Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 04 June 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणूक निकालाचे प्रारंभिक कल हाती येत आहेत. एकूण ५४२ पैकी सुमारे तीनशे जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून, २३० जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार तर जवळपास १९ जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर दिसून येत आहेत.
उत्तरप्रदेशात भाजपला ३४ तर समाजवादी पक्षाला ३५ जागांवर सध्या आघाडी आहे. बिहारमध्ये संयुक्त जनता दलाला १४, भाजपला ११ तर लोकजनशक्ती पक्षाला पाच जागांवर आघाडी आहे. तर लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला पाच जागांवर आघाडी आहे.
पंजाबात काँग्रेसला सात तर आम आदमी पक्षाला तीन जागांवर आघाडी आहे. हरियाणात काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी पाच जागांवर आघाडी आहे. झारखंडमध्ये सर्वाधिक ९ जागांवर भाजप आघाडीवर आहे.
मध्यप्रदेशात सर्व २९ जागांवर, गुजरातमध्ये २६ पैकी २५ जागांवर, उत्तराखंडमध्ये सर्व पाच जागांवर तर हिमाचल प्रदेशात सर्व चार जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत.
दक्षिण भारतात कर्नाटकातून मतदारांनी भाजपला कौल दिल्याचं दिसून येतं आहे. कर्नाटकात भाजप १६, काँग्रेस १० तर धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवार दोन जागांवर आघाडीवर आहे.
आंध्र प्रदेशात तेलगूदेशम पक्ष सर्वाधिक १६ जागांवर, तमिळनाडूत द्रविड मुनेत्र कळघम सर्वाधिक २१ जागांवर, केरळमध्ये काँग्रेस सर्वाधिक १२ जागांवर तर तेलंगणात भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी आठ मतदार संघात आघाडीवर आहेत.
गोव्यातल्या दोन जागांपैकी भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत.
****
महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी २० जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर असून, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी २७ जागांवर आघाडी मिळवली आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे संदीपान भुमरे जवळपास ११ हजार मतांनी आघाडीवर आहेत. एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलिल दुसऱ्या, तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या मतदारसंघात नोटा ला एक हजार ५९५ मतं मिळाली आहेत.
बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या पंकजा मुंडे आघाडीवर आहेत. जालना मधून महाविकास आघाडीचे कल्याण काळे, हिंगोलीतून महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर, परभणी मधून महाविकास आघाडीचे संजय जाधव, लातूर मधून महाविकास आघाडीचे शिवाजी काळगे, उस्मानाबाद मधून महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजे निंबाळकर, तर नांदेड मधून महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण आघाडीवर आहेत.
नंदुरबार मधून महाविकास आघाडीचे गोवाल पाडवी, धुळे इथून महायुतीचे सुभाष भामरे, जळगाव मधून महायुतीच्या स्मिता वाघ, रावेर मधून महायुतीच्या रक्षा खडसे आघाडीवर आहेत.
बुलडाणा मधून महायुतीचे प्रतापराव जाधव, रामटेक मध्ये महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे, नागपूर मधून महायुतीचे नितीन गडकरी, यवतमाळ मधून महायुतीचे संजय देशमुख, भंडारा-गोंदिया मधून महाविकास आघाडीचे प्रशांत पडोळे, वर्धा इथून महाविकास आघाडीचे अमर काळे, अमरावती मधून महायुतीच्या नवनीत राणा, अकोला मधून महाविकास आघाडीचे अभय पाटील, गडचिरोली - चिमुर मधून महाविकास आघाडीचे नामदेव किरसान, तर चंद्रपूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर असून, भाजपचे सुधीर मुनगंटीवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
दिंडोरी मधून महाविकास आघाडीचे भास्कर भगरे आघाडीवर असून, भाजप नेत्या केंद्रीय मंत्री भारती पवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. नाशिक मधून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, पालघर मधून महायुतीचे हेमंत सावरा, भिवंडी मधून महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे, कल्याण मधून महायुतीचे श्रीकांत शिंदे, तर ठाणे मतदारसंघातून महायुतीचे नरेश म्हस्के आघाडीवर आहेत.
रायगड मधून महायुतीचे सुनिल तटकरे, मावळमधून महायुतीचे श्रीरंग बारणे, पुण्यातून महायुतीचे मुरलीधर मोहोळ, बारामती मधून महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे, शिरुर मधून महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे, अहमदनगर मधून महायुतीचे सुजय विखे पाटील, तर शिर्डी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर आहेत.
सोलापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे, माढ्यातून महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते, सांगली मधून अपक्ष उमेदवार विशाल पाटील, सातारा महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे, कोल्हापूर मधून शाहू महाराज छत्रपती, हातकणंगले मधून महाविकास आघाडीचे सत्यजीत पाटील, तर रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीचे नारायण राणे आघाडीवर आहेत.
उत्तर मुंबईतून महायुतीचे पियुष गोयल, उत्तर मध्य मुंबईतून महायुतीचे उज्ज्वल निकम, ईशान्य मुंबईतून महायुतीचे संजय दिना पाटील, वायव्य मुंबईतून महाविकास आघाडीचे अमोल किर्तीकर, दक्षिण मुंबईतून महाविकास आघाडीचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून महाविकास आघाडीचे अनिल देसाई आघाडीवर आहेत.
****
No comments:
Post a Comment