Saturday, 30 November 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.11.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 November 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
विधानसभेत महाविकास आघाडी सरकारनं १६९ विरोधी शुन्य अशा मतांनी बहुमत ठराव जिंकला. विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षानं सभागृहाचा त्याग केल्यानं ठरावाच्या विरोधात शुन्य तर चार सदस्य तटस्थ राहीले. तत्पूर्वी अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी झाल्यानंतर पुन्हा अधिवेशन बोलवण्यासाठी राज्यपालांच्या समन्सची गरज असते. मात्र, हे अधिवेशन बोलावण्यासाठी राज्यपालांनी समन्स काढले नसल्यामुळे सदरचे अधिवेशन नियमबाह्य असल्याचा दावा केला. तसंच मंत्र्यांचा शपथविधी कायद्यानुसार झाला नाही आणि अगोदर निवड केलेले हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांची निवड का रद्द केली, असा मुद्दाही फडणवीस यांनी मांडला. यावर हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी हंगामी अध्यक्ष बदलण्याचा अधिकार मंत्रिमंडळाला असतो त्यामुळे हे अधिवेशन कायदेशीर असल्याचं सांगत फडणवीस यांचे सर्व आक्षेप फेटाळले.
त्यानंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु यांनी अनुमोदन केलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आवाजी मतदानानंतर सदस्यांना उभे करून त्यांच्या मतांची मोजणी करण्यात आली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, मनसे आणि एमआयएम या पक्षांचे ४ सदस्य ठरावावेळी तटस्थ राहीले.
या ठरावानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी हंगामी अध्यक्षांनी घोडेबाजार रोखल्यामुळं त्यांचे आभार मानले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सर्व सदस्यांचे आभार मानले.
****
पाकिस्तानकडून दहशतवादाच्या रूपात सुरु असलेल्या छुप्या युद्धाचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं. ते आज  पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३७ व्या तुकडीचं दीक्षांत संचलनाच्या वेळी उपस्थित होते. जागतिक मंचावर दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तान एकटा पडला असल्याचं त्यांनी सांगितलं. सशस्त्र सेना दल देशाची ताकद असून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सशस्त्र सेनेचं योगदान महत्वाचं आहे, असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.
****
भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली आहे. राहुल गांधी यांनी आपल्याला दहशतवादी संबोधल्याचा आरोप प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला आहे. आपल्याविरोधात न्यायालयात कोणतेही दोषारोप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे राहुल गांधी यांनी विशेषाधिकाराचा भंग केला आहे असं सांगत प्रज्ञा सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
****
झारखंड विधानसभेच्या पहिल्या फेरीत सहा जिल्ह्यातल्या १३ मतदारसंघासाठी आज शांततेत मतदान पार पडले. दुपारी तीन वाजता मतदान संपले तेव्हा ६२.८७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
****
जिल्हा प्रशासन आणि लातूर महानगरपालिकेच्या वतीनं दोन दिवसांच्या जलपरिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. परिषदेचं उद्घाटन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. पाणी काटकसरीनं वापरणं, नळाला मीटर बसवणं आणि पाण्याचं धोरण निश्चित करण्यासाठी ही जलपरिषद महत्वाची ठरणार असल्याचं जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी सांगितलं. पाणी वापर मोजण्यासाठी वापरात येणारं मीटर आणि इतर यंत्र सामग्रीचं प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे.
****
१ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून सर्वत्र पाळला जातो. वैयक्तिक, सामाजिक आणि शासकीय पातळीवर जागरुकता निर्माण करण्यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय, बीड मार्फत जागतिक एड्स दिन निमित्त प्रभातफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रभातफेरीचं उद्घाटन जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय,यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी करण्यात आलं.
****
केंद्र सरकार सोन्याची दागिने आणि सोन्यापासून बनवलेल्या शोभेच्या वस्तूंमधील शुद्धता टिकवण्यासाठी १५ जानेवारी २०२१ पासून त्यावर हॉलमार्क बंधनकारक करणार आहे. यासंबंधीचा अध्यादेश येत्या १५ जानेवारीला काढण्यात येणार असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे. सदर नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी व्यापाऱ्यांना एक वर्षाचा कालावधी देण्यात आला असल्याचं पासवान यावेळी म्हणाले.
****

आकाशवाणी औरंगाबाद दि.30.11.2019 संध्याकाळी 06.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद - सोलापूर जिल्हा वार्तापत्र दिनांक – ३०.११.२०१९

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.11.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 November 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -३० नोव्हेंबर २०१दुपारी .०० वा.
****

 महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला आज दोन वाजता बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. यासाठी थोड्याच वेळात विधानसभेच्या दोन दिवसांच्या अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आपलं बहुमत सिद्ध करणार आहे. या अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अधिवेशन सुरू झाल्यानंतर बहुमत चाचणीपूर्वी मुख्यमंत्री ठाकरे सभागृहाला त्यांच्या मंत्रीमंडळाचा परिचय करून देणार आहे. विश्वासदर्शक ठरावानंतर विधानसभा अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम घोषित केला जाईल. सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी ३ डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे.  

 दरम्यान, विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये १६ ते २१ डिसेंबर दरम्यान घेण्यात येणार असल्याचं विधीमंडळ सूत्रानं सांगितलं. 
****

 विधानसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अर्ज दाखल केला आहे. तत्पूर्वी सर्वांच्या संमतीनं या पदासाठी पटोले यांचं नाव निश्चित करण्यात आलं असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. तर, उद्या रविवारी सकाळी अकरा वाजता सभागृहात विधानसभाध्यक्ष पदासाठी मतदान होणार आहे. एकमतानं अध्यक्षपदासाठी पटोले यांचं नावं निश्चित करण्यात आलं असल्याचं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. भाजपनेही विधानसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. मुरबाडचे आमदार किसन कथोरे हे भाजप उमेदवार असणार आहेत.
****

 महाविकास आघाडीच्या सरकारच्या शपथविधी दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहा मत्र्यांनी शपथ घेताना त्यांच्या नेत्यांची नावं घेणं नियमबाह्य असल्यानं सदरचा शपथविधी रद्द करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. यासाठी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे याचिका दाखल केली आहे. जर राज्यपालांनी या प्रकरणी न्याय दिला नाही तर सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबरकर निवड करण्यात आलेली आहे. अशा वेळी त्यांच्या ऐवजी दिलीप वळसे पाटील यांची निवड करणे नियमबाह्य असल्याचं पाटील यावेळी म्हणाले.
****

 दरम्यान, शपथ घेताना नेत्यांची नाव घेणं नियमबाह्य असेल तर भाजपच्या सर्व खासदारांची शपथ रद्द होईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलीक यांनी म्हटलं आहे. तसंच भाजपनं फोडाफोडीचं राजकारण करू नये, अन्यथा आम्ही जर त्यांचे आमदार फोडले तर भाजप रिकामा होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. सत्तेची लालसा दाखवून भाजपनं अनेक नेत्यांना प्रवेश दिला ते सर्व आमदार आज आमच्याकडं येण्यास उत्सुक असल्याचंही मलीक यावेळी म्हणाले.
****

 झारखंड विधानसभेच्या पहिल्या फेरीतल्या निवडणुकीत सहा जिल्ह्यातल्या १३ मतदारसंघासाठी आज शांततेत मतदान सुरू आहे. अकरा वाजेपर्यंत २७ टक्के मतदान झाले आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. मतदानावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ३५ हजार सुरक्षा कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलं आहे.
****

 धुळे तालुक्यातील विंचूर गावाजवळ ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारी भरधाव पिकअप व्हॅन नदीपुलावरून कोसळून झालेल्या भीषण अपघात सात  जणांचा जागीच मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले आहेत. जखमींवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर वाहन चालक आणि कामगारांना घेऊन जाणार ठेकेदार पसार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
****

 नांदेड जिल्ह्यात स्‍वच्‍छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्‍या वैयक्तिक शौचालयांचं बांधकाम पूर्ण करण्याचं आवाहन, जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा शांताबाई पवार जवळगावकर आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी केलं आहे.

      हिमायतनगर तालुक्‍यात जवळगाव इथं शौचालय बांधकामाची पाहणी केल्यानंतर त्यांनी हे आवाहन केलं. गावस्‍तरावर बांधण्‍यात आलेल्‍या शौचालयाच्या वापराबाबत सरपंच, ग्रामसेवक, विविध समित्‍या, महिला बचतगट यांनी पुढाकार घेवून जनजागृती करावी, असं आवाहनही करण्यात आलं आहे
****

 सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळं ३८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं होतं. त्यामुळं जिल्ह्यातील पूर बाधित १४ हजार शेतकऱ्यांच १७६ कोटी  रुपयांचे कर्ज माफीसाठी, तर बिगर कर्जदार ९२ हजार शेतकऱ्यांना १३० कोटी रुपयांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनानं एक अहवाल तयार केला आहे. सदरचा अहवाल जिल्हा प्रशासनानं राज्य सरकारकडे पाठवला आहे.
*****
***

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.11.2019 13.00

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.11.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३०  नोव्हेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 राज्य विधानसभेचं दोन दिवसाचं अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आज विश्वासदर्शक ठरावाला सामोर जाईल. आज दुपारच्या सत्रात विधानसभेत हा विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल.  या अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांनी काल आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. अधिवेशन सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री नव्या मंत्रीमंडळाचा परिचय करून देतील, त्यानंतर विश्वसादर्शक ठराव मांडला जाईल. हा ठराव मंजूर झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षाच्या निवडीचा कार्यक्रम घोषित केला जाईल. सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी ३ डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे.  

 दरम्यान,  विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये १६ ते २१ डिसेंबर दरम्यान घेण्यात येणार असल्याचं विधीमंडळ सूत्रानं सांगितलं. 
****

 विधानसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेस नेते नाना पटोले अर्ज भरणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. आज दुपारी बारा वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरायचा आहे. तर, उद्या रविवारी सकाळी अकरा वाजता सभागृहात विधानसभाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. भाजपनेही विधानसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. मुरबाडचे आमदार किसन कथोरे हे भाजप उमेदवार असणार आहेत.
****

 माजी मंत्री आणि सलग तीन वेळा आमदार झालेले तुकाराम दिघोळे यांचं  आज पहाटे नाशिक इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. नाशिक साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, शिखर बँकेचे संचालक, राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. आज दुपारी तीन वाजता त्यांच्यावर नाशिक इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
*****
***

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.11.2019 11.00AM

Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 30 November 2019
Time:  8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۳۰ ؍نومبر  ۲۰۱۹ئ؁
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸

 ریاستی اسمبلی کا دو روزہ اجلاس آج سے شروع ہو رہا ہے۔ اِس اجلاس میں وزیر اعلیٰ اُدھو ٹھا کرے کی زیر قیادت مہاراشٹر مہا وِکاس آگھاڑی کی حکو مت تحریکِ اعتماد کے ذریعے ایوان میں اپنی اکثر یت ثابت کرے گی۔ آج دو پہر کے سیشن میںیہ تحریک اعتماد پیش کی جائے گی۔ اجلاس کے لیے عبو ری اسپیکر کے طور پر سابق اسمبلی اسپیکر دلیپ ولسے پاٹل کو نامزد کیا گیا ہے۔ اُنھوں نے کل اپنے عہدے کا جائزہ لیا۔ اجلاس کے آ غاز میں وزیر اعلیٰ اپنے کا بینی رفقاء کا تعا رف پیش کریں گے۔ جس کے بعد تحریکِ اعتماد پیش ہو گی۔ اکثر یت ثابت ہو جا نے کے بعد  اسپیکر کے با ضابطہ انتخاب کے پرو گرام کا اعلان کیا جائے گا۔
 حکو مت کو اکثر یت ثابت کرنے کے لیے گور نر نے 3؍ دسمبر تک کا وقت دیا ہے۔ دریں اثناء اسمبلی ذرائع نے بتا یا کہ اسمبلی کا سر مائی اجلاس 16؍  تا  21؍ دسمبر کے در میان نا گپور میں منعقد ہو گا۔

***** ***** ***** 

 وزیر اعلیٰ اُدھو ٹھا کرے نے انتظا میہ کے اعلیٰ عہدیداروں کو ہدا یت کی ہے کہ تر قیاتی کاموں پر عمل در آمد کے دوران اِس بات کو یقینی بنائیں کہ عوام کا ایک بھی پیسہ ضائع نہ ہو۔ وہ کل اپنے عہدے کا جائزہ لینے کے بعد وزیر اعلیٰ دفتر میں اعلیٰ افسران کے ایک اجلاس سے خطاب کررہے تھے۔ اِس اجلاس میں چیف سیکریٹری سمیت تمام محکموں کے سیکریٹری موجود تھے۔ وزیر اعلیٰ نے کہا کہ خد مت کے جذ بے سے کام کرنے پر عوام کا اعتماد حاصل کیا جا سکتا ہے۔ عوام  میںیہ تا ثر پید ا کیا جا نا کہ ’’ یہ حکو مت میری ہے‘‘ ہر ایک کی ذمہ داری ہے۔ اُدھو ٹھا کرے نے کہا کہ تر قیاتی کاموں کی تر جیح طئے کی جائے اور عوامی خد مت میں شفافیت پر توجہ دی جائے۔ اُنھوں نے اعتماد ظا ہر کیا کہ تر قیاتی ہدف حاصل کرنے میں نئی حکو مت کامیاب ہو گی۔

***** ***** ***** 

 قانون ساز ایوانوں کی کار وائی کی رپورٹنگ کر نے والے صحا فیوں نے کل وزیر اعلیٰ کا استقبال کیا۔ اِس استقبالیہ سے خطاب کر تے ہوئے اُدھو ٹھا کرے نے کہا کہ وزا رت اعلیٰ کا عہدہ اُن کے لیے ایک چیلنج ہے۔ اور تجویز پیش کی کہ صحا فی مسائل کی نشاندہی کر تے وقت اُس کے حل کے رہنمائی بھی کریں۔ وزیر اعلیٰ نے کہا کہ اُن کی حکو مت عوام کے ساتھ نرم بر تائو کر ے گی اور اِس بات پر خصو صی توجہ دی جائے گی کہ عوام کے پیسے کا بے دریغ استعمال نہ ہو۔
 دریں اثناء گزشتہ حکو مت کی جانب سے شروع کیے گئے آر ے میٹرو کار شیڈ کے کام کو ملتوی کرنے کا اعلان وزیر اعلیٰ اُدھو ٹھا کرے نے کیا اور کہا کہ اِن کا موں کا تفصیلی جائزہ لینے کے بعد ہی اِس سلسلے میں کوئی فیصلہ کیا جائے گی۔

***** ***** ***** 

 سابق وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے نئی حکو مت پر تنقید کر تے ہوئے کہا ہے کہ نو تشکیل شدہ کا بینہ کے پہلے اجلاس میں کسا نوں کے لیے راحت بہم پہنچا نے پر گفت و شنید کی بجائے صرف اِسی بات پر توجہ دی ہے کہ ایوان میں اکثر یت ثابت کرنے میں کس طرح کامیابی حاصل کی جائے۔ سماجی رابطے کی ویب سائٹ پر اپنے ایک پیغام میں پھڑ نویس نے سوال اُٹھا یا کہ قانو ن کو با لائے طاق رکھ کر عبوری اسپیکر تبدیل کرنے کا فیصلہ کیوں کیا گیا۔ نیز حکمراں اتحاد کو اپنے ہی اراکین ِ اسمبلی پر اب بھی اعتماد نہیں ہے۔

***** ***** ***** 

 قو می شاہراہوں پر ٹول ٹیکس کی ادائیگی کی غرض سے فور وہیلر گاڑیوں کے لیے لازمی قرار دیے جانے والے فاسٹ ٹیگ اِندراج کی معیاد میں 15؍ دسمبر تک کے لیے توسیع کر دی گئی ہے۔ وزارتِ حمل و نقل نے اعلان کیا تھا کہ کل یکم دسمبر سے قومی شاہراہوں پر صرف فاسٹ ٹیگ کی معر فت ہی ٹول ٹیکس وصول کیا جائے گا۔ تاہم عوام کی سہو لت کے لیے اِس کی معیاد بڑھا دی گئی ہے۔ 15؍ دسمبر تک یہ فاسٹ ٹیگ مفت دستیاب ہو گا لیکن مدت گزر جانے کے بعد دو ہری قیمت ادا کرنا ہو گی۔ اِس سلسلے میں تمام تفصیلی اطلا عات مائی فاسٹ ٹیگ ایپ پر دستیاب ہیں۔

***** ***** ***** 

 پر بھنی کی وسنت رائو نائک مراٹھواڑہ زرعی یو نیور سٹی کے وائس چانسلر ڈاکٹر اشوک ڈھون نے کہا ہے کہ حکو مت کی حمایت حاصل رہی تو کسا نوں کو ما یو سی کی کیفیت سے باہر نکا لا جا سکتا ہے۔ چھٹی ریاستی سطح کی زرعی نمائش مہا ایگرو کا کل سے اورنگ آباد میں آغاز ہو ا۔ اِس پروگرام کی افتتا حی تقریب سے وہ خطاب کر رہے تھے۔ اورنگ آ باد کے میئر نند کُمار گھوڑیلے مراٹھواڑہ آئینی تر قیاتی بورڈ کے چیئر من ڈاکٹر بھا گوت کراڑ سمیت دیگر اہم شخصیات کی مو جود گی میں اِس نمائش کا افتتاح عمل میں آ یا۔
 اِس تقریب سے خطاب کر تے ہوئے نند کمار گھوڑیلے نے کہا کہ جس دن عوام کے مسائل کو سمجھ لیا گیا وہ دن تاریخ کا سنہری دن ہو گا۔ 

***** ***** ***** 

 فرائض میں کو تا ہی کی پاداش میں عنبڑ کی تحصیلدار منیشا مینے کو عہدے سے معطل کر دیا گیا ہے۔ ڈیویژنل کمشنر سنیل کیندرے نے کل اُن کی معطلی کے احکا مات جاری کیے۔ ریت کی غیر قا نو نی حمل و نقل روکنے ۔ قحط سے متاثرین میں امداد کی تقسیم اور وزیر اعظم کسان سنمان نِدھی کی تقسیم میں منیشا مینے کی جانب سے کو تا ہی کی رپورٹ جالنہ کے ضلع کلکٹر رویندر بینوڑے نے ڈیویژنل کمشنر کو اِرسال کی تھی ۔

***** ***** *****

AIR News Urdu Bulletin, Aurangabad. Date : 30.11.2019 , 8.40 - 8.45 AM

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.11.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 November 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० नोव्हेंबर २०१सकाळी ७.१० मि.
****

Ø  राज्य विधानसभेचं आजपासून दोन दिवसाचं अधिवेशन; महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर आज विश्वासदर्शक ठराव
Ø  विकास कामं करतांना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे लक्ष देण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
Ø  मुंबईतल्या आरे मेट्रो कार शेडच्या कामाला स्थगिती
Ø  पथकर भरणीसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या फास्टटॅग संलग्नीकरणाला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
आणि
Ø  कामात कसून केल्याच्या कारणावरून अंबडच्या तहसीलदार मनिषा मेने निलंबित
****

 राज्य विधानसभेचं दोन दिवसाचं अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आज विश्वासदर्शक ठरावाला सामोर जाईल. आज दुपारच्या सत्रात विधानसभेत हा विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल.  या अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांनी काल आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. अधिवेशन सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री नव्या मंत्रीमंडळाचा परिचय करून देतील, त्यानंतर विश्वसादर्शक ठराव मांडला जाईल. हा ठराव मंजूर झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षाच्या निवडीचा कार्यक्रम घोषित केला जाईल. उद्या अध्यक्षाची निवडणूक होईल. सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी ३ डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे.    

 दरम्यान,  विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये १६ ते २१ डिसेंबर दरम्यान घेण्यात येणार असल्याचं विधीमंडळ सूत्रानं सांगितलं. 
****

 विकास कामं करतांना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयात काल पदभार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह विविध विभागाचे सचिव यावेळी उपस्थित होते. सेवाभावनेनं कामं केल्यास जनतेचा विश्वास संपादन करता येईल. सरकार माझं आहेअशी विश्वासाची भावना जनतेच्या मनात निर्माण करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचं, मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवावा, जनसेवेसाठी पारदर्शक आणि स्वच्छ कारभारावर लक्ष द्यावं, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.  प्रगतीचे उद्दिष्ट गाठण्यास शासन यशस्वी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
****

 विधीमंडळ वार्ताहर संघटनेकडून मुख्यमंत्र्यांचा काल सत्कार करण्यात आला, या सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी, राज्याचं मुख्यमंत्रिपद हे आपल्यासमोर एक आव्हान असून, पत्रकारांनी प्रश्र्न मांडताना ते सोडवण्यासंदर्भातही मार्गदर्शन करावं, असं आवाहन केलं. आपलं सरकार जनतेशी नम्रपणे वागेल तसंच जनतेच्या पैशाची उधळपट्टी होणार नाही, यावर आपण लक्ष केंद्रीत करणार असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं. महागाई, टंचाई आणि भ्रष्टाचार ही राज्यासमोरची आव्हानं असून त्यांचा सामना करायचा ते म्हणाले.

 दरम्यान, मुंबईत आरे इथल्या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पूर्ण कामाचं परीक्षण केल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी जाहीर केलं
****

 राष्ट्रीय महामार्गांवर पथकर भरणीसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांना फास्टटॅग संलग्नीकरणाला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. उद्या एक डिसेंबरपासून महामार्गांवर फक्त फास्टटॅग द्वारे पथकर वसुलीची घोषणा परिवहन मंत्रालयानं केली होती. मात्र नागरिकांच्या सोयीसाठी ही मुदतवाढ देण्यात आली. पंधरा डिसेंबरपर्यंत फास्टटॅग मोफत मिळणार असून, त्यानंतर मात्र दुप्पट शुल्क आकारलं जाणार आहे. माय फास्टटॅग ॲपवर याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
****

 शासनाकडून धोरणात्मक पाठबळ मिळालं तर शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढता येईल, असा आशावाद परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अशोक ढवण यांनी व्यक्त केला आहे. महाॲग्रो या सहाव्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला कालपासून औरंगाबाद इथं प्रारंभ झाला. या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड, यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. शेती आणि शेतकरी सध्या मान्सून आणि मार्केट या दुष्टचक्रात अडकला असल्याची खंत डॉ ढवण यांनी यावेळी व्यक्त केली.

 शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या जातील, तो सोन्याचा दिवस ठरेल, असं मत महापौर महापौर नंदकुमार घोडेले, यांनी व्यक्त केलं, तर मराठवाड्यातल्या तीस अविकसित तालुक्यात कृषी उत्पादन प्रक्रिया उद्योग उभारण्यावर प्राधान्य असल्याचं डॉ कराड यांनी सांगितलं.

 या उद्घाटन समारंभात, मराठवाड्यातल्या आठ प्रगतीशील शेतकऱ्यांना बॅरिस्टर जवाहर गांधी कृषी पुरस्कार प्रदान करण्यात आले. दोन डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात पीक प्रात्यक्षिक तसंच आधुनिक शेती औजारं पाहता येणार आहेत, शेती संबंधीत विविध विषयांवर चर्चासत्रं ही या प्रदर्शनात होणार आहेत.
****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 कामात कसून केल्याच्या कारणावरून अंबडच्या तहसीलदार मनिषा मेने यांना निलंबित करण्यात आलं आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काल निलंबन आदेश जारी केले. मेने यांनी, अवैध वाळू वाहतुक रोखणे, दुष्काळी अनुदान वाटप तसंच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वाटप या कामात कसूर केल्याचा अहवाल जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
****

 तरुण साहित्यिकांनी भयमुक्त साहित्य निर्माण करणं आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ नाटककार तथा ९९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केलं आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा काल समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यात कृषी, साहित्य, संगीत आणि युवा या क्षेत्रातल्या चार गुणवंतांचा यावेळी यशवंतराव चव्हाण पुरस्कार देवून गौरवण्यात आलं. यामध्ये प्रसिद्ध पखवाजवादक उद्धवबापू आपेगावकर, देगलूरचे ज्येष्ठ साहित्यिक बाबू बिरादार, हिंगोलीचे कृषी उद्योजक रामेश्वर मांडगे, नांदेडचे पत्रकार संदीप काळे यांचा समावेश आहे.
****

 लातूर इथं  जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित दोन दिवसीय पाणी परिषदेला आजपासून प्रारंभ होत आहे. पाणी बचत आणि पाण्याचा अपव्यय याबाबत जाणीव-जागृती, आणि नागरिक जलसाक्षर व्हावेत, या उद्देशानं ही पाणी परिषद आयोजित करण्यात आली आहे. शासकीय महिला तंत्रनिकेतनमध्ये आयोजित या परिषदेसाठी लातूर शहरातल्या गंजगोलाई भागातून मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
****

 जालना जिल्ह्यातले दोन लाख नव्वद हजार नऊशे बत्तीस शेतकरी `प्रधानमंत्री किसान सन्मान निधी` योजनेसाठी पात्र ठरले आहेत. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मिळवून एकशे सहा कोटी एकोणसत्तर लाख शेहचाळीस हजार रुपयांचं अनुदान जमा करण्यात आलं आहे. लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या `पीएम किसान पोर्टलवर` अद्ययावत करण्यात येत असून, अनुदान रक्कम लवकरच त्यांच्या खात्यांवर जमा केली जाईल, असं जालना जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****

 परभणी जिल्यातल्या तहसील कार्यालयात केंद्र सरकारच्या भारतनेट या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्याला जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली. राज्य माहिती आणि तंत्रज्ञान महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाद्वारे परभणी जिल्हातली चार तहसील कार्यालयं आणि त्याअंतर्गत येणाऱ्या चारशे अठ्ठावीस ग्रामपंचायती, ऑप्टीकल फायबर नेटवर्कनं जोडण्यात येणार आहेत.
****

 मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचं जालना जिल्ह्यातलं तीस टक्के काम पूर्ण झालं आहे. या टप्प्यात या मार्गावरच्या नियोजित १०६ पुलांपैकी ५२ पुलांची उभारणी झाली असून, उर्वरित काम सुरू असल्याचं, राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे. या कामांवर आतापर्यंत साडे तीनशे कोटी रुपये खर्च झाल्याची माहितीही या कार्यालयाकडून देण्यात आली.
****

 कापूस पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यात पाथरी तसंच गंगाखेड इथं सोमवारपासून केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीनुसार कापूस खरेदी सुरू होणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कापूस शासकीय खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा, असं आवाहन कापूस पणन महासंघाचे परभणी विभागाचे संचालक पंडितराव चोखट तसंच विभागीय व्यवस्थापक ए.डी.रेणके यांनी केलं आहे.
****

 परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथं काल एका रस्ता अपघातात शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख भाऊसाहेब जामगे यांचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. परळीहून गंगाखेड कडे येणाऱ्या जामगे यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं हा अपघात झाला असावा, असं पोलिसांकडून सांगण्यात आल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं शहरात दोन डिसेंबर ते मार्च २०२० पर्यंत केंद्र शासनाची विशेष इंद्रधनुष्य मोहिम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. महानगरपालिकेल्या २९ आरोग्य केंद्र आणि पाच रूग्णालयत आणि छावणी नगरपरिषदेचा एक असे एकूण ३५ आरोग्य केंद्रात ही मोहिम चार टप्प्यात राबवण्यात आहे. नागरिकांनी या मोहिमे दरम्यान नजीकच्या लसीकरण सत्राच्या ठिकाणी लसीकरण करून घेण्याचं आवाहन महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केलं आहे.
*****
***

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.11.2019 07.10AM

Friday, 29 November 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.11.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 November 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
राज्याचं मुख्यमंत्रीपद हे आपल्यासमोर एक आव्हान असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विधीमंडळ वार्ताहर संघटनेकडून त्यांचा आज सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. एक तर हे सरकार तीन पक्षांचं असून महागाई, टंचाई, भ्रष्टाचार ही राज्यासमोरची आव्हानं असून त्यांचा आपल्याला सामना करायचा असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मुंबईतील आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या पूर्ण कामाचं परीक्षण केल्यानंतरच हे काम केलं जाईल, असं त्यांनी जाहीर केलं. पत्रकारांनी सरकारचे नाक, कान, डोळे व्हावं तसंच प्रश्र्न मांडताना ते सोडवण्यासंदर्भात मार्गदर्शन करावं, असं आवाहन त्यांनी केलं. हे सरकार जनतेशी नम्रपणे वागलं पाहिजे तसंच जनतेच्या पैशाची उधळपट्टी होणार नाही, यावर आपण लक्ष केंद्रीत करणार असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह नवीन शपथविधी झालेल्या मंत्र्यांनी तत्पूर्वी मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी नव्या मंत्रिमंडळातील मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत आदींसह महाराष्ट्र विकास आघाडीतले अनेक नेते उपस्थित होते.
****
मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपून-छपून बहुमत कसं सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारनं धन्यता मानली अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी आज एका संदेशात ही टीका केली आहे. मग बहुमताचे दावे कशासाठी, या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का, नियमबाह्य पद्धतीनं हंगामी अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी, स्वतःच्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का, असे प्रश्नही फडणवीस यांनी या संदेशात उपस्थित केले आहेत.
****
तरुण साहित्यिकांनी भयमुक्त साहित्य निर्माण करणं आवश्यक असल्याचं मत ज्येष्ठ नाटककार तथा ९९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केलं आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा आज समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यात कृषी, साहित्य, संगीत आणि युवा या क्षेत्रातल्या चार गुणवंतांचा यावेळी यशवंतराव चव्हाण पुरस्कार देवून गौरवण्यात आलं.
****
जालना जिल्ह्यातले दोन लाख नव्वद हजार नऊशे बत्तीस शेतकरी ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेसाठी पात्र ठरले आहेत. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपर्यंत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मिळवून एकशे सहा कोटी एकोणसत्तर लाख शेहचाळीस हजार रुपयांचं अनुदान जमा करण्यात आलं आहे. आजपर्यंत या योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या ‘पीएम किसान पोर्टलवर’ अद्ययावत करण्यात येत असून, अनुदान रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल, असं जालना जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्यातल्या तहसिल कार्यालयात आजपासून केंद्र सरकारच्या भारतनेट या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्याला जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या प्रमुक उपस्थितीत सुरूवात करण्यात आली. भारतनेट-महानेट प्रकल्प महाराष्ट्र राज्य माहिती आणि तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येत असून या प्रकल्पाद्वारे परभणी जिल्हातली चार तहसिल कार्यालयं आणि त्याअंतर्गत येणाऱ्या चारशे अठ्ठावीस ग्रामपंचायतींना ऑप्टीकल फायबर नेटवर्कनं जोडण्यात येणार आहेत.
****
परभणी शहरातील धारमार्ग परिसरात रस्त्यांवर पडलेले खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत, असे आदेश महापौर अनिता सोनकांबळे यांनी दिले आहेत.
****
कापूस पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यात पाथरी तसंच गंगाखेड इथं सोमवार दिनांक दोन डिसेंबर २०१९ पासून केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीनुसार कापूस खरेदी सुरू होणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कापूस शासकीय खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा, असं आवाहन कापूस पणन महासंघाचे परभणी विभागाचे संचालक पंडितराव चोखट तसंच विभागीय व्यवस्थापक ए.डी.रेणके यांनी केलं आहे.
****
गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातल्या गावातील शेतकऱ्यांचे बासस्ट हेक्टर शेतातील धानाचे पुंजके जळाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आज याची पाहणी करून मोबदला देण्यात यावा, अशा सूचना दिल्या आहेत.
****

आकाशवाणी औरंगाबाद दि.29.11.2019 संध्याकाळी 06.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद - सिंधुदुर्ग जिल्हा वार्तापत्र दिनांक - २९.११.२०१९

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.11.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 November 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक - नोव्हेंबर २०१दुपारी .०० वा.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अधिकृतपणे मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारत आहेत. ते मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्रीपदाची सुत्रं स्वीकारत आहेत. त्यांनी काल संध्याकाळी मुख्यमंत्रपदाची शपथ घेतल्यानंतर सह्याद्री अतिथीगृहात मंत्रिमंडळाची बैठक घेतली. राज्य सरकारच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती आपण मुख्य सचिवांकडून मागवली असल्याचं ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.
****
राज्यात सत्तर अब्ज अमेरिकी डॉलर्सचा तेल शोधणारं संयत्र बसवण्याबाबत सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये चर्चा झाली आहे. दररोज बारा लाख बॅरल तेल उत्पादन करण्याची क्षमता या प्रकल्पात असणार आहे. अबूधाबीचे राजकुमार शेख मोहम्मद बिन झायद  अल नह्यान आणि सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अझीझ आणि इतर अधिकाऱ्यांच्या अबुधाबी इथं झालेल्या दुसऱ्या बैठकीत ही चर्चा झाली. या बैठकीत चार सामंजस्य करारावर  सह्या झाल्या. जगातील या दोन प्रमुख तेल समृद्ध देशांमध्ये भारतीय बाजारपेठेत प्रतीदिन किमान सहा लाख बॅरल कच्चे तेल पाठवण्याच्या उपायांवरही चर्चा झाली.
****
रामायण अध्ययन प्रेरणादायी असून त्या माध्यमातून  आपण एक आदर्श समाज निर्माण करु शकतो, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबई विद्यापीठ आणि भागवत परिवार यांच्यातर्फे मुंबईत आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय रामायण संमेलन उदघाटन प्रसंगी बोलत होते. रामायण जीवनाचा आधार असून रामायण विश्र्वबंधुत्वाचा संदेश देतं, असंही राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी म्हटलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांच्यात आज नवी दिल्ली इथं हैदराबाद हाऊसमधे होत आहे. दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याचे मार्ग तसंच सहकार्याच्या विविध क्षेत्रांबाबत उभय नेत्यांमधे यावेळी चर्चा होत आहे. राजपक्षे त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत. तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी राजपक्षे काल संध्याकाळी नवी दिल्लीला पोचले. राष्ट्रपती भवनात त्यांचा स्वागताचा समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
****
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार काल संपला असून या अंतर्गत सहा जिल्ह्यांतील तेरा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. एक्क्याऐंशी सदस्य असलेल्या झारखंड विधान सभेसाठी पाच टप्प्यात मतदान होत आहे. मतमोजणी तेवीस डिसेंबरला होणार आहे. या मतदान प्रक्रियेत प्रथमच टोकन पद्धतीचा वापर केला जाणार आहे आणि यामुळे मदरांना खूप वेळ रांगेत उभं रहावं लागणार नसल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
****
मुंबई - पुणे महामार्गावर आज पहाटे एका भीषण अपघातात चार जण जागीच ठार  झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. एका मोटारीनं टँकरला मागून धडक दिल्यानं हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमींना पनवेल इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या जातील, तो सोन्याचा दिवस ठरेल, असं औरंगाबाद चे महापौर  महापौर नंदकुमार घोडेले, यांनी म्हटलं आहे. महाअग्रो या सहाव्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला आजपासून औरंगाबाद इथं प्रारंभ झाला. या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड, परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अशोक ढवण यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. मराठवाड्यातल्या दहा प्रगतीशील शेतकऱ्यांना बैरिस्टर जवाहर गांधी कृषी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
****
लखनऊ इथं सुरु असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या किंदबी श्रीकांत आणि सौरभ वर्मा यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठ्ली आहे. उपांत्यपूर्वफेरीत श्रीकांतचा सामना कोरियाच्या सोन वान हो याच्याशी तर, सौरभचा सामना थायलंडच्या कुणलाऊथ विटीसार्न याच्याशी होईल. युवा खेळाडू लक्ष्य सेनचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. महिला एकेरीत भारताच्या श्रृती मुदंडा आणि ऋतूपर्णा दास यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना सरळ गेममधे हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सिमरन सिंघी आणि रितिका ठाकर यांनी उपांत्यपूर्वफेरी गाठ्ली
आहे.
****
बँकॉक इथं सुरु असलेल्या एकवीसाव्या आशियायी तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्ह या प्रकारात भारताच्या दीपिका कुमारीनं सुवर्ण तर अंकिता भक्तनं रौप्य पदक पटकावलं आहे. दीपिकानं अंतिम लढतीत अंकिताला सहा - शून्य असं सहज  हरवलं. या दोघींनीही यापुर्वीच टोकयो ऑलम्पिकसाठी आपलं स्थान निश्चित केलं आहे.
****


आकाशवाणी औरंगाबाद दि.29.11.2019 दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.11.2019 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२९ नोव्हेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांच्यात आज नवी दिल्ली इथं हैदराबाद हाऊसमधे चर्चा होणार आहे. दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याचे मार्ग तसंच सहकार्याच्या विविध क्षेत्रांबाबत उभय नेत्यांमधे यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. राजपक्षे त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत. तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी राजपक्षे काल संध्याकाळी नवी दिल्लीला पोचले. राष्ट्रपती भवनात त्यांचा स्वागताचा समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
****
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी काल समन्स बजावले आहेत.  विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या शपथपत्रात दोन गुन्हेगारी खटल्यांची माहिती लपवल्याप्रकरणी दाखल याचिकेप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या निवाससस्थानी हे समन्स बजावण्यात आल्याची माहिती सदर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. एक स्थानिक वकील सतीश उके यांनी या संदर्भातील याचिका दाखल केली आहे. स्थानिक न्यायालयानं ही याचिका रद्द करण्याचा दिलेला निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं ग्राह्य ठरवला होता तथापि, सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भातील याचिकेवर कारवाईचे निर्देश दिले आहेत.  फडणवीस यांच्याविरुद्ध फसवणूक आणि बनवेगीरीप्रकरणी १९९६ आणि १९९८मध्ये गुन्हे नोंदवण्यात आले होते पण आरोपपत्र दाखल झालं नव्हतं. फडणवीसांनी ही माहिती दडवल्याचं उके यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे.
****
मुंबई - पुणे महामार्गावर आज पहाटे एका भीषण अपघातात चार जण जागीच ठार  झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. एका मोटारीनं टँकरला मागून धडक दिल्यानं हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमींना पनवेल इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
अकोला इथल्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे "कृषि अभियांत्रिकी- कृषि आधारित स्वयंरोजगार निर्मितीद्वारे शेतकरी सेवेतील पन्नास वर्षे" या विषयावर आज आणि उद्या, दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजीत केली आहे. अकोला कृषी महाविद्यालयामध्ये आज या परिषदेचं उदघाटन झालं.
****


आकाशवाणी औरंगाबाद दि.29.11.2019 सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 29 November 2019
Time:  8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۲۹ ؍نومبر  ۲۰۱۹ئ؁
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸

 شیو سینا صدر اُدھو ٹھا کرے مہاراشٹر کے وزیر اعلیٰ بن گئے ہیں۔ گور نر بھگت سنگھ کو شیاری نے کل شام ممبئی کے شیو اجی پارک میں اُدھو ٹھا کرے کو عہدے اور راز داری کا حلف دلا یا۔ اِس موقع پر تینوں اتحادی جماعوں شیو سینا ‘ این سی پی اور کانگریس سے دو -دو وزیروں نے بھی حلف اُٹھا یا۔ اِن میں شیو سینا سے ایکناتھ شندے ‘ سبھاش دیسائی  ‘ این سی پی سے جینت پاٹل ‘ چھگن بھجبل اور کانگریس سے با لا صاحیب تھوارت اور نتن رائو ت شامل ہیں۔
 حلف بر داری کی تقریب میں شیو سینا ‘ کانگریس اور این سی پی کے ملک بھر سے آئے سینئر رہنمائوں نے بھی شر کت کی۔ وہیں وزیر اعظم نریندر مودی نے نئے وزیر اعلیٰ اُدھو ٹھا کرے کو مبارکباد پیش کی ہے۔ اپنے ٹوئیٹر پیغام میں مودی نے کہا کہ اُنھیں امید ہے کہ اُدھو ٹھاکرے مہا راشٹر کے روشن مستقبل کے لیے  بھر پور محنت کریں گے۔

***** ***** ***** 

 اُدھو ٹھا کرے کی حلف بر داری کے بعد شیو سینا کار کنوں نے ریاست بھر میں جشن منا یا۔ بیڑ میں شیو سینا کار کنوں نے جگہ جگہ آتش بازی کی اور مٹھا ئیاں تقسیم کی وہیں اورنگ آ باد میں بھی اُدھو ٹھا کرے کے وزیر اعلیٰ بننے پر شیو سینا کار کنوں نے ٹو وہیلر ریلی نکالی اور جشن منا یا۔
 لاتور شہر میں بھی شیو سینا کی جانب سے آتش بازی کی گئی۔

***** ***** ***** 

 اِس بیچ حلف بر داری کے فوراً بعد وزیر اعلیٰ اُدھو ٹھا کرے نے ریاستی کا بینہ کا اجلاس طلب کیا جس میں رائے گڑھ کے قلعے کے تحفظ کے لیے 20؍ کروڑ روپئے منظور کیے گئے۔ وزیر اعلیٰ ٹھا کرے نے ریاست کے کسا نوں کو دی جا رہی حکو متی مدد اور اِس کی موجودہ صورتحال سے متعلق تفصیلی رپورٹ آئندہ دو دنوں میں پیش کرنے کی چیف سیکریٹری کو ہدا یت بھی دی۔ ٹھا کرے نے کہا کہ اِس رپورٹ کے موصول ہونے کے بعد کسا نوں کوراحت پہنچا نے والے فیصلے کا اعلان کیا جائے گی۔

***** ***** ***** 

 شیو سینا ‘ این سی پی اور کانگریس کی نو تشکیل شدہ مہاراشٹر وکاس آ گھاڑی نے کل اپنے Common Minimum Programme کا اعلان کر دیا۔ اِس کے مطا بق ریاست کے کسا نوں کو مکمل قرض معا فی دینے اور مہاراشٹر کے نو جوانوں کو ملازمت میں80؍ فیصد ریزر ویشن دینے کے بات کہی گئی ہے۔ شیو سینا کے ایکناتھ شندے ‘ این سی پی کے جینت پاٹل اور نواب ملک نے کل ممبئی میں
Common Minimum Programmeا اعلان کیا۔
 کسا نوں کی زرعی اشیاء کو مناسب دام دینے ‘ بیروز گار ی بھتہ ‘ معا شی  طور پر کمزور طبقات کی لڑ کیوں کی مفت تعلیم اور  تعلقہ جاتی سطح پر صرف ایک روپئے میں صحت کی جانچ جیسے موضوعات کو بھی اِس پروگرام میں جگہ دی گئی ہے۔ اِس موقعے پر سر کاری عہدوں پر تقررات کرنے کی بات بھی کہی گئی ۔

***** ***** ***** 

 دوسری جانب کانگریس صدر سو نیا گاندھی نے کہا ہے کہ مہا راشٹر میںمہا وکاس آ گھاڑی کو اقتدار میں آ نے سے روکنے کے لیے بھارتیہ جنتا پارٹی نے جمہوریت سے کھلواڑ کیا ہے ۔ سو نیا گاندھی کل نئی دلی میں کانگریس پارلیمانی بورڈ کی میٹنگ میں بول رہی تھیں۔
 پی ٹی آئی کی خبر میں کہا گیا ہے کہ سو نیا گاندھی نے مہاراشٹر کے گور نر بھگت سنگھ کو شیاری کے موقف کی مخالف کر تے ہوئے اُن پر تنقید بھی کی۔

***** ***** ***** 

 اپنے قابل ِ اعتراض بیا نوں سے خبروں میں رہنے والی بی جے پی کی رکن پارلیمنٹ پر گیا سنگھ ٹھا کر کے خلاف بی جے پی نے کار وائی کر تے ہوئے اُنھیں محکمہ دفاع کی صلا ح کار کمیٹی سے ہٹا دیا ہے۔ پارلیمنٹ کے جاریہ سیشن کے دوران پر گیا سنگھ ٹھا کر اپنی پارٹی کے پارلیمانی بورڈ کی میٹنگ میں بھی شر کت نہیں کر سکیں گی۔ بی جے پی کے کار گذار صدر جے پی نڈّا نے کہا کہ پر گیا سنگھ ٹھا کر کے بیا نات اور اُنکی سوچ اور نظر یات کی بی جے پی نے کبھی بھی حما یت نہیں کی۔ جے پی نڈّا  کل نئی دلی میں اخباری نمائندوں سے گفتگو کر رہے تھے۔

***** ***** ***** 

  50؍ واں بھارتی بین الاقوامی فلم فیسٹیول کل گوا میں اختتام پذیر ہوا۔ اِس موقعے پر جنو بی بھارت کے معروف موسیقار اِلائی راجہ سمیت منجو گورا‘ رُوپا گانگولی‘  رمیش  سِپّی اور پریم چو پڑہ جیسی مشہور شخصیات موجود تھیں۔ فیسٹیول کے آخری دِن فرانس کے فلمساز Blase Harison کی فلم پارٹیکل کو بہترین فلم کے انعام سے نوازا گیا۔ بہترین اداکارہ کا انعام مراٹھی فلم اداکارہ اُوشا جا دھو کو فلم مائی گھاٹ کے لیے دیا گیا۔

***** ***** ***** 

 لاتور میونسپل کارپوریشن نے شہر کے سبھی نلوں پر واٹر میٹر نصب کر نے کا فیصلہ کیا ہے۔ اِس بارے میںکل کارپوریشن میں قرار داد منظور کی گئی۔

***** ***** ***** 

 خواتین کی تعلیم کے روحِ رواں مہا تما جیو تی با پھُلے کی بر سی کے موقع پر کل اُنھیں خراج عقیدت پیش کیا گیا۔ اورنگ آباد میں مختلف تنظیموں کی جانب سے مہا تما  پھُلے کے مجسمے پر گلہائے عقیدت پیش کیے گئے۔
 جالنہ نگر پا لیکا کی صدر سنگیتا گورنٹیال نے بھی کل جالنہ میں مہا تما پھلے کو خراج عقیدت پیش کیا ۔ اِس دوران جالنہ نگر پالیکا کے افسران ‘ ملازمین اور مختلف سماجی تنظیموں کے رہنما موجود تھے۔

***** ***** ***** 

 ناک ‘ کان  اور گلے کے امراض کے ماہرین یعنی ENT سر جن کی ریاستی سطح کی کانفرنس  ’’MENTCON 2019  ‘‘آج سے اورنگ آ باد میں شروع ہو رہی ہے۔ MGM میں منعقد ہو رہی اِس کانفرنس کا افتتاح آج دو پہر ایک بجے ہو گا۔ نا سک کی مہا راشٹر ہیلتھ سائنس یو نیور سٹی کے وائس چانسلر ڈاکٹر دلیپ مہسیکر کانفرنس کا رسمی افتتاح کریں گے۔ یہ کانفرنس ایک دسمبر تک چلے گی جس میں ملک بھر سے قریب 800؍ ENT سر جن شر کت کر رہے ہیں۔

***** ***** *****

AIR News Urdu Bulletin, Aurangabad. Date : 29.11.2019 ,Time : 8.40 -8.4...

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.11.2019 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 November 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक नोव्हेंबर २०१सकाळी ७.१० मि.
****
** मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या सहा मंत्र्यांना शिवतीर्थावर शपथ
** शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांचा समावेश
** राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी २० कोटी रुपये मंजूर; शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचं वास्तववादी चित्रण मंत्रिमंडळासमोर दोन दिवसात सादर करण्याचे मुख्य सचिवांना आदेश
** शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि स्थानिक युवकांना नोकरीत ८० टक्के आरक्षणाचा, महाराष्ट्र विकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात समावेश; १० रूपयात थाळीही देणार
आणि
** गोव्यातल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप
****
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल राज्याचे वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या या समारंभाला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे देशभरातले अनेक वरिष्ठ नेते  उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे. ठाकरे महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी पूर्ण मेहनत करतील असा विश्वास पंतप्रधानांनी ट्विटर संदेशाद्धारे व्यक्त केला.
****
ठाकरे यांच्या शपथविधीनंतर राज्यभरात शिवसैनिकांनी जल्लोष केला. बीड शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी झाली तसंच लाडू आणि पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला. औरंगाबाद शहरातही ठिकठिकाणी शिवसैनिकांनी फटाके फोडून, दुचाकी फेरी काढून आणि मिठाई वाटप करुन आनंद साजरा केला.
लातूर शहरात शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं गंजगोलाई इथं आई जगदंबेची महाआरती करण्यात आली. त्यानंतर विवेकानंद चौकात स्वामी विवेकानंदाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन, फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
****
शपथविधीनंतर लगेचच मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी २० कोटी रुपये मंजुर करणाच्या निर्णय यावेळी घेण्यात आला. राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं आतापर्यंत जाहीर झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचं वास्तववादी चित्रण मंत्रिमंडळासमोर दोन दिवसात सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले. या सादरीकरणानंतर शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्री म्हणाले. 
****
महाराष्ट्र विकास आघाडीनं काल आपला किमान समान कार्यक्रम जाहीर केला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि राज्यात राहणाऱ्या युवकांना नोकरीत ८० टक्के आरक्षण सुनिश्चित करण्याचं या कार्यक्रमात नमूद करण्यात आलं आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि नवाब मलिक यांनी काल मुंबईत आघाडीचा किमान समान कार्यक्रम जाहीर केला. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव, बेरोजगार भत्ता, आर्थिक दुर्बल घटकातल्या मुलींसाठी मोफत शिक्षण, तालुकास्तरावर एक रुपयात आरोग्य तपासणी, पीक विमा योजनेची पुनर्रचना तसंच दहा रुपयात जेवण देण्याच्या  मुद्यांचाही या किमान समान कार्यक्रमात समावेश आहे. सरकारी नोकऱ्यांपैकी रिक्त पदांवर तत्काळ भरती प्रक्रिया राबवणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. शेतकरी कर्जमाफी तसंच अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकच्या मदतीबाबतही विधानसभेत बहुमत चाचणीनंतर सरकार स्थापन झाल्यावर निर्णय घेतला जाईल, असं यावेळी सांगण्यात आलं.
****
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येऊ नये, यासाठी भारतीय जनता पक्षाने लोकशाहीची कुचेष्टा केल्याचं, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. त्या काल दिल्लीत काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलत होत्या. या संदर्भात राज्यपालांची भूमिकाही निषेधार्ह असल्याची टीका गांधी त्यांनी केल्याचं, पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे.
****
आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरूद्ध भारतीय जनता पक्षानं कारवाई केली आहे. ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीवरून हटवण्यात आलं असून, संसदेच्या या सत्रात त्यांना संसदीय पक्षाच्या बैठकीत सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. ठाकूर यांचं वक्तव्य तसंच विचारधारेचं भाजप कधीही समर्थन करत नसल्याचं भाजप कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांनी सांगितलं, ते काल दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
****
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा वाढवाव्यात, अशी मागणी नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे. ते काल लोकसभेत शून्यकाळात बोलत होते. जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या पुरेशा शाखा नाहीत, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्याही अनेक शाखा बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना विमा रक्कम भरण्यासह इतर बँक व्यवहार करण्यात अडचणी येतात, याकडे चिखलीकर यांनी लक्ष वेधलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
गोव्यातल्या ५० व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल समारोप झाला. यावेळी दक्षिण भारतातील प्रख्यात संगीतकार इलायाराजा यांच्यासह प्रेम चोप्रा, मंजु गोरा, रुपा गांगुली, रमेश सिप्पी आदी मान्यवर उपस्थित होते. फ्रान्सच्या ब्लेस हॅरिसन यांच्या पार्टीकल या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयुर प्राप्त झाला. मारिघेला या चित्रपटासाठी स्यू जॉर्ज यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा, जल्लीकट्टू या सिनेमासाठी लिजो पेलिसार्री यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा, तर ज्युरींचा विशेष पुरस्कार बलून या सिनेमासाठी दिला गेला. अभिषेक शाह यांच्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हेलारू या सिनेमालाही विशेष पुरस्कारानं गौरवण्यात आलं. उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार माई घाट या चित्रपटासाठी उषा जाधव या मराठी अभिनेत्रीला देण्यात आला.
****
जालना जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाच्या भरपाईसाठी प्राप्त अनुदान वाटपाचं ९१ टक्के काम पूर्ण झालं आहे. जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात सरकानं ११० कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यापैकी जवळपास एक लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये १०० कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.
****
परभणी तालुक्यात झरी इथल्या प्रयोगशील शेतकरी मेघा देशमुख यांना महाॲग्रोचा सहावा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा मानाचा बॅरिस्टर जवाहर गांधी शेतकरी सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. आज औरंगाबाद इथं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
दरम्यान, या सहाव्या कृषी प्रदर्शनाला आजपासून औरंगाबाद इथं प्रारंभ होत आहे. पैठण रस्त्यावर कृषी विज्ञान केंद्र मैदानावर आयोजित या चार दिवसीय प्रदर्शनात पीक प्रात्यक्षिकांसह विविध विषयावर चर्चासत्र तसंच आधुनिक शेती औजारं पहायला मिळणार आहेत.
****
स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. औरंगाबाद इथं विविध संघटनांच्या वतीनं महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
जालना नगरपालिकेत नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून फुले यांना अभिवादन केलं.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आदिलाबाद ते मुंबई ही विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. ही गाडी पाच डिसेंबरला आदिलाबाद इथून सकाळी सात वाजता सुटेल आणि नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद मार्गे दादर इथं सहा डिसेंबरला पहाटे तीन वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी सहा डिसेंबरला मध्यरात्री साडे बारा वाजेनंतर दादर इथून निघेल, आणि मनमाड, औरंगाबाद, परभणी, नांदेड मार्गे आदिलाबादला परतणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
लातूर इथं उद्या आणि परवा होणाऱ्या जल परिषदेचा उद्देश पाणी टंचाई दूर करण्यासाठी जनजागृती करणं, हा असल्यांचं महापालिका आयुक्त एम डी सिंह यांनी सांगितलं. आयुक्तांनी काल लातूर इथं या परिषदेमागची भूमिका विषद केली.
दरम्यान,लातूर महानगरपालिकेनं शहरातल्या सर्व नळांना मीटर्स बसवण्यासंदर्भात ठराव पारित केला आहे. नागरिकांना जलमापकांची विविध प्रकारांची, तंत्रांची माहिती व्हावी, त्याचे फायदे लक्षात यावेत यासाठी जलपरिषदेबरोबरच जलमापकांचं प्रदर्शनही भरण्यात येणार आहे. 
****
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातल्या सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्यावतीनं मराठवाडा विभागातल्या शेतकऱ्यांकरता आयोजित सेंद्रीय शेतीवरच्या तीन दिवसीय प्रशिक्षणाचं उद्घाटन काल प्युअर ऑरगॅनिक ग्रुपच्या अध्यक्षा तथा यशस्वी महिला शेतकरी स्वाती शिंगाडे यांच्या हस्ते झालं. केवळ शेतमाल पिकवणं महत्वाचं नसून तो विकता आला पाहिजे तरच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल, असं त्या म्हणाल्या. शेतीतल्या निविष्ठांची खरेदी, पिकांची लागवड, शेतमालाची प्रतवारी आणि शेतमालाची विक्री आदी सर्व कामं एकटा शेतकरी करू शकत नाही, यासाठी शेतकरी गट स्थापन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
****