Sunday, 4 June 2023

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ०४ जून २०२३ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०४ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

जी ट्वेंटी आरोग्य कार्यगटाची तिसरी बैठक आजपासून हैदराबाद इथं सुरु होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत आरोग्य आपत्कालीन व्यवस्थापन, तयारी आणि प्रतिसाद, अल्प दरातील उपचार पद्धती आणि उपलब्धता तसंच डिजीटल आरोग्य याबाबत चर्चा केली जाणार आहे.

****

केंद्र सरकारनं आरोग्यासाठी घातक असलेल्या १४ औषधांवर बंदी घातली आहे. भारतीय औषध नियामक मंडळानं काल याबाबतचा निर्णय जारी केला. एका गोळीत एकापेक्षा जास्त गोळ्यांची क्षमता असलेल्या अशा औषधांच्या मात्रेचा संबंधित रोगांवर परिणाम कमी आणि धोकाच जास्त आढळून आल्यानं, त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

****

भंडाऱ्याचे माजी आमदार आणि भाजप नेते विधीज्ञ रामचंद्र अवसरे यांचं काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं, ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी पवनी इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. २०१४ ते २०१९ या कालावधीत त्यांनी भंडारा विधानसभा क्षेत्राचं लोकप्रतिनिधीत्व केलं होतं.
                                ****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं संत एकनाथ मंदिर आणि गोदावरी घाटांव स्वच्छता मोहिमेला पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते आज सकाळी प्रारंभ झाला. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत औरंगाबाद इथल्या जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं ही मोहीम राबवण्यात येत आहे.
                                ****
नांदेड शहरात मध्यरात्री मान्सूनपूर्व पाऊस झाला. ढगांच्या गडगडाटासह पावसाची सुरुवात झाली. त्यानंतर बराचवेळ पावसाची रिमझीम सुरू होती, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.  
                                 ****

मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आज गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

****

भारतीय कुस्तीपटूंनी शनिवारी बिश्केक इथं झालेल्या संयुक्त जागतिक मानांकन मालिका स्पर्धेत तीन पदकं जिंकली.
                                                            //*************//

No comments: