Monday, 5 June 2023

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र 05 जून 2023 सकाळी 11.00 वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०५ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

जागतिक पर्यावरण दिन आज साजरा होत आहे. पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं १९७३ पासून जगभरात पर्यावरण दिन साजरा केला जातो. “प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण रोखा ही यंदाच्या पर्यावरण दिनाची संकल्पना आहे.

***

ओडीशा रेलवे दुर्घटनेच्या ५१ तासांनंतर बालासोर अपघातस्थळावरून रेल्वे सेवेला पुन्हा सुरूवात झाली आहे. काल मध्यरात्रीपासून कोलकाता आणि चेन्नई दरम्यान रेल्वे मार्ग मोकळा केल्यानंतर बाधित मार्गावर एक मालगाडी धावली. आजपासून बाधित मार्गावरील सर्व गाड्या पूर्वपदावर येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितलं.

दरम्यान, या रेल्वे अपघाताची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग -  सी बी आय मार्फत करावी, अशी मागणी रेल्वे मंत्रालयानं केली आहे. या अपघाताचं मूळ कारण आणि त्याला नेमकं कोण जबाबदार आहे, याबाबतचा तपास सीबीआयनं करावा अशी मागणी रेल्वे मंडळानं केल्याचं रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.

***

मणिपूरमधे गेल्या तीन मे राजी झालेल्या हिंसक घटनांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने त्रिसदस्यीय आयोगाची स्थापना केली आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून सेवानिवृत्त झालले न्यायमूर्ती अजय लांबा आयोगाचे अध्यक्ष आहेत. विशिष्ट समाजाला लक्ष्य बनवणारी दंगल का घडली आणि कशी पसरली याची चौकशी हा आयोग करणार आहे.

***

महामारीचा धोका अजूनही पूर्णपणे टळला असल्याचं खात्रीशीर म्हणता येणार नाही म्हणून आरोग्यासंदर्भात माग काढणारी वन हेल्थ यंत्रणा विकसित आणि दृढ करण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी केलं. हैदराबाद इथं तिसऱ्या जी - 20 आरोग्यविषयक कार्यगटाच्या बैठकीचं काल उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. सरकार २०३० पर्यंत सर्व आरोग्य सेवा आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं, केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यावेळी म्हणाले.

***

दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आजही वादळी वारे आणि वीजांसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भात आज हवामान कोरडं राहील तर उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

//*************//

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...