Thursday, 6 June 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 06.06.2024, रोजीचे सकाळी:11.00,वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

०६ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

कथित मद्यधोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सात दिवसांचा अंतरिम जामीन अर्ज दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयानं काल फेटाळून लावला. यावेळी केजरीवाल यांच्या वकिलाने त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. त्यावर न्यायालयाने तिहार तुरुंग प्रशासनाला केजरीवाल यांच्या आरोग्यासंबंधी आवश्यक चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत.

****

महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षांनी राजकीय वातावरण गढूळ केल्यामुळेच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील मतदारांनी कौल दिल्याची प्रतिक्रिया लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी काल व्यक्त केली. लातूरचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या सत्कार प्रसंगी लातूर इथं ते बोलत होते. हा कौल महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीची राजकीय दिशा ठरविणारा असेल असा विश्वासही आमदार देशमुख यांनी व्यक्त केला.

****

महिला आणि बाल विकास विभागांतर्गत बाल धोरणाचा प्रारुप मसुदा तयार करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती तसंच शासनाचे अधिकारी यांचा समावेश असलेल्या गठित समितीने महाराष्ट्र राज्य बाल धोरण  कृती आराखडा २०२२ चा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा womenchild.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मसुद्यासांदर्भात येत्या ३० तारखेपर्यंत हरकती पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पुण्यातल्या महिला आणि बाल विकास आयुक्तालयाच्या कार्यालयात किंवा childpolicy@gmail.com या ईमेलवर नागरीकांना हरकती पाठवता येणार आहेत.

****

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त हिंगोली शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा परिसरात आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

****

नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढच्या वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल असून, येत्या दोन ते तीन दिवसांत तो दक्षिण महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...