Friday, 3 September 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.09.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 ०३ सप्टेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत आज उंच उडी प्रकारामध्ये भारताच्या प्रवीण कुमारनं रौप्य पदक जिंकलं. पुरुष उंच उडी टी ६४ प्रकारामध्ये प्रवीणने ही कामगिरी केली. या स्पर्धेमधलं भारताचं हे ११ वं पदक आहे.

****

कोरोना संकटामुळे भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांचा व्हिसा कालावधी ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. याआधी ही सुविधा ३१ ऑगस्टपर्यंत होती. या वर्षी मार्च महिन्यात विविध प्रकारचे व्हिसा घेऊन भारतात आलेले नागरिक कोविड परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवरील निर्बंधांमुळे भारतात अडकून पडल्याचं, गृह मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रिटन, युरोप, मध्यपूर्वेतले देश, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांग्लादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड आणि झिंबाब्वे या देशांमधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची उद्यापासून विमानतळावरच आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. यासोबतच इतर देशांमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांना १४ दिवस विलगीकरणात राहणं बंधनकारक असणार आहे. यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेनं आदेश जारी केले आहे.

****

पत्रकारांच्या कल्याणासाठी दिशानिर्देशांची निश्चिती करण्यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसारभारतीचे सदस्य अशोक कुमार टंडन यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. विविध वृत्तपत्र आणि वाहिन्यांचे सदस्य या समितीचे सभासद असतील. दोन महिन्यांत समिती आपला अहवाल सदर मंत्रालयाला सादर करणार आहे.

****

अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी सर्वसाधारण कार्यपद्धती निश्चित करण्यास ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंजुरी दिली आहे. असे प्रकल्प राबवू इच्छिणाऱ्या कंपन्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची आणि त्यांच्या अर्जावर कालबद्ध प्रक्रिया करण्याची यंत्रणा तात्काळ उभारण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

****

‘ग्राहकाची ओळख’ अर्थात केवायसी संदर्भातल्या नियमांच्या तरतुदींचं उल्लंघन केल्याबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेनं अॅक्सीस बँकेला, पंचवीस लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 13 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...