आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१५ मे २०२१
सकाळी ११.०० वाजता
****
अरबी समुद्रावर तौकती नावाचं चक्रीवादळ तयार झालं असून, आज सकाळी साडे पाचच्या
सुमारास ते ताशी ७० ते ८० किलोमीटरच्या वेगानं घोंगावत लक्षद्वीप बेटांजवळून उत्तरेकडे
निघालं. हे वादळ कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनार्यालगतच्या समुद्रावरून गुजरातच्या
दिशेनं जाणार आहे. आज दुपारपासून १७ तारखेपर्यंत वादळाचा प्रवास महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगतच्या
समुद्रातून होईल. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आज आणि उद्या दक्षिण कोकण आणि दक्षिण
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी अपेक्षित आहेत.
****
भारतानं काल लसीकरण मोहिमेत १८ कोटी मात्रा देण्याचा टप्पा पार केला. देशभरात आतापर्यंत
एकूण १८ कोटी चार लाख ५७ हजार ५७९ मात्रा देण्यात आल्या आहेत.
****
श्रीमंत देशांनी लहान आणि किशोरवयीन मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचं त्यांचं
नियोजन लांबणीवर टाकत, अतिरिक्त लशींचा पुरवठा गरीब देशांना करावा, असं आवाहन, जागतिक
आरोग्य संघटनेचे संचालक, टेड्रोस अदनॉन घेब्रेयेसूस यांनी केलं आहे. जगातल्या सर्वांनाच
लस मिळण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या कोव्हॅक्स सुविधा केंद्राला लशींचा पुरवठा केला
जावा, असंही आवाहन, त्यांनी काल जिनिव्हा इथं झालेल्या बैठकीत केलं.
****
रशियन बनावटीची कोरोना विषाणू संसर्गावरील ‘स्पुटनिक व्ही’ या लसीच्या एका मात्रेची
किंमत नऊशे पंच्याण्णव रुपये चाळीस पैसे इतकी निश्चित करण्यात आली आहे. भारतात मंजुरी
मिळालेली स्पुटनिक व्ही ही तिसरी लस आहे.
****
नांदेड जिल्ह्यात शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १ जूनपूर्वी कापूस
लागवड करू नये, असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे,
खरीप हंगामात इतर राज्यांतून अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी
या अनधिकृत बियाण्याची लागवड करु नये, असं आवाहन नांदेड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी
केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकानं एक जून पर्यंत एक दिवसआड सकाळी नऊ
ते ११ वेळेत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांनुसार वैद्यकीय सेवेसह औषधी दुकानं
वगळता, इतर सर्व आस्थापना आज आणि उद्या दोन दिवस पूर्णतः बंद राहणार आहेत.
****
No comments:
Post a Comment