Monday, 18 October 2021

TEXT: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 18.10.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 १८ ऑक्टोबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

नौदलाच्या भविष्यातील योजना, कार्यकारी, रसद आणि भौतिक सज्जता अशा विविध विषयांवरची नौदल अधिकर्यांची द्विवार्षिक बैठक आज सुरू होणार आहे. पाच दिवसांच्या या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत आणि नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह, आणि हवाई दल प्रमुख हे नौदल अधिकार्यांकशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कोविड संकटकाळातही नौदलानं लढाऊ सज्ज, विश्वासार्ह आणि एकसंध शक्ती बनण्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं असून, त्या दिशेनं नौदलाची अंमलबजावणी सुरू आहे. लष्करी-सामरिक पातळीवरच्या महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

****

भारतानं १९७१ च्या युद्धात पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी पुण्यात दाखल झालेल्या स्वर्णिम विजय मशालीचं स्वागत, काल राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये करण्यात आलं. प्रबोधिनीचे प्रमुख लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री यांनी या मशालीचं स्वागत केलं. कॅडेट्सनी मशालीसह आठ किलोमीटरची फेरी प्रबोधिनीमध्ये काढली. सुपर डीमोना विमानांनी मशालीला हवाई सलामी दिली. त्याआधी खडकवासला जलाशयात नावेतून फेरी काढण्यात आली.

****

दिवाळीच्या त राज्य सरकारने राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक देणी लवकर द्यावीत अन्यथा आक्रमक होऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा, एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला आहे. कोविड काळात ३०६ एस.टी.कर्मचारी मृत्युमुखी पडले असल्याचं, ते म्हणाले.

****

नांदेड जिल्ह्यातले भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी काल पक्षाचा राजीनामा देत काँग्रेस पक्षात प्रवेशाची घोषणा केली. खतगावकर हे तीन वेळा आमदार, तीन वेळा खासदार आणि राज्य सरकारमध्ये मंत्री देखील राहिले आहेत. खतगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या घोषणेचं नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वागत केलं.

****

वाशिम जिल्ह्यात वरोली तालुक्यातल्या मानोरा इथं एक शेतकरी अरुणावती नदीच्या पुरात वाहून गेला. सुनिल नाटकर असं या शेतकर्याचं नाव असून, तो गुरांसाठी चारा आणायला जात असताना ही घटना घडली.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 May 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्र...