनुष्यबळ हेच कोणत्याही देशाची खरी संपत्ती असते, असं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते
काल स्मार्ट इंडिया हॅकेथॉन - २०१८ मध्ये दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. जेंव्हा देशाचे नागरीकच एखादा बदल निश्चित करतात तेंव्हा सर्वकाही
शक्य होतं, असंही ते यावेळी म्हणाले. कोणत्याही समस्येचं मूळ कारण शोधणं गरजेचं असून, त्यावर तोडगा शोधण्यासाठी चौकटीबाहेर
जाऊन विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कोणतंही सरकार एकट्यानं अपेक्षित बदल
घडवून आणू शकत नाही त्यासाठी लोकसहभाग आवश्यक असतो, असंही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं. देशभरातल्या २८
केंद्रांवर हॅकेथेनचा हा अंतिम सोहळा पार पडला.
****
हनुमान जन्मोत्सव आज सर्वत्र भक्तीभावानं साजरा होत आहे. ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये
सूर्योदयाच्या वेळी हनुमानाचा जन्मसोहळा पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला. औरंगाबाद जिल्ह्यात
खुलताबाद इथं भद्रा मारोतीच्या दर्शनासाठी काल रात्रीपासूनच अनेक भाविक पायी चालत पहाटेच्या
सुमारास मंदिरात दाखल झाले. औरंगाबाद इथल्या प्रसिद्ध सुपारी हनुमान मंदिरातही भाविकांनी
पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. या निमित्तानं सर्वत्र धार्मिक कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे.
****
देशाच्या आर्थिक विकासाचं सध्या रंगवलं जाणारं चित्र फसवं असल्याची टीका, माजी
केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं, महावीर व्याख्यानमालेत बोलत होते.
सत्तेवर येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची भाजपनं पूर्तता केली नाही, त्यामुळे सर्वच
घटक नाराज असल्याचं, ते म्हणाले. विमुद्रीकरणाच्या निर्णयावरही सिन्हा यांनी यावेळी
टीका केली.
****
नांदेड इथं आयोजित कृषी महोत्सवाचा काल समारोप झाला. या महोत्सवात नांदेडसह परभणी आणि हिंगोली
जिल्ह्यातले २० हजार शेतकरी आणि ग्राहक सहभागी
झाले होते. गेल्या २६ तारखेपासून सुरु
असलेल्या या महोत्सवात जवळपास सदुसष्ठ लाख रुपयांच्या शेतमालाची विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
//*************//
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date: 31 March 2018
Time: 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۳۱ ؍مارچ ۲۰۱۸ء
وقت : صبح ۴۰-۸ سے ۴۵-۸
درج فہرست ذاتوں اور قبائل پر مظا لم کی اِنسداد سے متعلق قا نون ایٹرا سِٹی ایکٹ کے سلسلے میں عدالت عظمیٰ کے حا لیہ فیصلے کے خلاف مرکزی حکو مت نے نظر ثا نی در خواست داخل کر نے کا فیصلہ کیا ہے۔ سماجی انصاف کے مرکزی وزیر تھاور چند گہلوت نے کل ایک ٹو ئیٹر پیغام میں اطلاع دی۔ عدالت عظمیٰ نے اِس قانون کے خلاف دائر کر دہ عرضداشت میں فیصلہ دیا تھا کہ اِس ضمن میں ملزمین کے خلاف فوری کار وائی نہ کرتے ہوئے مکمل تحقیقات کے بعد کار وائی کی جائے۔ اپنے پیغام میںگہلوت نے کہا کہ درج فہرست ذاتوں اور قبائل کی بہبود کے لیے مرکزی حکو مت پا بند ہے اور اِس فیصلے کے خلاف نظر ثا نی در خواست داخل کی جائے گی۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
مرکزی ثا نوی بورڈ یعنی CBSE کے تحت با رہویںکے امتحا نات کے دوران معا شیات کا پر چہ قبل از وقت افشاء ہو نے کے واقعے کے با عث 25؍ اپریل کو اِ س مضمون کا دو با رہ امتحان لیا جا ئے گا۔ بورڈ نے بتا یا کہ دسویں جماعت کا ریاضی کا پر چہ بھی قبل از وقت افشاء ہو گیا تھا۔ اِس لیے ماہ جو لائی میں ریا ضی کا امتحان بھی دو با رہ لیا جائے گا۔ تا ہم صرف دہلی اور ہر یا نہ میں یہ دو با رہ امتحان ہو گا بقیہ ریاستوں کے طلباء کو دو با رہ امتحان دینا نہیں ہو گا یہ وضا حت فروغ انسانی وسائل کی وزا رت کے ایک بیان میں دی گئی۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
سابق مرکزی وزیر زراعت اور راشٹروادی کانگریس پارٹی کے سر براہ شرد پوار نے کہا ہے کہ زرعی ما ہرین اور محققین کو زراعت کی جدید کاری پر تو جہ دینا چا ہیے۔ کل جلگائوں میں جین ایریگیشن سمٹمز لِمِٹیڈ کی جانب سے زر عی ایوارڈ کی تقسیم کی تقریب سے وہ خطاب کر رہے تھے۔ اُنھوں نے کہا کہ زرعی شعبے میں ہونے والی تحقیقات اور تبدیلیوں کو کسا نوں تک پہنچا یا جا نا چا ہیے تا کہ زراعت کے شعبے میں تبدیلیاں لائی جا سکے۔ وزیر محصول چندر کانت پاٹل ، وزیر زراعت پانڈو رنگ پھُنڈ کر ، آ برسانی کے وزیر ببن رائو لو نیکر اور بقائے آب کے وزیر گریش مہا جن بھی اِس تقریب میں شریک تھے۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
وزیر توا نائی چندر شیکھر با ون کُڑے نے کہا ہے کہ مرکزی حکو مت کی ہدا یات کے مطا بق توا نائی پیدا کرنے والے 25؍ سال سے زائد پُرا نے پرو جیکٹ مر حلہ وار بند کر دیئے جائیں گے اور اُن کی جگہ ما حو لیات کو نقصان نہ پہنچا نے والے نئے پرو جیکٹ شروع کیئے جائیں گے۔ جلگائوں ضلع کے بھساول تعلقے کے تحت دیپ نگر میں مجوزہ 660؍ میگاواٹ بجلی پیدا کرنے والے پرو جیکٹ کا سنگ بنیاد کل وزیر محصول اور جلگائوں ضلع کے رابطہ وزیر چندر کانت پاٹل کے ہاتھوں رکھا گیا۔ پاٹل نے بتا یا کہ یہ پرو جیکٹ 42؍ مہینوں میں مکمل کر لیا جائے گا۔ 114؍ ہیکٹر پر مشتمل 660؍ میگا واٹ کے اِس پرو جیکٹ سے بھسا ول توا نائی سازی مرکز سے ایک ہزار870؍ میگا واٹ بجلی تیار کی جا سکے گی۔
جام نیئر اور یا ول تعلقوں میں220؍ کلو واٹ اور بھڑ گائوں میں132؍ کلو واٹ کے ذیلی مراکز کے علا وہ دیگر8؍ ذیلی مراکز کا سنگ بنیاد بھی کل رکھا گیا۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
ٹیکس دہندگان کو سہو لت بہم پہنچا نے کی غرض سے آج 31؍ مارچ کو ریزرو بینک آف اِنڈیا کے دفا تِر اور ٹیکس ادائیگی کی سہو لت دینے والی بینکوں کی شاخیں رات8؍ بجے تک کھلی رہے گی۔ علا وہ ازیں ای. کا رو بار در میا نی شب 12؍ بج تک کیا جا سکے گا۔ ٹیکس کی ادائیگی اور اِس کی رسید کے لیے ضروری انتظا مات بھی کیئے گئے ہیں۔RTGSاور NEFT کی سہو لت بھی اضا فی وقت تک جا رہی رہیگی۔ پر سوں2؍ اپریل کو بینکوں کو سا لا نہ گوشوا روں کی تکمیل کے لیے تعطیل رہے گی لیکن ریزر و بینک کے دفا تر اُس دن بھی کھلے رہیں گے۔
تا ہمRTGS اور NEFT سہو لت2؍ تاریخ کو بند رہیگی۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
لاتور میں میٹرو ریل کے ڈبّے بنا نے کے مجوزہ کا ر خا نے کا سنگ بنیاد آج شام رکھا جائے گا۔ تین مر حلوں میں تعمیر کیئے جانے والے اِس کا رخا نے کا پہلا مر حلہ ہرنگُڑ ریلوے اسٹیشن سے قریب واقع صنعتی علا قے میں تعمیر کیا جا رہا ہے۔ مرکزی وزیر ریلوے پیوش گوئل اور وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس کی مو جود گی میں اِسی مقام پر آج کار خا نے کا سنگ بنیاد رکھا جائے گا۔ اِس خصوص میں ڈِسٹرکٹ اسپورٹس کامپلیکس میں ایک جلسۂ عام رکھا گیا ہے۔ اِس مجو زہ کار خا نے کے لیے اب تک600؍ کروڑ روپئے منظور یئے جا چکے ہیں۔ ریلوے ڈبّے سازی کے اِس کار خا نے کے ساتھ ہی48؍ ذیلی صنعتیں بھی شروع ہو رہی ہیں۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
مراٹھواڑہ جنتا وِکاس پریشد کے سر براہ اور ماہر قا نون پر دیپ دیشمکھ نے مطالبہ کیا ہے کہ مراٹھواڑہ ریلوے کے مسائل سے متعلق طئے شدہ وقت میں پرو گرام تیار کر کے اِس پر عمل در آ مد کیا جائے۔ اِس خصوص میں وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس کو ارسال کر دہ مکتوب میں دیشمکھ نے کہا کہ ریلوے کی توسیع اور تر قی میں مراٹھواڑہ کو محروم رکھا جا رہا ہے۔ ریلوے گیج میں توسیع اور نئی ریلوے لائنوں کے لیے مراٹھوارہ میں طئے شدہ وقت میں پرو گرام تر تیب دینے کی ضرورت ہے۔

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 31.03.2018 6.50
Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 31 March 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मार्च २०१८ सकाळी ६.५० मि.
*****
· अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासंदर्भात
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर केंद्र सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
· सीबीएसईच्या बारावी अर्थशास्त्र विषयाची पुनर्परीक्षा
२५ एप्रिल रोजी तर दहावी गणित विषयाची पुनर्परीक्षा फक्त दिल्ली आणि हरियाणा राज्यातच
होणार
· कृषीविषयक प्रश्नांकडे शेतीतज्ज्ञ आणि संशोधकांनी
लक्ष केंद्रीत करावं - माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार
· हनुमान जन्मोत्सव सर्वत्र भक्तीभावानं साजरा
आणि
· लातूर इथल्या नियोजित मेट्रो रेल्वे डबेबांधणी कारखान्याचं
आज सायंकाळी भूमिपूजन
****
अनुसूचित जाती जमाती अत्याचार
प्रतिबंधक कायदा ॲट्रोसिटी संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निर्णयासंदर्भात
केंद्र सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री
थावरचंद गहलोत यांनी काल ट्विटरसंदेशात ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयानं, या कायद्यांतर्गत
तत्काळ कारवाई करण्याऐवजी पूर्ण चौकशीअंती कारवाईचे निर्देश दिले होते, तसंच अशा प्रकरणात
जामीन देण्याबाबतचे निर्बंध हटवले होते. अनुसूचित जाती जमातीच्या कल्याणासाठी सरकार
कटिबद्ध असून, या निर्णयाविरोधात केंद्र सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं,
गहलोत यांनी म्हटलं आहे.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण
मंडळ - सीबीएसईची बारावी अर्थशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे या विषयाची
पुनर्परीक्षा २५ एप्रिल रोजी होणार असल्याचं, मंडळाकडून सांगण्यात आलं आहे. दहावीच्या
गणित विषयाची प्रश्नपत्रिका फुटली होती, त्यामुळे या विषयाची पुनर्परीक्षा घेण्याचा
निर्णय झाल्यास, ती जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे. मात्र ही परीक्षा फक्त दिल्ली
आणि हरियाणा राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठीच असेल, इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांना
पुनर्परीक्षा द्यावी लागणार नसल्याचं, मनुष्यबळ विकास मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
****
कृषीविषयक प्रश्नांकडे शेतीतज्ज्ञ
आणि संशोधकांनी लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, असं माजी केंद्रीय कृषी मंत्री, राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. काल जळगाव इथं, जैन इरिगेशन
सिस्टिम्स लिमिटेडच्या वतीनं देण्यात येणारा पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी
उच्च-तंत्र पुरस्कार नाशिक जिल्ह्यातले प्रगतीशील तरुण शेतकरी अविनाश पाटोळे यांना
प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सन्मानचिन्ह, आणि दोन लाख रुपये, असं या
पुरस्काराचं स्वरुप आहे. शेती क्षेत्रातले बदल आणि संशोधनाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत
पोहो चवली, तरच शेतीत बदल घडून येतील,
असं पवार यांनी नमूद केलं. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर,
पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक मान्यवर
यावेळी उपस्थित होते, नवं तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांचं उत्पन्न वाढवण्याचा
शासनाचा प्रयत्न असल्याचं पाटील यावेळी म्हणाले, तर फुंडकर यांनी, कृषी क्षेत्रात काम
करणाऱ्या संस्थांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं असल्याची ग्वाही दिली. लोणीकर यांनी,
जालना जिल्ह्यात फक्त शेतकऱ्यांची औद्योगिक वसाहत उभारण्यात येत असल्याचं सांगतानाच,
शेतकरी वर्गानं विक्री कलाही आत्मसात केली पाहिजे, असं मत व्यक्त केलं.
****
केंद्राच्या सुचनेनुसार २५
वर्षांपेक्षा जुने वीजनिर्मिती प्रकल्प टप्प्या-टप्प्यानं बंद करण्यात येणार असून पर्यावरणाची
हानी न करणारे नवे प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांनी म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यात भुसावळ तालुक्यातल्या दीपनगर इथं उभारण्यात येणाऱ्या
६६० मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पाचं भूमिपूजन काल महसूल मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. भुसावळ इथला
हा प्रकल्प ४२ महिन्यात पूर्ण होईल, असं
पाटील यांनी सांगितलं. ११४ हेक्टर जमिनीवर साकारणाऱ्या या ६६० मेगावॅट क्षमतेच्या वीजनिर्मिती
प्रकल्पामुळे भुसावळ वीजनिर्मिती केंद्राची क्षमता एक हजार ८७० मेगावॅट एवढी होणार
आहे. जामनेर तालुक्यात केकतनिंभोरा आणि यावल तालुक्यात विरोदा इथं २२० किलोवॅट क्षमतेच्या
तसंच भडगाव तालुक्यात कोठली, आणि मुक्ताईनगर तालुक्यात कर्की पुर्नाड इथं १३२ किलोवॅट
क्षमतेच्या उपकेंद्रांचं तसंच इतर आठ उपकेंद्राचं भूमिपूजनही काल करण्यात आलं.
****
करदात्यांना कराचा भरणा करणं सोयीचं व्हावं यासाठी
आज ३१ मार्चला भारतीय रिजर्व्ह बँकेची कार्यालयं
आणि कर भरण्याची सुविधा असलेल्या
बँकांच्या शाखा रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार
आहेत. याशिवाय
इलेक्ट्रॉनिक व्यवहार रात्री बारा वाजेपर्यंत
सुरु राहतील. सरकारी भरणा आणि पोचपावतीसाठी आवश्यक
व्यवस्था करण्यात आली असून, आरटीजीएस आणि एनइएफटी या सुविधा देखील वाढीव वेळेत
सुरू राहणार असल्याचं बँकेकडून सांगण्यात आलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
हनुमान जन्मोत्सव आज सर्वत्र भक्तीभावानं साजरा होत आहे,
ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये सूर्योदयाच्या वेळी हनुमानाचा जन्मसोहळा पारंपरिक
पद्धतीनं साजरा झाला. औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद इथं भद्रा मारोतीच्या दर्शनासाठी
काल रात्रीपासूनच अनेक भाविक पायी चालत पहाटेच्या सुमारास मंदिरात दाखल झाले. औरंगाबाद
इथल्या प्रसिद्ध सुपारी हनुमान मंदिरातही भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लावल्या
आहेत. या निमित्तानं सर्वत्र धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
लातूर इथल्या नियोजित मेट्रो रेल्वे डबेबांधणी कारखान्याचं
भूमिपूजन आज सायंकाळी होणार आहे. तीन टप्प्यात उभारल्या जाणाऱ्या या कारखान्याचा पहिला
टप्पा हरंगुळ रेल्वेस्थानकाजवळ औद्योगिक वसाहतीत उभारला जात आहे, याच ठिकाणी आज सायंकाळी
रेल्वेमंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचं
भूमिपूजन होईल. जिल्हा क्रीडा संकुलावर यानिमित्तानं जाहीर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात
आलं आहे. या कारखान्याला अनुदानापोटी सध्या ६०० कोटी रुपये मंजूर झालेले असून, या कारखान्याच्या
सोबत ४८ सहउद्योग ही सुरु होणार आहेत.
****
मराठवाडयाच्या रेल्वे प्रश्नाबाबत कालबध्द कार्यक्रम आखून
तो पूर्ण करावा, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष विधीज्ञ प्रदीप देशमुख
यांनी केली आहे, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात
देशमुख यांनी, रेल्वेविकासासंदर्भात मराठवाड्याची उपेक्षा होत असल्याचं म्हटलं आहे.
रेल्वे रुंदीकरण आणि नव्या रेल्वे मार्गांच्या विस्ताराबाबत मराठवाड्यात कालबध्द कार्यक्रम
राबवण्याची गरज देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
****
बौद्ध धर्मियांनी गौतम बुद्धांच्या विचारांप्रमाणे आचरण
करावं, असं आवाहन, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी केलं आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातल्या कारोळी इथं आयोजित तिसऱ्या बौद्ध परिषदेच्या
उद्धाटन प्रसंगी ते काल बोलत होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५५ साली बौद्ध महासभा
सुरु केली तेव्हापासून आजपर्यंत या धम्माच्या प्रचार आणि प्रसार करण्याचं काम सुरु
असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या कर्नाटक सीमा भागातले बौद्ध धर्मीय ह्या परिषदेला
मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
****
लातूर जिल्ह्यात निलंगा उपजिल्हा रुग्णालयाला १०० खाटांची
मंजूरी मिळाली असून १८ कोटी २६ लाख ४२ हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे. ५० खाटांचं
हे रुग्णालय आरोग्य सुविधा पुरवण्यास अपुरं पडत असल्यानं, ते १०० खाटांचं करण्याची
मागणी जनतेकडून केली जात होती, या रुग्णालयात नऊ विशेषज्ञ अधिकारी, पाच आरोग्य अधिकारी,
तसंच १२५ आरोग्य कर्मचाऱ्यांची नव्यानं नियुक्ती होणार असल्याची माहिती पालकमंत्री
संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी
आवश्यक यंत्रसामुग्रीही उपलब्ध होणार असल्याचं, निलंगेकर यांनी सांगितलं.
****
नांदेड इथं आयोजित कृषी महोत्सवाचा
काल समारोप झाला. या महोत्सवात नांदेडसह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या २० हजार शेतकरी आणि ग्राहक सहभागी झाले. गेल्या २६ तारखेपासून सुरु
असलेल्या या महोत्सवात जवळपास ६७ लाख रुपयांच्या शेतमालाची विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
****
आगामी काळात राज्यातल्या
पाच हजार विकास कार्यकारी संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येणार असल्याची माहिती
सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. ते काल सोलापूर इथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँकेच्या शतकोत्सवी महोत्सवात बोलत होते. आर्थिक नियोजनाअभावी राज्यातल्या ज्या १२
हजार विकास कार्यकारी संस्था बंद पडल्या, त्या पुनरुज्जीवित केल्या जातील, असं त्यांनी
यावेळी सांगितलं.
****
परभणी आणि पूर्णा शहरासाठी पिण्याच्या पाण्याची आवश्यकता
असल्यानं, निम्न दुधना प्रकल्पातून उद्या एक एप्रिल रोजी दुधना नदीपात्रात पाणी सोडण्यात
येणार आहे. त्यामुळे दुधना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी
नदीपात्रात जाऊ नये, तसंच आपली जनावरं नदीपात्रात जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी,
नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याचा उपसा विद्युत मोटारीद्वारे कोणीही, कोणत्याही
प्रयोजनासाठी करु नये, असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
****
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे.
परभणी जिल्ह्यात काल ४१ अंश तर नाशिकमध्ये ३९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
//**********//
Friday, 30 March 2018
Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.03.2018 - 17.25
Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 30 March 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० मार्च २०१८ सायंकाळी
५.२५ मि.
****
अनुसूचित
जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा - ॲट्रोसिटी संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच
दिलेल्या निर्णयासंदर्भात केंद्र सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. सामाजिक
न्याय आणि अधिकारिता मंत्री थावरचंद गहलोत यांनी आज ट्विटरसंदेशात ही माहिती दिली.
सर्वोच्च न्यायालयानं या कायद्यांतर्गत तत्काळ कारवाई करण्याऐवजी पूर्ण चौकशीअंती कारवाईचे
निर्देश दिले होते, तसंच अशा प्रकरणात जामीन देण्याबाबतचे निर्बंध हटवले होते. अनुसूचित
जाती जमातीच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असून, या निर्णयाविरोधात केंद्र सरकार पुनर्विचार
याचिका दाखल करणार असल्याचं, गहलोत यांनी म्हटलं आहे.
****
केंद्रीय
माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसईच्या परीक्षेच्या गणित आणि अर्थशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिका
फुटल्याच्या निषेधार्थ आज विद्यार्थ्यांनी दिल्लीत अनेक ठिकाणी निदर्शनं केली. यावर्षी
जवळजवळ २८ लाख विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसले होते, विद्यार्थ्यांच्या
हिताचा विचार करुन प्रश्नपत्रिका फुटलेल्या विषयांची पुनर्परीक्षा घेण्यात येईल, असं
सीबीएसईच्या अध्यक्षा अनिता केरवाल यांनी सांगितलं.
दरम्यान,
याप्रकरणी झारखंडमधल्या चतरा इथून चार विद्यार्थ्यांना तसंच बिहारमधल्या पाटणा इथून
काही जणांना अटक करण्यात आली असून, खासगी शिकवणी चालकांची चौकशी सुरू आहे.
****
औषध
विक्रेत्यांच्या परवान्यांचं नूतनीकरण न करताच एक हजार २८६ दुकानांना औषधविक्रीची परवानगी
दिल्याबाबत नियंत्रक आणि महालेखापाल - कॅगनं आपल्या अहवालात राज्य सरकारवर कडक ताशेरे
ओढले आहेत. बाजारात उपलब्ध होणाऱ्या खाद्यान्न आणि औषधांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी
राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या औषध प्रशासनाकडे आहे. परंतु या विभागानं सुमारे
एक हजार ५३५ औषध विक्रेत्यांच्या परवान्यांची तपासणी केलीच नाही, तर एक हजार २८६ औषध
विक्रेत्यांच्या दुकानाची तपासणी न करताच त्यांना परवान्यांचं वाटप केलं. त्यामुळे
या दोन्ही प्रकारच्या औषध विक्रेत्यांकडून चुकीच्या औषधांचा पुरवठा होवून, जनतेचं आरोग्य
धोक्यात येण्याची भीती कॅगनं व्यक्त केली आहे.
****
कृषीविषयक
प्रश्नांकडे शेतीतज्ज्ञ आणि संशोधकांनी लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, असं राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. जळगाव इथं एका कार्यक्रमात
ते आज बोलत होते. शेतीत आधुनिक पद्धतीचा अवलंब करत नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करणं
आवश्यक असून, शेती क्षेत्रातले बदल आणि संशोधनाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली,
तरच शेतीत बदल घडून येतील, असं त्यांनी नमूद केलं.
****
जळगाव
जिल्ह्यात भुसावळ तालुक्यातल्या दीपनगर इथं उभारण्यात येणाऱ्या ६६० मेगावॅट वीजनिर्मिती
प्रकल्पाचं तसंच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या आठ उपकेंद्राचं भूमिपूजन आज
महसूल मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं.
हा वीजनिर्मिती प्रकल्प राज्याच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास पाटील यांनी
यावेळी व्यक्त केला.
****
बेकायदा
शाळा चालवल्या प्रकरणी ठाणे जिल्ह्यात ११ मुख्याध्यापकांना अटक करण्यात आली आहे. मुंब्रा
आणि दिवा परिसरातल्या या शाळा अवैध असल्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं दिला होता, मात्र
तरीही या शाळा सुरू होत्या. या प्रकरणी शाळांचे संचालक तसंच सचिवांविरोधातही गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
****
धुळे
इथं एकवीरादेवी यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. यानिमित्तानं मंदिरात विविध धार्मिक
कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून आणि इतर राज्यातूनही भाविक मोठ्या
संख्येनं याठिकाणी दाखल झाले आहेत. भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदीर प्रशासनानं चोख
पोलिस बंदोबस्त लावला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मराठवाडयाच्या
रेल्वे प्रश्नाबाबत कालबध्द कार्यक्रम आखून तो पूर्ण करावा, अशी मागणी मराठवाडा जनता
विकास परिषदेचे अध्यक्ष विधीज्ञ प्रदीप देशमुख यांनी केली आहे, या संदर्भात मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात देशमुख यांनी, मराठवाड्यातल्या रेल्वेविकासासंदर्भात
उपेक्षा होत असल्याचं म्हटलं आहे. मराठवाड्यात रेल्वे रुंदीकरण आणि नव्या रेल्वे मार्गांच्या
विस्ताराबाबत कालबध्द कार्यक्रम राबवण्याची गरज देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
****
धुळ्याचे
प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील इतर हक्कातला सावकारी
बोजा कमी करण्याचे निर्देश तलाठ्यांना दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार
आहे. अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यातील इतर हक्कात सावकारानं करुन घेतलेल्या वार्ड बोजाची
नोंद आजही आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना बँकांचं अर्थसाहाय्य मिळण्यासही अडचण निर्माण
होत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी मिसाळ यांनी या आदेशाचं परिपत्रक जारी केलं आहे.
****
Text AIR NEWS BULLETIN AURANGABAD 30.03.2018 13.00
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 March 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० मार्च २०१८ दुपारी १.०० वा.
****
करदात्यांना कराचा भरणा करणं सोयीचं व्हावं यासाठी
उद्या ३१ मार्चला भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्यालयं आणि कर भरण्याची सुविधा असलेल्या बँकांच्या शाखा रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवणार आहे. तसंच इलेक्ट्रॉनिक व्यवहार
रात्री बारा वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. सरकारी भरणा आणि पोचपावतीसाठी आवश्यक
व्यवस्था केली असून, आरटीजीएस
आणि एनइएफटी या सुविधा देखील वाढवलेल्या वेळेत सुरू राहतील. दोन एप्रिल २०१८ रोजी बँकांना
त्यांचा वार्षिक ताळेबंद पूर्ण करण्यासाठी सुटी जाहीर केली असली तरी रिझर्व्ह बँकेची
कार्यालयं या दिवशी सुरू राहतील, मात्र आरटीजीएस आणि एनइएफटी सेवा या बंद राहतील असं बँकेच्या प्रसिद्धी पत्रकात
म्हटलं आहे.
****
सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीनं एकाच दिवसात ७१ हजार
कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या डिजिटल व्यवहार प्रक्रियेचा विक्रम केला आहे. गेल्या बुधवारी एकूण ९८ लाख व्यवहारातून ही उलाढाल झाल्याचं अर्थ
मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजनेची व्याप्ती वाढवत असंघटीत
क्षेत्रात एक एप्रिल २०१६ नंतर रूजू झालेल्या आणि मासिक वेतन १५ हजार रूपये असणाऱ्या
कर्मचाऱ्यांचा पहिल्या तीन वर्षांचा भविष्य निर्वाह निधी भरण्याची तयारी केंद्र सरकारनं
दर्शवली आहे. या निर्णयामुळे सरकार पहिल्या तीन वर्षांपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या
१२ टक्के हिस्सा निवृत्ती वेतनासाठी देणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पेजयल आणि स्वच्छता मंत्रालय तसंच मनुष्यबळ विकास
मंत्रालयाच्या सहकार्यानं उन्हाळी सुट्टीत स्वच्छ भारत प्रशिक्षण आयोजित करणार आहे. या
सुट्टीत गावांमधल्या स्वच्छता कार्यात युवकांना सहभागी करुन घेणं हा त्यामागचा
उद्देश आहे. शंभर तासांच्या या प्रशिक्षणात श्रमदान, स्वच्छता
सुविधांची निर्मिती, व्यवस्था उभारणी, आणि
आसपासच्या गावांमधे स्वच्छतेच्या दृष्टीनं वर्तनात बदल घडवून आणण्याची मोहिम यांचा
समावेश आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन श्रेयांक
द्यायचं विद्यापीठ अनुदान आयोगानं मान्य केलं आहे.
****
आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक आणि
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्याशी सकारात्मक
चर्चा झाल्यानं महाराष्ट्र रोजंदारी कर्मचारी संघटनेनं आपलं आंदोलन मागं घेतलं आहे.
काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत दुर्गम आदिवासी भागांमध्ये
केलेल्या सेवेचा सहानुभूतीपूर्वक विचार करून भरती प्रक्रियेबाबतचा प्रस्ताव तीन महिन्यात
मंत्रिमंडळापुढे सादर करण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी संबंधितांना दिले.
****
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्ली
इथं आपलं उपोषण मागे घेताच अहमदनगर जिल्ह्यातल्या राळेगणसिद्धी इथल्या ग्रामस्थांनी
आनंद व्यक्त केला. अण्णांना पाठिंबा म्हणून ग्रामस्थांनी साखळी उपोषण, ग्रामसभा, रास्ता
रोको आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता.
****
जम्मू काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी
केलेल्या हल्ल्यात, एक विशेष पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला, तर
त्यांची पत्नी जखमी झाली.
दुसऱ्या एका घटनेत, शोपियान जिल्ह्यात लष्कराच्या
गस्ती पथकावर संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केला. शोपियान जिल्ह्यातच आज सकाळी दहशतवाद्यांनी सैन्यदलाच्या एका
तात्पुरत्या शिबीराला आग लावल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त
नाही. कुलगाममधे संशयित दहशतवाद्यांनी काल एका मदरसा शिक्षकावर
गोळीबार केल्याचं वृत्त आहे.
****
छत्तीसगढमधल्या बस्तर पसिरात काल नक्षलवाद्यांच्या ५९
समर्थकांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. यात १६ महिलांचा समावेश आहे. हे नागरिक नक्षलग्रस्त
गावांमधले असल्याचं सुकमाचे पोलिस अधिक्षक अभिषेक मीणा यांनी सांगितलं. या आत्मसमर्पणासाठी
पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
****
ख्रिस्ती समाजाचा प्रेषित येशू ख्रिस्त याच्या
बलिदानाची आठवण, गुडफ्रायडे निमित्त आज जगभरातल्या चर्चेसमध्ये आज विशेष प्रार्थना
सभांचं आयोजन करण्यात येत आहे. येशू ख्रिस्तांना सुळावर चढवण्यात आल्याच्या घटनेचं
स्मरण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. यानिमित्तानं औरंगाबाद शहरातल्या चर्चमध्ये
सकाळी प्रार्थना सभा घेण्यात आल्या.
****
परभणी आणि पूर्णा शहरासाठी पिण्याच्या पाण्याची आवश्यकता
असल्यानं, निम्न दुधना प्रकल्पातून परवा एक एप्रिल रोजी दुधना नदीपात्रात पाणी सोडण्याचं
नियोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे दुधना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात
आला आहे. शेतकऱ्यांनी नदीपात्रात जाऊ नये किंवा आपली जनावरे नदीपात्रात जाणार नाहीत
याची दक्षता घ्यावी, तसंच नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याचा उपसा विद्युत मोटारीद्वारे
कोणीही, कोणत्याही प्रयोजनासाठी करु नये, असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
//**********//
Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 30.03.2018 11.00
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३० मार्च २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
जगभरात सर्वत्र आज गुड फ्रायडे साजरा केला जात आहे. येशू ख्रिस्तांना सुळावर चढवण्यात
आल्याच्या घटनेचं स्मरण करण्यासाठी गुड फ्रायडे साजरा केला जातो. या निमित्तानं विविध
ठिकाणी चर्चमध्ये प्रार्थना सभांचं आयोजन केलं आहे. मानवतेच्या रक्षणासाठी येशू ख्रिस्तांनी
सोसलेल्या अपार कष्टांचं प्रतीक म्हणून गुड फ्रायडे साजरा केला जातो. येशू ख्रिस्तांनी मानवतेची सेवा आणि समाजातून अन्याय दूर करण्यासाठी आपलं आयुष्य
दिलं, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येशू ख्रिस्तांचं स्मरण केलं आहे.
****
देशभरात विविध केंद्रांवर स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या अंतिम फेरीत सहभागी झालेल्या
विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संवाद साधणार आहेत. स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची अंतिम फेरी आज आणि उद्या होणार असून
यासाठी देशभरात २८ केंद्रं
निवडली आहेत. युवावर्गाच्या विशेषतः अभियांत्रिकी
विद्यार्थ्यांच्या कल्पनांना प्रोत्साहन देणं, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव देणं हा हॅकेथॉनचा उद्देश आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या चिकलठाणा विमानतळाजवळच्या दुग्धनगरीच्या प्रस्तावित आरक्षित
जागेत कचरा विघटन करणारा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. कचरा प्रश्न सोडवण्यासाठी शासनानं
गठीत केलेल्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं काल हा निर्णय घेतला.
जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली.
****
जालना जिल्ह्यात भोकरदन- सिल्लोड रस्त्यावर मालखेडा गावाजवळ काल झालेल्या दोन दुचाकींच्या
अपघातात तीन जण ठार तर दोन जण जखमी झाले. सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात
घडला. अपघातात ठार झालेले तिन्ही तरूण हे एकाच कुटुंबातले असून लग्नपत्रिका वाटप करून
ते गावी जात असतांना हा अपघात झाला.
****
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त श्रीकांत देशमुख यांचा आज औरंगाबाद इथं मराठवाडा साहित्य परिषदेनं विशेष सत्कार आयोजित
केला आहे. हा सत्कार समारंभ मराठवाडा साहित्य परिषदेच्या ना.गो. नांदापूरकर सभागृहात
संध्याकाळी सहा वाजता कथाकार भास्कर चंदनशिव यांच्या हस्ते होणार असल्याचं परिषदेचे
कार्यवाह दादा गोरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवलं आहे.
//**********//
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date: 30 March 2018
Time: 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: 30 ؍مارچ ۲۰۱۸ء
وقت : صبح ۴۰-۸ سے ۴۵-۸
جلگائوں میںڈاکٹر الہاس پاٹل میڈیکل کالج کی منظوری منسوخ کرنے کاحکم ممبئی ہائی کورٹ کی اورنگ آبادبنچ نے دیاہے۔اس میڈیکل کالج نے سن 2012 میں میرٹ کے بجائے اسوسیٹ سی۔ای۔ٹی میں کم نشانات حاصل کرنے والے 20 طلباء کوداخلہ دیاتھا۔ان طلباء کے داخلے مسترد کرنے کا ایڈمیشن کنٹرول کمیٹی کافیصلہ بھی قائم رکھاگیاہے۔ اسی کے ساتھ نشانات ہونے کے باوجودداخلے سے انکارکرنے کی وجہہ سے عدالت میںعرضداشت پیش کرنے والی طالبہ تیجس ونی پھڑکوبیس لاکھ روپئے نقصان بھرپائی دینے کاحکم بھی عدالت نے دیا۔اس فیصلے کی وجہہ سے ایم ۔بی۔بی۔ایس کی ڈگری حاصل کرنے والے 20؍طلباء کواپنی ڈگریاں واپس کرنی ہوگی۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
لوک پال بل پرعمل درآمدسمیت دیگر مختلف مطالبات کے لئے نئی دلی میںرام لیلامیدان پرگذشتہ سات یوم سے بھوک ہڑتال کررہے بزرگ سماجی رہنماانناہزارے نے ان کی بھوک ہڑتال کل ختم کردی۔وزیراعلیٰ دیویندرپھڑنویس ،مرکزی وزیرگجندرسنگھ شیکھاوت، ریاست کے آبی وسائل وزیرگریش مہاجن اس موقع پرموجودتھے۔ہمارے گیارہ مطالبات حکومت نے فی الحال منظورکئے ہیں۔یہ بات انناہزارے نے بھوک ہڑتال ختم کرنے کے بعدکہی۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
ریاست میں 16؍اضلاع میںآنگن واڑیوں میں25؍ہزارسے زیادہ باغیچے تیارکرنے کے نظریہ سے خواتین اوربہبوداطفال وزیرپنکجامنڈے کی موجودگی میںریلائنس فائونڈیشن اورخواتین بہبوداطفال شعبے کے درمیان کل ممبئی میںمشترکہ معاہدہ کیاگیا۔ریاستی حکومت کی معرفت ریاست کے دیگر اضلاع میںبھی اس اسکیم پرعمل درآمدکیاجائے گا۔اس کی اطلاع پنکجامنڈے نے دی۔اس اسکیم پرمراٹھواڑہ میںپربھنی،عثمان آباد،بیڑ،جالنہ اوراورنگ آباد اضلاع میں عمل درآمدکیاجائے گا۔
دیہی علاقوں میں جن آنگن واڑیوں میںباغیچوں کے لئے اراضی نہیںہے۔ اُنہیں گرام پنچایت کی معرفت اراضی مہیا کی جائے گی۔یہ بات وزیر موصوفہ نے کہی۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
کل یعنی 31؍مارچ کوبینکس کے کاروبارشب آٹھ بجے تک جاری رہیںگے۔ شب بارہ بجے تک صارفین الیکٹرانک لین دین کرسکتے ہیں۔اس کی اطلاع ریزروبینک نے دی۔دواپریل کوبینکس کوتعطیل ظاہر کی گئی ہے۔گاہک کسی قسم کالین دین نہیں کرسکتے تاہم سال کے Balance Sheet مکمل کرنے کے لئے بینک کااندرونی کام کاج جاری رہے گا۔یہ بات ریزروبینک نے کہی۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
اورنگ آبادشہرکے چکل تھانہ طیران گاہ سے قریب دودھ نگری کے لئے مجوزہ مختص اراضی پرکچرے پرپروسیسنگ کرنے والا پروجیکٹ قائم کیا جائے گا۔کچرے کامسئلہ حل کرنے کے لئے حکومت نے تشکیل دی گئی ڈیویژنل کمشنرکی قیادت میںکمیٹی نے کل یہ فیصلہ لیا۔ ضلع کلکٹر نول کشوررام نے میٹنگ کے بعد اس کی اطلاع دی۔فی الحال شہرمیںچندمقامات پرگڑھے کھودکرگیلاکچرااس میںڈال کراسے کھادمیںتبدیل کرنے کاعمل شروع کیاگیاہے۔یہ طریقہ کار مستقبل میں جاری رکھاجائے گا۔ضلع کلکٹر نے یہ بات کہی۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
اورنگ آبادکے چکل تھانہ طیران گاہ پرانڈین ائیرپورٹ اتھاریٹی کی جانب سے کل سوفٹ بلندی پرقومی پرچم لہرایاگیا۔انڈین ائیرپورٹ اتھاریٹی کے مغربی علاقے کے ایگزیکٹیو ڈائریکٹر کیشوشرماکے ہاتھوں قومی پرچم کوعوام کے نام موسوم کیاگیا۔اس موقع پرڈیویژنل کمشنرڈاکٹر پرشوتم بھاپکر ،ضلع کلکٹر نول کشوررام،طیران گاہ کے ڈائریکٹر جی ۔ساڑوے موجودتھے۔ملک میں120 طیران گاہوں میںسے 29طیران گاہوں کوسوفٹ بلندی پرقومی پرچم لہرانے کے لئے منتخب کیاگیاہے۔اس میںاورنگ آبادکے طیران گاہ کوبھی شامل کیاگیاہے۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
جالنہ ضلع کے بھوکردن ۔سلوڑ راستے پرمالکھوڑا دیہات سے قریب کل ہوئے دوٹووہیلر س کے مابین حادثے میںتین افراد ہلاک ہوگئے اوردو افراد زخمی ہوگئے۔شام ساڑھے پانچ کے قریب یہ حادثہ پیش آیا۔حادثے میںہلاک ہونے والے تینوں افرادایک ہی خاندان کے ہے۔شادی کے کارڈس تقسیم کرکے یہ دیہات واپس جارہے تھے۔
۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰۰
خواتین کرکٹ میں کل ممبئی میں تین ملکوں کی ٹوئنٹی ٹوئنٹی سیریز کے چھٹے میچ میں بھارت نے انگلینڈ کو 8وکٹ سے ہرادیا۔بھارتی خواتین نے 108؍ رن کاجیت کانشانہ دووکٹ کھوکر حاصل کرلیا۔جبکہ 26؍گیندوں کاکھیل باقی تھا۔اسمرتی مندھانانے 62 اورہرمن پریت کورنے 20؍رن بنائے۔ اس سے پہلے ٹاس جیت کربلے بازی کرتے ہوئے انگلینڈ کی ٹیم 18اوورزاور5گیندوں میںصرف 107 رن کے اسکورپرآئوٹ ہوگئی۔ بھارت کی طرف سے انوجاپاٹل نے 3؍وکٹ لئے جبکہ پونم یادو،دپتی شرمااوررادھایادوکودو۔دووکٹ ملے۔بھارت اس سے پہلے کھیلے گئے اپنے سبھی میچ ہارچکاہے۔

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 30.03.2018 6.50
Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 30 March 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० मार्च २०१८ सकाळी ६.५० मि.
*****
· जळगाव इथल्या डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महविद्यालयाची
मान्यता आणि संलग्नता रद्द करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
· सरकारनं मागण्या तत्वतः मान्य केल्यामुळे जेष्ठ सामाजिक
कार्यकर्ते अण्णा हजारे यांचं उपोषण मागे
· औरंगाबाद शहरात चिकलठाणा विमानतळाजवळच्या दुग्धनगरीच्या
आरक्षित जागेत कचरा विघटन प्रकल्प उभारण्याचा विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालच्या
समितीचा निर्णय
आणि
· जालना जिल्ह्यात भोकरदन- सिल्लोड रस्त्यावर दोन दुचाकींच्या
अपघातात तीन जण ठार
****
जळगाव इथल्या डॉक्टर उल्हास
पाटील वैद्यकीय महविद्यालयाची मान्यता आणि संलग्नता रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च
न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. या महाविद्यालयानं २०१२ साली गुणवत्ता
यादीऐवजी असोसिएट सी ई टी मध्ये कमी गुण मिळालेल्या २० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला
होता. या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्याचा प्रवेश नियंत्रण समितीचा निर्णयही कायम
ठेवला आहे. याचबरोबर याप्रकरणी गुणवत्ता असूनही प्रवेश नाकारल्यामुळे न्यायालयात याचिका
दाखल केलेल्या तेजस्विनी फड या विद्यार्थीनीस २० लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे
आदेशही न्यायालयानं दिले आहेत. या निर्णयामुळे एम बी बी एस ही पदवी मिळालेल्या या २०
विद्यार्थ्यांना आपली पदवी गमवावी लागणार आहे.
****
लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीसह
इतर विविध मागण्यांसाठी नवी दिल्ली इथं रामलीला मैदानावर गेले सात दिवस उपोषण करणारे
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी त्यांचं उपोषण काल मागे घेतलं. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश
महाजन यावेळी उपस्थित होते. आपल्या ११ मागण्या सरकारनं तत्वतः मान्य केल्या असल्याची
माहिती अण्णा हजारे यांनी उपोषण सोडल्यानंतर दिली.
****
राज्यात १६ जिल्ह्यांमधल्या
अंगणवाड्यांमध्ये २५ हजारहून अधिक परसबागा तयार करण्याच्या दृष्टीनं महिला आणि बालविकास
मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रिलायन्स फाउंडेशन आणि महिला – बालकल्याण
विकास विभाग यांच्यामध्ये काल मुंबई इथं सामंजस्य करार करण्यात आला. राज्य शासनामार्फत
राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्येदेखील ही योजना राबवण्यात येईल, अशी माहिती पंकजा मुंडे
यांनी दिली.
आता ही योजना मराठवाड्यातल्या
परभणी, उस्मानाबाद सह बीड, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात ज्या अंगणवाड्यांना
परसबागांसाठी जागा नाही, त्यांना ग्रामपंचायतींमार्फत जागा उपलब्ध करुन देण्यात येईल,
असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
****
उद्या म्हणजे ३१ मार्च रोजी
बँकांचे व्यवहार रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार असून रात्री बारा वाजेपर्यंत इलेक्ट्रॉनिक
व्यवहार करता येतील, असं भारतीय रिर्झव्ह बँकेनं कळवलं आहे. दोन एप्रिल रोजी बँकांना
सुटी जाहीर करण्यात आली असून, ग्राहकांना कोणताही व्यवहार करता येणार नाही मात्र वर्षांचा
ताळेबंद पूर्ण करण्यासाठी बँकाचं अंतर्गत कामकाज सुरू राहणार असल्याचंही रिर्झव्ह बँकेनं
म्हटलं आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या चिकलठाणा
विमानतळाजवळच्या दुग्धनगरीच्या प्रस्तावित आरक्षित जागेत कचरा विघटन करणारा प्रकल्प
उभारण्यात येणार आहे. कचरा प्रश्न सोडवण्यासाठी शासनानं गठीत केलेल्या विभागीय आयुक्तांच्या
अध्यक्षतेखालच्या समितीनं काल हा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी बैठकीनंतर
ही माहिती दिली. सध्या शहरात काही ठिकाणी खड्डे खोदून ओला कचरा त्यात टाकून त्याचं
खतात रुपांतर करण्याची प्रकिया सुरू करण्यात आली आहे. ही पद्धत यापुढेही सुरु राहणार
असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर भारतीय विमानतळ
प्राधिकरणातर्फे काल १०० फूट उंचावर राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. भारतीय
विमानतळ प्राधिकरणाचे पश्चिम क्षेत्राचे कार्यकारी संचालक केशव शर्मा यांच्या हस्ते
या ध्वजाचं लोकार्पण झालं. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम
भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, विमानतळाचे
निदेशक डी. जी. साळवे उपस्थित होते. देशातल्या
१२० विमानतळापैकी २९ विमानतळांची शंभर फूट उंच राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी निवड केली
होती, त्यामध्ये औरंगाबाद विमानतळाचा समावेश करण्यात आला होता.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती
काल सर्वत्र भक्तिभावानं विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. औरंगाबाद
इथं यानिमित्त पैठणगेट परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. बाबा
पेट्रोल पंप परिसरातल्या भगवान महावीर चौकात
ध्वजारोहणही करण्यात आलं.
****
शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं
ही प्रशासनासोबतच अधिकाऱ्यांचीही नैतिक जबाबदारी असल्याचं लातूरचे पालकमंत्री संभाजी
पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. लातूर इथं काल रमाई घरकुल योजनेअंतर्गत ६४८ लाभार्थ्यांना
निलंगेकर यांच्या हस्ते धनादेशाचं वाटप करण्यात आलं, त्यावेळी
ते बोलत होते. लातूर जिल्ह्यातला एकही लाभार्थी या योजनेतून वंचित राहू नये, याची
महानगरपालिकेनं दक्षता घ्यावी, असं ते म्हणाले.
****
बीड जिल्ह्यातल्या रेल्वे कामांसाठी केंद्र आणि राज्य
सरकार पुढाकार घेत असून आगामी वर्षात जिल्ह्यात रेल्वे नक्कीच धावेल, असं खासदार प्रीतम
मुंडे यांनी म्हटलं आहे. बीड इथल्या पारपत्र कार्यालयाचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते
झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. मराठवाड्यातलं हे दुसरं पारपत्र कार्यालय असून अनेक
वर्षांची मागणी पूर्ण झाली असल्याचं मुंडे यावेळी बोलतांना म्हणाल्या.
****
वैद्यकीय क्षेत्रातल्या उत्कृष्ट कार्याबद्दल उस्मानाबाद
जिल्ह्याच्या भूम तालुक्यातल्या वालवड प्राथमिक आरोग्य केंद्राला तसंच लोहारा तालुक्यातल्या
स्पर्श ग्रामीण रूग्णालयाला जिल्हास्तरीय डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कारानं गौरवण्यात
आलं आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चना पाटील आणि कार्यकारी
अध्यक्ष संजय कोलते यांच्या हस्ते काल या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. जिल्ह्यातल्या
प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता, दर्जेदार सेवा आणि गुणवत्ता पुरवणाऱ्या विविध आरोग्य
केंद्रांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला.
****
नांदेड जिल्ह्यात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर धर्माबाद
पोलिसांनी कारवाई करत काल १८ जणांना अटक केली.
याशिवाय नऊ जेसीबी मशीन, २३ टिप्पर आणि ट्रॅक्टर, आठ मोटरसायकल आणि दहा हजार
ब्रास वाळू जप्त केली आहे. बिलोली, नायगाव
आणि उमरी तालुक्यात लिलाव न झालेल्या पट्ट्यावर गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळू
उपसा सुरू असल्याच्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी ही कारवाई केली.
****
ज्ञानवाणी, औरंगाबाद एफ एम रेडिओ केंद्राचं प्रसारण आज
सकाळी सहावाजेपासून १०५ पूर्णांक ६ मेगाहर्ट्झवर पुन्हा सुरु झालं आहे. इंदिरा गांधी
राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचं हे शैक्षणिक प्रसारण असून या केंद्रातून पत्रद्वारा प्रशिक्षण
घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम प्रसारित केले जातात. याशिवाय संगीतविषयक तसंच
प्रबोधनात्मक कार्यक्रमही प्रसारित केले जातात. दररोज सकाळी सहा ते १० आणि सायंकाळी
सहा ते रात्री १० वाजेपर्यंत या ज्ञानवाणी केंद्राचे कार्यक्रम श्रोत्यांना ऐकता येतील.
****
अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत राज्य शासनाची भूमिका
सकारात्मक असल्याचं पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे. जालना जिल्हा परिषदेच्या महिला, बालकल्याण
विभागाच्या वतीनं आयोजित आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार वितरण कार्यक्रमात काल ते
बोलत होते. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, असं
आश्वासन खोतकर यांनी या वेळी दिलं. उत्कृष्ट
कार्य करणाऱ्या २४ अंगणवाडी केंद्रांसह, १२ पर्यवेक्षिका आणि २४ अंगणवाडी सेविकांचा
या कार्यक्रमात राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
****
जालना जिल्ह्यात भोकरदन- सिल्लोड रस्त्यावर मालखेडा गावाजवळ
काल झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात तीन जण ठार तर दोन जण जखमी झाले. सायंकाळी साडे
पाच वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातात ठार झालेले तिन्ही तरूण हे एकाच कुटुंबातले
असून लग्नपत्रिका वाटप करून ते गावी जात असतांना हा अपघात घडला.
//************//
Subscribe to:
Posts (Atom)
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...