Tuesday, 31 July 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.07.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१  जुलै २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत चालू खरीप हंगामात बिगर कर्जदार शेतकऱ्यांना क विमा अर्ज सादर करण्याची मुदत आज संपणार आहे. बँकेच्या सर्व शाखांमध्ये आज संबंधीतांचे अर्ज आणि पक विमा हप्ता स्वीकारुन येत्या १३ ऑगस्ट पर्यंत महिती संकेतस्थळावर भरण्याची सूचना यासंदर्भात जारी पत्रामधून देण्यात आली आहे.

****



 फरार उद्योजक विजय मल्ल्याच्या भारतात प्रत्यार्पण प्रकरणाची अंतिम सुनावणी आज ब्रिटनच्या न्यायालयात होणार आहे. त्यानंतर न्यायालय अंतिम निकालाची तारीख जाहीर करेल. याप्रकरणी गेल्या २७ एप्रिलला झालेल्या सुनावणीत भारतानं दाखल केलेले पुरावे न्यायालयानं मान्य केले आहेत. बँकांचं नऊ हजार कोटी रुपये कर्ज थकवून फरार झाल्याचा मल्ल्यावर आरोप आहे.

****



 राफेल विमान खरेदी घोटाळ्याच्या निषेधार्थ, केंद्र सरकारच्या विरोधात काल मुंबई काँग्रेसतर्फे “मोर्चा” काढण्यात आला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाकॉंग्रेस पदाधिकारी आणि  कार्यकर्ते या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

****



 जालना जिल्ह्यात उस्माननगर ते सातोना दरम्यान रेल्वे मार्ग दुरूस्तीमुळे आज ब्लॉक घेण्यात येत आहे. यामुळे नगरसोल-नांदेड सवारी गाडी आणि मनमाड ते काचीगुडा सवारी गाडी आज उशीरा धावणार आहे. हा ब्लॉक येत्या दोन, तीन, चार, आणि सात ऑगस्ट रोजी ही घेण्यात येणार आहे.

*****



      बीड जिल्ह्यात जवळपास तीन लाख हेक्टक्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय योजना केली जात आहे. काल कृषी आयुक्त कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी बीड तालुक्यातल्या पिकांची पाहणी करून, बांधावर जाऊन मार्गदर्शन केलं, तर कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांची पाहणी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 भारत आणि श्रीलंका यांच्यात श्रीलंकेतल्या कोलंबो इथं खेळल्या गेलेल्या, १९ वर्षांखालील युवकांच्या पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला कालचा हिला सामना, भारतीय संघानं सहा गडी राखून जिंकला. अवघ्या ३८ षटकं आणि चार चेंडूत श्रीलंकेचा संघ केवळ १४३ धावाच करू शकला. भारतीय संघानं ३७ षटकं आणि एका चेंडूत, चार गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान पार केलं.

*****

***

No comments: