आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२२ नोव्हेंबर २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
देशात
सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे ४५ हजार २०९ नवे
रुग्ण आढळले आहेत. या काळात या संसर्गामुळे ५०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
****
देशात
कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची एकूण संख्या ९० लाख ९५ हजार ८०७ झाली असून, ४
लाख ४० हजार ९६२ सक्रिय रुग्ण असल्याचं केंद्रीय आरोग्य विभागानं म्हटलं आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात कोरोना विषाणुच्या एकूण रुग्णांची संख्या बेचाळीस हजार दोनशे शेहेचाळीस झाली
आहे. यापैकी ४० हजार चारशे अठ्ठावन्न रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार एकशे एकतीस रुग्णांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू
झाला आहे. सध्या जिल्ह्यात सहाशे सत्तावन्न रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
सामान्य
जनतेची गेल्या आठ महिन्यांतली वीज देयकं पन्नास टक्के माफ करावी, या मागणीसाठी रिपब्लीकन
पक्षातर्फे उद्यापासून तीन दिवस राज्यभर आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती पक्षाचे
राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.
****
मुंबईतल्या
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लातूर विभागाअंतर्गत काम करणारे राज्य
परिवहन महामंडळाचे वाहक, चालकांना बेस्ट वाहतूक सेवेसाठी मुंबईला पाठवू नये अशी विनंती
आमदार अभिमन्यू पवार यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे. लातूर इथल्या सुमारे चारशे
एसटी कर्मचाऱ्यांना बेस्ट वाहतूक सेवेसाठी मुंबई इथं पाठवण्याचा निर्णय राज्य परिवहन
महामंडळानं घेतल्याच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी ही मागणी केली आहे.
****
अंमली
पदार्थ नियंत्रण विभाग - एनसीबीनं विनोदी कलाकार भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया
या दोघांनाही मुंबईत अटक केली. त्या दोघांवरही अंमली पदार्थांचं सेवन तसंच अंमली पदार्थ
बाळगल्याचा आरोप आहे.
****
वीज
देयक वसुलीला बंदी घालून संपूर्ण माफी द्यावी, अन्यथा ऊर्जामंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यात
प्रवेश बंदी करण्यात येईल, असं जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख
यांनी म्हटलं आहे. टाळेबंदीच्या काळातली सर्वसामान्यांची वीज देयकं माफ करावी, या मागणीसाठी
आम आदमी पक्षाच्या वतीनंही काल अहमदनगर इथं घंटानाद आंदोलन करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment