Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 1 July 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ जुलै २०१८ सायंकाळी ६.००
Date - 1 July 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ जुलै २०१८ सायंकाळी ६.००
****
वस्तू
आणि सेवा कर प्रणाली लागू करून भारतानं करप्रणालीतला फार मोठा बदल सुरळीतपणे पार पाडला
असून, या करप्रणालीचा सर्वात चांगला परिणाम अजून दिसून यायचा आहे, असं केंद्रीय मंत्री
अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. जीएसटी वर्षपूर्तीच्या एका कार्यक्रमाला दूरदृष्यप्रणालीद्वारे
संबोधित करताना ते आज बोलत होते. या करप्रणालीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर दीर्घकालिक
अनुकूल परिणाम होतील, असा विश्वास जेटली यांनी व्यक्त केला.
****
जीएसटी
लागू केल्यानंतर करवसुली मोठ्या प्रमाणात झाली असल्याचं मत औरंगाबाद विभागाचे केंद्रीय
वस्तू आणि सेवा कर सहआयुक्त अशोक कुमार यांनी व्यक्त केलं आहे. ते आज औरंगाबाद इथं
वस्तू आणि सेवा कर वर्षपूर्ती कार्यक्रमात बोलत होते.
****
उत्तराखंडमधील
पौडी जिल्ह्यात बस दरीत कोसळून झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या सत्तेचाळीस तर
जखमींची संख्या अकरा झाली आहे. रामनगरला जाणारी ही खासगी बस ग्वीन गावाजवळ २०० मीटर
खोल दरीत कोसळली. अपघाताचं निश्चित कारण कळलं नसलं तरी बस क्षमतेपेक्षा अधिक भरलेली
होती असं पोलिसांनी म्हटलं आहे.
****
दिल्ली
आणि उत्तर भारताच्या काही भागात आज दुपारी साडेतीनच्या सुमाराला भूकंपाचा धक्का जाणवला.
रिश्टर स्केलवर या धक्क्याची तीव्रता चार इतकी नोंदली गेली. यामुळे जीवित किंवा वित्तहानी
झाली नसल्याचं, तसंच काही सेकंद सुरू राहिलेल्या या भूकंपाचं केंद्र हरियाणाच्या सोनिपत
जिल्ह्यात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद
इथल्या विश्व संवाद “केंद्राचा देवर्षी नारद पुरस्कार” आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचे
वृत्तविभाग प्रमुख रमेश जायभाये यांना आज प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार मनोहर
कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह
आणि पाच हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुरस्काराची रक्कम जायभाये यांनी
विविध उपक्रमांसाठी विश्व संवाद केंद्राच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द केली.
यावेळी,
युवा पत्रकार पुरस्कार मनोज कुलकर्णी यांना, ग्रामीण पत्रकार पुरस्कार वेस्ता पाडवी
यांना, महिला पत्रकार पुरस्कार पूनम मिश्रा यांना तर पत्रलेखनासाठीचा पुरस्कार संगीता
जोशी यांना प्रदान करण्यात आला.
आकाशवाणी
औरंगाबाद केंद्राचे यापूर्वीचे वृत्तविभाग प्रमुख वसंतराव देशपांडे, पुरुषोत्तम कोर्डे,
संजय आर्वीकर यांच्यासह आकाशवाणीचे लातूर प्रतिनिधी अरुण समुद्रे यांना या पुरस्कारानं
याआधी गौरवण्यात आलेलं आहे.
****
राज्य
शासनाच्या तेरा कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्याला चव्वेचाळीस लाख चव्वेचाळीस
हजार झाडं लावण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं असून, हे पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातल्या
विविध संघटना, संस्था आणि नागरिकांनी यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असं आवाहन विधानसभा
अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे. फुलंब्री तालुक्यात या योजनेचा शुभारंभ त्यांच्या
हस्ते आज झाला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात परभणी, जालना, उस्मानाबाद, लातूर, यवतमाळ,
जळगावसह सर्व जिल्ह्यांमध्ये या योजनेचा शुभारंभ झाला असल्याचं आमच्या वार्ताहरांनी
कळवलं आहे.
****
महाराष्ट्राचे
माजी मुख्यमंत्री आणि राज्यातल्या हरित धवल क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या
जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण
करून अभिवादन केलं. यावेळी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यासह
अन्य मान्यवर उपस्थित होते.
****
मुलं
पळवण्याच्या संशयावरून धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या राईनपाड्याच्या ग्रामस्थांच्या
जमावानं पाच जणांना मारहाण करून त्यांची हत्या केल्याचं वृत्त आहे. सातारा आणि सांगलीचे
सातजण बाजारासाठी आज राईनपाड्यात आलेले असताना ही घटना घडली. नाशिक विभागाचे विशेष
पोलिस महानिरीक्षक घटनास्थळी रवाना झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment