Wednesday, 3 January 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर संक्षिप्त बातमीपत्र ०३ जानेवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

०३ जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज १९३ वी जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी केली जात आहे. या निमित्तानं आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सावित्रीबाई फुले यांचं यांचं जन्मगाव असलेल्या सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यातल्या नायगाव इथं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टीच्या नुतनीकरण कामांचं लोकार्पण मुख्यमंत्र्याच्या हस्ते यावेळी होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वहिली आहे. सावित्रीबाईंचं देशाप्रती योगदान अमूल्य असल्याचं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लक्षद्वीपमधल्या कावरत्ती बेटावर विविध योजनांचं लोकार्पण आणि विकास प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. यामध्ये पाण्याखालील ऑप्टिकल फायबर केबल प्रकल्प, नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा प्रकल्प आणि बॅटरीवर आधारित सौर ऊर्जा प्रकल्प यांचा समावेश आहे.

****

शासनानं शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या टास्क फोर्सचं लवकरच पुनर्गठन करण्यात येणार असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विविध संत-महात्म्यांनी राज्यात समाज प्रबोधनाचं काम करावं, असं आवाहन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते काल ठाणे इथं एका कार्यक्रमात बोलत होते.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला केंद्र आणि राज्य शासनामार्फत आरोग्य सुविधांसाठी १७६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असून, याचा लाभ नागरिकांना द्यावा, असे निर्देश केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले आहेत. त्या काल छत्रपती संभाजीनगर इथं आढावा बैठकीत बोलत होत्या.

****

उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या मध्य भागांमध्ये काल संध्याकाळापसून दाट धुकं पडलं आहे, त्यामुळे या भागात दृश्यमानता कमी झाली आहे. या महिन्यात देशाच्या मध्य भागासह उत्तर भारतात अणखी काही दिवस थंडीची लाट कायम असेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 13 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 13 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...