आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
संक्षिप्त
बातमीपत्र
२४ डिसेंबर २०२३ सकाळी ११.००
वाजता
****
छत्रपती संभाजीनगर
इथं काल दिवसभरात १२२ जणांची तर गेल्या आठवडाभरात ३३९ संशयित रुग्णांची कोविड चाचणी
करण्यात आल्याचं महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी
सांगितलं आहे.
गेल्या दोन दिवसात शहरात एकूण तिघांना कोविडची लागण झाली आहे.
त्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं कोविड
चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून दिली असून,
संभाव्य रुग्णांवर उपचारासाठीची यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
****
हिवाळी अधिवेशना दरम्यान लातूर जिल्ह्यातल्या औसा मतदारसंघासह जिल्ह्यातील
विकासकामांसाठी १ हजार १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार
अभिमन्यू पवार यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. निधीच्या विनियोगातून
औसा मतदारसंघातील ५० पेक्षा अधिक खेड्यांचा कायापालट, लातूर
शहरातील महात्मा बसवेश्वर चौक ते किल्लारी राष्ट्रीय महामार्गाचं विस्तारीकरण,
महावितरणची कामं, आदी विकास कामं करण्यात
येणार आहेत.
****
अकोला जिल्ह्यात आजपासून येत्या २९ तारखेपर्यंत ६७ वी राष्ट्रीय मुष्टीयुद्ध
स्पर्धा आयोजित करण्यात
आली आहे. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये १४, १७ आणि १९ या वयोगटामध्ये सामने होणार आहेत. स्पर्धेत
हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश,
मध्यप्रदेश, ओडिसा, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र
आदी राज्यातले विविध एकूण ३४ संघ सहभागी झाले असून एकूण १ हजार ८०० खेळाडूंमध्ये सामने
रंगणार आहेत.
****
यवतमाळ इथं जिल्हा
कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करिअर सेंटर आणि
अमोलकचंद विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं काल पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार
मेळावा घेण्यात आला.
या मेळाव्यात ३५१ उमेदवारांची मुलाखतीद्वारे विविध कंपन्यांत प्राथमिक
निवड करण्यात आली.
****
शहीद वीर जवान
अनिल कळसे यांच्या पार्थिव देहावर सातारा
जिल्ह्यात कराड तालुक्यातील रेठरे खुर्द इथं शासकीय इतमामात काल अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहीद अनिल कळसे
भारतीय सेनेतील बॉम्बे इंजिनिअर चमूतल्या २६७ इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. मणिपूर
मध्ये कर्तव्यावर असताना २१ डिसेंबर रोजी त्यांना वीरमरण आलं.
****
No comments:
Post a Comment