Friday, 7 June 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर संक्षिप्त बातमीपत्र ०७ जून २०२४ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

०७ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

भारतीय रिझर्व्ह बॅंकेनं रेपो दर सहा पूर्णांक पाच टक्के इतका कायम ठेवला आहे. मुंबईत बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.

****

केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडी - एनडीएचं सरकार स्थापन करण्यासंदर्भात राजकीत हालचालींना वेग आला आहे. नवी दिल्लीत आज एनडीएच्या संसदीय मंडळाची बैठक होणार आहे. भाजपसह आघाडीतले तेलगु देसम पक्ष, संयुक्त जनता दल, शिवसेना, धर्मनिरपेक्ष जनता दल, आदी घटक पक्षांचे नेते तसंच नवनिर्वाचित खासदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

****

नव्या रालोआ मंत्रिमंडळात सहभागी होताना संयुक्त जनता दलाने मंत्रिपदासाठी कोणतीही अट घातली नसून, बिहारला विशेष दर्जा द्यावा, ही आपली मागणी असल्याचं संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते के.सी.त्यागी यांनी काल आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.

****

डिशा विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी भाजप विविध नेत्यांच्या नावांचा विचार करत आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी ओडिशातल्या सर्व २० नवनिर्वाचित खासदारांना आज दिल्लीला बोलावलं आहे.

****

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते काल राज्यातल्या ११५ पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना २०२१ च्या स्वातंत्र्य दिनी तसंच २०२२ च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली पोलीस पदकं समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. यामध्ये ३० पोलीस अधिकारी आणि जवानांना पोलीस शौर्य पदक, सात पोलीस अधिकारी आणि जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक, तर ७८ पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना  गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकं प्रदान करण्यात आली.

****

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एब्डेन उपांत्य फेरीत पराभूत झाले. काल झालेल्या सामन्यात त्यांना इटालियन जोडीनं सात - पाच, दोन - सहा, सहा - दोन असा पराभव केला.

****

गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शी तालुक्यात काल वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून दोन जणांचा मृत्यू, तर दोनजण जखमी झाले. जखमींवर गडचिरोली इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...