Monday, 27 February 2017


आकाशवाणीऔरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२७ फेब्रुवारी २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

      विख्यात साहित्यिक कुसुमाग्रज - वि. वा. शिरवाडकर यांची जयंती  आज मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मराठीला तीचं वैभव, प्रतिष्ठा आणि हक्क प्राप्त करुन देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. डिजिटल माध्यमातून मराठी भाषेचा साहित्य व्यवहार विस्तारला जावा, तरच खऱ्या अर्थानं तीला जागतिक भाषा म्हणून गौरव प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

      मुंबई इथं आज यानिमित्त राज्य वाड्मय पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

      यानिमित्त आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीनं मराठी साहित्य आणि संस्कृती समृद्ध करण्यात योगदान देणाऱ्या साहित्य, संगीत, चित्र, नाट्य आणि लोककला क्षेत्रांतील दहा व्यक्तिमत्वाचा सन्मानचिन्ह आणि ग्रंथ देउन गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पद्मश्री डॉ. यू.म.पठाण प्रमुख पाहुणे, तर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे अध्यक्षस्थानी  म्हणून उपस्थित राहणार आहेत.

****

बीड जिल्ह्यातल्या परळी इथं आज चौथं जिल्हा शिक्षक साहित्य संमेलन होत आहे. ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक नागनाथ बडे हे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील तर संमेलनाचं उद्घाटन युवा साहित्यिक प्राध्यापक वीरा राठोड करतील. सकाळी ग्रंथ दिंडीनं सुरु होणाऱ्या या साहित्य संमेलनात शिक्षक गौरव पुरस्कारांचं वितरण, साहित्य तसंच शिक्षण क्षेत्रातल्या तज्ञांशी परिसंवाद, कथाकथन आदी कार्यक्रम होणार आहेत.

****

देशातल्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी तरुणांनी पुढे येण्याची गरज असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलं आहे. ते बीड जिल्ह्यातल्या तेलगाव इथं एका कार्यक्रमात बोलत होते. शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली असून, समाजातून सेवाभाव संपला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

****

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातलं मतदान आज होत आहे. १२ जिल्ह्यातल्या ५१ मतदारसंघांसाठी हे मतदान होत असून, ४० महिलांसह ६०७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

//****//


Regional Urdu Text Bulletin, Aurangabad
Date- 27 February 2017
Time 8.40am to 8.45am
آکاشوانی اورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۲۷؍فروری  ۲۰۱۷؁ء
وقت : صبح  ۴۰-۸ سے  ۴۵-۸
 حکو مت نے اعلان کیا ہے کہ ریاست کے کاشتکا روں کی توّر مکمل طور پر خریدی جائیگی، کاشتکا روں کے پاس کی توّر ختم ہونے تک کوئی بھی خریدی مرکز بند نہیں کیا جائیگا ۔ اور 15؍ مارچ کے بعد بھی یہ مراکز کھُلے رہیں گے۔ توّر کی پیدا وار میں اِضا فے اور اِسے ذخیرہ کرنے کے لیے جگہ اور ساز و سا مان نا کا فی ہونے کے با عث فی الحال توّر نہیں خریدی جا رہی ہے۔ اِس خصوص میں کاشتکا روں کی شکا یات کے پیش ِ نظر حکو مت کی جانب سے یہ اعلان کیا گیا۔ وزیر ِ تجا رت سُبھاش دیشمُکھ نے کہا ہے کہ مرکزی حکو مت کی جانب سے اِس خرید کے لیے 15؍ مارچ تک کی مُدت طئے کی گئی ہے تاہم اِس مُدت میں توسیع کا مرکز سے مطالبہ کیا جائے گا۔
 دریں اثناء کسا نوں کی توّر خریدنے کے لیے حکو مت کے ما تحت مختلف اِداروں ،کمیٹیوں اور خانگی گو دا م کِرائے پر حاصل کرنے کے احکا مات بھی وزیر ِ موصوف نے جا ری کیئے۔
****************************
 وزیر اعظم نریندر مودی نے کہا ہے کہ عوام کے مفا دات کے لیے ٹیکنا لو جی کے اِستعمال کی غرض سے ملک کو بڑی تعداد میں سائنسدا نوں کی ضرورت ہے۔ کل آکاشوانی پر من کی بات سلسلے کے29؍ ویں پرو گرام سے خطاب کرتے ہوئے اُنھوں نے کہا کہ جب عوامی ضروریات کو ذہن میں رکھتے ہوئے سائنس کا اِستعمال کیا جا تا ہے تو یہ سب سے قیمتی چیز بن جا تی ہے۔
 وزیر اعظم نے کہا کہ صارفین اِسکیم اور ڈیجی دھن پاور یو جنا کو عوام میں زبر دست پذیرائی مِلی ہے اور اِس سلسلے میں ہزا روں تاجِروں اور لاکھوں شہر یوں کو حکو مت کی جانب سے اِنعا مات دیئے جا چُکے ہیں۔
 اُنھوں نے نو جوانوں کو تر غیب دی کہ آئندہ 14؍ اپریل کو بھارت رتن ڈاکٹر با با صاحب امبیڈکر کے یومِ پیدائش پر کم از کم 125؍ لوگوں کو بھیم ایپ سے روشناس کرائیں۔ اناج کے ریکارڈ پیدا وار پر خوشی کا اظہار کر تے ہوئے وزیر اعظم نے اِسے کسا نوں کی محنت کا پھل قرار دیا۔ پینے کے پانی اور صفائی سے متعلق پروگراموں کی بھی اُنھوں نے تفصیلات پیش کیں۔ آئندہ 8؍ مار چ کو ہونے والے بین الاقوا می یوم خواتین کا تذکرہ کر تے ہوئے خواتین کی بہبود کے لیے مختلف ریاستوں میں چلائے جا رہے مختلف پروگراموں کا بھی اُنھوں نے جائزہ لیا۔
****************************
 انتخا بی کمیشن نے سیا سی جما عتوں کو تلقین کی ہے کہ انتخا بی تشہیر کے دوران سیاسی جماعتیں خود پر چند پا بندیوں کا احترام کریں۔
 انتخا بات کو مذہبی رنگ دینے کی کوشش میں چند سیا سی رہنما مذہبی مسائل کو اُٹھا تے ہیں اور تشہیر کے دوران متنا زعہ بیا نات دیتے ہیں۔ اِس طرح کے بیا نات ہم آہنگی کی فضا بر قرار رکھنے میں ما نع ہوتے ہیں۔ جو کہ ایک تشویشناک امر ہے ۔ حال ہی میں اپنے ایک فیصلے میں عدالت عظمیٰ نے ذات، مذہب اور قبیلے کی بنیاد پر ووٹ مانگنے پر پا بندی عائد کر رکھی ہے۔
****************************
 سوالنا مہ قبل از وقت افشاء ہونے کے سبب کل ملک بھر کے مختلف مراکز پر ہونے والے فو جی بھر تی کے امتحا نات ملتوی کر دیئے گئے ۔
 اب یہ امتحا نات ایک ماہ بعد لیے جائیں گے۔ یہ اطلاع مملکتی وزیر دِفاع سُبھاش بھامرے نے کل تھا نہ میں دی۔ اِس ضمن میں تھا نہ پولس کی جانب سے گرفتار کیئے گئے فو جی اہلکا روں سمیت 18؍ ملزمین کو کل عدالت نے 3؍ دن تک پولس کسٹڈی میں رکھنے کا حکم دیا ۔ وزیر موصوف نے بتا یا کہ امتحان دینے والے ساڑھے تین سو امید واروں کو بھی پولس نے حراست میں لے لیا ہے۔
 تھانہ کے پولس کمشنر کی زیر قیا دت ناگپور، ناسک ،پو نا اور گوا میں بھی اِس سلسلے میں کار وائی کی گئی۔ فو ج میں بھر تی کے لیے ہونے والی ایک تر بیتی کلاس میں 2؍ لاکھ روپئے کے عوض امتحا نات کا سوالیہ پر چہ ظاہر کیے جانے کی خبر ہے۔
****************************
 عوامی شعبے کی تمام بڑی بینکوں کے ملازمین کل ہڑتال پر جائینگے۔ بینکِنگ شعبے کے بڑھتے ہوئے قرضوں کے لیے اعلیٰ افسران کو ذِمہ ار قرار دیئے جانے اور دیگرمطالبات کو منوا نے کے لیے یہ ہڑتال کی جا رہی ہے۔ تا ہم خانگی بینک ہڑتال میں شامل نہیں ہوں گے۔ بینک ملازمین کی تنظیم اور بینک انتظا میہ کے درمیان گذشتہ ہفتے ہوئی گُفت و شنید نا کام ہوجا نے کی اطلاع ملازمین تنظیم کے سیکریٹری سی ۔ایچ۔ وینکٹ چلم نے کل نئی دہلی میں PTI کو دی۔
****************************
 ریاست میں ضلع پریشدوں میں اقتدار حاصل کرنے کے لیے کانگریس کے ساتھ اتحاد کے لیے این سی پی تیار ہے۔
 یہ اعلان راشٹر وادی کانگریس سر براہ شرد پوار نے کل ناندیڑ میں صحا فیوں کے ساتھ گفتگو کر تے ہوئے کیا۔ اُنھوں نے کہا کہ اگر کانگریس اور راشٹر وادی کانگریس کا با ہمی اتحاد ہو جا تا ہے تو یہ اتحاد19؍ ضلع پریشدوں میں اقتدار پر قبضہ کر سکتا  ہے۔ ایک سوال کے جواب میں اُنھوں نے کہا کہ ممبئی میونسپل کار پو ریشن میں اقتدار کے لیے شیو سینا کی حما یت سے متعلق فیصلہ بہت جلد کیا جائے گا۔تاہم اُنھوں نے واضح طور پر کہا کہ راشٹر وادی کانگریس بی جے پی کی حما یت نہیں کریگی۔
 دریں اثناء ناندیڑ کی سوامی راما نند تیرتھ مراٹھواڑہ یو نیور سٹی نے شرد پوار کو اعزازی   DLitt  ڈگری دی ہے۔
****************************
 

Regional Urdu Bulletin of 27.02.2017 Time:8.40-8.45 AM


27.02.2017_6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 February 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ फेब्रुवारी २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      शेतकऱ्यांकडची सर्व तूर खरेदी करण्याची राज्य सरकारची घोषणा

·      प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे सैन्य भरतीसाठी होणारी लेखी परीक्षा रद्द

·      राज्यात जिल्हा परीषदांमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस सोबत आघाडी करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस अनुकूल - शरद पवार

आणि

·      मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आज राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन

****

राज्यातल्या शेतकऱ्यांकडच्या सर्व तुरीची खरेदी केली जाणार असल्याचं काल राज्य सरकारनं जाहीर केलं. ही तूर खरेदी करेपर्यंत कोणतेही केंद्र बंद केले जाणार नसून १५ मार्चनंतरदेखील खरेदी केंद्र सुरूच राहणार आहेत. तूर उत्पादनात झालेली वाढ आणि खरेदीसाठी आवश्यक बारदान्यासह तिच्या साठवणुकीसाठी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे राज्यातल्या खरेदी केंद्रांमध्ये तूर खरेदी केली जात नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सरकारच्यावतीनं सांगण्यात आलं. केंद्र सरकारनं तूर खरेदीसाठी १५ मार्चपर्यंत मुदत दिली असून तिला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली असल्याचं पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं.

दरम्यान, तूर साठवणुकीसाठी राज्यातले शासनाच्या नियंत्रणाखालची विविध महामंडळं, समित्यां तसंच खासगी गोदामं भाड्याने घेण्याचे निर्देशही पणनमंत्री देशमुख यांनी दिले आहेत.

****

तंत्रज्ञान हे सामान्य माणसाच्या उपयोगाचं बनवण्यासाठी देशाला मोठ्या प्रमाणावर शास्त्रज्ञांची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या २९ व्या भागात  जनतेशी संवाद साधताना काल ते बोलत होते. यासाठी युवकांनी विज्ञानाची कास धरावी असं ते म्हणाले. डिजीधन योजनेअंतर्गत रोखविरहीत व्यवहार करण्याला मोठा प्रतिसाद मिळत असून हजारो व्यापारी आणि लाखो नागरिकांना सरकारकडून बक्षीसं मिळाली असल्याचं त्यांनी नमूद केलं. येत्या १४ एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी किमान १२५ जणांना भिम हे ॲप अंकेक्षित व्यवहारांसाठी वापरण्यास शिकवावं, असं आवाहन त्यांनी केलं.

यंदा देशात विक्रमी धान्य उत्पादन झालं असून, ते आपल्या शेतकरी बांधवांच्या कष्टाचं फळ असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.

पेयजल आणि स्वच्छता योजना, स्वच्छता पंधरवडा आदी उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. येत्या आठ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या अनुषंगानं देशात महिलांप्रती संवेदनशीलता आणि जागरुकता वाढावी असं आवाहन त्यांनी केलं. महिला सक्षमीकरणासाठी विविध राज्यांमध्ये राबवल्या जाणाऱ्या योजना आणि उपक्रमांचा आढावा त्यांनी घेतला. महिलांनी सर्व क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला असून त्यांना सर्व बाबतीत समान हक्क असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.

****

निवडणुकीचा प्रचार करताना राजकीय पक्षांनी स्वत:वर काही बंधनं घालावीत, अशी सूचना निवडणूक आयोगानं केली आहे. निवडणुकीला धार्मिक रंग देण्याच्या उद्देशानं काही नेते याप्रकारचे मुद्दे अधोरेखित करतात आणि त्यामुळे प्रक्षोभक विधानं केली जातात, अशा प्रकारची भाषणं निकोप वातावरणासाठी बाधक असून, हा गंभीर मुद्दा असल्याचं आयोगानं नमूद केलं आहे. अलिकडेच दिलेल्या एका निकालात सर्वोच्च न्यायालयानं जात, धर्म आणि वंश या मुद्यांवर मत मागण्यास बंदी घातली आहे. 

****

प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे सैन्य भरतीसाठी काल देशभरातल्या विविध केंद्रावर होणारी लेखी परीक्षा रद्द करण्यात आली. आता ही परीक्षा एक महिन्यानंतर घेतली जाणार आहे,  असं संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी काल ठाणे इथं सांगितलं. याप्रकरणी, काल ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्या लष्कराशी संबंधीत कर्मचाऱ्यांसह एकूण अठरा जणांना न्यायालयानं तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहितीही भामरे यांनी दिली. पोलिसांनी संबंधित साडेतीनशे परीक्षार्थींनाही ताब्यात घेतलं आहे. ठाण्याचे पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली नागपूरसह, नाशिक, पुणे आणि गोव्यात याबाबत कारवाई करण्यात आली. संबंधीत परीक्षेसाठी घेतल्या जाणाऱ्या एका शिकवणी वर्गात दोन लाख रुपयांच्या मोबदल्यात या परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचं वृत्त आहे.

****

सार्वजनिक क्षेत्रातल्या प्रमुख बँकांचे कर्मचारी उद्या संपावर जाण्याची शक्यता आहे. बँकिंग क्षेत्रातल्या वाढत्या थकीत कर्जांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याच्या मुद्यासह अन्य मागण्यांसाठी हा संप होणार आहे. खाजगी बँकांचा मात्र या संपात सहभाग नसेल. बँक कर्मचारी संघटना आणि बँक व्यवस्थापन संघटनेदरम्यान गेल्या आठवड्यात झालेली चर्चा निष्फळ ठरल्याचं बँक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सी. एच. वेंकटचलम यांनी काल नवी दिल्ली इथं पीटीआयला सांगितलं.

****

औषधांमध्ये असणाऱ्या घटक द्रव्यांचं उत्पादन वाढवण्यावर सरकारनं भर दिला पाहिजे असं एका राष्ट्रीय संस्थेनं म्हटलं आहे. जैविक घटकांचा अभ्यास करणाऱ्या या संस्थेनं केलेल्या सर्वात मोठ्या औषध गुणवत्ता सर्वेक्षणात ही बाब नमूद करण्यात आली. सर्वेक्षण केलेल्या औषधांपैकी ९० टक्के औषधं चीनी बनावटीची असल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत या संस्थेनं कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी तसंच औषध नियामक विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी एक प्रशिक्षण संस्था सुरु करण्याची शिफारस केली आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

राज्यात जिल्हा परीषदांमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस सोबत आघाडी करण्यास आपण अनुकूल असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल नांदेड इथं वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. या दोन पक्षात आघाडी झाली तर राज्यातल्या १९ जिल्हा परिषदांमध्ये सत्ता येऊ शकते असं पवार यावेळी म्हणाले.

मुंबई महापालिकेत सत्तेसाठी शिवसेनेला मदत करण्याबाबत लवकरच पक्षपातळीवर निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले. मात्र भारतीय जनता पक्षाला मदत केली जाणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं पवार यांना  राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते मानद डी लिट पदवी प्रदान केली. विद्यापीठाचा १९वा दीक्षांत समारंभ काल पार पडला. यावेळी बोलतांना पवार यांनी मराठवाडा शेतीवर अवलंबून असल्यामुळे इथल्या तरुणांनी कृषी शिक्षणासाठी आग्रही असायला पाहिजे, असं मत व्यक्त केलं.

****

विख्यात साहित्यिक कुसुमाग्रज - वि. वा. शिरवाडकर यांची जयंती  मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरी करण्यात येते. या निमित्त आज राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठी भाषेशी संबधित विविध विभाग, विद्यापीठं, ग्रंथालयं, विविध शैक्षणिक संस्थांसह ठिकठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत. नाशिक इथं कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा मराठी साहित्यातील मनाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक विजया राजाध्यक्ष यांना प्रदान केला जाणार आहे.

****

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा यंदाचा ‘कविवर्य कुसुमाग्रज काव्य पुरस्कार’ ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांना जाहीर झाला आहे. तर ‘कवयित्री लीला धनपलवार काव्य पुरस्कार’ कविता महाजन यांना जाहीर झाला आहे. परिषदेच्या पत्रकात ही माहिती देण्यात आली.  परिषदेच्या औरंगाबाद इथल्या सभागृहात समीक्षक आणि कवी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. परिषदेच्या वतीनं आजचा २७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन ‘कविता दिन’ म्हणून साजरा केला जातो.

****

मुंबई इथं येत्या सहा मार्च रोजी आयोजित मराठा मोर्चा दहावी-बारावीच्या परीक्षांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. काल औरंगाबाद इथं संबंधीत समन्वय समितीची  बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

****

केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयाअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातल्या सिरसम इथं ‘माता, बाल आणि किशोरवयीन आरोग्य’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय जनजागृती अभियानाला काल सुरुवात झाली. कालच्या पहिल्या दिवशी किशोरवयीन आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं. आज या अभियानात, विद्यार्थ्यांच्या जनजागरण फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

उस्मानाबाद इथं सहकारी रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं. यासंदर्भात उस्मानाबाद इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईतले प्रसिध्द डॉक्टर पद्मभूषण नंदू लाड यांनी या रुग्णालय उभारण्यासंदर्भात यावेळी माहिती दिली. या प्रस्तावित रुग्णालयाला तुळजाभवानी सहकारी रुग्णालय असं नाव देण्याचा ठरावही यावेळी घेण्यात आला.

//******//

Sunday, 26 February 2017

26 February 2017 Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 26 February 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

निवडणुकीचा प्रचार करताना राजकीय पक्षांनी स्वत:वर काही बंधनं घालावीत, अशी सूचना निवडणूक आयोगानं केली आहे. निवडणुकीला धार्मिक रंग देण्याच्या उद्देशानं काही नेते याप्रकारचे मुद्दे अधोरेखित करतात आणि त्यामुळे प्रक्षोभक विधानं केली जातात, असं आयोगानं सगळ्या मान्यताप्राप्त पक्षांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. अशा प्रकारची भाषणं निकोप वातावरणासाठी बाधक असून, हा गंभीर मुद्दा असल्याचं आयोगानं नमूद केलं आहे. अलिकडेच दिलेल्या एका निकालात सर्वोच्च न्यायालयानं जात, धर्म आणि वंश या मुद्यांवर मत मागण्यास बंदी घातली आहे. 

****

स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या ५१व्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली आहे. सक्षम आणि विकसित भारताचं स्वप्न पाहणारे वीर सावरकर हे खरे देशभक्त होते असं पंतप्रधानांनी सोशल मिडीयावर दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय सहभाग घेणाऱ्या सावरकरांनी सशस्त्र लढ्याचा पुरस्कार केला आणि विद्यार्थ्यांना तसंच समविचारी लोकांना संघटीत केलं. आयुष्यातली अनेक वर्ष त्यांना अंदमान इथल्या तुरुंगात घालवावी लागली.

****

सार्वजनिक क्षेत्रातल्या प्रमुख बँकांचे कर्मचारी परवा मंगळवारी संपावर जाण्याची शक्यता आहे. बँकिंग क्षेत्रातल्या वाढत्या थकीत कर्जांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याच्या मुद्यासह अन्य मागण्यांसाठी हा संप होणार आहे. खाजगी बँकांचा मात्र या संपात सहभाग नसेल. बँक कर्मचारी संघटना आणि बँक व्यवस्थापन संघटनेदरम्यान गेल्या आठवड्यात झालेली चर्चा निष्फळ ठरल्याचं बँक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सी.एच.वेंकटचलम यांनी आज नवी दिल्ली इथं पीटीआयला सांगितलं.

****

ऐतिहासिक वास्तुवैभवाचं जतन आणि संवर्धन करणं ही काळाची गरज असून, या वास्तू वैयक्तिक संपत्ती समजून प्रत्येकानं त्याचं जतन करावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबई इथं एशियाटिक सोसायटी मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नूतनीकरण केलेल्या सभागृहाच्या उदघाटनप्रसंगी ते आज बोलत होते. या सभागृहात अनेक प्रकारची दुर्मिळ आणि उपयुक्त पुस्तकं उपलब्ध असून, वाचकांनी याचा लाभ घ्यावा असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

****

कृषीप्रधान वर्गाच्या क्षमतांचा विकास साधणाऱ्या शिक्षणाची गरज असल्याचं, माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या १९व्या दीक्षांत समारंभात ते आज प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कृषी शिक्षणामुळे नवीन संसाधन संपत्ती निर्मितीचे मार्ग उपलब्ध होतील, असं ते म्हणाले. मराठवाडा हा प्रदेश शेतीवर अवलंबून असल्यामुळे इथल्या तरुणांनी कृषी शिक्षणासाठी आग्रही असायला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. राज्यपाल तथा कुलपती सी विद्यासागर राव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी पवार यांना राज्यपालांच्या हस्ते मानद डी लिट पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं.

****

पोलीस अधिकाऱ्यांविरुध्दच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी येत्या महिनाभरात राज्य तक्रार निवारण प्राधिकरण कार्यान्वित करण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयानं राज्य शासनाला केली आहे. विभागीय तक्रार निवारण प्राधिकरणांची स्थापना करण्यासाठी सरकारनं सकारात्मक पावलं उचलावीत आणि ही प्रक्रिया येत्या २० मार्चपर्यंत पूर्ण करावी असं न्यायालयानं सांगितलं आहे.

****

केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयाअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातल्या सिरसम इथं ‘माता, बाल आणि किशोरवयीन आरोग्य’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय जनजागृती अभियानाला सुरुवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी किशोरवयीन आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं. उद्या विद्यार्थ्यांच्या जनजागरण फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा यंदाचा ‘कविवर्य कुसुमाग्रज काव्यपुरस्कार’ ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांना जाहीर झाला आहे. तर ‘कवयित्री लीला धनपलवार काव्य पुरस्कार’ कविता महाजन यांना जाहीर झाला आहे. परिषदेच्या पत्रकात ही माहिती देण्यात आली. उद्या परिषदेच्या औरंगाबाद इथल्या सभागृहात समीक्षक आणि कवी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. परिषदेच्या वतीनं उद्याचा २७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन ‘कविता दिन’ म्हणून साजरा केला जातो.

****

औषधांमध्ये असणाऱ्या घटकद्रव्यांचं उत्पादन वाढवण्यावर सरकारनं भर दिला पाहिजे असं एका राष्ट्रीय संस्थेनं म्हटलं आहे. जैविक घटकांचा अभ्यास करणाऱ्या या संस्थेनं केलेल्या सर्वात मोठ्या औषध गुणवत्ता सर्वेक्षणात ही बाब नमूद करण्यात आली. सर्वेक्षण केलेल्या औषधांपैकी ९० टक्के औषधं चीनी बनावटीची असल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत या संस्थेनं कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी तसंच औषध नियामक विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी एक प्रशिक्षण संस्था सुरु करण्याची शिफारस केली आहे.

****

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...