Monday, 28 February 2022

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.02.2022 रोजीचे रात्री 09.15 ते 09.30 वाजेच...

आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक 28.02.2022 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे ...

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 February 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 February 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ फेब्रुवारी २०२ सायंकाळी ६.१०

****  

कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. आम्ही सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.

****

** सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर मराठा आरक्षणा संदर्भात मुंबईत आझाद मैदानात तीन दिवसांपासून सुरु असलेलं खासदार संभाजी राजे छत्रपती यांचे उपोषण मागे

** अहमदनगर जिल्ह्यातील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची बेकायदेशिर लिलावातील १३ कोटी ४१ रूपयांची मालमत्ता सक्त वसुली संचालनालयाकडून जप्त

** कोळशाचा तुटवड्यामुळे राज्यात भारनियमन करावं लागण्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे संकेत

** इतर मागासवर्ग आरक्षण संदर्भात येत्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

आणि

** संजय पांडे यांची मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी नियुक्ती

****

मराठा आरक्षणा संदर्भात मुंबईत आझाद मैदानात तीन दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर थोड्या वेळापूर्वी मागे घेतलं. खासदार संभाजीराजे यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर खासदार संभाजी राजे यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. यावेळी बोलतांना मंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजे यांनी  मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला असल्याचं सांगितलं. ण्णासाहेपाटील महामंडळाला १०० कोटी रुपये अतिरिक्त निधी देण्याची तसंच  सारथी संस्थे मधील रिक्त पदे २०२२ पर्यंत भरण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात येणाऱ्या सर्व वसतीगृहांचं उद्धाटन करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील तसंच मृतांच्या वारसांना नोकरी मिळणार असल्याचंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

****

अहमदनगर जिल्ह्यातील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची बेकायदेशिर लिलावातील १३ कोटी ४१ रूपयांची मालमत्ता सक्त वसुली संचालनालय- ईडीनं जप्त केली आहे. ट्विटरवर ट्वीट करुन ईडीनं ही माहिती दिली. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या लिलावात हा साखर कारखाना अतिशय कमी किंमतीत विकला गेला होता. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी हा साखर कारखाना विकत घेतला होता. या कारवाईत ईडीनं साखर कारखान्याच्या मालकीची ९० एकर शेत जमिन आणि जवळपास साडेचार एकर अकृषिक जमिनही जप्त केली आहे.

****

राज्यातील औष्णिक वीज उत्पादन प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्यानं राज्यात भारनियमन करावं लागू शकतं असे संकेत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू, बार्शी टाकळी तालुक्यातील कोथळी आणि घोटा इथल्या वीज उपकेंद्राचं लोकार्पण आज करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात सध्या ६ लाख ७५ हजार मेट्रिक टन कोळसा शिल्लक आहे. राज्यातील ७ वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये रोज एक ते दीड लाख मेट्रिक टनापर्यंत कोळसा लागतो मात्र तुटवडा झाल्यास भारनियमन होऊ शकतं तसंच ग्राहकांनी वीज देयकं त्वरीत भरावीत अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****

इतर मागासवर्ग - ओबीसी आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, हा निकाल ओबीसी घटकांच्या बाजूने येईल आणि ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण पूर्ववत होईल असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. ते आज नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते. भारत सरकारच्या यंत्रणांपासून ते राज्याच्या विविध विभागाच्या डाटा मधून राज्य मागासवर्गीय आयोगानं अंतरिम अहवाल तयार केला असून सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेल्या त्रिस्तरीय चाचणीचा बराच भाग राज्य सरकारनं पूर्ण केला असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.

****

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटका करण्याच्या, ऑपरेशन गंगा मोहीमेअंतर्गत सहाव्या विमानानं बुडापेस्ट इथून आज आणखी २४० भारतीय नागरिकांना दिल्लीत आणण्यात आलं.

****

सध्या राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून काम पाहणारे संजय पांडे यांची मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यमान पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज गृह मंत्रालयाने याबाबतचे आदेश जारी केले.

****

हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूरला तालुक्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीनं आज नांदेड - हिंगोली रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाच्यावेळी विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव, आमदार संतोष बांगर यांनी भेट देत तालुका निर्मितीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासान दिलं. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती.

****

सोलापूर इथं राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयासमोर आज विषारी ताडी विक्री विरुध्द गोदुताई परुळेकर संस्थेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. ताडी विक्री केंद्र बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी दिला आहे.

****

धुळे पंचायत समितीच्या माध्यमातून घरकुल, पेयजेल, इंधन विहीर, कृषी, आरोग्य अशा विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी आज घेतला. पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजना अशा विविध घरकुल योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात दिरंगाई होत असल्याबाबत संबंधितांना त्यांनी जाब विचारला. तसंच केंद्र सरकारच्या घर घर नल योजनेत तालुक्यातील समाविष्ट गावांना पाईपलाईन जोडणी देण्याच्या कामाचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.

****

राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील जेष्ठ नागरीकांना साधन साहित्याचं वितरण सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाचे मंत्री डॉ विरेद्र कुमार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात करण्यात आलं. देशात ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र सशक्त विभाग सुरू करण्यात आला असून, त्यांना आवश्यक साधन साहित्याची निर्मिती देशात सुरू करून केंद्र सरकारनं आत्मनिर्भरतेचं आणखी एक पाउल पुढे टाकलं असल्याचं डॉ विरेद्र कुमार यांनी यावेळी बोलतांना सांगितलं. जिल्ह्यातील ३७ हजार जेष्ठ नागरीकांना ३७ कोटी ९५ लाख रुपयांचं साधन साहित्य मोफत देण्यात येणार असून यापैकी आज ८९५ पात्र लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आलं.

****

राष्ट्रीय विज्ञान दिन आज सर्वत्र साजरा करण्यात आला. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी रामन परिणामांचा शोध लावल्याच्या स्मरणार्थ २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.

****

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 28.02.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.02.2022 रोजीचे दुपारी 03.00 वाजेचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.02.2022 – सांगली जिल्हा वार्तापत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.02.2022 रोजीचे दुपारी 01.30 वाजेचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.02.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 February 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ फेब्रुवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

पायाभूत सुविधांची परिणामकारकता वाढवण्यासाठी पीएम गतीशक्ती योजना महत्वाची असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पीएम गतिशक्तीचा दृष्टीकोन आणि यंदाच्या अर्थसंकल्पात त्याविषयीचा समन्वय' याविषयी एका वेबिनारमध्ये ते आज बोलत होते. आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे भारताची अर्थव्यवस्था मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. गतिशक्ती योजना कार्यान्वित झाल्यानंतर संपूर्ण माहितीसह नियोजन करणं शक्य होणार आहे. केंद्र आणि राज्यांमधल्या समन्वयाच्या अभावामुळे देशाचं मोठं नुकसान झाल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. यंदाच्या अर्थसंकल्पानं २१ व्या शतकातल्या भारताच्या विकासाची गती निश्चित केली असून, सरकार खूप मोठं ध्येय घेऊन पुढे जात असल्याचं ते म्हणाले. केंद्राने राज्यांच्या मदतीसाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दुर्गम भागात रस्ते संपर्क वाढवण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रम राबवला जात असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.

****

युक्रेनमधल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री हरदीप सिह पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरेन रिजिजू आणि व्ही के सिंह युक्रेसमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांचा दौरा करणार आहेत. यासंदर्भात आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, सरकार भारतीयांना परत आणण्यासाठी सर्वप्रकारे मदत करणार असल्याचं सांगितलं.  

****

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं ऍट ऑप गंगा हे विशेष ट्विटर हँडल सुरू केलं आहे. नागरिकांना आपल्या सर्व अडचणी यावर पाठवता येतील अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एका ट्वीट संदेशात दिली आहे.

****

राष्ट्रीय विज्ञान दिन आज साजरा होत आहे. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी, रामन परिणामांचा शोध लावल्याच्या स्मरणार्थ, २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातला एकात्मिक दृष्टिकोन ही यावर्षीच्या विज्ञान दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. यानिमित्तानं विविध कार्यक्रम आज देशभरात आयोजित केले जात आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत २२ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या विज्ञान सर्वत्र पूज्यते या साप्ताहिक कार्यक्रमाची सांगताही आज होणार आहे.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. संभाजीराजे यांची आज वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, रक्तदाब आणि शरीरातील साखरेचं प्रमाण कमी झालं असून, अशक्तपणा आणि तीव्र डोकेदुखी ही लक्षणे जाणवत आहेत. यावर कोणत्याही प्रकारची औषधे घेण्यास संभाजीराजेंनी नकार दिला आहे.

आरक्षणाचा हा दीर्घकालीन लढा आहे,  त्यामुळे ज्या २२ मागण्यांपैकी सहा मागण्या कमीत कमी मार्गी लागाव्यात, या मागण्यांना न्यायालयाचे निर्बंध आहेत असं काही नाही, असं खासदार संभाजीराजे आज वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.

दरम्यान, खासदार संभाजीराजे यांच्यावतीने जाणाऱ्या शिष्टमंडळासोबत मराठा आरक्षण उपसमितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षेखाली आज बैठक होत आहे.

****

इतर मागासवर्ग - ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली असून, परवा बुधवारी ही सुनावणी होणार आहे. निवडणुकीशी संबंधित दोन प्रकरणांवर एकाच वेळी सुनावणी करणार असल्याचं न्यायालयानं सांगितलं. मागासवर्ग आयोगाच्या अंतरिम अहवालानुसार आरक्षण लागू करण्याची परवानगी राज्य सरकारने मागितली आहे.

****

वीज दर कमी करा आणि वीज जोडणी तोडण्याची मोहीम थांबवण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सूरु केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज इथल्या एम एस ए बी चं कार्यालय काल पेटवण्यात आलं. पहाटे अग्निशमन विभागाला आग आटोक्यात आणण्यात यश आलं. उर्जा मंत्र्यांनी वेळीच दखल घेतली नाही तर सांगली जिल्ह्यात आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. दिवसा दहा तास वीज देणं, वाढी वीज दर रद्द करणं, आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हे आंदोलन सुरु केलं आहे.

****

यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात रावेरी इथं आठवं अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन काल पार पडलं. शेतीविषयाच्या सखोल अभ्यासक आणि स्तंभलेखिका प्रज्ञा बापट संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होत्या. उद्योजिका मधुरा गडकरी यांचे हस्ते संमेलनाचं उदघाटन झालं. सामान्य माणसाची शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, शेती व्यवसायाला भेडसावणाऱ्या दाहक समस्यांची जाणीव मराठी साहित्यविश्वाला करून देण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आलं होतं.

****

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.02.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.02.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.02.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२८ फेब्रुवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रीय विज्ञान दिन आज साजरा होत आहे. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी रामन परिणामांचा शोध लावल्याच्या स्मरणार्थ २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. रामन परिणामांच्या शोधाबद्दल रामन यांना नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मानवी जीवनात विज्ञानाचं महत्त्व आणि त्याचा वापर याचा प्रसार करण्याचा या दिवसाचा उद्देश असतो. शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातला एकात्मिक दृष्टिकोन ही यावर्षीच्या विज्ञान दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. यानिमित्तानं विविध कार्यक्रम आज देशभरात आयोजित केले जात आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत २२ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या विज्ञान सर्वत्र पूज्यते या साप्ताहिक कार्यक्रमाची सांगताही आज होणार आहे. या निमित्ताने यावर्षीच्या विज्ञान संज्ञापन पुरस्कारांचं वितरण आणि विविध स्पर्धांमधल्या विजेत्यांचा गौरव दिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात केला जाणार आहे.

****

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपलं सामूहिक वैज्ञानिक दायित्व पूर्ण करण्यासाठी आणि विज्ञानाच्या शक्तीचा वापर मानवी विकासासाठी करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहायला हवं असं त्यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे.

****


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. आरक्षणाचा हा दीर्घकालीन लढा आहे,  त्यामुळे ज्या २२ मागण्यांपैकी सहा मागण्या कमीत कमी मार्गी लागाव्यात, या मागण्यांना न्यायालयाचे निर्बंध आहेत असं काही नाही, असं खासदार संभाजीराजे आज वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.

दरम्यान, खासदार संभाजीराजे यांच्यावतीने जाणाऱ्या शिष्टमंडळासोबत मराठा आरक्षण उपसमितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षेखाली आज बैठक होणार आहे.

****

मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली. सहा जिल्ह्यांमधल्या ३८ जागांसाठी मतदान होत आहे.

****

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.02.2022 रोजीचे सकाळी 09.20 वाजेचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

آکاشوانی اورنگ آباد علاقائی خبریں تاریخ : 28 فروری 2022 وَقت: صبح 09.00 سے 09.10 ؍ بجے

 Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.

Date : 28 February 2022

Time:  09 : 00 to 09: 10 AM

آکاشوانی اَورنگ آباد

علاقائی خبریں

تاریخ:   ٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗ ۲۸ ؍  فروری  ۲۰۲۲ء؁

وَقت: صبح  ۰۰۔۹  سے  ۱۰۔۹؍ بجے 


کورونا وائرس کا نیا ویرینٹ ’’اومائیکرون ‘‘ فکر مندی کی وجہ ہے۔لہذاہم اپنے سننے والوں سے احتیاط برتنے اور 15 سے 18؍ سال کے بچوں سمیت دیگر سبھی لوگوں کو کورونا وائرس سے بچائو کاٹیکہ لگوانے میں مدد کرنے کی اپیل کرتے ہیں۔محفوظ رہنے کے لئے تین آسان طریقے اپنائیں۔ماسک پہنیں، دوگز کا محفوظ جسمانی فاصلہ بنائے رکھیں ‘ ہاتھ اور چہراصاف رکھیں۔کووڈ 19سے متعلق جانکاری اور رہنمائی کے لئے ہیلپ لائن نمبر

011-23 97 80 46  یا  1075 ؍پرکال کریں۔۔

اب خاص خبروں کی سر خیاں...


٭ وزیر اعظم نے سر پرستوں کو بچوں میں سائنسی روئیے کے ارتقاکے لیے چھو ٹی چھو ٹی 

کوشِشیں کرنے کا دیا مشورہ

٭ رکن پارلیمنٹ سمبھا جی راجے چھتر پتی کا مراٹھا سماج کے مطالبات کی یکسوئی کے لیے حکو مت کی جانب سے تحریری فیصلہ اور عمل در آمد کا اعلان کیے جانے تک بھوک ہڑ تال

واپس نہ لینے کاعزم

٭ دِشا سالیان کی بد نامی معاملے میں مرکزی وزیر نا رائن رانے اور رکن اسمبلی نِتیش رانے کے خلاف مالو نی پولس اسٹیشن میں فردِ جرم داخل


٭ ریاست میں کَل پائے گئے کورونا کے 782؍ نئے مریض‘ مراٹھواڑہ میں کورونا سے

2؍ کی موت  اور 38

؍ نئے متاثرین کا اضا فہ 

اور

٭ تیسرے T-20؍ کرکٹ مقابلے میں بھارت نے سری لنکا کو6؍ وکٹوں سے شکست دے کر 

3 - 0 

؍ سے سیریزکرلی اپنے نام


  اب خبریں تفصیل سے....


وزیر اعظم نریندر مودی نے سر پرستوں کو بچوں میں سائنسی تحقیقی  رویہ کے ارتقا کے لیے چھو ٹی چھو ٹی کوشِشیں کرنےکا مشورہ دیا ہے ۔ وزیر اعظم کَل آکاشوانی کے پروگرام من کی بات کے ذریعے قوم سے خطاب کر رہے تھے ۔ آج قومی سائنسی دِن منا یا جا رہا ہے ۔ اِس موقع پر انہوں نے بچوں میں علم طبعیات اور فلکیات کے متعلق جاننے کا تجسُس پیدا کرنے کی بھی اپیل کی ۔ وزیر اعظم نے مراٹھی زبان کا یومِ افتخار کے موقعے پر کَل مراٹھی شہر یوں کو مراٹھی میں تہنیت پیش کی ۔ اِس موقعے پر اُنہوں نے کہا کہ ماں اور مادری زبان ہماری زندگی کی بنیاد کو مضبوط کرتے ہیں ۔ وزیر اعظم نے بتا یا کہ قو می تعلیمی پالیسی کے تحت مقامی زبان میں تعلیم پر زور دیاگیا ہے ۔ انہوں نے کہا کہ پیشہ وارانہ کورسیز بھی مقا می زبانوں میں سکھانے کے لیے کوشش کی جا رہی ہے ۔

***** ***** ***** 

جنگ زدہ یو کرین میں پھنسے بھارتی طلبا کی مہم آپریشن گنگا کے تحت کَل 250؍ طلبا دہلی پہنچے ۔ اِن میں مہاراشٹر کے27؍ طلبا شامل ہیں۔158؍ ہندوستانیوں کو لے کر بُخار سیٹ سے کَل ایک طیارہ دہلی پہنچا ۔ دہلی میں واقع مہاراشٹر سدن کی جانب سے اِندرا گاندھی بین الاقوامی طیران گاہ پر یو کرین سے آنے والوں کو صحیح سلامت گھر پہنچا نے کے لیے ایک امدادی روم قائم کیا ہے ۔ مہاراشٹر کے طلبا کو اُن کے گھروں کے قریب واقع طیران گاہوں کے ٹکٹ حکو مت کی جانب سے دیے جا رہے ہیں ۔

***** ***** ***** 

رکنِ پارلیمنٹ سمبھا جی راجے چھتر پتی نے مراٹھا سماج کے مطا لبات کی خاطر حکو مت کی جانب سے تحریری فیصلہ اور عمل در آمد کا اعلان کیے جانے تک بھوک ہڑ تال ختم نہ کرنے کا فیصلہ کیا ہے ۔ دوسری جانب ریاستی حکو مت نے سمبھا جی راجے کی بھوک ہڑ تال ختم کر وانے کے لیے مراٹھا سماج کے مطالبات پر غور و خوص کی خا طر وزراکی آج میٹنگ طلب کی ہے ۔ جس میں سمبھا جی راجے کے نمائندے کو بھی شر کت کی دعوت دی ہے ۔

***** ***** ***** 

اِسی بیچ سکَل مراٹھا سماج نے حکو مت پر مراٹھا ریزر ویشن کے لیے رکنِ پارلیمنٹ یو راج سمبھا جی راجے چھتر پتی کی جانب سے کی جا رہی بھوک ہڑ تال کو نظر انداز کرنے کا الزام عائد کیا ہے ۔ اِس سماج نے 2؍ دِنوں میں مراٹھا ریزر ویشن پر فیصلہ نہ کیے جانے پر مختلف طریقوں سے احتجاج کرنے کا انتباہ دیا ہے جس کا آغاز آئندہ بدھ کو کولہا پور بند سے کیے جانے کا فیصلہ سکَل مراٹھا سماج کی میٹنگ میں کیا گیا ۔ سمبھا جی راجے کی بھوک ہڑتال کی حمات میں بند کے دورا ن راستہ روکو آندو لن بھی کیا جا ئے گا ۔ 

اِسی بیچ مراٹھا ریزر ویشن کے لیے رکن پارلیمنٹ سمبھا جی راجے کی بھوک ہڑ تال کی حمایت میں تُلجا پور سے بی جے پی کے رکن اسمبلی رانا جگجیت سنگھ پاٹل نے بھی کَل علا متی بھوک ہڑتال کی ۔

***** ***** ***** 

فلم ادا کار سُشانت سنگھ راجپوت کی سابق منیجر دِشا سالیان کی بد نا می کرنے کے معاملے میں مرکزی وزیر نا رائن رانے اور  رکن اسمبلی نِتیش رانے کے خلاف کَل ما لو نی پولس اسٹیشن میں جرم داخل کیا گیا ۔ گزشتہ 19؍ فروری کو نارائن رانے نے ایک صحا فتی کانفرنس میں دِشا سے متعلق متنا زعہ بیان دیا تھا   اور  اِس بیان کی حمایت میں اُن کے بیٹے نِتیش رانے نے سوشل میڈیا پر دِشا کی موت سے متعلق بد نام کرنے والا پیغام وائرل کیا ۔ دِشا کی ماں واسنتی سالیان نے رانے کے بیان کو سا لیان خاندان کی بد نا می قرار دیتے ہوئے پولس اسٹیشن میں شکایت درج کر ائی تھی ۔ اِس شکا یت کے بعد رانے اور اُن کے بیٹے کے خلاف جرم داخل کیا گیا ہے ۔


***** ***** ***** 

 یہ خبریں آکاشوانی اورنگ آ باد سے نشر کی جا رہی ہیں

***** ***** ***** 


ریاست کے وزیر صحت راجیش ٹو پے نے کہا ہے کہ کورونا کی تیسری لہر اگر چے کے قابو میں ہے تب بھی ہمیں ماسک کے استعمال سے آزاد ہونے کی جلد ی نہیں کرنا چا ہیے۔ وزیر موصوف کَل جالنہ میں صحیفہ نگا روں سے خطاب کر رہے تھے ۔ انہوں نے کہا کہ حکو مت فی الحال پا بند یوں کو ختم کرنے کی جانب گامزن ہے تاہم ماسک سے نجات کے فیصلے پر ابھی غور کرنا باقی ہے ۔

***** ***** ***** 

ریاست میں کَل کورونا وائرس کے 782؍ نئے مریض پائے گئے ۔ جس کے بعد ریاست بھر میں اِس وبا کے کُل متاثرین کی تعداد78؍ لاکھ65؍ ہزار298؍ ہو چکی ہے ۔ کَل علاج کے دوران2؍ کورونا مریضوں کی موت ہو گئی ۔ ریاست میں اب تک ایک لاکھ43؍ ہزار697؍ افراد کورونا سے ہلاک ہو چکے ہیں ۔ ساتھ ہی کَل ایک ہزار361؍ کورونا مریض شفا یاب ہوئے ۔ ریاست میں اب تک 77؍ لاکھ10؍ ہزار376؍ کورونا مریض صحت یاب ہو کر گھر لوٹ چکے ہیں۔ فی الحال ریاست میں کورونا کے7؍ ہزار228؍مریضوں کا علاج کیا جا رہا ہے ۔

***** ***** ***** 

مراٹھواڑہ میں کَل کورونا کے34؍ نئے کیسیز درج کیے گئے ۔ بیڑ اور ہنگولی اضلاع میں کَل علاج کے دوران فی کس ایک کورونا مریض کی موت ہو گئی ۔ اورنگ آباد ضلعے میں کَل کورونا کے11؍ نئے مریض پائے گئے ۔ لاتور میں9؍ بیڑ5؍ پر بھنی4؍ ناندیڑ3؍ عثمان آ بادمیں2؍ جبکہ جالنہ  اور ہنگولی میں کَل کورونا کا ایک بھی نیا معاملہ درج نہیں کیاگیا ۔

***** ***** ***** 

مُلک بھر میں کَل سے قو می پلس پو لیو مہم کا آغاز کر دیا گیا ہے ۔ اِس مہم کے تحت صفر سے5؍ برس کے عمر کے بچوں کو پو لیو کے قطرے پلائے جا تے ہیں ۔ آئندہ2؍ مارچ تک یہ مہم جاری رہے گی ۔ ریاستی سطح پر اِس مہم کا آغام وزیر صحت راجیش ٹو پے کے ہاتھوں جالنہ کے خواتین ضلع اسپتال سے کیا گیا ۔ اورنگ آ باد میونسپل کار پو ریشن نے کَل ایک لاکھ58؍ ہزار225؍ بچوں کو پو لیو کی خوراک دی۔ عثمان آباد میں کَل ضلع پریشد صدر اسمِتا کامبلے کے ہاتھوں ایک بچے کو پو لیو خوراک دے کر اِس مہم کا آغاز کیا گیا ۔

***** ***** ***** 

رکن پارلیمنٹ امتیاز جلیل نے اورنگ آباد میں آئندہ2؍ مارچ کو ہونے والے قد رتی گیس پائپ لائن کے کاموں کے افتتاح کے موقع پر مرکزی وزرا کو کالے جھنڈے دِکھا کر احتجاج کرنے کا انتباہ دیا ہے ۔ جلیل کَل اورنگ آ باد میں صحا فتی کانفرنس میں بول رہے تھے ۔ انہوں نے کہا کہ شہر کے52؍ ہزار اہل افراد کو وزیر اعظم رہائشی اسکیم کے تحت ابھی تک مکا نات نہیں دیے گئے ہیں  اور  شہر کے راستے ما ضی قریب میں دُرست کیے گئے ۔ انہوں نے قدرتی گیس پائپ لائن بچھا نے کے لیے اِن راستوں کو دو با رہ خراب کیے جانے کی تشویش ظاہر کی ہے ۔ انہوں نے کہا کہ اورنگ آباد کے بے گھر افراد کو قدرتی گیس سے زیادہ گھر اور پانی فراہمی کی ضرورت ہے ۔

***** ***** ***** 

ناندیڑ کے رابطہ وزیر اشوک چوہا ن نے کہا ہے کہ حکو مت کی جانب سے معیاری تعلیم کی فراہمی کی خاطر اسکو لوں کو فنڈ کی کمی نہیں ہونے دی جا ئے گی ۔ ناندیڑ ضلع پریشد کی جانب سے ساوِتری بائی پھُلے ایوارڈ ‘ نر ہرکُرندکر ایوارڈ ضلع اُستاذ انعام کَل وزیر موصوف کے ہاتھوں تقسیم کیے گئے ۔ اِس موقعے پر چو ہان نے یہ تیقن دیا ۔ 

***** ***** ***** 

دھرم شالہ میں کَل کھیلے گئے تیسرے T-20؍ کر کٹ مقابلے میں بھارت نے سر ی لنکا کو6؍ وکٹوں سے شکست دے دی  اور  سیریز0 - 3 ؍ سے اپنے نام کر لی ۔ سر ی لنکائی ٹیم کی جانب سے دیے گئے 147؍ رنوں کے ہدف کو بھارت نے17؍ ویں اوور میں حاصل کر لیا ۔ سیریز میں مسلسل 3؍مرتبہ نصف سنچری بنا نے اور ناٹ آئوٹ رہنے پر شرییس ائیر کو مین آ ف دی میچ کے اعزاز سے نوازا گیا ۔

***** ***** ***** 


آخر میں اہم خبروں کی سر خیاں ایک بار پھر ...


٭ وزیر اعظم نے سر پرستوں کو بچوں میں سائنسی روئیے کے ارتقاکے لیے چھو ٹی چھو ٹی 

کوشِشیں کرنے کا دیا مشورہ

٭ رکن پارلیمنٹ سمبھا جی راجے چھتر پتی کا مراٹھا سماج کے مطالبات کی یکسوئی کے لیے حکو مت کی جانب سے تحریری فیصلہ اور عمل در آمد کا اعلان کیے جانے تک بھوک ہڑ تال

واپس نہ لینے کاعزم

٭ دِشا سالیان کی بد نامی معاملے میں مرکزی وزیر نا رائن رانے اور رکن اسمبلی نِتیش رانے کے  خلاف مالو نی پولس اسٹیشن میں فردِ جرم داخل


٭ ریاست میں کَل پائے گئے کورونا کے 782؍ نئے مریض‘ مراٹھواڑہ میں کورونا سے

 2؍ کی موت  اور 38

؍ نئے متاثرین کا اضا فہ 

اور

٭ تیسرے T-20؍ کرکٹ مقابلے میں بھارت نے سری لنکا کو6؍ وکٹوں سے شکست دے کر 

3 - 0 

؍ سے سیریزکرلی اپنے نام


اِسی کے ساتھ آکاشوانی اورنگ آباد سےعلاقائی خبریں ختم ہوئیں۔

٭٭٭٭٭


آکاشوانی اورنگ آباد علاقائی خبریں تاریخ : 28 فروری 2022 وَقت: صبح 09.00 سے 09.10 ؍ بجے

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.02.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.02.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 February 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      मुलांमध्ये वैज्ञानिक वृत्ती विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सल्ला

·      मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून लेखी निर्णय आणि भरीव अंमलबजावणी जाहीर केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा निर्धार

·      दिशा सालियानची बदनामी केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

·      मास्कमुक्तीची घाई करुन चालणार नाही- आरोग्य मंत्री राजेश टोपे

·      राज्यात कोविडचे ७८२ नवे रुग्ण, मराठवाड्यात दोन जणांचा मृत्यू तर ३४ नवे रुग्ण

·      मराठी भाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी साजरा

आणि

·      तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर सहा गडी राखून विजय मिळवत भारतानं तीन- शून्यच्या फरकानं मालिका जिंकली

****

मुलांमध्ये वैज्ञानिक वृत्ती विकसित करण्यासाठी लहान प्रयत्नांपासून सुरूवात करण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालकांना दिला. मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रम श्रृंखलेच्या ८६ व्या भागात, ते काल बोलत होते. राष्ट्रीय विज्ञान दिन आज साजरा होत आहे, यानिमित्त मुलांमध्ये भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्राबद्दल उत्सुकता निर्माण करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. कालच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पंतप्रधानांनी, मराठी नागरिकांना मराठीतून शुभेच्छा दिल्या. आई आणि मातृभाषा आपल्या जगण्याचा पाया मजबूत करत असल्याचं, त्यांनी मराठी भाषा दिनानिमित्त नमूद केलं. ज्येष्ठ साहित्यिक वि वा शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांचं स्मरण केलं. राष्ट्रीय शिक्षण धोरणात स्थानिक भाषेतूनं शिकवण्यावर भर दिला गेला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमही स्थानिक भाषांमधून शिकवले जावेत, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं ते म्हणाले.

****

युद्ध परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याच्या ‘ऑपरेशन गंगा या मोहीमेअंतर्गत, काल २५० विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले. यात महाराष्ट्रातल्या २७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एकशे अट्ट्याण्णव भारतीय नागरिकांना घेऊन बुखारेस्ट इथून निघालेलं चौथं विमानही, काल दिल्लीत दाखल झालं. या सर्वांना आपापल्या घरी सुखरुप पोहोचता यावं, यासाठी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्यावतीनं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना राज्यातल्या त्यांच्या घराजवळच्या विमानतळाच्या शहराची तिकीटं काढून देण्यात येत असल्याचं, सरकारनं सांगितलं आहे.

****

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सरकारकडून लेखी निर्णय आणि भरीव अंमलबजावणी जाहीर केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काल पुन्हा एकदा जाहीर केला. संभाजीराजेंनी उपोषण मागे घ्यावं, आणि मराठा समाजाच्या मागण्यांबाबतची कोंडी फुटावी, यासाठी राज्य सरकारनं मराठा आरक्षणाच्या प्रश्नाशी संबंधित मंत्र्यांची आज बैठक बोलावली आहे. या बैठकीला संभाजीराजेंच्या प्रतिनिधींना देखील उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

दरम्यान, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप, कोल्हापूर इथल्या सकल मराठा समाजानं केला आहे. दोन दिवसांत मराठा आरक्षणावर निर्णय न झाल्यास विविध पध्दतींनी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याची सुरुवात परवा बुधवारी कोल्हापूर बंदची हाक देऊन करण्याचा निर्णय काल कोल्हापूर इथं झालेल्या बैठकीत घेण्यात आला. संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी कोल्हापूरकर आक्रमक झाले असून‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌, हळदी बंदची हाक देत रस्ता रोको करण्यात येणार असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तुळजापूर इथं भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी काल लाक्षणिक उपोषण केलं. 

****

अभिनेता सुशांत सिंग राजपुत याची माजी मॅनेजर दिशा सालियान हिची बदनामी केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. १९ फेब्रुवारीला नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिशाबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. या विधानाला त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी दुजोरा देत समाजमाध्यमांवर दिशाच्या मृत्यूविषयी बदनामीकारक संदेश प्रसारित केला.  त्यांच्या या विधानामुळे दिशासह सालियन कुटुंबीयांची  बदनामी झाली असून, लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. असं सांगत दिशाच्या आई वासंती सालियान यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत, राणे पिता-पुत्राविरुद्ध  माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट आटोक्यात आली असली, तरीही मास्कमुक्तीची घाई करुन चालणार नाही, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते. सरकार सध्या निर्बंधमुक्तीकडे वाटचाल करत आहे, मात्र मास्कमुक्तीचा निर्णय घेताना विचार करावा लागेल, असं ते म्हणाले.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ७८२ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ६५ हजार २९८ झाली आहे. काल दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४३ हजार ६९७ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. काल एक हजार ३६१ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख १० हजार ३७६ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य दोन शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या सात हजार २२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ३४ नवे रुग्ण आढळले तर बीड आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात काल ११ नव्या रुग्णांची नोंद झाली. लातूर ९, बीड ५, परभणी ४, नांदेड तीन, उस्मानाबाद जिल्ह्यात दोन नवे रुग्ण आढळले तर जालना आणि हिंगोली जिल्ह्यात काल एकही नविन रुग्ण आढळला नाही. 

****

देशभरात कालपासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवण्यास सुरुवात झाली. या मोहिमेतून शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या बालकांना पोलिओ लस दिली जात आहे. येत्या दोन मार्चपर्यंत ही मोहीम चालणार आहे. या मोहिमेचं राज्यस्तरीय उदघाटन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जालना इथल्या जिल्हा स्त्री रुग्णालयात करण्यात आलं.  औरंगाबाद महानगरपालिकेनं काल एक लाख ५८ हजार २२५ मुलांना पोलिओ लस दिली. निर्धारित उद्दिष्टापैकी ७८ टक्के उद्दीष्ट काल साध्य झालं. उस्मानाबाद इथं जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अस्मिता कांबळे यांच्या हस्ते एका बालकाला पोलिओ लसीचा डोस देऊन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

****


मराठी भाषा गौरव दिन काल सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा झाला. औरंगाबाद इथं भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त, एकदिवसीय श्री समर्थ साहित्य संमेलन काल मराठी भाषा दिनी घेण्यात आलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत या साहित्य परिषदेचा समोराप झाला. यावेळी बोलताना राज्यपालांनी, समर्थ रामदास स्वामी यांची शिकवण अखिल विश्वाला मार्गदर्शक ठरणारी आहे. त्यादृष्टीनं चांगलं आयुष्य जगण्यासाठी सर्वांनी समर्थांची शिकवण आचरणात आणण्याची गरज व्यक्त केली.

या परिषदेत 'साहित्यातले राष्ट्रविचार` या विषयावर, ज्येष्ठ पत्रकार विवेक घळसासी यांनी, `समर्थ साहित्य आणि व्यवस्थापन` विषयावर, श्रीनिवास रायरीकर यांनी, तर `समर्थांचा कुटुंब संदर्भातला विचार` या विषयावर, डॉ. अपर्णा बेडेकर यांनी मार्गदर्शन केलं.

दरम्यान, राज्यभरातल्या मराठी शाळा वाचवून माय मराठीचं अस्तित्व टिकवण्यासाठी, सरकारनं सकारात्मक निर्णय घ्यावेत, अशी मागणी, भाजपा शैक्षणिक महासंघ तर्फे राज्यपालांना करण्यात आली. भाजपचे औरंगाबाद शहरजिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांच्या नेतृत्वात महासंघानं राज्यपालांना याबाबतचं निवेदन सादर केलं.

****

मराठीकरण करण्याची राज्य सरकारची इच्छा शक्ती नसून सरकारवर परप्रांतीयांचं दडपण असल्याचा आरोप, ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांनी केला आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या, मराठी भाषा आणि वाङ्गमय विभागातर्फे घेण्यात आलेल्या व्याख्यानात, ‘मराठी भाषेपुढील समस्या, या विषयावर रसाळ बोलत होते. शासनामध्ये मराठीतूनच सगळे व्यवहार झाले पाहिजेत, तरंच मराठीकरण होवू शकतं, असं त्यांनी नमूद केलं. मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी सरकारला खर्चिक प्रयत्न करावे लागतील, चीनसारखी राष्ट्रं ज्या पद्धतीनं आपल्या मातृभाषेचा आग्रह धरतात, त्या पद्धतीनं मराठी भाषिकांनीही मातृभाषेचा आग्रह धरला पाहिजे, असं रसाळ म्हणाले.

मराठी राजभाषा दिनानिमित्त शिवसेनेच्यावतीनं औरंगाबाद इथं कवी संमेलन घेण्यात आलं. काव्यप्रेमी, रसिक प्रेक्षकांची या कार्यक्रमाला लक्षणीय उपस्थिती होती.

परभणी जिल्ह्यात सेलू इथल्या नूतन विद्यालयात, कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिनानिमित्त, मराठी विषयाचे सहशिक्षक अशोक लिंबेकर यांनी, मराठी भाषेची महती आपल्या मनोगतातून विषद केली. मराठी भाषेला उज्ज्वल असा इतिहास आहे. त्यामुळेच मराठी ही अभिजात भाषा असल्याचं मत, लिंबेकर यांनी व्यक्त केलं.

****

औरंगाबाद इथं येत्या दोन मार्च रोजी होणाऱ्या नैसर्गिक वायूवाहिनी कामाच्या शुभारंभ सोहळ्यात, केंद्रीय मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा, खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. औरंगाबाद इथं काल पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहरातल्या ५२ हजार पात्र लाभार्थ्यांना `पंतप्रधान आवास` योजनेचा लाभ मिळालेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शहरातले रस्ते आताच दुरुस्त करुन नवे करण्यात आले आहेत. ही नैसर्गिक वायू वाहिनी टाकण्यासाठी परत रस्ते खराब केले जाणार असल्याची शंका त्यांनी वर्तवली. औरंगाबाद शहरातल्या बेघरांना नैसर्गिक वायू वाहिनीपेक्षा घरं आणि पाण्याची आवश्यकता असल्याचं खासदार जलील यांनी सांगितलं.

****

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळांना शासन स्तरावरून निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असं नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीनं सावित्रीबाई फुले पुरस्कार, नरहर कुरुंदकर पुरस्कार आणि जिल्हा शिक्षक पुरस्कारांचं वितरण काल चव्हाण यांच्या हस्ते नांदेड इथे झालं, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात वाचन चळवळ रुजावी यासाठी मराठी भाषा दिनाच्या औचित्यानं चव्हाण यांची ग्रंथतुला करण्यात आली. ही पुस्तकं मराठी शाळांना वाटण्यात येणार असल्याचं संयोजकांनी कळवलं आहे.

दरम्यान, चव्हाण यांच्या हस्ते काल परभणी तालुक्यात जांब इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचं लोकार्पण, जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन, आणि नाबार्ड 36 अंतर्गत बाभूळगाव ते मांडाखळी ग्रामीण रस्त्याचं भूमिपूजन करण्यात आलं.

****

परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथं औद्योगिक वसाहतीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी काल मतदान झालं.

दरम्यान, या मतदानावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. यावेळी झालेल्या दगडफेकीत पोलिस उपनिरीक्षकासह एक पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी सौम्य लाठीमार करुन दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांसह जमावाला पांगवलं. 

****

औरंगाबाद इथं विवेकानंद महाविद्यालयात आयोजित केंद्र सरकारच्या विज्ञान प्रसार महोत्सवामध्ये काल सहाव्या दिवशी डॉक्टर जी. डी. यादव, डॉक्टर एस. डी. पवार, खगोल शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर तसंच गिरीशकुमार भसीन यांची व्याख्यानं झाली. या सप्ताहात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्य विद्यार्थ्यांना पारितोषिकं देण्यात आली.  आज विज्ञान दिनी या सप्ताहाचा समारोप होत आहे.

****

धरमशाला इथं काल झालेल्या तिसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेवर सहा गडी राखून विजय मिळवत, तीन सामन्यांची मालिका तीन - शून्य अशी जिंकली आहे. प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेनं दिलेलं १४७ धांवंचं लक्ष्य भारतीय संघानं सतराव्या षटकातच पूर्ण केलं. मालिकेत सलग तीन अर्धशतके ठोकत नाबाद राहणाऱ्या श्रेयस अय्यरला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

****

तुळजापूर तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने १० जागा जिंकत खरेदी विक्री संघावर सत्ता मिळवली आहे. शिवसेनेचे सहा, काँग्रेसचे दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन उमेदवारांनी विजय मिळवला. या संघावर सत्ता असलेल्या भारतीय जनता पार्टीचे तीन उमेदवार निवडून येऊ शकले.

****

उदगीर इथं येत्या २३ आणि २४ एप्रिलला विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे सोळावं विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. काल उदगीर इथं झालेल्या राज्य कार्यकारिणी आणि स्थानिक संयोजन समितीच्या बैठकीत संमेलन संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं.

****

Sunday, 27 February 2022

आकाशवाणी औरंगाबाद – आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक – 27.02.2022 रोजीचे- वृत्त विशेष

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.02.2022 रोजीचे रात्री 09.15 ते 09.30 वाजेचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.02.2022 रोजीचे दुपारी 03.00 वाजेचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र

आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक 27.02.2022 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 February 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 February 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ फेब्रुवारी २०२ सायंकाळी ६.१०

****  

कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. आम्ही सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.

****

** आई आणि मातृभाषा जगण्याचा पाया मजबूत करत असल्याचं नमुद करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा

** राज्यात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी ६ कोटी ६७ लाखापेक्षा जास्त नागरिकांना लसीच्या दोन मात्रा

** युद्धग्रस्त युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनातर्फे दिल्लीत सहकार्य कक्ष 

आणि

** सदाचार असेल तर देश आणि जग सुधारेल- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं प्रतिपादन 

****

आई आणि मातृभाषा आपल्या जगण्याचा पाया मजबूत करत असल्याचं नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रख्यात कवी आणि लेखक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीला साजऱ्या होणाऱ्या या दिवशी कुसुमाग्रज यांचं स्मरण करत, त्यांनी मराठी साहित्याला नवी उंची प्राप्त करून दिली, असं पंतप्रधानांनी आपल्या या संदर्भातल्या संदेशात म्हटलं आहे.

****

‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं असून राज्यातल्या जनतेला तसंच जगभरातील मराठी भाषाप्रेमींना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिजात भाषेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लवकर मिळावा, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्धार असल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे.

****

युद्धग्रस्त युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना सुखरुप स्वगृही पोहचता यावं, यासाठी दिल्लीतल्या महाराष्ट्र शासनाच्या, महाराष्ट्र सदनाच्यावतीनं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना राज्यातल्या त्यांच्या घराजवळ पोहचवण्यासाठी विमानाचं तिकीट काढून देण्यात येत असल्याचं सरकारनं कळवलं आहे. दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटका करण्याच्या, ऑपरेशन गंगा या, मोहीमेअंतर्गत चौथ्या विमानानं आज अजून एकशे अट्ट्याण्णव भारतीय नागरिक बुखारेस्ट इथून दिल्लीसाठी निघाले आहेत.

****

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरणाअंतर्गत राज्यात आज सकाळपासून दुपारपर्यंत ६ हजार नागरिकांचं लसीकरण झालं. लाभार्थ्यांना आतापर्यंत दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १५ कोटी ५५ लाखांच्या वर गेली आहे. त्यात ६ कोटी ६७ लाखापेक्षा जास्त नागरिकांना लसीच्या दोन मात्रा मिळाल्या आहेत, तर १५ लाख १४ हजारापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना एकूण ५३ लाख ६५ हजारापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत.

****

राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद, अर्थात `नॅक`च्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर भूषण पटवर्धन यांची निवड करण्यात आली आहे. प्रा. जगदेशकुमार यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर `नॅक`चं अध्यक्षपद रिक्त होतं. डॉक्टर पटवर्धन सध्या आयुष मंत्रालयात राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

****

सदाचार असेल तर देश आणि जग सुधारेल, असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या अनुशंगानं आज औरंगाबाद इथं आयोजित समर्थ साहित्य परिषदेचा समोराप त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला, त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या अणि संस्कृतीच्या रक्षणासाठी `राम राज्या`ची आवश्यकता असल्याचं त्यांनी यावेळी नमुद केलं. `समर्थ साहित्यातले राष्ट्रविचार` या विषयावर ज्येष्ठ पत्रकार विवेक घळसासी यांनी तर `समर्थ साहित्य आणि व्यवस्थापन` या विषयावर श्रीनिवास रायरीकर यांनी आणि `समर्थांचा कुटुंब संदर्भातला विचार` या विषयावर डॉ. अपर्णा बेडेकर यांनी या परिषदेत मार्गदर्शन केलं.

****

औरंगाबाद मधल्या ५२ हजार पात्र लाभार्थ्यांना `पंतप्रधान आवास` योजनेचा लाभ मिळालेला नाही. शहरातल्या बेघरांना व्यावसायिक आणि स्वयंपाकाच्या नैसर्गिक वायू वाहिनीची गरज नसून घरांची आणि पाण्याची आवश्यकता असल्यानं दोन मार्चला औरंगाबाद इथं या कामाच्या उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. औरंगाबाद इथं आज एका पत्रकार परिषदेत त्यांनी या संदर्भातली माहिती दिली. शहरातले रस्ते आताच दुरुस्त करुन नवे करण्यात आले आहेत. ही नैसर्गिक वायू वाहिनी टाकण्यासाठी परत रस्ते खराब केले जाणार असल्याची टीका त्यांनी केली. सर्व पात्र नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करत रहाणार असल्याचंही जलील यांनी यावेळी सांगितलं.

****

पल्स पोलिओ लसीकरण राज्य स्तरीय मोहीमेचं उदघाटन आज जालना इथं आरोग्य तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जिल्हा स्त्री रुग्णालयात झालं. उस्मानाबाद इथं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते लस देऊन मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. येत्या २ मार्चपर्यंत ही लसीकरण मोहीम चालणार आहे.

****

ग्रामीण भागात विद्यार्थी शाळेत टिकून रहाण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळांना शासन स्तरावरून निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असं नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीनं सावित्रीबाई फुले पुरस्कार, नरहर कुरुंदकर पुरस्कार आणि जिल्हा शिक्षक पुरस्कारांचं वितरण आज त्यांच्या हस्ते नांदेड इथे झालं, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात वाचन चळवळ रुजावी यासाठी मराठी भाषा दिनाच्या औचित्यानं त्यांची यावेळी ग्रंथतुला करण्यात आली. ही पुस्तकं मराठी शाळांना वाटण्यात येणार असल्याचं संयोजकांनी कळवलं आहे.

****

औरंगाबाद जिल्हयातील पर्यटन स्थळं खुली करण्यात आल्यानं आज सुटीच्या दिवशी पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी झाली होती. दरम्यान, पर्यटनस्थळांसाठीची तिकीटविक्री केवळ `ऑनलाईन` न ठेवता आता प्रत्यक्षही केली जावी, अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.

****